गुरुवार, ४ सप्टेंबर, २०२५

उद्योजकांनी मिलाप प्रणालीचा लाभ घ्यावा - प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे

सांगली, दि. 4 ( जि. मा. का.) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या औद्योगिक वसाहतीतील भूखंडाचे वितरण आता ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. या संबंधी एमआयडीसी इंडस्ट्रीयल लॅन्ड अॅप्लिकेशन अॅन्ड अलॉटमेंट पोर्टल (मिलाप) या संगणकीय प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले असून जिल्ह्यातील उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. या प्रणालीचा उपयोग औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी भूखंडांचे वाटप करण्यासाठी होणार आहे. आर्थिक वाढीला चालना देऊन गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी एमआयडीसीचा नवोपक्रम आहे. याद्वारे उपलब्ध भूखंडांची यादी, सहज-सोपी प्रक्रिया, ऑनलाईन पेमेंट, स्वयंचलित, पारदर्शक आणि तात्काळ मंजूरीसह प्रक्रिया प्रदान करते. गुंतवणूकदारांना आवश्यक धोरणात्मक क्षेत्रांना प्राधान्य यासह मिलाप ही प्रणाली व्यवसाय सुलभतेचा समर्पक आहे. भूखंडांसाठी अर्ज करण्यारकीता पर्याय औद्योगिक भूखंडांचे थेट वाटप - अति. विशाल / अति. विशाल प्रकल्प/ सामंजस्य करार, केंद्र / राज्यस्तरीय सार्वजनिक उपक्रम इत्यादी अंतर्गत अटी पूर्ण करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी औद्योगिक भूखंडांचे थेट वाटप. ई- बिडींग (औद्योगिक भूखंडांसाठी) - या प्रक्रियेद्वारे औद्योगिक भूखंडांसाठी गुंतवणूकदाराना ई-बिडींग (ऑनलाईन पध्दतीने) करण्याची मुभा मिळते. ई- बिडींग (निवासी आणि व्यावसायिक भूखंडांसाठी) - या प्रक्रियेद्वारे निवासी आणि भूखंडांसाठी गुंतवणूकदारांना ई-बिडींग (ऑनलाईन पध्दतीने) करण्याची मुभा मिळते. अर्जाची प्रक्रिया - https://milaap.midcindia.org/ या संकेतस्थळावर नोंदणी करून लॉग इन करा. आपल्या भूखंडाच्या आवश्यकतेनुसार तसेच पात्रतेनुसार प्रक्रिया निवडा. भूखंडाच्या प्रकारानुसार आपला अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. प्रक्रिया शुल्क आणि ई-बिडींगसाठी इसारा रक्कम (EMD) भरून अर्ज पूर्ण करा आणि सबमिट करा. विस्तृत प्रकल्प अहवालाची (DPR) संबंधित अधिकाऱ्यांमार्फत छाननी केली जाईल. प्राप्त अर्जाची छाननी, भूखंड वाटप समिती (LAC) बैठकीची तारीख, अर्जाचा संदर्भ क्रमांक ई-मेलद्वारे प्राप्त करा. भूखंड वाटप समितीची (LAC) बैठक नियोजित करून अर्ज मंजूर निर्णयानंतर अर्जदारास देकार पत्र (Offer letter) प्रणालीव्दारे (System Generated) प्राप्त होईल. अंतिम इसारा रक्कम ऑनलाईन भरून भूखंड वाटप पत्र ऑनलाईन पध्दतीने (System generated) प्राप्त होईल. भूखंडाची शिल्लक रक्कम (BOP) ऑनलाईन भरा. प्राथमिक करारनामा करा आणि भूखंडाचा ताबा घ्या. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा