गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५

पलूस येथील जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अर्ज भरण्याची 23 सप्टेंबर अंतिम मुदत

सांगली, दि. 18 (जि. मा. का.) : पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालय पलूस येथे शैक्षणिक सत्र 2026-2027 साठी इयत्ता 9 वी आणि 11 वी कला व विज्ञान या शाखांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया 25 जुलै 2025 पासून सुरु झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक 23 सप्टेंबर 2025 आहे. सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. ही प्रवेश परीक्षा दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी पलूस येथील केंद्रावर होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2026-2027 साठी जवाहर नवोदय विद्यालय पलूस येथे विज्ञान शाखेबरोबरच कला शाखा सुरू करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील 8 वी च्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थी 9 वी करीता https://cbseitms.nic.in/2025/nvsix 9 या लिंकवर तसेच 10 वी च्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थी 11 वी करीता https://cbseitms.nic.in/2025/nvsxi 11 या लिंकवर प्रवेश अर्ज करू शकतात. प्रवेश अर्ज भरताना काही समस्या असल्यास विद्यालयाचे शिक्षक श्रीकांत देशपांडे मो.नं. 7972870877, विलास शहापूरकर मो. नं. 9423575901 यांच्याशी संपर्क करावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा