शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५

नगर भूमापन अधिकारी कार्यालय सांगली येथे सोमवारी फेरफार अदालत

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दिनांक 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा अंतर्गत नगर भूमापन अधिकारी कार्यालय सांगली येथे सोमवार, दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरफार अदालतीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नगर भूमापन अधिकारी सुवर्णा मसणे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच महाभूमी पोर्टलवरील सेवांची माहिती देण्याकामी नगर भूमापन अधिकारी कार्यालय सांगली, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला, ब्लॉक नं. 102, सांगली मिरज रोड, विजयनगर, सांगली येथे फेरफार अदालतीचे 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा