मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६

सेवा संकल्प अभियानांतर्गत वाळेखिंडी येथील विद्यालयात करिअर समुपदेशन

सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील श्री. सिद्धनाथ हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांना सरकारी योजनांची जागरुकता व करिअर समुपदेशनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कौशल विकास विभागाचे संतोष माने यांनी कौशल्य विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या योजनांची माहिती सांगून करिअर समुपदेशनबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली येथे सुरु असलेल्या ग्रंथालय सदृश्य अभ्यासिका व मॉडेल करिअर सेंटरचा लाभ घेण्याचे आवाहन केले. महाविद्यालयातील युवक-युवतींनी या सत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद देत करिअर व रोजगाराच्या संधींबाबत विविध प्रश्न विचारून सेवा संकल्प अभियानाचा लाभ घेतला. या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका रुक्मिणी गुलाबराव शिंदे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या जिल्हा समन्वयक दया उगले, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा