बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२६

सेवा संकल्प अभियानांतर्गत लाभार्थ्यांच्या घरी ‘आशीर्वादाचा दिवा’

सांगली, दि. 14 (जि. मा. का.) : सेवा संकल्प अभियानांतर्गत शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधण्याबरोबरच आशीर्वादाचा दिवा’ लावण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत तासगाव तालुक्यातील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रमाई घरकुल योजनेचे लाभार्थी शशिकांत देवकुळे यांच्या घरी भेट देऊन ‘आशीर्वादाचा दिवा’ लावण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच, वाकुर्डे खुर्द येथील प्रेरणा स्वयंसहाय्यता शेतकरी बचत गटाच्या मिनी ट्रॅक्टर योजनेच्या लाभार्थी व सचिव उषा घेवदे व सागाव येथील ताराबाई मागासवर्गीय महिला बचत गटाच्या मिनी ट्रॅक्टर योजनेच्या लाभार्थी व गटाच्या अध्यक्षा मधुबाला पांडुरंग कांबळे यांच्या घरी भेट देऊन ‘आशीर्वादाचा दिवा’ लावण्यात आला. यावेळी त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) तसेच समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. या ठिकाणी शिराळा येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाचे अधीक्षक विक्रम पाटील उपस्थित होते. शासकीय योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मिळालेल्या सुविधांची माहिती घेणे, त्यांच्याशी थेट संवाद साधणे आणि विविध योजनांची माहिती देऊन त्यांना पुढील प्रगतीसाठी प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा