बुधवार, १४ ऑक्टोबर, २०२६

‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती

सांगली, दि. 14 (जि. मा. का.) : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्या वतीने आरग (ता. मिरज) येथील आरग हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तसेच जिल्हा कौशल्य विकास कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. या मार्गदर्शन कार्यक्रमात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जिल्हा समन्वयक धनश्री जगताप यांनी विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची सविस्तर माहिती दिली. योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या प्रशिक्षणाच्या संधी, प्रत्यक्ष कार्यानुभवाचे महत्त्व तसेच रोजगारक्षम कौशल्यांचा विकास याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच विविध कौशल्ये आत्मसात करून रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, या दृष्टीने शासनाच्या कौशल्य विकासविषयक योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नांना श्रीमती जगताप यांनी उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधींबाबत उपयुक्त माहिती मिळाली. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा