गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२६
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक तसेच साहसी उपक्रमांत विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन २०२४-२५ व सन २०२५-२६ या वर्षांच्या पुरस्कारांसाठी पात्र व्यक्तींनी दि. १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरिता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
शासन निर्णय दि. 29 डिसेंबर 2023 व दि. 25 जानेवारी 2024 अन्वये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची सुधारित नियमावली, 2023 निश्चित करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार सन २०२४-२५ व सन २०२५-२६ या वर्षांच्या पुरस्कारांसाठी उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक / जिजामाता पुरस्कार, खेळाडू, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमांत सहभागी झालेले खेळाडू / व्यक्तींकडून दि. १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज सादर करणाऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावर दि. १२ ऑक्टोबर, २०२६ ते दि. १५ नोव्हेंबर, २०२६ या कालावधीत दि. १५ नोव्हेंबर, २०२६ रोजी रात्री ११:५९:५९ वाजेपर्यंत फक्त ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा