शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२६

कृष्णा नदीवरील उपसा बंदी शिथील

सांगली, दि. 30 (जि. मा. का.) : जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 29 ऑक्टोबर रोजी झालेल्या कालवा सल्लागार बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार कोयना धरणातून विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. तसेच बैठकीत मंत्रीमहोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार सांगली को.प. बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचण्याच्या अनुषंगाने, दि. 30 ऑक्टोबरच्या सायंकाळपासून कृष्णा नदीवरील उपसा बंदी शिथील करण्यात आली आहे. ही माहिती कृष्णा खोरे, जलसंपदा विभाग, कोल्हापूर मुख्य अभियंता (ज.सं.) अलका अहिरराव यांनी दिली आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा