शनिवार, २४ एप्रिल, २०२१

ऑक्सिजन तुटवड्यावर मात करण्यासाठी जिल्ह्यात ऑक्सिजन प्लँटस उभे करण्यावर भर - पालकमंत्री जयंत पाटील

सांगली दि. 24 (जि.मा.का.) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रूग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असल्यामुळे रूग्णांना बेड्स, ऑक्सिजन व रेमडेसिवीअर औषधाची कमतरता भासत आहे. यावर उपाययोजना म्हणून प्रशासनामार्फत बेड्सची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. बेड्स जरी उपलब्ध झाले तरी रूग्णांना ऑक्सिजन मिळणे हे महत्वाचे आहे. ऑक्सिजन पुरविण्यासाठी जिल्ह्यात ऑक्सिजन उत्पादन प्लँटस् उभे करता येतील का याबाबत जिल्हा प्रशासनाने भर द्यावा. याबरोबरच ऑक्सिजन बाहेरून आणण्यासाठी टँकर्स उपलब्ध करण्याबाबतची कार्यवाही तातडीने सुरू करा, अशा सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार अरूण लाड, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे आदि उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यात कोरोना बाधित उपचाराखाली असणाऱ्या रूग्णांची संख्या 10 हजाराहून अधिक झाली आहे. यामध्ये दररोज नवीन एक हजारहून अधिक रूग्णांची भर पडत आहे. परिस्थिती चिंताजनक आहे त्यामुळे सर्व यंत्रणा सज्ज करा. कोरोना बाधितांच्या उपचारासाठी जास्तीत जास्त रूग्णालयात व्यवस्था करण्याचा प्रयत्न प्रशासनाने करावा. काही दिवसांनंतर बेड्स अपुरे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेड्स मध्ये वाढ करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात आयुक्तांनी, ग्रामीण भागात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यवस्था करावी. यासाठी जिल्हाधिकारी यांनी समन्वय साधावा, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सर्वात मोठी अडचण ऑक्सिजनची असून गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा प्रयत्नपूर्वक सुरळीत ठेवण्यास यश आले आहे. परंतु जशी कोरोना बाधितांची संख्या वाढेल तसा पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत ताण वाढण्याची शक्यता आहे. रेमडेसिवीरचा पुरवठा केंद्र शासनाच्या हातात गेलेला असल्यामुळे व सर्व उत्पादकांवर केंद्र शासनाचे नियंत्रण असल्यामुळे तेथून महाराष्ट्राला जो रेमडेसिवीरचा पुरवठा होत आहे त्यातील काही भाग आपल्या जिल्ह्याला येत आहे व तो अपुरा पडत आहे. त्यामुळे केंद्र शासनाकडून रेमडेसिवीरचा महाराष्ट्राला अधिक पुरवठा व्हावा यासाठी राज्यस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. सध्या जिल्हाला प्राप्त होणारा ऑक्सिजन रूग्णालयांनी आवश्यकतेनुसारच वापर करावा. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून याचे ऑडिट करण्यात यावे. सद्यस्थितीत जे बेड्स उपलब्ध आहेत ते कदाचीत पुढील चार – पाच दिवसात संपण्याची शक्यता आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात व महानगरपालिका क्षेत्रात आणखी बेड्स वाढविण्याचा प्रयत्न सुरू करा. बेड्स वाढविले की ऑक्सिजनही वाढवावा लागतो. त्या दृष्टीने सतर्क राहून जिल्हा प्रशासनाने सर्वोतोपरी प्रयत्न करावेत. कोरोना लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी पॉझीटीव्ह आलेल्या रूग्णांच्या ठिकाणांना प्रसंगानुरूप कंटेनमेंट झोनमध्ये परावर्तीत करावे. या ठिकाणच्या व्यक्ती बाहेर पडू नयेत याबाबत कडक बंदोबस्त करण्यात यावा. ग्रामस्तरावर ग्रामपंचायतींनी ग्रामसमित्या सक्रीय कराव्यात. प्रसंगी कठोर निर्णय घेवून कोरोनाचा फैलाव होणार नाही याबाबत उपाययोजना कराव्यात. यासाठी लागणारी मदत जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात यावी, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील यांनी 18 वर्षावरील सर्वांनाच आता कोरोना लसीकरण करण्यात येणार असल्याने लसीकरणाच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने याबाबतचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना यावेळी दिल्या. कोरोना बाधितांची संख्या कमी करावयाची असेल तर लोकांनी घरात राहून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी ग्रामसमित्या सक्रीय करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रामधील नर्सेस, आशा वर्कर्स यांना थर्मल गन, ऑक्सिमीटर यासारख्या ज्या आरोग्य विषयक सामुग्री पुरविण्यात आल्या आहेत याबाबतची तपासणी करून त्या कार्यरत आहेत किंवा कसे याबाबत प्राथम्याने जाणून घेणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी या साधनसामग्री नादुरूस्त असतील त्या ठिकाणी त्या तातडीने दुरूस्त करून देण्याची कार्यवाही प्रशासनाने करावी. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या व्यक्ती बाहेर फिरणार नाहीत याबाबतची कडक अंमलबजावणी पोलीस प्रशासनाकडून करण्यात यावी. कोरोना रूग्णालये कार्यान्वीत आहेत अशा रूग्णालयातील ऑक्सिजन व व्हेंटीलेटर, फायर यंत्रणा याची तातडीने तपासणी झाल्यास संभाव्य अपघात घडणार नाहीत, असे सांगून राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, लसीकरण हे प्रत्येक गावात पोहोचवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. ज्या गावांमध्ये अद्यापही लसीकरण पोहोचले नाही अशा गावांमध्ये लसीकरण करण्याबाबत प्रशासनाने करावी. रेमडेसिवीअर औषध हे उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासनाने दैनंदिन पाठपुरावा करावा, असे आदेश दिले. मिरज येथील महानगरपालिकेने उभारलेल्या कोविड रूग्णालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मिरज शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज मिरज येथे महानगरपालिकेने उभारलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार डॉ. सुरेश खाडे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस आदि उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, महानगरपालिकेने मिरज शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज मिरज येथे कोरोना बाधितांवर उपचारासाठी 132 ऑक्सिजनेटेड बेड्सची व्यवस्था केली आहे. त्यामुळे फार मोठी मदत सांगली जिल्ह्यातील तसेच महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्येला झाली आहे. या ठिकाणी 200 बेड्स पर्यंतची वाढ होवू शकते अशी व्यवस्था महानगरपालिकेने निर्माण केली आहे. पुढच्या 15 ते 20 दिवसात जर रूग्णांची संख्या वाढली तर त्या रूग्ण संख्येला कुठे ठेवायचे हा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनेटेड बेड्स वाढविण्याचे काम सुरू असून यामध्ये आणखी वाढ करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. पॉझिटीव्ह आहे परंतु घरी रहायला जागा नाही अशा रूग्णांसाठीही येथे महापालिकेने सोय केली आहे. या ठिकाणी महानगरपालिकेने सर्व खानपानाची चांगली सोय उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 000000

शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

कोव्हिड' काळातील मानसिक आरोग्य जपण्यासाठी ' विश्वास ' हेल्पलाईन.. जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम

कोव्हिड' काळातील मानसिक आरोग्य जपण्यासाठी ' विश्वास ' हेल्पलाईन.. जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम तज्ञ संस्था म्हणून 'शुश्रुषा'संस्था विविध उपक्रम राबविणार सांगली,दि.24,(जि.मा.का): राज्यासह सांगली जिल्ह्यात वेगाने पसरणाऱ्या कोरोना आपत्तीमुळे भयग्रस्त होऊ नये. लॉकडाऊनमुळे येणारा आर्थिक ताण, भविष्याविषयी काळजी, आजाराविषयीची वाढती भीती, समज-गैरसमज यामुळे लोकामध्ये मानसीक आजारपण वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय यांच्यावतीने विश्वास.. कोरोना सोबत जगण्याचा..! हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे , अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. कोव्हीड आपत्तीचा दुष्परिणाम शरीरा इतकाच माणसांच्या मनावरही होत आहे. त्यामुळे अनेकदा व्यसनाधीनता, कौटुंबिक वाद-विवाद याबरोबरच कोव्हिडपश्चात रुग्णामध्ये आत्महत्येचे विचार येऊ नयेत व सामान्य नागरिकांच्या मनातील कोव्हीडविषयी अकारण भीती कमी व्हावी या हेतूने जिल्हा प्रशासनाच्यावतीने ' हा अभिनव उपक्रम हाती घेवून मानसशास्त्रीय हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. या उपक्रमाचा फायदा प्रत्येक कोव्हिड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना होईल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला. ही योजना सामान्य माणसाला आधार देणारी असल्याने प्रशासनास सर्व घटकांनी मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. जिल्हाधकारी डॉ. अभिजित चौधरी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या विश्वास कोरोना सोबत जगण्याचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी तज्ञ संस्था म्हणून इस्लामपूर येथील शुश्रुषा सल्ला, मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्था कार्य करणार आहे. शुश्रुषा संस्थेचे अध्यक्ष व मानस तज्ञ कालिदास पाटील म्हणाले, सध्याच्या वास्तव परिस्थितीला सामोरे जाता न येणाऱ्या अनेक व्यक्तींना आत्महत्येपासून वाचविण्यासाठी व कोरोना सोबत भीतीमुक्त जगण्यासाठी शुश्रुषाच्या मानसतज्ञांची टीम कार्यरत राहणार आहे. 9422627571 हा योजनेचा मनोमित्र हेल्पलाईन नंबर असून या योजनेअंतर्गत रुग्णांचे चिंता, उदासीनता, ताण तणाव अशा विविध मानसीक त्रासांचे निदान करून तज्ञांकरवी मोफत समुपदेशन सेवा देण्यात येणार आहे,सोशल मीडिया द्वारे प्रबोधन, तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. 00000

शुक्रवार, १६ एप्रिल, २०२१

नागरिकांच्या सुविधेसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात अँबुलन्स कंट्रोल रूम कार्यान्वित

सांगली, दि. १६, (जि. मा. का.) : कोरोना बाधीत रूग्णांना उपचाराकरिता हॉस्पीटल पर्यंत पोहोचवणे व उपचारानंतर बरे झालेले रूग्ण घरी सोडण्याकरीता खाजगी मालकीच्या नोंदणी झालेल्या अँबुलन्स नागरीकांना माफक दरात व वेळेवर मिळाव्यात याकरीता जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथे अँबुलन्स कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आली आहे. कंट्रोल रूम कडून नागरिकांना मदत, सुविधा व माहिती पुरवण्यात येतील. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथे 24 x 7 करीता अँबुलन्स कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली असून त्याचा दुरध्वनी क्रमांक 0233-2310555 आहे. या क्रमांकावर ज्या नागरिकांना खाजगी अँबुलन्सची आवश्यकता आहे, त्यांना संपर्क साधून अँबुलन्सचे बुकिंग करता येईल. अँबुलन्स बुकिंग केल्यानंतर संबंधित नागरिकांना अँबुलन्स क्रमांक, चालकाचे नाव व मोबाईल क्रमांक पुरवला जाईल. जिल्ह्यातील खाजगी हॉस्पीटलचे डॉक्टर्स यानांही कंट्रोल रूम मार्फत अँबुलन्स बुकिंग करता येईल. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, सांगली यांनी दि. 7 जुलै 2020 रोजीच्या बैठकीत खालीलप्रमाणे मंजुर केलेल्या भाडेदराप्रमाणे भाडे अदा करता येईल. अँबुलन्सचे चालक/मालक यांनी मंजुर भाडे दरापेक्षा जादा दराची आकरणी केल्यास, कंट्रोल रूमकडे तक्रार दाखल करता येईल. तक्रारीत रूग्णाचे नाव, अँबुलन्सचा क्रमांक, कोठून कोठे असे प्रवास ठिकाण, प्रवासाचा दिनांक व वेळ इत्यादी नमुद करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी केले आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, सांगली यांनी अँबुलन्स करीता मंजुर केलेले भाडेदर पुढीलप्रमाणे आहेत. मारूती व्हॅनसाठी 25 कि. मी. किंवा 2 तासाकरीता भाडेदर 550 रूपये व 25. कि. मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. भाडेदर 11 रूपये. टाटा सुमो / मारूती इको / मॅटेडोर सदृष्य वाहनांसाठी 25 कि. मी. किंवा 2 तासाकरीता भाडेदर 700 रूपये व 25. कि. मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. भाडेदर 14 रूपये. टाटा 407/स्वराज माझदा / टेंपो ट्रॅव्हलर इत्यादी वाहनांसाठी 25 कि. मी. किंवा 2 तासाकरीता भाडेदर 900 रूपये व 25. कि. मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. भाडेदर 18 रूपये. ALS/आय.सी.यु. वातानुकुलीत वाहनांसाठी 25 कि. मी. किंवा 2 तासाकरीता भाडेदर 1200 रूपये व 25. कि. मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. भाडेदर 24 रूपये आहे. 00000

शासकीय दरानुसारच एचआरसीटी चेस्ट तपासणीचे दर आकारणी करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली दि. 16 (जि.मा.का.) : कोविडच्या पार्श्वभूमीवर एचआरसीटी चेस्ट तपासणी दरावर नियंत्रण रहावे यासाठी राज्य शासनाने एचआरसीटी चेस्ट तपासणीचे दर निश्चित केले आहेत. शासकीय दरानुसारच डायग्नोस्टीक सेंटर्सनी दर आकारणी करावी, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात रेडिओलॉजीस्ट यांच्या समवेत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, डायग्नोस्टीक सेंटर्सचे रेडिओलॉजीस्ट उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोविड रूग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिक विविध तपासण्या करण्यासाठी डायग्नोस्टीक सेंटर्सवर येत आहेत. यावेळी प्रामुख्याने एचआरसीटी चेस्ट तपासणी करण्यात येते. अशावेळी कोरोना पॉझीटीव्ह असल्याचे निष्पन्न होते. यावेळी डायग्नोस्टीक सेंटर्स प्रशासनाने तातडीने आरोग्य विभागाला कळविणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ई-मेल आयडी उपलब्ध करून दिला आहे. त्यावर संबंधित माहिती तातडीने सादर करावी. कोरोना पॉझीटीव्ह येणाऱ्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसींगच्या दृष्टीकोनातून सविस्तर माहिती प्रशासनास सादर करावी. प्रामुख्याने कोरोना बाधितांचा मोबाईल क्रमांक देण्यात यावा. त्याचबरोबर संबंधित रूग्णांच्या नातेवाईकांना कोरोनाची चाचणी घेण्याबाबत तातडीने मार्गदर्शन करावे, असे सांगून डायग्नोस्टीक सेंटर्सनी चाचण्याबाबतचे दर दर्शनी भागात लावावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 00000

कोविड रूग्णांसाठी बेड्स उपलब्धतेची माहिती एका क्लिकवर - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली दि. 16 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यातील कोविड हॉस्पीटलमधील बेड्स उपलब्धतेची माहिती मिळण्यासाठी बेड इन्फॉर्मेशन ॲप विकसीत करण्यात आले आहे. बेड्स उपलब्धतेची सद्यस्थिती पाहण्यासाठी http://smkc.gov.in/Covid19mgt/CovidBedInfo.aspx या लिंकवर क्लिक करावे. तसेच 0233-2374900 किंवा 0233-2375900 या नंबरवर देखील फोन करून कोविड रूग्णालयातील बेड्स उपलब्धतेबाबतची माहिती मिळू शकते. या सुविधेचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. 00000

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदारांना मतदानासाठी प्रवास करण्यास मुभा

सांगली दि. 16 (जि.मा.का.) : 252-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीच्या अनुषंगाने दि. 17 एप्रिल 2021 रोजी पार पडणाऱ्या मतदानासाठी मतदारसंघाच्या बाहेर राज्यात किंवा राज्याबाहेर असणाऱ्या मतदारांना सदर मतदारसंघात मतदान करण्यासाठी प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. यासाठी दि. 16 एप्रिल 2021 रोजीचे सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 18 एप्रिल 2021 रोजीचे दुपारी 12 वाजेपर्यंत पासून / पर्यंत प्रवास करण्यासाठी संबंधिताकडे सोबत छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र किंवा सदर मतदारसंघात त्याचे मतदार यादीत नाव असलेला पुरावा असणे आवश्यक आहे. तसेच ब्रेक दि चेन ऑर्डरमध्ये प्रवासा संदर्भात नमूद केलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, अशा सूचना महाराष्ट्र शासनाने दि. 15 एप्रिल 2021 रोजीच्या पत्रान्वये दिल्या आहेत. 00000

रविवार, ११ एप्रिल, २०२१

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शिस्त पाळून, गर्दी टाळून घरीच राहून प्रतिकात्मक साजरी करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करा सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : कोरोनाच्या अभूतपूर्व महामारीला रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या ब्रेक द चेनच्या निर्बंधाचे पालन करून भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रतिकात्मक पध्दतीने, साधेपणाने साजरी करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती आनंदात साजरी व्हावी. पण कोरोनाची दुसरी लाट अत्यंत गंभीर स्वरूप धारण करत असून कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक असून दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येवू नये यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्रीचे 8 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे. तसेच शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान अत्यंत महत्वपूर्ण असून वंचित घटकांच्या उत्थानासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आहे. या महामानवाच्या विचारांचे, चरित्राचे स्मरण करत असताना आपण सर्वांनीच गर्दी टाळून नियम पाळून शिस्तीचे दर्शन घडवूया, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. दरवर्षी 14 एप्रिल या दिवशी डॉ. आंबेडकरांचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने जमुन तसेच जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येवून जयंती ठिकठिकाणी साजरी करतात, परंतु यावर्षी कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्यंत साधेपणाने सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजण्यापुर्वी जयंती साजरी करणे अपेक्षित आहे. दर वर्षीप्रमाणे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका यावेळी काढण्यात येऊ नयेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना त्या ठिकाणी अनुयायांची संख्या एकावेळी 5 पेक्षा जास्त नसावी. तसेच तेथे सोशल डिस्टंन्सींगचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पालन करून जयंती साजरी करण्यात यावी. कोविड-19 विषाणुच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे गर्दी करण्यास निर्बंध असल्याने व दादर, मुंबई तसेच महाराष्ट्रातील अन्य रेल्वे स्थानकावरही गर्दी करण्यास निर्बंध असल्याने शासनातर्फे जयंती निमित्त मुंबई येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायींनी चैत्यभुमी, दादर, मुंबई येथे न येता घरातुनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे. सार्वजनिक ठिकाणी गाणी, व्याख्याने, पथनाट्य इत्यादीचे सादरीकरण अथवा इतर कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमांचे केबल नेटवर्कव्दारे अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी आरोग्यविषयक उपक्रम / शिबिरे (उदा. रक्तदान) स्थानिक प्रशासनाच्या पुर्वानुमतीने आयोजित करता येतील आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करता येईल. तथापि आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टंन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. राज्यातील कोविड-19 विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. अशा सूचना राज्य शासनातर्फे देण्यात आल्या असून या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. 00000

कोविड-19 संदर्भात तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव पाहता जिल्ह्यामध्ये दररोज पॉझिटीव्ह रूग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यासाठी प्रशासनाकडून कोरोना रूग्णांना तात्काळ सुविधा उपलब्ध होण्यासाठी मोठ्या प्रमाणात खाजगी व शासकीय हॉस्पीटल अधिग्रहीत करण्यात आली आहेत. पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या रूग्णांमध्ये लक्षणे असलेली व नसलेली हे दोन्ही रूग्ण हॉस्पीटलमध्ये दाखल करून घेण्यासाठी त्या अनुषंगाने रूग्णांना दाखल करणे, डिस्चार्ज देणे व हॉस्पीटलमधील बिलाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्रशासनास प्राप्त होत आहेत. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर बेड उपल्बतेबाबत व तक्रार निवारण कक्ष (टोल फ्री) सुरू करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. जिल्हास्तरावर पुढीलप्रमाणे कक्ष सुरू करण्यात आले आहेत. (1) बेड अथवा खाटांच्या उपलब्धतेसाठी (महानगरपालिका) संपर्क क्रमांक 0233-2375500 व 0233-2374500. (2) बेड अथवा खाटांच्या उपलब्धतेसाठी (जिल्हा परिषद) संपर्क क्रमांक 0233-2374900 व 0233-2375900. (3) तक्रार निवारण कक्ष (टोल फ्री) क्रमांक 1077. 00000

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयांची जिल्ह्यात कठोर अंमलबजावणी होणार - पालकमंत्री जयंत पाटील

सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : कोरोना बाधितांची वाढती संख्या पहाता लॉकडाऊन अथवा कठोर निर्बंध याबाबत राज्य शासन जे निर्णय घेईल त्या निर्णयांची जिल्ह्यात कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. सांगली जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या संबंधिच्या अनेक उपाययोजना जिल्ह्यात सुरू आहेत त्याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांची बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, खासदार संजय पाटील, सर्वश्री आमदार मोहनराव कदम, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, अरूण लाड, सुधीर गाडगीळ, अनिल बाबर, मानसिंगराव नाईक, विक्रम सावंत, श्रीमती सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट गंभीर होत असून कोरोना आता जीवनशैलीचा भाग बनत आहे. प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व या आजाराची गंभीरता कमी करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्या असणारा लसीकरणाचा वेग चांगला असला तरी तो अधिक वाढला पाहिजे. याबरोबरच कोरोना बाधीत रूग्ण अनेकदा होम आयसोलेशनच्या नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर फिरताना आढळतात. अशा रूग्णांवर कारवाई करण्याचे निर्देश देतानाच पालकमंत्री जयंत पाटील यांनी पोलीस पाटील, आशा वर्कर्स व ग्राम दक्षता समित्यांनी अधिक दक्ष राहून कोरोना बाधीत रूग्ण घराबाहेर पडणार नाहीत याची काटेकोर दक्षता घ्यावी. रेमडेसिव्हीअरचा काळाबाजार होवू नये याबाबत संबंधित यंत्रणांनी खबरदारी घेत असतानाच तक्रार प्राप्त झाल्यास काळाबाजार करणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करावी. कोरोना बाधीत रूग्णांकडून जादा बिलाची आकारणी होवू नये, सर्वांना माफक दरात आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्रशासन आणि आपली यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्याचे निर्देशित करून येत्या काळात कोरोनाचे संकट वाढेल असे गृहीत धरून संपूर्ण तयारी करावी. यावेळी त्यांनी जिल्हा क्रीडा संकुल येथील कोरोना सेंटरही तातडीने सुरू करावे, असे निर्देशित केले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या रूग्णांना हॉस्पीटल उपलब्ध न होणे ही बाब उचीत नसून बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम 24x7 कार्यरत ठेवावी. या ठिकाणच्या दूरध्वनी क्रमांकाच्या हेल्पलाईन्स वाढवून घ्याव्यात. तसेच दररोज सकाळी सर्व लोकप्रतिनिधींना जिल्ह्यातील उपलब्ध बेड संदर्भातील माहिती उपलब्ध करून द्यावी. यावेळी ग्रामीण रूग्णालयांच्या ठिकाणी अपुऱ्या मनुष्यबळाचा मुद्दा मांडला, यावर अशा ठिकाणी लवकरात लवकर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. त्या संदर्भात जिल्हास्तरावर भरती प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. लॉकडाऊन संदर्भातील व्यापाऱ्यांची भूमिका राज्य सरकारला कळविण्यात येईल, असे सांगतानाच कोरोनाचे संकट महाभयंकर आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी केले. या बैठकीत जिल्ह्यात 33 ठिकाणी डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल (DCH), 10 ठिकाणी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (DCHC), 11 ठिकाणी कोविड केअर सेंटर (CCC) अशा 54 ठिकाणी उपचारांची सुविधा उपलब्ध असून या ठिकाणी 3 हजार 160 बेड्स आहेत. यापैकी 1 हजार 977 ऑक्सिजिनेटेड बेड्स तर 600 आयसीयु बेड्स पैकी 245 बेड्सना व्हेंटीलेटर आणि 76 बेड्सना एचएफएनओ सुविधा आहेत. जिल्ह्यात 625 लहान ऑक्सिजन सिलेंडर, 1 हजार 117 जंबो सिलेंडर, 61 ड्युरा सिलेंडर, 7 ऑक्सिजन टँक (एकूण क्षमता 48.84 के.एल.). सद्यस्थितीत जानेवारी 2021 पासून आत्तापर्यंत 1 लाख 35 हजार 76 कोरोना नमुना चाचणी झाली असून जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 5.53 आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर टेस्टींग सुरू असून आरटीपीसीआर (RT-PCR) चाचण्यांची संख्यांही वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले. सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम अधिक सक्षम करून तालुकास्तरावरही हेल्पलाईन सुरू करावी. ग्राम दक्षता समित्या पुन्हा एकदा कार्यक्षम कराव्यात. पोलिस यंत्रणेनेही गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करावी. सांगली जिल्हा लसीकरणामध्ये राज्यात अग्रेसर आहे. याबद्दल अभिनंदन करतानाच सामुहिक गर्दी होवू नये यासाठी नागरिकांनी स्वत: दक्षता घ्यावी व गर्दी टाळावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 00000

मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये आणखी काही अत्यावश्यक सेवांचा समावेश - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली दि. 6 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावास आळा बसण्यासाठी दि. 5 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशान्वये प्रतिबंधात्मक आदेश दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत पारित करण्यात आला आहे. राज्य शासनाने दि. 4 एप्रिल 2021 रोजी जारी केलेल्या आदेशामध्ये दि. 5 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशान्वये काही अत्यावश्यक सेवा म्हणून अतिरिक्त बाबींचा समावेश केला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. 5 एप्रिल 2021 रोजी जारी केलेल्या आदेशामध्ये पुढील बाबींचा समावेश केला आहे. (१) अत्यावश्यक सेवांमध्ये पुढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे. (अ) पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने, (ब) सर्व प्रकारची माल वाहतूक सेवा (क) डेटा केंद्रे, क्लाउड सेवा वितरक, पायाभूत सुविधा आणि सेवांसाठी आवश्यक माहिती व तंत्रज्ञान सेवा, (इ) शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा (ई) फळ विक्रेता. (२) खाली नमूद खाजगी संस्था, कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या सर्व कर्मचारी यांचे लवकरात लवकर लसीकरण करण्याचे व जोपर्यंत लसीकरण करून घेतले जात नाही तोपर्यंत 15 दिवसापर्यंत वैध असेल असा कोरोना चाचणी निगेटिव्ह प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) सोबत बाळगण्याच्या अटीवर सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 वाजल्यापासून ते रात्री 08.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल. लसीकरण व RT-PCR चाचणी विषयक नियम दि. 10 एप्रिल 2021 रोजी पासून अंमलात येईल. आवश्यक ते प्रमाणपत्र सोबत नसल्यास संबंधीताकडून 1 हजार रूपये दंड आकरण्यात येईल. (अ) भारतीय सुरक्षा आणि विनियमन मंडळ (SEBI) ची कार्यालये आणि SEBI मान्यताप्राप्त बाजार मुलभूत संस्था उदा. स्टॉक एक्सचेंज, डिपॉजिटर्स व क्लेअरिंग कॉर्पोरेशन्स व SEBI कडे नोंदणीकृत असलेले एजंट. (ब) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिनस्त असलेल्या संस्था व मध्यस्थीच्या समावेशासह स्टँडअलोन प्राइमरी डीलर्स (Intermediaries including standalone primary dealers), क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL), पेमेंट सिस्टम ऑपरेटर, RBI ने नियमन केलेल्या बाजारामध्ये सहभागी होणारे वित्तीय बाजार. (क) सर्व नॉन बॅकिंग वित्तीय महामंडळे (ड) सर्व सूक्ष्म वित्तीय संस्था (इ) सर्व वकील यांची कार्यालये (फ) लस / औषधे / जीवनरक्षक औषधे संबंधित वाहतूक हाताळणारे कस्टम हाऊस एजंट / परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स. (३) ज्या व्यक्ती सोमवार ते शुक्रवार रात्री 08.00 वाजल्यापासून ते सकाळी 07.00 वाजेपर्यंत व शुक्रवार रात्री 08.00 वाजल्यापासून ते सोमवार सकाळी 07.00 वाजेपर्यंत रेल्वे/बसेस/विमाने यातून आगमन किंवा प्रस्थान करणार असेल त्याला अधिकृत तिकीट सोबत बाळगणे बंधनकारक असेल. जेणेकरून संबंधित व्यक्ती संचारबंदी कालावधीत स्थानकापर्यंत किंवा घरी प्रवास करू शकेल. (४) औद्योगिक कामगारांना / कर्मचारी यांना खाजगी बस /खाजगी वाहनाने त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे सोमवार ते शुक्रवार रात्री 08.00 वाजल्यापासून ते सकाळी 07.00 वाजेपर्यंत व शुक्रवार रात्री 08.00 वाजल्यापासून ते सोमवार सकाळी 07.00 वाजेपर्यंत कामाच्या वेळेनुसार प्रवास करण्यास परवानगी असेल. (५) जिल्ह्यातील सर्व प्रार्थनास्थळे सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आली आहेत. परंतु त्या ठिकाणी सुरू असलेल्या नित्यनियमाच्या धार्मिक पूजा अर्चा यांना परवानगी असणार आहे. एखाद्या धार्मिक स्थळी विवाह किंवा अंत्यसंस्कार संबंधित पूजा, प्रार्थना यांना लग्न समारंभ व अंत्यसंस्कार यांना राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याच्या अटीवर परवानगी देण्यात येत आहे. (६) परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांस सदर परिक्षेस व्यक्तीश: उपस्थित राहणे आवश्यक आहे, अशावेळी परिक्षेच्या ठिकाणाहून सोमवार ते शुक्रवार रात्री 08.00 वाजल्यानंतर व शुक्रवार रात्री 08.00 वाजल्यापासून ते सोमवार सकाळी 07.00 वाजेपर्यंत प्रवास करण्यास परवानगी असेल. तथापी, या कालावधीत परिक्षेचे प्रवेशपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असेल. (७) शनिवार, रविवार या संचारबंदी कालावधीत विवाह समारंभ असल्यास कोविड-19 च्या अनुषंगाने राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याच्या अटीवर सदर विवाह समारंभास परवानगी असेल. या व्यतिरिक्त यापूर्वी आदेशाने बंदी अथवा सूट देण्यात आलेल्या क्रिया/बाबी कायम राहतील. सूट देण्यात आलेल्या आस्थापनांनी, शासनाने त्या-त्या विभागासाठी, आस्थापनांसाठी नेमून दिलेल्या मार्गदर्शक सूचचांचे पालन करणे बंधनकारक राहील. या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधिक्षक, Incident Commander तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी. हा आदेश दि. 6 एप्रिल 2021 पासून दि. 30 एप्रिल 2021 रोजीचे रात्री 11.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आदेश दिले आहेत. 000000

सोमवार, ५ एप्रिल, २०२१

वाढता कोरोना रोखण्यासाठी जिल्ह्यात 30 एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लागू - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन व्हावे सांगली दि. 5 (जि.मा.का.) : राज्य शासनाकडील दि. 27 मार्च 2021 च्या आदेशातील निर्देशानुसार सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत दिनांक 15 एप्रिल 2021 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आलेली होती. आता राज्य शासनाकडील दि. 4 एप्रिल 2021 च्या आदेशानुसार दि. 30 एप्रिल 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता काही प्रतिबंध घालण्यात आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. 1 व 15 ऑक्टोबर 2020 रोजी जारी केलेल्या आदेशांना मुदतवाढ दिली आहे. तसेच सांगली जिल्ह्यात दि. 30 एप्रिल 2021 रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे आदेश दिले आहेत. 1. जमाव बंदी व संचार बंदी अ. सांगली जिल्ह्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करणेत येत आहे. ब. सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते रात्रीचे 08.00 वाजे पर्यंत 5 पेक्षा जास्त व्यक्तीना कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई असेल. 1. सोमवार ते शुक्रवार रात्रीचे 8.00 वाजल्यापासून ते सकाळी 07.00 वाजेपर्यंत, तसेच शुक्रवार रात्री 08.00 वाजलेपासून ते सोमवार सकाळी 07.00 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही नागरिकांस वैध कारणाशिवाय फिरण्यास किंवा खालील नमूद कारणास्तव दिलेल्या परवानगीशिवाय फिरता / वावरता (संचारबंदी) येणार नाही. ड. वैद्यकीय व अत्यावश्यक सेवांना सदर मनाई आदेशातून वगळणेत येत आहे. इ. अत्यावश्यक सेवा खालील प्रमाणे असतील. i. रुग्णालये, निदान केंद्रे (Diagnostic Centers), दवाखाने, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने (Pharmacies), औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा ii. किराणा, भाजीपाला, दुग्ध पदार्थ, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने iii. सार्वजनिक वाहतूक, रेल्वे, टैक्सी, रिक्षा व सार्वजनिक बसेस iv. स्थानिक प्राधिकरणांचे मान्सूनपूर्व उपक्रम v. स्थानिक प्राधिकरणांच्या सर्व सार्वजनिक सेवा vi. वस्तूंची वाहतूक vii. शेतीविषयक सेवा viii. ई - व्यापार ix. मान्यताप्राप्त माध्यमे x. गॅस एजन्सी व पेट्रोल, डीझेल पंप 2. मैदानी / सार्वजनिक ठिकाणच्या क्रिया (Outdoor Activity) अ. सर्व सार्वजनिक ठिकाणे ( उदा. बगीचे, मैदाने व इतर ) सोमवार ते शुक्रवार रात्रीचे 8.00 वाजलेपासून ते सकाळी 07.00 वाजेपर्यंत, तसेच शुक्रवार रात्री 08.00 वाजलेपासून ते सोमवार सकाळी 07.00 वाजेपर्यंत बंद राहतील. ब. सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 वाजलेपासून ते रात्रीचे 8.00 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी (उदा. बगीचे, मैदाने व इतर ) भेट देणाऱ्या व्यक्तींनी कोव्हीड-19 च्या अनुषंगाने देणेत आलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल. क. स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सार्वजनिक ठिकाणी ( उदा. बगीचे, मैदाने व इतर ) भेट देणाऱ्या व्यक्तींकडून राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने कोव्हीड-19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन होत असलेबाबतची तपासणी करावी. स्थानिक स्वराज्य संस्था यांना सदर ठिकाणी नागरिकाकडून कोव्हीड- 19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन होत नसलेचे निदर्शनास आलेस त्यांनी तात्काळ सदरचे ठिकाण नागरिकांसाठी बंद करावे. 3. दुकाने, बाजार पेठा व मॉल्स अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा व मॉल्स पूर्णपणे बंद राहतील अ. जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात भरविले जाणारे सर्व आठवडा बाजार बंद राहतील. जिल्ह्यातील अधिकृत भाजीमंड्या सुरु राहतील. ब. अत्यावश्यक सेवेतील दुकानांमध्ये / आवारामध्ये ग्राहक व विक्रेता यांनी सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असेल. जास्तीच्या ग्राहकांना प्रतीक्षेसाठी सामाजिक अंतराचे पालन होईल अशा योग्य पद्धतीने खुणा करून घ्याव्यात. क. अत्यावश्यक सेवेतील दुकान मालक व कामगार यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकानांनी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून घ्याव्यात. उदा. विक्रेता व ग्राहक यांमध्ये पारदर्शक काच किंवा इतर साहित्याचे कवच, इलेक्ट्रॉनिक पेमेंट (Electronic payment) व इतर. ड. सद्यस्थितीत बंद असणाऱ्या दुकानांच्या दुकान मालक यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्यांच्याकडे काम करीत असणाऱ्या सर्व कामगारांचे लसीकरण करून घ्यावे. तसेच त्यांना पारदर्शक काच किंवा इतर साहित्याचे कवच, इलेक्ट्रॉनिक पेमेंट (Electronic payment) वापरून ग्राहकांशी संवाद साधनेसाठी तयार करावे. जेणेकरून शासनास सदरची दुकाने लवकरात लवकर खुली करता येतील. 4. सार्वजनिक वाहतूक सार्वजनिक वाहतूक खालील प्रमाणे सुरु राहील रिक्षा - चालक + 2 प्रवासी टैक्सी ( 4 चाकी ) - चालक + RTO नियमाच्या 50 % प्रवासी बस - RTO नियमाप्रमाणे बैठकीनुसार पूर्ण क्षमतेने. उभे राहून प्रवासास परवानगी नसेल. i. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या व्यक्तींना मास्क चा वापर करणे बंधनकारक असेल. सदर आदेशाचे उल्लंघन केलेस प्रतिव्यक्ती र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल. ii. टैक्सी मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीने मास्क परिधान केला नसेल तर मास्क परिधान न करणारी व्यक्ती व वाहन चालक यांचेकडून प्रत्येकी र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल. iii. प्रत्येक प्रवासानंतर वाहनाचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल. iv. सर्व सार्वजनिक वाहतूक करणारे वाहन चालक व नागरिकांच्या संपर्कात येणारे कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे व जोपर्यंत लसीकरण करून घेतले जात नाही तोपर्यंत 15 दिवसापर्यंत वैध असेल असा कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) सोबत असणे बंधनकारक असेल. सदरचा नियम दि.10 एप्रिल 2021 रोजी पासून अंमलात येईल. टैक्सी व रिक्षा चालक यांनी स्वतःला प्रवाशांपासून प्लास्टिक आवरणाने अथवा इतर आवरणाने अलगीकरण करून घेतलेले असेल तर त्यांना सदर नियमातून सुट देणेत येईल. v. वरील पैकी कोणीही व्यक्ती कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) शिवाय / लसीकरणाशिवाय आढळून आलेस प्रत्येकी र.रु.1000/- इतका दंड आकारणेत येईल. vi. रेल्वे मध्ये कोणीही उभा राहून प्रवास करणारा प्रवासी नसेल तसेच सर्व प्रवासी यांनी मास्क परिधान केला असलेबाबतची खात्री सबंधित रेल्वे प्राधिकरणाने करावी. vii. रेल्वे मध्ये मास्क परिधान न करणाऱ्या व्यक्तीकडून प्रत्येकी र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल. 5. कार्यालये i. खालील कार्यालये वगळता सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील अ. सहकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) व खाजगी बँक ब. Bomby Stock Exchange (BSE) / National Stock Exchange (NSE) क. विद्युत पुरवठा सबंधित कंपनी ड. टेलिकॉम (Telicom) सुविधा पुरवणाऱ्या सेवा इ. विमा / वैद्यकीय हक्क सबंधित सेवा फ. औषध उत्पादन करण्यासाठी लागणारी त्यांची व्यवस्थापन कार्यालये चालू राहतील. ii. सर्व शासकीय कार्यालये 50 % क्षमतेने उपस्थितीसह चालू राहतील. परंतु ज्या अधिकारी / कर्मचारी यांचेवर कार्यालय प्रमुख यांनी कोव्हीड- 19 उपाययोजनांचे कामकाज सोपविले आहे, त्यांनी 100 टक्के क्षमतेने कार्यरत राहणेचे आहे. iii. विद्युत, पाणी, बँकिंग व वित्त सबंधित शासकीय कार्यालये / कंपनी पूर्ण क्षमतेने सुरु राहतील. iv. शासकीय कार्यालये / कंपनी यांनी आयोजित केलेल्या बैठकीस कार्यालयाबाहेरील व्यक्तींची उपस्थिती आवश्यक असलेस, अशा बैठकी Online आयोजित कराव्यात. v. अभ्यागतांना शासकीय कार्यालयात / कंपनीत येणेस प्रतिबंध असेल, त्यामुळे शासकीय कार्यालये / कंपनी यांनी e-visitor सेवा तात्काळ सुरु करावी. vi. अपवादात्मक परिस्थिती मध्ये कार्यालय प्रमुख अभ्यागतांना त्यांचेकडे मागील 48 तासामधील कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) असणेचे अटीवर पास वितरीत करून अभ्यागतांना भेटणेस परवानगी देतील. vii. सर्व शासकीय व खाजगी कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. 6. खाजगी वाहतूक खाजगी वाहतूक खाजगी बसेस सहित सोमवार ते शुक्रवार सकाळी 7.00 वाजलेपासून ते रात्री 08.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. तसेच सोमवार ते शुक्रवार रात्री 08.00 ते सकाळी 07.00 व शुक्रवार रात्री 08.00 वाजलेपासून ते सोमवार सकाळी 07.00 वाजेपर्यंत अतितात्काळ व अत्यावश्यक सेवेसाठीच सुरु राहतील. i. खाजगी वाहतूक / खाजगी बसेस RTO नियमाच्या बैठक क्षमतेनुसार सुरु राहतील. उभे राहून प्रवासास परवानगी नसेल. ii. खाजगी वाहतूक / खाजगी बसेस वाहतूक करणारे वाहन चालक व नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे व जोपर्यंत लसीकरण करून घेतले जात नाही तोपर्यंत 15 दिवसापर्यंत वैध असेल असा कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) सोबत असणे बंधनकारक असेल. सदरचा नियम दि.10 एप्रिल 2021 रोजी पासून अंमलात येईल. 7. करमणूक i. सिनेमा गृहे बंद राहतील ii. नाट्यगृहे व सभागृहे बंद राहतील. iii. करमणूक नगरी / आर्केड्स (Arcades) / व्हिडीओ गेम पार्लर बंद राहतील. iv. जल क्रीडा स्थळे बंद राहतील. v. क्लब (Clubs), जलतरण तलाव, व्यायामशाळा व क्रीडा संकुले बंद राहतील. vi. वरील आस्थापनांमधील मालक व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरणकरून घ्यावे. vii. चित्रपट / मालिका / जाहिरात यांचे छायाचित्रणास खालील प्रमाणे परवानगी असेल. अ. ज्या चित्रिकरणास मोठ्या संख्येने कलाकार उपस्थिती राहणार असतील असे चित्रिकरण टाळावे. ब. सदर ठिकाणी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीजवळ 15 दिवसापर्यंत वैध असेल असा कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) सोबत असणे बंधनकारक असेल. सदरचा नियम दि.10 एप्रिल 2021 रोजी पासून अंमलात येईल. क. कलाकार आणि संबंधित कामगार वर्ग यांचेसाठी Quarantine Bubble तयार करणेस आलेस, सदर Quarantine Bubble मध्ये प्रवेश करणेपूर्वी कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report)सादर केलेनंतर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अटी व शर्तीवर परवानगी देणेत येईल. 8. रेस्टॉरंट, बार, हॉटेल i. सर्व रेस्टॉरंट व बार पूणर्पणे बंद राहतील. ii. घेवून जाणे (take away orders), पार्सल आणि घरपोच (Home Delivery) सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 वाजलेपासून ते रात्री 08.00 वाजेपर्यंत सुरु राहील, तसेच शुक्रवार रात्री 08.00 वाजलेपासून ते सोमवार सकाळी 07.00 वाजेपर्यंत फक्त घरपोच (Home Delivery) सेवा सुरु राहील, सदर कालावधीत कोणत्याही ग्राहकाला रेस्टॉरंट व बार मध्ये प्रत्यक्ष येणे प्रतिबंधित असेल. iii. हॉटेल्स मधील रेस्टॉरंट व बार हे फक्त निवासी ग्राहकांसाठी सुरु राहील. बाहेरील ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत हॉटेल मध्ये प्रवेशास परवानगी नसेल. बाहेरील ग्राहकांसाठी वरील प्रमाणे प्रतिबंध लागू असेल. iv. घरपोच (Home Delivery) सेवा देणाऱ्या कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. जोपर्यंत लसीकरण करून घेतले जात नाही तोपर्यंत 15 दिवसापर्यंत वैध असेल असा कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) सोबत असणे बंधनकारक असेल. सदरचा नियम दि.10 एप्रिल 2021 रोजी पासून अंमलात येईल. v. सदर कर्मचारी यांनी दि.10 एप्रिल 2021 पर्यंत वरीलप्रमाणे कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) / लसीकरण करून घेतलेले नसलेस सदर व्यक्तीकडून र.रु.1000/- इतका दंड आकारला जाईल. दंडात्मक कारवाई नंतरही सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड -19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापनेची अनुज्ञप्ती रद्द किंवा सदरचे ठिकाण बंद केले जाईल. vi. रेस्टॉरंट व बार मध्ये काम करणाऱ्या कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. 9. धार्मिक प्रार्थनास्थळे अ. सर्व धार्मिक प्रार्थनास्थळे बंद राहतील. ब. धार्मिक प्रार्थनास्थळांमधील विधिवत पूजेसाठी असणाऱ्या धर्मगुरू अथवा पुजारी यांना वगळून इतर सामान्य नागरिकांना धार्मिक प्रार्थना स्थळांना भेटी देणेस मनाई असेल. क. धार्मिक प्रार्थनास्थळांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. 10. केश कर्तनालये / स्पा / सलून / ब्युटी पार्लर्स अ. केशकर्तनालये / स्पा / सलून / ब्युटी पार्लर्स बंद राहतील. ब. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. 11. वर्तमानपत्रे अ. वर्तमानपत्र छपाईस व वितरणास परवानगी असेल. ब. सकाळी 07.00 ते रात्री 08.00 पर्यंत घरपोच वर्तमानपत्र वितरण करणेस परवानगी असेल. क. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. 12. शाळा व महाविद्यालये अ. शाळा व महाविद्यालये बंद राहतील. ब. सदरचा नियम हा 10 वी 12 वी परीक्षेसाठी शिथिल असेल. परीक्षेच्या नियोजनासाठी तसेच परीक्षेसाठी नियुक्त कर्मचारी यांनी लसीकरण केलेले असावे किंवा त्यांचेकडे मागील 48 तासामधील कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) असणे बंधनकारक असेल. क. महाराष्ट्र राज्याबाहेरील कोणत्याही परिक्षा मंडळ, विद्यापीठ अथवा प्राधिकरणामार्फत सांगली जिल्हयातील विद्यार्थ्यासाठी घेणेत येणाऱ्या परीक्षांना परवानगी देणेत येत आहे. सबंधित विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास सदर परीक्षेबाबत पूर्व कल्पना देणे आवश्यक असेल. ड. सर्व प्रकारची खाजगी कोचिंग क्लासेस बंद राहतील. इ. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. 13. धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम अ. सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम प्रतिबंधित असतील. ब. ज्या जिल्हयामध्ये निवडणूका प्रस्तावित असतील, त्या ठिकाणी राजकीय सभा / मेळावे घेण्यास खालील अटी व शर्तीस अधीन राहून जिल्हाधिकारी यांचेकडून परवानगी देणेत येईल. i) भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनूसार संबंधित राजकीय मेळावे / सभा यांना बंदिस्त सभागृहासाठी 50 पेक्षा जास्त नाही किंवा सभागृहाच्या बैठक क्षमतेच्या 50 % चे अधीन राहून आणि खुल्या ठिकाणी 200 पेक्षा जास्त नाही किंवा खुल्या ठिकाणच्या क्षमतेच्या 50 % या पैकी कमी असेल त्या क्षमतेच्या अधिन राहून सर्व कोव्हीड -19 शिष्टाचाराचे पालन केले जाईल, या अटीवर परवानगी देणेत येईल. i) संबंधित परवानगी देणेत आलेल्या राजकीय सभा / मेळावे संबंधित क्षेत्राचे त्या त्या स्थानिक प्राधिकरणाकडून किंवा नेमलेल्या अधिकारी यांचेमार्फत योग्य नियमांचे पालन केले जात असलेची खात्री केली जाईल. ii) सदर ठिकाणी कोव्हीड -19 शिष्टाचाराचे उल्लंघन झालेस संबंधित ठिकाणचा जागा मालक हा यासाठी जबाबदार राहील आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नूसार दंडास पात्र राहील. गंभीर प्रकारचे उल्लंघन झाल्यास सदर ठिकाण हे कोव्हीड -19 साथ संपेपर्यत बंद करण्यात येईल. iii) एखाद्या उमेदवारांच्या दोन पेक्षा जास्त राजकीय सभा आणि मेळाव्यामध्ये सदर बाबींचे उल्लंघन झालेस, पुन्हा सदर उमेदवाराच्या राजकीय सभा / मेळाव्यास परवानगी दिली जाणार नाही. iv) कोणत्या प्रकारचे मिरवणूका, कोपरा सभा या ठिकाणी कोव्हीड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक असेल. v) वरील सर्व मार्गदर्शक सूचना या निवडणूक प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वासाठी समान राहतील. तसेच कोणत्याही प्रकारच्या तक्रारी होणार नाहीत, याविषयी दक्षता घेणे. क. 50 नातेवाईक/ नागरिकांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ करणेस परवानगी असेल. i. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण केलेले असावे. लसीकरण होईपर्यंत त्यांचेकडे वैध कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) असणे बंधनकारक असेल. ii. लग्नसमारंभाच्या ठिकाणी एखाद्या कर्मचाऱ्याकडे कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र(Negative RT-PCR Test Report) नसलेस / लसीकरण करून घेतलेले नसलेस सबंधित आस्थापनेवर र.रु.10.000/- इतका दंड आकारणेत येईल. iii. दंडात्मक कारवाई नंतरही सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड - 19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापनेची अनुज्ञप्ती रद्द किंवा सदरचे ठिकाण बंद केले जाईल. ड. अंत्यसंस्कारासाठी 20 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येणेस प्रतिबंध असेल. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण केलेले असावे आणि त्यांचेकडे वैध कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) असणे बंधनकारक असेल. 14. रस्त्याच्या कडेला असणारी खाद्य पदार्थ विक्रेते i. खाद्य पदार्थ विक्रेते यांनी त्यांचे आस्थापनेच्या ठिकाणी ग्राहकांना प्रत्यक्ष खाणेसाठी देणेस प्रतिबंध असेल. पार्सल अथवा घरपोच सेवेस सकाळी 07.00 ते रात्री 08.00 पर्यंत परवानगी असेल ii. प्रतीक्षेत असणाऱ्या ग्राहकांना आस्थापनेपासून दूर सामाजिक अंतराचे पालन होईल अशा ठिकाणी उभे राहणेच्या सूचना द्याव्यात. iii. सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड -19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापना ठिकाण बंद केले जाईल. vii. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व व्यक्तीं यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. जोपर्यंत लसीकरण करून घेतले जात नाही तोपर्यंत 15 दिवसापर्यंत वैध असेल असा कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) सोबत असणे बंधनकारक असेल. सदरचा नियम दि.10 एप्रिल 2021 रोजी पासून अंमलात येईल. iv. स्थानिक स्वराज्य संस्था यांनी CCTV द्वारे / वैयक्तिक रीत्या सदर आस्थापनांवर लक्ष ठेवून रहावे. जर एखाद्या आस्थापनाधारक अथवा ग्राहक यांचेकडून नियमांचे उल्लंघन झालेचे निदर्शनास आलेस त्यांचेवर दंडात्मक कारवाई करणेत यावी. v. स्थानिक स्वराज्य संस्था यांना असे निदर्शनास आले कि सदर आस्थापना वारवार दंडात्मक कारवाई करूनही नियमांचे उल्लंघन करीत आहे. अशा वेळेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड -19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापना ठिकाण बंद करणेत यावे. 15. उत्पादन क्षेत्र i. उत्पादन क्षेत्रास खालील अटी व शर्तीस अधीन राहून परवानगी असेल. ii. कारखाने व उत्पादन केंद्रामध्ये कामगारांच्या प्रत्येक प्रवेशावेळी शरीराचे तापमान तपासणे बंधनकारक असेल. iii. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व व्यक्तीं यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. iv. कारखाने व उत्पादन केंद्रामध्ये काम करणाऱ्या कामगार अथवा कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आलेस. कारखाने व उत्पादन क्षेत्र व्यवस्थापनाने सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीस स्वखर्चाने विलगीकरणामध्ये ठेवावे. v. ज्या कारखाने / उत्पादन केंद्रामध्ये 500 पेक्षा जास्त कामगार/ कर्मचारी काम करीत असतील अशा कारखाने / उत्पादन केंद्र व्यवस्थापनाने स्वतःचे विलगीकरण केंद्र उभे करावे. vi. जर एखादा कामगार अथवा कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला असेल तर सबंधित कारखाने / उत्पादन केंद्राचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण होईपर्यंत बंद राहील. vii. गर्दी टाळणेसाठी जेवणाच्या व चहाच्या वेळा टप्प्याटप्प्याने ठेवणेत याव्यात. एकाच ठिकाणी जेवणासाठी एकत्र येवू नये. viii. सार्वजनिक स्वच्छता गृहाचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणेत यावे. ix. सर्व कामगार / कर्मचारी / व्यक्तीं यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. जोपर्यंत लसीकरण करून घेतले जात नाही तोपर्यंत 15 दिवसापर्यंत वैध असेल असा कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) सोबत असणे बंधनकारक असेल. सदरचा नियम दि.10 एप्रिल 2021 रोजी पासून अंमलात येईल. x. जर एखादा कामगार / कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला तर त्यांस कामावरून न काढता त्यांस वैद्यकीय रजा देणेत यावी. सदर कर्मचारी पूर्ण वेतनासाठी पात्र राहतील. 16. ऑक्सिजन उत्पादक अ) कोणताही कारखाना / उत्पादन केंद्र कच्चा माल म्हणून ऑक्सिजन चा वापर करीत असेल तर त्याला दि.10 एप्रिल 2021 पासून ऑक्सिजन कच्चा माल म्हणून वापरता येणार नाही. जर दि.10 एप्रिल 2021नंतर हि एखाद्या कारखाना / उत्पादन केंद्रास वापर सुरु ठेवणेचा असेल तर तो सबंधित अनुज्ञप्ती प्राधिकरणाकडे कारणमीमांसेसह ऑक्सिजन वापराबाबत परवानगी मागेल. सर्व अनुज्ञप्ती प्राधिकरण यांनी ज्या ठिकाणी ऑक्सिजन कच्चा माल म्हणून वापरला जात आहे त्या ठिकाणी दि.10 एप्रिल 2021नंतर ऑक्सिजन चा वापर करणे थांबले बाबत तसेच जेथे वापर सुरु आहे त्यांनी परवानगी घेतली असलेबाबत खात्री करावी. ब) ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या कारखाना / उत्पादन केंद्र यांनी त्यांचे उत्पादन क्षमतेच्या 80 % उत्पादन हे वैद्यकीय कारणास्तव आरक्षित ठेवावे. सदर ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या कारखाना / उत्पादन केंद्र यांनी त्यांचे ग्राहक आणि दि.10 एप्रिल 2021 पासून सदर ग्राहकांना ऑक्सिजन पुरवठा बंद केले बाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे. 17. ई - व्यापार अ. सदर आस्थापनांवरील कामगार / कर्मचारी / व्यक्तीं यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. जोपर्यंत लसीकरण करून घेतले जात नाही तोपर्यंत 15 दिवसापर्यंत वैध असेल असा कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) सोबत असणे बंधनकारक असेल. सदरचा नियम दि.10 एप्रिल 2021रोजी पासून अंमलात येईल ब. वारंवार सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड-19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापनेची अनुज्ञप्ती रद्द केली जाईल. 18. सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) अ. कोणत्याही सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) मध्ये 5 पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेस सदर सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) ला सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल. ब. अशा संस्थांनी (Societies) संस्थेच्या मेन गेटचे ठिकाणी भेटण्यास येणाऱ्या व्यक्तींच्या माहितीसाठी सदर ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळले बाबत फलक लावावा व त्यांचा प्रवेश निषिद्ध करणेत यावा क. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रास लागू असणाऱ्या सर्व नियमांचे पालन करणे सबंधित संस्थेवर बंधनकारक असेल. (उदा. प्रवेश, पत्ता व इतर यावर परीक्षण ठेवणे) ड. कोणत्याही संस्थेने सदर नियमांचे उल्लंघन केलेस पहिल्या घटनेवेळी सबंधित संस्थेकडून र.रु.10000/- इतका दंड आकारला जाईल. त्यानंतरही नियमाचे उल्लंघन झालेस स्थानिक प्राधिकरणाने निश्चित केलेला जास्तीत जास्त दंड आकारला जाईल. सदरचा वसूल करणेत आलेला दंड हा संस्थांकडून शासन निर्देशांचे पालन होत असलेबाबत पर्यवेक्षण कामी वापरला जाऊ शकतो. इ. सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) यांनी इमारतीमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचे शासकीय नियमानुसार लसीकरण होत नाही तोपर्यंत कोरोना चाचणी अहवाल (RT-PCR Test Report) घ्यावा. 19. बांधकाम क्रिया (Costruction Activity) अ. ज्या बांधकामावर कामगार / कर्मचारी हे बांधकामाच्या ठिकाणी राहणेस आहेत त्या बांधकामांना सुरु ठेवणेस परवानगी असेल. सामानाची ने-आण वगळता बांधकामाचे ठिकाणाहून बाहेरून आत व आतून बाहेर होणारी वाहतूक प्रतिबंधित असेल. ब. सदर आस्थापनांवरील कामगार / कर्मचारी / व्यक्तीं यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. जोपर्यंत लसीकरण करून घेतले जात नाही तोपर्यंत 15 दिवसापर्यंत वैध असेल असा कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) सोबत असणे बंधनकारक असेल. सदरचा नियम दि.10 एप्रिल 2021रोजी पासून अंमलात येईल क. सदर नियमांचे उल्लंघन केलेस सबंधित बांधकाम विकसकावर (Devloper) यांचेवर पहिल्या घटनेवेळी र.रु.10000/- इतका दंड आकारला जाईल. त्यानंतरही नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड-19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित बांधकाम बंद करणेत यावे. ड. जर एखादा कामगार / कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला तर त्यांस कामावरून न काढता त्यांस वैद्यकीय रजा देणेत यावी. रजेच्या कालावधीत नियमानुसार पूर्ण वेतनासाठी पात्र राहील. 20. दंड अ. या कार्यालयाकडील आदेश क्र.गृह-1/कार्या-6/कोरोना/आरआर-19/2021 बंदी आदेश/एसआर-14/2021 दि. 27 मार्च 2021 अन्वये पारित केलेल्या आदेशामध्ये नमूद दंड या आदेशास अधिक्रमित करील. ब. वसूल करणेत आलेला सर्व दंड हा सबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे भरणेत यावा जेणेकरून सदरचा निधी हा कोव्हीड -19 च्या योग्य प्रतिबंध व उपाययोजनाकामी उपयोगात आणता येईल. या व्यतिरिक्त यापूर्वी आदेशाने बंदी अथवा सूट देणेत आलेल्या क्रिया / बाबी कायम राहतील. सूट देणेत आलेल्या आस्थापनांनी, शासनाने त्या - त्या विभागासाठी / आस्थापनांसाठी नेमून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. सदर आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, Incident Commander तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी. सदरचा आदेश दि. 05 एप्रिल 2021 रोजीचे रात्री 08.00 वाजल्यापासून ते दि. 30 एप्रिल 2021 रोजीचे रात्री 11.59 वाजेपर्यंत अंमलात राहील. 00000

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध संयमाने आणि काटेकोरपणे पाळा - पालकमंत्री जयंत पाटील

नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे सांगली दि. 5 (जि. मा. का.) : कोरोनाची दुसरी लाट मोठी असून गंभीर आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध संयमाने आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सांगली जिल्हा वासियांनी साथ द्यावी, असे आवाहन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये कोविड-19 च्या उपचारांसाठी उपयोगात आणलेली सर्व हॉस्पीटल्स पुन्हा एकदा तयार ठेवावीत. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक गंभीर असून वेगाने वाढत आहे. त्यामुळे बाधीत रूग्णांच्या उपचारासाठी पुरेशा प्रमाणात बेड्स, औषधे व ऑक्सिजन यांचा साठा उपलब्ध ठेवावा, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी यंत्रणांना दिले. कोविड उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेचा 5 टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार असून यातून कोरोना रूग्णांची संख्या वाढू नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या अनुषंगाने दैनंदिन असणारी रूग्णसंख्या, सद्यस्थितीत उपचाराखाली असणारे रूग्ण, चिंताजनक रूग्ण, कोरोना उपचारांच्या ठिकाणी उपलब्ध असणारा ऑक्सिजन साठा, पुरवठा, रेमडिसीव्हीरची उपलब्धता व अन्य औषधांची उपलब्धता आदि सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेतला. कोविड उपचार सुरू असणाऱ्या ठिकाणी आणि परिसरात सीसीटीव्हीची यंत्रणा ठेवावी, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लस घेणे हा त्यावरचा मूळ उपाय आहे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, जिल्हा रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये या ठिकाणी जावून नागरिकांनी लसकीकरण करून घ्यावे. 45 वर्षावरील सर्वांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे. कोरोनाच्या संकटापासून स्वत: आणि स्वत:चे कुटुंब मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा मदत करण्यासाठी तयार आहेत. महानगरपालिकेच्या क्षेत्रातही आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे, त्याचाही फायदा जनतेने घ्यावा, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 2 लाखापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आता प्रति दिवस 15 हजारापर्यंत लसीकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. लसीकरणासाठी नागरिकही मोठ्या प्रमाणात सहकार्य करीत आहेत. जे कोणी लसीकरणापासून वंचित राहिले आहेत त्यांनीही पुढे येवून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 00000

गुरुवार, १ एप्रिल, २०२१

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने पुन्हा एकदा मिशन मोडवर यावे - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली दि. 1 (जि.मा.का.) : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध केलेल्या खाजगी हॉस्पीटलसाठी पर्यवेक्षीय व प्रशासकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर तातडीने कार्यान्वीत करण्यात आली आहेत. तसेच एप्रिल 2021 मध्ये संपूर्ण महिना सुट्टीच्या दिवशीही (30 दिवस) कोरोना लसीकरण सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने पुन्हा एकदा मिशन मोडवर यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपजिल्हाधिकारी (महसूल) विजया यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, सर्व उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोना प्रादुर्भावाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर खाजगी रूग्णालये अधिग्रहीत केली आहेत. त्या रूग्णालयांनी त्यांच्या आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवाव्यात. रूग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमण्यात आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरील जबाबदारी विहीत वेळेत पार पाडावी. जिल्ह्यामध्ये रूग्णांची संख्या वाढल्यास बेड्सची संख्या कमी पडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. बेड्स इन्फॉर्मेशन सिस्टीम नियमितपणे अद्ययावत करावी. रूग्णालयाच्या दर्शनी भागात रूग्णालयात एकूण उपलब्ध असणाऱ्या बेड्सची संख्या, उपचारार्थ असलेल्या रूग्णांची संख्या व रिक्त असलेल्या बेड्सची संख्या या बाबतची माहिती लावण्यात यावी. खाजगी रूग्णालयांनी कोरोना रूग्णाला ॲडमिट करून घेण्याची आवश्यकता असल्यासच ॲडमिट करून घ्यावे, असे केल्याने ज्यांना खरोखरच ॲडमिट करण्याची आवश्यकता आहे त्यांना बेड्स उपलब्ध होतील. खाजगी रूग्णालयांनी बिलींगबाबत प्रशासनाने नेमून दिलेल्या ऑडिटरकडूनच बिलांची तपासणी करून घ्यावी. खाजगी रूग्णालयांसाठी नियुक्त केलेल्या प्रशासकीय अधिकारी यांना खाजगी रूग्णालयांनी सहकार्य करावे. त्यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या सूचना, उपाययोजना यांची तातडीने अंमलबजावणी करावी. तसेच खाजगी रूग्णालये प्रशासनाने दिलेल्या सूचनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करतात किंवा कसे याबाबतची पाहणी करून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अहवाल द्यावेत. सद्यस्थितीत खाजगी रूग्णालयांनी रूग्णांच्या कोरोना चाचण्या शासकीय यंत्रणांच्या मार्फत करून घ्याव्यात. आरोग्य विभागाच्या यंत्रणांचा आढावा घेताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रूग्णालयांनी कोरोना उपचारासाठीची यंत्रणा अद्ययावत करावी. यासाठी निधीची आवश्यकता भासल्यास तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवर लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली असून या ठिकाणी लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. एखाद्या ठिकाणी कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यास लसीकरणावर याचा परिणाम होवू नये यासाठी लसीकरण केंद्रांना पर्यायी जागा उपलब्ध होईल याबाबतचे नियोजन व सर्व्हेक्षण ग्रामीण व शहरी भागात संबंधित यंत्रणांनी करून घ्यावे. सद्यस्थितीमध्ये उष्णतेचे प्रमाण वाढले असून लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होवू नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी मंडप, पाणी याची तातडीने स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने सोय करावी. कोविड हॉस्पीटलच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लॅंट उभे करण्यात आले आहेत. ऑक्सिजन प्लॅंटची पाहणी करून आवश्यक असल्यास तातडीने दुरूस्ती करून घ्यावी. ऑक्सिजन पुरवठा आवश्यकतेनुसार व सोयीनुसार उपलब्ध करून घ्यावा. विद्युत पुरवठा खंडीत होवू नये याबाबतचे योग्य नियोजन करावे. शासनाने दिलेल्या आदेशानुसार एकाच ठिकाणी शहरी भागात 5 व गा्रमीण भागात 10 पेक्षा जास्त कोरोना रूग्ण आढळल्यास त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करण्याबाबतच्या सर्व प्रक्रिया राबविण्यात याव्यात. तसेच पोलीस विभागास तातडीने सूचित करण्यात यावे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची यंत्रणा सज्ज ठेवावी. कोरोना रूग्णांना आवश्यकतेनुसार होम आयसोलेशन करण्याबाबत योग्य नियोजन करण्यात यावे. होम आयसोलेशन करण्यात आलेल्या रूग्णांच्या घराबाहेर दर्शनी फलक तातडीने लावण्यात यावेत, असे आदेशित करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आरटीपीसीआर टेस्ट, रॅपिड ॲन्टीजन टेस्ट वाढवाव्यात अशा सूचना दिल्या. आरोग्य यंत्रणेकडून आढावा घेताना बहुतांशी ठिकाणी डॉक्टर्स, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, वर्ग 4 चे कर्मचारी, वाहन चालक यांची मागणी होत आहे. यावर तातडीची उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाकडून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या माध्यमातून येणारा कर्मचारी वर्ग मागणीनुसार पुरविण्यात येईल. कोरोना प्रादुर्भावाचा अनुभव आरोग्य विभागाच्या पाठीशी असून मागील वर्षामध्ये ज्या यंत्रणा उभ्या करण्यात आल्या होत्या, जे आदेश निर्गमित करण्यात आले होते तेच आदेश आता लागू करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मागील वर्षी आलेल्या अनुभवांचा उपयोग करून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यावेळी म्हणाले, कोरोना परिस्थितीत संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. समन्वयाचा अभाव झाल्यास यंत्रणेवर अधिकचा ताण येईल. कोरोना रूग्णांना देण्यात येणाऱ्या औषधोपचाराबाबत पारदर्शकता ठेवण्यात यावी. कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांचा उपचाराबाबत गैरसमज वाढू नये यासाठी संबंधित यंत्रणांनी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. त्यामुळे जनतेमध्ये अफवा पसरणार नाहीत. ग्रामीण भागात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांना भेटी देवून तिथे उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा यांचा अहवाल प्रशासनास सादर करावा, असे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, कोरोना लसीकरणासाठी जिल्हा परिषदेमार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या असून गट विकास अधिकारी / सहाय्यक गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखाली नोडल अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करून त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. 000000

पुढील काळ कोरोनाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील त्यामुळे 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी त्वरीत लसीकरण करून घ्यावे - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

जिल्ह्यात 227 ठिकाणी लसीकरण सुविधा उपलब्ध सांगली दि. 1 (जि.मा.का.) : 1 एप्रिल पासून 45 वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना लसीकरण सुरू केलेले आहे. जिल्ह्यात 111 आरोग्य केंद्रावरून लसीकरण सुरू असून यामध्ये आजपासून आणखी 116 लसीकरण केंद्रांची भर पडली आहे. जिल्ह्यात 227 केंद्रावरून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. पुढील 15 ते 20 दिवसांचा कालावधी हा कोरोना प्रादुर्भावाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असून 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी त्वरीत लसीकरण करून घ्यावे व पुढील धोका टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. जिल्ह्यातील कोरोना स्थिती व लसीकरण याबाबत माहिती देत असताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील आदि उपस्थित होते. कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढत असून येणारा कालावधी हा कोरोनाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. शासनाने 45 वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून जिल्ह्यातील या वयोगटातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. लसीकरणाचे दोन डोस पूर्ण झाल्यानंतर कोरोना होण्याची शक्यता अत्यल्प आहे. तसेच प्रादुर्भाव झाला तरी कोरोनाची तीव्रता या लसीकरणामुळे कमी होवून पर्यायाने पुढील संभाव्य अप्रिय घटना व धोके टाळण्यासाठी लसीकरणामुळे निश्चितच मदत होते, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यातील 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी कोणतीही भिती न बाळगता लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे. याबरोबरच त्यांनी स्वत:च्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनीच मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, कोणतेही लक्षण आढळल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधणे या बाबींचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे. ज्या जिल्ह्यामध्ये लसीकरणाचा वेग जास्त आहे, त्या जिल्ह्यांना आवश्यक लसींचे डोसेसही शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जिल्ह्यात 45 वर्षावरील सुमारे 6 लाख 30 हजार नागरिक असून या सर्वांच्या लसीकरणासाठी प्रशासन प्रयत्नशील आहेच परंतु याबरोबरच सामाजिक संस्थांनीही या वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी उद्युक्त करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 2 लाख 430 कोविड लस प्राप्त झाल्या असून यापैकी 1 लाख 73 हजार 430 कोविशिल्ड तर 27 हजार कोव्हॅक्सीन लस आहेत. जिल्ह्यातील 1 लाख 42 हजार 218 जणांचा पहिला डोस तर 17 हजार 974 जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. मास्क न वापरणाऱ्या व कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत असून 20 फेब्रुवारी ते मार्च अखेर जिल्ह्यात 40 लाख 90 हजार रूपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. तर महानगरपालिका क्षेत्रात 5 लाख 68 हजार रुपये दंडाची वसुली करण्यात आल्याची माहिती देवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, दंड वसुल करणे हे प्रशासनाचे उद्दिष्ट नसून नागरिकांची सुरक्षा हेच अंतिम उद्दिष्ट आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्देशित करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोर पालन करा. जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट जानेवारी 2021 पासून 3.28 असून येत्या काळात कोरोना प्रादुर्भाव वाढणार हे निश्चित असल्याने शासकीय रूग्णालयांबरोबरच खाजगी रूग्णालयेही कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी कार्यान्वीत करण्यात येत आहेत. तसेच महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेशी संलग्नीत असणारी हॉस्पीटलही पुन्हा कार्यान्वीत करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालय सांगली, कुल्लोळी हॉस्पीटल सांगली, मिरज चेस्ट सेंटर मिरज, वाळवेकर हॉस्पीटल सांगली, विवेकानंद मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल ॲण्ड रिसर्च सेंटर बामणोली ता. मिरज, मेहता हॉस्पिटल टिंबर एरिया सांगली, वॉन्लेस हॉस्पिटल मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज या ठिकाणी उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ऑक्सिजन साठा व बेड्सही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. पण असे असले तरी उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक चांगला हे लक्षात घेवून लसीकरण करून घ्यावे. लसीकरणासाठी जाताना कोणतेही फोटो ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी) घेवून जावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. 00000