शुक्रवार, २६ एप्रिल, २०२४

निवडणूक प्रक्रियेत काम करणाऱ्या प्रत्येक घटकाची जबाबदारी महत्त्वाची - निवडणूक निरीक्षक परमेश्वरम बी.

निवडणूक निरीक्षकांनी घेतला निवडणूक कामकाजाचा आढावा सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : 44-सांगली लोकसभा मतदार संघात दि.7 मे 2024 रोजी मतदान होत असून निवडणूक प्रक्रियेत काम करणाऱ्या प्रत्येक घटकाची जबाबदारी महत्त्वाची आहे. लोकशाहीच्या या उत्सवात प्रत्येक मतदारचा सहभाग असावा, यासाठी यंत्रणेने सुयोग्य नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी,अशा सूचना सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक परमेश्वरम बी. यांनी आज दिल्या. 44-सांगली लोकसभा मतदार संघातील निवडणूक कामाकाजा आढावा सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक परमेश्वरम बी, निवडणूक पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा व निवडणूक खर्च निरीक्षक संजीव कुमार यांनी आज घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधिक्षक संदिप घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेता मतदान केंद्रावर पाणी, सावली, पुरेसा वीज पुरवठा यासह अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यास प्राधान्य द्यावे. मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था करावी. गरज भासल्यास दिव्यांग मतदारांना मदतनीसाची सेवाही उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना निवडणूक निरीक्षकांनी दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी 44-सांगली लोकसभा मतदार संघात निवडणूक यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली, यामध्ये मतदान केंद्रावरील सुविधा, उपलब्ध मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था, ईव्हीएम, व्होटर हेल्पलाईन, सीव्हीजील ॲप, कायदा सुव्यवस्था याबाबत निवडणूक निरीक्षकांना माहिती दिली. 000000

गुरुवार, २५ एप्रिल, २०२४

44- सांगली लोकसभा मतदार संघात टपाली मतपत्रिकेद्वारे 1797 मतदार बजावणार घरांतून मतदानाचा हक्क

सांगली, दि. 25 (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 44-सांगली लोकसभा मतदार संघात 1797 मतदार घरांतून टपाली पद्धतीने मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा 44-सांगली मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षापेक्षा अधिक वय असणारे मतदार, 40 टक्के पेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेले मतदार आणि अत्यावश्यक सेवेतील (शासकीय) अधिकारी/कर्मचाऱ्यांना टपाली मतदान केंद्राव्दारे टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 44-सांगली लोकसभा मतदार संघात 85 वर्षापेक्षा अधिक वय असलेले 1502 व दिव्यांग 295 मतदारांचे गृहभेटीव्दारे मतदान करून घेतले जाणार आहे. या मतदारांचे मतदान दि. 1, 2 व 3 मे 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदान होणार आहे. तर अत्यावश्यक सेवेतील 6 मतदारांचे मतदान जिल्हाधिकारी कार्यालयातील हिरकणी कक्षात 30 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत होणार आहे. 44-सांगली लोकसभा मतदारसंघात मतदार म्हणून नोंद असलेल्या आणि सांगली लोकसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांना निवडणूक कार्यप्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर सांगली लोकसभा मतदार संघाबाहेर जे अधिकारी/कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर आहेत त्यांना विधानसभा मतदार संघस्तरावर सुविधा केंद्रामध्ये प्रत्यक्ष जाऊन 2 ते 4 मे 2024 या कालावधीत मतदान करता येणार आहे. 00000

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचार संहितेचे पालन करावे - निवडणूक निरीक्षक परमेश्वरम बी.

सांगली, दि. 25 (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये 44-सांगली लोकसभा मतदार संघात 7 मे 2024 रोजी मतदान होत असून राजकीय पक्ष व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन जनरल निरिक्षक परमेश्वरम बी. यांनी केले. आदर्श आचारसंहिता संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्ष प्रतिनिधी व उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधी समवेत बैठक संपन्न झाली. बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे आदी उपस्थित होते. जनरल निरिक्षक परमेश्वरम बी. यांनी सांगितले, सांगली लोकसभा मतदार संघात निवडणूक निर्भय, भयमुक्त वातावरणात होण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. आदर्श आचार संहितेमध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे सर्वांनी पालन करावे. कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रचारासाठी आवश्यक परवानग्या घ्या... जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी 44-लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी त्यांच्या प्रचारासाठी वाहन, सभा, रॅली, प्रचार साहित्य, ऑडिओ, व्हिडिओ, प्रमाणीकरण यासह आवश्यक असणाऱ्या परवानग्या संबंधित कक्षाकडून घ्याव्यात. या परवानगीसाठी वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बैठकीत केले. handbill, pamphlet, manifesto यांची छपाई करताना त्यावर मुद्रक आणि प्रकाशक यांची नावे नमूद करणे आवश्यक आहे. याबाबत आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे, उमेदवाराने प्रत्येक दिवसाचा खर्च विहित नमुन्यात खर्च विषयक समितीस सादर करावा. खर्च सादर करण्यासाठी प्रतिनिधीची नेमणूक करावी. प्रचारात लहान मुलांचा सहभाग करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी दिल्या. बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी आदर्श आचारसंहिता व निवडणूक प्रचार कालावधीत काय करावे आणि काय करू नये याची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. ००००

जनरल निरीक्षक यांच्या उपस्थितीत ईव्हीएम यंत्रांची दुसरी सरमिसळ

सांगली, दि. 25 (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार ४४-सांगली लोकसभा मतदारसंघाकरिता दि. 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार जिल्ह्यातील ईव्हीएम यंत्रांची प्रथम सरमिसळ (First Randomisation) 5 एप्रिल रोजी करण्यात आली होती. आज ईव्हीएम यंत्रांची दुसरी सरमिसळ जिल्हाधिकारी कार्यालयात जनरल निरीक्षक परमेश्वरम बी., जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी व विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल आदी उपस्थित होते. पहिले रॅन्डमायझेशन विधानसभा मतदारसंघनिहाय करण्यात आले होते. आजचे दुसरे रॅन्डमायझेशन मतदान केंद्र निहाय करण्यात आले. यावेळी बॅलेट युनिट (BU), कंट्रोल युनिट (CU) व VVPAT च्या अनुषंगाने उपस्थित उमेदवार व त्यांचे प्रतिनिधींना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी माहिती दिली. राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी मतदार यादी उपलब्ध असून संबंधितांनी ती प्राप्त करून घ्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हडणाले, मतदार चिठ्ठीचे वाटप सुरू करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्राशिवास मतदानासाठी ओळखीचे 12 पुरावे ग्राह्य धरले असल्याचे त्यांनी सांगितले. 000000

बुधवार, २४ एप्रिल, २०२४

खरीप हंगामासाठी कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करावे - निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील

सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : खरीप हंगाम मध्ये शेतकऱ्यांना आवश्यक बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके वेळीच उपलब्ध व्हावीत. यासाठी कृषी विभागाने खरीप हंगामचे सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी दिल्या. जिल्हास्तरीय खरीप हंगाम 2024 आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात झाली. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, आत्माचे प्रकल्प संचालक जांबुवंत घोडके, विभागीय कृषी अधीक्षक श्री. अजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ, कृषी उपसंचालक डी. एम. पाटील आदी उपस्थित होते. श्रीमती पाटील यांनी सांगितले, कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे लाभ व्हावा यासाठी योजनांची प्रभावी प्रचार व प्रसिद्धी करावी. खरीप हंगामसाठी आवश्यक, बी-बियाणे, कीटकनाशके, खतांची मागणी करून हा साठा उपलब्ध करून ठेवावा. खरीप 2024 च्या हंगामा मध्ये बियाणे व खतांची पुरेशी उपलब्धता करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोठेही टंचाई निर्माण होणार याची कृषी विभागाने दक्षता घेतली आहे. आपत्कालीन पीक परिस्थितीत करावयाच्या उपाय योजनेमध्ये राखीव बियाण्याचे नियोजन करण्यात आले आहे व खतांच्या संरक्षित साठ्याचे नियोजन झाले असून त्याचा वापर टंचाई निर्माण झाल्यास दुबार पेरणीसाठी करण्यात येणार आहे. खते व बियाणांची साठेबाजी तसेच जादा दराने विक्री होऊ नये व योग्य दर्जाची बियाणे व खते शेतकऱ्यांना पुरवठा करणेसाठी कृषी विभाग सतर्क असून तक्रार निवारण कक्ष व भरारी पथके कार्यान्वीत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी बैठकीत दिली. प्रकल्प संचालक श्री. घोडके यांनी आत्मा मार्फत सन 2024-25 मध्ये राबविण्यात येणार असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. तर विभागीय कृषी सह संचालक कोल्हापूर कार्यालयाचे अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कृषी विभागाने सतर्क राहून शेतकऱ्यांना दर्जेदार खते व बियाणे वेळेत उपलब्ध होतील याचे सूक्ष्म नियोजन करावे. घरचे सोयाबीन बियाणे याची उगवणक्षमता चाचणी प्रात्यक्षिके व बीजप्रक्रिया प्रात्यक्षिके गाव पातळीवर मोहीम स्वरुपात आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बैठकीस कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रजचे प्रभारी अधिकारी डॉ. मिलिंद देशमुख, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, सहा.महा.प्रबंधक निलेश चौधरी, जिल्हा अग्रणी बँकचे प्रबंधक विश्वास वेताळ, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.अजयनाथ थोरे, कृषी विज्ञान केंद्र कांचनपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनार पाटील, महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाचे सहायक व्यवस्थापक एस.एस.पाटील, क्षेत्रीय व्यवस्थापक राष्ट्रीय बीज निगम पुणे एस. एस.बडोले, महाबीजचे क्षेत्र अधिकारी जी.एस.जायपत्रे यांच्यासह कृषी व संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ०००००

राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम यंत्रांची प्रथम पुरवणी सरमिसळ

सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार ४४-सांगली लोकसभा मतदारसंघाकरिता दि. 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार जिल्ह्यातील ईव्हीएम यंत्रांची प्रथम सरमिसळ (First Randomisation) 5 एप्रिल रोजी करण्यात आली होती. आज ईव्हीएम यंत्रांची प्रथम पुरवणी सरमिसळ जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी व विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, उपजिल्हाधिकारी तथा ईव्हीएम नोडल अधिकारी डॉ. विकास खरात व जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल आदी उपस्थित होते. यावेळी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट व्यवस्थापनाचे नोडल अधिकारी डॉ. विकास खरात यांनी सांगली लोकसभा मतदार संघाकरीता उपलब्ध असलेल्या बॅलेट युनिट (BU), कंट्रोल युनिट (CU) व VVPAT च्या अनुषंगाने उपस्थित राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना माहिती दिली. या सर्व मशिन्सचे विधानसभा मतदारसंघनिहाय Randomisation प्रमाणे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली. 000000

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तालुकानिहाय शिबीर

सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत एप्रिल ते जून महिन्यात तालुकानिहाय शिबीर आयोजित करण्यात आली आहेत, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत एप्रिल 2024 या महिन्यामध्ये तासगाव 25, आटपाडी 26, आष्टा 29 व विटा 30 एप्रिल. माहे मे 2024 मध्ये आयोजित तालुकानिहाय शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे. इस्लामपूर 6 व 20 मे, विटा 13, 21 व 31 मे, कडेगाव 2 व 15 मे, पलूस 3 व 22 मे, आष्टा 10 व 27 मे, आटपाडी 17 मे, जत 9 व 28 मे, शिराळा 14 व 29 मे, तासगाव 8 व 16 मे, कवठेमहांकाळ 30 मे 2024. माहे जून 2024 मध्ये आयोजित तालुकानिहाय शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे. इस्लामपूर 3 व 18 जून, विटा 4, 13, 21 व 28 जून, कडेगाव 11 जून, पलूस 12 जून, आष्टा 6, 14 व 27 जून, आटपाडी 7 व 26 जून, जत 10 व 24 जून, शिराळा 19 जून, तासगाव 5 व 20 जून, कवठेमहांकाळ 25 जून 2024. 00000

मतदार जनजागृतीसाठी सांगलीत 26 एप्रिलला रोलर्स स्केटींग रॅली

सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने मतदारांचा जास्तीत जास्त सहभाग होण्याच्या दृष्टीने मतदार जनजागृती कार्यक्रम सुरू केला आहे. जिल्हास्तरावरून कार्यक्रमाच्या नियोजनासाठी 26 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 वाजता सांगली शहरामध्ये रोलर्स स्केटींग रॅलीचे आयोजन केले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) तथा स्वीपचे नोडल अधिकारी शशिकांत शिंदे यांनी दिली. ही रॅली विश्रामबाग चौक सांगली येथून सुरू होवून कर्मवीर भाऊराव पाटील चौक मार्गे जिल्हा परिषद सांगली येथे रॅलीची सांगता होणार आहे. 00000

मंगळवार, २३ एप्रिल, २०२४

मतदानाची टक्केवारी वाढविण्यात सामाजिक संस्थांनी योगदान द्यावे - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिध

ी सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ मे २०२४ रोजी मतदान होत आहे. मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपक्रम राबवत असून जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनीही या उपक्रमात सहभागी होऊन जिल्ह्यात लोकसभेसाठी अधिकाधिक मतदान व्हावे यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सामाजिक संस्थांचे योगदान मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, स्वीपचे नोडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. या उत्सवात जिल्ह्यातील मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावून मतदान टक्केवारी वाढविण्यामध्ये आपले योगदान द्यावे. जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मतदारांसाठी आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत. यामध्ये पिण्याचे पाणी, सावली, वेटींग रुम, टोकन पद्धत, दिव्यांग मतदारासाठी मदतनीस वाहतुकीची सोय अशा सुविधांचा समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या, सामाजिक संस्थांची नाळ तळागाळातील लोकांपर्यंत जोडलेली असते. त्यांनी मतदारांना लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रेरित करावे व जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी योगदान द्यावे. तर पोलीस अधीक्षक श्री. घुगे म्हणाले मतदारांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्यास पुढे यावे. लोकशाहीच्या उत्सवात आपला सहभाग नोंदवून मतदानाची टक्केवारी वाढविण्यात आपला सहभाग नोंदवावा. सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनी यावेळी जिल्हा प्रशासनाचे कौतुक करून काही मौलिक सूचनाही केल्या. ०००००

घरोघरी भेट देवून मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करा

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : जिल्ह्यात लोकसभेसाठी दि. 7 मे रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा असे आवाहन करून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, स्वीपचे नोडल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घरोघरी भेट देवून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हाधिकारी कार्यालयात तालुकास्तरीय स्पीप नोडल अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) तथा जिल्हास्तरीय स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, गेल्या निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर कमी मतदान झाले आहे, अशा ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत. याबरोबरच या भागात घरोघरी भेट देवून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करावे. मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावरून विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमात प्रसिध्दीसाठी वापरण्यात येत असलेले पोस्टर, बॅनर, भित्तीपत्रके आदी साहित्य याची जिल्हास्तरावरून अनुमती घ्यावी. जत तालुक्यातील कर्नाटक सिमा भागात कन्नड भाषेतही स्वीप उपक्रम राबवावेत. स्वीप अंतर्गत सकाळी 11 पूर्वी व दुपारी 4 नंतर उपक्रम राबवावेत. महापालिकेने त्यांच्या आस्थापनांच्या ठिकाणी तसेच कृषी विभागाने जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रावर मतदान जागृतीसाठी बॅनर लावावेत. सध्या कृषी विभागामार्फत संपर्क मोहिम राबविण्यात येत असून या मोहिमेत मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी यावेळी सांगितले. स्वीप उपक्रमांतर्गत मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी चांगले उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमातून जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी निश्चित वाढेल असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केला. यावेळी तालुकास्तरीय स्वीप नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या स्वीप उपक्रमांची माहिती दिली. 00000

माध्यमकर्मी व अभ्यासकांसाठी जिल्हा माहिती कार्यालयाकडून पूर्वपीठिका प्रसिद्ध

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 देशभर माहोल सुरु आहे. निवडणुकीत सर्वाधिक लोकशिक्षणाचे कार्य प्रसारमाध्यमाकडून केले जाते. त्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या सहकार्याने व जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या सूचनेनुसार जिल्हा माहिती कार्यालय, सांगली यांच्याकडून सांगली लोकसभा मतदारसंघाच्या पूर्वपीठिकेचे प्रकाशन आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मनपा आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधिक्षक संदिप घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.) तथा स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी फारूक बागवान, माहिती अधिकारी एकनाथ पोवार, मनपा जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद हे उपस्थित होते. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने माध्यमे तसेच अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या पूर्वपीठिकेत सांगली जिल्ह्यातील सन 1951 पासून ते सन 2019 पर्यंत घेण्यात आलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील विजयी - पराभूत उमेदवार, त्यांना मिळालेले मतदान याबाबतचा सर्वंकष आढावा घेण्यात आला आहे. ही पूर्वपीठिका माध्यम प्रतिनिधी तसेच अभ्यासकांना उपयुक्त आहे. या पूर्वपीठिकेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे आवाहन पर मनोगत प्रसिद्ध करण्यात आले आहे. 00000

मतदानासाठी 7 मे रोजी कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 7 मे 2024 रोजी मतदान होत आहे. त्या अनुषंगाने मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने (उदा. खाजगी कंपनी या मधील आस्थापना, सर्व दुकाने व आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स, इत्यादी) या मधील कामागार/अधिकारी व कर्मचारी यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. आस्थापनेने निवडणुकीच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्यास सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, उद्योग भवन, विश्रामबाग, सांगली, दुरध्वनी क्रमांक 0233-2950119, ई-मेल आयडी - aclsangli@gmail.com या ठिकाणी तक्रार दाखल करावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त यांनी केले आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवशी सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधीत महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. वर नमुद केल्यानुसार उद्योग, उर्जा व कामगार विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी / व्यवस्थापनाने वरील सुचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधीत आस्थापनांविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असे सहाय्यक कामगार आयुक्त यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

सोमवार, २२ एप्रिल, २०२४

निवडणूक आयोगाने खर्चाच्या लेखांच्या संदर्भात केलेल्या सूचनांचे पक्ष व उमेदवारांनी काटेकोर पालन करावे निवडणूक खर्च निरीक्षक संजीव कुमार यांच्या सूचना

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ सांगली, दि. 22 (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मध्ये निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोगाने ९५ लाखाची खर्च मर्यादा घालून दिली आहे. त्यामुळे उमेदवारांनी खर्चाची मर्यादा पाळून खर्चाची नोंद नियमित करावी. या बरोबरच निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या खर्चाच्या लेखांच्या संदर्भात दिलेल्या सूचनांचे सर्व राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी काटेकोर पालन करावे, अशा सूचना ४४-सांगली लोकसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरीक्षक संजीव कुमार यांनी दिल्या. ४४-सांगली लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविणारे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना निवडणूक कालावधीत करण्यात येणाऱ्या खर्चासंदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. बैठकीस उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक तथा जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी शिरीष धनवे यांच्यासह निवडणूक लढविणारे उमेदवार, प्रतिनिधी उपस्थित होते. खर्च निरीक्षक श्री. संजीव कुमार म्हणाले, उमेदवारांनी त्यांच्या प्रचारासाठी handbill, pamphlet, manifesto यांची छपाई करताना त्यावर मुद्रक आणि प्रकाशक यांची नावे नमूद करणे आवश्यक आहे. उमेदवाराने प्रत्येक दिवसाचा खर्च विहित नमुन्यात सादर करणे आवश्यक आहे. उमेदवाराने त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती नामनिर्देशन करताना नमूद केली असल्यास त्याबाबत प्रचार कालावधीत तीन वेळा प्रिंट मीडिया, आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रसिद्धी द्यावी आणि त्याचा खर्च उमेदवाराच्या खर्चात समावेश करावा. निवडणूक अनुषंगाने खर्च करण्यासाठी बँकेत उघडण्यात आलेल्या बँक खात्यामार्फत सर्व व्यवहार करावेत. निवडणूक खर्चाची माहिती नियमित खर्च विषयक समितीकडे सादर करावी. यावेळी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ खर्च संनियंत्रण प्रक्रिया, निवडणूक खर्चाशी संबंधित विधीविषयक तरतुदी आणि या तरतुदींचे अनुपान न केल्यास होणारे परिणाम या बाबतही माहिती देण्यात आली. ०००००

स्वीप अंतर्गत तालुकास्तरावर २४ व २५ एप्रिलला निमंत्रित टेनिस क्रिकेट स्पर्धा २६ एप्रिलला सांगलीत रोलर स्केटिंग रॅलीचे आयोजन

- तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन सांगली, दि. २२ (जि. मा. का.) : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, सांगली यांच्यामार्फत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ (SVEEP) अंतर्गत मतदार जनजागृती करिता निमंत्रित टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन प्रत्येक तालुकास्तरावरील तालुका क्रीडा संकुलामध्ये दिनांक २४ व २५ एप्रिल २०२४ या कालावधीत करण्यात येणार आहे. दि. २६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ६.३० वाजता रोलर स्केटींग खेळाडूंची रॅली पुष्कराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरून काढण्यात येणार असून सांगली जिल्ह्यातील स्केटिंग खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. दिनांक ०७ मे २०२४ रोजी होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता सांगली जिल्ह्यातील १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या युवक, युवती व सर्व मतदान करण्यास पात्र असणारे नागरिक यांनी मतदानाचा हक्क बजावण्याच्या हेतूने संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उद्देशाने तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या निमंत्रित टेनिस क्रिकेट स्पर्धेत १८ ते ४० वयोगटातील युवक व युवती यांनी आपला संघ नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे. स्पर्धेचा सहभाग व नियमावलीबाबत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली तसेच सर्व तालुक्यातील सहाय्यक नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. सहभागी संघांची नोंद स्पर्धेपूर्वी २ दिवस अगोदर करण्यात यावी. अधिक माहितीसाठी तालुका क्रीडा अधिकारी प्रशांत पवार (मो.नं. ९४०३९६८६२५) या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

शनिवार, २० एप्रिल, २०२४

44-सांगली लोकसभा मतदारसंघात 25 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र छाननीत वैध

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 सांगली, दि. 20 (जि. मा. का.) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदार संघात नामनिर्देशनपत्र छाननीत 25 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली. नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे. राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार - 1. चंद्रहार सुभाष पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 2. टिपूसुलतान सिकंदर पटवेगार, बहुजन समाज पार्टी 3. संजय रामचंद्र पाटील, भारतीय जनता पार्टी. नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार (राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार) - 1. आनंदा शंकर नालगे, बळीराजा पार्टी 2. पांडूरंग रावसाहेब भोसले, भारतीय जवान किसान पार्टी 3.महेश यशवंत खराडे, स्वाभिमानी पक्ष 4. सतिश ललीता कृष्णा कदम, हिंदुस्थान जनता पार्टी. इतर उमेदवार (अपक्ष) - 1. अजित धनाजी खंदारे 2. अल्लाउद्दीन हयातचाँद काजी 3. डॉ. आकाश नंदकुमार व्हटकर 4.जालिंदर मच्छिंद्र ठोमके 5.तोहिद इलाई मोमीन 6. दत्तात्रय पंडीत पाटील 7. दिगंबर गणपत जाधव 8. नानासो बाळासो बंडगर 9. प्रकाश शिवाजीराव शेंडगे 10. प्रतिक प्रकाशबापू पाटील 11. बापू तानाजी सुर्यवंशी 12. रविंद्र चंदर सोलनकर 13. रेणुका प्रकाश शेंडगे 14. विशाल प्रकाशराव पाटील 15. शशिकांत गौतम देशमुख 16. सुरेश तुकाराम टेंगळे 17. सुवर्णा सुधाकर गायकवाड 18. संग्राम राजाराम मोरे या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर उर्वरित उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. सोमवार दिनांक 22 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 000000

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वसाधारण निरीक्षक परमेश्वरम बी. जिल्ह्यात दाखल

सांगली दि.20 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी सर्वसाधारण निरीक्षक (General Observer) म्हणून परमेश्वरम बी. हे जिल्ह्यामध्ये दाखल झाले असून त्यांच्या कार्यालयाचा पत्ता - कक्ष क्र. १, शासकीय विश्रामगृह, माधवनगर रोड, सांगली तर ई-मेल आय.डी :- generalobserver44@gmail.com असा असून त्यांचा भ्रमणध्वनी क्र. 09439047611 हा आहे. तरी, सांगली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 मधील उमेदवारांच्या निवडणूक अनुषंगाने काही तक्रारी असल्यास वरील नमुद ई-मेलवर किंवा भ्रमणध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन सर्वसाधारण निरीक्षक (General Observer) यांनी केले आहे . 000000

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा सांगली जिल्ह्यात दाखल

सांगली दि.20 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी पोलिस निरीक्षक (Police Observer) म्हणून श्री. प्रदीप शर्मा हे जिल्ह्यामध्ये दाखल झाले असून त्यांच्या कार्यालयाचा पत्ता - कक्ष क्र. 2, शासकीय विश्रामगृह, माधवनगर रोड, सांगली तर ई-मेल आय.डी :- policeobserver44@gmail.com असा असून त्यांचा भ्रमणध्वनी क्र. 9699485083 हा आहे. तरी, सांगली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 मधील उमेदवारांच्या निवडणूक अनुषंगाने काही तक्रारी असल्यास वरील नमुद ई-मेलवर किंवा भ्रमणध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक (Police Observer) यांनी केले आहे . 00000

उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवह्या तपासणीस कार्यक्रम निश्चित

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सांगली दि.20 (जि.मा.का.) : 44-सांगली लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांचा दैनंदिन खर्च उमेदवार खर्च नोंदवहीमध्ये नोंदवणे आवश्यक असून या नोंदवहीची तपासणी प्रचार कालावधीपर्यंत तीन वेळा खर्च निरीक्षीक यांच्याकडून करुन घेणे आवश्यक आहे. त्यानुसार उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवह्या तपासणीसाठी कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी कळविले आहे. या कार्यक्रमानुसार प्रथम तपासणी शुक्रवार, 26 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 ते 6 या वेळेत, द्वितीय तपासणी मंगळवार, 30 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 ते 6 या वेळेत आणि तृतीय तपासणी रविवार, 4 मे 2024 रोजी सकाळी 11 ते 6 या वेळेत करण्यात येणार आहे. 00000

खर्चविषयक बाबींची माहिती देण्यास 22 रोजी बैठकीचे आयोजन उमेदवार, प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सांगली दि.20 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 44-सांगली लोकसभा मतदार संघात येत्या 7 मे रोजी मतदार होत आहे. या मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यानंतर खर्च संनियंत्रण प्रक्रिया, निवडणूक खर्चाशी संबंधित विधीविषयक तरतुदी आणि या तरतुदींचे अनुपान न केल्यास होणारे परिणाम या बाबात माहिती देण्यासाठी सोमवार, 22 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयाजित करण्यात आली आहे. या बैठकीस उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक तथा जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी शिरीष धनवे यांनी केले आहे. 00000

रेणुका प्रकाश शेंडगे यांनी आपला उमेदवारी अर्ज घेतला मागे

सांगली दि. 20 ( जि.मा.का.) : 44-सांगली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल केलेले नामनिर्देशनपत्र (अर्ज) श्रीमती रेणुका प्रकाश शेंडगे यांनी शनिवारी मागे घेतले. अर्ज मागे घेण्याची मुदत दि. 22 एप्रिल पर्यंत आहे. 00000

शुक्रवार, १९ एप्रिल, २०२४

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन

सांगली दि. 19 ( जि.मा.का.) : निवडणुकीच्या अनुषंगाने लाच देणे-घेणे, उमेदवारांना, मतदारांना, कोणत्याही व्यक्तीला इजा पोहचवणे, धमकावणे भारतीय न्याय संहितेच्या कलम १७१ बी व कलम १७५ सी नुसार गुन्हा आहे. असे गुन्हे करणारी व्यक्ती, दोन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास, किंवा आर्थिक दंड अथवा दोन्ही शिक्षा याप्रमाणे संबधित शिक्षेस पात्र राहील. जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात तक्रार नियंत्रण कक्ष २४ तास सुरु असून निवडणुकीचे अनुषंगाने, लाच देण्या - घेण्याबाबत तसेच धमकावल्याबाबत कोणतीही माहिती मिळाली तर त्वरित १८००२३३१८०९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून जिल्हा निवडणूक अधिकारी यांना माहिती देता येईल. त्याचबरोबर C-VIGIL ॲपवर फोटो/व्हिडीओसह तक्रार दाखल करता येईल. जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता कक्षाच्या mcc.sangli@gmail.com या मेल आयडीवर तसेच नागरिकांना जिल्हा स्तरावरील तक्रार नियंत्रण कक्ष (२४ x ७) येथेही समक्ष येऊन तक्रार दाखल करता येईल. अशी माहिती आचार संहिता कक्षाच्या नोडल अधिकारी तथा निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. येत्या ७ मे रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत प्रत्येकाने मतदान करा आणि देशाची लोकशाही समृद्ध करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. 00000

निवडणूक निरीक्षकांनी घेतला निवडणूक कामकाजाच्या तयारीचा आढावा

सांगली दि. 19 ( जि.मा.का.) : ४४-सांगली लोकसभा मतदार संघात ७ मे २०२४ रोजी मतदान होत आहे. या निमित्ताने लोकसभा मतदार संघात सुरू असलेल्या कामकाजाचा व तयारीचा आढावा आज सर्वसाधारण निरीक्षक परमेश्वरन बी. (भा.प्र.से.), पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा (भा.पो.से.) व खर्च निरीक्षक संजीव कुमार (आय.आर.एस.) यांनी घेतला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी निवडणूक निरीक्षकांना सादरीकरणाद्वारे निवडणुक कामकाज व तयारीची माहिती दिली. तर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कायदा व सुव्यवस्था संदर्भात माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रितू खोखर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे यांच्यासह सर्व संबधित नोडल अधिकारी उपस्थित होते. ००००

सांगली लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त निरीक्षक सांगलीत दाखल

सांगली दि. 19 (जि.मा.का.) : 44-सांगली लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक परमेश्वरन बी. (भा.प्र.से.), पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा (भा.पो.से.) व खर्च निरीक्षक संजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वसाधारण निरीक्षक परमेश्वन बी. यांचे 18 एप्रिल रोजी तर पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांचे 19 एप्रिल रोजी सांगली येथे आगमन झाले आहे. खर्च निरीक्षक संजीव कुमार यांचे 11 एप्रिल रोजी सांगली येथे आगमन झाले आहे. सर्वसाधारण निरीक्षक परमेश्वरन बी. हे सर्किट हाऊस सांगली येथील कृष्णा कक्षात, पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा सर्किट हाऊस सांगली येथील वारणा कक्षात, आणि खर्च निरीक्षक संजीव कुमार हे सर्किट हाऊस सांगली येथील येरळा कक्षात वास्तव्यास आहेत. सर्वसाधारण निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संदीप संभाजी यादव (मो.नं. 7745078078), पोलीस निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप शिंदे (मो. नं. 7057399219) आणि खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी राज्यकर उपायुक्त सुनिल कानबुडे (मो. नं. 9867797054) आहेत. 00000

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 23 एप्रिल 2024 ते 7 मे 2024 अखेर पर्यंत खालील कृत्ये करण्यास मनाई केली आहे. या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 23 एप्रिल 2024 रोजीचे 06.00 वाजल्यापासून ते दि. 7 मे 2024 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. 00000

एमएचटी-सीईटी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू

सांगली दि. 19 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यात 22 एप्रिल 2024 ते 17 मे 2024 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने एमएचटी - सीईटी परीक्षा-2024 तीन परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात परीक्षा कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले असून पुढील कृत्यांना मनाई केली आहे. परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परिक्षा केंद्रात मोबाईल, पेजर नेण्यास मनाई केली आहे. एमएचटी - सीईटी परीक्षा-2024 जिल्ह्यातील आदर्श इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी खंबाळे (भा.) एमआयडीसी खानापूर-विटा ता. खानापूर, आण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ॲन्ड टेक्नॉलॉजी, आष्टा ता. वाळवा, नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पेठ, पेठ नाका ता. वाळवा या महाविद्यालयाच्या ठिकाणी दि. 22 ते 24 एप्रिल, 28 ते 30 एप्रिल, 2 ते 4 मे, 9 ते 11 मे व 15 ते 17 मे 2024 या कालावधीत प्रथम सत्र सकाळी 7.30 ते दुपारी 12 व व्दितीय सत्र दुपारी 12.30 ते सायंकाळी 6.45 या वेळेत होणार आहे. हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. 00000

बुधवार, १७ एप्रिल, २०२४

पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांची आज सांगली आकाशवाणीवर मुलाखत

सांगली दि. 17 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 संदर्भात, 44-सांगली लोकसभा मतदारसंघातील ' कायदा व सुव्यस्था ' या विषयावर जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांची जिल्हा माहिती अधिकारी फारूक बागवान यांनी घेतलेली मुलाखत आकाशवाणी सांगली केंद्रावर आज गुरुवार, दि.18 एप्रिल रोजी सकाळी 9.45 वाजता प्रसारित होईल. ही मुलाखत 1251 किलोहर्टझ या ए.एम. वाहिनीवर, तसेच 100.6 एफ एम वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर ऐकता येईल.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या मुलाखतीमध्ये सविस्तर माहिती दिली आहे. जिल्ह्यातील सर्व मतदात्यांनी आज सकाळी पाऊणे दहा वाजता प्रसारीत होणारी मुलाखत नक्कीच ऐकायला हवी .. 00000

मंगळवार, १६ एप्रिल, २०२४

आचारसंहिता कालावधीत जिल्ह्यात रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक लावण्यास व वापरण्यास मनाई

सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 नुसार प्राप्त अधिकारान्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी वर्षभरातील विशिष्ट सण, उत्सवादिवशी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यासाठी सवलत देण्याबाबत दि. 1 फेब्रुवारी 2024 रोजी आदेश जारी केले होते. या आदेशानुसार विशिष्ट सण, उत्सवासाठी ध्वनीची विहित मर्यादा राखून कार्यक्रमासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सवलत देण्यात आली होती. तथापी आचारसंहितेच्या कालावधीत रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक न लावण्याबाबत निर्देश प्राप्त असल्याने आचारसंहिता कालावधीत रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक लावण्यास / वापरण्यास मनाई केली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. दि. 1 फेब्रुवारी 2024 रोजीच्या आदेशान्वये शिवजयंती (१ दिवस), ईद-ए-मिलाद (१ दिवस), डॉ. आंबेडकर जयंती (१ दिवस), १ मे महाराष्ट्र दिन (१ दिवस), गणपती उत्सव (गणेश चतुर्थी, पांचवा दिवस, सातवा दिवस, नववा दिवस, अनंत चतुर्दशी, असे ५ दिवस), नवरात्री उत्सव (अष्टमी व नवमी, असे २ दिवस), दिवाळी (१ दिवस लक्ष्मीपूजन), ख्रिसमस (१ दिवस), ३१ डिसेंबर (१ दिवस) तसेच उर्वरित १ दिवस (जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने महत्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार सूट) ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सवलत देण्यात आली होती. 00000

िल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची सांगली आकाशवाणीवर मुलाखत

ज सांगली दि. 16 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 संदर्भात, 44-सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीची तयारी या विषयावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत आकाशवाणी सांगली केंद्रावर आज बुधवार, दि. 17 एप्रिल रोजी सकाळी 9.45 वाजता प्रसारित होईल. ही मुलाखत 1251 किलोहर्टझ या ए.एम. वाहिनीवर, तसेच 100.6 एफ एम वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर ऐकता येईल. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या तयारीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी या मुलाखतीमध्ये सविस्तर माहिती दिली आहे. जिल्ह्यातील सर्व मतदात्यांनी आज सकाळी पाऊणे दहा वाजता प्रसारीत होणारी मुलाखत नक्कीच ऐकायला हवी .. 00000

सोमवार, १५ एप्रिल, २०२४

मतदानासाठी 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरण्यात येणार

सांगली दि. 15 ( जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी 44-सांगली लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त (EPIC) इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाहीत, असे मतदार त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त खालील नमूद कागदपत्रापैकी कोणताही एक पुरावा सादर करू शकतील. यामध्ये आधार कार्ड, मनरेगा रोजगार पत्रक (जॉब कार्ड), बँक / टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक, श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहनचालन लायसन (ड्रायव्हींग लायसन), स्थायी खाते क्रमांक (पॅन कार्ड), राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक (RGI) यांनी दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), छायाचित्र असलेली निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे, केंद्र सरकार/ राज्य शासन/ सार्वजनिक क्षेत्र उपक्रम / सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले, छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, संसद सदस्य / विधानसभा सदस्य / विधानपरिषद सदस्य यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि, विशिष्ट दिव्यांगत्वाचे ओळखपत्र (युडीआयडी), सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार या कागदपत्रांचा समावेश आहे. 00000

रविवार, १४ एप्रिल, २०२४

निर्भय, भयमुक्त, निःपक्ष वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा - मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

निवडणूक विषयक कामकाजाचा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून आढावा सांगली दि. 14 ( जि.मा.का.) : लोकसभा निवडणूक निर्भय, भयमुक्त आणि निःपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणेने सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज दिले. ४४-सांगली लोकसभा मतदार संघात येत्या ७ मे २०२४ रोजी मतदान होत असून लोकसभा मतदार संघातील निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या या आढावा बैठकीस जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे यांच्यासह सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व नोडल अधिकारी आदी उपस्थित होते. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम म्हणाले, निवडणुकीदरम्यान नगदी रक्कम तसेच मतदारांना आमिष दाखवण्यासाठी करण्यात येणाऱ्या बाबींच्या वाहतुकीवर एसएसटी व एफएसटी पथकांनी निगराणी ठेवावी. संशयित वाहनांची कडक तपासणी करावी. उमेदवारांचा खर्चावर खर्चविषयक समितीने लक्ष ठेवावे. उमेदवारांचा खर्च नियमित नोंदवून त्याची माहिती सादर करावी. कायदा सुव्यवस्था अबाधित राखा जिल्ह्यात निवडणूक कालावधीत कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची दक्षता जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने घ्यावी. संवेदनशील भागात पुरेसा बंदोबस्त लावावा. आंतरराज्य व आंतरजिल्हा सीमेवरील चेक नाक्यावर येणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करावी. राज्य उत्पादन शुल्क, पोलीस, जीएसटी व वन विभागाने समन्वयाने कारवाई करावी. मतदार जागृतीचा कार्यक्रम प्रभावी राबवा देशात लोकशाहीचा उत्सव सुरू असून राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाने मतदार जनजागृती कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावा. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी नवीन उपक्रम राबविले जावेत. शहरी भागात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी बूथनिहाय नियोजन करावे. अधिकाधिक मतदान व्हावे याबाबत ग्रामस्थांचे प्रबोधन करावे. मतदान टक्केवारी वाढावी यासाठी बक्षीस योजना जाहीर करण्याबाबत विचार व्हावा. प्रत्येक बुथवर किमान ७५ टक्केपेक्षा अधिक मतदान व्हावे. ज्या मतदान केंद्रावरील मतदानाचे प्रमाण कमी आहे, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी यासाठी निवडणूक यंत्रणेने प्रयत्न करावेत, अशा सूचना श्री. चोक्कलिंगम यांनी दिल्या. मतदारांना इपिक कार्ड वाटप बरोबरच वोटर स्लिप वाटपाचे 100 टक्के काम बीएलओमार्फत करावे. मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करा केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. मतदान केंद्रावर मतदारांसाठी पिण्याचे पाणी, उन्हाळा असल्याने सावलीची सोय व अत्यावश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध ठेवाव्यात. शहरी भागातील मतदान केंद्रांवर पार्किंगची व्यवस्था करावी. मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प व व्हीलचेअरची व्यवस्था करावी. प्रसाधनगृह, विद्युत पुरवठा, पुरेशी प्रकाश योजना असावी. कामगारांना पगारी सुट्टी औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावता यावे यासाठी मतदाना दिवशी आयोगाने पगारी सुट्टी जाहीर केली आहे. कामगारांनीही या दिवशी मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी केले. मतदान केंद्रावर स्वच्छता अभियान जिल्ह्यातील मतदान केंद्र व परिसराची स्वच्छता ठेवण्यासाठी या परिसरात स्वच्छता अभियान राबवावे असा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी बैठकीत दिल्या. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जिल्ह्यात निवडणूक विषयक सुरू असलेल्या कामांची माहिती तर पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि कायदा व सुव्यवस्था व पोलीस विभागाची माहिती सादरीकरणद्वारे दिली. जिल्ह्यात लोकसभा निवडणूकसाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने केलेल्या तयारी बाबत मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी समाधान व्यक्त करून प्रशासनाचे कौतुक केले. ००००

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची माध्यम कक्षास भेट

सांगली दि. 14 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या प्रसार माध्यम कामकाजासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षास आज प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य एस. चोक्कलिंगम यांनी भेट देऊन पाहणी करून कक्षाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. तद्नंतर मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कार्यान्वित करण्यात आलेला नियंत्रण कक्ष आणि मतदार मदत केंद्रास भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी श्री. चोक्कलिंगम यांना माध्यम कक्ष, मतदार मदत केंद्र कक्ष व नियंत्रण कक्षाच्या कामकाजाबाबतची माहिती दिली. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी फारुख बागवान व माहिती अधिकारी एकनाथ पोवार आदी उपस्थित होते. 000000

शनिवार, १३ एप्रिल, २०२४

ऑनलाईन माध्यमातून होणाऱ्या संशयित आर्थिक व्यवहारांवर लक्ष द्या - निवडणूक खर्च निरीक्षक संजीव कुमार

सांगली दि. 13 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक २०२४ मधील निवडणूक कालावधीत गुगल पे, युपीआय, फोन पे, वॉलेट या सारख्या ऑनलाईन माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. यासाठी या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या संशयित आर्थिक व्यवहारांवर लक्ष द्यावे, असे निर्देश ४४-सांगली लोकसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरीक्षक संजीव कुमार यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज खर्च निरीक्षक संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ४४- सांगली लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकसाठी नियुक्त केलेल्या विविध पथकातील नोडल अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, मुख्य लेखा परीक्षक तथा जिल्हा खर्च सनियंत्रण समिती नोडल अधिकारी शिरीष धनवे आदी उपस्थित होते. खर्च निरीक्षक संजीव कुमार म्हणाले, सद्या सर्वत्र ऑनलाईनद्वारे आर्थिक व्यवहार उपलब्ध माध्यमातून केले जात आहेत. लोकसभा निवडणुकीतही या माध्यमातून आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या संशयित आर्थिक व्यवहारांवर लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण असून त्यादृष्टीने सर्वांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. निवडणूक कालावधीत राज्य उत्पादन शुल्क, जीएसटी, पोलीस, इन्कम टॅक्स आणि बँक अधिकारी यांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले. ००००

छपाईच्या अनुषंगाने मुद्रक - प्रकाशक यांना जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

सांगली दि. 13 (जि.मा.का.) : लोकसभा निवडणुकेच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने निवडणूक पत्रके, भित्तीपत्रके छपाई करण्याबाबत सांगली लोकसभा मतदार संघातील सर्व मुद्रक व प्रकाशक, राजकीय पक्ष, उमेदवार यांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 127 (A ) मधील तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला निवडणूक पत्रक किंवा भित्तीपत्रकाची छपाई करायाची आहे, त्या व्यक्तीने म्हणजेच प्रकाशकाने विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र , मुद्रकाला देणे आवश्यक आहे. या प्रतिज्ञापत्रावर प्रकाशकाची स्वतःची स्वाक्षरी असावी, तसेच त्याला ओळखणा-या दोन व्यक्तींनी सदर प्रतिज्ञापत्र साक्षांकीत केले पाहीजे. त्याचबरोबर जात, धर्म, भाषा इ. कारणांनी दोन गटांमध्ये शत्रुत्व निर्माण होईल, कोणाच्याही वैयक्तिक जीवनावर टीका होईल असा आक्षेपार्ह मजकूर छापण्यात येऊ नये. तसेच पत्रकावरील मजकुरामुळे आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता संबंधित मुद्रकांनी घ्यावी. छपाई केलेल्या निवडणूक पत्रकावर दर्शनी भागात मुद्रक व प्रकाशक यांचे नाव पत्ता व छपाई केलेल्या प्रतींची संख्या आदी बाबी छपाई प्रणालीमध्ये स्पष्टपणे दिसून येतील अशा पध्दतीने नमूद कराव्यात. मुद्रकांनी छपाई केलेल्या पत्रकाच्या बरोबर प्रकाशकाचे प्रतिज्ञापत्र तसेच विहीत नमुन्यातील परिशिष्ट बी मधील माहिती छपाई कैलेपासून 3 दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांना देणे मुद्रकावर बंधनकारक आहे. उपरोक्त तरतुदींचे, निर्देशांचे उल्लंघन करू नये. उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाईही होवू शकते. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी 18 मार्च रोजी मुद्रकांची बैठक घेवून सविस्तर सूचना दिल्या आहेत तसेच राजकीय पक्षांच्या घेतलेल्या बैठकांमध्येही या तरतुदींबाबत वारंवार सुचित केले आहे. उमेदवाराच्या अनाधिकृत खर्चावर निर्बंध घालण्याच्या अनुषंगाने तसेच उमेदवाराच्या / पक्षाच्या जाहिरातीमधून आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित न होण्याच्या दृष्टीने सदर बाब अत्यंत महत्वाची आहे.तरी, जिल्हयातील सर्व मुद्रक, प्रकाशक, उमेदवार, पक्षप्रमुख यांना लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 127 (A) च्या पालना बाबत जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. 00000

शुक्रवार, १२ एप्रिल, २०२४

44- सांगली लोकसभा मतदार संघात पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही

सांगली दि. 12 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदार संघात नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आज पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आज पहिल्या दिवशी 20 व्यक्ती 46 अर्ज घेऊन गेल्या आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक 19 एप्रिल 2024 असा आहे. ०००००

44-सांगली लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक अधिसूचना प्रसिध्द 7 मे रोजी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 सांगली दि. 12 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदार संघासाठी निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिध्द करण्यात आली असून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आज पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालेले नाही. नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल दुपारी 3 पर्यंत आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख 22 एप्रिल दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. या निवडणुकीसाठी येत्या 7 मे रोजी मतदान होत असून सर्व मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून लोकशाही बळकटीकरणासाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद प्रसंगी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, दरदिवशी नामनिर्देशन पत्र भरल्याची माहिती दर्शनी भागात नमुना क्रमांक 4 मध्ये नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी 100 मीटर परिसरात फक्त 3 वाहनांना परवानगी तसेच उमेदवारासह अन्य 4 जणांना परवानगी असेल. दिनांक 13, 14 व 17 एप्रिल रोजी शासकीय सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशन पत्राची छाननी 20 एप्रिल रोजी आहे. छाननी करीता उमदेवार ऑनलाईनही अर्ज दाखल करू शकतात. उमदेवारांच्या खर्चाची तपासणी 3 वेळा करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 2448 मतदान केंद्रे (सहाय्यकारी मतदान केंद्रासह (Aux Polling Station) आहेत. शिराळा तालुक्यात 03 शॅडो मतदान केंद्रे असून या ठिकाणी संपर्कासाठी आवश्यक ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात 12 एप्रिल अखेर एकूण 24 लाख 34 हजार 117 मतदारांचा समावेश आहे. यामध्ये पुरूष मतदार 12 लाख 42 हजार 152, स्त्री मतदार 11 लाख 91 हजार 854, तृतीयपंथी 120 मतदार आहेत. यामध्ये दिव्यांग मतदार 20 हजार 945, तर 85 वर्षावरील 39 हजार 240 इतके मतदार आहेत. यामध्ये 18 ते 19 वर्षे वयोगटातील 40 हजार 285 मतदार आहेत. उमेदवाराच्या इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडिया वरून राजकीय जाहिराती प्रसिध्द करण्यासाठी जिल्हास्तरावर गठीत करण्यात आलेल्या एमसीएमसी समितीकडून पूर्व प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवस अगोदर प्रिंट मीडियामधून उमेदवाराच्या राजकीय जाहिराती प्रसिध्द करण्यासाठी एमसीएमसी समितीकडून पूर्व प्रमाणिकरण करून घेणे आवश्यक आहे. 85 वर्षावरील नागरिकांना व दिव्यांगांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुक्त, निर्भय, पारदर्शक व शांततामय वातावरणात निवडणूक होण्यासाठी विविध विषयासाठी नोडल अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारीबाबत मतदारांना 1950 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. सीव्हिजील ॲपवर तक्रार प्राप्त झाल्यापासून 100 मिनिटाच्या आत तक्रारीचे निराकरण करता येणार आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याच्या अनुषंगाने व आदर्श आचारसंहिता भंगाबाबत प्राप्त तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी FST - 68, SST - 78, VST - 40 तर VVT - 17 पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. आचारसंहितेचे पालन करण्याकरीता जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष (24 x 7) स्थापन करण्यात आलेला आहे. सदर कक्षाकरीता 0233-2600185 हा दुरध्वनी क्रमांक आहे. नागरिकांना मतदान कार्ड, मतदारयादी, ऑनलाईन रजिस्ट्रेशन इ. बाबतच्या माहितीकरीता Voter helpline 1950 हा दुरध्वनी नंबर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. आज अखेर एकूण 2474 शस्त्रापैकी 2084 इतकी शस्त्रे अनामत करण्यात आलेली आहेत. मतदान केंद्रावर मतदारांना सावलीची व पाण्याची सोय केली जाणार आहे. दिव्यांगासाठी रॅम्प सोय करण्यात येणार असून त्यांना विना रांग मतदान करता येणार आहे. मतदान केंद्रावर अत्यावश्य वैद्यकीय सेवाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी सांगितले. निर्भय वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज - पोलीस अधीक्षक संदीप घुगे पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले, आंतरराज्य व आंतरजिल्हा चेक पोस्टवर आवश्यक चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यावेळी त्यांनी अवैध दारू, गांजा जप्तीबाबत माहिती दिली. पोलीस पथकाव्दारे नियमित तपासणी सुरू आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने पुढील काळात निवडणुका निर्भय व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. 0000000

निवडणूक कामकाजासाठी नियुक्त पथकांनी समन्वयाने काम करावे- खर्च निरीक्षक संजीव कुमार

सांगली दि. 12 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निर्भय आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कामकाजासाठी नियुक्त सर्व पथकांनी समन्वयाने काम करावे. लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवारास 95 लाख खर्चाची मर्यादा आयोगाने घातली असून उमेदवारांकडून प्रचारासाठी केल्या जाणाऱ्या प्रत्येक खर्चावर बारकाईने लक्ष ठेवावे, अशा सूचना 44-सांगली लोकसभा मतदार संघाचे खर्च निरीक्षक (Expenditure observer) संजीव कुमार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात खर्च निरीक्षक संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, खर्च निरीक्षक - नोडल अधिकारी शिरीष धनवे आदी उपस्थित होते. खर्च निरीक्षक संजीव कुमार म्हणाले, निवडणुकीत अवैध मार्गाने होणाऱ्या खर्चावर बारकाईने लक्ष देऊन याची तपासणी होणे गरजेचे आहे. यामध्ये एसएसटी व एफएसएसटी पथकांची मोठी जबाबदारी आहे. या पथकांनी अवैध दारू व अवैध रकमेची तपासणी करावी. जिल्ह्यात येणाऱ्या संशयित वाहनाची बारकाईने तपासणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, एसएसटी व एफएसएसटी पथकांनी संशयित वाहनांची कडक तपासणी करावी. हिशोबापेक्षा अधिक रक्कम आढळून आल्यास नियमानुसार संबंधितावर कारवाई करावी. तपासणी पथकांना देण्यात आलेल्या वाहनावर जीपीएस सिस्टीम कार्यरत करण्यात आली असल्याने या पथकानी सचोटीने काम करावे. पोलीस अधीक्षक श्री. घुगे यांनी सांगितले, निवडणूक कालावधीत अवैध दारू, अवैध रक्कम पकडण्यात एसएसटी व एफएसएसटी पथकांचे काम महत्वाचे आहे. अंतर राज्य सीमेवरील चेक पोस्टवरील व आंतर जिल्हा सीमेवरील चेक पोस्टवर संशयित वाहनांची कसून तपासणी करण्यात यावी. यावेळी निवडणूक कामकाजासाठी नियुक्त पथकातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. ०००००००

खर्च निरीक्षक संजीव कुमार यांची प्रसार माध्यम कक्षास भेट

सांगली दि. 12 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या प्रसार माध्यम कामकाजासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षास आज ४४-सांगली लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त खर्च निरीक्षक संजीव कुमार यांनी भेट देऊन पाहणी करून कक्षाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. तत्पूर्वी खर्च निरीक्षक संजीव कुमार यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी उमेदवार व राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या परवानग्या देण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या एक खिडकी कक्ष, नियंत्रण कक्ष आणि मतदार मदत केंद्रास भेट देऊन येथील कामकाजाची माहिती घेवून आवश्यक सूचना दिल्या. यावेळी खर्च निरीक्षक संजीव कुमार यांच्या समवेत निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, खर्च निरीक्षक -नोडल अधिकारी शिरीष धनवे उपस्थित होते. ००००

गुरुवार, ११ एप्रिल, २०२४

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ खर्च निरीक्षक संजीव कुमार जिल्ह्यात दाखल

सांगली दि. ११ ( जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी ४४-सांगली लोकसभा मतदार संघात ७ मे २०२४ रोजी मतदान होत आहे. ४४-सांगली लोकसभा मतदार संघासाठी खर्च निरीक्षक (Expenditure observer) म्हणून संजीव कुमार असून ते आज सांगलीत दाखल झाले आहेत. त्यांच्या कार्यालयाचा पत्ता " जिल्हास्तरीय खर्च सनियंत्रण कक्ष", अर्थ व बांधकाम समिती सभागृह, दुसरा मजला, जिल्हा परिषद सांगली असा आहे. ई- मेल expenditureobserver44sangli@gmail.com व भ्रमणध्वनी क्र. 8483033745 हा आहे. खर्च निरीक्षक संजीव कुमार हे ४४-सांगली लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार असून सांगली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मधील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने काही तक्रारी असल्यास संबंधितांनी उक्त नमूद ई-मेलवर किंवा भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ०००००

बुधवार, १० एप्रिल, २०२४

मुद्रित माध्यमातील जाहिराती माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून पूर्व-प्रमाणित करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश

सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार, इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी राजकीय जाहिरात राज्य व जिल्हास्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (एमसीएमसी) पूर्ण-प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करु नये, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. 44-सांगली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान होणार असून मुद्रित माध्यमांमध्ये दिनांक 6 व 7 मे रोजी राजकीय जाहिरात प्रसिध्द करण्यासाठी त्या जिल्हास्तरीय एमसीएमसी समितीकडून पूर्व-प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. अर्जदारांनी जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवस आधी एमसीएमसी कडे अर्ज सादर करावा. 000000

राज्यात ओपिनियन आणि एक्झिट पोलला निवडणूक कालावधीत प्रतिबंध

सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे. महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असून याअनुषंगाने 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात 19 एप्रिल रोजी सकाळी सात वाजल्यापासून 1 जून 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत एक्झिट पोलसाठी प्रतिबंध लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्याच्या आधी 48 तासाच्या कालावधीत ओपिनियन पोल अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल, असे निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे. 0000

उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित झाला असून दिनांक 12 एप्रिलपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज वेळेत सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल,उ पमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवी ) प्रमोद काळे, मुख्य लेखा परिक्षक (मनपा) शिरीष धनवे, जिल्हा माहिती अधिकारी फारूक बागवान आदी उपस्थित होते. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी दि 12 एप्रिल पासून नामनिर्देशन पत्र सुरू होणार असून सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करावा. अपूर्ण अर्ज सादर करू नये. उमेदवाराच्या खर्चाबाबत प्रशासनाकडून शाडो रजिस्टर ठेवण्यात येणार असून त्याद्वारे त्याची पडताळणी केली जाईल. तसेच उमेदवारांनी खर्चाची नोंदणी काळजीपूर्वक करावी. सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारण्यास येणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मतदानादिवशी नियुक्त मतदान प्रतिनिधींनी काय करावे, काय करू नये या अनुषंगाने सविस्तर माहिती डॉ. कनिचे यांनी दिली. शिरीष धनवे यांनी उमेदवाराच्या खर्च विषयक तसेच निवासी उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाच्या नोडल अधिकारी ज्योती पाटील यांनी आचारसंहिता भंगाबाबत तर जिल्हा माहिती अधिकारी फारुख बागवान यांनी जाहिरात प्रमाणिकरण व पेड न्यूजच्या अनुषंगाने यावेळी उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सविस्तर माहिती दिली. या बैठकीसाठी विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. ०००००

सोमवार, ८ एप्रिल, २०२४

मतदान जनजागृतीसाठी स्वीप अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात साकारली भव्यदिव्य रांगोळी

“ वृध्द असो वा जवान ; अवश्य करा मतदान ” सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीचे मतदान सांगली जिल्ह्यांकरीता दि. 7 मे रोजी होणार आहे. मतदान टक्केवारी वाढावा म्हणून तसेच मतदान जनजागृती करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून आज स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात 80 x 55 फूट इतक्या आकाराची भव्यदिव्य रांगोळी काढण्यात आली. या रांगोळीचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, स्वीपचे नोडल अधिकारी शशिकांत शिंदे, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, दादासाहेब कांबळे, श्रीमती निता शिंदे, डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र ताटे, तहसिलदार लिना खरात, मिना निंबाळकर यांच्यासह प्रशसनातले इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे यांनी उपस्थितांना मतदान करण्यासाठी मतदान प्रतिज्ञा दिली. इस्लामपूर येथील रांगोळी कलावंत सचिन अवसरे (वय ३४) यांचा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते शाल व पुष्प देवून सत्कार करण्यात आला. तसेच भव्यदिव्य रांगोळी साकारल्याबद्दल श्री. अवसरे यांचे कौतुक करून पाठीवर शाबासकीची थाप टाकली. “ वृध्द असो वा जवान ; अवश्य करा मतदान ” ही कॅचलाईन घेवून श्री. अवसरे यांनी ही रांगोळी साकारली. 00000

शनिवार, ६ एप्रिल, २०२४

मतदानासाठी 7 मे रोजी कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च 2024 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीचे मतदान सांगली जिल्ह्यांकरीता दि. 7 मे रोजी होणार आहे. लोकप्रतिनिधीत्व कायदा, 1951 मधील कलम 135 (ब) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक 22 मार्च 2024 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत संबंधितांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील. उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्याविरूध्द योग्य कारवाई करण्यात येईल, असे शासन परिपत्रकात नमूद केले आहे. 00000

शुक्रवार, ५ एप्रिल, २०२४

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : लोकसभा निवडणूक-2024, विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, जयंती, यात्रा, जत्रा, उरूस आदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 8 ते 22 एप्रिल अखेरपर्यंत खालील कृत्ये करण्यास मनाई केली आहे. या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 8 एप्रिल रोजीचे 6 वाजल्यापासून ते दि. 22 एप्रिल रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत. 00000

'रन फॉर वोट' साठी विटामध्ये मॅरेथॉनचे आयोजन

सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : विटा ता. खानापूर येथे लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदान टक्केवारी वाढवणे, मतदान जनजागृती करणे आणि मतदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेणे यासाठी स्वीप कार्यक्रम अंतर्गत आज विटा शहरांमध्ये सकाळी 7.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी रन फॉर वोट - एक धाव मतदान जनजागृती रनचे आयोजन केले होते. याप्रसंगी खानापूरचे तहसीलदार उदयसिंह गायकवाड व गटशिक्षणाधिकारी विकास राजे यांनी रन फॉर वोटमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व धावपटूना मतदान जनजागृतीसाठी आवाहन केले. या मॅरेथॉनमध्ये विटा शहरातील ग्रामस्थ, शासकीय कर्मचारी त्याचबरोबर सायकल प्रेमी क्लब विटा, अल्ट्रा फिटनेस क्लब विटा त्याचबरोबर विटा हायस्कूल विटा, के.के गुळवणी माध्यमिक विद्यालय विटा मधील विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला. ही मॅरेथॉन छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सुरू होवून शहरातील प्रमुख रस्त्यावरून धावली. या मॅरेथॉनला सपोर्ट करण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, गटविकास अधिकारी डॉ.संताजी पाटील, मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील, श्री. वाजे, केंद्रप्रमुख दिलीप कुमार सानप, नवनाथ कदम, राजेंद्र जंगम, विटा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री जाधव, विटा सायकल प्रेमी क्लबचे अध्यक्ष सतीश शिंदे अल्ट्रा फिटनेस क्लबचे अध्यक्ष संग्राम कचरे, सागर कचरे, मिलिंद भागवत, कॅप्टन अतुल माळी, विटा शहरातील विविध फिटनेस क्लब, स्पोर्ट्स अकॅडमी, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम यंत्रांची सरमिसळ उद्या राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना उपस्थितीचे आवाहन- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. ५ (जि. मा. का.): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणूक कार्यक्रमानुसार ४४-सांगली लोकसभा मतदारसंघाकरिता दि. ७ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार जिल्ह्यातील ईव्हीएम यंत्रांची प्रथम सरमिसळ (First Randomisation) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी व विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, उपजिल्हाधिकारी तथा ईव्हीएम नोडल अधिकारी डॉ. विकास खरात, 281- मिरज (अ.जा.) सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दिपक शिंदे, 283-इस्लामपूर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, 284-शिराळा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ पोटे, 288-जत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजयकुमार नष्टे व जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल आदी उपस्थित होते. यावेळी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट व्यवस्थापनाचे नोडल अधिकारी डॉ.विकास खरात यांनी सांगली लोकसभा मतदार संघाकरीता उपलब्ध असलेल्या बॅलेट युनिट (BU), कंट्रोल युनिट (CU) व VVPAT च्या अनुषंगाने उपस्थित राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना माहिती दिली. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ३ हजार १०९ बॅलेट युनिट, ३ हजार १०९ कंट्रोल युनिट तर ३ हजार ४१० व्हीव्हीपॅट मशिन्सची सरमिसळ करण्यात आली. या सर्व मशिन्सचे विधानसभा मतदारसंघनिहाय Randomisation प्रमाणे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली. प्रथम सरमिसळच्या यादीप्रमाणे मतदान यंत्राचे विधानसभा मतदारसंघनिहाय विलगीकरण करून मतदारसंघनिहाय वितरण व वाहतूक करणे तसेच विधानसभा मतदारसंघस्तरीय स्थापित केलेल्या सुरक्षा कक्षात मशिन्स साठविण्याकामी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाकडील मिरज-पंढरपूर रोड जवळील गोदाम क्र. ०८ मालगाव तालुका मिरज येथील मुख्य सुरक्षा कक्ष गोदाम हे दिनांक ५ ते १० एप्रिल २०२४ कालावधीत उघडण्यास परवानगी प्राप्त झाली आहे. याकामी दि. ६ ते १० एप्रिल २०२४ या कालावधीत दररोज सकाळी १० वाजता सुरक्षा कक्ष उघडणे व दररोज काम संपल्यानंतर सीलबंद करण्यावेळी राजकीय पक्षांच्या प्राधिकृत प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. त्याचप्रमाणे संबंधित राजकीय पक्षांना लेखी कळविण्यात आले आहे. 000000

बुधवार, ३ एप्रिल, २०२४

पलूसमध्ये मतदार जागृती अभियानांतर्गत मॅरेथॉन रॅली संपन्न

सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : येत्या 7 मे रोजी सांगली लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. मतदान म्हणजे लोकशाहीचा मोठा उत्सव आहे. या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी प्रशासन पातळीवर जोरदार प्रबोधन मोहीम राबवली जात आहे. याचाच एक भाग म्हणून आज पलूस शहरात तालुका प्रशासनाच्या वतीने पलूस तहसील कार्यालय,पोलीस स्टेशन ते नवीन एसटी स्टँडपर्यंत मॅरेथॉन रॅली काढण्यात आली. या मॅरेथॉन रॅलीची सुरुवात तहसील कार्यालयापासून झाली. प्रारंभी तहसीलदार दीप्ती रेटे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. यावेळी बोलताना सहा. नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी प्रकाश कांबळे म्हणाले, स्वीप कार्यक्रमांतर्गत युवक, युवती, प्रौढ, वृद्ध तसेच जे नव मतदार आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदानासंदर्भात गेली दोन महिने जागृती करण्याचे प्रयत्न करीत आहोत. तसेच शाळा, महाविद्यालयातून या संदर्भात रांगोळी / निबंध स्पर्धा, विद्यार्थी रॅली, सायकल रॅली असे उपक्रम घेतले आहेत. या सर्व बाबींचा मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी निश्चित फायदा होईल. यावेळी मतदार जागृतीच्या अनुषंगाने उपस्थितांनी मॅरेथॉन रॅलीमध्ये, सर्व कर्मचाऱ्यांनी हातात बॅनर घेवून तसेच मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. आपले मतदान आपले भविष्य अशा घोषणा दिल्या. या रॅलीमध्ये तहसीलदार दीप्ती रिठे, निवडणूक नायब तहसीलदार सर्वश्री परदेशी, मनोहर पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप पाटील, गटशिक्षणाधिकारी प्रकाश कांबळे, केंद्रप्रमुख सर्वश्री किरण आमणे, राम चव्हाण, शिक्षक मारुती शिरतोडे, नितीन चव्हाण, पंडित विष्णू दिगंबर हायस्कूलचे मुख्याध्यापक तानाजी करांडे, बाळासाहेब खेडकर, विनोद आल्हाट, संतोष खेडकर, अमोल कोळेकर यांच्यासह तहसील कार्यालय पंचायत समिती कर्मचारी शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 00000

सोमवार, १ एप्रिल, २०२४

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रमाव्दारे जनजागृती करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 1 (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यात येत्या 7 मे रोजी मतदान होत आहे. निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत सर्व स्तरावर नाविण्यपूर्ण उपक्रमाव्दारे जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीप कार्यक्रम आढावा व नियोजनाबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी श्रीमती निता शिंदे, उपजिल्हाधिकारी सविता लष्करे, जि.प. उपपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) तथा स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, गत निवडणुकीत राष्ट्रीय सरासरी पेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रमाव्दारे जनजागृती करावी. मतदान केंद्र, गाव व तालुका स्तरावर नाविण्यपूर्ण उपक्रमाव्दारे जनजागृती करावी. महाविद्यालय, पेट्रोल पंप, एसटी महामंडळ बसस्थानक, बसेस, पोस्ट ऑफीस, चावडी, मंगल कार्यालये, मोठे समारंभ आदी ठिकाणी पोस्टर, स्टीकर, ऑडिओ जिंगल्स, नाविण्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जनजागृती करावी. तसेच जिल्ह्यातून किमान एक लाख संकल्प पत्रे भरून घ्यावीत. यामध्ये 50 टक्क्यापेक्षा अधिक महिलांचा समावेश असावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे म्हणाले, तालुकास्तरावर मोठी रांगोळी, ज्या ठिकाणी नागरिकांची गर्दी असते त्या ठिकाणी पोहोचून मतदार जनजागृती करावी. त्याचबरोबर सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा. तसेच वाढता उन्हाळा लक्षात घेता नागरिकांना त्रास होणार नाही या दृष्टीने सकाळी कार्यक्रमाचे नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात याव्यात. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी रांगोळी स्पर्धा, सायकल रॅलीचे नेटके आयोजन करून मतदार जनजागृती मोठ्या प्रमाणावर करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळीस तालुकास्तरीय नोडल अधिकारी उपस्थित होते. 00000

शुक्रवार, २९ मार्च, २०२४

वासुंबेमध्ये सायकल रॅली, रांगोळी स्पर्धेचे आयोजन

सांगली दि.29 (जि.मा.का.) : येत्या सात मे रोजी लोकशाहीचा उत्सव पार पडत आहे. या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी स्वीप मोहिमेअंतर्गत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्या प्रयत्नाचे फलित म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश मतदानाची टक्केवारी वाढावी असा आहे. तासगाव तालुक्यातील मौजे वासुंबे येथे गेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये कमी मतदान झाले होते ही बाब तेथील नागरिकांना अस्वस्थ करत होती. यंदा मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा गावकऱ्यांनी निर्णय घेतला त्या अनुषंगाने स्वीप उपक्रमांतर्गंत मतदान वाढीसाठी तेथील प्रशालेची मदत घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्याद्वारे वासुंबे गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी व सायकल रॅली काढण्यात आली. त्याचबरोबर विद्यार्थी व पालक यांच्यासाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली. या कामी शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती शोभा जाधव यांनी उपस्थित नागरिकांना मतदान कर्तव्य बजाविण्याबाबत आवाहन केले. या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत, यंदा मतदानाचा हक्क मोठ्या प्रमाणावर बजावणार असल्याचे सांगितले. 0000000

बुधवार, २७ मार्च, २०२४

लोकशाही बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजावावा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

मतदार जनजागृतीसाठी सायकल रॅली उत्साहात संपन्न सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करावे, यासाठी स्वीप (SVEEP) कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीवर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी येत्या 7 मे रोजी मतदान होत आहे. सर्व मतदारांनी लोकशाही बळकटीकरणासाठी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी केले. मतदार जनजागृतीसाठी स्वीप उपक्रमांतर्गत आज सकाळी 7 वाजता विश्रामबाग सांगली येथे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीस प्रारंभ केला. या सायकल रॅलीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, महानगरपालिका उपायुक्त वैभव साबळे, आरोग्य अधिकारी रविंद्र ताटे, वैद्यकीय अधिकारी वैभव पाटील, मुख्य अग्नीशमन अधिकारी सुनील माळी, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रियाज मुजावर, श्री. बोडस, अरूण लोंढे, यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, सायकल पट्टू, क्रीडा प्रेमी, नागरिक, विविध शाळा, विद्यालयांचे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही रॅली मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी रॅलीमध्ये सहभाग घेणाऱ्यांचे अभिनंदन करून, 7 मे रोजी मतदान करण्याचे तसेच, इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याबाबत आवाहन केले. विश्रामबाग सांगली येथून काढण्यात आलेली सायकल रॅली पुढे पुष्कराज चौक - राम मंदिर मार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम सांगली येथे या रॅलीची सांगता झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी 7 मे रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित सायकल पट्टू, पत्रकार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात या सायकल रॅली कार्यक्रमाची सांगता झाली. 00000

मंगळवार, २६ मार्च, २०२४

अत्यावश्यक शासकीय सेवेमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदानाची सुविधा

सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : भारत निवडणूक आयोगाने अत्यावश्यक शासकीय सेवेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानादिवशी पदीय कर्तव्य बजावत असल्याने प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जावून मतदान करता येत नसल्यामुळे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोस्टल मतदानाची सुविधी उपलब्ध करून दिली आहे. याबाबतची अधिसूचना व नमुना फॉर्म 12 D सांगली जिल्ह्याच्या sangli.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी याचा लाभ घेवून राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अत्यावश्यक शासकीय सेवेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानादिवशी पदीय कर्तव्य बजावत असल्याने प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जावून मतदान करता येत नसल्यामुळे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोस्टल मतदानाची सुविधी उपलब्ध करून दिली आहे. भारत निवडणूक आयोगाने दिनांक 19 मार्च 2024 रोजी प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेनुसार एकूण 32 अत्यावश्यक शासकीय सेवेमधील जे अधिकारी, कर्मचाऱी मतदानादिवशी कर्तव्य बजावत असतील त्यांना पोस्टल मतदानाची सुविधा दिली आहे. अत्यावश्यक सेवेमधील आस्थापना पुढीलप्रमाणे - मेट्रो, रेल्वे ट्रान्सपोर्ट (पॅसेंजर आणि Freight) सर्व्हिसेस, ज्या प्रसारमाध्यमांना मतदान दिवसातील प्रक्रिया कव्हर करण्यासाठी आयोगाच्या मान्यतेने अधिकृत पत्रे जारी करण्यात आली आहेत ते प्रसारमाध्यम प्रतिनिधी, इलेक्ट्रीसिटी डिपार्टमेंट, बीएसएनएल, पोस्ट आणि टेलिग्राम, दूरदर्शन, ऑल इंडिया रेडिओ, स्टेट मिल्क युनियन ॲण्ड मिल्क कोऑपरेटिव्ह सोसायटी, हेल्थ डिपार्टमेंट, फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ॲव्हीएशन, रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, फायर सर्व्हिसेस, ट्राफिक पोलिस, ॲम्बुलन्स सर्व्हिसेस, शिपींग, फायर फोर्स, जेल, एक्साईज, वॉटर ॲथॉरिटी, ट्रेझरी सर्व्हिसेस, फॉरेस्ट, इन्फॉर्मेशन ॲण्ड पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट, पोलीस, सिव्हील डिफेन्स ॲण्ड होम गार्ड, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार, पॉवर, भारतीय विमानतळ प्राधिकरण, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, डिपार्टमेंट ऑफ पीडब्लूडी, एमटीएनएल. 00000

गुरुवार, २१ मार्च, २०२४

स्वीप अंतर्गत येत्या 27 मार्च रोजी सर्व तालुक्यांत सायकल रॅलीचे आयोजन

सांगली दि. 21 (जि.मा.का.) : येत्या सात मे रोजी लोकशाहीचा उत्सव पार पडत आहे. या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी स्वीप मोहिमेअंतर्गत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्या प्रयत्नाचे फलित म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश मतदानाची टक्केवारी वाढावी असा असून या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह सांगली शहरामध्ये, दि. 27 मार्च रोजी सकाळी 7 वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला विश्राम बाग येथून प्रारंभ होणार असून कर्मवीर भाऊराव पाटील चौक, राममंदीर या ठिकाणा वरून मार्गक्रमण करत भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे या रॅलीची सांगता होणार आहे. या रॅलीला प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 18 वर्षापुढील सर्वांनी या सायकल रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन स्वीपचे नोडल अधिकारी शशिकांत शिंदे यांनी केले आहे. 00000

वय वर्ष फक्त 103 ..! - छे . . ! छे . . ! मी घरून मतदान करणार नाही तर प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊनच मतदान करणार

सांगली दि. 21 (जि.मा.का.) : पांढरपेशा . . . सुशिक्षित वर्गामध्ये मतदान करण्याविषयी फारशी रुची दिसून येत नाही. मात्र अशाही स्थितीत काहीजण प्रकाशाचा किरण बनतात. असाच एक किरण ...शिराळामध्ये आहे. नाव महादेव दंडगे (स्वातंत्र सैनिक ) वय वर्ष फक्त 103. या वयात ही देशप्रेम .. कणखरता . . जिद्द या शब्दांनी ओतप्रोत भरलेल. एक समृद्ध, सफल आयुष्य. ही गोष्ट आहे एका देशप्रेमी मतदाराची. शिराळा मतदार संघ विधानसभेला सांगली जिल्ह्याशी तर लोकसभेला कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदार संघाशी जोडलेला. या मतदारसंघाची पाहणी करण्यासाठी तेथील निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे हे गेले होते. सोबत शिराळ्याच्या तहसीलदार श्यामला खोत या ही सोबत होत्या. यंदा निवडणूक आयोगाने 85 वर्षांपुढील तसेच अंध मतदारासाठी विशेष बाब म्हणून घरातूनच मतदान करण्याची सोय या निवडणुकीत केली आहे. निवडणूक आयोगाच्या या मतदान उपक्रमाबाबत माहिती सांगण्यासाठी श्री. शिंदे यांनी शिराळाचा दौरा केला. यावेळेस त्यांना या ठिकाणी श्री. दंडगे नावाचे स्वातंत्र्य सैनिक (वय -103 )असल्याचे समजले. त्यांची श्री. शिंदे यांनी आपुलकीने भेट घेत घरून मतदान करण्याबाबत सुचित केले. त्यावर दंडगे यांनी स्मित हास्य करत सांगितले, छे . . ! छे . . ! मी घरून मतदान करणार नाही तर प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊनच त्या ठिकाणी मतदान करणार. त्यांची ही जिद्द पाहून निवडणूक निर्णय अधिकारी श्री. शिंदे ही क्षणभरासाठी थबकले . . . ! जर या 103 वर्षाच्या नवतरुण मतदाराचा आदर्श मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्या नागरिकांनी घेतला तर ? 000000

जिल्हा कौशल्य विकास केंद्राकडून आज प्लेसमेंट ड्राईव्ह

सांगली दि. 21 (जि.मा.का.) : खाजगी क्षेत्रात लहान मध्यम व मोठे उद्योजक तसेच कारखाने यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ व बेरोजगारीची समस्या दूर करण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगलीच्या वतीने आज दि. 22 मार्च रोजी जिल्हास्तरीय प्लेसमेंट ड्राईव्ह-9 चे आयोजन सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत करण्यात आले आहे. या ड्राइव्हमध्ये तीन नामवंत कंपन्यांचा सहभाग असून एकूण 106 पदे भरण्यात येणार असून इच्छूक व पात्र उमेदवारांनी विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सकाळी 10 ते 2 या वेळेत मध्यवर्ती प्रशासकीय इमारत (तळमजला) जिल्हाधिकारी कार्यालय परिसर विजयनगर - सांगली या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे. 00000

शासकीय सुट्टीच्या दिवशीही मुद्रांक कार्यालय सुरू राहणार

सांगली दि. 21 (जि.मा.का.) : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दरवर्षी एक एप्रिलला वार्षिक मूल्य दरानुसार नवीन दर जाहीर केले जातात. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन दिनांक 23 व 24 मार्च तसेच 29 ते 31 मार्च या शासकीय सुट्टीच्या दिवशी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंध कार्यालये या दिवशी सुरू राहणार असल्याची माहिती सहाय्यक जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे - जिरंगे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. पक्षकारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. 00000

भ्रष्टाचार निर्मूलन समिती स्थापनेबाबत आवाहन

सांगली दि. 20 (जि.मा.का.) : सध्या कार्यरत असलेल्या जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या 2 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असल्याने नव्याने जिल्हा व तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची स्थापना करावयाची आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील इच्छुकांनी आपले स्वतःचे नाव, पत्ता, वय, शैक्षणिक पात्रता, तसेच कोणत्या गटातून शिफारस करण्यात येत आहे तो गट अथवा प्रवर्ग या सर्व आवश्यक कागदपत्रांसह 22 मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत. सदर अर्जाचा नमुना प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. इच्छुकांनी भरलेले परिपूर्ण अर्ज sgysangli@gmail.com या ईमेलवर पाठवावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नसल्याचे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सांगली यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. 00000

बुधवार, २० मार्च, २०२४

आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने 14,633 जाहिराती हटविल्या

सांगली दि. 20 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ जाहीर झाल्याने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीला प्रारंभ झाला आहे. त्या अनुषंगाने निवडणूक जाहीर झाल्यापासून २४ तासाच्या आत शासकीय इमारती अथवा कार्यालयाच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर, पेपर, कटआउट, होर्डिंग्ज, जाहिरातींचे फलक, बॅनर्स प्रशासनाने हटवली असून याची संख्या सुमारे ५ हजार ५९ इतकी आहे. तसेच ४८ तासांमध्ये सार्वजनिक मालमत्ता व जागेच्या गैरवापर दूर करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने ६ हजार ४०१ जाहिराती काढल्या. तर ७२ तासांमध्ये खाजगी मालमत्तेवरील सुमारे ३ हजार १७३ इतक्या जाहिराती आत्तापर्यंत काढून टाकण्यात आल्या. आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणाने अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने एकंदरीत सुमारे 14 हजार 633 इतक्या जाहिराती काढून टाकल्या आहेत. 000000

निवडणूक अनुषंगाने आता एक खिडकी योजनेच्या माध्यमातून मिळणार विविध परवाने

सांगली दि. 20 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कामांकरिता विविध राजकीय पक्ष व उमेदवार यांना आचारसंहिता कालावधीत द्यावयाच्या विविध परवानग्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यास्तरावर आजपासून एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आला आहे. सांगली लोकसभा मतदार संघासाठी सदरचा कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय सांगली (तळमजला ) येथे कार्यरत करण्यात आला आहे. तर त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर ही एक खिडकी कक्षामधून परवाने देण्यात येतील. एकापेक्षा अधिक विधानसभा मतदार संघाकरिता वाहन परवाना, रॅली, मिरवणूक परवाना आदी बाबींचा यामध्ये समावेश राहणार आहे. सुविधा पोर्टलवर तसेच प्रत्यक्ष प्राप्त होणाऱ्या अर्जाबाबत Encore पोर्टलच्या माध्यमातून परवानगी देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. जिल्ह्यातील 281-मिरज विधानसभा मतदार संघासाठी - पंचायत समिती मिरज, 282-सांगली - सांगली महानगरपालिका, 285 पलूस -कडेगाव - उपविभागीय कार्यालय कडेगाव, 286-खानापूर - तहसिल कार्यालय विटा, 287 - तासगाव - कवठे महांकाळ - प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय तासगाव व 288-जत विधानसभा मतदारसंघासाठी नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय जत या ठिकाणी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदार संघाचा समावेश नाही. जाहीर /कॉर्नर सभा, मेळावे, मिरवणुका, रोड – शो, रॅलीज, वाहन परवाना इत्यादींच्या अनुषंगाने संबंधित राजकीय पक्षाच्या लेटर हेडवर त्या संबंधित राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांचा अर्ज व उमेदवार यांच्या बाबतीत उमेदवाराच्या स्वतःच्या सहीचा अर्ज किंवा उमेदवाराचा अधिकृत निवडणूक प्रतिनिधीच्या सहीचा अर्ज सदर कक्षामध्ये स. 10 ते सायं 5 या वेळेत सुट्टीच्या दिवशीही स्विकारण्यात येतील. मीटिंग, सभा, रॅली आदीच्या परवानगीसाठी किमान 2 दिवस अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच suvidha.gov.eci.in या पब्लिक पोर्टलवर ही अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असून विविध परवानगी देण्याच्या अनुषंगाने अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे, फी आदीबाबत सविस्तर माहिती sangli.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 00000

रविवार, ३ मार्च, २०२४

मुलांनी मोबाईल ऐवजी मैदान जवळ करावे - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 3 (जि.मा.का.) : हल्ली मुले मोबाईलमध्ये खूप गुंतली आहेत. या मोबाईल ऐवजी मुलांनी मैदान जवळ केल्यास त्यांच्या आरोग्यासाठी ते अधिक चांगले होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. निमित्त होते विश्रामबाग येथील महासंस्कृती महोत्सवातर्गंत, ' यलो सांगली हॅपी स्ट्रीट ' या कार्यक्रमाचे . . . जीवनातील टेन्शन, चिंता, काळजी या सारख्या शब्दाला पूर्ण विराम देण्याच्या उद्देशाने या हॅपी स्ट्रीट कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते. या उपक्रमाला पालकमंत्र्यांनी अचानक भेट दिली. तेथील संपूर्ण वातावरण पाहिल्यानंतर पालकमंत्रीही क्षणभरासाठी आपल्या बालपणीच्या कालखंडात रंगून गेले. उपस्थित स्थानिक कलावंताशी त्यांनी अतिशय आत्मियतेने संवाद साधला. तसेच ' नंदीबैल - मालकास 'छोटीशी बक्षिसीही अदा केली. सकाळी ८ ते ११ या वेळेत पार पडलेल्या या हॅपी स्ट्रीट उपक्रमामध्ये बालकांबरोबर - पालक ही आपले वय विसरून सहभागी झाले होते. या हॅपी स्ट्रीट उपक्रमात बालपणीच्या सर्व आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्याचे काम जिल्हा प्रशासनाने केले. बाळ गोपाळांना आनंद देणारा मिकी माऊस, काचेच्या गोट्या, लघोर, घोडेस्वारी, योगासने, लेझीम, झांज, युद्ध कलेची प्रात्यक्षिके, झुंबा डान्स, गायन, मिमिक्री त्याचबरोबर उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्तपणे कोणताही कलाप्रकार सादर करावा याची मुभा सादरकर्त्यांना यावेळी देण्यात आली होती. त्यालाही नागरिकांनी गायन व नृत्याच्या रूपाने प्रतिसाद दिला. याप्रसंगी बैलगाडी, घोडेस्वारीची सफर मुलांनी अनुभवली तर नंदी बैलाची मोठी शिंगे बघून बाल चमू अचंबित झाला. स्वतःचे वय विसरायला लावणाऱ्या या जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमाबाबत उपस्थितांच्या चेहऱ्यावर 'आनंदरेषा' न उमटल्या तर नवलच . . ! शेवटी उपस्थितांचे आभार निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी मानले. उद्या दि. 4 मार्च (सोमवार) रोजी महासंस्कृती महोत्सवात सादर होणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे – (1) सायंकाळी ५.३० ते ७ लोककला / शाहीर (सांगली परिसरातील लोककलाकारांचे सादरीकरण), (2) सायंकाळी ७ ते ९.३० आपली संस्कृती (परंपरा जपणाऱ्या लोककलांचा अविष्कार). oooooo

शुक्रवार, १ मार्च, २०२४

महासंस्कृती महोत्सवाचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

सांगली दि. 1 (जि.मा.का.) : राज्यातील विविध संस्कृतीचे आदान - प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती त्याचबरोबर लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने दि. 2 ते 6 मार्च या कालावधीत कल्पद्रुम मैदान नेमिनाथ नगर सांगली येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन 2 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते होणार आहे. हा महोत्सव सर्वांसाठी मोफत असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. दिनांक 2 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता गर्जा महाराष्ट्र (अभिनेत्री निवेदक - पूर्वी भावे, सेलेब्रिटी गायक (अभंग)- ज्ञानेश्वर मेश्राम, भरतनाट्यम नृत्य - धनश्री आपटे आणि शिष्यांगणा, मर्दानी खेळ, मल्लखांब प्रात्याक्षिक, गजी नृत्य, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा कार्यक्रम होणार आहे. 00000

गुरुवार, २९ फेब्रुवारी, २०२४

येत्या रविवारी 'हॅप्पी स्ट्रीट' कार्यक्रमाचे आयोजन

सांगली दि. 29 (जि.मा.का.): सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई आणि जिल्हा प्रशासन सांगली यांच्या समन्वयातून महसंस्कृती महोत्सवाचे दि 2 मार्च ते 6 मार्च रोजी कल्पद्रुम मैदान सांगली येथे आयोजन करण्यात आले असून याचाच एक भाग असलेला 'यलो सांगली हॅप्पी स्ट्रीट' हा कार्यक्रम दि. 3 मार्च रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत विश्रामबाग चौक येथे होत असून यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम होणार आहेत. मल्लखांब, कबड्डी, योगासने आणि अनेक मैदानी खेळांची प्रात्यक्षिके, तसेच रांगोळी काढणे, बैलगाडी, टांगा सफर, घोडेस्वारी, हलगी ढोल ताशा पथक, लेझिम पथक त्याच बरोबर झुंबा डान्स, लहान मुलांसाठी कार्टून्स, करा ओके तसेच लहानपणीच्या खेळाची अनुभुती सांगलीकरांना घेता येणार आहे. ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या विविध लोककला यामध्ये नागरिकांना पाहता येणार आहेत. त्याचबरोबर उपस्थित नागरिकांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी, व्यासपीठावर मुक्त सादरीकरणही करता येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिक, गायक, नृत्य कलाकार, झुंबा डान्सर, चित्रकार, शाहीर, हास्य क्लब, सायकलिंग क्लब, शाळा व कॉलेज तसेच विविध सामाजिक संस्था, महिलांचे किटी पार्टी ग्रुप, इतर कलाकार यांनी या मंचावर येवून आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या सर्व सांस्कृतिक मेजवानीचा आनंद घेण्यासाठी सर्व नागरिकांनी रविवार दिनांक 3 मार्च रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत विश्रामबाग चौक येथे मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 00000

शनिवार, १७ फेब्रुवारी, २०२४

'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचे पुण्यात २४ फेब्रुवारीपासून आयोजन

मुंबई दि. १७ : संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीला अधिक बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन कारणाऱ्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी २४ ते २६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान पुणे येथे 'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो' आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) सक्षम करणारा महाराष्ट्रातील हा अशा प्रकारचा पहिलाच डिफेन्स एक्स्पो असून पुण्यातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित करण्यात आला आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्राविण्य असणाऱ्या उद्योगातील समन्वयाला चालना देण्याच्या उद्देशाने जल, स्थल आणि वायू या तिन्ही सुरक्षा दलांचा यात महत्वाचा सहभाग असणार आहे. यात दोनशेहून अधिक सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्ट-अप आणि २० हजारहून अधिक अभियांत्रिकी विद्यार्थी एकत्र येऊन ज्ञानाची देवाण-घेवाण करतील. भारताचे औद्योगिक बलस्थान म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र हे आत्मनिर्भर भारताचे संवर्धन करण्यात आघाडीवर असलेले राज्य आहे. राज्यात ३९.८८ लाख एमएसएमईचे मजबूत जाळे आहे. ज्यात उद्यम पोर्टलवर १०८.६७ लाख रोजगार आहेत. एमएसएमई डिफेन्स एक्स्पो अशा उद्योगांना त्यांच्या क्षमतांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि संरक्षण उद्योगातील प्रमुख भागधारकांशी जोडण्यासाठी एक समर्पित व्यासपीठ प्रदान करेल. एमएसएमई डिफेन्स एक्सपो २०२४ ची ठळक वैशिष्ट्ये : या एक्स्पोमध्ये २०० हून अधिक एमएसएमई प्रदर्शक त्यांची संरक्षण- संबंधित उत्पादने, तंत्रज्ञान आणि सेवांचे विविध क्षेत्र जसे की एरोस्पेस, शस्त्रास्त्रे, इलेक्ट्रॉनिक्स, दळणवळण आणि लॉजिस्टिक्स याचे प्रदर्शन करतील. एमएसएमई आणि प्रमुख संरक्षण खरेदी संस्था, उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि संभाव्य गुंतवणूकदार यांच्यात संवाद सत्रे होतील. नॉलेज सेमिनार : प्रख्यात तज्ञ आणि विचारवंत नेते, संरक्षण क्षेत्रातील नवीनतम ट्रेंड, संधी आणि आव्हाने यावर दृष्टीक्षेप टाकतील कौशल्य विकास कार्यशाळा : संरक्षण उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एमएसएमई कर्मचाऱ्यांची कौशल्ये आणि क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने परस्परसंवादी सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. सरकारी सहाय्य उपक्रम : संरक्षण उत्पादनात एमएसएमईंना समर्थन देण्यासाठी विविध सरकारी योजना, धोरणे आणि आर्थिक सहाय्य पर्याय प्रदर्शित करण्यात येतील. धोरणात्मक भागीदारी : संरक्षण क्षेत्रात एमएसएमईना व्यवसाय वाढवण्यासाठी संभाव्य खरेदीदार, सहयोगी गुंतवणूकदारांशी संपर्क साधता येईल. तज्ञांचे सेमिनार आणि कार्यशाळांद्वारे संरक्षण उद्योगातील नवीनतम घडामोडी आणि ट्रेंड्सवर अपडेट मिळू शकतील. आर्थिक सहाय्य : संरक्षण क्षेत्रातील एमएसएमईंच्या वाढीला चालना देण्यासाठी सरकारी योजना आणि निधीच्या संधी उपलब्ध होतील. या एक्स्पोद्वारे एमएसएमईंना सर्वसमावेशक सहाय्य प्रदान करण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. यामध्ये उद्योग जोडणी सुलभ करणे, तांत्रिक सहाय्य ऑफर करणे आणि नियामक प्रक्रिया सुव्यवस्थित करणे समाविष्ट आहे. यामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रामध्ये त्यांना सक्रियपणे सहभागी होण्यास सक्षम करतील. एमएसएमईं डिफेन्स एक्स्पो २०२४ मध्ये एमएसएमईं, संरक्षण अधिकारी, उद्योग प्रतिनिधी, गुंतवणूकदार आणि शैक्षणिक क्षेत्रातील २ हजारहून अधिक संस्था सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले. एल ॲण्ड टी. डिफेन्स, महिंद्रा, टाटा, डीआरडीओ, सोलार, भारत फोर्ज आणि सार्वजनिक सरंक्षण क्षेत्रातील उपक्रम (PSU) सारख्या उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी केलेल्या नाविण्यपूर्ण संरक्षण उत्पादनामुळे महाराष्ट्राची संरक्षण क्षेत्रात प्रमुख उत्पादक म्हणून ओळख निर्माण झाली आहे. यात सहभागींना फायदेशीर व्यावसायिक संधी, शेकडो कोटींचे संभाव्य करार आणि संरक्षण तंत्रज्ञान निर्यात क्षेत्रातील एमएसएमई आणि स्टार्ट-अप्ससाठी लाभदायक ठरेल. "हा एक्स्पो आपल्या राज्याच्या संरक्षण क्षमता बळकट करण्याची शासनाची बांधिलकी अधोरेखित करतो. नावीन्य आणि सहकार्यावर लक्ष केंद्रित करून, हा कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावतो. आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत आत्मनिर्भरतेकडे, संरक्षण क्षेत्रातील वाढ आणि नवकल्पनांना चालना देणारा आहे ”, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या." "आत्मनिर्भर भारत ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरंक्षण क्षेत्रात आणल्यानंतर मोठ्या प्रमाणात संरक्षण एमएसएमई तयार झाल्या आहेत. तिन्ही सैन्य दलाचा सहभाग यात असणार आहे. आज देशात मोठया प्रमाणात संरक्षण साहित्य निर्माण होत असताना महाराष्ट्रात १० ऑर्डंनंस फॅक्टरी आणि ५ डिफेन्स पी एस यु आहेत. याची राज्यात इकोसिस्टिम तयार झाली आहे. टाटा, भारत फोर्ज, सोलार, एल ॲण्ड टी, अशा मोठ्या कंपन्या राज्यात संरक्षण क्षेत्रात उपादने तयार करतात. यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योजक येतील, गुंतवणूक वाढेल. मुख्य म्हणजे उत्पादन करणारे आणि खरेदीदार आर्म्ड फोर्स असे दोन्ही एका ठिकाणी एकत्र असतील. उद्योग विभागाने पुढाकार घेऊन ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. आजपर्यंत झालेल्या एक्स्पोमधील सर्वात मोठा एक्स्पो महाराष्ट्रात करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याच्या भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. "महाराष्ट्रातील एमएसएमईच्या संरक्षण उत्पादनातील अफाट क्षमतेचा उपयोग करण्यासाठी हा एक्स्पो एक महत्त्वाचा टप्पा आहे. स्थानिक नवकल्पना वाढवून आणि देशांतर्गत पुरवठा साखळी मजबूत करून संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या प्रधानमंत्री यांच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असल्याच्या भावना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केल्या. *****

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४

पी. एम. किसान, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लाभासाठी शेतकऱ्यांनी 21 फेब्रुवारी पर्यंत आवश्यक बाबींची पूर्तता करावी

- सामाईक सुविधा केंद्रांमार्फत ई-केवायसी प्रमाणिकरण करण्यासाठी 21 फेब्रुवारी पर्यंत देशव्यापी संपृक्तता मोहीम सांगली दि. 13 (जि.मा.का.) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ई-केवायसी प्रमाणिकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबीची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर असणे आवश्यक आहे. बँक खाती आधार संलग्न करणे बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या सोयीनुसार प्राधान्याने नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे. केंद्र शासन पी. एम. किसान योजनेचा 16 वा हप्ता माहे फेब्रुवारी 2024 च्या शेवटच्या आठवड्यात वितरीत करणार आहे. तसेच पी. एम. किसान योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थीनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा होईल. या दोन्ही योजनांच्या लाभासाठी दिनांक 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत आवश्यक बाबीची पूर्तता या मोहिमेदरम्यान करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची संपृक्तता साध्यतेसाठी राज्यात दिनांक 6 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीत राबविलेल्या मोहिमेत 1 लाख 4 हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण, 3 लाख 1 हजार स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली. तथापि, राज्यातील एकूण 1 लाख 94 हजार शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी आवश्यक इतर सर्व बाबींची पूर्तता केलेली असून त्यांचे केवळ ई-केवायसी करणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांचे मुख्यतः सामाईक सुविधा केंद्रांमार्फत ई-केवायसी प्रमाणिकरण करण्यासाठी दि. 12 ते 21 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आणखी 10 दिवसांची देशव्यापी संपृक्तता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत शेतकऱ्यांनी आवश्यक बाबींची पूर्तता करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. या मोहिमेची क्षेत्रीयस्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त कृषी डॉ. प्रवीण गेडाम यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना निर्देश दिले आहेत. या मोहिमेदरम्यान केवळ ई-केवायसी प्रमाणिकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नजिकच्या सामाईक सुविधा केंद्र व ग्रामस्तरीय नोडल अधिकारी यांच्यामार्फत ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण करावे. शेतकऱ्यांनी स्वतःचे ई-केवायसी प्रणाणिकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पी. एम. किसान फेस ऑथेंटिकेशन अॅप या सुविधांपैकी कोणत्याही एका सुविधेचा वापर करावा. अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक/मंडळ कृषि अधिकारी/तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहनही कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. 00000

सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४

शिवगर्जना महानाट्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची प्रत्यक्ष अनुभूती - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

- शिवगर्जना महानाट्य उपक्रमाची सांगता - तीनही दिवस शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास सर्व सामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी शिवगर्जना महानाट्य उपयुक्त ठरत आहे. या महानाट्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची प्रत्यक्ष अनुभूती मिळत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून गेले तीन दिवस सुरू असलेल्या शिवगर्जना महानाट्य उपक्रमाच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, महानाट्याचे दिग्दर्शक स्वप्नील यादव आदि उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष असून या निमित्ताने त्यांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना हे महानाट्य आहे. सांगलीच्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर गेले तीन दिवस ही शिवगाथा सांगलीकरांसाठी विनामूल्य सादर करण्यात आली. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नीतीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांपर्यंत पोहोचली. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली व अलौकिक वारसा तरूण पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. या महानाट्यात १२ व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंत पूर्ण इतिहास मांडण्यात आला आहे. २५० कलाकारांचा भव्य संच, फिरता ६५ फुटी भव्य रंगमंच, हत्ती, घोडे, उंट यांचा प्रत्यक्ष वापर करण्यात आला. महानाट्याच्या निर्मात्या रेणू यादव असून दिग्दर्शन स्वप्नील यादव यांनी केले आहे. हजारो शिवप्रेमींनी या महानाट्याचा आनंद घेतला. अल्लाउद्दिन खिलजीचे आक्रमण, विजयनगरचे साम्राज्य, लखोजीराज्यांची हत्या, शिवजन्म, युध्द कला व राज्य कारभारांचे प्रशिक्षण, स्वराज्याची शपथ, अफजलखान वध, पन्हाळगड वेढा, पावनखिंडीतील शौर्य गाथा, शाहिस्तेखानाची फजिती, सुरत लुट, कोकण मोहीम, पुरंदर वेढा, मुरारबाजीचे शौर्य, आग्रा भेट, तानाजी मालुसरे बलिदान अशा शिवरायांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगांनी साक्षात शिवकाल शिवप्रेमींपुढे उभा राहिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यावेळी केलेल्या नेत्रदीपक आतषबाजीमुळे मैदान उजळून निघाले. 00000

शनिवार, ३ फेब्रुवारी, २०२४

शिवगर्जना महानाट्य उपक्रमाचा प्रारंभ सांगलीत तीन दिवस होणार शिवजागर

- सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाचा उपक्रम - छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची अनुभूती - सर्वांना विनामूल्य प्रवेश सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित शिवगर्जना महानाट्य उपक्रमाचा आज प्रारंभ झाला. आमदार अरूण लाड, आमदार सुधीर गाडगीळ, पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या सुविद्य पत्नी सुमनताई खाडे, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास खासदार संजय पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, माजी नगरसेविका सविता मदने आदि उपस्थित होते. आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त शासनाकडून शिवगर्जना महानाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज देशाचे दैवत व आपले आदर्श आहेत. त्यांचे चरित्र अनुभवावे व त्यांचे विचार आचरणात आणावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आमदार अरूण लाड म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना महानाट्याचे आयोजन हा राज्य शासनाचा चांगला उपक्रम आहे. यामुळे चांगले बघण्याची संधी मिळाली असून या माध्यमातून शिवचरित्र अनुभवायला मिळणार आहे. सर्वांनी शिवचरित्राचा आदर्श घ्यावा व त्यांच्या विचारांचे जीवनात अनुकरण करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले, ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष असून या निमित्ताने त्यांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना हे महानाट्य आहे. प्रजाहितदक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर आधारित हा कार्यक्रम पाहायला मिळणे हे आपले भाग्य आहे हे समजून हे महानाट्य सर्वांनी पाहावे व त्यांचे कार्य, विचार व चरित्रापासून स्फूर्ती घ्यावी. या महानाट्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र अनुभवण्याची संधी सर्वांना लाभणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. प्रारंभी दीप प्रज्वलन व शस्त्रपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व मा. मुख्यमंत्री यांच्या संदेशाचे प्रसारण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नीतीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करून तरूण पिढीला मार्गदर्शक ठरावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाला प्रसिध्दी मिळावी या उद्देशाने शिवगर्जना हे महानाट्य दिनांक ३, ४ आणि ५ फेब्रुवारी असे सलग तीन दिवस सादर केले जात आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून हे महानाट्य सादर होत आहे. सांगलीच्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर दिनांक ५ फेब्रुवारीपर्यंत संध्याकाळी साडेसहा वाजता हे महानाट्य सादर होत असून तीनही दिवस या महानाट्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे. यानिमित्त जून २०२३ ते जून २०२४ या वर्षभरात विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या महानाट्यामध्ये २५० कलाकारांचा भव्य संच, फिरता ६५ फुटी भव्य रंगमंच, हत्ती, घोडे, बैलगाडी, उंट यांचा प्रत्यक्ष वापर करण्यात आला आहे. चित्त थरारक लढाया, रोमांचकारी प्रसंग, एक धगधगत्या इतिहासाची आठवण, नेत्रसुखद आतषबाजी, तीन तासात संपूर्ण शिवचरित्राचे दर्शन, लक्षवेधी दिग्दर्शन, मंत्र मुग्ध संगीत, नेत्रदीपक प्रकाशयोजना, आकर्षक वेशभूषा, लोककला व लोकनृत्याची यथायोग्य सांगड ही या महानाट्याची वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये अल्लाउद्दिन खिलजीचे आक्रमण, विजयनगरचे साम्राज्य, लखोजीराज्यांची हत्या, शिवजन्म, युध्द कला व राज्य कारभारांचे प्रशिक्षण, स्वराज्याची शपथ, अफजलखान वध, पन्हाळगड वेढा, पावनखिंडीतील शौर्य गाथा, शाहिस्तेखानाची फजिती, सुरत लुट, कोकण मोहीम, पुरंदर वेढा, मुरारबाजीचे शौर्य, आग्रा भेट, तानाजी मालुसरे बलिदान, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आदी प्रसंग या महानाट्यामध्ये दाखविण्यात आले आहेत. १२ व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंत पूर्ण इतिहास या महानाट्यात मांडण्यात आला आहे. महानाट्याच्या निर्मात्या रेणू यादव असून दिग्दर्शन स्वप्नील यादव यांनी केले आहे. किमान १० हजार शिवप्रेमी या महानाट्याचा आनंद घेतील, या पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. याचा सर्व जिल्हावासियांनी लाभ मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 00000

गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४

सांगलीत 3 फेब्रुवारीला शिवगर्जना महानाट्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते उद्घाटन

- सांस्कृतिक कार्य विभाग व जिल्हा प्रशासनाचा उपक्रम - छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा होणार जागर - सर्वांना विनामूल्य प्रवेश सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नीतीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करून तरूण पिढीला मार्गदर्शक ठरावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाला प्रसिध्दी मिळावी या उद्देशाने सांगली येथे शिवगर्जना हे महानाट्य दिनांक ३, ४ आणि ५ फेब्रुवारी असे सलग तीन दिवस सादर केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून हे महानाट्य सादर करण्यात येणार आहे. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी या महानाट्याचे उद्घाटन होणार आहे. तीनही दिवस या महानाट्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे. सांगलीच्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर दिनांक ३, ४ आणि ५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता हे महानाट्य सादर करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे ३५० वे राज्याभिषेक वर्ष आहे. यानिमित्त जून २०२३ ते जून २०२४ या वर्षभरात विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या महानाट्यामध्ये जवळपास २५० कलाकारांसह हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर करण्यात येणार आहे. १२ व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंत पूर्ण इतिहास या महानाट्यात मांडण्यात आला आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदीपक आतषबाजीही असणार आहे, तसेच लोकनृत्य आणि लोककलांची व्यवस्थित सांगड घातली आहे. महानाट्याच्या निर्मात्या रेणू यादव असून दिग्दर्शन स्वप्नील यादव यांनी केले आहे. किमान १० हजार शिवप्रेमी या महानाट्याचा आनंद घेतील, या पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे. याचा सर्व जिल्हावासियांनी लाभ मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. 00000

शुक्रवार, २६ जानेवारी, २०२४

राजर्षि छत्रपती शाहु महाराज मार्गाचे काम दर्जेदार करावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : राजर्षि छत्रपती शाहु महाराज मार्ग (१०० फुटी रस्ता) हा शहरातील प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम दर्जेदार करावे. सांगली व विश्रामबागची शोभा वाढेल, अशा पद्धतीने या रस्त्याचे काम देखणे व्हावे, असे प्रतिपादन राज्याचे कामगारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले. सांगली – मिरज – कुपवाड महानगरपालिका अंतर्गत राजर्षि छत्रपती शाहु महाराज मार्ग (१०० फुटी रोड) च्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ज्योतिरामदादा पाटील कुस्ती आखाड्याजवळ आयोजित या कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण आदि उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, १०० फुटी रस्ता वर्दळीचा रस्ता असून, या रस्ता कामातून तुमचा ठसा उमटला जाणार आहे. रस्ता तयार करताना नगरसेवक, कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते व नागरिक यांनी सहकार्य करावे. अतिक्रमण स्वयंस्फूर्तीने काढावे. सध्या ६० फुटी रस्त्याचे काम होत असून, त्यामध्ये अतिक्रमण व विजेच्या खांबांचे स्थलांतरण करण्यात येणार आहे. संपूर्ण १०० फूट रस्त्याचा प्रस्ताव लगेच करा, निधीची कमतरता भासू देणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. आमदार सुधीर गाडगीळ, आयुक्त सुनील पवार यांनी मार्गदर्शन केले. स्वागत व प्रास्ताविक शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन नकुल जकाते यांनी केले. केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणूक निधीमधून हा रस्ता तयार करण्यात येत आहे. या रस्त्याची लांबी ३,८५० मीटर आहे. त्याची अंदाजपत्रकीय रक्कम जवळपास १५ कोटी, १७ लाख रूपये आहे. याअंतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजूला धावपट्टीचे २ मीटर रूंदीने रूंदीकरण, खडीकरण, मुरूमीकरण, सिलकोट, थर्मोप्लास्टीक पेंट, रस्ता दुभाजक व दुभाजकामध्ये वृक्षारोपण अशी कामे करण्यात येणार आहेत. 00000

प्रजासत्ताक दिनाचा 74 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

- मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात दिली ग्वाही - समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन वाटचाल - बळीराजाला बळ देण्यासाठी सिंचन प्रकल्पांना भरीव निधी - शासकीय आरोग्य यंत्रणांचे बळकटीकरण करण्यास प्राधान्य सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून अनेक कल्याणकारी योजना राज्य शासन राबवित आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून राज्य शासन वाटचाल करीत आहे. सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिली. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात डॉ. खाडे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तद्नंतर सर्व जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देवून संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महानगरपालिका आयुक्त सुनिल पवार, उपवनसंरक्षक नीता कट्टे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव माने, यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना भरीव निधीसह बळीराजाला बळ देण्यासाठी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पास 8 हजार 272 कोटी रुपयांची पाचवी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. या प्रकल्पातील म्हैसाळ विस्तारीत जत उपसा सिंचन योजनेसाठी सुधारित प्रशासकीय मान्यतामध्ये 1 हजार 930 कोटी रूपये मंजूर आहेत. त्यापैकी विविध कामांची 981 कोटींची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एकूण 57 किलोमीटरपैकी 8 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तसेच, टेंभू विस्तारीत उपसा सिंचन प्रकल्पाला नुकतीच सव्वा सात हजार कोटींची सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सद्यस्थितीत या योजनेचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. दोन्ही योजनांचे काम पूर्ण झाल्यानंतर जत तालुका दुष्काळमुक्त होईल, असा विश्वास डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केला. माहे नोव्हेंबर - डिसेंबर 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाईपोटी सुधारित शासन निर्णयानुसार वाढीव दराने 3 हेक्टरच्या मर्यादेत जिल्ह्याची एकूण 58 कोटी रुपये अनुदान मागणी शासनाकडे केली आहे. एक रुपयामध्ये पीक विमा या योजनेतून आजअखेर 62 हजार शेतकऱ्यांना जवळपास सतरा कोटी रूपये अदा केले आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून चालू आर्थिक वर्षात विहित मुदतीत कर्ज फेडणाऱ्या 86 हजार शेतकऱ्यांना जवळपास तेरा कोटी रूपये मंजूर केले. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून 81 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे 482 कोटी रूपये वितरीत करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. आरोग्यविषयक शासकीय योजना जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने राबविण्यात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविण्यात सांगली जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत जवळपास साडेनऊ लाख लोकांनी आयुष्मान कार्ड काढले आहे. शासकीय आरोग्य यंत्रणांचे बळकटीकरण होऊन जिल्ह्यातील गोरगरीब, गरजू रुग्णांना दर्जेदार व उत्तम आरोग्य सुविधा मिळणार असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे एम. आर. आय. नवीन यंत्र खरेदीसाठी 25 कोटी तसेच पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे सी. टी. स्कॅन यंत्र खरेदीकरिता साडेदहा कोटी रूपये नुकतेच जाहीर करण्यात आले. दोन्ही मशिनची खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच, डीपीडीसीमधून विविध विभागांतील अत्याधुनिक यंत्रे व शस्त्रक्रिया साहित्य खरेदी केले आहे, असे त्यांनी सांगितले. कामगारांचे जीवनमान व आरोग्य उंचावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, राज्यस्तरीय विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या अंमलबजावणीसह नोंदित बांधकाम कामगारांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व आरोग्यविषयक लाभ मोठ्या प्रमाणावर देण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या ई-श्रम कामगार नोंदणी प्रकल्पात आतापर्यंत एकूण 3 लाखाहून अधिक कामगारांची नोंदणी झाली आहे. जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 साठी एकूण 471 कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा प्रस्तावित केला असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, डीपीडीसीच्या निधीमधून जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अधिनस्त 10 कार्यालयास जवळपास पावणेदोन कोटी रूपयांचे 15 अत्याधुनिक रोव्हर मशीन देण्यात आले आहेत. प्लॉटर खरेदीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे भूमि मोजणी प्रकरणांमधील विलंब कमी होऊन, जनतेला अचूक व जलद गतीने सेवा मिळेल. सांगली पेठ रस्त्याचे काम सुरू झाले असून, हा 41 किलोमीटरचा संपूर्ण रस्ता चार पदरी होणार आहे, असे त्यांनी सांगितले. कुपवाड भुयारी गटार योजनेचे भूमिपूजन आणि सांगली ते बोरगाव महामार्ग चौपदरीकरण टप्प्याचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. त्याचबरोबर मिरज जंक्शन व भिलवडी या दोन रेल्वे स्थानकांजवळील रेल्वे ओव्हर ब्रिजचे लोकार्पणही करण्यात आले. अशा प्रकल्पांसह सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या भरीव मदतीबद्दल पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले. आपल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी जनतेच्या कल्याणासाठी शासनाने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांवर व त्याच्या जिल्ह्यातील प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेतला. यामध्ये वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या नोंदणीकृत घरेलू कामगारांसाठीची सन्मानधन योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून वैयक्तिक व गट कर्ज परतावा, जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल उपक्रम, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा, जिल्ह्याचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा यांचा समावेश आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच, पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी देण्यास जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून, त्यामध्ये कोठेही कमी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. प्रारंभी राष्ट्रध्वजास सलामी देवून राष्ट्रगीत व राज्यगीत वादन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री डॉ. खाडे यांनी परेड निरीक्षण केले. प्रारंभी उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली. लष्करात कार्यरत असताना अपंगत्त्व आल्याने शुभम अनिल झांबरे (डोंगरसोनी, ता. तासगाव), रामदास संभाजी गरंडे (सिध्देवाडी, ता. मिरज) यांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते सानुग्रह अनुदान देण्यात आले. तसेच, शत्रूशी लढा देताना जखमी झालेले भरत अगतराव सरक (करगणी, ता. आटपाडी) यांना ताम्रपट प्रदान करण्यात आला. आवास योजना (ग्रामीण) मधील प्रथम तीन सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींचा तसेच मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीबद्दल सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा गौरव करण्यात आला. जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख विभागास डीपीडीसी निधीमधून प्राप्त रोव्हर मशीनचे प्रातिनिधीक स्वरूपात वितरण करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलिस अधिकारी व अंमलदार यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजमध्ये जिल्हास्तरीय निवड झालेल्या विजेत्यांचा सत्कार पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विविध पथक प्रमुखांनी पालकमंत्री डॉ. खाडे यांना मानवंदना दिली. प्रजासत्ताक दिनाच्या परेड संचलनात सांगली पोलीस दल, आरसीपी पोलीस पथक, सशस्त्र पोलीस पथक, महिला पोलीस पथक, होमगार्ड, वाहतूक विभाग, महाराष्ट्र सुरक्षा बल, अग्निशमन दल, निमणी स्कूल (एमसीसी), मार्टिन इंग्लिश स्कूल व आर. पी. पाटील स्कूल कुपवाड या शाळांचे पथक, पोलीस दल बँड पथक, दंगल ‍विरोधी पथक, श्वान पथक, निर्भया पथक वाहन, डायल 112 वाहन, फॉरेन्सिक लॅब वाहन, बॉम्ब शोधक पथक वाहन, अग्निशमन वाहन आदि पथकांसह पत्रकार ‍दीपक चव्हाण यांचा ‍चित्ररथ आदिंनी सहभाग घेतला. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमात ए. ए. उपाध्ये गर्ल्स हायस्कूल कुपवाड, श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूल सांगली, सौ. कस्तुरबेन भगवानदास दामाणी हायस्कूल सांगली, देशभक्त नाथाजी लाड विद्यालय सांगली, रा. ने. पाटील गर्ल्स हायस्कूल सांगली, मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मिरज, ज्युबिली कन्या शाळा मिरजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या समारंभास स्वातंत्र्य सैनिक, अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन विजयदादा कडणे व बाळासाहेब माळी यांनी केले. 00000