शुक्रवार, ३० जून, २०२३

आपत्ती व्यवस्थापनामध्ये गांभिर्याने काम करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

कामात कुचराई झाल्यास वैयक्तीक जबाबदारी निश्चित होणार सांगली दि. 30 (जि.मा.का.) :- आपत्ती व्यवस्थापनांतर्गत दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. यामध्ये कोणतीही दिरंगाई झाल्यास वैयक्तीक जबाबदारी निश्चित करण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापनामध्ये यंत्रणांनी गांभिर्याने व समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून तयारी बैठक संपन्न झाली. यावेळी महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील, कडेगाव उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, जत प्रभारी उपविभागीय अधिकारी जीवन बनसोडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, धोकादायक शासकीय इमारती, शाळा, तात्पुरती निवारा व्यवस्था यांचे स्ट्रक्चरल ऑडिट तात्काळ करून घ्यावे. जिल्हा परिषदेकडून २३ बोटींची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसह पाठवावा. रेस्क्यूची आवश्यकता भासल्यास स्थानिक लोकांची मदत मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, पोहणारे, स्थानिक मंडळे, संस्था यांची बैठक घ्यावी. चारा उपलब्धतेसाठी मागणी व पुर्ततेचे नियोजन कळवावे. जलजीवन मिशनची खुदाईची कामे मान्सून मध्ये बंद ठेवावीत. कामासाठी खुदाई केलेले रस्ते सुस्थितीत करावेत. एमएसईबीने विद्युत पुरवठा खंडित झाल्यास पुरेशा व्यवस्थेसाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. शासकीय यंत्रणांनी अभिलेखे भिजून नुकसान होवू नये यासाठी सुव्यवस्थित ठेवावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील म्हणाले, संभाव्य महापूरासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. सर्वांनी समन्वयाने संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज राहू. कृषी विभागाने 2019 ची पाणीपातळी ग्राह्य धरून पंचनाम्यांसाठी पथके तयार करावीत. त्यांना आवश्यक ट्रेनिंग द्यावे. चारा तजवीज ठेवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने पाण्याखाली जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिगेट लावण्यासाठी तयारी ठेवावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच एनडीआरएफची टीम 15 जुलै पासून जिल्ह्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या बैठकीत 7 जुलै रोजी कर्नाटकेचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्यात आंतरराज्य बैठक होणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिली. ०००००

बुधवार, २८ जून, २०२३

स्वाधार योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी 14 जुलै पर्यंत मुदतवाढ

सांगली दि. 28 (जि.मा.का.) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्याचे सन 2022-23 मधील अर्ज दि. 31 मार्च 2023 पर्यंत स्विकारण्यात आले होते. तथापि, या योजनेच्या लाभापासून गरजु विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी या योजनेंतर्गत सन 2022-23 मधील विद्यार्थ्यांचे अर्ज स्विकारण्याची मुदत दि. 14 जुलै 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहायक आयुक्त समाज कल्याण सांगली कार्यालयाकडे अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी सध्या शिकत असलेल्या संबधीत महाविद्यालयाचे प्राचार्य/मुख्याध्यापक, अधिक्षीका मुलींचे शासकिय वसतिगृह, विश्रामबाग सांगली दूरध्वनी क्र. 0233-2304367, अधिक्षक मुलांचे शासकिय वसतिगृह विश्रामबाग सांगली दुरध्वनी क्र. 0233-2301414, सहायक आयुक्त समाज कल्याण सांगली दूरध्वनी क्र. 0233-2374739 येथे संपर्क साधावा. 00000

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामकाजासाठी तालुकानिहाय शिबीर कार्यक्रम जाहीर

सांगली दि. 28 (जि.मा.का.) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत माहे जुलै 2023 या महिन्यातील शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्की अनुज्ञप्तीच्या कामकाजाचा तालुकानिहाय आयोजित शिबीर दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केला असून तो पुढीलप्रमाणे आहे. इस्लामपूर 3 व 17 जुलै, विटा 4 व 25 जुलै, कडेगाव 11 व 31 जुलै, पलूस 6 व 28 जुलै, आष्टा 10 व 24 जुलै, आटपाडी 18 जुलै, जत 5 व 19 जुलै, शिराळा 13 व 17 जुलै, तासगाव 12 व 26 जुलै, कवठेमहांकाळ 20 जुलै. 00000

‘राष्ट्रकुल’सह जागतिक नेमबाजी स्पर्धेतील पदक विजेते खेळाडूंसह त्यांच्या मार्गदर्शकांना पारितोषिकाची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू

सांगली दि. 28 (जि.मा.का.) : राष्ट्रकुल स्पर्धा २०२२, जागतिक नेमबाजी स्पर्धा २०२२ मधील पदक प्राप्त खेळाडू व त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांना मंजूर रोख पारितोषिकाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, असे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने सहसंचालक चंद्रकांत कांबळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व संवर्धन परिणामकारक व्हावे, राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीयस्तरावर दर्जेदार कामगिरी करून पदक विजेते खेळाडू तयार व्हावेत यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभूत सुविधा, खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना अद्ययावत तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून क्रीडा धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत आंतरराष्ट्रीयस्तरावर उल्लेखनीय कामगिरी तसेच राज्याचे नाव उज्ज्वल करून पदक प्राप्त खेळाडू व त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांना रोख बक्षीस देवून गौरविण्याची योजना संचालनालयस्तरावर कार्यान्वित आहे. त्यानुसार २८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत बर्मिंगहॅम (इंग्लंड) येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक प्राप्त सात खेळाडू व त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांसह कैरो (इजिप्त) येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धा २०२२ मधील पदक प्राप्त चार खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना द्यावयाच्या रोख रकमेत मुख्यमंत्र्यांनी वाढ करून पदक प्राप्त खेळाडूंना रोख रक्कम जाहीर केली आहे. राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मधील पदक प्राप्त खेळाडूंना जाहीर रकमेचा तपशील असा (अनुक्रमे खेळाडू व मार्गदर्शक या क्रमाने) : सुवर्ण पदक- ५० लाख रुपये, १२ लाख ५० हजार रुपये. रौप्य पदक – ३० लाख रुपये, ७ लाख ३० हजार रुपये. जागतिक नेमबाजी स्पर्धा २०२२ मधील पदक प्राप्त खेळाडूंना जाहीर रकमेचा तपशील असा (अनुक्रमे खेळाडू व मार्गदर्शक या क्रमाने) : सुवर्ण पदक – दीड कोटी रुपये, सात लाख ५० हजार रुपये, सांघिक - ५० लाख रुपये, सात लाख ५० हजार रुपये. रौप्य पदक (सांघिक) - ३० लाख रुपये, पाच लाख रुपये. कांस्य पदक (सांघिक) : २० लाख रुपये, २ लाख ५० हजार रुपये. पदक प्राप्त खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना शासन निर्णयान्वये मान्यता दिलेली रोख पारितोषिकाची रक्कम सर्व संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्यास क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी मान्यता दिली असून मंजूर रोख पारितोषिकाची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही संचालनालयस्तरावर प्राधान्याने सुरू आहे, असेही सहसंचालक श्री. कांबळे यांनी म्हटले आहे. ०००००

"महिला आयोग आपल्या दारी' 7 जुलैला सांगली जिल्ह्यात महिलांनी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडाव्या - रुपाली चाकणकर यांचे आवाहन

सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी शुक्रवार दि. 7 जुलै 2023 रोजी सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात सकाळी 11 वाजता होणार असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि आयोगाच्या सदस्या या स्वतः तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. सांगली जिल्ह्यात होणाऱ्या या जनसुनावणीत अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी यावेळी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर दि. 7 जुलै रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारी' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर महिला व बालकांच्या विषयांच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्याची आढावा बैठक होईल. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच कामगार आयुक्त, आरोग्य, परिवहन, शिक्षण आदी विभागाचे अधिकारी उपस्थित असतील. वरील सर्व कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे होणार आहेत. जिल्हा दौरा दरम्यान वन स्टॉप सेंटर तसेच महिला वसतीगृहास ही आयोगाच्या अध्यक्षा व सदस्या भेट देणार आहेत. महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या, महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणामुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हा स्तरावर सर्व यंत्रणेनिशी जात आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलीस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारींवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम आयोग करत आहे. 00000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 6 जुलै

सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे महिला व बाल कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला सामाजिक कार्यकर्त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. या पुरस्कारासाठी सन 2020-21, 2021-22, 2022-23 व सन 2023-24 या वर्षासाठी इच्छुक व्यक्ती, संस्थाकडून दिनांक 6 जुलै 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व्यक्ती, संस्थांनी विहित नमुन्यातील अर्जासाठी तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नविन प्रशासकीय इमारत विजयनगर, मिरज रोड सांगली येथे संपर्क साधून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव चार प्रतित विहीत वेळेत सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी केले आहे. या पुरस्कारांचे स्वरुप व अर्हता पुढीलप्रमाणे आहे. राज्यस्तरीय महिलांकरीता वैयक्तीक पुरस्कार (राज्यस्तरीय पुरस्कार ) - रोख रक्कम 1 लाख 1 रूपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ. महिला व बाल कल्याण क्षेत्रात किमान 25 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रिबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे, त्या महिला तो पुरस्कार मिळाल्याच्या 5 वर्षापर्यंत राज्यस्तरीय पुरस्कारास पात्र राहणार नाहीत. विभागीय स्तरावरील स्वयंसेवी संस्थांना पुरस्कार - रोख रक्कम 25 हजार 1 रूपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ. महिला व बाल कल्याण क्षेत्रात किमान 7 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. नोंदणीकृत संस्थेस दलित मित्र पुरस्कार प्राप्त नसावा, संस्था राजकारणांपासून अलिप्त असावी. तसेच तिचे कार्य व सेवाही पक्षातीत व राजकारणापासून अलिप्त असावी. जिल्हास्तरीय पुरस्कार - रोख रक्कम 10 हजार 1 रूपये, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ. महिला व बाल कल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रिबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे, त्या महिलांना हा जिल्हास्तरीय पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही. अर्ज सादर करणाऱ्या इच्छुक व्यक्ती /संस्थांनी पुढीलप्रमाणे कागदपत्रेही सादर करणे आवश्यक आहे. राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी उपविभागीय अधिकारी यांचे विना दुराचार प्रमाणपत्र, गैरवर्तनासंबंधी खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे पोलिस विभागाचे प्रमाणपत्र, सार्वजनीक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र, प्रस्ताव धारकाची माहिती व केलेल्या कार्याचा अहवाल, वृत्तपत्र फोटोग्राफ्स इ., सद्या कोणत्या पदावर कार्यरत आहे, यापूर्वी पुरस्कार मिळाले काय? असल्यास तपशिल. विभागीयस्तर पुरस्कारासाठी संस्थेची माहिती व कार्याचा अहवाल, उपविभागीय अधिकारी यांचे विना दुराचार प्रमाणपत्र, गैरवर्तनासंबंधी खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे पोलिस विभागाचे प्रमाणपत्र, सार्वजनीक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र, वृत्तपत्र फोटोग्राफ्स इ., संस्थेस यापूर्वी पुरस्कार मिळाले आहे काय? असल्यास तपशिल, संस्था नोंदणी प्रमाणपत्र व घटनेची प्रत. 00000

नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरु

सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय, पलूस येथे इयत्ता 6 वी मध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता 80 जागा भरण्यात येणार आहेत. प्रवेश परीक्षा शनिवार दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11.30 ते 1.30 या वेळेत घेतली जाणार आहे. जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा दिनांक 20 जून 2023 ते 10 ऑगस्ट 2023 असा आहे. पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज मुदतीमध्ये भरावेत, असे आवाहन प्राचार्य सुनिलकुमार नल्लाथ यांनी केले आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी संकेत स्थळ www.navodaya.gov.in किंवा https://navodaya.gov.in वर संपर्क साधावा. पात्र उमेदवार हा संबंधित जिल्ह्यातील असावा. ऑनलाईन अर्ज करताना ते इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडून योग्य रित्या भरलेले प्रमाणपत्र ज्यावर स्वतःचे अलीकडील काळात काढलेले छायाचित्र (Photo), विद्यार्थ्यांची स्वाक्षरी, पालकांची स्वाक्षरी आणि मुख्याध्यापकाकडून प्रतिहस्ताक्षरित केलेले प्रमाणपत्र (jpg स्वरुपात 10kb-100kb प्रमाणात ) ऑनलाईन अपलोड करावयाचे आहे. विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2012 ते 31 जुलै 2014 दरम्यान झालेला असावा, असे प्राचार्य सुनिलकुमार नल्लाथ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

मंगळवार, २७ जून, २०२३

संभाव्य गुंतवणुकीला व विकासाला चालना देऊ शकणाऱ्या विविध क्षेत्रांच्या वृध्दीबाबत 30 जून पर्यंत अभिप्राय द्या - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली दि. 27 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यातील विकासाच्या संभाव्य संधी ओळखून संभाव्य गुंतवणुकीला व विकासाला चालना देऊ शकणाऱ्या तसेच कृषी व संलग्न सेवा उद्योग (वस्तुनिर्माण सह), जलसंधारण, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, पर्यटन इत्याची क्षेत्रांच्या वृध्दीबाबत दि. 30 जून 2023 पर्यंत अभिप्राय द्यावेत. अभिप्राय गुगल फॉर्म लिंक https://forms,gle/x8sMvgSjAF4UWu1U9 वर किंवा dposangli22@gmail.com या ई-मेल आयडीवर लेखी स्वरूपात द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन 2047 पर्यंत विकसित भारत - भारत @ 2047 (India @ 2047) करण्याचा संकल्प केला आहे. यामध्ये सन 2025-26 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरपर्यंतचे नेण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. तसेच सन 2030 पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्ट सुद्धा साध्य करण्याचा भारत सरकारचा मानस आहे. विकसित भारताची ही उद्दिष्टे साध्य करीत असताना भारतातील राज्यांना सुद्धा 2047 पर्यंत संपूर्णपणे विकसित होणे गरजेचे आहे. यादृष्टीने महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर, सन 2037 पर्यंत 2.5 ट्रिलियन डॉलर व सन 2047 पर्यंत 3.5 ट्रिलियन डॉलर पोहोचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. यासाठी विकासाचे केंद्र म्हणून जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केल्याने आर्थिक विकासासाठी विचारपूर्वक आणि विशिष्ट दृष्टिकोन विकसित करणे शक्य होईल असा विकास सर्वसमावेशक असेल आणि शास्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यात मदतही करेल. जिल्ह्यातील सामाजिक, आर्थिक परिस्थिती आणि नैसर्गिक संसाधनांमधील असमानता आणि जलद शहरीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याची गरज या सर्व बाबी विचारात घेऊन प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याकरीता जिल्ह्यातील नागरिक, संस्था व आस्थापनांनी 30 जून पर्यंत अभिप्राय कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 00000

सोमवार, २६ जून, २०२३

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत जिल्ह्यात 1 लाख 92 हजार शेतकऱ्यांना 32 कोटीहून अधिक व्याज सवलत

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा यंत्रणा, राष्ट्रीयकृत, ग्रामीण, खाजगी बँकाकडून 3 लाख रूपये पर्यंतचे अल्प मुदती कर्ज घेणाऱ्या आणि विहीत मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना घेतलेल्या कर्जावर उत्पादन प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत देण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात सन 2022-23 वर्षाकरीता एकूण 1 लाख 92 हजार 33 शेतकऱ्यांना 32 कोटी 91 लाख 19 हजार 174 शेतकऱ्यांना व्याज सवलतीची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली. अल्प मुदती कर्ज 3 लाख रुपये पर्यंत घेणाऱ्या आणि विहीत मुदतीत (प्रत्येक वर्षी 30 जूनपर्यंत अथवा शासनाने अपवादात्मक परिस्थितीत कर्ज परतफेडीस मुदतवाढ दिली असल्यास तो दिनांक) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाख रूपये पर्यंतच्या अल्पमुदती पीक कर्जास 3 टक्के प्रमाणे व्याज सवलत लागू करण्यात आली आहे. तालुक्याचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडून वि.का.स. संस्था अथवा राष्ट्रीयकृत/ग्रामीण/खाजगी बँकांच्या शाखांकडून पात्र सभासद शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली यांच्या कार्यालयात प्राप्त होतात. तद्नंतर या योजनेकरिता प्राप्त झालेल्या निधीतून कोषागाराकडून बील मंजूर झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या खात्यारवर व्याज सवलतीची रक्कम जमा करण्यात येते. या योजनेमुळे विहीत मुदतीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून व्याज सवलतीची रक्कम प्राप्त होते. केंद्र शासनाकडूनही याच प्रकारची योजना राबविली जात असल्याने शेतकऱ्यांना 3 लाख रूपये पर्यंत अल्पमुदत पीक कर्ज बिनव्याजी मिळते. या योजनेचा लाभ घेणारा शेतकरी विहीत मुदतीत कर्ज परतफेड करीत असल्याने वि.का.स. संस्था / बँकांकडील थकबाकीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. 000000

गुरुवार, २२ जून, २०२३

कृष्णा नदीमधून शेतीसाठी खाजगी उपसा करणाऱ्या सर्व योजनांवर 26 जून पर्यंत उपसा बंदी

सांगली दि. 22 (जि.मा.का.) : वारणा, कोयना धरणातील पाणीसाठा कमी झालेला असून पाऊस अद्याप सुरू न झाल्याने पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाणी पुरवणे अत्यावश्यक आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 मधील कलम 11, 49 मधील तरतुदीनुसार कृष्णा नदी मधून शेतीसाठी खाजगी उपसा करणाऱ्या सर्व योजनांवर पुनश्च उपसा बंदी आदेश सांगली पाटबंधारे विभागामार्फत जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार दि. 23 जून 2023 ते दि. 26 जून 2023 पर्यंत उपसा बंदी तर दि. 27 जून 2023 ते दि. 30 जून 2023 उपसा कालावधी आहे. पिण्याच्या पाणी पुरवठा करणाऱ्या योजना सुरू राहतील. पर्जन्यमानानुसार व परिस्थितीनुसार पुढील नियोजन करण्यात येईल. उपसा बंदी कालावधीमध्ये पिण्याचे पाणी पुरवठा व्यतिरिक्त इतर कारणासाठी (खाजगी) कृष्णा नदीतून पाणी उपसा केल्यास हा उपसा अनअधिकृत समजून संबंधितांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षाच्या कालावधीकरीता रद्दबातल करण्यात येऊन उपसा संच सामुग्री जप्त करून पुढील कारवाई करण्यात येईल. याची गांभीर्याने नोंद घेऊन उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर कृष्णा नदीवरील लाभक्षेत्रातील उभी असणारी पिके जोपासण्यासाठी आधुनिक सुक्ष्म सिंचनाचा वापर करून फक्त उभ्या पिकांचे नुकसान होऊ नये या दृष्टीने नियोजन करून जलसंपदा विभागास सहकार्य करावे. धरणातील मर्यादित पाणी साठ्याचा विचार करून बिगरसिंचन पाणी वापरकर्त्यांनी सांडपाणी, औद्योगिक वापरातील पाणी थेट नदीत सोडून पाणीसाठा प्रदूषित करू नये. प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध नसल्याने सर्व संबंधितांनी याची दक्षता घेऊन पाणीनाश टाळण्यास सहकार्य करावे, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे. 00000

तलाठी पदभरतीसाठी उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष स्थापन

सांगली दि. 22 (जि.मा.का.) : तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील यांनी दिली. महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील गट-क संवर्गातील तलाठी पदभरतीच्या अनुषंगाने महसूल व वन विभागाकडून सरळसेवा पदभरती प्रक्रिया राबवून संपूर्ण भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी शासनस्तरावरुन जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे. तलाठी पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हास्तरावर मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात आला असून त्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मदत कक्षासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0233-2600185 असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहे. तहसिलदार महसूल अनंत गुरव - 9420933283, नायब तहसिलदार संजय विभूते - 9881517700, अव्वल कारकून विनायक यादव - 8308300991. 000000

अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षितेबाबतचे प्रशिक्षण पूर्ण करून घ्यावे - सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे

सांगली दि. 22 (जि.मा.का.) : सर्व अन्न व्यवसायिकांना अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींची व अन्न पदार्थांच्या सुरक्षितेकरीता अवलंबावयाच्या नियमावलीची माहिती होण्यासाठी अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षितेबाबत प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्याकरीता अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण नवी दिल्ली यांनी फुड सेफ्टी ट्रेनिंग अँड सर्टिफिकेशन (FOSTAC) प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत अन्न व्यवसायिकांना प्रशिक्षण देण्यासाठी खासगी प्रशिक्षण संस्था यांना अधिसूचित केले आहे. अधिसूचित प्रशिक्षण संस्थाची यादी अन्न व सुरक्षा व मानके प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या http://fostacold.fssai.gov.in/fostac/listoftrainingpartner या संकेतस्थळावार उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अन्न व्यवसायिकांनी प्रशिक्षण संस्थांची निवड करून लवकरात लवकर प्रशिक्षण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन सांगलीचे सहायक आयुक्त (अन्न) तथा पदनिर्देशित अधिकारी नि. सु. मसारे यांनी केले आहे. प्रशिक्षण अभ्यासक्रमांची पुढीलप्रमाणे वर्गवारी करण्यात आली आहे. बेसिक प्रशिक्षण - यामध्ये नोंदणीकृत फिरते विक्रेते, छोटे उत्पादक, किरकोळ विक्रेते यांच्यासाठी प्रशिक्षण असून प्रशिक्षण कालावधी 4 तास आहे. प्रशिक्षणाकरीता जास्तीत जास्त 50 अन्न व्यवसायिकांची मर्यादा आहे. अडव्हान्स्ड प्रशिक्षण - यामध्ये परवानाधारक उत्पादक, केटरिंग/हॉटेल, रेस्टॉरंड, होलसेल व किरकोळ विक्रेते/वितरक, गोडवून व वाहतूकदार यांच्यासाठी प्रशिक्षण असून प्रशिक्षणाचा कालावधी 8 तास आहे. प्रशिक्षणाकरीता जास्तीत जास्त 30 अन्न व्यवसायिकांची मर्यादा आहे. स्पेशल प्रशिक्षण - दुध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादक, चिकन, मटन मासे उत्पादक, बेकरी व बेकरी पदार्थ उत्पादक, खाद्यतेल उत्पादक, बेव्हरेजेस उत्पादक, न्यूट्रासिटीकल व हेल्थ सप्लीमेंट उत्पादक व इतर अन्न पदार्थ उत्पादक यांच्यासाठी प्रशिक्षणाचा कालावधी 8 ते 12 तास असून प्रशिक्षणाकरीता जास्तीत जास्त 30 अन्न व्यवसायिकांची मर्यादा आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण यांनी अधिसूचित केलेल्या खाजगी प्रशिक्षण संस्था यांना निश्चित करून दिलेल्या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे. यानुसार कोणत्याही प्रशिक्षण संस्था जास्तीत जास्त संख्येच्या मर्यादा पेक्षा जास्त अन्न व्यवसायिकांना एकाच प्रशिक्षणामध्ये समाविष्ट करू शकत नाही. तसेच प्रशिक्षण कार्यक्रमाचा कालावधी पाळणे व अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण यांनी ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देणे बंधनकारक आहे. खाजगी प्रशिक्षण संस्था ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करीत नसल्यास अन्न व्यवसायिकांनी अन्न व औषध प्रशासन सांगली विभाग यांच्या कार्यालयास 0233-2602201/2 या दूरध्वनी क्रमांकावर, ईमेल - fdasangli@gmail.com किंवा प्रत्यक्ष कार्यालयास भेट देवून अवगत करावे, असे आवाहनही श्री. मसारे यांनी केले आहे. प्रशिक्षण अन्न व्यवसायिकांनी स्वतः घ्यावयाचे असल्याने अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरण नवी दिल्ली किंवा अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क निश्चित केले नाही. अन्न व्यवसायिक हे स्वतः प्रशिक्षण संस्थेची निवड व प्रशिक्षण शुल्क निश्चित करू शकतात. प्रत्येक अन्न व्यवसायिकांनी स्वतःच्या व्यवसायाचा प्रकारानुसार निश्चित केलेल्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेऊन संस्थेकडून प्रमाणपत्र घ्यावे. अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांकडून अन्न आस्थापनाची तपासणी दरम्यान प्रशिक्षण प्रमाणपत्राची तपासणी केली जाईल व ज्या अन्न व्यवसायिकांनी प्रशिक्षण घेतले नसेल अशा अन्न व्यवसायकांविरुद्ध अन्नसुरक्षा व मानके कायद्यांतर्गत तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे श्री. मसारे यांनी स्पष्ट केले आहे. 00000

दुचाकी वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर करावा - सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. व्ही. साळी

सांगली दि. 22 (जि.मा.का.) : हेल्मेट वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक व अंमलबजावणी विषयक व्यापक मोहिम सांगली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. मोटर वाहन कायदा 1988 मधील कलम 194ड मधील तरतुदीनुसार हेल्मेट वापरासंबधी तरतुदीचा भंग करणाऱ्या अथवा त्यास संमती देणाऱ्या व्यक्तीस दंडाची तरतूद करण्यात आली आहे. दुचाकी वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. व्ही. साळी यांनी केले आहे. वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. बहुतांशी दुचाकी वाहनांच्या अपघातामध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात असे दिसून आले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांनी आपल्या कार्यालयीन आवारात विना हेल्मेट दुचाकीवरून प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना मज्जाव करावा, तसेच आपल्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांना दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करण्याबाबत अवगत करावे. दोषी आढळणाऱ्या व्यक्तीवर आपल्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यामध्ये ज्या व्यक्ती विना हेल्मेट प्रवेश करताना आढळून येतील त्यांच्यावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सांगली / शहर वाहतूक शाखा, सांगली यांच्याकडून मोटर वाहन कायद्यातील कलम 194ड नुसार कारवाई करण्यात येईल याबाबत सूचना द्याव्यात, असे आवाहनही श्री. साळी यांनी केले आहे. 00000

दिव्यांग व्यक्ती, संस्थांना राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 31 जुलै पर्यंत

सांगली दि. 22 (जि.मा.का.) : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाकडून दिव्यांग व्यक्ती व दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थाकरीता राष्ट्रीय पुरस्कार सन 2023 करिता नामाकंन व अर्ज गृह कामकाज मंत्रालयाच्या केंद्रिकृत www.awards.gov.in या पोर्टलवर केवळ ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज, नामांकन भरण्याची मुदत दि. 15 जून ते 31 जुलै 2023 पर्यंत संकेतस्थळावर सुरु आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांनी दिली. अर्ज नामांकन www.awards.gov.in या संकेतस्थळावर भरण्यात यावेत. अर्ज/नामांकने केवळ गृह मंत्रालयाने तयार केलेल्या ऑनलाईन पोर्टलवर पासवर्ड संरक्षित करण्यात यावा. अर्जातील सर्व मुद्यांची माहिती उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याचे सविस्तर वर्णनासह भरावी. अर्ज/मानांकने समक्ष अथवा पोस्टाद्वारे स्विकारण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी. www.disabilityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने राष्ट्रीय पुरस्कारासाठीच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना विचारात घेण्यात येतील, असे श्री. कामत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 000000

एकात्मिक बाल विकास सेवा योजना, खानापूर-विटा प्रकल्पाकडील अंगणवाडी मिनी सेविका व मदतनिस पद भरतीसाठी 10 जुलै पर्यंत अर्ज करा

सांगली दि. 22 (जि.मा.का.) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना खानापूर-विटा प्रकल्पाकडील भाळवणी गावातील अंगणवाडी मिनी सेविका 1 पद व एकूण 40 गावातील मदतनिसची 58 ही मानधनी रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. पात्र महिला उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिनांक 26 जून 2023 ते दि 10 जुलै 2023 अखेर सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सांक्षाकित प्रतिसह एकात्मिक बाल विकास सेवा योजना खानापूर-विटा कार्यालयाकडे समक्ष पोहच करावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे एकात्मिक बाल विकास सेवा योजना खानापूर-विटाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. अंगणवाडी मिनी सेविका व मदतनिस ची भरण्यात येणारी गावनिहाय पदे पुढीलप्रमाणे. मिनी सेविका - भाळवणी -1 मदतनिस - पळशी-1, हिवरे-4, करंजे-1, बेणापुर-1, शेडगेवाडी-1, भीकवडी बु-1, हिंगणगादे-1, नागेवाडी-1, माहुली -2, चिखलहोळ-1, वलखड-1, भाग्यनगर-1,‍ देविखिंड-1, वेजेगाव-1, लेंगरे -2, गावठाण भेंडवडे-1, सागर भेंडवडे-1, साळशिंग-1, आळसंद-4, भाळवणी-4, बवडली भा-1, जाधवनगर-1, पंचलिंगनगर-1, वाझर-1, अडसरवाडी-1, ऐनवाडी-2, धोंडगेवाडी-1, जखीनवाडी-1, बलवडी खा-3, पोसवाडी-1, कळंबी-1, ढवळेश्वर-2, गार्डी-2, घानवड-2, चिंचणी मं-1, मंगरुळ-1, कुर्ली-1, पारे-1, घोटी खुर्द-1, कार्वे-2. अंगणवाडी मिनी सेविका व मदतनिस पद भरतीसाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे. उमेदवाराचे दिनांक 10 जुलै 2023 रोजी वय 18 वर्षाचे वरील व 35 वर्षाच्या आतील असावे. मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिस या पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महिला उमेदवार ही त्या गावची स्थानिक रहिवाशी असावी. या पदासाठी लहान कुटुंबाची अट लागू राहील. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर अनुषंगिक पात्रता याबाबतचा सविस्तर तपशील दर्शवणारा नमुना अर्ज संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर उपलब्ध असल्याचे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. 00000

महाराष्ट्र प्राणी रक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : बकरी ईद सण 2023 च्या अनुषंगाने संबंधित सर्व विभागांनी महाराष्ट्र प्राणी रक्षण कायदा 1976, महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995, प्राणी छळ प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत कत्तलखाना अधिनियम व ट्रान्सपोर्ट ऑफ ॲनिमल्स रुल्स, 1978 तसेच ट्रान्सपोर्ट ऑफ ॲनिमल्स (अमेंडमेंट) नियम 2009 च्या तरतुदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. विनाकारण कोणत्याही वाहन चालकाला त्रास देऊ नये. तसेच महानगरपालिका, पोलीस प्रशासन, पशुसंवर्धन विभाग यांनी संबंधित नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 कायदा 4 मार्च 2015 पासून महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे. या सुधारीत कायद्यातील कलम 5 अन्वये कोणतीही व्यक्ती राज्यातील कोणत्याही ठिकाणी गायींची, वळूंची किंवा बैलांची कत्तल करणार नाही. कलम 5 अ (1) अन्वये कत्तल करण्यासाठी गाय, वळू किंवा बैल यांची वाहतूक करण्यास प्रतिबंध तसेच कलम 5 अ (2) कत्तल करण्यासाठी गाय, वळू किंवा बैल यांची निर्यात करण्यास प्रतिबंध. कलम 5 ब गाय, वळू किंवा बैल यांची अन्य कोणत्याही पध्दतीने विक्री, खरेदी करण्यास, विल्हेवाट लावण्यास प्रतिबंध. कलम 5 क गाय, वळू किंवा बैल यांचे मांस ताब्यात ठेवण्यास मनाई. कलम 5 ड महाराष्ट्र राज्याबाहेर कत्तल केलेले गाय,वळू किंवा बैल त्यांचे मांस ताब्यात ठेवण्यास मनाई असून या कायद्याचे उल्लंघन केल्यास कडक शिक्षेची तरतूद असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. 0000000

शुक्रवार, १६ जून, २०२३

सैनिकी मुलां-मुलींच्या वसतिगृहात पदभरतीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलांचे व मुलींचे वसतिगृह येथे तात्पुरत्या स्वरूपात रोजंदारी पध्दतीने एकूण 15 पदे माजी सैनिक, सिव्हीलीयन मधून भरावयाची आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिनांक 30 जून 2023 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे. सैनिकी मुलांचे व मुलींचे वसतिगृह येथे वसतीगृह अधीक्षक 1, सहायक वसतीगृह अधिक्षक/अधिक्षीका २, स्वयंपाकी ७, चौकीदार 1, सफाई कामगार 3 व माळी 1 अशी एकूण 15 पदे भरावयाची आहेत. वसतिगृह अधिक्षकासाठी 29 हजार 835 रूपये, सहायक वसतीगृह अधिक्षक/अधिक्षीका पदासाठी 23 हजार 282 रूपये, स्वयंपाकी 12 हजार 962 रूपये, चौकीदार 19 हजार 443 रूपये, सफाई कामगारासाठी 12 हजार 127 रूपये असे किमान वेतन आहे. अधिक माहितीसाठी 0233-2990712 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. 00000

बालके मुलभूत हक्कापासून वंचित न राहण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांनी लक्ष देण्याची गरज - ॲड. सुहास कवठेकर

सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : बालमजुरी ही देशातील एक गंभीर समस्या असून बालकांचे आरोग्य, शिक्षण अशा मुलभूत हक्कापासून वंचित ठेवले जाते. समाजातील सर्व स्तरातील लोकांनी या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन शासनाच्या नजरेस आणून देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ॲड. सुहास कवठेकर यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत जागतिक बालकामगार विरोधी दिन, बालकांचे हक्क व अधिकार या विषयावर कायदेविषयक शिबीर जिजामाता बालक मंदिर सांगली येथे आयोजित केले. याप्रसंगी ॲड. सुहास कवठेकर मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी ॲड. एस. एम. पखाली, डॉ. लताताई देशपांडे, मुख्याध्यापिका राजश्री डिगे, माजी प्राचार्य विजय कोगनोळे आदि उपस्थित होते. ॲड. पखाली म्हणाले, शिक्षण हक्क कायदा हा या देशात निर्माण केला असून लहान मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. बालक ही आपली राष्ट्रीय संपत्ती म्हणूनच जपली गेली पाहिजे. लहान वयात मजुरी करताना काही दुखापत झाल्यास मूल आयुष्य भर दिव्यांग राहू शकते. याप्रसंगी मुख्याध्यापिका राजश्री डिगे यांनी स्वागत केले, माजी प्राचार्य विजय कोगनोळे यांनी प्रास्ताविक केले. शुभांगी शिंदे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन नितीन ढाले यांनी केले. या कार्यक्रमास नितीन आंबेकर, सूरज कदम, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. 00000

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांनी वाहनांसाठी टोल फ्री पास सवलतीचा लाभ घ्यावा - सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. व्ही. साळी

सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : आषाढी एकादशी-2023 च्या निमित्ताने शासनाकडून पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या वारकऱ्यांना हलक्या व जड वाहनांसाठी पथकरातून सूट देण्याबाबत आदेश झाले आहेत. त्या अनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय वसंतदादा औद्योगिक वसाहत माधवनगर रोड सांगली या कार्यालयामधून दि. 13 जून 2023 ते दि. 7 जुलै 2023 या कालावधीत पथकरातून सूट मिळण्याकरीता पथकर सवलत प्रवेशपत्र (टोल फ्री पास) सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत उपलब्ध करण्यात आले आहेत. याकरीता स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पास घेण्याकरीता वाहन क्रमांक, मालकाचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक तसेच प्रवासाचा मार्ग व जाण्याची / येण्याची तारीख तसेच वाहनासंबंधी वैध कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. या सवलतीचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. व्ही. साळी यांनी केले आहे. 00000

बेरोजगार व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी 22 जून रोजी मार्गदर्शन वेबीनार

सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्यामार्फत बेरोजगार व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी गुरुवार, दिनांक 22 जून 2023 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार आयोजित करण्यात आलेला आहे. इच्छुक युवक व युवतींनी https://meet.google.com/qby-nmmh-ooa या लिंकव्दारे वेबीनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात आले आहे. या वेबीनारमध्ये यंग प्रोफेशनल, मॉडेल करिअर सेंटर सांगलीचे प्रविण बनकर सुशिक्षीत बेरोजगार युवक युवतींना NCS (National Carrier Service Portal) वर नोकरीच्या संधी या विषयी माहिती व मार्गदर्शन करणार आहेत. 00000

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पालकमंत्र्यांकडून आढावा गुन्हेगारांवर कायद्याची वचक निर्माण करा - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 16 (जि.मा.का.) :- गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस दलाने याबाबत अधिक दक्षता घेतली पाहिजे. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्हेगारांवर कायद्याची वचक निर्माण करा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिल्या. पोलीस मुख्यालयातील सभागृहात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, सांगली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, विटा व तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम, इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, जत उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे, पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सतीश कदम उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले, गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घ्यावी. गुन्हेगारांवर कायद्याची वचक निर्माण झाली पाहिजे यासाठी कोणताही मुलाहिजा न ठेवता कडक कारवाई करण्यात यावी. नशेखोर लोकांवर कारवाई केल्यास गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल असेही त्यांनी सांगितले. अवैध धंदे बंद झाल्यास गुन्हेगारीला आळा बसू शकेल, असे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले, गुन्हे का घडतात याचीही उकल होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसापासून खुनाचे प्रमाण वाढले आहे ही चिंतेची बाब आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन जनतेला असुरक्षितता वाटू नये यासाठी पोलीस दलाने अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटी स्थापन करण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री डॉ. खाडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या. पोलीस अधीक्षक डॉ. तेली यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थे संदर्भात पालकमंत्र्यांना माहिती दिली. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दलामार्फत व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. 00000

कोणतेही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी दक्षता घ्या - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : सद्यस्थितीत पाऊस लांबला आहे. अलनिनोचे संकट आले तर जुलै अखेर पुरेल एवढा पिण्याच्या पाण्याचा साठा कोयना धरणात ठेवण्यात आला आहे. माणसे आणि जनावरे यांच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आल्याने टप्प्याटप्प्याने उपसा बंदी करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत शेतीला पाण्याचा पुरवठा करणे अवघड असून जनतेने पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. ताकारी, टेंभू, म्हैसाळ, आरफळ या योजनांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील, उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, म्हैसाळ २ उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता सचिन पवार, टेंभू उपसा सिंचन १ चे कार्यकारी अभियंता अभिनंदन हरूगडे, ताकारी उपसा सिंचन योजनेचे राजन डवरी, टेंभू उपसा सिंचन योजना २ चे उपविभागीय अभियंता सुशील गायकवाड व ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे उप विभागीय अभियंता अमित डवरी, एमएसईबीचे श्री. पेठकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, जूनचा मध्यावधी संपला तरी पाऊस झालेला नाही. आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे माणसे आणि जनावरे यांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही व पिण्याच्या पाण्यापासून एकही गाव वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन यंत्रणांनी आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. या बैठकीत त्यांनी टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ या योजनांचा आढावा घेतला. कोयना धरणात 11.74 टीएमसी तर वारणा धरणात 11.28 टीएमसी पाणीसाठा आहे. कोयनेतून सध्या 1050 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. टेंभू योजनेचे 9 पंप सुरू असून 12 टीएमसी पाणी उचलले गेले आहे. तर ताकारी योजनेतून 4.85 टीएमसी पाणी उचलले आहे. म्हैसाळ योजनेतून 7.20 टीएमसी पाणी उचलले आहे. तर नदीवरील उपसा 21 टीएमसी असा एकूण 45 टीएमसी पाण्याचा उपसा झालेला आहे. कोयनेतून 1050 क्युसेक्स पाणी सोडणे सुरू असले तरी नदीतील डोह भरल्याशिवाय पाणी पुढे प्रवाहीत होत नाही त्यामुळे नदीपात्रात पाणी अत्यंत अत्यल्प आहे. पिण्यासाठी पाणी राखीव ठेवणे सद्यस्थितीत आवश्यकच असल्याने उपसा बंदी लागू करण्यात आल्याची माहिती या बैठकीत जलसंपदा अधिकाऱ्यांनी दिली. म्हैसाळ योजनेतील रखडलेले पाईपलाईनचे काम तातडीने मार्गी लावा त्यासाठीचा आवश्यक ड्रोन सर्व्हे, मोजणी करून घ्या. भूसंपादनासाठी नोटीसा बजावा, कागदोपत्री प्रक्रिया त्वरीत पूर्ण करून घ्या, असे निर्देशही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. नदीकाठच्या गावांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही, जेथे तलावातून पाणी पुरवठा होतो तेथे यंत्रणांनी संबंधित गावांमध्ये बैठका घेवून पाण्याची स्थिती लोकांना समजावून सांगावी आणि तलाव कोरडे पडू नयेत यासाठी तातडीने लोकांना विश्वासात घेवून पाण्याचे नियोजन करावे, असे निर्देश यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. यावेळी त्यांनी आवश्यकता भासल्यास टँकरची तजवीज करा, त्यासाठी आराखडे तयार करा. गावनिहाय पाण्याचा उपलब्धतेचा अहवाल तयार करा पण कोणत्याही स्थितीत पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्या, असे सांगितले. ०००००

गुरुवार, १५ जून, २०२३

सांगलीत 19 जूनला पेन्शन अदालत

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांसाठी 19 जून रोजी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. महालेखापाल मुंबई व संचालक लेखा व कोषागारे मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद सांगली येथील पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सभागृहात सकाळी 10.30 वाजता ही पेन्शन अदालत होणार आहे. या पेन्शन अदालतीस जिल्ह्यातील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी व शासकीय विभागांच्या कार्यालय प्रमुखांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कोषागार अधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांनी केले आहे. 000000

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानातून 589 उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विकास मार्गदर्शन केंद्रामार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 25 प्रशिक्षण संस्थांमध्ये उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येते. सन 2022- 2023 मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या 589 उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त झाला आहे. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान अंतर्गत राज्य व केंद्र शासनातील विविध विभागाअंतर्गत कौशल्य प्रशिक्षणाशी निगडित सर्व योजना व कार्यक्रमाखालील निधीद्वारे एकत्रित अंमलबजावणीद्वारे 15 ते 45 वर्षापर्यंतच्या वयोगटातील उमेदवारांना रोजगारक्षम करण्यात येते. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योगकत मार्गदर्शन केंद्र सांगली यांच्यामार्फत करण्यात आले आहे. 00000

पी.एम.किसान योजनेसाठी केवायसी मोहिम

टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा योजनांतून 23.42 टीएमसी पाणी उपसा

प्रधानमंत्री मातृवंदना योजना

बुधवार, १४ जून, २०२३

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यम शाळेत मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता 1 ली ते 12 वी मोफत शिक्षण देण्यासाठी सन 2023-24 मधील इयत्ता 1 ली ते 5 वी च्या प्रवेशाकरीता सांगली जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रवेश देण्यात येणारी नामांकित इग्रंजी माध्यमाची शाळा वाळवा तालुक्यातील एस.के.इंटरनॅशनल स्कूल, रेठरेधरण आहे. ‍विनाशुल्क प्रवेशासाठी या शाळेकडे दि. 30 जून 2023 अखेर पर्यंत संपर्क साधून अर्ज सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. प्रवेशाच्या इयत्ता 1 ली ते 5 वी करीता योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे - प्रवेश घेवू इच्छिणारा विद्यार्थी धनगर समाजाचा असावा (जात प्रमाणपत्र दाखला सादर करणे आवश्यक). जर विद्यार्थी दारिद्र्यरेषेखालील असेल तर त्यासंबधीच्या यादीतील अनुक्रमांच्या नोंदीसह दाखला आवश्यक आहे. मुलांच्या पालकांच्या कुटूबांची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाख इतकी राहील. या योजनेअंतर्गत विनाशुल्क प्रवेशासाठी मुख्याध्यापक एस.के.इंटरनॅशनल स्कूल पेठ-शिराळा रोड,रेठरेधरण ता.वाळवा जि.सांगली यांच्याकडे दि. 30 जून 2023 अखेर पर्यंत संपर्क साधून अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,सांगली यांचे कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगांव रोड,सांगली दूरध्वनी क्र.0233-2374739 येथे संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. 00000

डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन सप्ताह ‍निमित्त सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे कार्यक्रमाचे आयोजन

सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन सप्ताह दि. 10 ते 16 जून 2023 या कालावधीत साजरा केला जात असून यानिमित्त पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिभिषन सारंगकर म्हणाले, दृष्टीआडची सृष्टी दाखविणारे डॉ. रामचंद्र भालचंद्र यांचा जन्म दिवस व मृत्यु दिवस 10 जून आहे. डॉ. रामचंद्र भालचंद्र यांनी त्यांच्या जवळजवळ 25 वर्षाच्या कारकिर्दीत 90 हजाराहून अधिक शस्त्रक्रिया केल्या. ते सामान्य जनतेत देवमाणूस म्हणून ओळखले जात, त्यांनी हैद्राबाद येथील मेडीकल कॉलेजमध्ये एम.बी.बी.एस चे शिक्षण पूर्ण केले नंतर मुंबई विद्यापीठाचे एम. एस. डी. ओ. एम. एस. चे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून अनेक वर्षे काम पाहिले. याच काळात ते एक नावाजलेले नेत्रतज्ञ म्हणून प्रसिद्ध झाले. डोळ्याच्या शस्त्रक्रियेची शिबीरे आयोजीत केली व अंध व्यक्तींना दृष्टी देण्याचे काम केले असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेत्रदान समुपदेशक अविनाश शिंदे यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (अंधत्व नियंत्रण कार्यक्रम) तथा नेत्रशल्य चिकित्सक डॉ. गायत्री खोत, नेत्रशल्य चिकित्सक डॉ. शैलजा सिनम, जिल्हा नोडल ऑफिसर तथा नेत्र चिकित्सा अधिकारी जे. जी. बाबर, नेत्र चिकित्सा अधिकारी आर. बी. कोथळे, लेखापाल अभिनंद पाटील तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. 00000

मंगळवार, १३ जून, २०२३

दुचाकी वाहनाकरिता नविन मालिका 19 जून पासून सुरू

सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली करीता नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी वाहनांकरिता एम एच 10 ई सी ही नवीन मालिका सोमवार, दि. 19 जून 2023 पासून सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांनी दिली. एम एच 10 ई सी या मालिकेव्यतिरिक्त इतर वाहनांसाठी आकर्षक क्रमांक हवा असेल तर तिप्पट फी भरून आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियमाच्या 5(अ) मध्ये विहीत केलेल्या पुराव्याची छायांकित प्रत आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इत्यादीची साक्षांकित प्रत, ई-मेल आयडी आवश्यक आहे. पसंतीचे नोंदणी क्रमांक वाहन 4.0 या संगणकीय प्रणालीवर देण्यात येणार असून त्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आहे. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत विहीत शुल्काचा डिमांड ड्राफ्ट सादर करणे बंधनकारक आहे. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास दि. 20 जून 2023 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जास्त रकमेची डीडी जो अर्जदार सादर करेल त्यास तो क्रमांक दिला जाईल. आकर्षक क्रमांकासाठी 30 दिवसांच्या आत वाहन नोंदणी करणे बंधनकारक राहील, असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. 00000

एम.आर.पी. पेक्षा जादा दराने खते खरेदी करू नका - जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार

अनुदानित रासायनिक खतांची विक्री एम.आर.पी. पेक्षा जादा दराने होत असल्यास संपर्क साधा सांगली दि. 13 (जि.मा.का.) : खरीप हंगाम 2023 मध्ये शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा पुरवठा योग्य रीतीने होण्याच्या दृष्टीने सांगली जिल्ह्यामध्ये आज अखेर रासायनिक खतांच्या 89 हजार 230 मेट्रीक टन मागणी पैकी 84 हजार 208 मेट्रीक टन रासानिक खते उपलब्ध झाली आहेत. जिल्ह्यामध्ये रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असून यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. चालू खरीप हंगामामध्ये रासायनिक खतांचे ग्रेड निहाय दरपत्रक शेतकऱ्यांच्या माहितीसाठी देण्यात येत आहे. ही खते एम.आर.पी. पेक्षा जादा दराने खरेदी करू नयेत. अनुदानित रासायनिक खतांची विक्री एम.आर.पी. पेक्षा जादा दराने होत असल्यास शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे. रासायनिक खतांचे दरपत्रक पुढीलप्रमाणे. अ.क्र खताचे नाव दर / बॅग वजन (कि.ग्रॅम) १ युरिया २६६.५०/- ४५ २ डी.ए.पी. १३५०/- ५० ३ एम.ओ.पी.P १७००/- ५० ४ १०:२६:२६ १४७०/- ५० ५ १२:३२:१६ १४७०/- ५० ६ २४:२४:०० १७००/- (पी.पी.एल.) ५० ७ १४:२८:१४ १७९५/- (पी.पी.एल.) ५० ८ २४:२४:०:०८ १५००/- (कोरोमंडल) ५० ९ १४:३५:१४ १५००/- (कोरोमंडल) ५० १० २४:२४:०:०८ १७००/- (महाधन) ५० ११ २०:२०:०:१३ १३००/- (महाधन) ५० १२ १४:२८:०० १४९५/- (महाधन) ५० १३ ०९:२४:२४ १७९०/- (महाधन) ४० १४ ०८:२१:२१ १७५०/- (महाधन) ४० १५ १५:१५:१५ १४७०/- ५० १६ २०:२०:०:१३ १३००/- (आर.सी.एफ.) ५० १७ २०:२०:०:१३ १२००/- (इफको) ५० १८ २०:२०:०:१३ १२५०/- (आय.पी.एल.) ५० १९ २०:२०:०:१३ १२००/- (चंबल) ५० २० एस.एस.पी.(पावडर) ५३०/-(पी.पी.एल.) ५० २१ एस.एस.पी.(ग्रॅन्युलर) ५७०/- (पी.पी.एल.) ५० २२ एस.एस.पी.(पावडर) ५०५/- (श्री पुष्कर) ५० २३ एस.एस.पी.(ग्रॅन्युलर) ५४५/-(श्री पुष्कर) ५० २४ एस.एस.पी.(ग्रॅन्युलर झिंकेटड) ५७५/- (श्री पुष्कर) ५० २५ एस.एस.पी.(पावडर) ५१०/- (रामा) ५० २६ एस.एस.पी.(ग्रॅन्युलर) ५५०/-(रामा) ५० 00000

डी.एल.एड्. प्रवेश प्रक्रिया सुरू

सांगली दि. 13 (जि.मा.का.) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या (डी.एल.एड्.) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना नोंदणीसाठी 13 जून पासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा 27 जूनपर्यंत चालू राहणार आहे, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. शैक्षणिक वर्ष सन 2023-24 साठी डी.एल.एड्. प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन करण्यात येत आहेत. याबाबतचे वेळापत्रक, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयांची यादी www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. प्रवेशास इच्छुक असणाऱ्या कला, वाणिज्य, विज्ञान व एम्.सी.व्ही.सी. शाखेतील पात्र उमेदवारांना 12 वी खुल्या संवर्गासाठी किमान 49.5 टक्के गुण व खुला संवर्ग वगळून अन्य संवर्गासाठी किमान 44.5 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन प्रक्रियेतील अर्ज भरणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी पूर्ण भरलेल्या अर्जाची डाएट स्तरावरून 13 ते 28 जून या कालावधीत ऑनलाईन पडताळणी करण्यात येणार आहे. 3 जुलै रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करून त्यावरील आक्षेपाचे निरसन करण्यात येणार आहे. 5 जुलै रोजी पूर्ण भरलेल्या अर्जाची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. 6 जुलै रोजी प्रथम प्रवेश फेरीतील उमेदवारांना प्रवेशासाठी 6 ते 10 जुलै असा कालावधी देण्यात येणार आहे. या फेरीत प्रवेश धेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी डायट लॉगीनवर 10 जुलै रोजी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी 11 जुलै रोजी विकल्प देता येतील. 13 जुलै रोजी या फेरीची यादी जाहीर होईल. 13 ते 17 जुलै या कालावधीत या फेरीतील उमेदवारांना प्रवेश घेता येईल. 17 जुलै रोजी प्रवेश घेतलेल्या उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. तिसऱ्या फेरीसाठी 18 जुलै रोजी विकल्प नोंदविता येणार आहेत. तिसऱ्या व अंतिम प्रवेश फेरीची यादी 20 जुलै रोजी जाहीर होणार आहे. या फेरीतील उमेदवारांना 20 ते 24 जुलै पर्यंत प्रवेश घेता येईल. चालू शैक्षणिक वर्ष सन 2023-24 मध्ये प्रथम वर्ष 20 जुलै पासून सुरू होईल, असे प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

एकात्मिक बाल विकास सेवा योजना सांगली ग्रामीण प्रकल्पाकडील अंगणवाडी मिनी सेविका व मदतनिस पद भरतीसाठी 28 जून पर्यंत अर्ज करा

सांगली दि. 13 (जि.मा.का.) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना सांगली ग्रामीण प्रकल्पाकडील एकूण 5 गावातील अंगणवाडी मिनी सेविका 6 व 18 गावातील मदतनिस 55 ही मानधनी रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. पात्र महिला उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिनांक 15 जून 2023 ते 28 जून 2023 अखेर सायंकाळी 6 वाजेपर्यंत सांक्षाकित प्रतिसह एकात्मिक बाल विकास सेवा योजना सांगली ग्रामीण कार्यालयाकडे समक्ष पोहच करावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे एकात्मिक बाल विकास सेवा योजना सांगली ग्रामीण चे बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. अंगणवाडी मिनी सेविका व मदतनिस ची भरण्यात येणारी गावनिहाय पदे पुढीलप्रमाणे. मिनी सेविका - नांद्रे-1, दुधगाव-1, सावळवाडी-1, कवठेपिरान-1, समडोळी-2. मदतनिस - बामणोली-2, माधवनगर-5, कसबेडिग्रज-4, समडोळी-4, तुंग-1, मौजे डिग्रज-1, कर्नाळ-1, नांद्रे-2, पदमाळे-1, कवठेपिरान-5, दुधगाव-3, सावळवाडी-1, हरीपूर-2, कवलापूर-8, काकडवाडी-1, बुधगाव-12, का.खोतवाडी-1, बिसूर-1. अंगणवाडी मिनी सेविका व मदतनिस पद भरतीसाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे. उमेदवाराचे वय दिनांक 28 जून 2023 रोजी वय वर्षे 18 वर्षाचे वरील व 35 वर्षाच्या आतील असावे. मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिस या पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महिला उमेदवार ही त्या गावची स्थानिक रहिवाशी असावी. या पदासाठी लहान कुटुंबाची अट लागू राहील. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर अनुषंगिक पात्रता याबाबतचा सविस्तर तपशील दर्शवणारा नमुना अर्ज संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर उपलब्ध असल्याचे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. 00000

एकात्मिक बाल विकास सेवा योजना मिरज प्रकल्पाकडील अंगणवाडी मिनी सेविका व मदतनिस पद भरतीसाठी 28 जून पर्यंत अर्ज करा

सांगली दि. 13 (जि.मा.का.) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना मिरज प्रकल्पाकडील एकूण 31 गावातील अंगणवाडी मिनी सेविकाची 2 व मदतनिस 83 ही मानधनी रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. पात्र महिला उमेदवारांनी त्यांचे परिपूर्ण अर्ज दिनांक 15 जून 2023 ते 28 जून 2023 अखेर कार्यालयीन कामकाजा दिवशी सकाळी 9.45 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सांक्षाकित प्रतिसह एकात्मिक बाल विकास सेवा योजना मिरज कार्यालयाकडे समक्ष पोहच करावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंचायत समिती मिरज चे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. अंगणवाडी मिनी सेविका व मदतनिस ची भरण्यात येणारी गावनिहाय पदे पुढीलप्रमाणे. मिनी सेविका - सुभाषनगर मालगाव-1, मल्लेवाडी-1. मदतनिस - पाटगाव-1, आरग-9, लिंगनूर-2, खटाव-2, कळंबी-1, टाकळी-1, सावळी-1, तानंग-3, मालगाव-7, खंडेराजूरी-1, गुंडेवाडी-2, करोली एम-3, सिध्देवाडी-2, नरवाड-2, बेडग-5, सोनी-2, भोसे-4, डोंगरवाडी-1, संतोषवाडी-1, जानराववाडी-1, सलगरे-2, बेळंकी-3, विजयनगर-2, मल्लेवाडी-2, म्हैसाळ-8, बोलवाड-2, वड्डी-2, एरंडोली-7, बामणी-1, अंकली-2, ढवळी-1. अंगणवाडी मिनी सेविका व मदतनिस पद भरतीसाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे. मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिस या पदासाठी सरळ नियुक्तीसाठी महिला उमेदवाराची वयोमर्यादा दिनांक 28 जून 2023 रोजी 18 वर्षे पूर्ण व 35 वर्षाच्या आतील राहील. विधवा महिला उमेदवारासाठी ही वयोमर्यादा दिनांक 28 जून 2023 रोजी 18 वर्षे पूर्ण व 40 वर्षाच्या आतील राहील. मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिस या पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महिला उमेदवार ही त्या महसुली गावची स्थानिक रहिवाशी असावी. या पदासाठी लहान कुटुंबाची अट लागू राहील. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर अनुषंगिक पात्रता याबाबतचा सविस्तर तपशील दर्शवणारा नमुना अर्ज संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती व बाल विकास प्रकल्प अधिकारी मिरज यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर उपलब्ध असल्याचे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. 00000

सोमवार, १२ जून, २०२३

पाण्याचा वापर काटकसरीने करा - कार्यकारी अभियंता ज्योती देवकर

सांगली दि. १२ (जिमाका) : सद्यस्थितीस कोयना व वारणा धरणामधील उपलब्ध पाणीसाठा, तापमानातील वाढ विचारात घेता पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाणी पुरवणे अत्यावश्यक आहे. यासाठी ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, इतर पाण्याच्या योजना व इतर सिंचन योजना यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा. अन्यथा पिण्यासाठी पाणी पुरवणे अत्यावश्यक असल्याने उपसा बंदी आदेश लागू करणे अपरिहार्य होईल, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे. पावसाळा लांबल्यामुळे व धरणातील पाणीसाठा अत्यल्प असल्याने कोयना धरणातून केवळ १ हजार ५० क्युसेक्स इतकाच विसर्ग सुरू आहे. टेंभू, ताकारी व म्हैसाळ या तिन्ही उपसा सिंचन योजनांचे आवर्तन अंशत: सुरू आहे. तसेच नदीकाठावरील लाभधारकांकडून सिंचन / बिगर सिंचनासाठी पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीपात्रातील पाणी पातळी कमी होवून सिंचन व बिगरसिंचन कारणासाठी (पिण्यासाठी) पाणी अपुरे पडत आहे. सध्या कोयना धरणात 12.37 टी.एम.सी. व वारणा धरणात 11.76 टी.एम.सी. इतका पाणीसाठी उपलब्ध असल्याचे श्रीमती देवकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

नद्या अमृत वाहिन्या करणे प्रत्येकाची जबाबदारी चला जाणूया नदीला अभियान यशस्वी करण्यासाठी डॉ. राजेंद्रसिंह राणा यांचे आवाहन

सांगली दि. १२ (जिमाका) : चला जाणुया नदीला अभियानामध्ये राज्य शासनाने चांगली भूमिका घेतली आहे. या अभियानाच्या माध्यमातून नद्या अमृत वाहिन्या करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडूया व अभियान यशस्वी करूया असे आवाहन चला जाणूया नदीला या अभियानाच्या राज्यस्तरीय समितीचे विशेष निमंत्रित सदस्य डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणुया नदीला या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात चला जाणुया नदीला या अभियानाच्या राज्यस्तरीय समितीचे विशेष निमंत्रित सदस्य डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील, उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, सहायक उपवनसंरक्षक अजित साजणे, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, महाराष्ट्र राज्य जल बिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चुग यांच्यासह जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी व चला जाणुया नदीला अभियानाच्या राज्यस्तरीय समितीचे सदस्य व नदी समन्वयक उपस्थित होते. डॉ. राणा म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राबविण्यात येत असलेल्या चला जाणुया नदीला अभियानास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. राज्य सरकार या महत्वाकांक्षी उपक्रमाकडे अत्यंत गांभीर्याने पहात आहे. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी यंत्रणांनी स्वत:ला झोकून देऊन काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नदी अमृत वाहिनी करण्यासाठी नदीचा नेमका आजार काय आहे, कोणत्या कारणांमुळे प्रदूषण होते, यासाठी संबंधित यंत्रणांनी कृती आराखडा तयार करावा. नदीला आपण आईची उपमा दिलेली आहे मात्र तिच्याशी व्यवहार चुकीच्या पद्धतीने करतो आहोत, ही परिस्थिती बदलण्यासाठी गाव पातळीवर जनजागृती करून नदी अमृत वाहिनी करण्यासाठी गावकऱ्यांचा सहभाग घेतला पाहिजे अशी अपेक्षा डॉ. राणा यांनी व्यक्त केली. नदी स्वच्छ व अमृत वाहिनी करण्यासाठी जिल्ह्यातील अग्रणी नदीचे काम उत्कृष्ट होत आहे. या कामासाठी केंद्र सरकारने पुरस्कार देऊन यामध्ये काम करणाऱ्यांचा उत्साह वाढविला आहे. अग्रणी नदी स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या टीमचे त्यांनी अभिनंदन केले. चला जाणूया नदीला अभियानात लोक सहभाग वाढवून जिल्ह्यात अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी झोकून देऊन काम करावे, अशा सूचना अपर उपजिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी दिल्या. अभियानातील एक सैनिक म्हणून शासकीय अधिकाऱ्यांनी अभियानासंदर्भात निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार काम करावे. जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घ्यावेत असेही त्या म्हणाल्या. श्री. चुग यांनी चला जाणूया नदीला अभियानासंदर्भात माहिती दिली. राज्यात या अभियानास शासन स्तरावरून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, जल साक्षरतेच्या अभावामुळे नद्या प्रदूषित झाल्या आहेत. गाव पातळीवर याबाबत जनजागृती करून या अभियानाच्या माध्यमातून नद्या अमृत वाहिन्या करूया, असे त्यांनी आवाहन केले. चला जाणूया नदीला या अभियानात जन सहभाग घ्यावा, नदीच्या समस्या समजून घेऊन उपाय सुचावावेत. यासाठी प्रत्येक नदीची यात्रा करावी. या अभियानाचा शुभारंभ 13 जूनपासून करावा, अशा सूचना उपजिल्हाधकारी दीपक शिंदे यांनी दिल्या. तसेच चला जाणूया या अभियानामध्ये सांगली जिल्ह्यात उत्कृष्ठ काम केले जाईल असा विश्वास दिला. चला जाणुया या अभियानामध्ये जिल्ह्यातील अग्रणी, येरळा, माणगंगा, कृष्णा, तीळगंगा, महाकाली आणि कोरडा या सात नद्यांचा समावेश असून यासाठी नदीनिहाय केंद्रस्थ अधिकारी व नदी समन्वयक यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. बैठकीत नदी समन्वयक यांनी मनोगत व्यक्त करून अभियानाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक सूचना केल्या. ००००

शुक्रवार, ९ जून, २०२३

जिल्ह्यात सामाजिक सलोखा राखा, अफवा पसरवू नका व अफवांवर विश्वास ठेवू नका - प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

जिल्ह्यात सामाजिक सलोखा राखा, अफवा पसरवू नका व अफवांवर विश्वास ठेवू नका - प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी सांगली दि. 9 (जि.मा.का) : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत सोशल मिडीयावर धार्मिक व जातीय भावना दुखावणारे स्टेट्स प्रसारित केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील नागरीकांनी धार्मिक, जातीय तेढ निर्माण करणारे मेसेज, फोटो, व्हिडीओ, कमेंट सोशल मिडीयावर शेअर अथवा पोस्ट करू नयेत. जिल्ह्यात सामाजिक सलोखा बिघडवल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देवून जिल्ह्यात सामाजिक सलोखा राखावा, अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात न घेता शांतता राखावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे. समाज माध्यमांवरील मेसेज, फोटो, व्हिडीओ, कमेंटवर सायबर सेलचे विशेष पथक, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन सोशल मिडीयावर लक्ष ठेवून आहे. अफवा पसरवणाऱ्या अथवा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सोशल मिडियाच्या माध्यमांतून धार्मिक व जातीय भावना दुखावून समाजात तेढ निर्माण होतील असे स्टेट्स, व्हिडीओ क्लिप्स, आक्षेपार्ह मजकूर, एस.एम.एस. तयार करून प्रसारित करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल. सामाजिक शांतता खराब करून, अशांतता होईल असे वातावरण निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येवून, त्यांना कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी स्पष्ट केले आहे. 00000

बालकांना कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा - सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर

सांगली दि. 9 (जि.मा.का) : बालकामगार कायद्याचे पालन होण्यासाठी दुकाने, आस्थापना, कारखाने, सिनेमागृह, उपहारगृह, हॉटेल व गॅरेज या ठिकाणी 14 वर्षाखालील बालकांना व 14 ते 18 किशोर वयोगटातील बालकांना कामावर ठेऊ नये. अशी मुले कामावर ठेवणे हे कायद्याने गुन्हा आहे, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर यांनी केले आहे. बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम 1986 अंतर्गत जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून 12 जून हा दिवस साजरा केला जाणार आहे. 14 वर्षाखालील बालकास सर्वच व्यवसाय व प्रक्रियामध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रियामध्ये कामावर ठेवणे हा फौजदारी गुन्हा आहे. फौजदारी गुन्ह्यासाठी 6 महिने ते 2 वर्ष पर्यंत वाढविता येईल इतक्या तुरूंगवासाची शिक्षा किंवा किमान 20 हजार रूपये व कमाल 50 हजार रूपये इतका दंड किंवा दोन्ही शिक्षा मालकास होऊ शकतात. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास किमान 1 ते 3 वर्ष पर्यंत वाढविता येईल इतकी तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. बालकास किंवा किशोरवयीन बालकास कामावर ठेवल्याचे आढळल्यास कामगार आयुक्त मुंबई किंवा सहाय्यक कामगार आयुक्त सांगली (ईमेल aclsangli@gmail.com) या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. मुजावर यांनी केले आहे. 00000

मुलां-मुलींच्या शासकीय निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

सांगली दि. 9 (जि.मा.का) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांमार्फत सांगली जिल्ह्यामध्ये अनुसूचित व नवबौध्द मुलां-मुलींच्या 200 क्षमता असणाऱ्या शासकीय ‍निवासी शाळा कार्यरत असून इयत्ता 6 वी ते 10 वी सेमी इंग्रजी माध्यम या वर्गासाठी निवासी शाळांमध्ये सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश अर्ज शासकीय निवासी शाळा व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय सांगली येथे उपलब्ध आहेत, असे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय सांगली यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. प्रवेशासाठी प्रवर्गनिहाय जागा आरक्षित व मर्यादित असून अनुसूचित जाती व नवबौध्द 80 टक्के, अनुसूचित जमाती 10 टक्के, विजाभज 5 टक्के, दिव्यांग 3 टक्के, एस.बी.सी. 2 टक्के याप्रमाणे शासकीय निवासी शाळेत प्रवेश निश्चित केला जातो. प्रवेशासाठी मुलांची शासकीय निवासी शाळा कवठेएकंद ता. तासगाव (मुख्याध्यापक पी. सी. भातलंवडे मो.क्र. 9284801040, मुलांची शासकीय निवासी शाळा विटा ता. खानापूर (मुख्याध्यापक एच. जी. बुरूंगे मो.क्र. 9172410167), मुलांची शासकीय निवासी शाळा कवठेमहांकाळ ता. कवठेमहांकाळ (मुख्याध्यापक मो.क्र. 9325385771), मुलांची शासकीय निवासी शाळा वांगी ता. कडेगाव (मुख्याध्यापक एस. एच. भोसले मो.क्र. 8698029878), मुलींची शासकीय निवासी शाळा बांबवडे ता. पलूस (मुख्याध्यापक तानाजी करचे मो.क्र. 9766040998), मुलींची शासकीय निवासी शळा जत ता. जत (मुख्याध्यापक डी.डी. जाधव मो.क्र. 8275207276). येथे संपर्क साधावा. सन 2022-23 मध्ये सांगली जिल्ह्यामधील कार्यरत शासकीय निवासी शाळांचा 100 टक्के निकाल लागलेला आहे. शासकीय निवासी शाळांमध्ये कोणतीही फी न घेता मोफत प्रवेश दिला जातो. निवासी शाळेत सुसज्ज शासकीय इमारतीत निवास, निवास साहित्य, भोजन, दैनंदिन वापराचे साहित्य, पाठ्यपुस्तके, वह्या, इतर शैक्षणिक साहित्य व गणवेश अशा प्रकारच्या सुविधा मोफत दिल्या जातात. विद्याथी, विद्यार्थीनींच्या सर्वांगीण विकासाकरीता सुसज्ज अद्यावत वर्ग खोल्या, ग्रंथालय, व्यायामशाळा, ई-लर्निंग, मनोरंजन कक्ष इत्यादी सोयीसुविधेसह विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते, असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. 00000

जात वैधता प्रमाणपत्र : त्रुटी पुर्ततासाठी विशेष मोहिम

सांगली दि. 9 (जि.मा.का) : माहे जून व जुलै 2023 मधील प्रत्येक सोमवारी व गुरुवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगली कार्यालयामध्ये सुनावणी कक्षामध्ये जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी "त्रुटी पुर्तता विशेष मोहिम" चे आयोजन करण्यात आलेले आहे. संबंधित सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालकांनी तसेच ग्रामपंचायत निवडणूक 2022 अंतर्गत मागासवर्गीयांच्या आरक्षित जागेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी या शिबिरात उपस्थित राहून त्रुटी पुर्ण कराव्यात. त्रुटी पुर्तता करण्याकरिता मूळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे व या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, सांगली यांनी केले आहे. जात पडताळणी अंतर्गत सांगली जिल्ह्यातील 12 वी विज्ञान शाखेतील तसेच सन 2023-24 या चालू शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा प्रक्रियेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तसेच ग्रामपंचायत निवडणूक 2022 अंतर्गत जात पडताळणी करिता अर्ज सादर केलेला आहे, परंतु त्यांचे प्रकरणांमध्ये त्रुटी आहेत व अशा अर्जदारांना त्रुटीची पुर्तता करण्याबाबत समितीस्तरावरुन ईमेलद्वारे याआधी कळविण्यात आलेले आहे, अशा अर्जदारांकरिता त्रुटी पुर्तता विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

एमएच-बी.एस्.सी. नर्सिंग सीईटी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू

सांगली दि. 9 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यात दि. 11 जून 2023 रोजी MH-B.Sc. नर्सिंग सीईटी-2023 परीक्षा आदर्श इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी खंबाळे (भा.) एमआयडीसी खानापूर-विटा ता. खानापूर या केंद्रावर दिनांक 11 जून 2023 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळोत घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृश्टीने अपर जिल्हादंडाधिकारी विजयसिंह पाटील यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी इमारतीपासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात दिनांक 11 जून 2023 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले असून पुढील कृत्यांना मनाई केली आहे. परीक्षा वेळेत परीक्षेसंबंधी अधिकारी / कर्मचारी व परीक्षेस येणारे विद्यार्थी वगळता इतर कोणत्याही चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे. तसेच परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशिन, ध्वनीक्षेपक यांचा परिक्षा संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई केली असून परिक्षा केंद्रात मोबाईल, पेजर नेण्यास मनाई केली आहे. हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी विजयसिंह पाटील यांनी जारी केले आहेत. 00000

बुधवार, ७ जून, २०२३

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : विविध आंदोलने, यात्रा, जत्रा, ऊरूसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून प्रभारी जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 8 जून 2023 ते 20 जून 2023 अखेर पर्यंत खालील कृत्ये करण्यास मनाई केली आहे. या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि. 8 जून 2023 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 20 जून 2023 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश प्रभारी जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले आहेत. 00000

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सांगली दि. 7 (जि.मा.का) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ऑफलाईन पध्दतीने थेट कर्ज योजना, 20 टक्के बीज भांडवल योजना आणि ऑनलाईन पध्दतीने व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहेत. या योजना ऑफलाईन व ऑनलाईन अशा दोन्ही वेगवेगळ्या असून ऑफलाईन पध्दतीने योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड व जातीचा दाखला घेऊन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क करावा. ऑनलाईन पध्दतीने असणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी www.msobcfdc.org पोर्टलवर अर्ज दाखल करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. काकडे यांनी केले आहे. 00000

कर्जाची परतफेड एकरकमी करणाऱ्यास थकीत व्याजात 50 टक्के सूट

सांगली दि. 7 (जि.मा.का) : ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याजात 50 टक्के सूट देण्याबाबतची एकरकमी (OTS) योजना 31 मार्च 2024 पर्यंत लागू करण्यात येत आहे. त्यानुसार थकबाकीदार लाभार्थींनी या योजनेचा फायदा घेवून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्री. काकडे यांनी केले आहे. 00000

चिंतामणीनगर येथील रेल्वे पुल बांधकामासाठी 10 जून पासून वाहतूकीस बंद

सांगली दि. 7 (जि.मा.का) : चिंतामणीनगर येथील कॉलेज कॉर्नर ते माधवनगर दरम्यानचा रेल्वे पुल ५०३ चे बांधकाम सुरू करावयाचे असल्याने प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मोटर वाहन कायदा 1988 कलम 115 व 116 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून रेल्वे पूल 503 (1/5.94m RCC T-Beam) या पुलावरून होणारी वाहतूक दि. 10 जून 2023 ते दि. 10 जानेवारी 2014 या कालावधीसाठी अन्य मार्गावरून वळविण्याचे तसेच वाहतुक सुरक्षा उपाययोजनाव्दारे वाहतुक नियंत्रीत करण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत. या आदेशानुसार सांगली शहरातून तासगाव, विटा शहराकडे जाण्यासाठी मार्ग पुढीलप्रमाणे - कॉलेज कॉर्नर चौक - माधवनगर रोड - पट्टणशेट्टी होंडा शोरूम कॉर्नर - डावीकडे वळण घेवून बायपास रोड - जुना बुधगाव नाका चौक - जुना बुधगाव रोड - समाजकल्याण कार्यालयाकडे जाणारा रस्ता - रेल्वे फाटक पंचशीलनगर - दसरा चौक पंचशीलनगर - गोसावी गल्ली पंचशीलनगर रोड - लक्ष्मीनगर पंचशीलनगर रोड - माधवनगर जकात नाका रोड मार्गे - तासगाव, विटा शहराकडे जाता व येता येईल. तासगाव, विटा शहराकडून सांगली शहरात येणे व जाणे साठीचा मार्ग पुढीलप्रमाणे - माधवनगर रोड - साखर कारखाना चौक - संपत चौकामधून डावीकडे (पुर्व) वळण घेऊन - औद्योगिक वसाहत मार्गे - संजयनगर 100 फुटी रोड -‍ अहिल्यादेवी होळकर चौकातून उजवीकडे पश्चिमेकडे शिंदे मळा रेल्वे ब्रिज खालून सांगलीला येता व जाता येईल. तसेच अहिल्यादेवी होळकर चौकातून डावीकडे पुर्वेस वळण घेवून कुपवाड रोड - मंगळवार बाजार चौक - गांधी कॉलनी - सह्याद्रीनगर ओव्हर ब्रिज मार्गे शहरात व इतर ठिकाणी जाता व येता येईल. कार्यकारी अभियंता मध्य रेल्वे मिरज यांनी जनतेच्या व वाहन चालकांच्या माहितीसाठी योग्य ठिकाणी दिशाचिन्हे व माहिती लावावी. या उपाययोजना कार्यकारी अभियंता मध्य रेल्वे मिरज, पोलीस अधीक्षक सांगली, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली, वाहतूक नियंत्रण शाखा सांगली व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांनी एकत्रितपणे कराव्यात, असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. 00000

मंगळवार, ६ जून, २०२३

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी वर्ग करण्यासाठी लाभार्थ्यांचे खाते आधार संलग्नित व ई-केवायसी करणे आवश्यक - जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार

सांगली दि. 6 (जि.मा.का) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान ) योजनेंतर्गत १४ व्या हप्त्याचे वितरण होणार आहे. लाभार्थ्याच्या खात्यामध्ये सन्मान निधी वर्ग करण्यासाठी लाभार्थ्यांचे खाते आधार क्रमांकासाठी संलग्नित असणे व e-KYC पूर्ण केलेले असणे गरजेचे आहे. ज्या पात्र खातेदारांचे खाते आधार संलग्नित नसेल व e-KYC केलेले नसेल त्यांच्या खात्यावर सन्मान निधी वर्ग होणार नाही. ज्या पात्र खातेदार लाभार्थ्यांचे बँक खात्याशी जोडणी नसेल व e-KYC केलेली नाही अशा लाभार्थ्यांनी आधार जोडणी व e-KYC तात्काळ करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे. आधार जोडणी व e-KYC सामाजिक सुविधा केंद्र (CSC) येथून करता येईल. केंद्र शासनाने pmkisan पोर्टलवर फार्मर कॉर्नर (Farmer Corner) मध्ये OTP आधारे तसेच सामाईक सुविधा केंद्राद्वारे लाभार्थ्याची e-kyc करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. केंद्र शासनाने विकसित केलेल्या PMKISSAN App मोबाईल वर Face Authentication व्दारे पी.एम.किसान. योजनेच्या लाभार्थ्यांना e-KYC प्रमाणीकरण करण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना स्वतःचे e-KYC प्रमाणीकरण तसेच इतर ५० लाभार्थ्यांचे सुद्धा e-KYC प्रमाणीकरण करता येणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रलंबित पात्र लाभार्थ्यांनी सदर PMKISSAN App चा उपयोग करून स्वतःचे e-KYC प्रमाणीकरण करून घ्यावे. e-KYC प्रमाणिकरणाअभावी कोणताही पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे. 00000

निरोगी आरोग्याकरीता व प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल चालविणे हितकारक - प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के मलाबादे

सांगली दि. 6 (जि.मा.का) : निरोगी व दीर्घायुष्य जगण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायामासाठी सायकल चालविणे सर्वांसाठी हितकारक आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होते, असे प्रतिपादन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के मलाबादे यांनी जागतिक बायसिकल डे निमित्त केले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅमनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली, वकील संघटना व जिल्हा न्यायालयाच्या वतीने जागतिक बायसिकल डे दि. ३ जून २०२३ रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा न्यायाधीश एस. आर. भदगले, पी. बी. जाधव, आर. एन. माजगांवकर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एम. एम. राव, मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. केस्तीकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण नरडेले, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व्ही. व्ही. पाटील, डब्लू ए सईद, जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष किरण रजपूत आदि उपस्थित होते. यावेळी प्रमुख जिल्हा न्यायाधीश सांगली यांच्या निवासस्थानापासून ते जिल्हा न्यायालय, विजयनगर सांगली पर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये जिल्हा मुख्यालयातील न्यायाधीश, वकील व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास वकील संघटनेचे पदाधिकारी तसेच जिल्हा न्यायालय सांगली येथील कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण नरडेले व जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक विरूपाक्ष कुलकर्णी यांनी केले. 00000

प्रदूषण थांबवून पर्यावरणाचा ऱ्हास रोखा - प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे

सांगली दि. 6 (जि.मा.का) : दीर्घायुष्य जगण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त झाडे लावून ती जगविली पहिजेत. वाहने व अन्य माध्यमातून होणारे प्रदूषण थांबवून पर्यावरणाचा ऱ्हास रोखला पाहिजे, असे मत प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी जिल्हा न्यायालय आवारामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅमनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली, वकील संघटना व जिल्हा न्यायालयाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांच्या अध्यक्षतेखालही आयोजित करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश एस. आर. भदगले, पी.बी. जाधव, आर.एन. माजगांवकर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. पोतदार, श्रीमती एम.एम. पाटील, श्रीमती एस. एस. काकडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण नरडेले, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एम. एम. राव, मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. केस्तीकर, सांगली मुख्यालयातील सर्व न्यायाधीश, जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, सांगली वकील संघटनेचे अध्यक्षः किरण रजपूत व वकील संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे म्हणाले, वाढत्या वाहनांमुळे, प्लॅस्टीकमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. याचा परिणाम पाऊस व आपल्या सर्वांच्या आरोग्यावर होत आहे. यामुळे माणसाचे आयुष्यमान कमी होत चालले आहे. त्यामुळे सर्वांनी आपआपल्या परिसरामध्ये जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत व ती जगविण्यासाठी 100 टक्के प्रयत्न केले पाहिजेत तसेच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखला पाहिजे. कार्यकमाचे संयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण नरडेले, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक विरुपाक्ष कुलकर्णी, सचिन नागणे यांनी केले. यावेळी जिल्हा न्यायालय सांगली येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते. 00000

सांगली पाटबंधारे विभागात पूर ‍नियंत्रण कक्ष कार्यान्वीत

सांगली दि. 6 (जि.मा.का) : सांगली पाटबंधारे विभाग सांगली येथे दि. 1 जून 2023 पासून मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करण्यात आला आहे. या कक्षाचे उद्घाटन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. पूर नियंत्रण कक्ष दि. 1 जून 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये अखंडित कार्यरत ठेवण्यात येत असून माहितीसाठी पूरनियंत्रण कक्षामधील 0233-2301820, 0233-2302925 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे. पूर नियंत्रण कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी पाटबंधारे उपविभाग सांगली व मिरज चे सहाय्यक अभियंता मो. रा. गळंगे, पाटबंधारे उपविभाग आष्टा व इस्लामपूरचे उपविभागीय अधिकारी एस. एस. पाटील, उपकार्यकारी अभियंता तथा समन्वय अधिकारी श्वेता दबडे व विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 00000

सोमवार, ५ जून, २०२३

फळपिक विमा योजनेत सहभागासाठी विमा प्रस्ताव विहीत वेळेत जमा करा - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार

सांगली दि. 5 (जि.मा.का) : प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना, (मृग बहार) 2023-24 या योजनेची अंमलबजावणी एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, मुंबई मार्फत जिल्ह्यात करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना भाग घेण्याची अंतिम मुदत द्राक्ष-(क), पेरु, लिंबू या फळपिकासाठी 14 जून 2023, चिकू या फळपिकासाठी 30 जून 2023 आणि डाळिंब या पिकासाठी 14 जुलै 2023 अशी आहे. या योजनेत सहभागासाठी विमा प्रस्ताव विहीत वेळेत जमा करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे. ही योजना शासन निर्णयातील अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी लागू राहील. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी ऐच्छिक आहे. अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी खातेदारांव्यातिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घेता यावा यासाठी जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त अधिसूचित फळपिकासाठी 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करता येईल. अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामा करीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. (उदा. डाळींब व द्राक्ष). केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहाणार आहे. उत्पादनक्षम अधिसूचित वय डाळींब व द्राक्षे 2 वर्ष, पेरु 3 वर्ष, लिंबू 4 वर्ष, व चिकू 5 वर्ष या पेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षण घेतल्याचे निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. या योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र शासनाने त्यांचा विमा हप्ता 30 टक्के दरापर्यंत मर्यादित केलेला आहे. त्यामुळे 30 टक्के वरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी स्विकारणे क्रमप्राप्त आहे. या योजनेंतर्गत 30 ते 35 टक्के पर्यंतचे अतिरिक्त 5 टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्विकारले असून 35 टक्क्यावरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी 50:50 टक्के प्रमाणे भरावयाचा आहे. या योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग ऐच्छिक असल्याने अधिसूचित क्षेत्रातील सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपले बँक खाते असणाऱ्या जवळच्या प्राधिकृत बँका/प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्था/ संबधित विमा कंपनीची कार्यालये किंवा विमा प्रतिनिधीशी संपर्क साधून विमा प्रस्ताव विहीत प्रपत्रात योग्य त्या विमा हप्त्यासह, 7/12 खाते उतारा / आधार कार्ड / बँक खात्याचे तपशिल, घोषणापत्र, बागेबाबत छायाचित्र अक्षांश-रेखांश पत्र इत्यादी कागदपत्रासह विहीत वेळेत जमा करावे. बिगर कर्जदार फळपिक उत्पादक शेतकऱ्यांनी बँकेतील गर्दी टाळण्यासाठी प्राधिकृत आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क करुन सहभाग नोंदवावा. या योजनेंतर्गत विहीत मुदतीत नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी व दायित्व विमा कंपन्याची असून; नुकसान भरपाई देण्याचे कोणतेही दायित्व शासनावर नाही. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. कुंभार यांनी केले आहे. 00000

िल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 19 जूनला

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 19 जूनला सांगली दि. 5 (जि.मा.का.) : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. माहे जून 2023 या महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन दिनांक 19 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केला आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी दिली. 00000

कवठेएकंद येथील मुलांच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरु

कवठेएकंद येथील मुलांच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरु सांगली दि. 5 (जि.मा.का) : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत कार्यरत अनुसूचित व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा कवठेएकंद ता. तासगाव येथे सन 2023-24 करिता इयत्ता 6 वी ते 10 वी सेमी इंग्रजी माध्यम या वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असल्याबाबत शासकीय निवासी शाळा, कवठेएकंदचे मुख्याध्यापक यांनी कळविले आहे. निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांना कोणतीही फी न घेता मोफत प्रवेश दिला जातो. निवासी शाळेत मुलांना निवास, निवास साहित्य, भोजन, दैनंदिन वापराचे साहित्य, पाठ्यपुस्तके, वह्या, इतर शैक्षणिक साहित्य व गणवेश अशा प्रकारच्या सुविधा मोफत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता सुसज्ज अद्यावत वर्ग खोल्या, ग्रंथालय, व्यायामशाळा, ई-लर्निंग, मनोरंजन कक्ष इत्यादी सोयी सुविधेसह स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून प्रवेश अर्ज शासकीय निवासी शाळा कवठेएकंद व सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, सांगली येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी प्रवर्गनिहाय जागा आरक्षित व मर्यादित असून अनुसूचित जाती व नवबौद्ध 80 टक्के, अनुसूचित जमाती 10 टक्के, विजाभज 5 टक्के, दिव्यांग 3 टक्के, एस. बी. सी. 2 टक्के याप्रमाणे शासकीय निवासी शाळेत प्रवेश निश्चित केला जातो. तरी प्रवेशासाठी शाळेचे मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहनही करण्यात आले आहे. 00000

पुणे येथे "इंडस्टी मिट" 9 जूनला

सांगली दि. 5 (जि.मा.का) : कौशल्य केंद्र आपल्या दारी संकल्पनेतून पुणे विभागातील नामांकित इंडस्ट्रीज, इंडस्ट्री असोसिएशन, प्लेसमेंट एजन्सीज व मोठे लेबर कंत्राटदार इत्यादी समवेत सामंजस्य करार करण्याकरिता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत दि. 9 जून 2023 रोजी यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी बाणेर रोड पुणे येथे "इंडस्टी मिट" चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील बेरोजगार तरूणांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच इंडस्ट्रीजना आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याकरीता नामांकित उद्योजक, इंडस्ट्री असोसिएशन, प्लेसमेंट एजन्सीज व मोठे लेबर कंत्राटदार यांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आयोजित रोजगार मेळाव्यात त्यांच्याकडील रिक्तपदे उपलब्ध करून घ्यावी व बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज.बा. करीम यांनी केले आहे. 00000

शासन आपल्या दारी - गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सन २०१५- २०१६ पासून राज्यात राबविण्यात येत होती. आता राज्य शासनाकडून १९ एप्रिल २०२३ पासून ही योजना सानुग्रह अनुदान तत्वावर संपूर्णपणे कृषी विभागाच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या नावाने ३ वर्षे कालावधीसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेविषयी..... योजनेची वैशिष्ट्ये - राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार शेतकरी म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य ( शेतकऱ्याची पती-पत्नी, आई-वडील, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वयोगटातील दोन जणांचा समावेश ग्राह्य धरण्यात येईल. योजना कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच विहित कालावधीतील प्रत्येक दिवसाच्या २४ तासासाठी लागू राहील. लाभास पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांने किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदारांने शासनाच्या अन्य विभागाकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतंर्गत लाभास पात्र असणार नाही. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना कार्यपद्धत - १) शेतकऱ्याचे अपघाताचे प्रकरण निदर्शनास आल्यानंतर संबधित अपघातग्रस्त शेतकरी/शेतकऱ्यांचे वारसदार यांनी निर्धारित कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे ३० दिवसाच्या आत सादर करावा. २) प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यानंतर सखोल चौकशी करण्यासाठी संबधित महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या पथकाने प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करून अहवाल तहसिलदार यांना ८ दिवसात सादर करावा. ३) तालुका कृषी अधिकारी यांनी प्राप्त अहवालाची छाननी करून पात्र प्रस्ताव तहसिलदार यांना सादर करावा. ४) तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीमध्ये ३० दिवसाच्या आत संबंधितांना मदत देण्याबाबतचा निर्णय घ्यावा. ५) तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत संबंधितांच्या बँक खात्यात ईसीएस द्वारे निधी अदा करावा. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर समित्या गठित करण्यात आलेल्या आहेत. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना पात्रतेसाठी रस्ता/रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्याने झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश/विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या खाल्ल्यामुळे/चावल्यामुळे जखमी/मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल, अन्य कोणतेही अपघात या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. तर या योजनेसाठी नैसर्गिक मृत्यू, पूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, आमली पदार्थांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा शरीरांतर्गत रक्तस्राव, मोटर्स शर्यतीत अपघात, युद्ध सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकांकडून खून या बाबी योजनेच्या पात्रतेसाठी समाविष्ट नाहीत. संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

गुरुवार, १ जून, २०२३

शासन आपल्या दारी अभियानांतर्गत आयोजित रोजगार मेळाव्यात 1607 उमेदवारांच्या मुलाखती, 698 उमेदवारांची निवड

युवकांनी कष्टाची तयारी ठेवावी - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे सांगली दि. 1 (जि.मा.का.) : शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथील मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल येथे आयोजित पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 1 हजार 607 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यातून 527 उमेदवारांची प्राथमिक निवड तर 171 उमेदवारांची अंतिम अशा एकूण 698 उमेदवारांची निवड केली आहे. रोजगार मेळाव्यातून नियुक्त झालेल्या उमेदवारांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्ती पत्रे वितरीत करण्यात आली. या रोजगार मेळाव्याचा समारोप समारंभ पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री यांच्या सुविद्य पत्नी सुमनताई खाडे,मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूलचे सचिव प्रा. मोहन वनखंडे, तहसिलदार अपर्णा मोरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम, सुशांत खाडे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि, रोजगार प्राप्त उमेदवार उपस्थित होते. युवकांनी कष्टाची तयारी ठेवावी... पालकमंत्री डॉ. खाडे रोजगार मेळाव्यातून विविध कंपन्यांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी शुभेच्छा देवून जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्टाची तयारी ठेवा असा संदेश दिला. आपल्या निवडीच्या ठिकाणी रूजू होवून प्रामाणिक सेवा बजावा. आपले व आपल्या कुटुंबाचे नाव लौकिक करा. या मेळाव्यात कंपन्यांनी आपल्या दारात येवून नोकऱ्या दिल्या आहेत. शासन आपल्या दारी ही संकल्पना खऱ्या अर्थाने साकारत आहे, असेही त्यांनी सांगितले. रोजगार मेळाव्यात 69 कंपन्यांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने टाटा ऑटोकॅम्प सिस्टम लि., एस. के. एफ. इंडिया प्रा. लि., टाटा मोटर्स, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा प्रा. लि., सिपला प्रा. लि., भारत फोर्ज लि., किर्लोस्कर ऑईल इंजिन लि., घाटगे पाटील इंडस्ट्रीज लि. मेमन, महाबळ मेटल प्रा. लि., घोडावत कन्झ्युमर लि., घाटगे पाटील इंडस्ट्रीज लि.,किर्लोस्कर ब्रदर्स लि. अशा विविध कंपन्यांचा समावेश होता. रोजगार मेळाव्यात कंपन्यांचा सहभाग महत्वाचा असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे यांनी सर्व सहभागी कंपन्यांना धन्यवाद दिले. कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते मुलाखतीसाठी उपस्थित राहिलेल्या कंपन्यांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. नागरिकांच्या सर्व प्रकारच्या समस्या नोंदविण्यासाठी www.sureshkhade.com हे वेब पोर्टल तयार करण्यात आले असून या वेब पोर्टलचे अनावरण पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांनी त्यांच्या समस्या या वेब पोर्टलवर नोंदवाव्यात असे आवाहन यावेळी करण्यात आले. 000000

विकास कामांचा अनुशेष पूर्ण करून मागणीमुक्त गावांची संकल्पना राबविण्याचा निश्चय - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत मिरज येथील रोजगार मेळाव्याचे पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते उद्घाटन सांगली दि. १ (जि.मा.का.) :- गावातील विकास कामे आणि गावांसाठी असणाऱ्या आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. गावांच्या विकास कामांचा अनुशेष पूर्ण करून मागणी मुक्त गावाची संकल्पना राबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी मिरज येथील रोजगार मेळाव्यात केले. शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि दास बहुउद्देशीय विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज येथील मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल येथे आयोजित पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. रोजगार मेळावा उद्घाटन प्रसंगी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, कामगार आयुक्त सतिश देशमुख, महापालिका आयुक्त सुनील पवार, पालकमंत्री यांच्या सुविद्य पत्नी सुमनताई खाडे, पालकमंत्री यांचे खाजगी सचिव गोपिचंद कदम, ‍विशेष कार्य अधिकारी रणजित देसाई, ‍विशेष कार्य अधिकारी प्रमोद फडणीस, मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूलचे सचिव प्रा. मोहन वनखंडे, महानगरपालिका समाज कल्याण सभापती अनिता वनखंडे, माजी महापौर संगीता खोत, तहसिलदार अपर्णा मोरे, अपर तहसिलदार अर्चना पाटील, सहायक कामगार आयुक्त मुजम्मिल मुजावर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, त्यांच्या हाताला काम मिळावे, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारावी हा उद्देश ठेवून शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये 69 कंपन्या सहभागी झाल्या असून या कंपन्यांमध्ये 3 हजार रिक्त पदांसाठी बेरोजगार युवकांच्या विविध पदासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊन त्यांच्या अनुभवाच्या शिदोरीत वाढ होऊन त्यांच्यात नवीन उमेद निर्माण होईल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. खाडे यांनी यावेळी व्यक्त केला. पालकमंत्री डॉ. खाडे पुढे म्हणाले, युवकांनी मोठे ध्येय बाळगावे आणि या ध्येयाच्या पूर्तीसाठी कष्टाची तयारी ठेवावी. आपण स्वतःही एक कामगार होतो. त्यामुळे कष्टाची जाणीव आपल्याला आहे. सामान्य माणसाचे कष्ट कमी करण्यासाठी आपण मिळालेल्या संधीचे सोने करू. जत येथून एक वेळा आणि मिरज येथून तीन वेळा आमदार म्हणून जनतेने सेवा करण्याची संधी दिली. जनतेने आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला विकास कामांच्या माध्यमातून उतराई होण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या महामंडळाच्या स्टॉलचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. मिरज येथील या रोजगार मेळाव्यातून बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात रिक्त जागा कळवून बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. बेरोजगार युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या प्रसंगी केले. या मेळाव्याच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. रोजगाराच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाची आर्थिक उन्नती होईल, असा विश्वास प्रा. मोहन वनखंडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे जमीर करीम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रोजगार मेळाव्यासाठी सुमारे 69 कंपन्या सहभागी झाल्या आहेत. या मेळाव्यात विविध कंपन्यांमध्ये 3 हजार रिक्त पदासाठी मुलाखती घेतल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत 3 हजार 513 कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात येऊन यासाठी बँकेकडून 267 कोटी 89 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे आणि महामंडळाकडून या कर्जापोटी 24 कोटी रुपयांचा व्याज परतावा करण्यात आल्याची माहिती महामंडळाच्या व्यवस्थापक निशा पाटील यांनी दिली. रोजगार मेळाव्यात अतुल किसन पाटील यांना 4 लाख 50 हजार, सतीश दिनकर मोहिते यांना 4 लाख 50 हजार, विशाल आनंदा पाटील यांना 1 लाख 50 हजार, उदय आप्पासाहेब शिंदे यांना 3 लाख, संतोष निशिकांत शिंदे यांना 4 लाख 50 हजार, मनीषा संतोष शिंदे 4 लाख 50 हजार, भास्कर तानाजी पाटील 2 लाख 50 हजा, बजरंग यशवंत पाटील 3 लाख, संपत तुकाराम माने 75 हजार, गजानन साळुंखे 4 लाख 50 हजार, प्रशांत सावंत 3 लाख, सोहन संभाजी पाटील 1 लाख 75 हजार, महादेव पुंडलिक जाधव 4 लाख 50 हजार, रोहित अनिल मस्के 2 लाख, प्रवीण मोहन पवार 1 लाख 50 हजार, प्रदीप श्रीकांत पाटील 3 लाख, गोपाळ शिवाजी पाटील 3 लाख 25 हजार, वैशाली अमर खोत 75 हजार, प्रसाद भगवान जाधव 4 लाख 50 हजार आणि गोरखनाथ मारुती कदम यांना 2 लाख रुपयांचा व्याज परतावा देण्यात आल्याचे प्रमाणपत्र पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुमनताई खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. ०००००