बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

रोजगार मेळाव्यातून जिल्ह्यातील सुमारे 600 बेरोजगारांना मिळाला रोजगार

सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना नोकरी मिळावी तसेच उद्योजकांना आवश्यक मनुष्यबळ जागेवरच उपलब्ध व्हावे या हेतूने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने सन 2020-21 मध्ये 5 ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित केले. यामध्ये 310 बेरोजगार उमेदवारांची प्राथमिक निवड झाली तर सन 2021-22 मध्ये 4 ऑनलाईन रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 283 बेरोजगार उमेदवारांची प्राथमिक निवड झाली. सन 2020-21 मध्ये दि.25 व 26 जून 2020 रोजी 9 उद्योजकांनी 188 पदांसाठी मागणी नोंदविली होती. यामध्ये 321 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केला होता. यामध्ये 21 उमेदवारांची निवड झाली. दि. 14 व 15 जुलै 2020 रोजी 13 उद्योजकांनी 962 पदांसाठी मागणी नोंदविली होती. यामध्ये 59 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केला होता. यामध्ये 24 उमेदवारांची निवड झाली. दि. 23 व 24 सप्टेंबर 2020 रोजी 13 उद्योजकांनी 429 पदांसाठी मागणी नोंदविली होती. यामध्ये 487 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केला होता. यामध्ये 159 उमेदवारांची निवड झाली. दि. 22 व 23 ऑक्टोबर 2020 रोजी 11 उद्योजकांनी 190 पदांसाठी मागणी नोंदविली होती. यामध्ये 163 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केला होता. यामध्ये 61 उमेदवारांची निवड झाली. दि. 25 व 26 फेब्रुवारी 2021 रोजी 8 उद्योजकांनी 166 पदांसाठी मागणी नोंदविली होती. यामध्ये 56 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केला होता. यामध्ये 45 उमेदवारांची निवड झाली. सन 2021-22 मध्ये दि. 27 व 28 मे 2021 रोजी 9 उद्योजकांनी 391 पदांसाठी मागणी नोंदविली होती. यामध्ये 93 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केला होता. यामध्ये 64 उमेदवारांची निवड झाली. दि. 16 व 17 जून 2021 रोजी 9 उद्योजकांनी 278 पदांसाठी मागणी नोंदविली होती. यामध्ये 59 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केला होता. यामध्ये 44 उमेदवारांची निवड झाली. दि. 28 व 29 जुलै 2021 रोजी 7 उद्योजकांनी 136 पदांसाठी मागणी नोंदविली होती. यामध्ये 126 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केला होता. यामध्ये 59 उमेदवारांची निवड झाली. दि. 22 व 23 सप्टेंबर 2021 रोजी 8 उद्योजकांनी 303 पदांसाठी मागणी नोंदविली होती. यामध्ये 141 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केला होता. यामध्ये 116 उमेदवारांची निवड झाली. 00000

मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

नदी उत्सवांतर्गत आज माई घाटावर एकतारी भजन व सुधीर फडके यांच्या गीतांचा कार्यक्रम

सांगली, दि. 21 (जि. मा. का.) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत जिल्ह्यात नदी उत्सव सुरू आहे. या उत्सवात ‍दि. 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत तुकाराम सुर्यवंशी आणि मंडळी यांचा एकतारी भजनाचा कार्यक्रम तर सायंकाळी 6 ते 7 या वेळेत भक्ती गीत, भावगीत व गीतरामायण कार्यक्रमांतर्गत आर. डी. कुलकर्णी ग्रुप यांचा सुधीर फडके गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हे दोन्ही कार्यक्रम सांगली येथील कृष्णा नदी काठावर माई घाट स्वामी समर्थ मंदिर येथे होणार आहेत. तरी श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 00000

कृषि यांत्रिकीकरणांतर्गत जिल्ह्यात 213 लाभार्थी

सांगली, दि. 21 (जि. मा. का.) : राज्यात सन 2014-15 पासून कृषि यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्यात येत आहे. कृषि यांत्रिकीकरण उप अभियानामध्ये केंद्र व राज्य हिस्सा 60:40 प्रमाणे आहे. सन 2020-21 मध्ये कृषि यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत जिल्ह्यातील 125 लाभार्थींना 74 लाख 59 हजार रूपये तर राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण योजनेतून 88 लाभार्थींना 55 लाख 16 हजार रूपये रक्कमेचा लाभ झाला असून अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे, विभागनिहाय पिक रचनेनुसार आवश्यक असलेली व पूर्व तपासणी केलेली दर्जेदार कृषि औजारे खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुरुप व मागणी प्रमाणे कृषी यंत्रसामुग्री/औजारे उत्पादने अनुदानावर उपलब्ध करुन देणे व कृषि उत्पादन प्रक्रियेत अद्ययावत यंत्रसामुग्रीच्या वापरासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कृषि यंत्र / औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य तसेच भाडे तत्वावर कृषि यांत्रिकीकरण सेवा सुविधा केंद्र/कृषि औजारे बँक स्थापनेसाठी अर्थसहाय्यचा लाभ देण्यात येतो. केंद्र शासनाने त्यासाठी मंजूर केलेल्या कार्यक्रमाच्या मर्यादेत 2015-16 कृषि गणनेनुसार जिल्हानिहाय एकूण खातेदार संख्या, पेरणी क्षेत्र मागील वर्षाचा मंजूर कार्यक्रम व मागील सहा वर्षाचा खर्च यावर आधारित कार्यक्रमाचे लक्षांक कृषि आयुक्तालय स्तरावर जिल्हानिहाय निश्चित करण्यात येतो. या योजनेच्या लाभासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी Mahadbt पोर्टल द्वारे अर्ज करणे आवश्यक आहे. शासनाच्या दि. 4 नोव्हेंबर 2020 च्या शासन परिपत्रकात नमूद केल्यानुसार कृषि विभागाच्या योजनाची महाडीबीटी पोर्टल द्वारे अंमलबजावणी करण्यासाठी शासन मान्यता देण्यात आलेली आहे. कृषि विभागाच्या योजना महाडीबीटी पोर्टलद्वारे करण्यासाठी एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबीच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेतीशी निगडीत विविध बाबीकरिता अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत ट्रॅक्टर/ लहान ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोटाव्हेटर, मोगडा (कल्टीव्हेटर), सर्व प्रकारचे प्लांटर (खत व बी टोकणी यंत्र), मळणी यंत्र, भात लावणी यंत्र (ट्रान्सप्लांटर), पॉवर विडर, रिपर व रिपर कम बाईंडर, भात मळणी यंत्र, मिनी भात मिल, दाल मिल व पूरक यंत्र (डी-स्टोनर, पॉलीशिंग, ग्रेडिंग, पॉकिंग इ.) संच, कापूस पऱ्हाडी थ्रेशर, ऊस पाचट कुट्टी, मल्चर, ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्र (बूम स्प्रेअर), सब सोईलर या यंत्र/ औजारांसाठी पात्र शेतकऱ्यांची संगणकीय सोडत पद्धतीने निवड करण्यात येत असून डीबीटी द्वारे अनुदान वितरीत केले जात आहे. भाडे तत्वावरील कृषि यांत्रिकीकरण सेवेसाठी कृषि औजारे बॅंक स्थापनेसाठी अर्थसहाय्य प्राधान्याने वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांचे नोंदणीकृत गट, शेतकरी बचत गट, प्रगतीशील शेतकरी गट, कृषि विज्ञान केंद्रे कृषि यांत्रिकीकरण सेवा सुविधा केंद्र (कृषि औजारे बॅन्क) स्थापनेसाठी गावांची निवड करताना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील निकष पाळणे बंधनकारक राहील. कृषि क्षेत्रात कमी प्रमाणात उर्जा वापर असलेली गावे, ट्रॅक्टरची संख्या कमी प्रमाणात असलेली गावे, अल्प व अत्यल्प जमीनधारकांचे प्रमाण अधिक असलेली गावे व सध्या कृषि उत्पादकता कमी असलेली परंतु उत्पादकता वाढीस वाव असलेली गावे. 00000

सोमवार, २० डिसेंबर, २०२१

बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात 110 प्रकल्पांची नोंदणी

सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : लहान आणि सिमांत शेतकरी तसेच कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत सांगली जिल्ह्यातील 110 प्रकल्पाची नोंदणी झाली असून 28 प्रकल्प ‘अ’ वर्गात आहेत व 17 प्रकल्प पात्र झाले आहेत. कृषि व्यवसाय क्षेत्रात लघु व मध्यम उद्योगांच्या स्थापनेसाठी उत्तेजन देणे, कृषि व्यवसायांच्या उभारणीस बळकटी देणे, त्यांना अधिक बाजारपेठा उपलब्ध करुन देणे तसेच कृषि व्यवसायांची हवामान लवचिकता व संसाधन वापराची कार्यक्षमता वाढविणे हे या प्रकल्पाचे ध्येय आहे. या योजनेत कृषि व्यवसाय सुधारणांसाठी संस्थात्मक वृद्धी, प्रकल्प व्यवस्थापन, व्यापक बाजारपेठ प्रवेशासाठी सहाय्य, सध्या प्रचलित असलेल्या योजनेतून यंत्रसाम्रगी, पॅकहाऊस, गोडाऊन, शितगृह, शेतमाल प्रक्रीया युनिट हे घटक आहेत. या योजनेचे लाभार्थी पात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत. समुदाय आधारीत नोंदणीकृत संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गटाचे संघ, प्राथमिक कृषि सहकारी संस्था, उत्पादक संघ, आत्मा यंत्रणेकडे नोंदणी झालेले उत्पादक गट, व्हीएसटीएफ गावसमुह इत्यादी. स्मार्टच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी संघटित असणे ही प्रमुख अट आहे. 00000

सोमवार, १३ डिसेंबर, २०२१

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 8 हजार 967 प्रकरणे निकाली. 18 कोटी 4 लाख 31 हजाराहून अधिक रक्कम वसूल

सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार दिनांक 11 डिसेंबर 2021 रोजी सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे सांगली जिल्हा व सांगली जिल्हयातील सर्व तालुक्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाली. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 8 हजार 967 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामधून 18 कोटी 4 लाख 31 हजार 286 रूपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली असल्याची माहिती प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा विधी व सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. एस. राजंदेकर यांनी दिली. या लोक अदालतीच्या सुरूवातीस प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा विधी व सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. एस. राजंदेकर यांनी सर्व पॅनल न्यायाधीश व सदस्यांना जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये समजोता घडवून आणून प्रकरणे तडजोडीने निकाली करावी, असे आवाहन केले. या कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश श्री. मलाबादे, श्री. सातवळेकर, श्री. जगताप, श्री. पोळ, श्री. पोतदार, सांगली वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सुनिल लवटे व जिल्हा सरकारी वकील अॅड. देशमुख उपस्थित होते. या लोक अदालतीमध्ये आवश्यकतेनुसार व्हिडिओ, कॉन्फर्न्सव्दारेही पक्षकारांशी संवाद साधण्याची व्यवस्था करण्यात आली होती. लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातून 53 पॅनलची निर्मिती करण्यात आली होती. कोरोनामुळे जे पक्षकार तडजोडीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नव्हते, अशांसाठी व्हॉट्सअॅप कॉलचा वापर करण्यात आला. लोक अदालतीच्या अगोदर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीन दिवस स्पेशल ड्राइव्हमध्येही प्रकरणे निकाली काढण्यात आली. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये पुढीलप्रमाणे प्रकरणे निकाली करण्यात आली. जिल्हा न्यायालय सांगली - 6 हजार 338, इस्लामपूर न्यायालय - 211, आटपाडी - 491, जत - 50, कडेगांव - 171, कवठेमहांकाळ - 181, मिरज - 223, पलूस - 279, शिराळा - 742, तासगांव - 195 तर विटा न्यायालयामध्ये 86 प्रकरणे निकाली करण्यात आली. पुढील राष्ट्रीय लोक अदालत दि 12 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण कि. नरडेले यांनी दिली. या लोक अदालतीमध्ये नागरिकांनी प्रलंबित प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्याचे आवाहनही श्री. नरडेले यांनी केले आहे. ०००००

शुक्रवार, ३ डिसेंबर, २०२१

कोविडमुळे पालक गमावलेल्या ६८७ बालकांना प्रतिमहा ११०० रूपये बालसंगोपन निधी लाभ मंजूर

- १२ बालकांना प्रत्येकी ५ लाख रूपये बालकांच्या व शासनाच्या संयुक्त नावे कायम ठेव (FD) स्वरुपात जमा सांगली, दि. 3. (जि. मा. का.) : ‍कोविड-१९ संसर्गामुळे जिल्ह्यातील ७१५ पेक्षा जास्त बालकांनी आपले पालक गमावले आहेत. कोविड-१९ या रोगामुळे दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या मुलांवर तसेच एक पालक गमावलेल्या मुलांना गंभीर समस्यांना तोंड देण्याची होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने महिला व बाल विकास मार्फत अशा १८ वर्षाखालील ६८७ बालकांना प्रतिमहा ११०० रुपये प्रमाणे बालसंगोपन निधी लाभ मंजूर करण्यात आला आहे. तसेच कोविडच्या प्रादुर्भावाने दोन्ही पालक गमावलेल्या १८ वर्षाखालील एकूण २० बालकांपैकी १२ बालकांना आजअखेर प्रत्येकी रक्कम ५ लाख रूपये इतका निधी राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत बालकांच्या व शासनाच्या संयुक्त नावे कायम ठेव (FD) स्वरुपात जमा करण्यात आली आहे. तसेच उर्वरीत ८ बालकांना या योजनेचा लाभ देण्याबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात सुरु आहे. केंद्र शासनाकडूनही विविध योजनांचा लाभ कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत मिळावी याससाठी PM care for children scheme ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा प्रमुख उद्देश कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांची काळजी व संरक्षण सुनिश्चित करणे, आरोग्य, शिक्षणाद्वारे सक्षमिकरण करणे. वयाच्या १८ व्या वर्षी मासिक वेतन आणि वयाच्या २३ व्या वर्षी एकरकमी १० लाख रुपयांचा लाभ देवून स्वयंपूर्णत्वासाठी सुसज्ज करणे हा आहे. त्याचबरोबर आयुष्यमान भारत आरोग्य विमा अंतर्गत ५ लाख रूपये आरोग्य विमा वयाची १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेंतर्गत मासिक हप्ते देण्याचे प्रावधान आहे. या योजनेचा लाभ देण्याकरीता १९ लाभार्थी बालकांची माहिती व कागदपत्रे शासनास पोर्टलच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहेत. लाभार्थीयांना १० लाख रुपयांच्या लाभासाठी जिल्हाधिकारी व लाभार्थी यांचे संयुक्त खाते जिल्ह्याच्या मुख्य पोस्ट ऑफीसमध्ये उघडण्यास मान्यता घेण्यात आली आहे. ०००००

गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : व्यापक पध्दतीने साजरा करा कार्यक्रमांचा सविस्तर आराखडा 15 नोव्हेंबर पर्यंत सादर करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्याला स्वातंत्र्य लढ्याचा दैदीप्यमान, गौरवपूर्ण वारसा लाभलेला आहे. देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्या निमित्त देशभरात आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्ह्यात अधिक व्यापक पध्दतीने साजरा करण्यासाठी सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करावे. यामध्ये प्राधान्याने अंमलात आणावयाचे उपक्रम, योजना, कार्यक्रम याबाबतचा सविस्तर आराखडा 15 नोव्हेंबर पर्यंत जिल्हा प्रशासनास सादर करावा. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाबाबत आयोजित आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, सर्व प्रातांधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, सर्व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2023 पर्यंत राबविण्यात येणार आहे. हा महोत्सव अधिक व्यापकपणे साजरा करण्यासाठी नवनविन संकल्पना राबविण्यात याव्यात. त्याचबरोबर शासनाकडून प्राप्त झालेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोगो प्राधान्याने सर्व कार्यालयांनी दर्शनी भागात लावावा. तालुकास्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समित्यांची स्थापना करावी. या समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात यावेत. या उपक्रमात सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, संकल्पक व्यक्ती यांचा सहभाग घ्यावा. ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत स्तरावरही समित्यांची स्थापना करावी व दरमहा या विषयाचा आढावा घेण्यात यावा. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आत्तापर्यंत विविध विभागांनी राबविलेल्या उपक्रमांची माहिती छायाचित्रासह विहीत नमुन्यात द्यावी. तसेच १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे नियोजनही 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत विहीत नमुन्यात द्यावे. सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वातंत्र्य चळवळी संबंधित असणारी स्मारके, हुतात्मा स्मारके सुस्थितीत ठेवावीत. त्यांच्या दुरूस्तीसाठी निधी आवश्यक असल्यास प्रस्ताव त्वरीत सादर करावेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दर्जेदार आरोग्य, पर्यटन संधी, युवा शक्ती, सामाजीक न्याय, सामाजिक सलोखा, कौशल्य विकास, माहिती तंत्रज्ञान, सुशासन, माझी वसुंधरा, अर्थ साक्षरता, रोजगार निर्मीती, चिरंतन विकास, महिलांचा वाढता सहभाग, सांस्कृतिक निर्देशांक वाढ या विषयांवर प्राधान्याने वैविध्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात. याबरोबरच स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हेरीटेज वॉक, सायकल रॅली, पथनाट्य, चर्चासर्त्रे, परिसंवाद, प्रदर्शने, मेळावे, लोककला, अभिजात कला, ‍निबंध स्पर्धा यांच्या माध्यमातून लोकसहभागातून महोत्सवी वातावरण निर्माण करावे. स्वातंत्र्य लढ्यातील योगदान दिलेली व्यक्तीमत्वे, वारसा स्थळे अशा ठिकाणी पदयात्रांचे आयोजन व्हावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने शाळा, महाविद्यालयांमध्ये वातावरण निर्मिती करावी. मॉडेल स्कूल, क्रीडा विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या सर्वांचा सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ०००००

बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत 91 हजार 464 शेतकऱ्यांना 14 कोटी 55 लाख रूपये वितरण

सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा यंत्रणा, राष्ट्रीयीकृत/ग्रामीण/खाजगी बँकांकडून एक लाख रूपयांपेक्षा जास्त पण 3 लाख रूपये पर्यंतचे अल्पमुदती पीक कर्ज घेणाऱ्या आणि विहीत मुदतीत परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर उत्पादन प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत देण्यात येते. या योजनेंतर्गत सन 2019-20 ते सन 2021-22 पर्यंत जिल्ह्यातील एकूण 91 हजार 464 शेतकऱ्यांना 14 कोटी 55 लाख 7 हजार 584 रूपये रक्कमेचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत 3 लाखांपर्यंत अल्पमुदती पीक कर्ज घेणाऱ्या आणि विहीत मुदतीत (प्रत्येक वर्षी 30 जूनपर्यंत अथवा शासनाने अपवादात्मक परिस्थितीत कर्ज परतफेडीस मुदत वाढ दिली असल्यास तो दिनांक) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रूपयांपर्यंत 3 टक्के व 1 लाख रूपयांपेक्षा जास्त पण 3 लाखांपेक्षा कमी रकमेवर 1 टक्के वार्षिक दराने व्याजाची सवलत देण्यात येते. सन 2021-22 पासून 3 लाखापर्यंतच्या अल्पमुदती पीक कर्जास 3 टक्के प्रमाणे व्याज सवलत लागू करण्यात आली आहे. यासाठी तालुक्याचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडून वि.का.स. संस्था अथवा राष्ट्रीयीकृत/ग्रामीण/खाजगी बँकांच्या शाखांकडून पात्र सभासद शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली यांच्या कार्यालयास प्राप्त होतात. तद्नंतर सदर योजनेकरिता प्राप्त झालेल्या निधीतून कोषागाराकडून बील मंजूर झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर व्याज सवलतीची रक्कम जमा करण्यात येते. या योजनेंतर्गत सन २०१९-२० ते सन २०२१-२२ पर्यंत वर्षनिहाय लाभ दिलेली शेतकरी संख्या व कंसात रक्कम पुढीलप्रमाणे. सन 2019-20 - 42 हजार 462 (6 कोटी 55 लाख 59 हजार 161 रूपये), सन 2020-21 - 21 हजार 557 (2 कोटी 99 लाख 88 हजार 155 रूपये), सन 2021-22 - 27 हजार 445 (4 कोटी 99 लाख 60 हजार 268 रूपये), अशा एकूण 91 हजार 464 शेतकऱ्यांना 14 कोटी 55 लाख 7 हजार 584 रूपये रक्कमेचा लाभ देण्यात आला आहे. 00000

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

जिल्ह्यात शिवभोजन केंद्रातून आत्तापर्यंत 22 लाख 63 हजारांहून अधिक थाळ्यांचे वाटप

सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागाने शिवभोजन योजना सुरू केली. त्यानुसार सांगली जिल्ह्यात 26 जानेवारी 2020 रोजी शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. आजमितीस सांगली जिल्ह्यात सांगली, मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात 20 व तालुका स्तरावर 18 अशी एकूण 38 शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. जिल्ह्याचा शिवभोजन योजनेचा नियमित इष्टांक 4825 इतका असून जिल्ह्यातील सर्व शिवभोजन केंद्रातून दि. 26 जानेवारी 2020 ते दि. 08 नोव्हेंबर, 2021 अखेर एकूण 22,63,429 थाळ्याचे वाटप झालेले आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दि. 1 एप्रिल, 2020 पासून दि. 13 एप्रिल, 2021 पर्यंत शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना 5 रु. प्रतिथाळी प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आली. या काळात 10 लाख 46 हजार 392 इतक्या लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला. दि. 15 एप्रिल, 2021 पासून दि. 30 सप्टेंबर, 2021 पर्यंत दीडपट इष्टांक तसेच मोफत प्रमाणे शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या काळात 9 लाख 48 हजार 268 इतक्या लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला. दि. 01 ऑक्टोंबर, 2021 पासून शिवभोजन थाळी मूळ इष्टांकासह 10 रु. प्रतिथाळी प्रमाणे लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. 00000

मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

आयर्विन पूलाला समांतर निर्माण होणाऱ्या नविन पूलामुळे सांगली शहराचे वैभव वाढेल, दळणवळण सुरळीत होईल - पालकमंत्री जयंत पाटील

- राम मंदिर ते गांधी चौक मिरज रस्त्याचे लवकरच सहापदरीकरण व सुशोभिकरण करण्यात येणार - सांगली सिव्हील हॉस्पीटल मध्ये नविन 100 खाटांची दोन रूग्णालये व मिरज येथे 100 खाटांचे एक रूग्णालय, कुपवाड येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल होणार. - महापालिका क्षेत्रात अत्याधुनिक उत्तम व चांगल्या दर्जाचे सोलर सिस्टीम असलेले नाट्यगृह उभारण्यासाठी प्रयत्नशील सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : सांगली शहराचा वाढता विस्तार, शहरीकरण, वाढती वाहतूक तसेच आपत्ती काळात शहराशी तुटणारा संपर्क, तसेच आयर्विन पूलाला 90 वर्षे पूर्ण झाली आहेत. गेली चार वर्षे या पुलावरून अवजड वाहनांना येण्याजाण्यास बंदी करण्यात आली आहे. यासाठी शहराला जोडणाऱ्या नवीन पुलाची अत्यंत आवश्यकता होती. त्यामुळेच 25 कोटी रूपये खर्चून कृष्णा नदीवर आयर्विन पूलाला समांतर नविन पूलाची उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे शहराचे बहुतांश प्रश्न सुटून आपत्ती काळातही शहराला तातडीने मदत होईल. त्याचबरोबर सांगली शहराचे वैभव वाढेल, दळणवळण सुरळीत होईल, असा विश्वास जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. सांगली येथील आयर्विन पूलाला लागून समांतर पूल उभारण्याच्या कामाचे भूमिपुजन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय बजाज, कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, सहाय्यक कार्यकारी अभियंता ए. एस. नलवडे, स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, समाज कल्याण सभापती सुब्राव मद्रासी, नगरसेवक भारती निगडे, उर्मिला बेलवलकर, धीरज सुर्यवंशी, शेखर माने आदि उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगलीच्या सेवेसाठी गेली 90 वर्षे कार्यरत असणारा आयर्विन पूल हा बांधकाम क्षेत्राचा उत्कृष्ट नमुना असून या पुलाच्या बांधकामाचे स्वरूप अत्यंत उच्च दर्जाचे आहे. या पूलाचे बांधकाम करणारे कॉन्ट्रॅक्टर, डिझाईन तयार करणारे डिझायनर, या पुलासाठी ज्यांनी आपले योगदान दिले त्या सर्व व्यक्तींची नावे, पुलाच्या खर्चासह फलकावर देण्यात आली आहेत. त्याचबरोबर या पुलाचे आयुष्य निर्धारीत करण्यात आले. त्याचप्रमाणे नविन होणारा पूल हा दर्जेदार व देखणा त्याचबरोबर शहराच्या वैभवात भर घालणारा व्हावा. पूलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आयर्विन पूलाप्रमाणेच या नविन पूलावर सर्व परिपूर्ण माहितीचा फलक लावण्यात यावा, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले, सांगली शहराच्या विकासासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल. राज्य शासनाने महापालिकेसाठी 100 कोटी इतका निधी मंजूर केला आहेत. त्यातील 20 कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. उर्वरीत निधीही तातडीने देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील. सांगली येथील राम मंदिर चौक ते मिरज शहरातील गांधी चौक रस्ता सध्या चौपदरी असून त्याचे लवकरच सहापदरीकरण करण्यात येणार असल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली सिव्हीलमध्ये 100 खाटांची दोन रूग्णालये व मिरज सिव्हीलमध्ये 100 खाटाचे एक रूग्णालय मंजूर झाले असून ते ही तातडीने उभे करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. यामुळे सांगली सिव्हील मध्ये 800 ते 900 बेड्स उपलब्ध होतील. त्याचबरोबर कुपवाड येथेही मल्टी स्पेशालिटी रूग्णालय उभे करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. तसेच कुपवाड शहराची ड्रेनेज योजनाही तातडीने मार्गी लावण्यात येईल. सांगली ही नाट्यपंढरी म्हणून ओळखली जाते त्यामुळे सांगलीत उत्तम व चांगल्या दर्जाचे नाट्यगृह उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा. यासाठी महापालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी. नाट्यगृहाचा सर्वात मोठा खर्च हा वीज बिलाचा असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी या नाट्यगृहावर सोलर सिस्टीम बसविण्याबाबतही विचार करण्यात येईल. आपत्तीच्या काळात सांगली शहराचा पेठ, इस्लामपूर, आष्टा तसेच नजिकच्या नदीकाठच्या गावांशी संपर्क तुटतो. हा संपर्क कायम राहण्यासाठी पेठ ते सांगली हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडे वर्ग करण्यात आला असून या रस्त्याचेही काम लवकरच सुरू होवून तो ही दर्जेदार निर्माण होईल, असे ते म्हणाले. यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार सुधीर गाडगीळ यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात कार्यकारी अभियंता संतोष रोकडे म्हणाले, आयर्विन पूलाला समांतर पूलासाठी 25 कोटी रूपये मंजूर करण्यात आले असून हा पूल 132 मीटर लांबीचा असून 12 मीटर रूंदीचा आहे. या पुलामध्ये 5 पीअर उभारण्यात येणार आहेत. सांगलीवाडीच्या बाजूस 112 मीटर व सांगलीच्या बाजूस 110 मीटर जोडरस्ते करण्यात येणार आहेत. सदरचा पूल दोन वर्षात पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय बजाज यांनी मानले. प्रारंभी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते सांगलीवाडी येथे ‍ नविन पूलाच्या कामाचे ‍ भूमिपूजन करण्यात आले. तर सांगली येथील टिळक चौकात कोनशिला अनावरण करण्यात आले. 00000

सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री जयंत पाटील

- पोलीस दलाची गतीमानता वाढविण्यासाठी 35 बोलेरो व 61 मोटर सायकल देण्याचे नियोजन - आटपाडी येथे नविन पोलीस स्टेशन इमारत उभारणार सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : पोलीस दलाचे कामकाजाचे स्वरूप विस्तारत असून त्यासाठी आधुनिक यंत्रणा, सुसज्ज कार्यालय अत्याधुनिक साधन सामुग्री असणे ही काळाची गरज झाली आहे. सांगली पोलीस दलालाही कामकाजासाठी क्षेत्र कमी पडत असल्याने नविन इमारत असणे ही आवश्यक बाब झाली होती. त्यासाठीच नविन पोलीस अधिक्षक कार्यालय निर्माण करण्यात येणार असून पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. नविन पोलीस अधिक्षक कार्यालयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते विश्रामबाग पोलीस मुख्यालय सांगली येथे संपन्न झाले. यावेळी गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई, कृषि व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार सर्वश्री अरूण लाड, सुधीर गाडगीळ, डॉ. सुरेश खाडे, सुमनताई पाटील, अनिल बाबर, विक्रम सावंत, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले आदि उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, पोलीस दल सक्षम करण्यासाठी भर देण्यात येत असून पोलीस दलाची विश्रामबाग येथील 216 शासकीय पोलिस निवासस्थाने व आटपाडी येथील नविन पोलीस स्टेशन उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच पोलीस क्वाटर्स दुरूस्तीसाठी 1 कोटी 90 लाख इतका निधी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीमधून पोलीस दलाची गतीमानता वाढविण्यासाठी 35 बोलेरो व 61 मोटर सायकल देण्याचेही नियोजन करण्यात आले असून त्यासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. नुतन पोलीस अधिक्षक कार्यालय उभारणीसाठी सुमारे 20 कोटीचा निधी देण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास वाढीव निधीही देण्यात येणार आहे. नुतन इमारत उभारणी करताना सदरची इमारत ही मेन्टेनन्स फ्री उभारण्यावर भर द्यावा. ही इमारत सर्व सोयीसुविधेने उभारण्यात येणार असल्याने या ठिकाणाहून चांगल्या प्रकारे कारभार होवून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, पोलीस दलानेही जनतेला तातडीने सेवा देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. अडचणीत असलेल्या व्यक्तीकडून अथवा कुटुंबाकडून मदतीसाठी कॉल आल्यानंतर अगदी कमीत कमी वेळेत त्या ठिकाणी पोहोचणे ही काळाची गरज झाली आहे. तरच गुन्हेगारी प्रवृत्तीला बहुतांशी आळा बसेल व पोलीस दलाचा वचक निर्माण होईल. पोलीस दलाच्या 112 क्रमांकावर दिली जाणारी सुविधा ही अधिक जलदगतीने झाल्यास पोलीस दलाबद्दल जनतेत विश्वास निर्माण होईल व पोलीसांमध्येही आत्मविश्वास वाढेल, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली पोलीस दलाने राबविलेले उपक्रम हे आता आदर्शवत होत चालले आहेत. यामध्ये प्रामुख्याने चोरीस गेलेला मुद्देमाल अत्यंत कमी कालावधीत संबंधिताला शोध घेवून परत करणे, मृतांच्या वारसांना अनुकंपा भरती प्रक्रिया तातडीने राबविणे तसेच खाजगी कंपन्यांमध्ये पोलीसांच्या पाल्यांना चांगल्या दर्जाची नोकरी मिळवून देणे, एमआयडीसी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी तक्रार पेठीची सुविधा उपलब्ध करून देणे, तक्रार पेठीत प्राप्त झालेल्या सुचनांवर तातडीने अंमलबजावणी करणे तसेच जिल्ह्यातील व शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, महत्वाची ठिकाणे या ठिकाणी सीसीटीव्हीची नजर ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानके आयएसओ मानांकन करण्यात आली आहेत. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी होताना दिसत असून हे सर्व श्रेय सांगली पोलीस दलाचे आहे. त्यामुळे सांगली पोलीस दल प्रशंसनेस पात्र आहे. पोलीस दल सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी अहोरात्र काम करते. तसेच कोरोना काळात कायदा व सुव्यवस्था अत्यंत चांगल्या पध्दतीने राबवून कोरोना फैलावण्यास अटकाव करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या कर्तव्यासाठी बऱ्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यामुळे याच पोलीस दलाप्रती आपल्या सर्वांचे हे कर्तव्य आहे की, त्यानांही आपण सहकार्य करणे तसेच त्यांचे प्रोत्साहन वाढविणे. गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई म्हणाले, पोलीस दलामध्ये नवनविन विभाग सुरू होत असून कामकाजाचे स्वरूपही मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. त्यासाठी यंत्रणा अपुऱ्या पडत आहेत. यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने पोलीस दलाचे आधुनिकीकरण करण्यावर व अधिकच्या नविन सुविधा, इमारती उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी सन 2020-21 च्या अर्थसंकल्पात 450 कोटीची तरतूद करण्यात आली होती. आता यामध्ये वाढ करून ती 800 कोटी पर्यंत वाढविण्यात आली आहे. राज्यात 1 हजार व्यक्तींच्या मागे 1 पोलीस कार्यरत असून पोलीसांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. पोलीस दलाने मुलींना स्वरक्षणार्थ सक्षम करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यावर भर दिला असून त्याची प्राथमिक सुरूवात सातारा पोलीस दलात करण्यात आली आहे. हाच प्रकल्प पुढे राज्यात विस्तारण्याचा शासनाचा मानस आहे. सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, कोरोना सारख्या महाभयंकर महामारीच्या काळात पोलीस दलाने बजावलेले कर्तव्य हे प्रशंसनीय आहे. कोरोना काळात प्राणाची पर्वा न करता स्वत:चा जीव धोक्यात घालून शिस्त लावण्याचे काम चोखपणे बजावले आहे. त्यामुळे पोलीस दल हे यापुढेही याच पध्दतीने कायदा व सुव्यवस्थेचे काम चोखपणे पार पाडेल अशी खात्री असून सांगली जिल्हा पोलीस दलासाठी नविन इमारत आत्मविश्वास वाढविणारी असेल, असे सांगून सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी नविन इमारत उभारताना वाहनांच्या पार्किंगसाठी इमारतीच्या बाजूला सोय न करता इमारतीच्या खाली सोय करण्यात यावी. सदरची इमारत ग्रीन बिल्डींग करण्यावर भर द्यावा. इमारतीवर सोलर सिस्टीम असण्याबरोबरच पोलीस दलातील ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्राणांची आहुती देवून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम केले त्यांची ओळख जिल्ह्याला व्हावी यासाठी या इमारतीमध्ये म्युझियम करण्यात यावे, अशा सूचना केल्या. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी मनोगत व्यक्त केले. आभार अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले यांनी मानले. 00000

कुपवाड वारणाली येथील कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या इमारतीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते भूमिपूजन

- शहराच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील - पालकमंत्र्यांची ग्वाही - कुपवाड शहरासाठी आणखी एका सुसज्ज हॉस्पीटलचे नियोजन सांगली दि. 18 (जि.मा.का.) : सुसज्ज रूग्णालयांची गरज कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर अधोरेखीत झाली आहे. कुपवाड वारणाली येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत उभारण्यात येत असलेल्या कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या रूपाने कुपवाडकरांची अनेक वर्षांची सुसज्ज हॉस्पीटलची प्रतिक्षा पूर्ण होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी या हॉस्पीटलशिवाय कुपवाडला आणखी एक सुसज्ज हॉस्पीटल बामणोली रोड येथे उभारण्यात येणार असून त्यासाठीही पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. सांगली-‍मिरज- कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने कुपवाड वारणाली सर्व्हे नंबर 191/अ 1+2 या जागेवर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत कम्युनिटी हेल्थ सेंटर उभारण्यात येत आहे. या इमारतीचे भूमिपूजन तसेच कोनशिला अनावरण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार अरूण लाड, महानगरपालिका आयुक्त नितीण कापडणीस, उपमहापौर उमेश पाटील, स्थायी सभापती निरंजन आवटी, ‍विरोधी पक्षनेता संजय मेंढे, गटनेता मैनुद्दीन बागवान, माजी आमदार शरद पाटील, विशाल पाटील, जयश्री पाटील, संजय बजाज, संजय विभूते यांच्यासह महानगरपालिकेचे विविध पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.‍ महानगरपालिका आरोग्य सेवा सक्षमीकरणासाठी उत्तम प्रकारे काम करीत असून महानगरपालिकेच्या मध्यावधी आरोग्य केंद्रातून माफक दरात दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यात येत आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल घडणार आहेत, अशा शब्दात महानगरपालिका आरोग्य सुविधेला देत असलेल्या प्राधान्याबद्दल पालकमंत्री जयंत पाटील यांनी कौतुक केले. कुपवाड येथे 5 कोटी रूपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या कम्युनिटी हेल्थ सेंटरची इमारत लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच या हॉस्पीटलसाठी महानगरपालिकेचा ठराव विखंडीत करून हॉस्पीटलला मंजुरी दिल्याबद्दल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून अमृत पाणीपुरवठा योजना जवळपास पूर्ण होत आहे. मिरज ड्रेनेज योजना 93 टक्के तर सांगली ड्रेनेज योजना 75 टक्के पूर्ण झाली आहे. 236 कोटी रूपये खर्चाच्या कुपवाड ड्रेनेज योजनेलाही शासनस्तरावर लवकरात लवकर मान्यता घेवू. सांगलीतील काळ्या खणीचे काम सुरू असून 9 कोटी रूपयाचा वाढीव प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे सादर करण्यात येत आहे. ‍मिरज येथील खण सुशोभीकरणाचे काम लवकरच हाती घेण्यात येईल. पूर, महापूराच्या काळात पाणीपुरवठा योजना बंद पडू नयेत यासाठीची योजना हाती घेण्यात आली आहे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली, मिरज प्रमाणेच कुपवाड शहरात बगीचा विकास कार्यक्रमांतर्गत तीन ठिकाणी बगीचे उभारण्यात येणार आहेत. तसेच स्टेशन चौक, मिरजेतील गांधी चौक ही दोन्ही ठिकाणे अतिशय चांगल्या पध्दतीनी सुशोभित करण्यात येतील. या सर्व कामांसाठी शासनस्तरावरून निधी आणण्यासाठीही प्रयत्नशील असल्याचे ते यावेळी म्हणाले. सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून कुपवाड शहरातील नागरिकांची मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटलची मागणी होती. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हे हॉस्पीटल अत्यंत महत्त्वाचे आहे. कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या मान्यतेमध्ये पालकमंत्री जयंत पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. महानगरपालिकेच्या निधी व्यतिरीक्त या हॉस्पीटलच्या सुसज्जतेसाठी आवश्यक असणारी सर्व ती मदत पालकमंत्री व आपण स्वत: शासनाकडून मिळवून देवू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. खाजगी रूग्णालयांमधील उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या रूग्णालयात सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा ‍मिळावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. महापौर दिग्वीजय सुर्यवंशी यांनी 5 कोटी रूपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या कम्युनिटी हेल्थ सेंटरची इमारत वर्षभरात पूर्ण होईल अशी ग्वाही दिली. कुपवाडकरांसाठी हे हॉस्पीटल अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून या हॉस्पीटलमुळे या क्षेत्राचा भौगोलिक विकास होणार असल्याचे सांगितले. या हॉस्पीटलला मंजूरी ‍दिल्याबद्दल नगरविकास विभाग आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी कुपवाड ड्रेनेज योजना मार्गी लावण्यासंबंधी पालकमंत्री जयंत पाटील यांना विनंती केली. प्रास्ताविकात महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी कुपवाड वारणाली येथील कम्युनिटी हेल्थ सेंटरच्या रूपाने महानगरपालिकेचे पहिले अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटर उभा राहात असल्याचे सांगून कोरोनाच्या लाटेत आरोग्य सेवा ‍किती सक्षम हव्यात याची प्राकर्षाने जाणीव झाली. कोरोना काळात महानगरपालिकेच्या मल्टीस्पेशालिटी हेल्थ सेंटरची गरज अधोरेखीत झाली त्यादृष्टीने सदरचे कम्युनिटी हेल्थ सेंटर महत्त्वाचे ठरेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नगरसेवक विष्णू माने, जयश्री पाटील, संजय विभूते यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले. स्थायी सभापती निरंजन आवटी यांनी आभार मानले. 000000

मंगळवार, १ जून, २०२१

जिल्ह्यातील वारणा धरणात 14.31 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 01, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 14.31 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 29.19 (105.25), धोम 5.27 (13.50), कन्हेर 2.45 (10.10), दूधगंगा 8.07 (25.40), राधानगरी 2.84 (8.36), तुळशी 1.87 (3.47), कासारी 0.72 (2.77), पाटगांव 1.57 (3.72), धोम बलकवडी 0.68 (4.08), उरमोडी 5.85 (9.97), तारळी 3.60 (5.85), अलमट्टी 24.04 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 1050, धोम 726, कण्हेर 700, वारणा 744, दुधगंगा 700, तुळशी 225, पाटगांव 220, धोम बलकवडी 275, तारळी 300 व अलमट्टी धरणातून 541 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 21.5 (45), आयर्विन पूल सांगली 10 (40) व अंकली पूल हरिपूर 4.7 (45.11). 00000

शनिवार, २९ मे, २०२१

गंभीर संसर्ग असणाऱ्या कोरोना रूग्णावर उपचारास नकार दिल्यास कठोर कारवाई - पालकमंत्री जयंत पाटील

सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : कोरोनाचा गंभीर संसर्ग झालेल्या रूग्णास रूग्णालयात बेड शिल्ल्क असतानाही दाखल करून घेतल्या जात नसल्याची तक्रारी जिल्ह्यातून येत आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना रूग्णाला उपचार नाकारणाऱ्या अथवा टाळाटाळ करणाऱ्या रूग्णालयांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 आढावा बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलिस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपअधिष्ठाता डॉ. प्रदिप दीक्षित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, महानगरपालिका उपायुक्त राहूल रोकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यात जवळपास साडेसहा ते सात हजार कोरोना स्वॅब टेस्टींग करण्यात येत आहे. पॉझिटीव्हीटी रेट टप्प्याटप्प्याने कमी होत असून तो सद्या 17.35 वर आलेला आहे. होम आयसोलेशनमध्ये सुमारे 8 हजार 500 तर कम्युनिटी आयसोलेशनमध्ये 1 हजार 650 रूग्ण आहेत. लॉकडाऊनचा चांगला परिणाम पॉझिटीव्हीटी रेट कमी होत असल्याच्या माध्यमातून दिसून येत आहे. सर्वांनी संसर्ग टाळण्यासाठी यापुढेही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 4 हजार 320 बेड संख्या असून यामध्ये 861 आयसीयु मधील बेड्सची तर 3 हजार 459 ऑक्सिजनेटेड बेडची संख्या आहे. आयसीयु बेडची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने शासकीय इमारती वापरात आणाव्यात त्यासाठी ऑक्सिजन पुरवठ्यासह सर्व उपचार यंत्रणा सज्ज ठेवावी. आयसीयु मध्ये काम करण्यासाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टर्सना आवश्यकतेनुसार ट्रेनिंग द्या. कोणत्याही स्थितीत रूग्ण दगावू देणार नाही अशी जिद्द त्यांच्यात निर्माण करा. तिसऱ्या लाटेसाठी यंत्रणा आत्तपासूनच सुसज्ज ठेवा. या लाटेचा लहान मुलांना असणारा धोका लक्षात घेवून उपचारासाठी लागणारी औषधे वेळेत खरेदी करून ठेवा. या संदर्भात निर्माण करण्यात आलेल्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्कफोर्सच्या सुचनांनुसार सर्व कार्यवाही करा. कोविड रूग्णांसंबधीची सर्व माहिती पोर्टलवर अद्ययावत ठेवावी. सर्व वॉर्डमध्ये कॅमेरे बसविण्यात यावेत व ते पोर्टलला जोडण्यात यावेत. बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम अधिक सक्षम करा, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील नादुरूस्त व्हेंटीलेटर्स बाबत आढावा घेवून सदरचे व्हेंटीलेटर्स त्वरीत दुरूस्त करून घ्या असे सांगून जिल्ह्यात जे ऑक्सिजन प्लाँट उभारणी प्रक्रियेत आहेत त्यांची कामे गतीने पूर्ण करून घ्या, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. फळ, भाजीपाला व्यापाऱ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल पण कोरोना संसर्गाची ही वेळ अशी आहे की, सर्वांनीच यामध्ये संयमाने सहकार्य करणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या निर्देशास अनुसरून जिल्ह्यातही निर्णय घेतला जाईल, असेही पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी बालरोग तज्ज्ञांच्या टास्कफोर्सच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. तसेच यावेळी त्यांनी महानगरपालिकेने कम्युनिटी आयसोलेशनसाठी यंत्रणा वाढविणे आवश्यक असल्याचे सांगितले. 000000

गाव कोरोना मुक्त करण्यासाठी दक्षता समित्यांनी कडक भूमिका घ्यावी - पालकमंत्री जयंत पाटील

सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गाव कोरोना मुक्त करण्यासाठी ग्राम दक्षता समित्यांनी कडक भूमिका घ्यावी, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. पंचायत समिती पलूस येथे कोविड-19 आढावा बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पंचायत समिती सभापती दिपक मोहिते, कडेगाव उपविभागीय अधिकारी गणेश मरकड, तहसीलदार निवास ढाणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रागिणी पवार, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अधिक पाटील, गटविकास अधिकारी डॉ. स्मीता पाटील यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी व विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने जारी केलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. सौम्य लक्षणे असणाऱ्या ज्या पॉझिटीव्ह रूग्णांना हॉस्पीटलमध्ये ॲडमीट होण्याची गरज भासत नाही, अशा रूग्णांना त्यांच्या घरी सोय असेल तर होम आयसोलेट करावे. ज्यांच्या घरी होम आयसोलेशनची सोय होवू शकत नाही अशा रूग्णांना विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आलेल्या ठिकाणी ठेवावे. कोणत्याही स्थितीत कोरोनाचा प्रसार होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी. दक्षता समित्यांनी याबाबत अधिक सतर्क राहून कामकाज करावे, अशा सूचना करून पलूस तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना चांगल्या प्रकारे राबविण्यात येत असल्याचे ते यावेळी म्हणाले. सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, पॉझिटीव्ह रूग्ण बाहेर फिरू नये यासाठी दक्षता समित्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टींग यावर भर द्यावा. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रूग्णांबाबत कोरोनाची लक्षणे दिसत असणाऱ्या रूग्णांची माहिती तात्काळ प्रशासनास द्यावी. गरजू रूग्णांना बेड्स उपलब्धतेबाबतची माहिती द्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी कडेगाव उपविभागीय अधिकारी गणेश मरकड यांनी पलूस तालुक्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत व करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर सादरीकरण केले. 000000

कोरोना रूग्णांची जास्त संख्या असलेल्या गावात निर्बंधांचे काटेकोरपणे पालन होण्याबाबत पोलिस विभागाने दक्षता घ्यावी - पालकमंत्री जयंत पाटील

सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी ज्या गावात कोरोना बाधित रूग्णांची संख्या जास्त आहे, अशा प्रत्येक गावात प्रशासनाने जारी केलेल्या कडक निर्बंधांचे काटेकोरपणे पालन होण्याबाबत पोलिस विभागाने अधिक सतर्कता बाळगून दक्षता घ्यावी, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले. कडेगाव येथील तहसील कार्यालयात कोविड-19 आढावा बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार मोहनराव कदम, आमदार अरुण लाड, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, कडेगाव उपविभागीय अधिकारी गणेश मरकड, उपविभागीय पोलिस अधिकारी अंकुश इंगळे, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, नगराध्यक्षा संगीता राऊत, मुख्याधिकारी कपिल जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशा चौगुले यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वूमीवर शासन व प्रशासन सर्वोतोपरी काम करीत आहे. नागरिकांनीही कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने जारी केलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी कडेगाव तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांची सद्यस्थिती, उपलब्ध बेड्स, उपचार सुविधा, लसीकरण, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, दक्षता समितीचे कामकाज याबाबत सविस्तर आढावा घेवून कडेगाव तालुक्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना चांगल्या प्रकारे राबविण्यात येत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग, पॉझिटीव्ह रूग्णांचे अलगीकरण यावर भर द्यावा. लसीकरणाचे योग्य नियोजन करावे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घ्यावी. यावेळी तालुकास्तरावर सुरू करण्यात आलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँकेसाठी कडेगाव व्यापारी असोसिएशनतर्फे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन सुपूर्द करण्यात आली. यावेळी कडेगाव उपविभागीय अधिकारी गणेश मरकड यांनी तालुक्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर सादरीकरण केले. 00000

शुक्रवार, २८ मे, २०२१

संभाव्य पूरपरिस्थितीच्या मुकाबल्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने सज्जता ठेवावी - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

संभाव्य पूरपरिस्थितीच्या मुकाबल्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने सज्जता ठेवावी - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी - आरोग्य विभागाने संभाव्य पूरस्थितीत लसीकरण मोहिम थांबू नये यासाठी पर्यायी जागा निश्चित करावी. - जलसंपदा विभागाने कर्नाटकातील अलमट्टी व कोल्हापूर, सातारा येथील धरण व्यवस्थापन यंत्रणांशी समन्वय ठेवावा. - सार्वजनिक बांधकाम विभागाने पुरामुळे पाण्याखाली जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी बॅरीकेटींग, रिफलेक्टर अशी संबंधित साधनसामग्री तयार ठेवावी. सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : हवामान विभागाने 98 ते 103 टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे संभाव्य पूरपरिस्थिती उद्भविल्यास जिल्ह्यात पूर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सर्व संबंधित विभागातील यंत्रणांनी नियंत्रण कक्ष कार्यान्वीत करावेत. तसेच आवश्यक साधनसामग्री सज्ज ठेवावी, असे, निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता मिलींद नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार तसेच प्रांताधिकारी, तहसिलदार व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोना परिस्थितीत सर्व प्रशासन अहोरात्र काम करीत आहे. कोरोना परिस्थितीबरोबरच संभाव्य पूर परिस्थितीही हाताळणे ही अत्यंत महत्वाचे काम आहे. त्यासाठी कोणीही गाफील न राहता सतर्क राहून कामकाज करावे. तालुकास्तरावरील आपत्ती निवारण आराखडे सज्ज ठेवण्यात यावेत. जिल्हा प्रशासनामार्फत पुरविण्यात आलेले साहित्य यांचीही तज्ज्ञांकडून तपासणी करावी. आवश्यकता भासल्यास त्याची तातडीने दुरूस्तीही करून घ्यावी. जिल्ह्यात निश्चित करण्यात आलेल्या 104 पूरबाधित गावातील पूर आराखडे यांचे अवलोकन करून यामध्ये त्रुटी असल्यास त्या दुरूस्तीबाबतची कार्यवाही करावी. आपत्ती बाबतच्या रंगीत तालमी तातडीने घेण्यात याव्यात. बाधीत क्षेत्रात बोट चालविणाऱ्या व्यक्तींना अद्ययावत प्रशिक्षण देण्यात यावे. संबंधित विभागाचे नियंत्रण कक्ष 24 x 7 सुरू राहण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात. तसेच जिल्ह्यातील सर्व पाणी साठवण तलाव याची तपासणी करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पाटबंधारे विभागाने संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी आत्तापासूनच नियोजन करावे. कोयना धरणावर जलसंपदा विभागामार्फत सर्कल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. या संबंधित अधिकाऱ्यांकडे संपर्काची अद्ययावत यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोयना धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग सांगली जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरतो. त्यामुळे कोयना धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग व त्याचा सांगली जिल्ह्यावर होणारा परिणाम याची शास्त्रशुध्द माहिती प्रशासनाला तात्काळ मिळणे अनिवार्य आहे. कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणाच्या व्यवस्थापनाशी सतत संपर्क ठेवावा. तसेच कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील विविध धरणे व सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबद्दल दर दोन तासांनी माहिती देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वीत ठेवा. या काळात धरणातील पाणीसाठा, धरण पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस, धरणातील विसर्ग, नदीतील पुराची पातळी आणि त्यामुळे पाण्याखाली येणारी गावे तसेच भाग याची सविस्तर माहिती पाटबंधारे विभागाने जनतेसाठी वेळोवेळी द्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील सर्व पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण करून घ्यावेत. यापूर्वी पाण्यामुळे जिल्ह्यातील जे रस्ते बंद झाले होते त्याची यादी तातडीने तयार करावी. पूरामुळे पाण्याखाली जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी बॅरीकेटींग, रिफलेक्टर अशी संबंधित साधनसामग्री तयार ठेवावी. त्यामुळे संभाव्य धोके टळतील त्यामुळे जीवित हानीचा धोका टळेल. रस्त्यावर झाडे पडल्यामुळे तसेच रस्ता खचून वाहतूक बंद होणार नाही याबाबतची यंत्र सामग्री सज्ज ठेवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने या काळात पाण्याखाली गेलेले रस्ते, पूल यांची माहिती देवून ज्या पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आलेली आहे त्याची माहिती जनतेला द्यावी. महाराष्ट्र जीवनप्राधिकरण आणि जिल्हा परिषदेची ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणा यांनी पूरग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नियोजन करावे. संभाव्य आपत्तीचा यशस्वी सामना करण्यासाठी साधनसामुग्रीची सज्जता असणे आवश्यक आहे. या अनुषंगाने महसूल विभागाकडील साहित्य सुस्थितीत असल्याबाबत तहसिलदारांनी तर ग्रामपंचायती व महानगरपालिकेकडील साहित्याबाबत संबंधित यंत्रणांनी वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. बीएसएनएलने लँडलाईन, इंटरनेट आणि मोबाईल यंत्रणा सक्षमपणे सुरू रहावी यासाठी आत्ताच आवश्यक ती तजवीज ठेवावी व त्यांची रंगीत तालीम घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रूम, महानगरपालिकेकडील आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रूम पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यासाठी आवश्यक ते नियोजन करावे. महानगरपालिकेनेही वार्डनिहाय आपत्ती व्यवस्थापन दल तयार करावे. बोटी व अन्य आवश्यक सामग्री सज्ज ठेवावी. धोकादायक निवासी व शाळेच्या इमारतीबाबत वेळीच कार्यवाही करावी. तसेच, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून पूरबाधित लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याबाबतही आवश्यक नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, संभाव्य पूरस्थितीत नागरिकांचे स्थलांतर करणे आवश्यक ठरल्यास निवारागृहांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी पूरबाधीत गावांमध्ये जादा निवारागृहांची उपलब्धता ठेवा. अतिवृष्टीच्या काळात जादा दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री होऊ नये यासाठी पुरवठा विभागाने पथके तैनात ठेवावीत. आरोग्य विभागामार्फत कोरोना नियंत्रणासाठी लसीकरणाची मोहिम सुरू असून संभाव्य पूरपरिस्थितीत लसीकरण थांबू नये यासाठी लसीकरण केंद्रे उभारण्यासाठी पर्यायी जागा निश्चित करावी. तसेच कोविड केअर सेंटर, संस्थात्मक अलगीकरण इतर ठिकाणी हलविण्याची आवश्यकता भासल्यास पर्यायी जागा निश्चित करावी, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, आरोग्य विभागाने संभाव्य पूर परिस्थितीत आवश्यक ती आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी. साथीच्या रोगाबाबत सर्तकता बाळगावी. तसेच पूरपरिस्थिती, वादळी वारे, साथीचे रोग, पर्यायी मार्ग, तात्पुरता निवारा, औषध साठा, अन्न-धान्य वितरण, वाहतूक व कायदा सुव्यवस्था, विद्युत पुरवठा, पशुधनाचे लसीकरण व औषधाचा साठा या बाबतीत संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी. तसेच कृषि विभागाने स्वयंचलित हवामान केंद्रे याबाबतची तपासणी करावी व खते, बी-बियाण्यांचे योग्य नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रारंभी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांनी बैठकीची माहिती सांगून संभाव्य पूर परिस्थितीबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. 00000

शुक्रवार, २१ मे, २०२१

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती 1098 क्रमांकावर कळवा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधर

ी जिल्हास्तरावर टास्क फोर्स स्थापन सांगली दि. 21 (जि.मा.का.) : कोविड-19 आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांबाबत विहीत प्रपत्र तयार करून, अशा बालकांची माहिती प्राप्त करून महानगरपालिका आयुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे तातडीने द्यावी. कोविड-19 आजाराकरिता रूग्णालयात दाखल होतेवेळी बालकाचा ताबा कोणाकडे द्यावा ही माहिती रूग्णांकडून भरून घेण्यात यावी. अशा प्रकारच्या मुलांची माहिती बालकांचे शुभचिंतक या दृष्टीने चाईल्ड हेल्पलाईन नंबर 1098 व बाल कल्याण समिती सांगली यांना संपर्क करून कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन होण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कृती दलाची (टास्क फोर्स) बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडिओ कॉन्फरन्सींगव्दारे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विश्वास माने, महानगरपालिका उपायुक्त राहूल रोकडे, बाल कल्याण समिती अध्यक्षा सुचेता मलवाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बी. टी. नागरगोजे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे एस. एच. बेंद्रे आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोविड-19 प्रादुर्भावाच्या काळात बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आले आहे. कोरोनामुळे जीव गमवलेल्या पैकी अनेक व्यक्तींची मुले 18 वर्षाखालील असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशा परिस्थितीत मुलांचे संगोपण व संरक्षण होणे खूप गरजेचे आहे. चाईल्ड हेल्पलाईन 1098 बाबतचा माहिती फलक सर्व रूग्णालयात दर्शनी भागात लावण्यात यावे. कोविड-19 आजाराने पालक गमावलेल्या बालकांना इतर नातेवाईक सांभाळण्यास तयार आहेत किंवा कसे तसेच बालगृहात दाखल करणे आवश्यक आहे किंवा कसे याबाबत जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून योग्य ती कार्यवाही करावी. जिल्ह्यात कार्यरत निरीक्षणगृह / बालगृहांना नियमित भेटी देवून सर्व प्रवेशितांची नियमित वैद्यकीय तपासणी होत आहे का याची माहिती घ्यावी. बालकांच्या आरोग्याबाबत दैनंदिन आढावा घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. कोरोनामुळे मृत झालेल्या पालकांच्या बालकांना मदत करण्यासाठी शासनाने चाईल्ड हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहेत. या नंबरवर बालकांची माहिती वेळेत प्राप्त झाल्यास त्यांची काळजी व संरक्षणासंबंधी पुढील कार्यवाही करणे शक्य होणार आहे. चाईल्ड हेल्पलाईन नंबर 1098 तसेच आयुक्त महिला व बाल विकास विभाग पुणे 8308992222 / 7400015518, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी 0233-2600043, अध्यक्ष बाल कल्याण समिती सांगली 9890837284, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (समन्वयक) 7972214236 / 9552310393 आदि हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे एस. एच. बेंद्रे यानी जिल्हास्तरावर गठीत करण्यात आलेल्या कृती दलाची सविस्तर माहिती दिली. तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्राम बाल संरक्षण समिती मधील अंगणवाडी सेविका यांच्या सहाय्याने बालकांच्या पालकांना संपर्क साधून आवश्यक मदत पुरविण्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. 00000

कृषि उत्पन बाजार समितीमधून किराणा साहित्य विक्री रविवारपासून बंद - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली दि. 21 (जि.मा.का.) : जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दिनांक 19 मे सकाळी 7 वाजल्या पासून 26 मे सकाळी 7 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेशांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमधून दि. 19 ते 22 मे या कालावधीमध्ये सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त किराणा साहित्याचे घाऊक विक्रेते यांच्याकडून फक्त किरकोळ किराणा विक्रेते यांना खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली होती. हे व्यवहार रविवार, दिनांक 23 मे 2021 पासून बंद राहतील, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्‍ट केले आहे. दिनांक 19 ते 26 मे 2021 या कालावधीत किरकोळ किराणा दुकाने, भाजीपाला, बेकरी, फळ विक्रेते यांना सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत ग्राहकांना फक्त घरपोच सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. किरकोळ किराणा विक्रेत्यांना किराणा साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी 19 ते 22 मे 2021 या कालावधीत सकाळी 7 ते 11 या वेळेत कृषि उत्पन्न बाजार समितीमधून या साहित्याच्या घाऊक विक्रेत्यांना फक्त किरकोळ किराणा विक्रेत्यांना माल विक्रीची परवानगी देण्यात आली होती. 00000

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागासाठी पोस्ट विभागाची बँकिंग सुविधा

सांगली दि. 21 (जि.मा.का.) : संचारबंदीमुळे बऱ्याच नागरिकांची बँक खात्यावर पैसे भरणे अथवा काढणे यासारख्या आवश्यक सेवा उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होते. तसेच या व्यवहारांसाठी संबंधित नागरिकाने प्रवास केला अथवा बँकेमध्ये गर्दी केल्यास त्याच्या स्वत:च्या आणि पर्यायाने त्याचे कुटुंब आणि ग्रामस्थ यांना कोरोना प्रसाराचा धोका निर्माण होऊ शकतो. पोस्ट ऑफिसेसची सुविधा बहुतेक सर्व ग्रामीण भागात उपलब्ध आहे. पोस्ट ऑफिसेसच्या विविध सुविधांचा वापर केल्यास बँकांमध्ये होणारी गर्दी कमी होवून कोरोना संसर्ग होण्याचा आणि प्रसाराचा धोका टळेल. नागरिकांनी पोस्ट विभागाच्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांगली आयपीपीबी शाखेचे शाखा व्यवस्थापक यांनी केले आहे. शासकीय मदत निधी उदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, एकदा बँक खात्यावर वर्ग झाल्यास ते काढण्यासाठी बँकामध्ये प्रचंड गर्दी होण्याची संभव निर्माण होतो. जे सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यंत धोकादायक आहे. पोस्ट ऑफिसेसची सुविधा बहुतेक सर्व ग्रामीण भागात उपलब्ध आहे. AEPS या सुविधेचा वापर करुन गावातील नागरिक त्यांच्या इतर बँक खात्यामधील रक्कम काढू शकतात. तसेच डायरेक्ट मनी ट्रान्सफर (DMT) या सेवेचा वापर करुन इतर बँक खात्यावर पैसे भरण्याची सुविधाही पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. AEPS सुविधेमध्ये इतर कोणत्याही बँक खात्यामधून पैसे काढण्याची सुविधा (जिल्हा मध्यवर्ती बँक/स्थानिक सहकारी बँक सोडून) आहे. त्यासाठी बँक खात्याला आधार सीडींग आवश्यक असून एकावेळेस जास्तीत जास्त 10 हजार रुपये काढता येतात. एका दिवसात व्यवहाराची आणि रक्कमेची कमाल मर्यादा बँक नुसार बदलते. या सुविधेसाठी कोणत्याही प्रकारचे जादाचे शुक्ल आकारले जाणार नाहीत. आधार क्रमांक आणि मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे. DMT सुविधेमध्ये इतर कोणत्याही आणि कोणाच्याही बँक खात्यावर पैसे भरता येतात. KYC पुर्ण असेल तर एका वेळेस कमाल 25 हजार आणि KYC पुर्ण नसेल तर एका वेळेस कमाल 5 हजार रूपये भरण्याची सोय आहे. या सेवेसाठी व्यवहार रक्कमेच्या 1 टक्के किंपर 10 रुपये या पैकी जे जास्त आहे ती रक्कम शुल्क म्हणून आकारण्यात येईल. अधिक माहितीसाठी 0233-2324252 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे सांगली आयपीपीबी शाखेचे शाखा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

विविध कृषी पुरस्कारांसाठी 30 जून पर्यंत प्रस्ताव सादर करा - कृषी संचालक विकास पाटील

सांगली दि. 21 (जि.मा.का.) : राज्यात दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात अति उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित विविध पुरस्कार करुन सन्मानित करण्यात येते. तरी सर्व शेतकरी, शेतकरी गट/संस्था यांनी मार्गदर्शक सुचनांचे अधिन राहुन कृषि पुरस्कारासाठीचा आपला परीपूर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयात दिनांक 30 जुन पर्यंत सादर करावा. विविध कृषि पुरस्कारांच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, असे आवाहन कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे चे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध कृषी पुरस्कार सन 2020 करीता मागविण्यात आले आहेत. यावर्षी नवीन शासन निर्णय क्रमांक कृपु-2020/ प्र.क्र12/4अे, मंत्रालय मुंबई-32, दि. 15 फेब्रवारी 2021 अन्वये विविध कृषी पुरस्कारांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे व काही अंशी निकषामध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनिय व नाविन्यपुर्ण कामगिरी करणाऱ्या युवा शेतकऱ्यांसाठी राज्यातील प्रत्येक कृषी विभागातुन एक याप्रमाणे एकुण आठ युवक शेतकऱ्यांना युवा शेतकरी पुरस्कार या वर्षापासून नव्याने देण्यात येणार आहे. कृषि विभागामार्फत देण्यात येणारे पुरस्कार, पुरस्काराची संख्या व पुरस्कार रक्कम अनुक्रमे पुढीलप्रमाणे. (१) डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार - 01 (राज्यातून एक), 75 हजार रूपये. (२) वसंतराव नाईक कृषिभुषण पुरस्कार - 08 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ०८), 50 हजार रूपये. (३) जिजामाता कृषिभुषण पुरस्कार - 08 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ०८), 50 हजार रूपये. (४) कृषिभूषण (सेंद्रिय शेती ) पुरस्कार - 08 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ०८), 50 हजार रूपये. (५) युवा शेतकरी पुरस्कार - 08 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ०८), 30 हजार रूपये. (६) वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार - 08 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ०८), 30 हजार रूपये. (७) उद्यान पंडीत पुरस्कार - 08 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण ०८), 25 हजार रूपये. (८) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार - ४० (सर्वसाधारण गटासाठी प्रति जिल्हा 1 याप्रमाणे ३४ आणि आदिवासी गटासाठी प्रति विभाग 01 याप्रमाणे ०६ असे एकूण 40), 11 हजार रूपये. (९) पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार - 09 (आठ कृषि विभागातून प्रत्येकी 01 अधिकारी/कर्मचारी याप्रमाणे 8 तसेच कृषि आयुक्तालय स्तरावरून एक अधिकारी/कर्मचारी याप्रमाणे एकंदर एकूण 9). अधिक माहितीसाठी गावचे कृषी सहाय्यक / कृषी पर्यवेक्षक / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन आयुक्त (कृषी ) यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे. 00000

अँबुलन्स चालकांनी जादा दराची आकारणी केल्यास अँबुलन्स कंट्रोल रूमकडे तक्रार करा - उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : कोरोना बाधीत रूग्णांना उपचाराकरिता हॉस्पीटल पर्यंत पोहोचवणे व उपचारानंतर बरे झालेले रूग्ण घरी सोडण्याकरीता खाजगी मालकीच्या नोंदणी झालेल्या अँबुलन्स नागरीकांना माफक दरात व वेळेवर मिळाव्यात याकरीता जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथे 12 एप्रिल 2021 पासून अँबुलन्स कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आली आहे. अँबुलन्सचे चालक/मालक यांनी मंजुर भाडे दरापेक्षा जादा दराची आकरणी केल्यास, कंट्रोल रूमकडे 0233-2310555 या दूरध्वनर क्रमांकावर तक्रार दाखल करावी. तक्रारीत रूग्णाचे नाव, अँबुलन्सचा क्रमांक, कोठून कोठे असे प्रवास ठिकाण, प्रवासाचा दिनांक व वेळ इत्यादी नमुद करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी केले आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथे 24 x 7 करीता अँबुलन्स कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली असून त्याचा दुरध्वनी क्रमांक 0233-2310555 आहे. या क्रमांकावर ज्या नागरिकांना खाजगी अँबुलन्सची आवश्यकता आहे, त्यांना संपर्क साधून अँबुलन्सचे बुकिंग करता येईल. अँबुलन्स बुकिंग केल्यानंतर संबंधित वाहन चालक / मालक यांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, सांगली यांनी दि. 7 जुलै 2020 रोजीच्या बैठकीत पुढीलप्रमाणे मंजुर केलेल्या भाडेदराप्रमाणे भाडे अदा करावे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, सांगली यांनी अँबुलन्स करीता मंजुर केलेले भाडेदर पुढीलप्रमाणे आहेत. मारूती व्हॅनसाठी 25 कि. मी. किंवा 2 तासाकरीता भाडेदर 550 रूपये व 25. कि. मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. भाडेदर 11 रूपये. टाटा सुमो / मारूती इको / मॅटेडोर सदृष्य वाहनांसाठी 25 कि. मी. किंवा 2 तासाकरीता भाडेदर 700 रूपये व 25. कि. मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. भाडेदर 14 रूपये. टाटा 407/स्वराज माझदा / टेंपो ट्रॅव्हलर इत्यादी वाहनांसाठी 25 कि. मी. किंवा 2 तासाकरीता भाडेदर 900 रूपये व 25. कि. मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. भाडेदर 18 रूपये. ALS/आय.सी.यु. वातानुकुलीत वाहनांसाठी 25 कि. मी. किंवा 2 तासाकरीता भाडेदर 1200 रूपये व 25. कि. मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. भाडेदर 24 रूपये आहे. 00000

वैद्यकीय व औद्योगिक क्षेत्रात काम करण्यासाठी बेरोजगार उमेदवारांकरिता 27 व 28 मे रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा - सहाय्यक आयुक्त ज. बा. करीम

इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी दि. 25 मे पर्यंत पसंतीक्रम नोंदवावा सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये कोविड-19 साथरोग अत्यंत वेगाने जनमानसात फैलावत असल्याने कोरोना हॉस्पीटल निर्माण होत आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात मनुष्यबळांची कमतरता भासत आहे. या अनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली या कार्यालयाच्या वतीने नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांसाठी विशेषत: वैद्यकीय क्षेत्रामध्ये व औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी दि. 27 व 28 मे 2021 रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केला आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त ज. बा. करीम यांनी दिली. या ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर, नर्स, हाऊस किपींग, फार्मासिस, बेड साईड असीस्टंट, इर्मजन्सी मेडीकल असीस्टंट, इत्यादी पदे भरती करण्यांत येणार आहेत. तसेच औद्योगिक व सेवा क्षेत्रामध्ये सांगली जिल्ह्यातील नामवंत विविध उद्योजकांकडील सी.एन.सी ऑपरेटर, टर्नर, फिटर, वेबसाईट डेव्हलपर, सेल्स असोसिएट, हेल्पर, फायनान्सियल ॲडव्हायझर, सेल्स मॅनेजर, स्पेअरपार्ट, सर्व्हिस, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर,रुरल करिअर एजंट, सिटी करिअर एजंट, पॉईंट आफ सेल, सेल्स ऑफिसर, इत्यादी भरण्यात येणार आहेत. तसेच साखर कारखान्यामध्ये फक्त अनुभवी उमेदवारांसाठी ‍चिफ अकौटंट, ऊस विकास अधिकारी, ॲग्री ओव्हरसिअर, मॅन्यु.केमिस्ट, असि. इंजिनिअर, पर्यावरण अधिकारी, केनयार्ड सुपरवायझर, सुरक्षा अfधकारी, सेफटी ऑफिसर, वर्कशॉप फिटर, इव्हापोरेटर मेट, वॉटरमन, खलाशी, सल्फीटेशन मेट, इत्यादी पदे भरती करण्यात येणार असल्याचे श्री. करीम यांनी सांगितले. हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी आपआपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे Web : https://mahaswayam.gov.in या संकेत स्थळाव्दारे लॉगीन करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदांसाठी आपला पसंतीक्रम व उत्सुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावा. पसंतीक्रम नोंदविताना शक्यतो आपण वास्तव्यास असलेल्या ठिकाणाच्या कंपनीची तसेच आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करावी. पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस अर्लटव्दारे कळविण्यांत येईल. शक्य असेल तेथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यांत येईल. जिल्ह्यातील इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी दिनांक 25 मे 2021 पर्यंत आपआपले पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे. 00000

बुधवार, १९ मे, २०२१

खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी कोविड सदृष्य लक्षणे असणाऱ्या संशयित बाह्यरुग्णांची दैनंदिन माहिती देण्याचे प्रशासनाचे निर्देश

सांगली दि. 19 (जि.मा.का.) : सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही कोरोना साथरोग आजाराची दुसरी लाट फैलावत आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी जिल्हास्तरावरुन विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे येणाऱ्या सर्दी, ताप, श्वासन व फुफ्फुस विषयक आजार व इतर कोविड सदृष्य लक्षणे असणाऱ्या संशयित बाह्यरुग्णांची दैनंदीन माहिती घेण्याचे काम जिल्हा परिषदेतील पाणी व स्वच्छता कक्ष व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागातील क्षेत्रीय कर्मचारी यांच्याकडून घेतले जात आहे. जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय डॉक्टरांनी दैनंदीन व नियमित माहिती https://forms.gle/Ejnqw1JWCvQARV7J7 या लिंकवर भरुन जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. ग्रामीण भागातील खाजगी वैद्यकीय डॉक्टरांकडून गुगल लिंकच्या माध्यमातून बाह्यरुग्णांची माहिती घेतली जात आहे. वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून प्राप्त 1520 खाजगी वैद्यकीय डॉक्टरांपैकी आत्तापर्यंत 600 खाजगी डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या दैंनदिन कोविड सदृष्य, सारी, इन्फुलुजा आजाराची लक्षणे असणाऱ्या बाह्यरुग्णांची माहिती भरण्यास सुरुवात केलेली आहे. प्राप्त झालेल्या बाह्यरुग्णांच्या माहितीच्या आधारे तालुका वैद्यकीय अधिकारी/मेडिकल ऑफिसर यांनी संशयित रुग्णांपर्यत पोहचून रुग्णांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील ज्या खाजगी डॉक्टरांनी जिल्हा प्रशासनास सदर बाह्यरुग्णांची माहिती लपविल्यास अथवा माहिती देण्यास टाळाटाळ केल्यास व संबधित रुग्णास नजिकच्या आरोग्य संस्थेकडे तपासाणी करण्याकरिता संदर्भीत केले नसल्याचे निदर्शनास आल्यास, अशा रुग्णांचा दुर्दैवी मुत्यू झाल्यास संबंधित डॉक्टरांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय साथ रोग अधिनियम 1897 अन्वये कायदेशिर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 00000

कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भेट देवून केली पाहणी

सांगली दि. 19 ( जि.मा.का) : कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथे सुरू करण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथील नुतन होमिओपॅथीक मेडीकल कॉलेज ॲन्ड हॉस्पीटलमध्ये सुरू करण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भेट देवून पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी समिर शिंगटे, तहसिलदार बी. जे. गोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. आर. पाटील, गटविकास अधिकारी रविंद्र कणसे, कवठेमहांकाळ उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक सतिश गडदे, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, नुतन होमिओपॅथीक मेडीकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाजीराव शिंदे, डॉ. संदीप पाटील आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सुरूवातीस या हॉस्पीटलमध्ये 25 ऑक्सिजनेटेड बेड्सची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. येथील डॉक्टरांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हॉस्पीटल चालविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ऑक्सिजन, औषधे आदि आवश्यक साधन सामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी संबंधितांना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, औषधे, आरटीपीसीआर टेस्टींग, जैविक कचरा विल्हेवाट आदिंबाबत सविस्तर माहिती घेतली व हॉस्पीटलमध्ये पुरविण्यात आलेल्या सोयी सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून तालुक्यातील रूग्णस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. भारत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कुची यांच्यावतीने कवठेमहांकाळ तालुक्यातील उपजिल्हा रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील डॉक्टर्स व कर्मचारी तसेच आशा वर्कर्स यांना मोफत पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्हज, ऑक्सिमिटर, फेसशिल्ड आदि कोविड साहित्यांचे वाटप करण्यात येत आहे. भारत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने हॉस्पीटलच्या परिसरात सुरू केलेल्या स्टॉलला जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भेट देवून पाहणी केली व त्यांचे कौतुक केले. 00000

जत येथे सुरू केलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमुळे रूग्णांना मोठे सहाय्य मिळणार - पालकमंत्री जयंत पाटील

सांगली दि. 19 ( जि.मा.का) : जत तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची रूग्णसंख्या वाढत आहे. कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी जतपासून सांगलीचे अंतरही जास्त आहे. अशा संकटाच्या काळात जत येथे 70 ऑक्सिजनयुक्त बेड्सचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू केले आहे. जत तालुक्यासाठी ही अत्यंत चांगली व्यवस्था उपलब्ध केली आहे याचे समाधान आहे. यामुळे जत तालुक्यातील रूग्णांना फार मोठे सहाय्य मिळणार असून रूग्णांचे प्राणही वाचणार आहेत, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह जत येथील 70 ऑक्सिजनयुक्त बेड्सच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण समिती सभापती सुनिता पवार, पंचायत समिती सभापती मनोज जगताप, उपविभागीय अधिकारी जत प्रशांत आवटे, पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, तहसिलदार सचिन पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. इरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बंडगर, गटविकास अधिकारी डी. गुत्तीकर तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, येणाऱ्या काळात कोरोना बाधित रूग्णांची संख्या कमी करण्यासाठी सर्वांनी घरात थांबणे आवश्यक आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या कडक निर्बंधांचे तंतोतंत पालन करावे. कोरोना काळात प्राथमिक आरोग्य केंद्रानींही फार मोठी मदत केली आहे. त्यांचे महत्व कोरोना काळात समजले आहे. आरोग्य सेवेवर भर देणे, जिल्ह्यात आरोग्य सेवा वाढविणे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सद्यस्थितीत ऑक्सिजन जेमतेम उपलब्ध होत असतानाही सर्वांच्या पुढाकाराने जत येथे 70 ऑक्सिजनयुक्त बेड्सचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची पहाणी करून समाधान व्यक्त केले. मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह जत येथील 70 ऑक्सिजनयुक्त बेड्सच्या उद्घाटनंतर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जत येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींची शासकीय निवासी शाळा येथे सुरू असलेल्या डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलला भेट देवून तेथील डॉक्टरांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी डॉ. शरद पवार, डॉ. रोहन मोदी, डॉ. विवेकानंद राऊत, डॉ. सुनिल वनकुंडे आदि उपस्थित होते. 000000

रविवार, १६ मे, २०२१

दहा दिवसात जिल्ह्याला ४२ व्हेंटिलेटर्स व २० बायपॅप मशीन्सचा पुरवठा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली दि. 16 (जि.मा.का.) : कोरोना महामारीचा झपाट्याने वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात घेऊन गरजू रुग्णांना उपचाराची सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. गेल्या दहा दिवसात जिल्ह्यात ४२ व्हेंटिलेटर्स व २० बायपॅप मशीनची उपलब्ध करण्यात आली असून शासकीय रुग्णालयांसह विविध खाजगी रुग्णालयांना यांचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. यातील ३२ व्हेंटिलेटर प्रशासनामार्फत खरेदी करण्यात आले असून यामधील 2 सीएसआर फंडातून खरेदी करण्यात आले आहेत. तर दहा व्हेंटिलेटर्स वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरजसाठी राज्य शासनाकडून उपलब्ध झाले आहेत. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज, भारती हॉस्पिटल मिरज येथे प्रत्येकी तीन, मिरज ग्रुप ऑफ फिजिशियन मिरज यांना 2, सिनर्जी हॉस्पिटल मिरज, सायना कोवीड सेंटर गणेश नगर सांगली यांना प्रत्येकी एक व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहे. जत कोविड हॉस्पिटलला चार, भगवान महावीर कोविड हॉस्पिटल सांगली आणि क्रीडा संकुल मिरजला प्रत्येकी तीन, विवेकानंद हॉस्पिटल बामनोलीला दोन व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय श्वास हॉस्पिटल सांगली, घाडगे हॉस्पिटल सांगली, लाईफ केअर तासगाव, श्री हॉस्पिटल विटा, सद्गुरु हॉस्पिटल विटा, कवठेमहांकाळ कोविड हॉस्पिटल, कोविड हॉस्पिटल पलूस, देशमुख (सत्रे) चारिटेबल आयुर्वेदिक हॉस्पिटल इस्लामपूर , प्रकाश मेमोरियल क्लिनिक इस्लामपूर यांना प्रत्येकी एक व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच आटपाडी ग्रामीण रुग्णालयाला दोन व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज साठी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेले 10 व्हेंटिलेटर मिरज येथे पोहोच झाल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी सांगितले. याशिवाय मिरज चेस्ट हॉस्पिटल मिरजला चार, भारती हॉस्पिटल मिरजला पाच, वेध मल्टीस्पेशालिटी तासगाव, उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर, पलूस ग्रामीण रुग्णालय यांना प्रत्येकी दोन तर वाळवेकर हॉस्पिटल सांगली यांना तीन बायपॅप मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. 00000

शनिवार, १५ मे, २०२१

अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर फिरत असल्याचे आढळून आल्यास 500 रूपये दंड - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

दंडात्मक कारवाईसाठी पोलीस प्रशासनास अधिकार प्रदान सांगली दि. 15 (जि.मा.का.) : जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून करावयाच्या कार्यवाहीबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले आहेत. नाकाबंदी तसेच इतर कारवाईच्यावेळी पोलिसांना कोणी नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय व कारणाशिवाय घराबाहेर फिरत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार पोलीस प्रशासनाला मिळण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुढीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत. कोणतीही व्यक्ती अत्यावश्यक कामाशिवाय व कारणाशिवाय घराबाहेर फिरत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर 500 रूपये इतकी दंडात्मक कारवाई करावी. तसेच त्या व्यक्तींच्या ताब्यातील वाहन संबंधित प्रतिबंधात्मक आदेश लागू असेपर्यंत किंवा केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोविड-19 साथरोग आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी ताब्यात घेण्यात यावे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना प्राधिकृत करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत. 00000

शुक्रवार, १४ मे, २०२१

खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांनी कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्या रूग्णांची माहिती आरोग्य यंत्रणेला देणे आवश्यक - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

संशयीत कोविड रूग्णाबाबतची माहिती लपविल्यास कारवाई सांगली दि. 14 (जि.मा.का.) : सद्यस्थितीत कोविड रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यानुसार सर्दी, ताप व इतर कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्या व्यक्ती खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांच्या बाह्य रूग्ण विभागात उपचाराकरिता येतात. अशा कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्या रूग्णांची माहिती आरोग्य यंत्रणेला देणे आवश्यक आहे. अशा रूग्णांना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे आर.टी.पी.सी.आर. अथवा ॲन्टीजन टेस्ट करण्याकरिता संदर्भित करावे. जेणेकरून कोविड बाधित रूग्णांवर त्वरीत उपचार सुरू करून रूग्णांचा SpO2 मेंनटेन करता येईल व संभाव्य मृत्यू टाळता येतील, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. संशयित कोविड रूग्ण कोविड तपासणी न करता किरकोळ उपचाराकरिता इतरत्र फिरत असल्याने कोविड संसर्गाचा प्रसार वाढत असून अशा रूग्णांना वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. रूग्णांची माहिती आरोग्य यंत्रणेला कळविण्यासाठी गुगल शीट तयार करण्यात आली असून खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांच्या बाह्यरूग्ण विभागात येणाऱ्या व कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्या सर्व रूग्णांची माहिती दैनंदिन https://forms.gle/Ejnqw1JWCvQARV7J7 या गुगल फॉर्म मध्ये भरावी. ॲन्टीजन तपासणी करण्याकामी परवानगी हवी असल्यास जिल्हा प्रशासनाकडे अर्ज करावा. बाह्यरूग्ण विभागात उपचाराकरिता आलेल्या संशयीत कोविड रूग्णाबाबतची माहिती लपविल्यास अथवा रूग्णास नजीकच्या आरोग्य तपासणी करण्याकरिता संदर्भित केले नसल्याचे निदर्शनास आल्यास अथवा अशा रूग्णांचा दुर्देवी मृत्यू झाल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 अन्वये व भारतीय साथरोग अधिनियम 1897 नुसार आणि Section 2(a) (iii) Maharashtra Essential Services Maintenance Act 2005 अन्वये कायदेशीर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ष्ट केले आहे. 00000

सोमवार, ३ मे, २०२१

कोरोना बाधीतांची संख्या जास्त असलेल्या गावात सक्तीने कडक जनता कर्फ्यू पाळा - पालकमंत्री जयंत पाटील

सांगली दि. 3 (जि.मा.का.) : जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या गावात कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे त्या गावात निर्बंध अधिक कडक करून जनता कर्फ्यूचे सक्तीने पालन करावे, अशा सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. जत येथील पंचायत समिती सभागृहात कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रम सावंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी जितेंद्र डुडी, प्रातांधिकारी प्रशांत आवटे, तहसिलदार सचिन पाटील, नगराध्यक्ष शुभांगी बन्नेनवार, पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बंडगर, गट विकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर आदि उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, विनाकारण बाहेर फिरताना आढळल्यास रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट करा. आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स यांना दमदाटी केल्यास शासकीय कामात अडथळा या अनुषंगाने कडक कारवाई करा. हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्यांनाही होम आयसोलेशन करा. तसेच सौम्य लक्षणे जाणवणाऱ्यांनीही होम आयसोलेशन व्हावे. चेक पोस्टच्या ठिकाणी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात बंदोबस्त कडक करावा. प्राथमिक आरोग्य केंद्रांना जास्तीचे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. ॲम्बुलन्स सेवा सुरळीत ठेवावी. व्हेंटीलेटर तातडीने उपलब्ध करून घ्यावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. खाजगी रूग्णालंयानी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच बील आकारणी करावी, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जी खाजगी रूग्णालये कोरोना रूग्णांकडून डिपॉझीट मागणी करत असतील त्यांचे ऑडीट करावे. औषधांचा पुरवठा पुरेसा प्रमाणात करावा. जिल्ह्यासाठी ऑक्सिजनचा कोटा 23 वरून 35 टन करण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्सिजन उपलब्ध करून देवू. देशात 60 रेमडीसीवीअर उत्पादक असून लोकसंख्येच्या प्रमाणात पुरवठा व्हावा, अशी केंद्राकडे मागणी केली आहे. रेमडेसीवीअरचा पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यात लसीकरण मोहिम चांगली राबविण्यात येत असून लसीकरणात सांगली जिल्हा सर्वात पुढे आहे. 18 ते 45 वयोगटातील तरूण वर्गाला मोफत लस देणार असून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करावे. जत तालुका आकाराने मोठा असून प्राथमिक आरोग्य केंद्रे सज्ज करावी. माडग्याळ येथे हॉस्पीटल सुरू करण्याची तातडीने कार्यवाही करावी. सांगली मुख्यालयापासून अंतर जास्त असल्याने रूग्णांना उपचार येथेच उपलब्ध करावा. जत तालुक्यात 63 गावे आहेत. ज्या गावात 15 पेक्षा जास्त रूग्ण आहेत त्या गावातील निर्बंध अधिक कडक करावेत. सक्तीने जनता कर्फ्यू लागू करा. कोरोना बाधित रूग्णांना शिक्के मारा व त्यांची यादी ग्रामपंचायतींच्या बोर्डावर प्रसिध्द करावी. कोरोना बाधित रूग्ण बाहेर फिरताना आढळल्यास त्यांना विविध शाळांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत त्या ठिकाणी पाठवावे. गावातील शाळा निश्चित करून बाधितांना शाळेत ठेवावे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जे निर्बंध घातले आहेत त्याला नागरिकांनी सहकार्य करावे. निर्बंधांचे कठोर पालन होण्यासाठी पोलीसानींही गस्त वाढवावी. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली असेल त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी, असे आवाहनही शेवटी त्यांनी केले. तत्पूर्वी पालकमंत्री जयंत पाटील यांनी डफळापूर येथील कोविड केअर सेंटरचे उदघाटन करून तेथे असणाऱ्या विविध सोयी सुविधांची पहाणी केली. यावेळी त्यांनी रूग्णांना चांगल्या सुविधा देण्याची सूचना करून रूग्णांची योग्य ती काळजी घ्यावी असे सांगितले 000000

सिव्हील हॉस्पीटल सांगली येथील टेलीमेडीसीन कक्षाची जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली पहाणी

गरजू रूग्णांना उपचाराबातच्या सल्ल्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन सांगली दि. 3 (जि.मा.का.) : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना पॉझीटीव्ह व सौम्य लक्षणे असणारे बरेच रूग्ण होम आयसोलेशनमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहेत. अशा रूग्णांच्या व इतर रूग्णांच्या उपचाराबाबतच्या सल्ल्यासाठी सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे टेलीमेडीसीन कक्ष सुरू करण्यात आला आहे. तरी रूग्णांना काही शंका असल्यास, त्रास होत असल्यास त्यांनी उपचाराबाबतच्या सल्ल्यासाठी टेलीमेडीसीन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे सुरू करण्यात आलेल्या टेलीमेडीसीन कक्षाला भेट देवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पहाणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्ष्क डॉ. नंदकिशोर गायकवाड, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश आष्टेकर, प्रशासकीय अधिकारी मनोज धाबाडे, डॉ. मनोज पवार आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी टेलीमेडीसीन कक्षातील सोयी सुविधांची पहाणी करून या कक्षात नेमणूक करण्यात आलेल्यांना उपचाराबाबतच्या सल्ल्यासाठी आवश्यक ट्रेनींग द्यावे. कॉलची संख्या वाढल्यास त्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना दिल्या. टेलीमेडीसीन सुविधा सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या वेळेत उपलब्ध राहील. यासाठी 0233-2621400 व 0233-2621700 या दूरध्वनी क्रमांकावर गरजू रूग्णांनी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे उभारण्यात येत असलेल्या लिक्वीड ऑक्सिजन प्लाँटची पहाणी करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. 00000

शनिवार, २४ एप्रिल, २०२१

ऑक्सिजन तुटवड्यावर मात करण्यासाठी जिल्ह्यात ऑक्सिजन प्लँटस उभे करण्यावर भर - पालकमंत्री जयंत पाटील

सांगली दि. 24 (जि.मा.का.) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रूग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असल्यामुळे रूग्णांना बेड्स, ऑक्सिजन व रेमडेसिवीअर औषधाची कमतरता भासत आहे. यावर उपाययोजना म्हणून प्रशासनामार्फत बेड्सची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. बेड्स जरी उपलब्ध झाले तरी रूग्णांना ऑक्सिजन मिळणे हे महत्वाचे आहे. ऑक्सिजन पुरविण्यासाठी जिल्ह्यात ऑक्सिजन उत्पादन प्लँटस् उभे करता येतील का याबाबत जिल्हा प्रशासनाने भर द्यावा. याबरोबरच ऑक्सिजन बाहेरून आणण्यासाठी टँकर्स उपलब्ध करण्याबाबतची कार्यवाही तातडीने सुरू करा, अशा सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार अरूण लाड, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे आदि उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यात कोरोना बाधित उपचाराखाली असणाऱ्या रूग्णांची संख्या 10 हजाराहून अधिक झाली आहे. यामध्ये दररोज नवीन एक हजारहून अधिक रूग्णांची भर पडत आहे. परिस्थिती चिंताजनक आहे त्यामुळे सर्व यंत्रणा सज्ज करा. कोरोना बाधितांच्या उपचारासाठी जास्तीत जास्त रूग्णालयात व्यवस्था करण्याचा प्रयत्न प्रशासनाने करावा. काही दिवसांनंतर बेड्स अपुरे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेड्स मध्ये वाढ करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात आयुक्तांनी, ग्रामीण भागात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी व्यवस्था करावी. यासाठी जिल्हाधिकारी यांनी समन्वय साधावा, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सर्वात मोठी अडचण ऑक्सिजनची असून गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा प्रयत्नपूर्वक सुरळीत ठेवण्यास यश आले आहे. परंतु जशी कोरोना बाधितांची संख्या वाढेल तसा पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करण्याबाबत ताण वाढण्याची शक्यता आहे. रेमडेसिवीरचा पुरवठा केंद्र शासनाच्या हातात गेलेला असल्यामुळे व सर्व उत्पादकांवर केंद्र शासनाचे नियंत्रण असल्यामुळे तेथून महाराष्ट्राला जो रेमडेसिवीरचा पुरवठा होत आहे त्यातील काही भाग आपल्या जिल्ह्याला येत आहे व तो अपुरा पडत आहे. त्यामुळे केंद्र शासनाकडून रेमडेसिवीरचा महाराष्ट्राला अधिक पुरवठा व्हावा यासाठी राज्यस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. सध्या जिल्हाला प्राप्त होणारा ऑक्सिजन रूग्णालयांनी आवश्यकतेनुसारच वापर करावा. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून याचे ऑडिट करण्यात यावे. सद्यस्थितीत जे बेड्स उपलब्ध आहेत ते कदाचीत पुढील चार – पाच दिवसात संपण्याची शक्यता आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यात व महानगरपालिका क्षेत्रात आणखी बेड्स वाढविण्याचा प्रयत्न सुरू करा. बेड्स वाढविले की ऑक्सिजनही वाढवावा लागतो. त्या दृष्टीने सतर्क राहून जिल्हा प्रशासनाने सर्वोतोपरी प्रयत्न करावेत. कोरोना लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी पॉझीटीव्ह आलेल्या रूग्णांच्या ठिकाणांना प्रसंगानुरूप कंटेनमेंट झोनमध्ये परावर्तीत करावे. या ठिकाणच्या व्यक्ती बाहेर पडू नयेत याबाबत कडक बंदोबस्त करण्यात यावा. ग्रामस्तरावर ग्रामपंचायतींनी ग्रामसमित्या सक्रीय कराव्यात. प्रसंगी कठोर निर्णय घेवून कोरोनाचा फैलाव होणार नाही याबाबत उपाययोजना कराव्यात. यासाठी लागणारी मदत जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात यावी, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील यांनी 18 वर्षावरील सर्वांनाच आता कोरोना लसीकरण करण्यात येणार असल्याने लसीकरणाच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने याबाबतचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना यावेळी दिल्या. कोरोना बाधितांची संख्या कमी करावयाची असेल तर लोकांनी घरात राहून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी ग्रामसमित्या सक्रीय करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रामधील नर्सेस, आशा वर्कर्स यांना थर्मल गन, ऑक्सिमीटर यासारख्या ज्या आरोग्य विषयक सामुग्री पुरविण्यात आल्या आहेत याबाबतची तपासणी करून त्या कार्यरत आहेत किंवा कसे याबाबत प्राथम्याने जाणून घेणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी या साधनसामग्री नादुरूस्त असतील त्या ठिकाणी त्या तातडीने दुरूस्त करून देण्याची कार्यवाही प्रशासनाने करावी. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या व्यक्ती बाहेर फिरणार नाहीत याबाबतची कडक अंमलबजावणी पोलीस प्रशासनाकडून करण्यात यावी. कोरोना रूग्णालये कार्यान्वीत आहेत अशा रूग्णालयातील ऑक्सिजन व व्हेंटीलेटर, फायर यंत्रणा याची तातडीने तपासणी झाल्यास संभाव्य अपघात घडणार नाहीत, असे सांगून राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, लसीकरण हे प्रत्येक गावात पोहोचवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. ज्या गावांमध्ये अद्यापही लसीकरण पोहोचले नाही अशा गावांमध्ये लसीकरण करण्याबाबत प्रशासनाने करावी. रेमडेसिवीअर औषध हे उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासनाने दैनंदिन पाठपुरावा करावा, असे आदेश दिले. मिरज येथील महानगरपालिकेने उभारलेल्या कोविड रूग्णालयाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मिरज शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज मिरज येथे महानगरपालिकेने उभारलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार डॉ. सुरेश खाडे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस आदि उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, महानगरपालिकेने मिरज शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज मिरज येथे कोरोना बाधितांवर उपचारासाठी 132 ऑक्सिजनेटेड बेड्सची व्यवस्था केली आहे. त्यामुळे फार मोठी मदत सांगली जिल्ह्यातील तसेच महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्येला झाली आहे. या ठिकाणी 200 बेड्स पर्यंतची वाढ होवू शकते अशी व्यवस्था महानगरपालिकेने निर्माण केली आहे. पुढच्या 15 ते 20 दिवसात जर रूग्णांची संख्या वाढली तर त्या रूग्ण संख्येला कुठे ठेवायचे हा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनेटेड बेड्स वाढविण्याचे काम सुरू असून यामध्ये आणखी वाढ करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. पॉझिटीव्ह आहे परंतु घरी रहायला जागा नाही अशा रूग्णांसाठीही येथे महापालिकेने सोय केली आहे. या ठिकाणी महानगरपालिकेने सर्व खानपानाची चांगली सोय उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 000000

शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

कोव्हिड' काळातील मानसिक आरोग्य जपण्यासाठी ' विश्वास ' हेल्पलाईन.. जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम

कोव्हिड' काळातील मानसिक आरोग्य जपण्यासाठी ' विश्वास ' हेल्पलाईन.. जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम तज्ञ संस्था म्हणून 'शुश्रुषा'संस्था विविध उपक्रम राबविणार सांगली,दि.24,(जि.मा.का): राज्यासह सांगली जिल्ह्यात वेगाने पसरणाऱ्या कोरोना आपत्तीमुळे भयग्रस्त होऊ नये. लॉकडाऊनमुळे येणारा आर्थिक ताण, भविष्याविषयी काळजी, आजाराविषयीची वाढती भीती, समज-गैरसमज यामुळे लोकामध्ये मानसीक आजारपण वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय यांच्यावतीने विश्वास.. कोरोना सोबत जगण्याचा..! हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे , अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. कोव्हीड आपत्तीचा दुष्परिणाम शरीरा इतकाच माणसांच्या मनावरही होत आहे. त्यामुळे अनेकदा व्यसनाधीनता, कौटुंबिक वाद-विवाद याबरोबरच कोव्हिडपश्चात रुग्णामध्ये आत्महत्येचे विचार येऊ नयेत व सामान्य नागरिकांच्या मनातील कोव्हीडविषयी अकारण भीती कमी व्हावी या हेतूने जिल्हा प्रशासनाच्यावतीने ' हा अभिनव उपक्रम हाती घेवून मानसशास्त्रीय हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. या उपक्रमाचा फायदा प्रत्येक कोव्हिड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना होईल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला. ही योजना सामान्य माणसाला आधार देणारी असल्याने प्रशासनास सर्व घटकांनी मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. जिल्हाधकारी डॉ. अभिजित चौधरी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या विश्वास कोरोना सोबत जगण्याचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी तज्ञ संस्था म्हणून इस्लामपूर येथील शुश्रुषा सल्ला, मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्था कार्य करणार आहे. शुश्रुषा संस्थेचे अध्यक्ष व मानस तज्ञ कालिदास पाटील म्हणाले, सध्याच्या वास्तव परिस्थितीला सामोरे जाता न येणाऱ्या अनेक व्यक्तींना आत्महत्येपासून वाचविण्यासाठी व कोरोना सोबत भीतीमुक्त जगण्यासाठी शुश्रुषाच्या मानसतज्ञांची टीम कार्यरत राहणार आहे. 9422627571 हा योजनेचा मनोमित्र हेल्पलाईन नंबर असून या योजनेअंतर्गत रुग्णांचे चिंता, उदासीनता, ताण तणाव अशा विविध मानसीक त्रासांचे निदान करून तज्ञांकरवी मोफत समुपदेशन सेवा देण्यात येणार आहे,सोशल मीडिया द्वारे प्रबोधन, तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. 00000

शुक्रवार, १६ एप्रिल, २०२१

नागरिकांच्या सुविधेसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात अँबुलन्स कंट्रोल रूम कार्यान्वित

सांगली, दि. १६, (जि. मा. का.) : कोरोना बाधीत रूग्णांना उपचाराकरिता हॉस्पीटल पर्यंत पोहोचवणे व उपचारानंतर बरे झालेले रूग्ण घरी सोडण्याकरीता खाजगी मालकीच्या नोंदणी झालेल्या अँबुलन्स नागरीकांना माफक दरात व वेळेवर मिळाव्यात याकरीता जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथे अँबुलन्स कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आली आहे. कंट्रोल रूम कडून नागरिकांना मदत, सुविधा व माहिती पुरवण्यात येतील. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली येथे 24 x 7 करीता अँबुलन्स कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली असून त्याचा दुरध्वनी क्रमांक 0233-2310555 आहे. या क्रमांकावर ज्या नागरिकांना खाजगी अँबुलन्सची आवश्यकता आहे, त्यांना संपर्क साधून अँबुलन्सचे बुकिंग करता येईल. अँबुलन्स बुकिंग केल्यानंतर संबंधित नागरिकांना अँबुलन्स क्रमांक, चालकाचे नाव व मोबाईल क्रमांक पुरवला जाईल. जिल्ह्यातील खाजगी हॉस्पीटलचे डॉक्टर्स यानांही कंट्रोल रूम मार्फत अँबुलन्स बुकिंग करता येईल. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, सांगली यांनी दि. 7 जुलै 2020 रोजीच्या बैठकीत खालीलप्रमाणे मंजुर केलेल्या भाडेदराप्रमाणे भाडे अदा करता येईल. अँबुलन्सचे चालक/मालक यांनी मंजुर भाडे दरापेक्षा जादा दराची आकरणी केल्यास, कंट्रोल रूमकडे तक्रार दाखल करता येईल. तक्रारीत रूग्णाचे नाव, अँबुलन्सचा क्रमांक, कोठून कोठे असे प्रवास ठिकाण, प्रवासाचा दिनांक व वेळ इत्यादी नमुद करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी केले आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, सांगली यांनी अँबुलन्स करीता मंजुर केलेले भाडेदर पुढीलप्रमाणे आहेत. मारूती व्हॅनसाठी 25 कि. मी. किंवा 2 तासाकरीता भाडेदर 550 रूपये व 25. कि. मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. भाडेदर 11 रूपये. टाटा सुमो / मारूती इको / मॅटेडोर सदृष्य वाहनांसाठी 25 कि. मी. किंवा 2 तासाकरीता भाडेदर 700 रूपये व 25. कि. मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. भाडेदर 14 रूपये. टाटा 407/स्वराज माझदा / टेंपो ट्रॅव्हलर इत्यादी वाहनांसाठी 25 कि. मी. किंवा 2 तासाकरीता भाडेदर 900 रूपये व 25. कि. मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. भाडेदर 18 रूपये. ALS/आय.सी.यु. वातानुकुलीत वाहनांसाठी 25 कि. मी. किंवा 2 तासाकरीता भाडेदर 1200 रूपये व 25. कि. मी. पेक्षा जास्त वापरासाठी प्रति कि.मी. भाडेदर 24 रूपये आहे. 00000

शासकीय दरानुसारच एचआरसीटी चेस्ट तपासणीचे दर आकारणी करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली दि. 16 (जि.मा.का.) : कोविडच्या पार्श्वभूमीवर एचआरसीटी चेस्ट तपासणी दरावर नियंत्रण रहावे यासाठी राज्य शासनाने एचआरसीटी चेस्ट तपासणीचे दर निश्चित केले आहेत. शासकीय दरानुसारच डायग्नोस्टीक सेंटर्सनी दर आकारणी करावी, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात रेडिओलॉजीस्ट यांच्या समवेत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, डायग्नोस्टीक सेंटर्सचे रेडिओलॉजीस्ट उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोविड रूग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिक विविध तपासण्या करण्यासाठी डायग्नोस्टीक सेंटर्सवर येत आहेत. यावेळी प्रामुख्याने एचआरसीटी चेस्ट तपासणी करण्यात येते. अशावेळी कोरोना पॉझीटीव्ह असल्याचे निष्पन्न होते. यावेळी डायग्नोस्टीक सेंटर्स प्रशासनाने तातडीने आरोग्य विभागाला कळविणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून ई-मेल आयडी उपलब्ध करून दिला आहे. त्यावर संबंधित माहिती तातडीने सादर करावी. कोरोना पॉझीटीव्ह येणाऱ्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसींगच्या दृष्टीकोनातून सविस्तर माहिती प्रशासनास सादर करावी. प्रामुख्याने कोरोना बाधितांचा मोबाईल क्रमांक देण्यात यावा. त्याचबरोबर संबंधित रूग्णांच्या नातेवाईकांना कोरोनाची चाचणी घेण्याबाबत तातडीने मार्गदर्शन करावे, असे सांगून डायग्नोस्टीक सेंटर्सनी चाचण्याबाबतचे दर दर्शनी भागात लावावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 00000

कोविड रूग्णांसाठी बेड्स उपलब्धतेची माहिती एका क्लिकवर - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली दि. 16 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यातील कोविड हॉस्पीटलमधील बेड्स उपलब्धतेची माहिती मिळण्यासाठी बेड इन्फॉर्मेशन ॲप विकसीत करण्यात आले आहे. बेड्स उपलब्धतेची सद्यस्थिती पाहण्यासाठी http://smkc.gov.in/Covid19mgt/CovidBedInfo.aspx या लिंकवर क्लिक करावे. तसेच 0233-2374900 किंवा 0233-2375900 या नंबरवर देखील फोन करून कोविड रूग्णालयातील बेड्स उपलब्धतेबाबतची माहिती मिळू शकते. या सुविधेचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. 00000

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदारांना मतदानासाठी प्रवास करण्यास मुभा

सांगली दि. 16 (जि.मा.का.) : 252-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीच्या अनुषंगाने दि. 17 एप्रिल 2021 रोजी पार पडणाऱ्या मतदानासाठी मतदारसंघाच्या बाहेर राज्यात किंवा राज्याबाहेर असणाऱ्या मतदारांना सदर मतदारसंघात मतदान करण्यासाठी प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. यासाठी दि. 16 एप्रिल 2021 रोजीचे सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 18 एप्रिल 2021 रोजीचे दुपारी 12 वाजेपर्यंत पासून / पर्यंत प्रवास करण्यासाठी संबंधिताकडे सोबत छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र किंवा सदर मतदारसंघात त्याचे मतदार यादीत नाव असलेला पुरावा असणे आवश्यक आहे. तसेच ब्रेक दि चेन ऑर्डरमध्ये प्रवासा संदर्भात नमूद केलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, अशा सूचना महाराष्ट्र शासनाने दि. 15 एप्रिल 2021 रोजीच्या पत्रान्वये दिल्या आहेत. 00000

रविवार, ११ एप्रिल, २०२१

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शिस्त पाळून, गर्दी टाळून घरीच राहून प्रतिकात्मक साजरी करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करा सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : कोरोनाच्या अभूतपूर्व महामारीला रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या ब्रेक द चेनच्या निर्बंधाचे पालन करून भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रतिकात्मक पध्दतीने, साधेपणाने साजरी करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती आनंदात साजरी व्हावी. पण कोरोनाची दुसरी लाट अत्यंत गंभीर स्वरूप धारण करत असून कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोरोनाची साखळी तोडणे आवश्यक असून दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येवू नये यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्रीचे 8 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे. तसेच शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान अत्यंत महत्वपूर्ण असून वंचित घटकांच्या उत्थानासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आहे. या महामानवाच्या विचारांचे, चरित्राचे स्मरण करत असताना आपण सर्वांनीच गर्दी टाळून नियम पाळून शिस्तीचे दर्शन घडवूया, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. दरवर्षी 14 एप्रिल या दिवशी डॉ. आंबेडकरांचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने जमुन तसेच जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येवून जयंती ठिकठिकाणी साजरी करतात, परंतु यावर्षी कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्यंत साधेपणाने सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजण्यापुर्वी जयंती साजरी करणे अपेक्षित आहे. दर वर्षीप्रमाणे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका यावेळी काढण्यात येऊ नयेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना त्या ठिकाणी अनुयायांची संख्या एकावेळी 5 पेक्षा जास्त नसावी. तसेच तेथे सोशल डिस्टंन्सींगचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पालन करून जयंती साजरी करण्यात यावी. कोविड-19 विषाणुच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे गर्दी करण्यास निर्बंध असल्याने व दादर, मुंबई तसेच महाराष्ट्रातील अन्य रेल्वे स्थानकावरही गर्दी करण्यास निर्बंध असल्याने शासनातर्फे जयंती निमित्त मुंबई येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायींनी चैत्यभुमी, दादर, मुंबई येथे न येता घरातुनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे. सार्वजनिक ठिकाणी गाणी, व्याख्याने, पथनाट्य इत्यादीचे सादरीकरण अथवा इतर कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमांचे केबल नेटवर्कव्दारे अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी आरोग्यविषयक उपक्रम / शिबिरे (उदा. रक्तदान) स्थानिक प्रशासनाच्या पुर्वानुमतीने आयोजित करता येतील आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करता येईल. तथापि आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टंन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. राज्यातील कोविड-19 विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. अशा सूचना राज्य शासनातर्फे देण्यात आल्या असून या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. 00000

कोविड-19 संदर्भात तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव पाहता जिल्ह्यामध्ये दररोज पॉझिटीव्ह रूग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यासाठी प्रशासनाकडून कोरोना रूग्णांना तात्काळ सुविधा उपलब्ध होण्यासाठी मोठ्या प्रमाणात खाजगी व शासकीय हॉस्पीटल अधिग्रहीत करण्यात आली आहेत. पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या रूग्णांमध्ये लक्षणे असलेली व नसलेली हे दोन्ही रूग्ण हॉस्पीटलमध्ये दाखल करून घेण्यासाठी त्या अनुषंगाने रूग्णांना दाखल करणे, डिस्चार्ज देणे व हॉस्पीटलमधील बिलाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्रशासनास प्राप्त होत आहेत. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर बेड उपल्बतेबाबत व तक्रार निवारण कक्ष (टोल फ्री) सुरू करण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. जिल्हास्तरावर पुढीलप्रमाणे कक्ष सुरू करण्यात आले आहेत. (1) बेड अथवा खाटांच्या उपलब्धतेसाठी (महानगरपालिका) संपर्क क्रमांक 0233-2375500 व 0233-2374500. (2) बेड अथवा खाटांच्या उपलब्धतेसाठी (जिल्हा परिषद) संपर्क क्रमांक 0233-2374900 व 0233-2375900. (3) तक्रार निवारण कक्ष (टोल फ्री) क्रमांक 1077. 00000

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयांची जिल्ह्यात कठोर अंमलबजावणी होणार - पालकमंत्री जयंत पाटील

सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : कोरोना बाधितांची वाढती संख्या पहाता लॉकडाऊन अथवा कठोर निर्बंध याबाबत राज्य शासन जे निर्णय घेईल त्या निर्णयांची जिल्ह्यात कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. सांगली जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या संबंधिच्या अनेक उपाययोजना जिल्ह्यात सुरू आहेत त्याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांची बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, खासदार संजय पाटील, सर्वश्री आमदार मोहनराव कदम, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, अरूण लाड, सुधीर गाडगीळ, अनिल बाबर, मानसिंगराव नाईक, विक्रम सावंत, श्रीमती सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट गंभीर होत असून कोरोना आता जीवनशैलीचा भाग बनत आहे. प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व या आजाराची गंभीरता कमी करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्या असणारा लसीकरणाचा वेग चांगला असला तरी तो अधिक वाढला पाहिजे. याबरोबरच कोरोना बाधीत रूग्ण अनेकदा होम आयसोलेशनच्या नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर फिरताना आढळतात. अशा रूग्णांवर कारवाई करण्याचे निर्देश देतानाच पालकमंत्री जयंत पाटील यांनी पोलीस पाटील, आशा वर्कर्स व ग्राम दक्षता समित्यांनी अधिक दक्ष राहून कोरोना बाधीत रूग्ण घराबाहेर पडणार नाहीत याची काटेकोर दक्षता घ्यावी. रेमडेसिव्हीअरचा काळाबाजार होवू नये याबाबत संबंधित यंत्रणांनी खबरदारी घेत असतानाच तक्रार प्राप्त झाल्यास काळाबाजार करणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करावी. कोरोना बाधीत रूग्णांकडून जादा बिलाची आकारणी होवू नये, सर्वांना माफक दरात आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्रशासन आणि आपली यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्याचे निर्देशित करून येत्या काळात कोरोनाचे संकट वाढेल असे गृहीत धरून संपूर्ण तयारी करावी. यावेळी त्यांनी जिल्हा क्रीडा संकुल येथील कोरोना सेंटरही तातडीने सुरू करावे, असे निर्देशित केले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या रूग्णांना हॉस्पीटल उपलब्ध न होणे ही बाब उचीत नसून बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम 24x7 कार्यरत ठेवावी. या ठिकाणच्या दूरध्वनी क्रमांकाच्या हेल्पलाईन्स वाढवून घ्याव्यात. तसेच दररोज सकाळी सर्व लोकप्रतिनिधींना जिल्ह्यातील उपलब्ध बेड संदर्भातील माहिती उपलब्ध करून द्यावी. यावेळी ग्रामीण रूग्णालयांच्या ठिकाणी अपुऱ्या मनुष्यबळाचा मुद्दा मांडला, यावर अशा ठिकाणी लवकरात लवकर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. त्या संदर्भात जिल्हास्तरावर भरती प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. लॉकडाऊन संदर्भातील व्यापाऱ्यांची भूमिका राज्य सरकारला कळविण्यात येईल, असे सांगतानाच कोरोनाचे संकट महाभयंकर आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी केले. या बैठकीत जिल्ह्यात 33 ठिकाणी डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल (DCH), 10 ठिकाणी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (DCHC), 11 ठिकाणी कोविड केअर सेंटर (CCC) अशा 54 ठिकाणी उपचारांची सुविधा उपलब्ध असून या ठिकाणी 3 हजार 160 बेड्स आहेत. यापैकी 1 हजार 977 ऑक्सिजिनेटेड बेड्स तर 600 आयसीयु बेड्स पैकी 245 बेड्सना व्हेंटीलेटर आणि 76 बेड्सना एचएफएनओ सुविधा आहेत. जिल्ह्यात 625 लहान ऑक्सिजन सिलेंडर, 1 हजार 117 जंबो सिलेंडर, 61 ड्युरा सिलेंडर, 7 ऑक्सिजन टँक (एकूण क्षमता 48.84 के.एल.). सद्यस्थितीत जानेवारी 2021 पासून आत्तापर्यंत 1 लाख 35 हजार 76 कोरोना नमुना चाचणी झाली असून जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 5.53 आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर टेस्टींग सुरू असून आरटीपीसीआर (RT-PCR) चाचण्यांची संख्यांही वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले. सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम अधिक सक्षम करून तालुकास्तरावरही हेल्पलाईन सुरू करावी. ग्राम दक्षता समित्या पुन्हा एकदा कार्यक्षम कराव्यात. पोलिस यंत्रणेनेही गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करावी. सांगली जिल्हा लसीकरणामध्ये राज्यात अग्रेसर आहे. याबद्दल अभिनंदन करतानाच सामुहिक गर्दी होवू नये यासाठी नागरिकांनी स्वत: दक्षता घ्यावी व गर्दी टाळावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 00000

मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये आणखी काही अत्यावश्यक सेवांचा समावेश - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली दि. 6 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावास आळा बसण्यासाठी दि. 5 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशान्वये प्रतिबंधात्मक आदेश दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत पारित करण्यात आला आहे. राज्य शासनाने दि. 4 एप्रिल 2021 रोजी जारी केलेल्या आदेशामध्ये दि. 5 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशान्वये काही अत्यावश्यक सेवा म्हणून अतिरिक्त बाबींचा समावेश केला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. 5 एप्रिल 2021 रोजी जारी केलेल्या आदेशामध्ये पुढील बाबींचा समावेश केला आहे. (१) अत्यावश्यक सेवांमध्ये पुढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे. (अ) पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने, (ब) सर्व प्रकारची माल वाहतूक सेवा (क) डेटा केंद्रे, क्लाउड सेवा वितरक, पायाभूत सुविधा आणि सेवांसाठी आवश्यक माहिती व तंत्रज्ञान सेवा, (इ) शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा (ई) फळ विक्रेता. (२) खाली नमूद खाजगी संस्था, कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या सर्व कर्मचारी यांचे लवकरात लवकर लसीकरण करण्याचे व जोपर्यंत लसीकरण करून घेतले जात नाही तोपर्यंत 15 दिवसापर्यंत वैध असेल असा कोरोना चाचणी निगेटिव्ह प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) सोबत बाळगण्याच्या अटीवर सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 वाजल्यापासून ते रात्री 08.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल. लसीकरण व RT-PCR चाचणी विषयक नियम दि. 10 एप्रिल 2021 रोजी पासून अंमलात येईल. आवश्यक ते प्रमाणपत्र सोबत नसल्यास संबंधीताकडून 1 हजार रूपये दंड आकरण्यात येईल. (अ) भारतीय सुरक्षा आणि विनियमन मंडळ (SEBI) ची कार्यालये आणि SEBI मान्यताप्राप्त बाजार मुलभूत संस्था उदा. स्टॉक एक्सचेंज, डिपॉजिटर्स व क्लेअरिंग कॉर्पोरेशन्स व SEBI कडे नोंदणीकृत असलेले एजंट. (ब) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिनस्त असलेल्या संस्था व मध्यस्थीच्या समावेशासह स्टँडअलोन प्राइमरी डीलर्स (Intermediaries including standalone primary dealers), क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL), पेमेंट सिस्टम ऑपरेटर, RBI ने नियमन केलेल्या बाजारामध्ये सहभागी होणारे वित्तीय बाजार. (क) सर्व नॉन बॅकिंग वित्तीय महामंडळे (ड) सर्व सूक्ष्म वित्तीय संस्था (इ) सर्व वकील यांची कार्यालये (फ) लस / औषधे / जीवनरक्षक औषधे संबंधित वाहतूक हाताळणारे कस्टम हाऊस एजंट / परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स. (३) ज्या व्यक्ती सोमवार ते शुक्रवार रात्री 08.00 वाजल्यापासून ते सकाळी 07.00 वाजेपर्यंत व शुक्रवार रात्री 08.00 वाजल्यापासून ते सोमवार सकाळी 07.00 वाजेपर्यंत रेल्वे/बसेस/विमाने यातून आगमन किंवा प्रस्थान करणार असेल त्याला अधिकृत तिकीट सोबत बाळगणे बंधनकारक असेल. जेणेकरून संबंधित व्यक्ती संचारबंदी कालावधीत स्थानकापर्यंत किंवा घरी प्रवास करू शकेल. (४) औद्योगिक कामगारांना / कर्मचारी यांना खाजगी बस /खाजगी वाहनाने त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे सोमवार ते शुक्रवार रात्री 08.00 वाजल्यापासून ते सकाळी 07.00 वाजेपर्यंत व शुक्रवार रात्री 08.00 वाजल्यापासून ते सोमवार सकाळी 07.00 वाजेपर्यंत कामाच्या वेळेनुसार प्रवास करण्यास परवानगी असेल. (५) जिल्ह्यातील सर्व प्रार्थनास्थळे सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आली आहेत. परंतु त्या ठिकाणी सुरू असलेल्या नित्यनियमाच्या धार्मिक पूजा अर्चा यांना परवानगी असणार आहे. एखाद्या धार्मिक स्थळी विवाह किंवा अंत्यसंस्कार संबंधित पूजा, प्रार्थना यांना लग्न समारंभ व अंत्यसंस्कार यांना राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याच्या अटीवर परवानगी देण्यात येत आहे. (६) परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांस सदर परिक्षेस व्यक्तीश: उपस्थित राहणे आवश्यक आहे, अशावेळी परिक्षेच्या ठिकाणाहून सोमवार ते शुक्रवार रात्री 08.00 वाजल्यानंतर व शुक्रवार रात्री 08.00 वाजल्यापासून ते सोमवार सकाळी 07.00 वाजेपर्यंत प्रवास करण्यास परवानगी असेल. तथापी, या कालावधीत परिक्षेचे प्रवेशपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असेल. (७) शनिवार, रविवार या संचारबंदी कालावधीत विवाह समारंभ असल्यास कोविड-19 च्या अनुषंगाने राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याच्या अटीवर सदर विवाह समारंभास परवानगी असेल. या व्यतिरिक्त यापूर्वी आदेशाने बंदी अथवा सूट देण्यात आलेल्या क्रिया/बाबी कायम राहतील. सूट देण्यात आलेल्या आस्थापनांनी, शासनाने त्या-त्या विभागासाठी, आस्थापनांसाठी नेमून दिलेल्या मार्गदर्शक सूचचांचे पालन करणे बंधनकारक राहील. या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधिक्षक, Incident Commander तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी. हा आदेश दि. 6 एप्रिल 2021 पासून दि. 30 एप्रिल 2021 रोजीचे रात्री 11.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आदेश दिले आहेत. 000000

सोमवार, ५ एप्रिल, २०२१

वाढता कोरोना रोखण्यासाठी जिल्ह्यात 30 एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लागू - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन व्हावे सांगली दि. 5 (जि.मा.का.) : राज्य शासनाकडील दि. 27 मार्च 2021 च्या आदेशातील निर्देशानुसार सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत दिनांक 15 एप्रिल 2021 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत वाढविण्यात आलेली होती. आता राज्य शासनाकडील दि. 4 एप्रिल 2021 च्या आदेशानुसार दि. 30 एप्रिल 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता काही प्रतिबंध घालण्यात आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. 1 व 15 ऑक्टोबर 2020 रोजी जारी केलेल्या आदेशांना मुदतवाढ दिली आहे. तसेच सांगली जिल्ह्यात दि. 30 एप्रिल 2021 रोजीचे रात्री 12 वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे आदेश दिले आहेत. 1. जमाव बंदी व संचार बंदी अ. सांगली जिल्ह्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करणेत येत आहे. ब. सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते रात्रीचे 08.00 वाजे पर्यंत 5 पेक्षा जास्त व्यक्तीना कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई असेल. 1. सोमवार ते शुक्रवार रात्रीचे 8.00 वाजल्यापासून ते सकाळी 07.00 वाजेपर्यंत, तसेच शुक्रवार रात्री 08.00 वाजलेपासून ते सोमवार सकाळी 07.00 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही नागरिकांस वैध कारणाशिवाय फिरण्यास किंवा खालील नमूद कारणास्तव दिलेल्या परवानगीशिवाय फिरता / वावरता (संचारबंदी) येणार नाही. ड. वैद्यकीय व अत्यावश्यक सेवांना सदर मनाई आदेशातून वगळणेत येत आहे. इ. अत्यावश्यक सेवा खालील प्रमाणे असतील. i. रुग्णालये, निदान केंद्रे (Diagnostic Centers), दवाखाने, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने (Pharmacies), औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा ii. किराणा, भाजीपाला, दुग्ध पदार्थ, डेअरी, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने iii. सार्वजनिक वाहतूक, रेल्वे, टैक्सी, रिक्षा व सार्वजनिक बसेस iv. स्थानिक प्राधिकरणांचे मान्सूनपूर्व उपक्रम v. स्थानिक प्राधिकरणांच्या सर्व सार्वजनिक सेवा vi. वस्तूंची वाहतूक vii. शेतीविषयक सेवा viii. ई - व्यापार ix. मान्यताप्राप्त माध्यमे x. गॅस एजन्सी व पेट्रोल, डीझेल पंप 2. मैदानी / सार्वजनिक ठिकाणच्या क्रिया (Outdoor Activity) अ. सर्व सार्वजनिक ठिकाणे ( उदा. बगीचे, मैदाने व इतर ) सोमवार ते शुक्रवार रात्रीचे 8.00 वाजलेपासून ते सकाळी 07.00 वाजेपर्यंत, तसेच शुक्रवार रात्री 08.00 वाजलेपासून ते सोमवार सकाळी 07.00 वाजेपर्यंत बंद राहतील. ब. सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 वाजलेपासून ते रात्रीचे 8.00 वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी (उदा. बगीचे, मैदाने व इतर ) भेट देणाऱ्या व्यक्तींनी कोव्हीड-19 च्या अनुषंगाने देणेत आलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल. क. स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सार्वजनिक ठिकाणी ( उदा. बगीचे, मैदाने व इतर ) भेट देणाऱ्या व्यक्तींकडून राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने कोव्हीड-19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन होत असलेबाबतची तपासणी करावी. स्थानिक स्वराज्य संस्था यांना सदर ठिकाणी नागरिकाकडून कोव्हीड- 19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन होत नसलेचे निदर्शनास आलेस त्यांनी तात्काळ सदरचे ठिकाण नागरिकांसाठी बंद करावे. 3. दुकाने, बाजार पेठा व मॉल्स अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा व मॉल्स पूर्णपणे बंद राहतील अ. जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात भरविले जाणारे सर्व आठवडा बाजार बंद राहतील. जिल्ह्यातील अधिकृत भाजीमंड्या सुरु राहतील. ब. अत्यावश्यक सेवेतील दुकानांमध्ये / आवारामध्ये ग्राहक व विक्रेता यांनी सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असेल. जास्तीच्या ग्राहकांना प्रतीक्षेसाठी सामाजिक अंतराचे पालन होईल अशा योग्य पद्धतीने खुणा करून घ्याव्यात. क. अत्यावश्यक सेवेतील दुकान मालक व कामगार यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकानांनी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून घ्याव्यात. उदा. विक्रेता व ग्राहक यांमध्ये पारदर्शक काच किंवा इतर साहित्याचे कवच, इलेक्ट्रॉनिक पेमेंट (Electronic payment) व इतर. ड. सद्यस्थितीत बंद असणाऱ्या दुकानांच्या दुकान मालक यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्यांच्याकडे काम करीत असणाऱ्या सर्व कामगारांचे लसीकरण करून घ्यावे. तसेच त्यांना पारदर्शक काच किंवा इतर साहित्याचे कवच, इलेक्ट्रॉनिक पेमेंट (Electronic payment) वापरून ग्राहकांशी संवाद साधनेसाठी तयार करावे. जेणेकरून शासनास सदरची दुकाने लवकरात लवकर खुली करता येतील. 4. सार्वजनिक वाहतूक सार्वजनिक वाहतूक खालील प्रमाणे सुरु राहील रिक्षा - चालक + 2 प्रवासी टैक्सी ( 4 चाकी ) - चालक + RTO नियमाच्या 50 % प्रवासी बस - RTO नियमाप्रमाणे बैठकीनुसार पूर्ण क्षमतेने. उभे राहून प्रवासास परवानगी नसेल. i. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या व्यक्तींना मास्क चा वापर करणे बंधनकारक असेल. सदर आदेशाचे उल्लंघन केलेस प्रतिव्यक्ती र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल. ii. टैक्सी मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीने मास्क परिधान केला नसेल तर मास्क परिधान न करणारी व्यक्ती व वाहन चालक यांचेकडून प्रत्येकी र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल. iii. प्रत्येक प्रवासानंतर वाहनाचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक असेल. iv. सर्व सार्वजनिक वाहतूक करणारे वाहन चालक व नागरिकांच्या संपर्कात येणारे कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे व जोपर्यंत लसीकरण करून घेतले जात नाही तोपर्यंत 15 दिवसापर्यंत वैध असेल असा कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) सोबत असणे बंधनकारक असेल. सदरचा नियम दि.10 एप्रिल 2021 रोजी पासून अंमलात येईल. टैक्सी व रिक्षा चालक यांनी स्वतःला प्रवाशांपासून प्लास्टिक आवरणाने अथवा इतर आवरणाने अलगीकरण करून घेतलेले असेल तर त्यांना सदर नियमातून सुट देणेत येईल. v. वरील पैकी कोणीही व्यक्ती कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) शिवाय / लसीकरणाशिवाय आढळून आलेस प्रत्येकी र.रु.1000/- इतका दंड आकारणेत येईल. vi. रेल्वे मध्ये कोणीही उभा राहून प्रवास करणारा प्रवासी नसेल तसेच सर्व प्रवासी यांनी मास्क परिधान केला असलेबाबतची खात्री सबंधित रेल्वे प्राधिकरणाने करावी. vii. रेल्वे मध्ये मास्क परिधान न करणाऱ्या व्यक्तीकडून प्रत्येकी र.रु.500/- इतका दंड आकारला जाईल. 5. कार्यालये i. खालील कार्यालये वगळता सर्व खाजगी कार्यालये बंद राहतील अ. सहकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) व खाजगी बँक ब. Bomby Stock Exchange (BSE) / National Stock Exchange (NSE) क. विद्युत पुरवठा सबंधित कंपनी ड. टेलिकॉम (Telicom) सुविधा पुरवणाऱ्या सेवा इ. विमा / वैद्यकीय हक्क सबंधित सेवा फ. औषध उत्पादन करण्यासाठी लागणारी त्यांची व्यवस्थापन कार्यालये चालू राहतील. ii. सर्व शासकीय कार्यालये 50 % क्षमतेने उपस्थितीसह चालू राहतील. परंतु ज्या अधिकारी / कर्मचारी यांचेवर कार्यालय प्रमुख यांनी कोव्हीड- 19 उपाययोजनांचे कामकाज सोपविले आहे, त्यांनी 100 टक्के क्षमतेने कार्यरत राहणेचे आहे. iii. विद्युत, पाणी, बँकिंग व वित्त सबंधित शासकीय कार्यालये / कंपनी पूर्ण क्षमतेने सुरु राहतील. iv. शासकीय कार्यालये / कंपनी यांनी आयोजित केलेल्या बैठकीस कार्यालयाबाहेरील व्यक्तींची उपस्थिती आवश्यक असलेस, अशा बैठकी Online आयोजित कराव्यात. v. अभ्यागतांना शासकीय कार्यालयात / कंपनीत येणेस प्रतिबंध असेल, त्यामुळे शासकीय कार्यालये / कंपनी यांनी e-visitor सेवा तात्काळ सुरु करावी. vi. अपवादात्मक परिस्थिती मध्ये कार्यालय प्रमुख अभ्यागतांना त्यांचेकडे मागील 48 तासामधील कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) असणेचे अटीवर पास वितरीत करून अभ्यागतांना भेटणेस परवानगी देतील. vii. सर्व शासकीय व खाजगी कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. 6. खाजगी वाहतूक खाजगी वाहतूक खाजगी बसेस सहित सोमवार ते शुक्रवार सकाळी 7.00 वाजलेपासून ते रात्री 08.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. तसेच सोमवार ते शुक्रवार रात्री 08.00 ते सकाळी 07.00 व शुक्रवार रात्री 08.00 वाजलेपासून ते सोमवार सकाळी 07.00 वाजेपर्यंत अतितात्काळ व अत्यावश्यक सेवेसाठीच सुरु राहतील. i. खाजगी वाहतूक / खाजगी बसेस RTO नियमाच्या बैठक क्षमतेनुसार सुरु राहतील. उभे राहून प्रवासास परवानगी नसेल. ii. खाजगी वाहतूक / खाजगी बसेस वाहतूक करणारे वाहन चालक व नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे व जोपर्यंत लसीकरण करून घेतले जात नाही तोपर्यंत 15 दिवसापर्यंत वैध असेल असा कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) सोबत असणे बंधनकारक असेल. सदरचा नियम दि.10 एप्रिल 2021 रोजी पासून अंमलात येईल. 7. करमणूक i. सिनेमा गृहे बंद राहतील ii. नाट्यगृहे व सभागृहे बंद राहतील. iii. करमणूक नगरी / आर्केड्स (Arcades) / व्हिडीओ गेम पार्लर बंद राहतील. iv. जल क्रीडा स्थळे बंद राहतील. v. क्लब (Clubs), जलतरण तलाव, व्यायामशाळा व क्रीडा संकुले बंद राहतील. vi. वरील आस्थापनांमधील मालक व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरणकरून घ्यावे. vii. चित्रपट / मालिका / जाहिरात यांचे छायाचित्रणास खालील प्रमाणे परवानगी असेल. अ. ज्या चित्रिकरणास मोठ्या संख्येने कलाकार उपस्थिती राहणार असतील असे चित्रिकरण टाळावे. ब. सदर ठिकाणी काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीजवळ 15 दिवसापर्यंत वैध असेल असा कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) सोबत असणे बंधनकारक असेल. सदरचा नियम दि.10 एप्रिल 2021 रोजी पासून अंमलात येईल. क. कलाकार आणि संबंधित कामगार वर्ग यांचेसाठी Quarantine Bubble तयार करणेस आलेस, सदर Quarantine Bubble मध्ये प्रवेश करणेपूर्वी कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report)सादर केलेनंतर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अटी व शर्तीवर परवानगी देणेत येईल. 8. रेस्टॉरंट, बार, हॉटेल i. सर्व रेस्टॉरंट व बार पूणर्पणे बंद राहतील. ii. घेवून जाणे (take away orders), पार्सल आणि घरपोच (Home Delivery) सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 वाजलेपासून ते रात्री 08.00 वाजेपर्यंत सुरु राहील, तसेच शुक्रवार रात्री 08.00 वाजलेपासून ते सोमवार सकाळी 07.00 वाजेपर्यंत फक्त घरपोच (Home Delivery) सेवा सुरु राहील, सदर कालावधीत कोणत्याही ग्राहकाला रेस्टॉरंट व बार मध्ये प्रत्यक्ष येणे प्रतिबंधित असेल. iii. हॉटेल्स मधील रेस्टॉरंट व बार हे फक्त निवासी ग्राहकांसाठी सुरु राहील. बाहेरील ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत हॉटेल मध्ये प्रवेशास परवानगी नसेल. बाहेरील ग्राहकांसाठी वरील प्रमाणे प्रतिबंध लागू असेल. iv. घरपोच (Home Delivery) सेवा देणाऱ्या कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. जोपर्यंत लसीकरण करून घेतले जात नाही तोपर्यंत 15 दिवसापर्यंत वैध असेल असा कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) सोबत असणे बंधनकारक असेल. सदरचा नियम दि.10 एप्रिल 2021 रोजी पासून अंमलात येईल. v. सदर कर्मचारी यांनी दि.10 एप्रिल 2021 पर्यंत वरीलप्रमाणे कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) / लसीकरण करून घेतलेले नसलेस सदर व्यक्तीकडून र.रु.1000/- इतका दंड आकारला जाईल. दंडात्मक कारवाई नंतरही सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड -19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापनेची अनुज्ञप्ती रद्द किंवा सदरचे ठिकाण बंद केले जाईल. vi. रेस्टॉरंट व बार मध्ये काम करणाऱ्या कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. 9. धार्मिक प्रार्थनास्थळे अ. सर्व धार्मिक प्रार्थनास्थळे बंद राहतील. ब. धार्मिक प्रार्थनास्थळांमधील विधिवत पूजेसाठी असणाऱ्या धर्मगुरू अथवा पुजारी यांना वगळून इतर सामान्य नागरिकांना धार्मिक प्रार्थना स्थळांना भेटी देणेस मनाई असेल. क. धार्मिक प्रार्थनास्थळांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. 10. केश कर्तनालये / स्पा / सलून / ब्युटी पार्लर्स अ. केशकर्तनालये / स्पा / सलून / ब्युटी पार्लर्स बंद राहतील. ब. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. 11. वर्तमानपत्रे अ. वर्तमानपत्र छपाईस व वितरणास परवानगी असेल. ब. सकाळी 07.00 ते रात्री 08.00 पर्यंत घरपोच वर्तमानपत्र वितरण करणेस परवानगी असेल. क. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. 12. शाळा व महाविद्यालये अ. शाळा व महाविद्यालये बंद राहतील. ब. सदरचा नियम हा 10 वी 12 वी परीक्षेसाठी शिथिल असेल. परीक्षेच्या नियोजनासाठी तसेच परीक्षेसाठी नियुक्त कर्मचारी यांनी लसीकरण केलेले असावे किंवा त्यांचेकडे मागील 48 तासामधील कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) असणे बंधनकारक असेल. क. महाराष्ट्र राज्याबाहेरील कोणत्याही परिक्षा मंडळ, विद्यापीठ अथवा प्राधिकरणामार्फत सांगली जिल्हयातील विद्यार्थ्यासाठी घेणेत येणाऱ्या परीक्षांना परवानगी देणेत येत आहे. सबंधित विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास सदर परीक्षेबाबत पूर्व कल्पना देणे आवश्यक असेल. ड. सर्व प्रकारची खाजगी कोचिंग क्लासेस बंद राहतील. इ. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. 13. धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम अ. सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम प्रतिबंधित असतील. ब. ज्या जिल्हयामध्ये निवडणूका प्रस्तावित असतील, त्या ठिकाणी राजकीय सभा / मेळावे घेण्यास खालील अटी व शर्तीस अधीन राहून जिल्हाधिकारी यांचेकडून परवानगी देणेत येईल. i) भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनूसार संबंधित राजकीय मेळावे / सभा यांना बंदिस्त सभागृहासाठी 50 पेक्षा जास्त नाही किंवा सभागृहाच्या बैठक क्षमतेच्या 50 % चे अधीन राहून आणि खुल्या ठिकाणी 200 पेक्षा जास्त नाही किंवा खुल्या ठिकाणच्या क्षमतेच्या 50 % या पैकी कमी असेल त्या क्षमतेच्या अधिन राहून सर्व कोव्हीड -19 शिष्टाचाराचे पालन केले जाईल, या अटीवर परवानगी देणेत येईल. i) संबंधित परवानगी देणेत आलेल्या राजकीय सभा / मेळावे संबंधित क्षेत्राचे त्या त्या स्थानिक प्राधिकरणाकडून किंवा नेमलेल्या अधिकारी यांचेमार्फत योग्य नियमांचे पालन केले जात असलेची खात्री केली जाईल. ii) सदर ठिकाणी कोव्हीड -19 शिष्टाचाराचे उल्लंघन झालेस संबंधित ठिकाणचा जागा मालक हा यासाठी जबाबदार राहील आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नूसार दंडास पात्र राहील. गंभीर प्रकारचे उल्लंघन झाल्यास सदर ठिकाण हे कोव्हीड -19 साथ संपेपर्यत बंद करण्यात येईल. iii) एखाद्या उमेदवारांच्या दोन पेक्षा जास्त राजकीय सभा आणि मेळाव्यामध्ये सदर बाबींचे उल्लंघन झालेस, पुन्हा सदर उमेदवाराच्या राजकीय सभा / मेळाव्यास परवानगी दिली जाणार नाही. iv) कोणत्या प्रकारचे मिरवणूका, कोपरा सभा या ठिकाणी कोव्हीड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक असेल. v) वरील सर्व मार्गदर्शक सूचना या निवडणूक प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वासाठी समान राहतील. तसेच कोणत्याही प्रकारच्या तक्रारी होणार नाहीत, याविषयी दक्षता घेणे. क. 50 नातेवाईक/ नागरिकांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ करणेस परवानगी असेल. i. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण केलेले असावे. लसीकरण होईपर्यंत त्यांचेकडे वैध कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) असणे बंधनकारक असेल. ii. लग्नसमारंभाच्या ठिकाणी एखाद्या कर्मचाऱ्याकडे कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र(Negative RT-PCR Test Report) नसलेस / लसीकरण करून घेतलेले नसलेस सबंधित आस्थापनेवर र.रु.10.000/- इतका दंड आकारणेत येईल. iii. दंडात्मक कारवाई नंतरही सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड - 19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापनेची अनुज्ञप्ती रद्द किंवा सदरचे ठिकाण बंद केले जाईल. ड. अंत्यसंस्कारासाठी 20 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येणेस प्रतिबंध असेल. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण केलेले असावे आणि त्यांचेकडे वैध कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) असणे बंधनकारक असेल. 14. रस्त्याच्या कडेला असणारी खाद्य पदार्थ विक्रेते i. खाद्य पदार्थ विक्रेते यांनी त्यांचे आस्थापनेच्या ठिकाणी ग्राहकांना प्रत्यक्ष खाणेसाठी देणेस प्रतिबंध असेल. पार्सल अथवा घरपोच सेवेस सकाळी 07.00 ते रात्री 08.00 पर्यंत परवानगी असेल ii. प्रतीक्षेत असणाऱ्या ग्राहकांना आस्थापनेपासून दूर सामाजिक अंतराचे पालन होईल अशा ठिकाणी उभे राहणेच्या सूचना द्याव्यात. iii. सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड -19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापना ठिकाण बंद केले जाईल. vii. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व व्यक्तीं यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. जोपर्यंत लसीकरण करून घेतले जात नाही तोपर्यंत 15 दिवसापर्यंत वैध असेल असा कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) सोबत असणे बंधनकारक असेल. सदरचा नियम दि.10 एप्रिल 2021 रोजी पासून अंमलात येईल. iv. स्थानिक स्वराज्य संस्था यांनी CCTV द्वारे / वैयक्तिक रीत्या सदर आस्थापनांवर लक्ष ठेवून रहावे. जर एखाद्या आस्थापनाधारक अथवा ग्राहक यांचेकडून नियमांचे उल्लंघन झालेचे निदर्शनास आलेस त्यांचेवर दंडात्मक कारवाई करणेत यावी. v. स्थानिक स्वराज्य संस्था यांना असे निदर्शनास आले कि सदर आस्थापना वारवार दंडात्मक कारवाई करूनही नियमांचे उल्लंघन करीत आहे. अशा वेळेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड -19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापना ठिकाण बंद करणेत यावे. 15. उत्पादन क्षेत्र i. उत्पादन क्षेत्रास खालील अटी व शर्तीस अधीन राहून परवानगी असेल. ii. कारखाने व उत्पादन केंद्रामध्ये कामगारांच्या प्रत्येक प्रवेशावेळी शरीराचे तापमान तपासणे बंधनकारक असेल. iii. सदर ठिकाणी काम करणाऱ्या सर्व व्यक्तीं यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. iv. कारखाने व उत्पादन केंद्रामध्ये काम करणाऱ्या कामगार अथवा कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आलेस. कारखाने व उत्पादन क्षेत्र व्यवस्थापनाने सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीस स्वखर्चाने विलगीकरणामध्ये ठेवावे. v. ज्या कारखाने / उत्पादन केंद्रामध्ये 500 पेक्षा जास्त कामगार/ कर्मचारी काम करीत असतील अशा कारखाने / उत्पादन केंद्र व्यवस्थापनाने स्वतःचे विलगीकरण केंद्र उभे करावे. vi. जर एखादा कामगार अथवा कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला असेल तर सबंधित कारखाने / उत्पादन केंद्राचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण होईपर्यंत बंद राहील. vii. गर्दी टाळणेसाठी जेवणाच्या व चहाच्या वेळा टप्प्याटप्प्याने ठेवणेत याव्यात. एकाच ठिकाणी जेवणासाठी एकत्र येवू नये. viii. सार्वजनिक स्वच्छता गृहाचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणेत यावे. ix. सर्व कामगार / कर्मचारी / व्यक्तीं यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. जोपर्यंत लसीकरण करून घेतले जात नाही तोपर्यंत 15 दिवसापर्यंत वैध असेल असा कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) सोबत असणे बंधनकारक असेल. सदरचा नियम दि.10 एप्रिल 2021 रोजी पासून अंमलात येईल. x. जर एखादा कामगार / कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला तर त्यांस कामावरून न काढता त्यांस वैद्यकीय रजा देणेत यावी. सदर कर्मचारी पूर्ण वेतनासाठी पात्र राहतील. 16. ऑक्सिजन उत्पादक अ) कोणताही कारखाना / उत्पादन केंद्र कच्चा माल म्हणून ऑक्सिजन चा वापर करीत असेल तर त्याला दि.10 एप्रिल 2021 पासून ऑक्सिजन कच्चा माल म्हणून वापरता येणार नाही. जर दि.10 एप्रिल 2021नंतर हि एखाद्या कारखाना / उत्पादन केंद्रास वापर सुरु ठेवणेचा असेल तर तो सबंधित अनुज्ञप्ती प्राधिकरणाकडे कारणमीमांसेसह ऑक्सिजन वापराबाबत परवानगी मागेल. सर्व अनुज्ञप्ती प्राधिकरण यांनी ज्या ठिकाणी ऑक्सिजन कच्चा माल म्हणून वापरला जात आहे त्या ठिकाणी दि.10 एप्रिल 2021नंतर ऑक्सिजन चा वापर करणे थांबले बाबत तसेच जेथे वापर सुरु आहे त्यांनी परवानगी घेतली असलेबाबत खात्री करावी. ब) ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या कारखाना / उत्पादन केंद्र यांनी त्यांचे उत्पादन क्षमतेच्या 80 % उत्पादन हे वैद्यकीय कारणास्तव आरक्षित ठेवावे. सदर ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या कारखाना / उत्पादन केंद्र यांनी त्यांचे ग्राहक आणि दि.10 एप्रिल 2021 पासून सदर ग्राहकांना ऑक्सिजन पुरवठा बंद केले बाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे. 17. ई - व्यापार अ. सदर आस्थापनांवरील कामगार / कर्मचारी / व्यक्तीं यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. जोपर्यंत लसीकरण करून घेतले जात नाही तोपर्यंत 15 दिवसापर्यंत वैध असेल असा कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) सोबत असणे बंधनकारक असेल. सदरचा नियम दि.10 एप्रिल 2021रोजी पासून अंमलात येईल ब. वारंवार सदर नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड-19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित आस्थापनेची अनुज्ञप्ती रद्द केली जाईल. 18. सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) अ. कोणत्याही सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) मध्ये 5 पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेस सदर सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) ला सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल. ब. अशा संस्थांनी (Societies) संस्थेच्या मेन गेटचे ठिकाणी भेटण्यास येणाऱ्या व्यक्तींच्या माहितीसाठी सदर ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळले बाबत फलक लावावा व त्यांचा प्रवेश निषिद्ध करणेत यावा क. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रास लागू असणाऱ्या सर्व नियमांचे पालन करणे सबंधित संस्थेवर बंधनकारक असेल. (उदा. प्रवेश, पत्ता व इतर यावर परीक्षण ठेवणे) ड. कोणत्याही संस्थेने सदर नियमांचे उल्लंघन केलेस पहिल्या घटनेवेळी सबंधित संस्थेकडून र.रु.10000/- इतका दंड आकारला जाईल. त्यानंतरही नियमाचे उल्लंघन झालेस स्थानिक प्राधिकरणाने निश्चित केलेला जास्तीत जास्त दंड आकारला जाईल. सदरचा वसूल करणेत आलेला दंड हा संस्थांकडून शासन निर्देशांचे पालन होत असलेबाबत पर्यवेक्षण कामी वापरला जाऊ शकतो. इ. सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) यांनी इमारतीमध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचे शासकीय नियमानुसार लसीकरण होत नाही तोपर्यंत कोरोना चाचणी अहवाल (RT-PCR Test Report) घ्यावा. 19. बांधकाम क्रिया (Costruction Activity) अ. ज्या बांधकामावर कामगार / कर्मचारी हे बांधकामाच्या ठिकाणी राहणेस आहेत त्या बांधकामांना सुरु ठेवणेस परवानगी असेल. सामानाची ने-आण वगळता बांधकामाचे ठिकाणाहून बाहेरून आत व आतून बाहेर होणारी वाहतूक प्रतिबंधित असेल. ब. सदर आस्थापनांवरील कामगार / कर्मचारी / व्यक्तीं यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. जोपर्यंत लसीकरण करून घेतले जात नाही तोपर्यंत 15 दिवसापर्यंत वैध असेल असा कोरोना चाचणी निगेटिव्ह (Negative) प्रमाणपत्र (Negative RT-PCR Test Report) सोबत असणे बंधनकारक असेल. सदरचा नियम दि.10 एप्रिल 2021रोजी पासून अंमलात येईल क. सदर नियमांचे उल्लंघन केलेस सबंधित बांधकाम विकसकावर (Devloper) यांचेवर पहिल्या घटनेवेळी र.रु.10000/- इतका दंड आकारला जाईल. त्यानंतरही नियमाचे उल्लंघन झालेस केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी कोव्हीड-19 साथरोग हा आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितक्या कालावधीसाठी सबंधित बांधकाम बंद करणेत यावे. ड. जर एखादा कामगार / कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला तर त्यांस कामावरून न काढता त्यांस वैद्यकीय रजा देणेत यावी. रजेच्या कालावधीत नियमानुसार पूर्ण वेतनासाठी पात्र राहील. 20. दंड अ. या कार्यालयाकडील आदेश क्र.गृह-1/कार्या-6/कोरोना/आरआर-19/2021 बंदी आदेश/एसआर-14/2021 दि. 27 मार्च 2021 अन्वये पारित केलेल्या आदेशामध्ये नमूद दंड या आदेशास अधिक्रमित करील. ब. वसूल करणेत आलेला सर्व दंड हा सबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे भरणेत यावा जेणेकरून सदरचा निधी हा कोव्हीड -19 च्या योग्य प्रतिबंध व उपाययोजनाकामी उपयोगात आणता येईल. या व्यतिरिक्त यापूर्वी आदेशाने बंदी अथवा सूट देणेत आलेल्या क्रिया / बाबी कायम राहतील. सूट देणेत आलेल्या आस्थापनांनी, शासनाने त्या - त्या विभागासाठी / आस्थापनांसाठी नेमून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. सदर आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, Incident Commander तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी. सदरचा आदेश दि. 05 एप्रिल 2021 रोजीचे रात्री 08.00 वाजल्यापासून ते दि. 30 एप्रिल 2021 रोजीचे रात्री 11.59 वाजेपर्यंत अंमलात राहील. 00000