गुरुवार, ३० जून, २०२२

तासगाव तालुक्यातील किंदरवाडी ग्रामपंचायतीचा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : राज्य निवडणूक आयोगाने जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणक प्रणालीव्दारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील किंदरवाडी ग्रामपंचायतीचा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान दिनांक 4 ऑगस्ट 2022 तर मतमोजणी 5 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. ग्रामपंचायत निवडणूकीकरीता राज्य निवडणूक आयोगाकडील आदेशानुसार आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी व आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही असे नमूद केले आहे. जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणकप्रणालीवदारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे. तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक - दिनांक 5 जुलै 2022 (मंगळवार). नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अअ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) - दिनांक 12 जुलै 2022 (मंगळवार) ते दिनांक 19 जुलै 2022 (मंगळवार) वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 (दिनांक 16 जुलै 2022 चा शनिवार व दिनांक 17 जुलै 2022 चा रविवार वगळून). नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचर दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) - दिनांक 20 जुलै 2022 (बुधवार) वेळ सकाळी 11 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) - दिनांक 22 जुलै 2022 (शुक्रवार) दुपारी 3 वाजेपर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ - दिनांक 22 जुलै 2022 (शुक्रवार) दुपारी 3 वाजल्यानंतर. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक - दिनांक 4 ऑगस्ट 2022 (गुरूवार) सकाळी 7.30 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत. मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील) - दिनांक 5 ऑगस्ट 2022 (शुक्रवार). जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक - दिनांक 11 ऑगस्ट 2022 (गुरूवार) पर्यंत. 00000

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गत पशुवैद्यकीय सेवेसाठी पशुपालकांना टोल फ्री क्रमांकावर फोन करून लाभ घेण्याचे आवाहन

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, कडेगाव, पलूस, वाळवा, मिरज, खानापूर व तासगाव या तालुक्यांमध्ये "मुख्यमंत्री पशुस्वास्थ योजना" या राज्यस्तरीय योजनेंतर्गत फिरते पशुचिकित्सा पथकांचा विस्तार करण्यात आलेला आहे. या योजनेंतर्गत फिरत्या पशुचिकित्सा पथकामध्ये विविध उपकरणांनी सुसज्ज वाहन उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू पशुपालकांनी "१९६२" या टोल फ्री क्रमांकावर स्वतःच्या मोबाईलवरून फोन करून त्याच्या पशुधनासाठी आवश्यक असणाऱ्या पशुवैद्यकीय सेवेची मागणी नोंदवावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. ए. धकाते यांनी केले आहे. फिरत्या पशुचिकित्सा पथकांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय सेवांसाठी जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, कडेगाव, पलूस, वाळवा, मिरज, खानापूर व तासगाव या तालुक्यांमधील गरजू पशुपालकांनी "1962" या टोल फ्री क्रमांकावर स्वतःच्या मोबाईल क्रमांकावरून फोन करुन त्यास आवश्यक असणाऱ्या सेवेची मागणी नोंदविण्याची आहे. त्यानंतर मागणी केलेल्या सेवेच्या प्रकारानुसार व आजाराच्या तीव्रतेनुसार / वर्गीकरणानुसार संबंधित पशुपालकास 5 तास ते 72 तासांपर्यंत आवश्यक असणारी पशुवैद्यकीय सेवा फिरत्या पशुचिकित्सा पथकांमार्फत पुरविण्यात येणार आहे. या पथकांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांसाठी शासनामार्फत निश्चित केलेल्या सेवा शुल्काव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त सेवाशुल्क आकारण्यात येणार नाही. राज्यातील पशुधनास कृत्रिम रेतन, औषधोपचार, लसीकरण, शस्त्रक्रिया, वंध्यत्व तपासणी, गर्भधारणा तपासणी इत्यादी प्रकारच्या पशुआरोग्य सेवा पशुवैद्यकीय संस्थांमार्फत नियमितपणे पुरविल्या जातात. तथापि पशुधन आजारी पडल्यास सदर पशुधनास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये घेऊन जावे लागते. अशावेळी प्रसंगी पशुपालकांना स्वखर्चाने वाहनाची सोय करावी लागते. बहुतांशी पशुपालकांना हा आर्थिक भार परवडणारा नसतो. त्यामुळे पशुवैद्यकीय सेवेअभावी पशुधन मयत होऊन, पशुपालकांचे आर्थिक नुकसान होते. त्यासाठी ज्या भागामध्ये दळ्णवळणाच्या सुविधा अपुऱ्या आहेत अथवा पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या कमी आहे, अशा तालुक्यांमधील पशुधनास पशुवैद्यकीय सेवा पशुपालकांच्या दारापर्यंत पोहचविण्यासाठी फिरते पशुचिकित्सा पथके स्थापन करणे आवश्यक होते. त्यानुसार फिरत्या पशुचिकित्सा पथकांचा विस्तार करण्यात आलेला आहे. जनावरास विताना त्रास होणे, गर्भाशय बाहेर पडणे (अंग बाहेर येणे), गर्भाशयाला पिळ पडणे, सर्पदंश होणे, विषबाधा होणे, तीव्र स्वरुपाची पोटफुगी होणे, घशामध्ये वस्तू अडकणे, पशुधनास अपघात होऊन गंभीर इजा होणे, आग लागून जनावर भाजणे, उष्माघात होणे, घटसर्प अथवा इतर गंभीर आजार होणे या प्रकारच्या गंभीर व अत्यावश्यक सेवांसाठी व इतर आवश्यक असणाऱ्या सेवांसाठी जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, कडेगाव, पलूस, वाळवा, मिरज, खानापूर व तासगाव या तालुक्यांमधील गरजू पशुपालकांनी “1962” या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. धकाते यांनी केले आहे. 00000

जिल्ह्यात खानापूर तालुक्यात 21.2 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.3 मि. मी. पावसाची नोंद झाली असून खानापूर-विटा तालुक्यात सर्वाधिक 21.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 4.0 (66), जत 16.9 (93.9), खानापूर-विटा 21.2 (67.1), वाळवा-इस्लामपूर 5.6 (59.3), तासगाव 0.9 (60.4), शिराळा 1.2 (108.8), आटपाडी 12.3 (63.9), कवठेमहांकाळ 0.4 (55.9), पलूस 0.0 (43.6), कडेगाव 0.3 (51.2). 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 10.35 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 10.35 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 13.55 (105.25), धोम 4.12 (13.50), कन्हेर 2.34 (10.10), वारणा 10.35 (34.40), दूधगंगा 6.04 (25.40), राधानगरी 2.32 (8.36), तुळशी 1.37 (3.47), कासारी 0.91 (2.77), पाटगांव 1.19 (3.72), धोम बलकवडी 0.76 (4.08), उरमोडी 4.15 (9.97), तारळी 2.04 (5.85), अलमट्टी 48.21 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 1600, धोम 0.0, कण्हेर 150, वारणा 573, दुधगंगा 300, राधानगरी 1000, तुळशी 50, कासारी 250, पाटगांव 0.0, धोम बलकवडी 0.0, उरमोडी 550, तारळी 0.0 व अलमट्टी धरणातून 798 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 14.10 (45), आयर्विन पूल सांगली 4.6 (40) व अंकली पूल हरिपूर 3.11 (45.11). 00000

बुधवार, २९ जून, २०२२

हॉटेल आस्थापनांना हायजिन रेटींग प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे मार्गदर्शनपर कार्यशाळा

सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील हॉटेल आस्थापनांना स्वच्छतेबाबत थर्ड पार्टीकडून ऑडीट करून हायजिन रेटींग प्रमाणपत्र प्राप्त करण्याबाबत मार्गदर्शनपर कार्यशाळा अन्न व औषध प्रशासन कार्यालयातर्फे घेण्यात आली. ही कार्यशाळा अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांच्यासमवेत अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती हिरेमठ व श्री. स्वामी यांनी घेतली. या कार्यशाळेमध्ये अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील शेड्युल 4 मधील स्वच्छतेबाबत घ्यावयाची खबरदारी व उपाययोजना याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती हिरेमठ व श्री. स्वामी यांनी मार्गदर्शन केले. हायजिन रेटींग हे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती हॉटेल आस्थापनांना यावेळी देण्यात आली. या कार्यशाळेत तळण्यासाठी वापरण्यात येत असलेले तेल किती वेळा वापरावे व असे वापरून शिल्लक राहिलेले तेल रूको या संस्थेला देण्याबाबत मार्गदर्शन केले. रूको ही संस्था जळके तेल घेवून बायोडिझेल निर्मिती करीत असल्याबाबतचे त्यांना अवगत केले. वापरलेले तेल एका कंटेनरमध्ये साठवूण त्यावर रूकोचे लेबल लावण्याबाबत सूचना दिल्या. या कार्यशाळेत ईट राईट चॅलेंजच्या कार्याबाबत माहिती देण्यात आली. सांगली जिल्ह्यात मिरज लक्ष्मी मार्केट येथील रोडवर अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांना क्लिन स्ट्रिट फूड हब चे मानांकन प्राप्त झाल्याबाबतची माहिती यावेळी देण्यात आली. 00000

शिष्यवृत्ती, फ्रीशिप, आरएसएमएस, निर्वाह भत्ता योजनेकरीता महाडिबीटी प्रणालीवर अर्ज करण्यासाठी 5 जुलै पर्यंत मुदतवाढ

सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : अनुसूचित जाती प्रवर्गातील सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी प्रलंबित नुतनीकरण अर्जदारांसाठी तसेच सन 2021-22 मधील नवीन व नुतनीकरण अर्जदारांसाठी शिष्यवृत्ती, फ्रीशिप, आरएसएमएस, निर्वाह भत्ता या योजनेकरीता अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी प्रणालीवर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून दि. 5 जुलै 2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी या योजनेकरीता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी www.mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावरुन अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. सांगली जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित सर्व विद्यालय/ महाविद्यालयांनी दि. 5 जुलै 2022 पर्यंत विद्यार्थ्यांचे सर्व योजनांचे अर्ज भरुन घ्यावेत. भविष्यात अंतिम दिनांकानंतर मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्याबाबत किंवा अशा प्रकारे कोणतीही तक्रार निर्माण झाल्यास विद्यालय/ महाविद्यालयास सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे. 00000

सेवा सहकारी संस्थांना काम वाटपासाठी 5 जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : सेवा सहकारी संस्थांना कामे वाटपासाठी वाहनचालक 03 व सफाईकामगार 01 अशी एकूण चार कामे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली या कार्यालयाकडे प्राप्त झाली आहेत. ही कामे करण्यास इच्छुक असणाऱ्या तसेच अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या सेवा सहकारी संस्थांनी इच्छापत्र व आवश्यक कागदपत्रासह दि. 5 जुलै 2022 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे. शिराळा तालुक्यातील सहायक अभियंता श्रेणी-1 वारणा डावा तीर कालवा उपविभाग क्र. १, कोकरूड, उपविभागीय अभियंता वारणा डावा तीर कालवा उपविभाग क्र. २, सागांव व उपविभागीय अभियंता वारणा प्रकल्प उपविभाग क्र. ३ वारणावती या आस्थापनांकडील प्रत्येकी एक वाहनचालक तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था विटा यांच्याकडील एक सफाईगार अशी एकूण चार कामे असून कामाचा कालावधी 11 महिन्यांचा आहे. वाहनचालकासाठी 13 हजार 330 रूपये मासिक मानधन आहे. तर सफाईगार कामासाठी 597 रूपये प्रतिदिन मानधन आहे. या कामासाठी अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. बेरोजगारांची स्थापन केलेली सहकारी सेवा सोसायटी यांची स्थापना ऑगस्ट 2000 नंतर झालेली असावी. तसेच सहकार कायदा 1960 अन्वये नोंदणीकृत असावी. बेरोजगारांची सहकारी सेवा सोसायटी त्यांना देण्यात येणारे काम करण्यासाठी पात्र असावी. सहकारी सेवा सोसायटीस 3 लाखापर्यंतची कामे मिळण्यासाठी त्यांनी यापूर्वी केलेल्या कामाचे अनुभव दाखले प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. सहकारी सेवा सोसायटी खाते सहकारी बँक/ राष्ट्रीयकृत बँकेत काढलेले असावे. सहकारी सेवा सोसायटीच्या आर्थिक उलाढालीचे नियमित वार्षिक लेखापरिक्षण केलेले असावे. सन 2021-22 च्या लेखापरिक्षण अहवालाची प्रत सोबत जोडावी. सहकारी सेवा सोसायटी/ लोकसेवा केंद्र यांनी सदस्यांना ओळखपत्रे देणे आवश्यक असून ते क्रियाशील सदस्य असणे आवश्यक आहे. जे सदस्य क्रियाशिल नसतील त्यांची नावे सदर सहकारी सेवा सोसायटीतून कमी करून त्या ठिकाणी नवीन सदस्य घेण्यात यावेत. कागदपत्रांच्या छायांकित प्रती/प्रमाणपत्र मुळ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. ज्यांचे कार्यक्षेत्र शिराळा व विटा आहे तसेच जिल्हास्तरीय कार्यक्षेत्र असलेल्या संस्थांनी अर्ज सादर करावेत. अर्जासोबत उपविधीमध्ये नमूद असलेल्या कार्यक्षेत्राच्या पानाची साक्षांकित प्रत जोडावी. 00000

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 2.8 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.7 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 2.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 1.0 (62), जत 0.0 (77), खानापूर-विटा 0.0 (45.9), वाळवा-इस्लामपूर 0.8 (53.7), तासगाव 0.8 (59.5), शिराळा 2.8 (107.6), आटपाडी 0.0 (51.6), कवठेमहांकाळ 0.1 (55.5), पलूस 0.2 (43.6), कडेगाव 0.0 (50.9). 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 10.33 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 10.33 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 13.66 (105.25), धोम 4.15 (13.50), कन्हेर 2.35 (10.10), वारणा 10.33 (34.40), दूधगंगा 6.0 (25.40), राधानगरी 2.35 (8.36), तुळशी 1.37 (3.47), कासारी 0.91 (2.77), पाटगांव 1.15 (3.72), धोम बलकवडी 0.76 (4.08), उरमोडी 4.20 (9.97), तारळी 2.05 (5.85), अलमट्टी 48.28 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 1600, धोम 424, कण्हेर 150, वारणा 570, दुधगंगा 300, राधानगरी 1000, तुळशी 50, कासारी 250, पाटगांव 0.0, धोम बलकवडी 0.0, उरमोडी 550, तारळी 0.0 व अलमट्टी धरणातून 810 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 15.5 (45), आयर्विन पूल सांगली 4.9 (40) व अंकली पूल हरिपूर 4.3 (45.11). 00000

सोमवार, २७ जून, २०२२

िल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील निवडणूक विभाग, निर्वाचक गणाच्या अंतिम प्रभाग रचनेस मान्यता - उपजिल्हाधिकारी (महसूल) मोहिनी चव्हाण

ज प्रभागरचनेचे परिशिष्ट 4 व 4(अ) प्रसिध्द सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : सांगली जिल्हा परिषद व त्याअंतर्गत सांगली जिल्ह्यातील 10 पंचायत समित्यांमधील निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या अंतिम प्रभाग रचनेस विभागीय आयुक्त पुणे यांनी मान्यता दिली आहे. जिल्हा परिषद सांगली व त्याअंतर्गत सांगली जिल्ह्यातील 10 पंचायत समित्यांच्या प्रभागरचनेचे परिशिष्ट 4 व परिशिष्ट 4(अ) जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, जिल्हा परिषद सांगली, सर्व तहसिल कार्यालये, सर्व पंचायत समित्या तसेच जिल्हाधिकारी कार्यालय सांगली च्या sangliweb sangliweb@gmail.com यांच्या संकेतस्थळावर दि. 27 जून 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) मोहिनी चव्हाण यांनी दिली. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडील दि. 10 मे 2022 रोजीच्या आदेशान्वये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2022 साठी निर्वाचक गणाच्या रचनेबाबतचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने दि. 2 जून 2022 रोजी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली होती. प्रस्तुत प्रारूप प्रभाग रचनेच्या अधिसूचनेवर दि. 2 ते 8 जून 2022 पर्यंत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी होता. त्यास अनुसरून सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी, जत, तासगाव, पलूस, वाळवा, शिराळा, मिरज या तालुक्यामध्ये एकूण 34 हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी विभागीय आयुक्त पुणे यांनी 24 हरकती अमान्य केल्या असून 7 हरकती मान्य केल्या आहेत व 3 हरकती अंशत: मान्य केल्या आहेत. त्याअनुषंगाने आवश्यक ते बदल करून सांगली जिल्हा परिषद व त्याअंतर्गत सांगली जिल्ह्यातील 10 पंचायत समित्यांमधील निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या अंतिम प्रभाग रचनेस विभागीय आयुक्त पुणे यांनी मान्यता दिली असल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) मोहिनी चव्हाण यांनी सांगितले. 00000

सुशिक्षीत बेरोजगारांसाठी जत येथे गुरूवारी मेळावा

सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : जत तालुक्यातील 18 ते 45 वर्षे वयोगटातील सुशिक्षीत बेरोजगारांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजना या विषयी मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा राजेरामराव महाविद्यालय जत येथे दि. 30 जून 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे. 00000

शिक्षक पात्रता परीक्षेतील पेपर क्रमांक 1 व 2 ची अंतिम उत्तरसूची प्रसिध्द

सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. 21 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची दि. 2 डिसेंबर 2021 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या परीक्षेतील पेपर क्रमांक 1 व 2 ची अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. या परीक्षेच्या पेपर क्रमांक 1 व 2 च्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी, आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे दि. 8 डिसेंबर 2021 अखेरपर्यंत पाठविण्याबात कळविण्यात आले होते. विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेवून अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आली आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन, आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत. अंतिम उत्तरसूचीनुसार MAHATET-2021 परीक्षेचा निकाल यथावकाश परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल याची संबंधित परीक्षार्थीनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी केले आहे. 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 10.23 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 10.23 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 13.60 (105.25), धोम 4.22 (13.50), कन्हेर 2.39 (10.10), वारणा 10.23 (34.40), दूधगंगा 5.61 (25.40), राधानगरी 2.37 (8.36), तुळशी 1.38 (3.47), कासारी 0.88 (2.77), पाटगांव 1.07 (3.72), धोम बलकवडी 0.75 (4.08), उरमोडी 4.29 (9.97), तारळी 2.06 (5.85), अलमट्टी 48.42 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 2100, धोम 522, कण्हेर 250, वारणा 557, दुधगंगा 50, राधानगरी 800, तुळशी 100, कासारी 0.0, पाटगांव 0.0, धोम बलकवडी 0.0, उरमोडी 475, तारळी 0.0 व अलमट्टी धरणातून 810 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 15.11 (45), आयर्विन पूल सांगली 4.0 (40) व अंकली पूल हरिपूर 4.1 (45.11). 00000

टाळून अंमली पदार्थांचे सेवन वाचवू तरूण पिढीचे जीवन

अंमली पदार्थांची ‍विक्री करताना टोळीला अटक, रेल्वे फूटपाथवर चालतो अंमली पदार्थांचा धंदा, तरूणांना अंमली पदार्थांचा विळखा, अंमली पदार्थांच्या सेवनाने दोघांचा मृत्यू, विमानतळावर तीन कोटींचे ड्रग्ज सापडले, दोघांना अटक अशा आशयाच्या बातम्या आपण रोज प्रसार माध्यमांमध्ये वाचतो, ऐकतो. आजची बहुसंख्य तरूण पिढी अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. पालकांना तरूणांना यापासून रोखण्याची समस्या सतावत आहे. यासाठी शासनही बऱ्याच उपाययोजना, कायदे करत आहे. याचाच एक भाग म्हणून शासनाने अशा पदार्थांवर बंदी घातलेली आहे. तरीही अंमली पदार्थाचे सेवन युवा पिढी प्रामुख्याने करत आहे. या अंमली पदार्थांच्या विळख्यातून सुटका व्हावी, निर्व्यसनी सक्षम पिढी घडावी यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. अंमली पदार्थाचे दुष्परिणामांची व्हावी तसेच व्यसनाधीनतेला प्रतिबंधात्मक उपाययोजनेची जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी 26 जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. अंमली पदार्थांच्या विळख्यात सहजपणे फसतात ते तरूण. एकदा का अंमली पदार्थांची चटक लागली की ती सवय बनायला वेळ लागत नाही. अंमली पदार्थांचा प्रसार रोखला नाहीतर आपली अख्खी एक पिढी उध्वस्त होवू शकते. कोणत्याही दुष्परिणामांची आणि मृत्यूची फिकर विसरायला लावणाऱ्या अंमली पदार्थांचे सेवन सतत केल्याने अनेकांचे संसार उध्वस्त आहेत. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनाचा इतिहास दरवर्षी 26 जून हा दिवस जगभरात अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो. अंमली पदार्थांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत प्रबोधन व्हावे हा या दिनामागचा उद्देश आहे. संयुक्त राष्ट्राने सन 1987 पासून अंमली पदार्थ हा विषय महत्वाचा मानला आहे. भारतात नार्कोटिक ड्रग्ज ॲण्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट 1985 (एनडीपीएस) हा अंमली पदार्थ विरोधी कायदा आहे. मालव्दीप सरकारने संयुक्त राष्ट्रांना मादक पदार्थांच्या संबंधित संमेलनासाठी अनुमोदन दिले आणि पहिले अंमली पदार्थावर आधारित संमेलन 1961 साली झाले. दुसरे संमेलन 1971 मध्ये अवैध सायकोट्रापिक पदार्थ यावर झाले. गैरकानुनी धंद्याच्या विरोधात 1988 मध्ये ‍तिसरे संमेलन झाले. या कायद्यांतर्गत अंमली वस्तू किंवा औषधांचे उत्पादन, वितरण, सेवन, विक्री, वाहतूक, साठा, वापर, आयात-निर्यातर यावर देशात बंदी आहे. प्रत्येक व्यक्ती, मुले-मुली यांच्यामध्ये जनजागृती व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाचा सामाजिक व विशेष सहाय्य विभाग विविध उपक्रम राबवित आहे. अंमली पदार्थ सेवनाची कारणे ज्या पदार्थाच्या सेवनाने माणसाला विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा किंवा धुंदी येते त्यांना अंमली पदार्थ म्हणतात. अफूपासून मोर्फिन, हिरोहीन आदि नशेले पदार्थ तयार केले जातात. कोकेन, भांग, गांजा, चरस यांचा मादक पदार्थांमध्ये समावेश होतो. तरूणाईला अंमली पदार्थांच्या नशेचे आकर्षण वाटण्याचे पहिले कारण म्हणजे त्यांचा वयोगट. तारूण्य काळामध्ये काही तरी थ्रिलर करावं अशी इच्छा खूप प्रबळ बनलेली असते. लोकांमध्ये आपलं आकर्षण वाटावं यासाठी अनेक तरूण थ्रिलर गोष्टी करताना दिसतात. अशा थ्रिलिंगची प्रचंड क्रेझ असणाऱ्या वयात शरीरामध्ये एखादा अंमली पदार्थ गेल्यास आपण जगापेक्षा कुणीतर वेगळे आहोत अशी भावना या तरूणांमध्ये निर्माण होते. भारतात अंमली पदार्थाच्या विळख्यात 14 ते 22 वयोगटातील तब्बल 40 टक्के तरूण आहेत. अंमली पदार्थाचे दुष्परिणाम दारू, सिगारेट, मावा, गुटखा, तंबाखू याचे दुष्परिणाम जगजाहीर आहेतच. ड्रग्ज व इतर व्यसनांचे परिणाम आणखी गंभीर आहेत. अंमली पदार्थांचे सेवन केल्याने शरीराची अन्नग्रहण करण्याची इच्छाच नाहीशी होते, मानसिक आजार जडतात, नजर कमी होते, स्मृतीभ्रंष, मधुमेह जडतो, मेंदूच्या कार्यावर व लैंगिक जीवनावरही परिणाम होतो. उपाय समाजातून अंमली पदार्थांच्या पुरवठ्याला प्रतिबंध घातला ‍पाहिजे. त्यासाठी नार्कोटिक ड्रग्ज ॲण्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट यासारख्या अंमली पदार्थ विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी. यावरती औषधे आहेत मात्र व्यसन हे न सांगता किंवा लपवून दिलेल्या औषधाने सुटत नाही. याचे कारण म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे व्यसन वेगळे असू शकते. व्यसन सोडायचे असेल तर तज्ज्ञांच्या मदतीने, योग्य औषधोपचार, वेळोवेळी समुपदेशन, भावनिक संतुलन यासाठी राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय (‍सिव्हील हॉस्पीटल), सांगली या ठिकाणी उपलब्ध आहे. व्यसनमुक्तीसाठी भोंदू बाबा, मांत्रिकाकडे जाण्यापेक्षा व्यसनमुक्ती केंद्रात गेले पाहिजे. प्रसार माध्यमे विशेषत: कर मनोरंजन क्षेत्राने व्यसनाचं स्तुतीकरण, गौरवीकरण, जाहिरात व्यापक समाजहिताच्या दृष्टीकोनातून कटाक्षाने टाळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपली युवा पिढी व आपली जवळची माणसे या अंमली पदार्थाच्या विळख्यापासून दूर रहावीत यासाठी प्रत्येक जबाबदार नागरिकाने शासनास सहकार्य तर केलेचे पाहिजे आणि जनजागृतीसाठी प्रत्येकाने आपला सहभाग देणे ही काळाची गरज आहे. डॉ.‍ माणिकराव शिवाजी सुर्यवंशी सायकोलॉजिस्ट, ‍सिव्हील हॉस्पीटल, सांगली संकलन -जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांसाठी 29 जूनला मिरज येथे ऑफलाईन रोजगार मेळावा

सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली कार्यालयाच्या वतीने नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांसाठी औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी दिनांक 29 जून 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत ऑफलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा रोजगार मेळावा प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र, गणपती कॅन्सर हॉस्पीटल समोर,‍ मिरज येथे होणार असून याचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे. हा रोजगार मेळावा हा ऑफलाईन / ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठी घेण्यात येणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी आपआपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे Web : https://mahaswayam.gov.in या संकेत स्थळाव्दारे लॉगीन करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदांसाठी आपला पसंतीक्रम व उत्सुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावा. तसेच आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करावी. सांगली जिल्ह्यायातील औद्योगिक क्षेत्रामधील व सेवा क्षेत्रामध्ये तसेच विविध क्षेत्रामधील नामवंत उद्योजकांनी त्यांच्याकडील उपलब्ध असणारी विविध रिक्तपदे https://mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने सुपरक्रॉफ्ट फौंड्री प्रा.लि.मिरज, नेहा इंजिटेक प्रा.लि., युरेका फोब्ज प्रा.लि., मिलेनियम मोटर्स, इस्टीम ॲपीनरियल सर्व्हीस प्रा.लि. अल्फा फौंन्ड्रीज प्रा.लि. मिरज एपीक यार्न प्रा.लि.इस्लामपूर व पुणे येथील टालेन्टेन्सू सर्व्हीस प्रा.लि., बीएसए कार्पोरेशन लि इ. नामवंत कंपन्यानी एकूण 1 हजार 65 रिक्तपदे अधिसूचित केलेली असून यामध्ये प्रामख्याने इ. 10 वी 12 वी पदवीधर, पदव्यूत्तर पदवी आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिग पदवी तसेच मेकॅनिकल इंजिनिअर्स/डिप्लोमा मेकॅनिक/ आयटीआय-डिझेल मेकॅनिक/ आयटीआय-फिटर्स/ आयटीआयवेल्डर्स/ कॅज्युअल्स वर्कस/ मेल्टींग ऑपरेटर/ हेल्पर्स/ सुपरवायझर/ व्हीएमसी/ सीएमसी ऑपरेटर/ वर्कर्स/सर्व्हिस ॲडवायझर/ सुपरवायझर/ मेकॅलिक /स्पेअरपार्ट असीस्टंट/ ऑफिस बॉय/पेंटर (टू व्हिलर)/ स्ट्रेचिंग मशिन ऑपरेटर / ॲसेब्ली लाईन ऑपरेटर/ ॲप्रेटिशिप व्दारे 1 हजार 65 रिक्तपदे अधिसुचित करण्यात आलेली आहेत. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी या मेळाव्यात भाग घ्यावा. या बाबत काही अडचण असेल तर दुरध्वनी क्रं.0233-2990333 वर किंवा E-mail-sanglirojgar@gmail.com यावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे. 00000

शुक्रवार, २४ जून, २०२२

जिल्ह्यात विविध उपक्रमाद्वारे कृषि संजीवनी सप्ताह साजरा करण्यात येणार - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ

शेतकऱ्यांनी कृषि संजिवनी सप्ताहात सहभागी होवून विविध पिकांचे तंत्रज्ञान आत्मसात करावे सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : जिल्ह्यात खरीप हंगाम 2022 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषि विभाग आणि कृषि विद्यापीठातील अधिकारी आणि शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जावून संवाद साधण्यासाठी जिल्ह्यात दि. 25 जुन ते 1 जुलै 2022 "कृषि संजीवनी सप्ताह" साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी लक्षात घेता त्यांच्या 1 जुलै जयंती दिनानिमित्त कृषि दिन साजरा करुन कृषि संजिवनी सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषि संजिवनी सप्ताहात सहभागी होवून विविध पिकांचे तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी केले आहे. या कार्यक्रमात 25 जून 2022 रोजी विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार मुल्यसाखळी बळकटीकरण दिन आयोजीत करण्यात येणार असून या दरम्यान बिजप्रक्रिया मोहिम गावा-गावात बिजप्रक्रिया रथ फिरवून समुह बिजप्रक्रिया करुन दिली जाणार आहे. तसेच बियाणे वितरण, मिनीकिट वितरण केले जाणार आहे. 26 जून रोजी पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करण्यात येणार असून पौष्टिक तृणधान्य पिकांचे प्रक्रिया मुल्यवर्धन तसेच प्रक्रिया केंद्राना प्रत्यक्ष भेटीचे आयोजन करण्यात येणार आहे. पौष्टीक तृण धान्याचे आहारात असणारे अनन्य साधारण महत्वा याबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 27 जुन 2022 रोजी महिला कृषि तंत्रज्ञान सक्षमिकरण दिवस जिल्हास्तरावर साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमांतर्गत पिकतंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, महिला चर्चासत्र व परिसंवाद तसेच महिलांना वापरण्यायोग्य शेतीतील यंत्र सामुग्री याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 28 जून 2022 खत बचत दिन, 29 जून 2022 प्रगतशिल शेतकरी संवाद दिवस, 30 जून 2022 शेती पुरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे श्री. वेताळ यांनी सांगितले. 00000

गुरुवार, २३ जून, २०२२

जिल्ह्यात आटपाडी तालुक्यात 10 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.2 मि. मी. पावसाची नोंद झाली असून आटपाडी तालुक्यात सर्वाधिक 10 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 3.0 (55.1), जत 0.0 (75.1), खानापूर-विटा 0.2 (40.8), वाळवा-इस्लामपूर 0.1 (38.8), तासगाव 0.0 (48.9), शिराळा 1.3 (47.2), आटपाडी 10 (48.2), कवठेमहांकाळ 0.0 (52.9), पलूस 0.0 (33.5), कडेगाव 1.3 (46.7). 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 10.35 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 10.35 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 14.16 (105.25), धोम 4.35 (13.50), कन्हेर 2.48 (10.10), वारणा 10.35 (34.40), दूधगंगा 5.79 (25.40), राधानगरी 2.23 (8.36), तुळशी 1.41 (3.47), कासारी 0.66 (2.77), पाटगांव 0.97 (3.72), धोम बलकवडी 0.75 (4.08), उरमोडी 4.42 (9.97), तारळी 2.08 (5.85), अलमट्टी 48.63 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 2100, धोम 526, कण्हेर 400, वारणा 570, दुधगंगा 1000, राधानगरी 0.0, तुळशी 100, कासारी 0.0, पाटगांव 0.0, धोम बलकवडी 0.0, उरमोडी 550, तारळी 0.0 व अलमट्टी धरणातून 821 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 16.6 (45), आयर्विन पूल सांगली 4.0 (40) व अंकली पूल हरिपूर 3.8 (45.11). 00000

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 11.7 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.2 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 11.7 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 3.8 (52.1), जत 0.4 (75.1), खानापूर-विटा 5.8 (40.6), वाळवा-इस्लामपूर 6.9 (38.7), तासगाव 4.1 (48.9), शिराळा 11.7 (45.9), आटपाडी 1.1 (37.5), कवठेमहांकाळ 3.9 (52.9), पलूस 0.3 (33.5), कडेगाव 1.1 (45.4). 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 10.43 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 10.43 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 14.45 (105.25), धोम 4.40 (13.50), कन्हेर 2.52 (10.10), दूधगंगा 5.88 (25.40), राधानगरी 2.23 (8.36), तुळशी 1.42 (3.47), कासारी 0.65 (2.77), पाटगांव 0.97 (3.72), धोम बलकवडी 0.75 (4.08), उरमोडी 4.46 (9.97), तारळी 2.10 (5.85), अलमट्टी 48.70 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 2100, धोम 763, कण्हेर 400, वारणा 575, दुधगंगा 1000, राधानगरी 0.0, तुळशी 100, कासारी 0.0, पाटगांव 0.0, धोम बलकवडी 0.0, उरमोडी 550, तारळी 180 व अलमट्टी धरणातून 810 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 15.9 (45), आयर्विन पूल सांगली 4.0 (40) व अंकली पूल हरिपूर 3.8 (45.11). 00000

बुधवार, २२ जून, २०२२

मिरज शहरात वाहतूक ‍नियमन

सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे कामकाज जलद गतीने होण्यासाठी या रस्त्याचा हिरा हॉटेल चौक पासून ते मिशन हॉस्पिटल चौक पर्यंतचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करून या मार्गावरील वाहतूक खालील मार्गावरून वळविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. पंढरपूर कडून मिरज स्थानक, कोल्हापूर कडे जाणारी वाहतूक - मिशन हॉस्पिटल चौक - वंटमुरे कॉर्नर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन (संविधान चौक) - सुखनिवास (रेल्वे स्टेशन) - स्टेशन चौक मार्गे मिरज स्थानक - कोल्हापूर आणि कोल्हापूर कडून सांगली व पंढरपूर कडे जाणारी वाहतूक - स्टेशन चौक - सुखनिवास (रेल्वे स्टेशन) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन (संविधान चौक) - वंटमुरे कॉर्नर मार्गे सांगली, पंढरपूर मार्गे वरून वळविण्यात आल्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच वाहतुक सुरक्षा उपाययोजनेव्दारे वाहतुक नियंत्रीत करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्गमीत केले आहेत. 00000

नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांसाठी 29 जूनला मिरज येथे ऑफलाईन रोजगार मेळावा

सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली कार्यालयाच्या वतीने नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांसाठी औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी दिनांक 29 जून 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत ऑफलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा रोजगार मेळावा प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्र, गणपती कॅन्सर हॉस्पीटल समोर,‍ मिरज येथे होणार असून याचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे. हा रोजगार मेळावा हा ऑफलाईन / ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठी घेण्यात येणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी आपआपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे Web : https://mahaswayam.gov.in या संकेत स्थळाव्दारे लॉगीन करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदांसाठी आपला पसंतीक्रम व उत्सुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावा. तसेच आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करावी. सांगली जिल्ह्यायातील औद्योगिक क्षेत्रामधील व सेवा क्षेत्रामध्ये तसेच विविध क्षेत्रामधील नामवंत उद्योजकांनी त्यांच्याकडील उपलब्ध असणारी विविध रिक्तपदे https://mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने सुपरक्रॉफ्ट फौंड्री प्रा.लि.मिरज, नेहा इंजिटेक प्रा.लि., युरेका फोब्ज प्रा.लि., मिलेनियम मोटर्स, इस्टीम ॲपीनरियल सर्व्हीस प्रा.लि. अल्फा फौंन्ड्रीज प्रा.लि. मिरज एपीक यार्न प्रा.लि.इस्लामपूर व पुणे येथील टालेन्टेन्सू सर्व्हीस प्रा.लि., बीएसए कार्पोरेशन लि इ. नामवंत कंपन्यानी विविध रिक्तपदे यामध्ये प्रामख्याने इ. 10 वी 12 वी पदवीधर, पदव्यूत्तर पदवी आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिग पदवी तसेच मेकॅनिकल इंजिनिअर्स/डिप्लोमा मेकॅनिक/ आयटीआय-डिझेल मेकॅनिक/ आयटीआय-फिटर्स/ आयटीआयवेल्डर्स/ कॅज्युअल्स वर्कस/ मेल्टींग ऑपरेटर/ हेल्पर्स/ सुपरवायझर/ व्हीएमसी/ सीएमसी ऑपरेटर/ वर्कर्स/सर्व्हिस ॲडवायझर/ सुपरवायझर/ मेकॅलिक /स्पेअरपार्ट असीस्टंट/ ऑफिस बॉय/पेंटर (टू व्हिलर)/ स्ट्रेचिंग मशिन ऑपरेटर / ॲसेब्ली लाईन ऑपरेटर/ ॲप्रेटिशिप व्दारे 1 हजार पेक्षा जास्त रिक्तपदे अधिसुचित करण्यात आलेली आहेत. जास्तीत जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी या मेळाव्यात भाग घ्यावा. या बाबत काही अडचण असेल तर दुरध्वनी क्रं.0233-2990333 वर किंवा E-mail-sanglirojgar@gmail.com यावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे. 00000

निवेदनांच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची पुणे, अमरावती व नाशिक येथे जन सुनावणी

‍ सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त झालेल्या ‍निवेदनांच्या अनुषंगाने पुणे, अमरावती व नाशिक येथे आयोगाने जन सुनावणी आयोजित केली आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे चे संशोधन अधिकारी मेघराज भाते यांनी दिली. विभागनिहाय सुनावणी दिनांक, वेळ, ठिकाण व कंसात सुनावणीस उपस्थित राहणाऱ्या जाती/ जमातीचे नाव पुढीलप्रमाणे. पुणे - दि. 30 जून 2022 रोजी दुपारी 2 पासून व्ही.व्ही.आय.पी. शासकीय विश्रामगृह पुणे येथे (सगर, कडिया, कुलवाडी, टकारी, लिंगायत रड्डी). अमरावती - दि. 5 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह अमरावती येथे (हलवाई, हलबा कोष्टी, अहिर गवळी, गवळी अहीर, अहीर, गुरूडी, गुरूड, गुरड, कापेवार, गु. कापेवार, गुरूड कापेवार, गुरूडा कापेवार इत्यादी, हडगर, तेलंगी ऐवजी तेलगी अशी दुरूस्ती करणेबाबत, केवट समाजातील तागवाले/तागवाली. नाशिक - दि. 15 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह नाशिक येथे (काथार/कठहारवाणी, कंसारा, अत्तार जाती व तत्सम जात पटवे, पटवेगर, पटोदर, बैरागी जातीच्या संदर्भात शासन निर्णयात दुरूस्ती, चेवले गवळी दाभोळी, गवळी व लिंगायत गवळी, नावाडी) तर दि. 16 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह नाशिक येथे (वळंजूवाणी, कुंकारी वळांजूवाणी, वळुंज, बळुंज, शेटे, दलाल इत्यादी, लाडशाखीय वाणी, लाडवंजारी, रामगडिया सिख, कानडे/कानडी). 00000

बुधवार, १५ जून, २०२२

प्रलंबित न्यायीक प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात स्पेशल ड्राईव्ह - सहाय्यक धर्मादाय आयुक्त वर्षा बिरहारी

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी विशेष मोहिम सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात प्रलंबित न्यायीक प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी स्पेशल ड्राईव्ह 2022 आयोजित करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 5 वर्षे व 10 वर्षे प्रलंबित असलेल्या न्यायीक प्रकरणांचा, अर्जांचा जलद गतीने निपटारा करण्याकरिता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सांगली येथे नोंदणीकृत असलेल्या सर्व न्यासांच्या, संस्थांच्या विश्वस्तांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त वर्षा बिरहारी यांनी केले आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी बार असोसिएशनच्या सर्व विधी तज्ञांनी त्यांच्याकडील प्रलंबित असलेली 5 वर्षे व 10 वर्षे प्रकरणे/अर्ज निकाली करण्याकरिता आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करून ही मोहिम यशस्वीरित्या पूर्ण करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त वर्षा बिरहारी यांनी केले आहे. 00000

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील निर्लेखित साहित्य खरेदीसाठी 20 जून पूर्वी निविदा पाठविण्याचे आवाहन

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगलीच्या भांडार विभागामध्ये निर्लेखित झालेले व निरूपयोगी असलेल्या तसेच प्रात्यक्षिकानंतर जमा झालेले स्क्रॅप जॉब व इतर निरोपयोगी साहित्यांची विक्री करावयाची आहे. हे स्क्रॅप साहित्य संस्थेतून घेवून जाण्याकरिता विविध अटीवर सिलबंद पध्दतीने दोन लिफाफ्यात म्हणजेच तांत्रीक लिफाफा व अंतांत्रिक लिफाफामध्ये निविदा मागवून विक्री करण्याचे ठरविले आहे. तरी इच्छुकांनी अटी व शर्ती मान्य असल्यास खरेदीकरीता निविदा सिलबंद दोन पाकिटामध्ये दि. 20 जून 2022 पूर्वी संस्थेच्या कार्यालयीन पत्त्यावर पाठवाव्यात. प्राप्त निविदा दि. 20 जून रोजी दुपारी 4 वाजता संस्थेत उघडण्यात येतील, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. अटी व शर्ती तसेच अधिकच्या माहितीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली, पद्मभूषण वसंतदादा औद्योगिक वसाहत, सांगली येथे संपर्क साधावा. 00000

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 20 जूनला

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. माहे जून 2022 या महिन्यातील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन दि. 20 जून 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिली. 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 10.90 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 10.90 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 16.54 (105.25), धोम 4.91 (13.50), कन्हेर 2.80 (10.10), दूधगंगा 6.52 (25.40), राधानगरी 2.42 (8.36), तुळशी 1.54 (3.47), कासारी 0.59 (2.77), पाटगांव 1.11 (3.72), धोम बलकवडी 0.75 (4.08), उरमोडी 4.82 (9.97), तारळी 2.27 (5.85), अलमट्टी 49.12 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 2100, धोम 730, कण्हेर 300, वारणा 593, दुधगंगा 1050, राधानगरी 300, तुळशी 100, कासारी 125, पाटगांव 250, धोम बलकवडी 0.0, उरमोडी 550, तारळी 180 व अलमट्टी धरणातून 450 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 15.11 (45), आयर्विन पूल सांगली 3.9 (40) व अंकली पूल हरिपूर 4.8 (45.11). 00000

मंगळवार, १४ जून, २०२२

लहान गावांच्या पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर चालवा - पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : पाणी पुरवठा योजनांची विद्युत देयके वेळेत न भरल्याने पाणी पुरवठा योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे जेथे जेथे जागा उपलब्ध आहे तेथे तेथे छोट्या गावांच्या नळ पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर चालवाव्यात. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करावे, असे निर्देश देूवन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी 30 जून अखेर पर्यंत प्रस्तावित नळ पाणी पुरवठा योजनांचे कार्यादेश निर्गमित करण्याचे विभागाचे धोरण आहे, त्यामुळे यंत्रणांनी तातडीने आराखडे सादर करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. सांगली जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा योजनांबाबत माधवनगर रोड येथील शासकीय विश्रामगृह येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, प्रकल्प संचालक जल जीवन मिशन तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता) विजयसिंह जाधव,ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता एस. एम. कदम, उपकार्यकारी अभियंता बी. जे. सोनवणे आदि उपस्थित होते. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत एकूण 706 योजनांचा परिपूर्ण प्रकल्प आराखडे तयार करण्यात आले असून त्यापैकी 586 योजनांच्या कामांना तांत्रिक तर 485 कामांना प्रशासकीय मान्यता मिळून निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. 356 कामांना कार्यादेश देण्यात आले असून यातील 314 कामे सुरू आहेत. तर 42 कामे पूर्ण झाली आहेत. सांगली जिल्ह्याचे जल जीवन मिशन अंतर्गत काम चांगले असले तरी या कामांवर झालेला खर्च तुलनेने कमी दिसत आहे. जल जीवन मिशन अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांच्या निधी उपलब्धतेत केंद्राचा वाटा 50 टक्के, राज्याचा वाटा 50 टक्के व लोकवर्गणी 10 टक्के आहे. ही योजना 2024 पर्यंत राबविण्यात येणार असल्याने विहीत कालावधीमध्ये कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी यंत्रणांनी दर आठवड्याला कामांच्या प्रगतीचा आढावा घ्यावा. नळ पाणी पुरवठा योजनांवर होणाऱ्या खर्चाचा ताळमेळ काटेकोरपणे घ्यावा. या योजनेच्या कामातील गैरव्यवहार खपवून घेतले जाणार नाहीत. अधिकाऱ्यांनी योजनेशी आपली कामे विहीत मुदतीत पूर्ण करावीत, असे सांगून पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील 26 योजना प्रस्तावित असून यातील 6 योजनांचे कार्यादेश दिले आहेत. या सर्वच्या सर्व योजनांची कामेही गतीने सुरू करावीत, असे निर्देश यंत्रणांना दिले. पाणी हा विषय संवेदनशिल असल्याने पाणीपुरवठ्या विषयी निवेदन घेवून येणाऱ्यांशी अधिकाऱ्यांनी सौजन्यपूर्ण वर्तन ठेवावे अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. नळ पाणी पुरवठा योजनेतील कामांबाबत ज्या कंत्राटधारांचा पुर्वानुभव चांगला नाही त्यांना कामे देवू नयेत. जे कंत्राटदार कामे विहीत मुदतीत व गुणवत्तापूर्ण करू शकतील त्यानांच कामे द्यावीत. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेकडील भुयारी गटार योजना कामांचा आढावा घेवून दीर्घ कालावधीनंतरही कामे वेळेत पूर्ण न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. भुयारी गटार योजना, शेरीनाला, वारणा उद्भवातून पाणी पुरवठा योजना या विषयांबाबत मंत्रालयात लवकराच बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार अनिल बाबर यांनीही पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर घेण्यात याव्यात यासाठी आग्रही प्रतिपादन केले. तसेच आटपाडी साठी पाणीपुरवठा योजना तयार करताना ती ‍बिनचूक असावी याबाबत दक्षता घ्यावी, असे सांगितले. 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 10.95 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 10.95 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 16.96 (105.25), धोम 4.97 (13.50), कन्हेर 2.82 (10.10), दूधगंगा 6.61 (25.40), राधानगरी 2.42 (8.36), तुळशी 1.55 (3.47), कासारी 0.61 (2.77), पाटगांव 1.14 (3.72), धोम बलकवडी 0.75 (4.08), उरमोडी 4.87 (9.97), तारळी 2.29 (5.85), अलमट्टी 49.92 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 2100, धोम 688, कण्हेर 300, वारणा 595, दुधगंगा 1050, राधानगरी 0.0, तुळशी 100, कासारी 125, पाटगांव 250, धोम बलकवडी 0.0, उरमोडी 475, तारळी 180 व अलमट्टी धरणातून 450 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 15.3 (45), आयर्विन पूल सांगली 3.6 (40) व अंकली पूल हरिपूर 4.11 (45.11). 00000

जिल्ह्यात तासगाव तालुक्यात 3.2 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.6 मि. मी. पावसाची नोंद झाली असून तासगाव तालुक्यात सर्वाधिक 3.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.0 (46.4), जत 0.0 (72.4), खानापूर-विटा 0.2 (34.5), वाळवा-इस्लामपूर 0.0 (31), तासगाव 3.2 (41.4), शिराळा 2.6 (29.5), आटपाडी 0.0 (33.4), कवठेमहांकाळ 1 (43), पलूस 0.0 (23), कडेगाव 0.0 (35.7). 00000 जिल्ह्यात तासगाव तालुक्यात 3.2 मि.मी. पावसाची नोंद सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.6 मि. मी. पावसाची नोंद झाली असून तासगाव तालुक्यात सर्वाधिक 3.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.0 (46.4), जत 0.0 (72.4), खानापूर-विटा 0.2 (34.5), वाळवा-इस्लामपूर 0.0 (31), तासगाव 3.2 (41.4), शिराळा 2.6 (29.5), आटपाडी 0.0 (33.4), कवठेमहांकाळ 1 (43), पलूस 0.0 (23), कडेगाव 0.0 (35.7). 00000

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य केलेले असल्याने जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर 3 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्राबाबत समिती निर्णय घेते. जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राआभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये यास्तव ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केला नाही त्यांनी ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केला आहे त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्वरित अर्ज सादर करावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक तथा जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समित्या मुख्य समन्वयक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे. 00000

सोमवार, १३ जून, २०२२

सांगली जिल्ह्यात उद्यमिता यात्रा २०२२ ला सुरूवात

उद्योग आणि स्थानिक बाजार निर्मितीला चालना देण्यासाठी ही ऐतिहासिक चळवळ ठरेल - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यामध्ये उद्यमिता यात्रेचा प्रारंभ करण्यात आला असून या उपक्रमाच्या माध्यमातून जे छोटे उद्योजक आहेत, विशेषत: ज्या महिला उद्योजक आहेत, कोरोनामुळे घरातल्या कमवित्या पुरूषांचा मृत्यू झाल्यामुळे आता उद्योग करू इच्छितात अशा महिला व इतर छोटे उद्योजका यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. छोटे उद्योजक, महिला उद्योजकांना प्रशिक्षणानंतरही मदत व मार्गदर्शनाचे काम आपण एकत्रितपणे करू. स्थानिक रोजगाराच्या निर्मितीसाठी, स्थानिक व्यवसायची निर्मिती होणे ही काळाची निकड झालेली आहे. व्यवसाय मार्गदर्शन आणि निर्मितीचा उपक्रम हाती घेतलेली ही उद्यमिता यात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तळागाळातील लोकांना उद्योजक घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. स्थानिक रोजगार, उद्योग आणि स्थानिक बाजार निर्मितीला चालना देण्यासाठीची ही एक ऐतिहासिक चळवळ ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सांगली जिल्हा उद्यमिता यात्रेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यतीन पारगावकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील गवळी, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त जमीर करीम, युथ एड फांऊडेशन पुणे चे संस्था प्रमुख मॅथ्यू मट्टम, युथ एड फांऊडेशनचे जिल्हा समन्वयक ज्ञानू कांबळे आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, शासकीय योजनांचा लाभ कशा पध्दतीने घ्यावा, उत्पादन पॅकेजींग करून विकणे, त्याला मार्केट उपलब्ध करून देणे या छोट्या उद्योजकांना येणाऱ्या अडचणी संदर्भात सांगली जिल्ह्यात तीन दिवसाचे प्रशिक्षण घेतले जात आहे. याला निगडीत संस्था, सांगली जिल्ह्यातील सेवा सदन ट्रस्ट मदत करत आहे. शासनाची विविध कार्यालयेही या प्रकल्पासाठी जोडली गेली आहेत. एक पाऊल स्वयंरोजगाराकडे या हेतूने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि युथ एड फाउंडेशन यांच्या एकत्रित प्रयत्नामधून लघु उद्योजकतला प्रोत्साहन देणारा उपक्रम उद्यमिता यात्रा आहे. कोरोना महामारीचा फटका भारतालाही बसला. या एकंदरीत परिस्थितीचा विपरीत परिणाम ग्रामीण तसेच शहरी अर्थव्यवस्थेवर झाला. अनेकांच्या रोजगारावर त्यामुळे गदा आली आहे. लघु आणि मध्यम व्यवसाय बंद झाले. आता कोरोना ओसरला असताना या सर्व गोष्टींसाठी काम करणे गरजेचे बनले आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीने राज्यातल्या लघु व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्याचे काम हाती घेतलेले आहे. या अनुषंगाने युथ एड फाउंडेशन महाराष्ट्र शासनाच्या पुढाकारातून राज्यभर उद्यमिता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 10 मे रोजी मुंबईतून या यात्रेची सुरूवात झाली असून प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात 13 ते 15 जून या कालावधीत सांगली व कवठेमहांकाळ येथे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. त्यात व्यवसायाचे नियोजन करणे, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची ओळख करून त्याच्याशी जोडून देणे, त्यासाठी लागणाऱ्या अटीची पूर्तता करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे, आर्थिक तसेच डिजिटल साक्षर करणे, त्या त्या भागाच्या अनुषंगाने व्यवसायांचे पर्याय सुचवणे, व्यवसायासाठी बाजारात संधी कशा प्रकारे शोधल्या पाहिजेत या बद्दल माहिती देणे, जिल्हा उद्यमिता विभागाला त्यांना जोडून देणे अशा अनेक महत्वाच्या विषयासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. नव्या व्यावसायिकांना बीज भांडवलासाठी देखील मदत करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार असून या यात्रेच्या पहिल्या टप्प्यात डिसेंबर 2022 पर्यंत राज्यात नवे 4 हजार छोटे व्यावसायिक निर्माण करणे हा यात्रेचा मुख्य हेतू आणि उद्देश असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातून मोठ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असते. अशावेळी, स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळाल्यास स्थलांतराचा वेग कमी करता येईल. सोबतच स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालनाही देता येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. 00000

जिल्ह्यात कडेगाव तालुक्यात 5 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.4 मि. मी. पावसाची नोंद झाली असून कडेगाव तालुक्यात सर्वाधिक 5 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.8 (46.4), जत 0.0 (72.4), खानापूर-विटा 2.2 (34.3), वाळवा-इस्लामपूर 1.4 (31), तासगाव 0.4 (38.2), शिराळा 0.8 (26.9), आटपाडी 0.8 (33.4), कवठेमहांकाळ 1.3 (42), पलूस 4.1 (23), कडेगाव 5 (35.7). 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 10.98 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 10.98 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 17.17 (105.25), धोम 5.03 (13.50), कन्हेर 2.85 (10.10), दूधगंगा 6.69 (25.40), राधानगरी 2.42 (8.36), तुळशी 1.56 (3.47), कासारी 0.61 (2.77), पाटगांव 1.16 (3.72), धोम बलकवडी 0.75 (4.08), उरमोडी 4.91 (9.97), तारळी 2.31 (5.85), अलमट्टी 49.12 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 2100, धोम 674, कण्हेर 150, वारणा 597, दुधगंगा 1050, राधानगरी 0.0, तुळशी 150, कासारी 125, पाटगांव 250, धोम बलकवडी 0.0, उरमोडी 475, तारळी 180 व अलमट्टी धरणातून 450 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 15.10 (45), आयर्विन पूल सांगली 3.9 (40) व अंकली पूल हरिपूर 5.2 (45.11). 00000

रविवार, १२ जून, २०२२

विटा नगरवाचनालयाचा स्मृती-सुगंध हा ऐतिहासिक ग्रंथ सर्वांना उपयोगी ठरेल - पालकमंत्री जयंत पाटील

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : विटा-खानापूर परिसरातील सर्व इतिहासाचा मागोवा घेवून माहितीचे संकलन करून तयार करण्यात आलेला विटा नगरवाचनालयाचा स्मृती-सुगंध हा ग्रंथ अत्यंत सुरेख व सुबक असा ग्रंथ आहे. हा ऐतिहासिक ग्रंथ सर्वांना उपयोगी ठरेल, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. विटा येथील जय मल्टीपर्पज हॉल येथे विटा नगरवाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वाचनालयाच्या 150 वर्षाचा आढावा घेणाऱ्या स्मृती-सुगंध ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री जयंत पाटील बोलत होते. यावेळी सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ व मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार अनिल बाबर, माजी आमदार राजेंद्र देशमुख, माजी आमदार सदाशिव पाटील, सरसेनापती संताजी घोरपडे यांचे 12 वे वंशज उदयराजे घोरपडे, ॲड. बाबासाहेब मुळीक, ॲड. संदीप मुळीक, इंद्रजित देशमुख, अविनाश पाटील, जिल्हा परिषद व विटा नगरपालिका आजी व माजी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, खानापूर तालुक्यातील व्यक्तींचे योगदान, ऐतिसासिक वास्तुंचे महत्व व घटनांचा उल्लेख करून आवश्यक माहिती देवून ॲड. बाबासाहेब मुळीक व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वांच्या वाचनासाठी स्मृती-सुगंध ग्रंथ उपलब्ध केला आहे. इतिहासाला विसरायच नसतं, जो इतिहास विसरतो त्याचे भवितव्य अंधकारमय होवू शकते. सर्वांच्या समोर अत्यंत उत्तम शब्दात ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी स्मृती-सुगंध हा ग्रंथ मांडला आहे. या ग्रंथात महान व्यक्ती, महत्वपूर्ण योगदान दिलेले लोकप्रतिनिधी, आरोग्य, शिक्षण, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्तींचा, जुन्या वास्तु, शिलालेख व त्यावरील मजकूर यांचा उल्लेख प्रकाशात आणण्याचे काम झाले आहे. हे सर्व काही कागदावर आले असल्याने हा महत्वपूर्ण दस्तऐवज प्रदीर्घ काळ टिकून राहील, असे ते यावेळी म्हणाले. विटा नगरवाचनालय 1869 साली सुरू झाले होते. फार वर्षापासून खानापूर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात असून आता या भागात पाणी आले आहे. या भागात साखरेचा समृध्दीचा वारसा उभा करावा. प्रतिकूल परिस्थितीत कसे जगायचे असते हे खानापूर तालुका वासियांनी सर्वांना शिकवले आहे. निसर्गाची साथ नसताना जगाच्या पाठीवर जावून कोठेही आपले विश्व निर्माण करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. प्रचंड जिद्द, आत्मसन्मान, कष्ट, योग्य मार्गाने केलेला प्रगतीचा हट्टास या भागातील सर्वात मोठा इतिहासाचा वारसा आहे. स्मृती-सुगंध हा ग्रंथ प्रत्येकाने जतन करणे, तालुक्यातील प्रत्येक वाचनालयात ठेवणे, पुढच्या पिढीला वाचण्यासाठी आग्रह करणे आवश्यक असल्याचे सांगून सांगली जिल्ह्याचेही अशा प्रकारचे पुस्तक तयार करण्यात यावे, असे ते यावेळी म्हणाले. मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, ब्रिटीशांच्या हुकूमशाहीखाली हा देश असताना 1869 मध्ये विटा सारख्‍या छोट्या शहरात वाचनालय उभे करण्यात आलेले आहे. वाचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन व्हावे, लोकांना ज्ञान मिळावे, ज्ञानाच्या माध्यमातून समाजामध्ये सुधारणा व्हावी या कल्पनेने त्यावेळी वाचनालयाची सुरूवात झाली असावी असे सांगून राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, सध्या मोबाईलमुळे नवीन पिढीत वाचनाची आवड दिवसेंदिवस कमी होत असल्याचे पहावयास मिळत आहे. लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे, बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाज प्रबोधन, स्वातंत्र्य लढ्याची चळवळ, वाचनाची आवड या गोष्टींना दिशा देण्याचे काम केले. याचा पाया 1930-40 च्या काळात रचला गेला. यामधून स्वातंत्र्यानंतर देशाची पुढची घडी कसी असावी याचा बोध मिळाला. विटा नगरवाचनालयाच्या उपक्रमासाठी मराठी भाषा खात्याच्या माध्यमातून 5 लाख रूपयांचा निधी देण्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. वाचनालयासाठी आणखी काही पुस्तके घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. जादा निधीची गरज भासल्यास तो कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. नगरवाचनालयाची परंपरा चांगल्या भावनेतून जोपासाठी व सुधारावी. यातून पुढच्या पिढीला चांगली दिशा मिळेल. अशा प्रकारच्या सांगली जिल्ह्याच्या पुस्तिकेसाठीही जो काही निधी लागेल तो मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते खानापूर तालुक्याच्या 150 वर्षाच्या ऐतिहासिक वाटचालीत योगदान दिलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर व त्यांचा वारसांचा सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी केले. यावेळी त्यांनी विटा नगरवाचनालय 14 जून 1869 रोजी स्थापन झाले असल्याचे सांगून 150 वर्षाच्या वाटचालीत ज्यांनी योगदान दिले त्यांच्या कारकिर्दीचा आढावा, शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी, शेती, गलाई, कुकुटपालन, उद्योग, सहकार या क्षेत्रात ज्यांनी योगदान दिले त्यांची नोंद स्मृती-सुगंध या ग्रंथात घेण्यात आली असल्याचे सांगितले. 00000

शुक्रवार, १० जून, २०२२

सैनिक मुला-मुलींच्या वसतिगृहात प्रवेशासाठी 24 जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : सैनिक मुला-मुलींचे वसतीगृह सांगली येथे शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता सेवारत, माजी सैनिक, विधवा, सिव्हिलियन यांच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना गुणवत्तेच्या आधारावर सवलतीच्या दरात प्रवेश देण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी संबंधित वसतीगृहातून प्रवेश अर्ज प्राप्त करून भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रासह 24 जून 2022 पर्यंत जमा करावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजया पांगारकर यांनी केले आहे. पहिली प्रवेश फेरी जून 2022 अखेर आयोजित करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांची 2022-23 ची प्रवेश परीक्षा न झाल्याने किंवा सीईटी परीक्षा लांबणीवर पडल्याने जून पर्यंत होणार नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी 40 टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार असून त्यांच्यासाठी दुसरी प्रवेश फेरी ऑगस्ट मध्ये आयोजित करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली दूरध्वनी क्रमांक 0233-2990712, अधिक्षक सैनिकी मुलांचे वसतीगृह सांगली मो.क्र. 9657259073, अधिक्षिका सैनिकी मुलींचे वसतिगृह सांगली दूरध्वनी क्र. 9960190991 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन श्रीमती पांगारकर यांनी केले आहे. 00000

कवठेमहांकाळ येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांच्या शासकिय निवासी शाळेत मोफत प्रवेश सुरू

सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये मेगराज मंदिर जत रोड कवठेमहांकाळ येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांच्या शासकिय निवासी शाळेत नियमित सत्र 2022-23 करीता सहावी ते दहावी सेमी इंग्लिश माध्यममध्ये मोफत प्रवेश देणे सुरू झाले आहे. या शाळेत प्रवेश अर्ज सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत विनामूल्य मोफत उपलब्ध असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक यांनी दिली. या शाळेत अनुसूचित जाती 80 टक्के, अनुसूचित जमाती 10 टक्के, विमुक्त व भटक्या जाती जमाती 5 टक्के, विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के आणि दिव्यांगासाठी 3 टक्के राखीव आरक्षीत प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेशासाठी शाळा सोडल्याचा दाखला (टीसी), गुणपत्रिका, तहसीलदार उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, बँक पासबुक, संचयिका पुस्तक, वैद्यकीय प्रमाणपत्र व पालकाचे हमीपत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे. या शाळेत सर्व सुविधा मोफत दिल्या जातात, असे शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

अनुवंशिक सुधारणा कार्यक्रमांतर्गत जातीवंत जनावरांच्या नोंदणीसाठी पशुपालकांना 15 जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यामध्ये सन 2022-23 मध्ये जिल्ह्यातील गायी म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वसमावेशक अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी होण्याकरीता जिल्ह्यातील पशुपालकांकडील जातीवंत जनावरांची निवड करून नोंदणी करण्यात येणार आहे. नोंदणीकृत जातीवंत गायी व म्हशींपासून तयार होणाऱ्या कालवडी व रेड्या यांना 6 महिन्यांच्या कालावधीनंतर प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 5 हजार रूपये देण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत निवडलेल्या देशी व संकरीत गायी -म्हशींच्या कृत्रिम रेतनासाठी उच्च दर्जाच्या रेतमात्रा वापरण्यात येणार आहे. त्यासाठी पशुपालकांनी त्यांच्या जवळच्या पशुवैद्यकिय संस्थेशी संपर्क साधून त्यांच्याकडील गायी व म्हशींचे अर्ज दि. 15 जुलै 2022 पर्यंत भरून द्यावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय धकाते यांनी केले आहे. 00000

सिव्हील हॉस्पीटल येथे नेत्रतज्ज्ञ डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन साजरा

सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : प्रतिवर्षी दि. 10 ते 16 जून या कालावधीत डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन सप्ताह साजरा केला जातो. त्या अनुषंगाने पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय, सांगली (सिव्हील हॉस्पीटल सांगली) येथे नेत्रतज्ज्ञ डॉ. भालचंद्र यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सप्ताहाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, उप अधिष्ठाता डॉ. गुरव, जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, डॉ. सचिन पाटणकर यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दृष्टी दाता कर्मयोगी डॉ. रामचंद्र लक्ष्मणराव भालचंद्र यांचा जन्मदिवस दि. 10 जून 1926 व मृत्यू दिन दि. 10 जून 1979 असून 1982 सालापासून दि. 10 जून हा दिवस डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन साजरा केला जात असल्याचे सांगितले. जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील म्हणाले, डॉ. भालचंद्र यांनी एकूण 80 हजार नेत्र शस्त्रक्रिया त्या काळामध्ये यशस्वीरित्या केल्या असल्याचे सांगून भारतात अंधत्व दूर करण्यासाठी स्वतंत्रपणे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम सन 1976 पासून राबविण्यात येत असल्याचे सांगितले. या कार्यक्रम प्रसंगी डॉ. गायत्री खोत, डॉ. अर्चना कसबे, जे. जी. बाबर, आर. बी. कोथळे, नेत्रदान समुपदेशक अविनाश शिंदे, अभिनंदन पाटील तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील कर्मचारी, बाह्यरूग्ण विभागामध्ये तपासणीसाठी आलेले रूग्ण व रूग्णांचे नातेवाईक उपस्थित होते. 00000

राज्यव्यापी उद्यमिता यात्रे अंतर्गत उमेदवारांनी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या बदलेल्या ठिकाणाची नोंद घ्यावी - सहायक आयुक्त ज. बा. करीम

सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली आणि युथ एड फाउंडेशन पुणे व ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था मिरज यांच्या मार्फत संपूर्णत: विना अनुदान तत्वावरील राज्यव्यापी उद्यमिता यात्रे अंतर्गत सांगली जिल्ह्यात 13 ते 15 जून 2022 या कालावधीत पंचायत समिती मिरज येथे सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत तीन सत्रामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम होणार होते. तथापी काही कारणास्तव हा कार्यक्रम लियाड इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट ॲन्ड डिझाईन हायस्कूल रोड, वखारभाग, चेंबर्स ऑफ कॉमर्स, पंजाब नॅशनल बँकेजवळ, सांगली या ठिकाणी होणार आहे. उमेदवारांनी बदलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणाची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे. 00000

आला पावसाळा आरोग्य सांभाळा

आपल्याकडे सर्वसाधारण प्रत्येक वर्षी जून महिन्यात मान्सून येतो व पावसाळ्यास सुरूवात होते. पावसाळ्यात दूषित पाणी, अन्न, डास यामुळे कॉलरा, गॅस्ट्रो (अतिसार), अंमाश, विषमज्वर ( टायफॉईड), काविळ, लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, सर्दी, खाकला, स्वाईन फल्यू आदी ‍साथीचे रोग होण्याची शक्यता असते. या रोगांपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यायला हवी. स्वत:चे आरोग्य सांभाळण्यासाठी जाणून घेवूया विविध रोगांची लक्षणे, प्रसार व खबरदारीच्या उपाययोजनांबाबत.. गॅस्टो (अतिसार) विविध जीवाणू, विषाणू व परजीवी यांच्यामुळे अतिसार होतो. या रोगाचा प्रसार दूषित पाणी, अन्न, भाजीपाला, दूध यांच्या सेवनाने होतो. माशांमुळे रोगप्रसार होण्यास मदत होते. वारंवार पातळ शौचास होणे, उलटी होणे, पोटात कळ येणे, ताप येऊन अश्क्तपणा येणे, जलशुष्कता येणे ही या रोगाची लक्षणे आहेत. लहान मुले, अशक्त व कुपोषित बालके, वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव असणाऱ्या व्यक्ती हा या आजाराचा अति जोखमिचा गट आहे. या रोगाचे निदान रूग्णांच्या शौच तपासणीव्दारे केले जाते. कॉलरा व्हिब्रिओ कॉलरा नावाच्या जीवाणूमुळे हा आजार होतो. दूषित पाणी व अन्न यामुळे हा अजार पसरतो. परिसर अस्वच्छतेमुळे, माशांचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे या रोगाची साथ उद्भवण्याची शक्यता असते. वारंवार जुलाब व उलटी, अतिशय तहान लागणे, पोटात कळा येणे, पायात गोळे येणे, शरीरातील पाणी व क्षार कमी झाल्यामुळे जलशुष्कता संभवते, गंभीर अवस्थेत रक्त दाब कमी होणे, लघवी कमी होणे, शरीराचे तापमान कमी होणे इत्यादी या रोगाची लक्षणे आहेत. वैयक्तिक अस्वच्छता असणारे, अस्वच्छ परिसरात राहणारे, वारंवार सार्वजनिक ठिकाणी अन्नपदार्थ/ पेय सेवन करणारे हा या रोगाचा अति जोखमिचा गट आहे. या रोगाचे निदान रूग्णांच्या शौच तपासणीव्दारे केले जाते. विषमज्वर (टाइफॉईड) सालमोनेला टाईफी या जीवाणूमुळे हा आजार होतो. यालाच मुदतीचा ताप असेही म्हणतात. दूषित पाणी व अन्नाव्दारे, अस्वच्छ हात, दुषित बर्फ याव्दारे या रोगाचा प्रसार होतो. सर्दी/फ्ल्यू सारखी सुरूवात होणे, वाढत जाणारा भरपूर ताप, डोकेदुखी, जीभेवर पांढरा थर साचतो ही या रोगाची लक्षणे आहेत. वारंवार सार्वजनिक ठिकाणी अन्न खाणारे लोक हे या रोगाचा अति जोखमिचा गट आहे. या रोगाचे निदान रक्ताची तपासणी (विडाल टेस्ट) व्दारे केले जाते. अमांश (डिसेंट्री) अमिबा या एकपेशीय आदिजीवामुळे होणारा हा आजार आहे. दूषित पाणी व अन्नाव्दारे या रोगाचा प्रसार होतो. पोटात दुखणे, शौचात आव व रक्त पडणे, वारंवार शौचास जावेसे वाटणे ही या रोगाची लक्षणे आहेत. वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव असणाऱ्या व्यक्ती वसतिगृहे उपहारगृहे, खाणावळी तसेच उघड्यावर अन्न खाणारे हे या रोगाचा अति जोखमिचा गट आहे. या रोगाचे निदान लक्षणावरून व शौच तपासणीव्दारे केले जाते. पिण्याच्या पाण्याबाबत नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी हे करा : (१) पिण्यासाठी निर्जंतुक पाण्याचा वापर करा. (२) 20 मिनिटे उकळून थंड केलेले पाणी प्यावे. (३) विहीरीचे किंवा कूपनलिकेचे पाणी पिऊ नये. (४) नळ गळती त्वरीत दुरूस्त करावी. (५) पाण्यात तुरटी फिरवून, क्लोरीन द्रावणाचा वापर करावा. (६) पाण्याची नियमित तपासणी करा. (७) पाणी शुध्दीकरणासाठी घरगुती साधनांचा वापर करावा. (८) पाण्याची भांडी नियमित स्वच्छ करावी. हे टाळा : (१) नळाची पाईप गटार, डबकी यांतून घेणे टाळा. (२) घरगुती नळ कनेक्शनसाठी पीव्हीसी पाईपचा वापर टाळा. अन्नपदार्थांबाबत नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी हे करा : (१) ताजे शिजलेले गरम अन्न खा. (२) भाज्या व फळे वापरापूर्वी स्वच्छ व वाहत्या पाण्यात धुवा. (३) दुधासारखे पातळ पदार्थ उकळून प्या. (४) स्वयंपाकापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवा. (५) अन्न उघड्यावर ठेवू नका. हे टाळा : (१) उघड्यावरील अन्न खाणे टाळा. (२) बाहेर खाणे, पिणे टाळा. (३) शिळे अन्न खाणे टाळा. (४) गाड्यावरील खाद्यपदार्थ तसेच फळांचे ज्यूस पिणे टाळा. कावीळ काविळ हा विषाणूमुळे होणारा आजार असून हिपॅटाईटिस ए व इ या विषांणूमुळे होणारी काविळ दुषित पाण्यामुळे / अन्नाव्दारे होते. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने दूषित पाण्याव्दारे, दूषित व उघड्यावरील अन्न खाल्यामुळे होतो. रूग्णाची भूक मंदावते, अशक्तपणा व थकवा जाणवतो, मळमळते, उलटी, ताप, पोटदूखी अशी लक्षण दिसतात, लघवी, डोळे व त्वचा पिवळी होते ही या रोगाची लक्षणे आहेत. गरोदर स्त्रिया हा या रोगाचा अति जोखमिचा गट आहे. या रोगनिदानासाठी रक्ताची व लघवीची तपासणी केली जाते. लेप्टोस्पायरोसिस दूषित पाण्यापासून पसरणारा व लेप्टोस्पायरा या जीवाणूमुळे होणारा हा आजार आहे. रोगबाधित प्राणी (उंदीर, डुक्कर, गायी, म्हशी, कुत्री) यांच्या लघवीव्दारे बाहेर पडलेल्या जंतूमुळे दूषित झालेले पाणी, माती यांचा त्वचेवरील जखमांशी संपर्क आल्यामुळे रोगप्रसार होतो. तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, थंडी वाजणे, कावीळ, रक्तस्त्राव, डोळे सुजणे, मूत्रपिंड व यकृताचे काम बंद पडून मृत्यू येऊ शकतो ही या आजाराची लक्षणे आहेत. अनवाणी पायांनी शेतात काम करणारे, जनावरांची निगा राखणारे, पूरांच्या दूषित पाण्यामध्ये काम करणारे हा या आजाराचा अति जोखमिचा गट आहे. रोगनिदान रक्त व लघवीची तपासणी करून केले जाते. खबरदारीचे उपाय - दूषित पाणी, माती यांच्याशी संपर्क टाळावा, रबरी बूट, हातमोजे याचा वापर करावा, आजारी जनावरांवर त्वरीत उपचार करावेत, आजारी जनावचरांच्या लघवीचा मानवी संपर्क टाळावा, हातापयांना जखमा असल्यास अन्टीसेप्टिक मलमाचा वापर करावा, तसेच दूषित पाण्याशी संपर्क टाळावा. शौचाबाबत घ्यावयाची खबरदारी शौचालयाचा वापर करा, शौचास जाऊन आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवा, मलमूत्राची योग्य विल्हेवाट लावा, बाळांची शी धुतल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. लहान मुलांना उघड्यावर शौचास बसवणे टाळा. वैयक्तिक स्वच्छता नियमितपणे हाताची नखे कापा, स्वयंपाकापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवा, शौचाहून आल्यानंतर साबणाने हात स्वच्छ धुवा. परिसर स्वच्छता मलमूत्रची योग्य विल्हेवाट लावा, तुंबलेल्या गटारी वाहत्या ठेवा, आपला परिसर स्वच्छ ठेवा, माशांचा प्रादुर्भाव होणार नाही याची खबरदारी घ्या, कचऱ्यांचे ढिग साचू देऊ नका, कचरा उठावाबाबत वेळीच महापालिकेला सूचना करा. डेंग्यू ताप साठलेल्या पाण्यात वाढणाऱ्या एडिस ईजीप्ती जातीच्या डासाच्या चाचण्यामुळे हा रोग पसरतो. हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. एडिस ईजीप्ती डासाच्या पायावर तसेच पाठीवर पांढरे पट्टे असल्यामुळे तो इतर डासांपेक्षा वेगळा दिसतो. संसर्गित एडिस ईजीप्ती मादी डासाच्या चावण्यामुळे हा रोग पसरतो. भरपूर ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, डोळ्यांच्या खोबण्या दुखणे, गंभीर आजारात नाकातून, हिरड्यातून रक्तस्त्राव होणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची लक्षणे आहेत. लहान मुले, गरोदर स्त्रिया हा या आजाराचा अति जोखमिचा गट आहे. रक्त तपासणीव्दारे रोगनिदान केले जाते. हिवताप (मलेरिया) हा रोग डासामार्फत पसरणाऱ्या परजीवीमुळे होतो. वाढते शहरीकरण व नागरिकीकरण हा रोग पसरविण्यास करणीभूत ठरतात. पावसाळा ऋतूमध्ये हा रोग जास्त आढळतो. संसर्गित ॲनॉफिलीस डासांच्या मादीमार्फत हा रोग पसरतो. खूप हुडहूडी भरून ताप येणे, डोकेदुखी, मळमळ, अशक्तपणा, यकृताला व प्लीहाला सूज येणे, मेंदूला दाह होणे ही या आजाराची लक्षणे आहेत. गरोदर स्त्रिया, वृध्द व्यक्ती, बांधकाम करणारे मजूर हे या आजाराचा अति जोखमिचा गट आहे. रक्त तपासणीव्दारे रोगनिदान केले जाते. डासांव्दारे पसरणाऱ्या आजाराबाबत घ्यावयाची खबरदारी हे करा - आपल्या परिसरात घराभोवती पाणी साठू देऊ नका. साठलेल्या पाण्यावरती थोडेसे रॉकेल टाका त्यामुळे डासांच्या अळ्या नष्ट होतील. घराच्या आजूबाजूला डबकी असतील तर त्यात गप्पी मासे सोडा. दर आठवड्याला एकदा तरी पाण्याची भांडी रिकामी करा. डास घरात शिरू नयेत म्हणून खिडक्यांना जाळ्या लावा. हात पाय झाकले जातील असे अंगभर कपडे वापरा. डासांचा उपद्रव होत असेल तर डास पळवून लावणाऱ्या किटकनाशकांचा वापर करावा. आपल्या भागात किटक नाशकांची फवारणी होत असल्यास पथकाला सहकार्य करा. झोपताना मच्छरदानी वापरा. घराभोवती फुटके डब्बे, वापरलेले जुने टायर्स, नारळाच्या करवंट्या यामध्ये पाणी साचू देऊ नका. घरातील हौद, फुलदाण्या, कुलर्स इत्यादी नियमित स्वच्छ करा. छतावरील वेंट पाईपला जाळी लावा. आठवड्यांतून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. नेहमीची पाणी साठवण्याची भांडी एक दिवस कोरडी ठेवावीत. हे टाळा - उघड्यावर झोपणे टाळा. घराभोवती डबकी साचू देऊ नका. पाण्याचा साठा जास्त ठेवू नका. घराभोवती कचरा साठू देऊ नका. डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होऊ देवू नका. कोणताही ताप हा हिवताप असू शकतो म्हणून नजीकच्या दवाखान्यात त्वरीत रक्त तपासणी करून घ्या. चिकनगुनिया हा रोग एडिस ईजीप्ती हा डास चावल्यामुळे होतो. हा देखील विषाणूमुळे होणारा आजार आहे. संसर्गित एडिस ईजीप्ती मादी डासांच्या चावल्यामुळे हा रोग पसरतो. ताप येणे, सांधेदुखी, पुरळ येणे ही या रोगाची लक्षणे आहेत. लहान मुले व गरोदर स्त्रिया हा या रोगाचा अति जोखमिचा गट आहे. रक्त तपासणीव्दारे रोगनिदान केले जाते. स्वाईन फ्ल्यू हा विषाणूमुळे ( एच १ एन १ इन्फलुएन्झामुळे) होणारा आजार आहे. याचा संसर्ग स्वाईन फ्ल्यू बाधित एका माणसापासून दुसऱ्या माणसाला होतो. रूग्णांच्या शिंकण्यातून व खोकण्यातून हे विषाणू हवेव्दारा दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. ताप येणे, खोकला येणे, घसा दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, क्वचित प्रसंगी अतिसार, उलट्या होणे ही या रोगाची लक्षणे आहेत. स्वाईन फ्ल्यू विषाणूची तपासणी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे आणि हाफकिन संस्था मुंबई येथे करण्यात येते. खबरदारीचे उपाय - हात सातत्याने साबण व स्वच्छ पाण्याने धुवावे. पौष्टिक आहार घ्यावा. लिंबु, आवळा, संत्री, मोसंबी, हिरव्या पालेभाज्या यासारख्या सी विटामिन असलेल्या पदार्थांचा आहारात वापर करावा. खोकताना, शिंकताना तोंडावर रूमाल धरावा. भरपूर पाणी प्यावे. पुरेशी झोप घ्यावी. स्वाईन फ्ल्यू रूग्णांपासून किमान 6 फूट दूर रहावे. लक्षणे दिसताच 36 तासांच्या आत उपचार सुरू करावेत. संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

जिल्ह्यात जत तालुक्यात 2.6 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.5 मि. मी. पावसाची नोंद झाली असून जत तालुक्यात सर्वाधिक 2.6 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 0.0 (39.4), जत 2.6 (71.1), खानापूर-विटा 0.1 (19.5), वाळवा-इस्लामपूर 0.0 (26.1), तासगाव 0.0 (15.4), शिराळा 0.1 (19.7), आटपाडी 0.0 (27.3), कवठेमहांकाळ 0.0 (26.8), पलूस 0.0 (15.9), कडेगाव 1.6 (27). 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 11.08 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 11.08 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 17.98 (105.25), धोम 5.16 (13.50), कन्हेर 2.89 (10.10), दूधगंगा 7.05 (25.40), राधानगरी 2.42 (8.36), तुळशी 1.59 (3.47), कासारी 0.51 (2.77), पाटगांव 1.18 (3.72), धोम बलकवडी 0.75 (4.08), उरमोडी 5.03 (9.97), तारळी 2.36 (5.85), अलमट्टी 48.70 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 2100, धोम 173, कण्हेर 150, वारणा 602, दुधगंगा 1400, राधानगरी 0.0, तुळशी 150, कासारी 125, पाटगांव 250, धोम बलकवडी 0.0, उरमोडी 525, तारळी 180 व अलमट्टी धरणातून 450 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 15.7 (45), आयर्विन पूल सांगली 3.0 (40) व अंकली पूल हरिपूर 4.4 (45.11). 00000

गुरुवार, ९ जून, २०२२

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी ई-केवायसी जुलै 2022 पुर्वी करणे बंधनकारक - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी आपली e-KYC पूर्ण केली नाही त्यांनी तात्काळ e-KYC जुलै 2022 पुर्वी करणे बंधनकारक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. केंद्र शासनाकडील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पी. एम. किसान पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची e-KYC करण्यासाठी विशेष जनजागृती करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. त्या अनुषंगाने सध्यस्थितीत दि. 8 जून 2022 अखेर जिल्ह्यातील 4 लाख 36 हजार 584 नोंदणीकृत लाभार्थी पैकी 2 लाख 42 हजार 37 लाभार्थ्यांचे e-KYC प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. तसेच उर्वरित 1 लाख 94 हजार 547 लाभार्थ्यांचे e-KYC प्रमाणिकरण प्रलंबित आहे. पी. एम. किसान योजनेचे दोन हजार रूपयाचे तीन हप्ते एक वर्षासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून देण्यात येत आहेत आणि ते हप्ते चालु ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची e-KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपली e-KYC पूर्ण करून घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना पी. एम. किसानसाठी e-KYC अपडेट करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे. सर्वात प्रथम प्रधानमंत्री किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे. वेबसाईटवर आल्यानंतर पेजच्या उजव्या बाजुला दिसणाऱ्या e-KYC वर क्लिक करावे. त्यानंतर आधार क्रमांक व कॅप्चा कोड टाकून सर्च वर क्लिक करावे. त्यानंतर जो आधार कार्डशी लिंक आहे तो मोबाईल नंबर टाकावा व Get OTP वर क्लिक करावे आणि OTP प्राप्त झाल्यानंतर तो भरावा व सबमिट करावे. पी.एम. किसान योजनेंतर्गत ऑफलाईन e-KYC प्रक्रिया सीएससी केंद्रावर जावून करता येईल. पीएम किसान योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यात दि. 8 जून 2022 पर्यंत तालुकानिहाय नोंदणीकृत लाभार्थी, e-KYC पूर्ण झालेले लाभार्थी, e-KYC प्रलंबित असलेल्या लाभार्थींची संख्या व सीएससी व्दारे केलेली e-KYC अनुक्रमे पुढीलप्रमाणे. आटपाडी - 31 हजार 930, 15 हजार 898, 16 हजार 32, 9 हजार 715. जत - 73 हजार 636, 43 हजार 831, 29 हजार 805, 31 हजार 607. कडेगाव - 36 हजार 942, 20 हजार 823, 16 हजार 119, 9 हजार 403. कवठेमहांकाळ - 30 हजार 568, 16 हजार 291, 14 हजार 277, 10 हजार 860. खानापूर - 27 हजार 132, 12 हजार 19, 15 हजार 113, 6 हजार 266. मिरज - 57 हजार 880, 29 हजार 516, 28 हजार 364, 18 हजार 910. पलूस - 25 हजार 669, 14 हजार 11, 11 हजार 658, 5 हजार 310. शिराळा - 37 हजार 919, 23 हजार 916, 14 हजार 3, 14 हजार 570. तासगाव - 44 हजार 456, 24 हजार 631, 19 हजार 825, 16 हजार 312. वाळवा - 70 हजार 452, 41 हजार 101, 29 हजार 351, 26 हजार 97. 00000

सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्याची प्रलंबित कामे तातडीने पुर्ण करा : वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई,दि.९ : सांगली जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्याला मजबूत कुंपण उभारणे, जल मृदसंधारण करणे,गवत कुरण विकास करणे, वन वणवा नियंत्रण ही कामे प्राधान्याने करून या क्षेत्रातील वन समस्यांबाबत स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून तात्काळ कामे मार्गी लावावीत असे आदेश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयातील दालनात सांगली जिल्ह्यातील पलुस व कडेगाव वन विभागाच्या क्षेत्रातील समस्यासंदर्भात आयोजित बैठकीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते.यावेळी या बैठकीला आमदार अरुण लाड, अप्पर प्रधान मुख्यवनसरंक्षक श्री.बेंझ, उपसचिव वने भानुदास पिंगळे,विभागीय वन अधिकारी विशाल माळी,किरण लाड,कुंडलिक ऐडके उपस्थित होते. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातील एकमेव असे मानव निर्मित अभयारण्य आहे. अभयारण्यातील वन विभागातंर्गत करता येतील अशी कामे स्थानिक ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेवून पूर्ण करण्यात यावीत.या अभयारण्याला मजबूत कंपाउंड नसल्यामुळे या अभयारण्यातील प्राणी शेतीचे नुकसान करतात त्याचबरोबर प्राणी देखील दगावण्याच्या घटना घडतात अशा तक्रारी आहेत.अभयारण्याच्या विकासाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जी कामे करता येणे शक्य आहेत त्याचा तात्काळ प्रस्ताव बनवावा आणि ही कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत.या भागात अवैध वृक्षतोडी संदर्भातही वन विभागाने तात्काळ कारवाई करावी.सागरेश्वर अभयारण्य उत्कृष्ट पध्दतीने विकसीत करावे जेणेकरून या अभयारण्यामध्ये पर्यटन देखील वाढण्यास मदत होईल.आजच्या बैठकीनंतर या अभयारण्या संदर्भात दहा दिवसाच्या आत केलेल्या कार्यवाहीची माहिती सादर करावी अशा सूचना वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी बैठकीत दिल्या. आमदार अरुण लाड म्हणाले, सागरेश्वर अभयारण्य विकसित करण्याबाबत वन विभागाने तातडीने पाऊले उचलावीत.तसेच या भागातील अवैध वृक्षतोड थांबवून सागरेश्वर अभयारण्यामध्ये हरणांकरिता चारा उपलब्ध करावा.सागरेश्वर अभयारण्य विकसित करताना स्थानिक ग्रामस्थांना विचारात घेवून वन विभागाने कामे करावीत अशा सूचना बैठकीत केल्या. 00000

बँकांतर्फे सांगली येथे ग्राहक जनसंपर्क अभियान

सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : भारत सरकार वित्त मंत्रालय व राज्यस्तरीय बँकर्स समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत बँकांतर्फे “ग्राहक जनसंपर्क अभियान” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व बँकांच्या सक्रीय सहभागातून अग्रणी जिल्हा कार्यालय सांगली यांच्यावतीने “क्रेडीट ऑउटरिच कॅम्प” हा कार्यक्रम सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य कार्यालय, सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहात बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी बँक ऑफ इंडियाचे उप महाप्रबंधक मिलिंद गवसाने, उप विभागीय प्रबंधक किरण पाठक, जिल्हा उद्योग केंद्राचे महाप्रबंधक संतोष गवळी, उप कृषि अधीक्षक प्रियंका भोसले, अग्रणी जिल्हा प्रबंधक महेश हरणे, आर्थिक साक्षरता केंद्र प्रमुख लक्ष्मीकांत कट्टी आदि उपस्थित होते. यावेळी श्री. होनमोरे यांनी पीएमएफएमई योजनेंतर्गत सर्व प्रलंबित प्रस्ताव पूर्ण करुन, ग्रामीण भागातील महिला, शेतकरी व तरुण उद्योजक यांना जिल्हा बँक परिपूर्ण सहयोग करील अशी ग्वाही दिली. उपस्थित सर्व मान्यवरांनी विविध शासकीय योजना, आर्थिक प्रगतीसाठी शेती व छोटे-मोठे उद्योग विकासासाठी बँक कटिबद्ध असल्याचे संगितले. जिल्हा परिषदेचे अतुल नांदरेकर यांनी बचत गटांना सुलभतेने कर्ज उपलब्ध करण्याचे आवाहन केले. आर्थिक साक्षरता केंद्र प्रमुख लक्ष्मीकांत कट्टी यांनी आर्थिक साक्षरतेची गरज व महत्व विशद केले. या प्रसंगी मागील वर्षी शासकीय योजना प्रभावीपणे राबवून उत्कृष्ट काम केलेल्या 38 कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच सर्व बँकांच्या 72 लाभार्थ्यांना मंजूरी पत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या मेळाव्यास आलेल्या व्यक्तींना बँकेच्या विविध योजनांची माहिती देणे, लाभार्थीना मंजुरीपत्र वाटप करणे, आर्थिक साक्षरता समुपदेशन, विविध जनसुरक्षा योजनांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या शाखा, व्यवसाय समन्वयक, अधिकारी आणि कर्मचारी यांना पुरस्कृत करणे इत्यादीचे प्रयोजन केले होते. या कार्यक्रमास सर्व बँक व शासकीय विभागाचे पदाधिकारी, ग्राहक, 200 पेक्षा अधिक लाभार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रदीप साळुंखे व राजश्री कुलकर्णी यांनी केले. बँक ऑफ इंडिया सांगली शाखेचे मुख्य प्रबंधक राजकुमार बार यांनी आभार मानले. 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 11.10 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 11.10 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 18.16 (105.25), धोम 5.16 (13.50), कन्हेर 2.90 (10.10), दूधगंगा 7.19 (25.40), राधानगरी 2.42 (8.36), तुळशी 1.61 (3.47), कासारी 0.61 (2.77), पाटगांव 1.21 (3.72), धोम बलकवडी 0.75 (4.08), उरमोडी 5.06 (9.97), तारळी 2.38 (5.85), अलमट्टी 48.41 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 2100, धोम 173, कण्हेर 150, वारणा 400, दुधगंगा 1300, राधानगरी 0.0, तुळशी 150, कासारी 125, पाटगांव 250, धोम बलकवडी 0.0, उरमोडी 525, तारळी 180 व अलमट्टी धरणातून 450 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 16.4 (45), आयर्विन पूल सांगली 3.0 (40) व अंकली पूल हरिपूर 4.5 (45.11). 00000

जिल्ह्यात जत तालुक्यात 27.1 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 8.1 मि. मी. पावसाची नोंद झाली असून जत तालुक्यात सर्वाधिक 27.1 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 4.5 (39.4), जत 27.1 (68.5), खानापूर-विटा 3.1 (19.4), वाळवा-इस्लामपूर 2.2 (26.1), तासगाव 7.2 (15.4), शिराळा 0.6 (19.6), आटपाडी 15.1 (27.3), कवठेमहांकाळ 8.9 (26.8), पलूस 9.5 (15.9), कडेगाव 5.6 (25.4). 00000

बुधवार, ८ जून, २०२२

खते व बियाणे निविष्ठा उपलब्धतेसाठी अडचणी उद्भवल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

सांगली दि. 8 (जि.मा.का.) : खरीप हंगाम 2022 साठी खते व बियाणे निविष्ठा उपलब्धतेसाठी अडचणी उद्भवल्यास जिल्ह्यामध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी 0233-2601412, 0233-2601413, 0233-2372718 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी केले आहे. 00000

खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज

सांगली जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. जिल्ह्यात खरीपाची 633 व रब्बीची 103 गावे आहेत. जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 8 लाख 61 हजार हेक्टर असून निव्वळ लागवडीखालील क्षेत्र 5 लाख 76 हजार 903 हेक्टर आहे. यामध्ये सिंचनाखालील क्षेत्र 3 लाख 63 हजार 890 हेक्टर असून भूपृष्ठावरील सिंचीत क्षेत्र 2 लाख 80 हजार 747 हेक्टर आहे. ठिबक सिंचनाचे क्षेत्र 56 हजार 700 हेक्टर तर 83 हजार 219 विहीरी जिल्ह्यात आहेत. कृषी विभागाने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दर्जेदार खते, बी-‍बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी तसेच साठेबाजीला आळा घालण्यासाठी नियोजन केले आहे. खरीप हंगामासाठी सांगली जिल्हा कृषी विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यात भात, खरीप ज्वारी, रब्बी ज्वारी, बाजरी, मका, तूर, मुग, उडीद, भुईमुग, सोयाबीन, ऊस, गहू, हरभरा यासारखी पिके प्रामुख्याने घेतली जातात. गतवर्षी जिल्ह्यात 1 लाख 24 हजार 977 हेक्टर क्षेत्रावर ऊसाची त्याखालोखाल 56 हजार 124 हेक्टर क्षेत्रावर बाजरीची, 51 हजार 755 हेक्टरवर सोयाबीन, 44 हजार 651 हेक्टरवर मका, 38 हजार 791 हेक्टरवर खरीप ज्वारी यांची पेरणी झाली. तर खरीप हंगाम सन 2022-23 साठी 1 लाख 22 हजार 800 हेक्टर क्षेत्रावर ऊस, 60 हजार हेक्टर क्षेत्रावर बाजरी, 38 हजार 800 हेक्टर क्षेत्रावर खरीप ज्वारी, 44 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर मका, 38 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर भुईमुग, 51 हजार 800 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, 18 हजार 200 हेक्टरवर उडीद, 15 हजार 700 हेक्टरवर भात, 11 हजार 800 हेक्टरवर तूर, 9 हजार 500 हेक्टरवर मूग, 8 हजार 300 हेक्टरवर इतर कडधान्य पेरणीचे उद्दिष्ट असून उत्पादन व उत्पादकता या दोहांमध्ये वाढ करण्यासाठीही जिल्ह्यातील शेतकरी आणि विभाग प्रयत्नशील आहेत. सांगली जिल्ह्यात गत काही वर्षांमध्ये पर्जन्यमान चांगले राहिले आहे. गतवर्षी 770 मि.मी. पाऊस जिल्ह्यात झाला आहे. खरीप हंगाम सन 2022 साठी 64 हजार 24 क्विंटल बियाणांची आवश्यकता असून महाबीजकडून या हंगामासाठी 15 हजार 175 क्विंटल तर खाजगीरित्या 22 हजार 815 क्विंटल बियाणांची उपलब्धता आहे. यामध्ये शेतकऱ्यांकडे 63 हजार 336 क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध आहे. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी, एनपीके अशा विविध प्रकारची 1 लाख 51 हजार 530 मेट्रीक टन खतांची उपलब्धता आहे. तर सध्याचा शिल्लक साठा 43 हजार 111 मेट्रीक टनाचा आहे. रासायनिक खतांचा वापर कमी करून पर्यायी खतांचा वापर वाढविण्याचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. नॅनो युरियाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असून सध्या सांगली जिल्हा नॅनो युरिया वापरामध्ये राज्यात अग्रेसर आहे. जीवाणू खत वापरासाठी बीज प्रक्रिया मोहिम हाती घेण्यात आली आहे. पोटॅशला पर्यायी खतांचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. ऊस पिकासाठी बेसल व भरणी डोसेसमध्ये BIO-Enriched Organic Mannure चा वापर केल्यास रासायनिक खतांमध्ये 30 ते 40 टक्के बचत व खर्चात 50 टक्केपर्यंत बचत होणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये साधारणपणे 2 हजार 249 बियाणे, 2 हजार 947 खते व 2 हजार 450 कीटकनाशके परवानाधारकांच्या माध्यमातून कृषि निविष्ठांचा पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी गुणवत्तापूर्ण निविष्ठा वितरीत व्हाव्या यासाठी कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभाग यांनी मिळून 32 गुणनियंत्रण निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. सन 2021-22 मध्ये 30 बियाणे व 11 रासायनिक खते अप्रमाणित नमुन्यांवर केसेस दाखल केल्या आहेत. 104 बियाणे, 140 रासायनिक खते व 14 कीटकनाशके परवानाधारकांवर निलंबनांची कारवाई कृषी विभागाने केली आहे. तर 11 बियाणे, 39 रासायनिक खते व 44 कीटकनाशके परवानाधारकांना विक्री बंदी करण्यात आली आहे. खरीप हंगाम सन 2022-23 साठी निविष्ठा गुणनियंत्रण नियोजन करण्यात आले असून 11 भरारी पथके जिल्ह्यात स्थापन केली आहेत. जिल्हास्तरावर 30 मार्च पासून सनियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून 15 हजार 880 शेतकऱ्यांना 7 हजार 940 हेक्टर क्षेत्रासाठी ठिबकचा तर 140 शेतकऱ्यांना 115 हेक्टरसाठी तुषार सिंचन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील 1 लाख 42 हजार 223 शेतकऱ्यांना तर रब्बी हंगामासाठी 79 हजार 430 शेतकऱ्यांना सन 2021-22 मध्ये 2 हजार 188 कोटी 11 लाख रूपये कर्ज विविध बँकाच्या माध्यमातून वितरीत करण्यात आले आहे. सन 2022-23 मध्येही बँकनिहाय पतपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असून खरीपसाठी 1 हजार 994 कोटी 64 लाख तर रब्बीसाठी 855 कोटी 37 लाख रूपये पीक कर्ज वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना विनासहायास, विनाविलंब पीक कर्ज वितरण करण्याचे आदेश सर्व बँकांना दिले आहेत. शेतकऱ्यांनी 75 ते 100 मि. मी. पाऊस झाल्याशिवाय व जमिनीमध्ये पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये. खरीप हंगाम 2022 साठी खते व बियाणे निविष्ठा उपलब्धतेसाठी अडचणी उद्भवल्यास जिल्ह्यामध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी 0233-2601412, 0233-2601413, 0233-2372718 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. श्रीमती वर्षा पाटोळे जिल्हा माहिती अधिकारी, सांगली ०००००

जिल्ह्यातील वारणा धरणात 11.13 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 11.13 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 18.34 (105.25), धोम 5.18 (13.50), कन्हेर 2.92 (10.10), दूधगंगा 7.31 (25.40), राधानगरी 2.46 (8.36), तुळशी 1.63 (3.47), कासारी 0.62 (2.77), पाटगांव 1.24 (3.72), धोम बलकवडी 0.75 (4.08), उरमोडी 5.12 (9.97), तारळी 2.40 (5.85), अलमट्टी 48.28 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 2100, धोम 0.0, कण्हेर 220, वारणा 400, दुधगंगा 1200, राधानगरी 500, तुळशी 200, कासारी 125, पाटगांव 0.0, धोम बलकवडी 0.0, उरमोडी 525, तारळी 180 व अलमट्टी धरणातून 450 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 16.9 (45), आयर्विन पूल सांगली 4.0 (40) व अंकली पूल हरिपूर 5.3 (45.11). 00000

प्लास्टिक बंदी अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे करा नागरिकांनीही पर्यावरणपूरक बाबींचा अधिकाधिक वापर करावा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली दि. 8 (जि.मा.का.) : दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी एकल वापर प्लास्टिक बंदी अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. जिल्ह्यात प्लास्टिक कचरा किती संकलीत झाला याचा ताळेबंद ठेवून प्लास्टिक कचऱ्याचे मुल्यांकन, संकलन, पुनर्वापर यावर भर द्यावा, असेही त्यांनी यावेळी सूचित केले. एकल वापर प्लास्टिक (एसयुपी) बंदी अंमलबजावणीसाठीची जिल्हास्तरीय कृति दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी एन. एस. औताडे, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, एकल वापर प्लास्टिक बंदी अधिनियमानुसार कोणकोणत्या बाबींवर बंदी आहे अशा बाबींची यादी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने सर्व अंमलबजावणी यंत्रणांना उपलब्ध करून द्यावी, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत या सर्व यंत्रणांनी अधिनियमाच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी अधिकारी प्राधिकृत करावेत. या अधिनियमांनुसार बंदी असणाऱ्या बाबींचे उत्पादन, विक्री, साठवण जिल्ह्यात होत नाही याची काटेकोर तपासणी करून कारवाई करावी. तसेच याबाबत जनजागृती करावी. केलेल्या कार्यवाहीचा कृती दलाच्या बैठकीत अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, नागरिकांनी प्लॅस्टिकच्या पिशव्या ऐवजी कापडी पिशव्या, बांबूपासून बनणाऱ्या वस्तू, लाकडी वस्तू अशा पर्यावरणपूरक बाबींचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. एकल वापर (सिंगल युज प्लास्टिक) प्रतिबंधीत बाबींमध्ये सजावटीसाठी प्लास्टिक व पॉलिस्टीरिन (थर्माकोल), मिठाईचे बॉक्स, आमंत्रण कार्ड व सिगारेटची पाकिटे यांची प्लास्टिक आवरणे, प्लास्टिकच्या कांड्यासह कानकोरणी, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या कांड्या, प्लास्टिकचे झेंडे, कँडी कांड्या, आईस्क्रीम कांड्या, प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी, जसे काटे, चमचे, चाकू, पिण्यासाठीचे स्ट्रॉ, ट्रे, ढवळण्या (स्टरर्स), 100 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे पीव्हीसी बॅनर्स यावर बंदी आहे. तसेच कंपोस्टेबल प्लास्टिक पिशवी (कचरा व नर्सरी साठीच्या पिशव्या सोडून), सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (कॅरी बॅग्ज, नॉन वोवन बॅग्ज सह) हॅण्डल असलेल्या व नसलेल्या, प्लास्टीक डिश, बाउल, कॅन्टेनर (डबे), ग्लास इत्यादी बाबी प्रतिबंधित आहेत. ०००००

मंगळवार, ७ जून, २०२२

इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना ‍विनामुल्य प्रवेश घेण्याचे आवाहन

सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : भटक्या जमाती व प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेंतर्गत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात रामरतन एज्युकेशन फाऊंडेशन संचलित एस. के. इंटरनॅशनल स्कुल पेठ शिराळा रोड रेठरे धरण या शाळेची शासनामार्फत निवड करण्यात आली आहे. या शाळेमध्ये धनगर समाजातील इच्छुक विद्यार्थ्यांनी विनामुल्य प्रवेश घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याबाबतच्या शासन निर्णयान्वये उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी इंग्रजी माध्यमाचा वापर होत असल्याने धनगर समाज्याचे विद्यार्थी मागे पडू नयेत तसेच उच्च शिक्षणाच्या बदलत्या परिस्थितीशी त्यांना जुळवून घेता यावे व स्पर्धेत टिकून राहता यावे या दृष्टीने या समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळामध्ये विनामुल्य प्रवेश देणे ही योजना सुरू करण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असलेल्या पाल्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेंतर्गत एकूण 100 विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये प्रवेश घेता येईल. या पेक्षा जास्त अर्ज प्रवेशाकरीता प्राप्त झाल्यास लकीड्रॉ पध्दतीने प्रवेशाकरीता निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. नवीन विद्यार्थ्यांना इयत्ता 1 ली व 2 री मध्ये प्रवेश देण्यात येईल. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगाव रोड कलानगर सांगली दुरध्वनी क्रमांक 0233-2374739 व मुख्याध्यापक एस. के. इंटरनॅशनल स्कुल पेठ शिराळा रोड रेठरे धरण ता. वाळवा, जि. सांगली यांच्या कार्यालयाशी 9404537940/9359038866/8007975005 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. चाचरकर यांनी केले आहे. 00000

क्रेडिट आउटरीच मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील बँकांतर्फे आज मेळावा नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : भारत सरकार वित्त मंत्रालय व राज्यस्तरीय बँकर्स समिती, महाराष्ट्र राज्य यांचे निर्देशानुसार दि. 6 ते 12 जून 2022 हा सप्ताह आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या “ग्राहक जनसंपर्क अभियान” अंतर्गत “आइकॉनिक सप्ताह“ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या सप्ताह अंतर्गत सांगली शहरामध्ये सर्व बँकेच्या सक्रिय सहभागातून अग्रणी जिल्हा कार्यालय, सांगली यांच्यावतीने दि. 8 जून 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत “क्रेडीट ऑउटरिच कॅम्पचे पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृह सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मुख्य कार्यालय, सांगली येथे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक महेश हरणे यांनी केले आहे. या मेळाव्यास सांगली जिल्ह्यातील सर्व बँक व इतर शासकीय विभागाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यामध्ये आलेल्या व्यक्तींना बँकेच्या विविध योजनांची माहिती देणे व लाभार्थीना मंजुरीपत्र वाटप करणे, आर्थिक साक्षरता समुपदेशन, विविध जनसुरक्षा योजनांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या शाखा, व्यवसाय समन्वयक (BC), अधिकारी आणि कर्मचारी यांना पुरस्कृत करणे इत्यादीचे प्रयोजन असल्याचे श्री. हरणे यांनी सांगितले. 00000

सोमवार, ६ जून, २०२२

कवठेएकंद येथील शासकिय निवासी शाळेत मोफत प्रवेश सुरू

सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांच्या शासकिय निवासी शाळेत नियमित सत्र 2022-23 करीता सहावी ते दहावी सेमी इंग्लिश माध्यममध्ये मोफत प्रवेश देणे सुरू झाले आहे. या शाळेत प्रवेश अर्ज सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत विनामूल्य मोफत उपलब्ध असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक यांनी दिली. या शाळेत अनुसूचित जाती 80 टक्के, अनुसूचित जमाती 10 टक्के, विमुक्त व भटक्या जाती जमाती 5 टक्के, विशेष मागास प्रवर्ग 2 टक्के आणि दिव्यांगासाठी 3 टक्के राखीव आरक्षीत प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेशासाठी शाळा सोडल्याचा दाखला (टीसी), गुणपत्रिका, तहसीलदार उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, बँक पासबुक, संचयिका पुस्तक, वैद्यकीय प्रमाणपत्र व पालकाचे हमीपत्र इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे. या शाळेत सर्व सुविधा मोफत दिल्या जातात, असे शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

बार्टी मार्फत उद्योजकता विकास प्रशिक्षण

सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सांगली द्वारा आयोजित जिल्हा उद्योजकता विकास प्रशिक्षण सुरू करण्यात आले. हे प्रशिक्षण दि. 6 जून 2022 ते 5 जुलै 2022 पर्यंत चालणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये युवकांना उद्योगाच्या अनुषंगाने विविध प्रकारचे प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन सांगली जात पडताळणी समितीचे उपायुक्त खुशाल गायकवाड, बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे, दक्षता समिती एपीआय निर्मला माने, आयटीआय कॉलेजचे प्राध्यापक संजय सदामते व प्रमुख व्याख्याते विजय पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 11.18 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 11.18 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 18.73 (105.25), धोम 5.19 (13.50), कन्हेर 2.96 (10.10), दूधगंगा 7.56 (25.40), राधानगरी 2.56 (8.36), तुळशी 1.64 (3.47), कासारी 0.65 (2.77), पाटगांव 1.26 (3.72), धोम बलकवडी 0.75 (4.08), उरमोडी 5.22 (9.97), तारळी 2.44 (5.85), अलमट्टी 47.73 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 2100, धोम 0.0, कण्हेर 220, वारणा 400, दुधगंगा 1200, राधानगरी 500, तुळशी 200, कासारी 0.0, पाटगांव 0.0, धोम बलकवडी 0.0, उरमोडी 525, तारळी 180 व अलमट्टी धरणातून 450 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 17.1 (45), आयर्विन पूल सांगली 3.6 (40) व अंकली पूल हरिपूर 4.5 (45.11). 00000

जिल्ह्यात जत तालुक्यात 15.3 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.4 मि. मी. पावसाची नोंद झाली असून जत तालुक्यात सर्वाधिक 15.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 3.6 (34.9), जत 15.3 (41.4), खानापूर-विटा 11.9 (16.3), वाळवा-इस्लामपूर 2 (23.9), तासगाव 1.8 (8.2), शिराळा 1.4 (19), आटपाडी 6.7 (12.2), कवठेमहांकाळ 8.8 (17.9), पलूस 4.2 (6.4), कडेगाव 14.2 (19.8). 00000

शुक्रवार, ३ जून, २०२२

नळपाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने एकत्रितपणे करावेत - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळपाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव तयार करताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद यांनी एकत्रितपणे प्रस्ताव तयार करावेत. या योजनांचे प्रस्ताव तयार करताना अंदाजित खर्च व योजना चालविण्यासाठी येणारा खर्च याबाबत समतोल ठेवून प्रस्ताव तयार करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता मिशन समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कदम, जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक विजयंसिंह जाधव, जि. प. उप कार्यकारी अभियंता डी. जी. सोनवले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी करताना त्याची बारकाईने तपासणी करण्यात यावी. त्याचबरोबर दीड पटीच्या वर किंमत जात असेल अशा योजनांची तपासणी करावी. जिल्ह्यामध्ये आज नवीन 9 पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मंजुरी देण्यात येत आहे. या 9 योजनांव्दारे 3 हजार 213 नळजोडण्या होतील. या योजनांची पुढील कार्यवाही तातडीने करावी. जिल्ह्यात आत्तापर्यंत 706 पाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. या सर्व योजनांचे डीपीआर तयार झालेले आहेत. यापैकी 586 योजनांना तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. 485 योजनांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून यांचे टेंडरही प्रसिध्द झाले आहे. यापैकी 339 योजनांना कार्यादेश दिले आहेत. यापैकी 307 योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत व 42 योजनांची कामे पूर्ण झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 000000

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना गोल्डन कार्ड 30 जूनपर्यंत प्रत्येक लाभार्थ्याला मिळण्यासाठी ‍नियोजन करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : सामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आरोग्याच्या विविध योजना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येतात. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सुमारे 1 हजार 209 आजारांचा समावेश आहे. यामध्ये 5 लाख रूपयापर्यंतचे उपचार मोफत केले जातात. या योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना गोल्डन कार्डचे वितरण तातडीने करण्यासाठी विशेष मोहिमांचे आयोजन करावे. यासाठी गावनिहाय याद्या तयार करून त्यांचे वाटप प्रत्येक गावात करावे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना गोल्डन कार्ड 30 जून पर्यंत प्रत्येक लाभार्थ्याला मिळेल याबाबतचे ‍नियोजन आरोग्य विभागाने करावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात प्रधानमंत्री जनआरोग्य योजना गोल्डन कार्ड वितरण आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, महानगरपालिकेचे उपायुक्त राहूल रोकडे, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. रोहित खोलकुबे, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सांगली जिल्ह्यात सुमारे 5 लाख 67 हजार 770 लाभार्थी असून यांची यादी तयार आहे. यामधील 1 लाख 43 हजार 173 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जनआरोग्य योजना गोल्डन कार्ड मिळाले आहे. उर्वरीत पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जनआरोग्य योजना गोल्डन कार्ड मिळावे यासाठी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शहरी भागांतील आरोग्य केंद्रे या ठिकाणी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी. त्याचबरोबर संग्राम केंद्रात नाममात्र शुल्क आकारून ही सुविधा उपलब्ध करावी. कार्डसाठी शासनाने निर्धारीत केलेल्या दरापेक्षा अधिकचा दर घेवू नये. यासाठी नियंत्रण ठेवण्यात यावे. तसेच प्राधिकृत केलेल्या रूग्णालयांमध्ये असे कॅम्प आयोजित करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 00000

शिष्यवृत्ती, फ्रीशिप,आरएसएमएस,निर्वाह भत्ता योजनेकरीता अर्ज भरण्यासाठी 15 जून पर्यंत मुदतवाढ

सांगली दि. 3 (जि.मा.का.) : नवीन शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये अनुसूचित जाती, विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील नवीन व नुतनीकरण अर्जदारांसाठी तसेच सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील प्रलंबित नुतनीकरण अर्जदारांसाठी शिष्यवृत्ती, फ्रीशिप, आरएसएमएस, निर्वाह भत्ता या योजनेकरीता अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी प्रणालीवर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेकरीता अर्ज भरण्यासाठी दि. 15 जून 2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी शिष्यवृत्ती, फ्रीशिप, आरएसएमएस, निर्वाह भत्ता या योजनेकरीता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी www.mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावरुन अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. अंतिम दिनांकापर्यंत सर्व योजनांचे अर्ज भरुन घ्यावेत. भविष्यात अंतिम दिनांकानंतर मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्याबाबत किंवा अशा प्रकारे कोणतीही तक्रार निर्माण झाल्यास विद्यालय/ महाविद्यालयांना सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल. याची जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित सर्व विद्यालय/ महाविद्यालयांनी गांभिर्याने नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे. 00000

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडील अनुदान व बीजभांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सांगली, दि. 3, (जि. मा. का.) : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित सांगली कार्यालयामार्फत अनुदान योजना व बीजभांडवल योजना राबविण्यात येत आहेत. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनुसूचित जाती मधील महार, नवबौध्द, हिंदू खाटीक, वाल्मीकी, मेहतर, बुरूड, मालजंगम, बेडाजंगम या प्रवर्गातील लाभार्थींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. अनुदान योजनेसाठी भौतिक उद्दिष्ट 75 असून आर्थिक 7 लाख 50 हजार रूपये आहे. तर बीजभांडवल योजनेसाठी भौतिक उद्दिष्ट 75 असून आर्थिक अनुदान 7 लाख 50 हजार रूपये व बीजभांडवल 40 लाख रूपये आहे. अनुदान योजना 50 हजार रूपये पर्यंत असून त्यामध्ये 10 हजार रूपये हे अनुदान म्हणून व 40 हजार रूपये पर्यंत बँक कर्ज लाभार्थींना दिले जाते. बीजभांडवल योजना 50 हजार रूपये ते 5 लाख रूपयांपर्यंत असून बँकेची रक्कम 75 टक्के, लाभार्थीचा सहभाग 5 टक्के, महामंडळाचे बीजभांडवल 20 टक्के व अनुदान 10 हजार रूपये दिले जाते. प्रशिक्षण योजनेसाठी भौतिक उद्दिष्ट 150 असून आर्थिक 45 लाख रूपये आहे. ही योजना अनुसूचित जातीच्या लाभरधाकांना व्यवसायासाठी लागणारे तांत्रिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी व संबंधीत तांत्रिक व्यवसाय सुरु करण्याकरीता विविध व्यवसायिक ट्रेडचे शासनमान्य संस्थामार्फत (3 महिने ते 6 महिने पर्यत) मोफत प्रशिक्षण देण्यात येते. उदा. शिवणकला, ब्युटीपार्लर, इलेक्ट्रीक वायरमन, टर्नर/फिटर, रेफ्रीजरेशन ॲन्ड एअर कंडीशनिंग, मॅकॅनिक, संगणक प्रशिक्षण, मोटर वाईडींग , फेब्रिकेटर/वेल्डींग, ऑटोमोबाईल रिपेरिंग (टु, थ्री, फोर व्हीलर), पेंटींग (ऑटोमोबाईल्स), मशरुम, वाहनचालक चर्मोद्योग, घड्याळ दुरुस्ती, फोटोग्राफी, कंपोझींग, बुक-बायडींग, सुतारकाम, मोबाईल दुरुस्ती इत्यादी. या योजनांसाठी ग्रामीण भागातील अर्जदारांना प्राधान्य असून आधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगांव रोड,संभाजीनगर सांगली, जिल्हा कार्यालय सांगली-416416, फोन नं 0233 – 2325659 या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. 00000

संभाव्य पूरपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज

हवामान विभागाने यावर्षी 100 टक्के पेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. ही कृषी व अन्य क्षेत्रांसाठी सुखावणारी बाब आहे. असे असले तरी कमी कालावधीत जास्त पाऊस पडणे, ढग फुटी सदृश्य पाऊस पडणे, धरण क्षेत्रात अतिवृष्टी यामुळे पूरस्थिती निर्माण होते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी अथवा संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासन सज्ज असून याबाबतचे योग्य नियोजन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संभाव्य पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. याबाबतच्या जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावरच्या बैठका, कर्नाटक राज्याशी असलेला समन्वय, जलसंपदा व अन्य संबंधित विभागाने केलेली तयारी यामुळे संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर निश्चितपणे मात करण्यात येईल. सन 2019 व 2021 या वर्षीच्या आलेल्या महापूराचा फार मोठा अनुभव प्रशासनाच्या पाठीशी आहे. सन 2021 मध्ये महापूर आला पण कर्नाटक राज्याच्या प्रशासनासी केलेला योग्य समन्वय, धरणातील पाण्याच्या विसर्गाचे केलेले नियोजन यामुळे महाप्रलय टाळण्यात यश आले. हाच विश्वास बाळगून जिल्हा प्रशासन सांगली जिल्ह्यात संभाव्य आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाले आहे. नैसर्गिक आपत्ती बाबत त्वरीत माहिती मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण कार्यालय सुरू करण्यात आले असून त्या ठिकाणी 24 x 7 नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. त्यासाठी 1077 हा टोल फ्री क्रमांक ही देण्यात आला आहे. तसेच 0233-2600500 या क्रमांकावर माहिती ही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तालुका पातळीवरील सर्व तहसील कार्यालयात आपत्ती नियंत्रण कक्ष उघडण्यात आले आहेत. गावपातळीवरील निष्णात पोहणाऱ्यांची यादी संकलित करुन त्यांचे दूरध्वनी क्रमांकही आपत्ती नियंत्रण केंद्रात उपलब्ध ठेवले आहेत. पूरबाधित गावांची संख्या 104 जिल्ह्यात 104 गावे पूरबाधित क्षेत्रात येतात. जिल्ह्यामधील 10 तालुक्यांपैकी शिराळा वाळवा, पलूस व मिरज या चार तालुक्यातून वारणा व कृष्णा नदीचा प्रवाह असल्यामुळे पुराच्या पाण्याचा फटका अधिक बसतो. जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नदी काठाजवळील 104 गावांबाबत तसेच महानगरपालिका क्षेत्रात विशेष दक्षता प्रशासनाने घेतली असून जीवित व वित्तहानी होऊ नये यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. सांग़ली जिल्ह्यामध्ये एकूण १०४ पूर प्रवण गावामध्ये गाव आपत्ती प्रतिसाद दल गठित करण्यात आलेले आहे. सन २०१९ व सन २०२२ चा महापूरचा अनुभव लक्षात घेता संभाव्य आपत्तीस सामोरे जाण्यासाठी पूर प्रवण तालुक्यात एन.डी.आर.एफ. पुणे यांचे वतीने प्रशिक्षण संपन्न झाले आहे. या प्रशिक्षणामध्ये आपत्तीची ओळख, शोध व सुटका पध्दती, प्रथमोपचार पध्दती, बोट चालविणे इत्यादी प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण महानगरपालिका क्षेत्रातील स्थानिक स्वंयसेवी संस्था प्रतिनिधींनाही देण्यात आले आहे. आयर्विन पुलाच्या ठिकाणी सर्व साधारण पूर पातळी (फुटांमध्ये) 35, इशारा पातळी-40, धोकादायक पातळी-45 निश्चित करण्यात आली आहे. सन 2019 मधील उच्चतम पातळी-57.6 फूट होती. ताकारी पुलाच्या ठिकाणी सर्व साधारण पूर पातळी (फुटांमध्ये) 39, इशारा पातळी-44, धोकादायक पातळी-46, सन 2019 मधील उच्चतम पातळी-68.8 फूट होती. बहे पुलाच्या ठिकाणी सर्वसाधारण पूर पातळी (फुटांमध्ये) 17, इशारा पातळी-21.9, धोकादायक पातळी-23.7, सन 2019 मधील उच्चतम पातळी-36.6 फूट होती. भिलवडी पुलाच्या ठिकाणी सर्वसाधारण पूर पातळी (फुटांमध्ये) 46, इशारा पातळी-51 धोकादायक पातळी-53, सन 2019 मधील उच्चतम पातळी-64.6 फूट होती. तर अंकली पुलाच्या ठिकाणी सर्व साधारण पूर पातळी (फुटांमध्ये) 40, इशारा पातळी-45.11, धोकादायक पातळी-50.3, सन 2019 मधील उच्चतम पातळी-62.4. इतकी होती. पूरनियंत्रणासाठी उपलब्ध साधनसामुग्री पूरनियंत्रणासाठी जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेकडे 9 बोटी, जिल्हा परिषदेकडे-55 बोटी, महसूल विभागाकडे 19 बोटी अशा एकुण 83 बोटी उपलब्ध आहेत. मिरज तालुक्यातील 17 गावांमध्ये लाईफ जॅकेट- 170, टॉर्च- 34, रोप-51, बॅग-51,मेगा फोन-17, लाईफ रिंग-51, पलूस तालुक्यातील 21 गावांमध्ये लाईफ जॅकेट- 210, टॉर्च- 42, रोप-63, बॅग-63,मेगा फोन-21, लाईफ रिंग-63, वाळवा तालुक्यातील 31गावांमध्ये लाईफ जॅकेट-310, टॉर्च-62, रोप-93, बॅग-93,मेगा फोन-31, लाईफ रिंग-93, शिराळा तालुक्यातील 6 गावांमध्ये लाईफ जॅकेट- 60, टॉर्च- 12, रोप-18, बॅग-18,मेगा फोन-6, लाईफ रिंग-18, साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. त्याबरोबरच जिल्हा प्रशासनाने पुर्व तयारीच्या अनुषंगाने एन.डी.आर.एफ पुणे यांच्याकडील 2 पथके यामध्ये 25 जवान व 5 बोटी प्रत्येकी दिनांक 15 जूलै ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्ह्यात उपलब्ध राहणार आहेत. पाटबंधारे विभागाची यंत्रणा सतर्क जिल्ह्यामध्ये व धरणाच्या परिसरात पडणाऱ्या पावसाची माहिती तसेच धरणातील पाण्याच्या साठ्याची माहिती संकलित करून दररोज किती पाणी धरणातून सोडण्यात येणार आहे. नदीच्या पाण्याची पातळी किती आहे याची माहिती नियंत्रण कक्षाला वेळच्या वेळी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कर्नाटकातील आलमट्टी धरण नियंत्रण प्रशासन यांच्याबरोबर समन्वय ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील आर्यविन पूल, बहे पूल, ताकारी पूल, भिलवडी पूल, अंकली पूल येथील नद्यांच्या धोका पातळीची माहिती व इशारा अद्यावतपणे देण्यासाठी यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. सांगली पाटबंधारे विभाग, सांगली येथे दि. 1 जून 2022 पासून मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष सुरू झाला आहे. या अंतर्गत कृष्णा उपखोऱ्यातील माहिती एकत्रित करून प्रशासन, प्रसार माध्यमे यांना संबंधित यंत्रणामार्फत उपलब्ध करून दिली जाते. या नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक 0233-2301820/2302925, फॅक्स क्रमांक 0233-2302750, मोबाईल क्रमांक 9307862396 असा आहे. हा पूरनियंत्रण कक्ष दि. 1 जून ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत अखंडित कार्यरत ठेवण्यात येणार आहे. तसेच महापूर रोखण्यासाठी जलसंपदा विभागामार्फत कृष्णा व भीमा खोऱ्या2साठी एककालिक आधार सामग्री अधिग्रहण प्रणाली (Real Time Data Acquisition System) ही प्रणाली अधिक सक्षम करण्यात आली आहे. या प्रणालीव्दारे पर्जन्यमान, जलाशयातील येवा, नदीची पाणी पातळी व विसर्ग यांची सध्यस्थिती व पूर्वानुमान उपलब्ध होते. याचा उपयोग करून सन 2021 मधील महापूरात जिवीत व मोठ्या प्रमाणात वित्तहानी टाळण्यास मदत झाली होती. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका सज्ज संभाव्य पूरपरिस्थतीचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिका सज्ज असून शहरात पॅचवर्क चे काम सुरू करण्यात आले आहे. आवश्यक ठिकाणी मुरूमाचे रस्ते करण्याची कार्यवाही सुरू आहे. धोकादायक इमारतींचे सर्व्हेक्षण पूर्ण झालेले आहे. विभागनिहाय 24x7 पथके तयार करण्यात आली आहेत. महापालिका क्षेत्रात सुमारे 92 नाले असून यांची साफसफाई सुरू आहे. शहरातील खुले भूखंड तसेच विनावापर मालमत्ता यांचीही सफाई करण्यात येणार आहे. निवारा केंद्रांचीही निश्चिती करण्यात आली आहे. पूरकाळात शवदहनाचा प्रश्न गंभीर होतो यासाठी कुपवाड येथील 8 स्मशानभूमी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. शहरात आपत्ती मित्र ही संकल्पना राबविण्यात येत असून या अंतर्गत आत्तापर्यंत 200 जणांनी आपत्ती मित्र म्हणून नोंदणी केली आहे. तसेच आपत्ती मित्र ॲप ही महापालिकेकडून तयार करण्यात आले आहे. या ॲपवर महापालिकेची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. पोलीस मुख्यालयात नियंत्रण कक्ष सुरू लोकांना त्वरीत नैसर्गिक आपत्तीत घडलेल्या घटनांची माहिती व्हावी यासाठी पोलीस मुख्यालयातही नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्र.. 0233-2672100 असा आहे. पोलीस विभागानेही अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून तालुकापातळीवरही यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. औषधे व धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध पुराच्या काळात रोगराई व साथीचे आजार पसरू नये यासाठी आरोग्य विभागाने यंत्रणा सज्ज ठेवली असून औषधांचा पुरेशा प्रमाणात साठा तसेच वैद्यकीय अधिकाऱ्याचे पथकही त्या त्या भागात नियुक्त करण्यात आले आहे. तसेच पूरग्रस्त गावातील लोकासांठी पुरेशा प्रमाणात धान्याचा साठाही सुरक्षित ठिकाणी करण्यात आला आहे. पूरग्रस्त कुटुंबांना स्थलांतर करण्याची वेळ आली तर त्यासाठी सुरक्षित निवासाची व्यवस्था ही करण्यात आली आहे. जनावरांना सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी त्या त्या परिसरात शाळा व सार्वजनिक ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. याबरोबरच बांधकाम, टेलिफोन, विद्युत विभागांनीही त्यांच्यास्तरावर जय्यत तयारी केली आहे. संभाव्य पूरपरिस्थिती उद्भवल्यास प्रशासन अहोरात्र यासाठी उपलब्ध राहणार आहेच. तरीही जनतेनेही प्रशासनास सहकार्य करून प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. श्री. रणजित पवार माहिती सहायक जिल्हा माहिती कार्यालय, सांगली