गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2023 मध्ये नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सह सचिव सुनिल अवताडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक अनुक्रमे परीक्षा, संवर्ग, परीक्षेचे स्वरूप, जाहिरात, पूर्व परीक्षा दिनांक व मुख्य परीक्षा दिनांक व कंसात निकालाचा अंदाजित महिना पुढीलप्रमाणे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा-2023 - दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्वी परीक्षा-2023, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, जानेवारी 2023, पूर्वी परीक्षा 19 मार्च 2023 (मे 2023). दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-2023, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 8 जुलै 2023 (सप्टेंबर 2023). महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त परीक्षा-2023 - महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023, सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक श्रेणी 1/मुद्रांक निरीक्षक, कर सहायक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उद्योग निरीक्षक, लिपिक-टंकलेखक, तांत्रिक सहायक विमा संचालनालय, सहायक मोटार वाहन निरीक्षक, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, जानेवारी 2023, पूर्व परीक्षा 30 एप्रिल 2023 (जून 2023). महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा-2023 - सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक श्रेणी 1/मुद्रांक निरीक्षक, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, मुख्य परीक्षा 2 सप्टेंबर 2023 (ऑक्टोबर 2023). महाराष्ट्र अराजपत्रित गट-क सेवा मुख्य परीक्षा-2023 - कर सहायक, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, उद्योग निरीक्षक, लिपीक-टंकलेखक, तांत्रिक सहायक विमा संचालनालय, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, मुख्यह परीक्षा 9 सप्टेंबर 2023 (नोव्हेंबर 2023). सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा-2023, सहायक मोटार वाहन निरीक्षक गट-क, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, मुख्य परीक्षा 10 सप्टेंबर 2023 (नोव्हेंबर 2023). महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा-2023 - महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा-2023, राज्य सेवा-33 संवर्ग, यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, विद्युत अभियांत्रिकी सेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, कृषि सेवा, सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, वनसेवा, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, फेब्रुवारी 2023, पूर्व परीक्षा 4 जून 2023 (जुलै 2023). राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023, एकूण 33 संवर्ग, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 30 सप्टेंबर 2023 निबंध मराठी/इंग्रजी, 1 ऑक्टोबर 2023 सकाळ भाषा पेपर-1 मराठी, दुपार भाषा पेपर-2 इंग्रजी, 7 ऑक्टोबर 2023 सकाळ सामान्य अध्ययन-1, दुपार सामान्य अध्ययन-2, 8 ऑक्टोबर 2023 सकाळ सामान्य अध्ययन-3, दुपार सामान्य अध्ययन-4, 9 ऑक्टोबर 2023 सकाळ वैकल्पिक विषय-पेपर क्रमांक 1, दुपार वैकल्पिक विषय-पेपर क्रमांक 2 (जानेवारी 2024). महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2023, सहायक अभियंता यांत्रिकी गट-ब श्रेणी-2, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 14 ऑक्टोबर 2023 सकाळी पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (डिसेंबर 2023). महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2023, सहायक अभियंता विद्युत गट-ब श्रेणी-2, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 14 ऑक्टोबर 2023 सकाळी पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (डिसेंबर 2023). महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2023, सहायक कार्यकारी अभियंता गट-अ (स्थापत्य), सहायक अभियंता गट-अ (स्थापत्य), सहायक अभियंता गट-ब (स्थापत्य) श्रेणी-2, उप विभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट-अ, जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट-ब, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 14 ऑक्टोबर 2023 सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (डिसेंबर 2023). महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-2023, सहायक अभियंता विद्युत व यांत्रिकी गट-ब श्रेणी-2, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 15 ऑक्टोबर 2023 सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (डिसेंबर 2023). महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा-2023, कृषि अधिकारी गट अ, कृषि अधिकारी गट ब, कृषि अधिकारी गट ब कनिष्ठ, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 15 ऑक्टोबर 2023 सकाळ पेपर क्रमांक १, दुपार पेपर क्रमांक 2 (डिसेंबर 2023). सहायक नियंत्रक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा-2023, सहायक नियंत्रक वैधमापन, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 21 ऑक्टोबर 2023 सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (डिसेंबर 2023). अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा-2023, सहायक आयुक्त अन्न तथा पदनिर्देशित अधिकारी गट-अ, अन्न सुरक्षा अधिकारी गट-ब, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 28 ऑक्टोबर 2023 सकाळ पेपर क्रमांक 1, दुपार पेपर क्रमांक 2 (डिसेंबर 2023). महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा-2023, सहायक वनसंरक्षक गट-अ, वनक्षेत्रपाल गट-ब, पारंपरिक/वर्णनात्मक, मुख्य परीक्षा 4 नोव्हेंबर 2023 सकाळ कृषि अभियांत्रिकी/रासायनिक अभियांत्रिकी/स्थापत्य अभियांत्रिकी/यांत्रिकी अभियांत्रिकी, दुपार कृषि/पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान, 5 नोव्हेंबर 2023 सकाळ वनस्पति शास्त्र / प्राणिशास्त्र, दुपार रसायनशास्त्र, 6 नोव्हेंबर 2023 सकाळ गणित/सांख्यिकी, दुपार वनशास्त्र, 7 नोव्हेंबर 2023 सकाळ भूशास्त्र, दुपार भौतिकशास्त्र (जानेवारी 2024). शासनाकडून संबंधित संवर्ग/पदांसाठी विहित वेळेमध्ये मागणीपत्र प्राप्त होईल या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहित वेळेमध्ये मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल. वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होवू शकतो. असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. अंदाजित वेळापत्रकाबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संबंधित परीक्षेची परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवड पध्दत इत्यादी तपशिल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे / येईल व आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल. संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात/अधिसूचनेव्दारे उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. 00000

एकता दौडमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन दि. 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाच्या निमित्ताने केंद्रशासन व क्रीडा व युवक सेवा सेचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 31 ऑक्टोबर 2022 रोजी राष्ट्रीय एकता दौड (UNITY RUN) चे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासन सांगली यांच्या वतीने करण्यात येणार आहे. आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने एकता दौड साजरी करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील नागरीक, खेळाडू, विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून एकता दौड मध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. एकता दौड दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराष्ट्र स्टेडियम सांगली येथे आयोजित करण्यात आली असून यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांनी सकाळी 6.30 वाजता उपस्थित राहून शासकीय कार्यक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 00000

राज्य लोकसेवा हक्क आयोग पुणे विभाग कार्यालयाच्या पत्त्यात बदल

सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : महाराष्ट्र लोकसवा हक्क अधिनियम 2015 कलम 13 च्या पोटकलम 1 मधील तरतुदीस अनुसरून दि. 30 जुलै 2016 रोजीच्या अधिसूचनेन्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला आहे. तसेच कलम 13 (२) (ख) नुसार राज्य लोकसेवा हक्क आयोग पुणे महसुली विभागाचे कार्यालय गठीत करण्यात आले आहे. सदर पुणे विभागाचे कार्यालय दि. 1 डिसेंबर 2021 पासून तात्पुरत्या स्वरूपात औंध पुणे या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आले होते. दि. 11 ऑक्टोबर 2022 रोजी राज्य लोकसेवा हक्क आयोग पुणे विभागाचे कार्यालय नवीन पत्यावर घोले रोड, क्षेत्रिय कार्यालय, पुणे येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे, असे राज्य लोकसेवा हक्क आयुक्त पुणे विभाग उप सचिव अनुराधा खानविलकर यांनी कळविले आहे. राज्य लोकसेवा हक्क आयोग पुणे विभाग कार्यालयाचा नवीन पत्ता पुढीलप्रमाणे. राज्य लोकसेवा आयोग पुणे महसुली विभाग, पुणे, 3 रा मजला, छत्रपती शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रिय कार्यालय, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे-411005, दूरध्वनी क्र. 020-29950663, ई-मेल-crspune@maharashtra.gov.in. 00000

मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०२२

शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय (योजना) कार्यालयाकडे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती या योजना वर्ग करण्यात आल्या आहेत. याशिवाय शिक्षण संचालनालय (योजना) कार्यालयामार्फत आता अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी असलेली प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती (इयत्ता 1 ली ते 10 वी मधील विद्यार्थी), अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेली बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती (इयत्ता 9 वी ते 12वी फक्त मुली), राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (इयत्ता 9वी ते 12वी मधील विद्यार्थी), दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती (इयत्ता 9 वी व 10वी मधील विद्यार्थी) या योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या सर्व योजनांमधील पात्र विद्यार्थ्यांनी वाढीव मुदतीत NSP 2.0 पोर्टलवर (www.scholarships.in) दि. 31 ऑक्टोबर 2022 पूर्वी अर्ज भरण्याचे आवाहन शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी असलेली प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती ही योजना मुस्लिम, बौध्द, ख्रिश्चन, शीख, पारसी व जैन या समाजातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापन मधील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता 1 ली ते 10 वी मधील पात्र विद्यार्थी अर्ज करू शकतात. यासाठी मागील इयत्ता मध्ये कमीत कमी 50 टक्के गुण आवश्यक, पालकांचे उत्पन्न 1 लाख पेक्षा कमी असावे, एका कुटुंबातील 2 विद्यार्थ्यांना लाभ, 30 टक्के मुलींसाठी राखीव, इतर शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा इत्यादी अटी शर्ती आहेत. शिष्यमवृत्ती रक्कम 1 हजार ते 10 हजार रूपये पर्यंत देण्यात येते. बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती मध्ये सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळामधून अल्पसंख्याक समाजातील इयत्ता 9 वी ते 12 वी शिक्षण घेणाऱ्या फक्त मुलींसाठी ही योजना आहे. या शिष्यवृत्तीसाठी मागील वर्षी 50 टक्के गुण असावे, पालकांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख पेक्षा कमी असावे, एका कुटुंबातील 2 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही, आधार असणे बंधनकारक, इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा इत्यादी अटी शर्ती आहेत. शिष्यवृत्ती रक्कम इयत्ता 9 वी साठी 5 हजार रूपये व इयत्ता 10 वी साठी 6 हजार रूपये आहे. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याने NMMS शिष्यवृत्तीची परीक्षा पास होऊन गुणवत्ता यादीमध्ये निवड होणे आवश्यक आहे. इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये शासकीय, अनुदानित शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. यासाठी पालकांचे 3 लाख 50 हजार रूपये पेक्षा कमी उत्पन्न असावे. खाजगी विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित, केंद्रिय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच शासनाच्या वसतिगृहाची सवलत घेत असलेले विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. इयत्ता 10 वी नंतर विद्यार्थ्यांने व्यवसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यास तो विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अपात्र होतो. विद्यार्थ्यांची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्याच प्रवर्गामधून अर्ज भरणे आवश्यक, शिष्यवृत्ती रक्कम 12 हजार रूपये आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी शासकीय किंवा अनुदानित शाळेमध्ये नियमित व पूणवेळ शिक्षण घेत असलेले इयत्ता 9वी व 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रूपये पेक्षा कमी असावे, सक्षम अधिकारी (तहसीलदार) यांच्या सहीचा उत्पन्नाचा दाखला आवश्यक, एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल, एकूण शिष्यवृत्ती पैकी 50 टक्के मुलींसाठी राखीव, विद्यार्थ्याचे आधार नंबर आवश्यक, विद्यार्थ्यांचे Unique Disability Identify Card आवश्यक, अपंग व्यक्तीचा अधिकार अधिनियम 2016 मध्ये नमूद केल्याप्रमाणे अपंगत्वाचे प्रमाण आवश्यक. शिष्यवृत्ती रक्कम 7 हजार ते 11 हजार रूपये देण्यात येते. सर्व योजनांसाठी उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदार यांचा आवश्यक आहे. नुनतीकरणासाठी प्रत्येक वर्षी विद्यार्थ्याने अर्ज भरणे आवश्यक असल्याचे शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

शनिवार, २२ ऑक्टोबर, २०२२

पारदर्शकता ठेवून शिधाजिन्नस संचाचे वाटप करा - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : दिवाणी सणानिमित्त सामान्य नागरिकांना आधार ‍मिळण्यासाठी शासनाने राज्यात शंभर रूपयांमध्ये चार शिधावस्तुंचा संच देण्याचा निर्णय शासनाने घेतला. सर्व पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ मिळेल. स्वस्त धान्य दुकानदारांनी सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रामाणिकपणे व पारदर्शकता ठेवून शिधाजिन्नस संचाचे वाटप करावे, असे आवाहन कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. एन. एस. मुलाणी स्वस्तधान्य दुकान मिरज येथे शिधाजिन्नस वाटप कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे बोलत होते. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी सुमन खाडे, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, तहसिलदार दगडू कुंभार, महानगरपालिका समाज कल्याण सभापती अनिता व्हनखंडे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल, श्री. व्हनखंडे आदि उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर पामतेल या चार वस्तुंच्या शिधाजिन्नस संचाचे अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी दिवाळी सुख समाधानाची व आनंदाची जावो, अशा शुभेच्छा सर्वांना दिल्या. यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल यांनी शासनाच्या या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती देवून उपस्थित सर्वांचे आभार मानले. 00000 वाळवा तालुक्यात 56.4 मि.मी. पावसाची नोंद सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 23.8 मी. पावसाची नोंद झाली असून वाळवा तालुक्यात सर्वाधीक 56.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज - 28.4 (684.7), जत - 4.1 (665), खानापूर-विटा -3.4 (790.9), वाळवा-इस्लामपूर- 56.4 (972.4), तासगाव - 21.5 (748.6), शिराळा - 18.3 (1498.9), आटपाडी- 9.3 (480.6), कवठेमहांकाळ - 17.3 (800), पलूस - 24.9 (662.6), कडेगाव - 14.3 (794.6). 00000 वारणा धरणात 34.21 टी.एम.सी. पाणीसाठा सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात 34.21 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 104.60 (105.25), धोम 13.50 (13.50), कन्हेर 10.10 (10.10), वारणा 34.21 (34.40), दूधगंगा 21.26 (25.40), राधानगरी 8.21 (8.36), तुळशी 3.47 (3.47), कासारी 2.74 (2.77), पाटगांव 3.70 (3.72), धोम बलकवडी 4.08 (4.08), उरमोडी 9.95 (9.97), तारळी 5.67 (5.85), अलमट्टी 122.83 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना - निरंक, धोम - 1862, कण्हेर - 574, वारणा - 478, दुधगंगा - 1540, राधानगरी- निरंक, तुळशी - निरंक, कासारी - निरंक, पाटगांव - 250, धोम बलकवडी - 330, उरमोडी - 250, तारळी - निरंक व अलमट्टी धरणातून 47 हजार 34 क्युसेक्स विसर्ग सुरु आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 7.1 (45), आयर्विन पूल सांगली 10.9 (40) व अंकली पूल हरिपूर 14.3 (45.11). 00000

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०२२

लंगरपेठ येथील खाजगी सावकाराच्या घरावर धाड, कागदपत्रे ताब्यात सावकारी जाचाने पिडीत कर्जदारांना संपर्क साधण्याचे आवाहन

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : खाजगी सावकारीतून जमीन बळकावण्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने कवठेमहांकाळ तालुक्यातील लंगरपेठ येथील एकाच्या घराची झडती घेण्यात आली असून यावेळी घातलेल्या धाडीमध्ये 56 कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. सदर कागदपत्रांच्या आधारे संबंधितांचे जबाब नोंदवून कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक तथा सावकाराचा निबंधक मंगेश सुरवसे यांनी सांगितले. कवठेमहांकाळ तालुक्यातील लंगरपेठ येथील खाजगी सावकारीतून जमिन बळकावण्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्तात धाड टाकून ही कारवाई करण्यात आली. सावकारांकडून होणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांच्या पिळवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी व सावकारीचे नियमन करण्यासाठी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 दि. 16 जानेवारी 2014 पासून अंमलात आलेला आहे. सदर अधिनियमातील कलम 18 अन्वये सावकारीच्या ओघात संपादित केलेली स्थावर मालमत्ता परत करण्याची तरतूद आहे. अशा प्रकरणी प्राप्त तक्रारी अर्जावर चौकशी करण्यात आल्यावर तसेच वैयक्तीक सुनावणी झाल्यानंतर सावकाराने दिलेल्या कर्जाबद्दल प्रतिभूती म्हणून स्थावर मालमत्ता सावकाराच्या कब्जात असल्याची जिल्हा निबंधकाची खात्री पटली तर तो संलेख किंवा अभिहस्तांतरणपत्र अवैध असल्याचे घोषित करता येईल आणि त्या मालमत्तेचा कब्जा कर्जदाराकडे किंवा यथाशक्ती त्याच्या वारसाकडे किंवा उत्तराधिकाऱ्याकडे परत करण्याचा आदेश देण्याची तरतूद आहे. गरजू व्यावसायिक, नागरिक व शेतकरी यांनी सहकार खात्याकडून सावकारी परवाना घेतलेल्या सावकारांकडूनच कर्जाची रक्कम घ्यावी. तसेच परवाना नसतांना अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्तीस सावकारी अधिनियमाच्या कलम 39 अन्वये पाच वर्षाचा कारावास व 50 हजार रूपये इतक्या दंडाची तरतूद कायद्यात केलेली असून सदरचा गुन्हा हा दखलपात्र गुन्हा आहे. तरी सावकारांच्या जाचाने पिडीत झालेल्या कर्जदारांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली, दुसरा मजला, नविन प्रशासकीय इमारत, सांगली-मिरज रोड, विजयनगर, सांगली (संपर्क दुरध्वनी क्र. 0233-2600300 ईमेल- ddr_sng@rediffmail.com किंवा sangliddr@gmail.com) यांच्याकडे अथवा संबंधित तालुक्याचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी योग्य त्या पुराव्यानिशी संपर्क साधावा. जी कोणी व्यक्ती कर्जदाराकडून सावकाराला देय असलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी कर्जदाराला उपद्रव देईल, तिच्यावर बळाचा वापर करील किंवा तिला धाकदपटशा दाखविल, जागोजागी पाठलाग करील, अथवा तिच्या अथवा तिच्या कुटुंबियाच्या जिविताला धोका असल्याची खात्री झाल्यास, अशा प्रकरणी सावकारी जाचाने पिडीत झालेल्या कर्जदाराने संबंधीत पोलीस स्टेशन/ जिल्हा पोलीस अधिक्षक,सांगली (जिल्हा पोलीस अधिक्षक,सांगली यांचे कार्यालयातील स्वतंत्र कक्ष संपर्क दुरध्वनी क्र. 0233-2672100) यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे व सहकारी संस्था कोल्हापूर विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी केले आहे. 00000

दक्षता जनजागृती सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : दक्षता जनजागृती सप्ताह दि. 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेबर 2022 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. ॲन्टी करप्शन ब्युरोच्या कार्यपध्दतीची नागरीकांना माहिती व्हावी, तसेच जनतेमध्ये भ्रष्टाचाराविरोधी जनजागृती होण्याच्या दृष्टीने सप्ताह काळात जिल्ह्यात सर्वत्र दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ॲन्टी करप्शन ब्युरो सांगली चे पोलीस उप अधीक्षक सुजय घाटगे यांनी दिली. 00000

महिला व बाल विकास विभागाच्या संस्थांमधील प्रवेशितांचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : दिपावलीचा आनंद सर्वसामान्य नागरीकाप्रमाणेच महिला व बाल विकास विभागाच्या कार्यरत संस्थांमधील महिला बालके व भिक्षेकरी यांना देखील घेता यावा यासाठी दि. 21 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये जिल्ह्यातील संस्थामध्ये दिपावली सण व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला व बाल विकास मंत्री यांच्या निर्देशानुसार सदर संस्थेच्या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील मोठे व्यावसायीक प्रतिष्ठीत व्यक्ती व वरीष्ठ पदाधिकारी यांनी त्यांच्या वेळेनुसार सहभागी होवून संस्थेतील प्रवेशितांचा उत्साह वाढवणे, त्यांचा आनंद व्दिगुणीत करण्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी केले आहे. शासनाच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्ह्यातील निराधार, पिडीत, कौटुंबिक हिंसाचारास बळी पडलेल्या महिला आणि अनाथ, पाक्सो कायद्यांतर्गत बळी पडलेली मुले, एक पालक किंवा दोन्ही पालक गमावलेली मुले, आई-वडील दोन्ही बेपत्ता असलेली मुले, अवैध व्यापाराला बळी पडलेली मुले. दोन्ही पालक तुरूंगात असलेल्या पालकांची मुले यांच्यासाठी आणि रस्त्यावर भीक मागणाऱ्या अनाथ निराधार व्यक्तींसाठी मदतीची गरज आहे त्यांच्या हितासाठी अनेक योजना राज्यात महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहेत. 00000

कवठेमहांकाळ तालुक्यात 17.9 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 3.9 मी. पावसाची नोंद झाली असून कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधीक 17.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज - 1.6 (654), जत - 1.2 (660.8), खानापूर-विटा -9.7 (783.6), वाळवा-इस्लामपूर- 1.1 (914.3), तासगाव - 10.5 (725.9), शिराळा - 0.4 (1478.4), आटपाडी- 0.2 (473.7), कवठेमहांकाळ - 17.9 (782.7), पलूस - 1.2 (639.8), कडेगाव - 0.9 (780.3). 00000

भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या नोंदणीकरीता 10 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात खरीप पणन हंगाम 2022-2023 मध्ये किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत भरडधान्य (ज्वारी बाजरी व मका) खरेदी पुर्व तयारी करीता शासन निर्णयातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांची NeML पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता 10 नोव्हेंबर 2022 अखेर पर्यंत केंद्र शासनाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे. जिल्ह्यात विष्णु आण्णा ख.वि.संघ सांगली/जत, कवठेमहांकाळ तालुका ख. वि. संघ कवठेमहांकाळ, .ॲड आर. आर. पाटील शेतकरी सह ख.वि.संघ तासगाव, खानापुर तालुका ख. वि. संघ खानापुर, डॉ. पतंगराव कदम शेतकरी सह. ख. वि. संघ पलुस व कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी या सात खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. नोंदणीसाठी चालु हंगामातील पिक पेरा, ऑनलाईन नोंद असलेला सात बारा उतारा, बँक खात्याच्या पासबुकची साक्षांकित प्रत, आधारकार्ड प्रत तसेच शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रासह शेतकऱ्यांनी स्वत: हजर राहून पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी दरम्यान LIVE PHOTO अपलोड करावयाची आहेत. चालु हंगामात मका पिकासाठी 1 हजार 962 रूपये आधारभुत किंमत जाहिर झाली असून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ होण्यासाठी मुदतीत नोंदणी करावी. मका खरेदी करीता 1 नोव्हेंबर 2022 ते 31 जानेवारी 2023 असा कालावधी आहे. 00000

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०२२

बेरोजगार उमेदवारांसाठी ३१ ऑक्टोबरला ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : बेरोजगार व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सोमवार, दि. 31 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 12 ते 1 या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक युवक व युवतींनी https://meet.google.com/ykr-ypyp-wra या लिंकवर विहीत वेळेपूर्वी वेबीनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे. या वेबीनारमध्ये कौशल्य विकास व उद्योजकता या मधील UGC आणि कौशल्य विकास मंत्रालय यांची भूमिका या विषयी श्रीमती पुतळाबेन शहा कॉलेज ऑफ एज्युकेशन चे असोशिएट प्रोफेसर डॉ. युवराज पवार हे माहिती व मार्गदर्शन करणार आहेत. ०००००

चालक आणि सुरक्षा गार्ड भर्तीसाठी माजी सैनिकांना अर्ज करण्याचे आवाहन

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : टाटा स्मारक केंद्र, टाटा स्मारक रूग्णालय मुंबई येथे चालक आणि सुरक्षा गार्डची भर्ती होणार आहे. यासाठी सांगली जिल्ह्यातील पात्र माजी सैनिकांनी https://tmc.gov.in/def/inst.aspx या वेबसाईटवर दि. 11 नोव्हेंबर 2022 पूर्वी अर्ज भरावा. या संधीचा जास्तीत जास्त माजी सैनिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सांगली यांनी केले आहे. ०००००

शिक्षक पात्रता परीक्षा गैरप्रकारामध्ये समाविष्ट परीक्षार्थींच्या विरूध्द शास्ती निश्चित

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : शिक्षक पात्रता परीक्षा 2018 च्या दि. 15 जुलै 2018 रोजी झालेल्या परीक्षेमध्ये गैरव्यवहाराबाबत सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गैरप्रकारामध्ये समाविष्ट परीक्षार्थी यांच्या विरूध्द परीक्षा परिषदेने शास्ती निश्चित केली आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली. गुन्ह्याच्या तपासादरम्यान परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिकांची कसून तपासणी केली असता 1 हजार 663 उमेदवारांनी परीक्षेत गैरप्रकार निष्पन्न झाले आहे. म्हणजे प्रत्यक्षात ते अपात्र असतांना त्यानी गैरप्रकार करून स्वत:स पात्र करून घेतले. शिक्षक पात्रता परीक्षा 2018 चा अंतिम निकाल दि. 12 ऑक्टोबर 2018 रोजी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला त्यानुसार एकूण 9 हजार 677 उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी 779 उमेदवार ते प्रत्यक्ष अपात्र असताना त्यांच्या गुणामघ्ये फेरफार करून पात्र घोषित केले असल्याने ते गैरप्रकारामध्ये समाविष्ट असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच 884 उमेदवारांनी आरोपींच्या संगनमताने बनावट प्रमाणपत्र /गुणपत्रक प्राप्त करून घेतले आहे. गैरप्रकारामध्ये समाविष्ट परीक्षार्थी यांच्या विरूध्द परीक्षा परिषदेने शास्ती निश्चित केली आहे. सदर आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. ०००००

जिल्हास्तरीय वृध्द साहित्यिक व कलाकार मानधन समितीत अशासकीय सदस्य निवडीसाठी २५ नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून सन 2020-21 ते 2022-23 या तीन वर्षाकरीता जिल्हास्तरीय वृध्द साहित्यिक व कलाकार मानधन नवीन निवड समिती गठीत करण्यात आली होती. सदर समिती दि. 8 सप्टेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये रद्द करण्यात आली आहे. सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षासाठी नवीन जिल्हास्तरीय वृध्द साहित्यिक व कलाकार मानधन समितीमधील नवीन अशासकीय अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य निवड करावयाची आहे. यासाठी इच्छुक तज्ज्ञ कलाकारांनी दि. 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज जिल्हा परिषद सांगली समाज कल्याण विभागाकडे सादर करावेत. प्राप्त अर्ज पालकमंत्री यांच्याकडे अंतिम निवडीसाठी सादर करण्यात येतील, असे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. ०००००

कलाकार मानधनाचे प्रस्ताव ३१ डिसेंबर पर्यंत पाठविण्याचे आवाहन

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : सन २०२२-२३ या वर्षासाठी कलाकार मानधनाचे प्रस्ताव पात्र कलाकारांनी दि. ३१ ‍डिसेंबर २०२२ अखेर पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषद सांगली समाज कल्याण विभागाकडे पाठवावेत. तद्नंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे. इच्छुक कलाकारांनी प्रस्तावासोबत विहीत नमुन्यातील अर्ज, ५० वर्षापेक्षा जास्त वय असल्याबाबत वयाचा दाखला (शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक), उत्पन्नाचा तहसिलदार यांचा दाखला (४८ हजार रूपये पर्यंत), आकाशवाणी, राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरावरील प्रमाणपत्रे, कले संबंधीत सर्व पुरावे, रेशनकार्ड झेरॉक्स, रहिवाशी दाखला, शंभर रूपये स्टँपवर नोटरी, कलाकाराचे आधार लिंक केलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक पासबूकची झेरॉक्स (वैयक्तीक खाते), दूरध्वनी क्रमांक व आधार कार्डची झेरॉक्स इत्यादी कागदपत्रे गटविकास अधिकारी यांच्यामार्फत पाठवावीत, असे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. ०००००

तासगाव तालुक्यात 25.2 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 13.9 मी. पावसाची नोंद झाली असून तासगाव तालुक्यात सर्वाधीक 25.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज – 22.3 (652.4), जत- 9 (659.6), खानापूर-विटा –20 (773.9), वाळवा-इस्लामपूर- 8 (913.2), तासगाव – 25.2 (715.4), शिराळा – 3.4 (1478), आटपाडी- 10.2 (473.5), कवठेमहांकाळ – 16.6 (764.8), पलूस - 8.5 (638.6), कडेगाव – 10.8 (779.4). 00000

वारणा धरणात 34.26 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 20, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात 34.26 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 104.38 (105.25), धोम 13.50 (13.50), कन्हेर 10.10 (10.10), वारणा 34.26 (34.40), दूधगंगा 21.56 (25.40), राधानगरी 8.23 (8.36), तुळशी 3.47 (3.47), कासारी 2.72 (2.77), पाटगांव 3.70 (3.72), धोम बलकवडी 4.08 (4.08), उरमोडी 9.15 (9.97), तारळी 5.71 (5.85), अलमट्टी 123.08 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना - 1050, धोम - निरंक, कण्हेर - निरंक, वारणा - 591, दुधगंगा - 2905, राधानगरी- निरंक, तुळशी - निरंक, कासारी - निरंक, पाटगांव - निरंक, धोम बलकवडी - निरंक, उरमोडी - निरंक, तारळी - 350 व अलमट्टी धरणातून 27 हजार 284 क्युसेक्स विसर्ग सुरु आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 7.3 (45), आयर्विन पूल सांगली 11 (40) व अंकली पूल हरिपूर 14.9 (45.11). 00000

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२

वारणा धरणात 34.30 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात 34.30 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 104.38 (105.25), धोम 13.50 (13.50), कन्हेर 10.10 (10.10), वारणा 34.30 (34.40), दूधगंगा 21.76 (25.40), राधानगरी 8.24 (8.36), तुळशी 3.47 (3.47), कासारी 2.70 (2.77), पाटगांव 3.70 (3.72), धोम बलकवडी 4.08 (4.08), उरमोडी 9.93 (9.97), तारळी 5.75 (5.85), अलमट्टी 122.66 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना - 1050, धोम - 288, कण्हेर - 574, वारणा - निरंक, दुधगंगा - 2905, राधानगरी- निरंक, तुळशी - निरंक, कासारी - निरंक, पाटगांव - 250, धोम बलकवडी - निरंक, उरमोडी - निरंक, तारळी - 350 व अलमट्टी धरणातून 30 हजार 658 क्युसेक्स विसर्ग सुरु आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 8.8 (45), आयर्विन पूल सांगली 15 (40) व अंकली पूल हरिपूर 18.2 (45.11). 00000

वाळवा तालुक्यात 15.6 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.1 मी. पावसाची नोंद झाली असून वाळवा तालुक्यात सर्वाधीक 15.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज – 1.8 (630.1), जत- 3.6 (650.6), खानापूर-विटा –1.9 (753.9), वाळवा-इस्लामपूर- 15.6 (905.2), तासगाव – 5.2 (690.2), शिराळा – 7.7 (1474.6), आटपाडी- निरंक (463.3), कवठेमहांकाळ – निरंक (748.2), पलूस - 0.9 (630.1), कडेगाव – 15.2 (768.6). 00000

पणजी येथे 1 नोव्हेंबरला डाक अदालत

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : डाक विभागाची क्षेत्रीय स्तरावरील डाक अदालत दि. 1 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी यांच्या कार्यालयात आयोजित केली असून तक्रारी स्विकारण्याचा अंतिम दि. 22 ऑक्टोबर 2022 आहे. अशी माहिती सांगली डाक विभागाचे प्रवर डाक अधिक्षक यांनी दिली. गोवा क्षेत्राशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारीचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाणार आहे. विशेषत: टपाल वस्तु, मनीऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहेत. संबंधितानी सर्व तपशीलासह तक्रार श्री. यु. विजय कुमार, सचिव, डाक अदालत आणि सहाय्यक निदेशक डाक सेवा, पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी-403001 यांच्या नावे पाठवावाी, असे आवाहन डाक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 00000

खाजगी वाहतुकदारांनी निर्धारीत दरापेक्षा अधिक दर आकारल्यास कारवाई

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडे दराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडे दर शासनाने दि. 27 एप्रिल 2018 च्या शासन निर्णयान्वये निश्चित केले आहेत. प्रवाशांना गर्दीच्या हंगामात प्रवास करताना येणाऱ्या अडचणी, तक्रारी बाबत 8830770550 या व्हॉटसॲप क्रमांकावर किंवा dyrto.10-mh@gov.in या ई-मेल आयडीवर संबंधित वाहनाच्या तिकीटांच्या प्रति, वाहनाचे व नोंदणी क्रमांकाच्या छायाचित्रासह तक्रार नोंदविता येईल. सदर तक्रारीची शहानिशा करून मोटार वाहन कायद्यानुसार संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना परिवहन आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यात सुरू होणाऱ्या दिवाळी, ख्रिसमस इत्यादी सणांच्या कालावधीत उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यकारी अधिकारी यांना पुढीलप्रमाणे निर्देश दिले आहेत. गर्दीच्या हंगामात खाजगी बस मालकाकडून शासनाने निश्चित केलेल्या प्रति कि.मी. भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारात नसल्याचे वेळोवेळी खातरजमा करावी. या प्रकरणी वेळोवेळी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करावी. खाजगी वाहतुकदारांनी निर्धारीत करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास सदर वाहतुकदारावर मोटार वाहन कायद्यान्वये कडक कारवाई करावी. 00000

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडू ‍गिरीष जकाते याचा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केला सत्कार

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : गुजरात येथे दि. 27 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर 2022 या कालावधीत संपन्न झालेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तलवारबाजी खेळात सांगली जिल्ह्यातील खेळाडू ‍गिरीष वैभव जकाते यांने सांघीक प्रकारात रौप्य पदक व वैयक्तीक प्रकारात कास्यपदक संपादन केले. या यशाबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याहस्ते गिरीष जकाते याचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ‍जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी गिरीष जकाते याची संपूर्ण विचारपूस करून आत्तापर्यंत खेळलेल्या स्पर्धेबाबत माहिती घेतली. तसेच नोकरीसाठी थेट नियुक्तीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करावा असे सांगितले. 00000

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२

शेतकऱ्यांना अनुदानित दरात मिळणार महाबीजचा हरभरा

सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व ग्रामबिजोत्पादन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी महाबीजचे हरभरा बियाणे अनुदानित दरात मिळणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाबीजचे कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचे जिल्हा व्यवस्थापक एन. जी. इनामदार यांनी केले आहे. सोयाबीन व भात कापणी मळणीला सुरूवात झाल्याने रब्बी हंगामाची लगबग दिसून येत आहे. त्या अनुषंगाने शासनातर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व ग्रामबिजोत्पादन योजना जिल्ह्यात कृषी विभागातर्फे राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेमध्ये जिल्ह्याला 428 क्विंटल बियाणे वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे. या योजनेंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत परमिट वाटप होणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान या योजनेंतर्गत हरभरा (दहा वर्षाआतील वाण) 45 रूपये प्रति किलो या अनुदानित दराप्रमाणे तर ग्रामबिजोत्पादन योजनेंतर्गत हरभरा (दहा वर्षाआतील वाण) 45 रूपये प्रति किलो व दहा वर्षावरील वाण 52 रूपये प्रति किलो या अनुदानित दराप्रमाणे महाबीजच्या वितरकांकडे उपलब्ध होणार आहे. या योजनेंतर्गत दहा वर्षाआतील हरभरा फुले विक्रम, राजविजय-202, एकेजी-1109, ठळड-10216 व दहा वर्षावरील विजय, दिग्वीजय, विशाल व जॅकी-6218 हे वाण उपलब्ध होणार आहेत. हरभरा दहा वर्षाआतील वाणाची मूळ किंमत 70 रूपये प्रति किलो आहे. यामध्ये अनुदान 25 रूपये प्रति किलो असून अनुदानित दर 45 रूपये प्रति किलो आहे. हरभरा दहा वर्षावरील वाणाची मूळ किंमत 72 रूपये प्रति किलो आहे. यामध्ये अनुदान 20 रूपये प्रति किलो असून अनुदानित दर 52 रूपये प्रति किलो आहे. या योजनेत एका शेतकऱ्याला सातबारा, आधारकार्ड घेऊन एक बॅग वितरीत करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. इनामदार यांनी केले आहे. 00000

राष्ट्रीय लोकअदालत 12 नोव्हेंबरला

पक्षकारांनी प्रकरणे तडजोडीने मिटविण्याचा लाभ घ्यावा - जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण कि. नरडेले सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यामध्ये दि. 12 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून ती तडजोडीने मिटविण्याबाबत लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण कि. नरडेले यांनी केले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार शनिवार दि. 12 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अजेय राजंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय सांगली व सांगली जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी, कौटुंबिक वादासंबंधीची, कामगार वादाची, भू-संपादनाची, मोटार अपघात नुकसान भरपाई, कौटुंबिक हिंसाचाराची, चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम 138 खालील प्रकरणे, जिल्हा ग्राहक मंचासमोरील प्रलंबित प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणांत बॅंक, दूरसंचार, वीज बिल, घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची प्रकरणे ठेवता येणार आहेत. 00000

शिराळा तालुक्यात 37.2 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 12.3 मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधीक 37.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज – 12 (628.3), जत- 1.8 (647), खानापूर-विटा –9 (752), वाळवा-इस्लामपूर- 4.6 (889.6), तासगाव – 9.1 (685), शिराळा – 37.2 (1466.9), आटपाडी- 10.3 (463.3), कवठेमहांकाळ – 3.8 (748.2), पलूस - 25.3 (629.2), कडेगाव – 28.3 (753.4). 00000

कोयना धरणातून 2100 तर वारणा धरणातून 591 क्युसेक्स विसर्ग सुरू

सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात 34.35 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 104.60 (105.25), धोम 13.50 (13.50), कन्हेर 10.10 (10.10), वारणा 34.35 (34.40), दूधगंगा 21.97 (25.40), राधानगरी 8.22 (8.36), तुळशी 3.47 (3.47), कासारी 2.70 (2.77), पाटगांव 3.70 (3.72), धोम बलकवडी 4.08 (4.08), उरमोडी 9.95 (9.97), तारळी 5.77 (5.85), अलमट्टी 121.09 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना - 2100, धोम - 1318, कण्हेर - 574, वारणा - 591, दुधगंगा - 2905, राधानगरी- निरंक, तुळशी - निरंक, कासारी - निरंक, पाटगांव - 250, धोम बलकवडी - 330, उरमोडी - 350, तारळी - 350 व अलमट्टी धरणातून 74 हजार 951 क्युसेक्स विसर्ग सुरु आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 8.7 (45), आयर्विन पूल सांगली 11.6 (40) व अंकली पूल हरिपूर 15.4 (45.11). 00000

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर अनुदान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिध्द - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण 18 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करावे सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये नियमित कर्जदारांना 50‍ हजार रूपये पर्यंत प्रोत्साहन अनुदान योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. या योजनेच्या अनुषंगाने शासनामार्फत दि. 13 ऑक्टोबर 2022 रोजी एकूण 62 हजार 642 इतक्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी कर्जमाफीच्या पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आली आहे. या याद्या ग्रामपंचायत, बॅक शाखा, विकास सोसायटी, सी.एस.सी.सेंटर/आपले सरकार सेवा केंद्र, सहाय्यक निबंधक सहकरी संस्था यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांना पाहण्यास मिळतील. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. यादीमध्ये नाव असलेल्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी कुठलाही विलंब न लावता दि. 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत जवळच्या आपले सरकार केंद्र / सी.एस.सी.सेन्टर किंवा बॅक शाखेत जावून आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे. आधार प्रमाणिकरण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या सेव्हींग खात्यावर शासनाकडून लाभाची रक्कम संबंधित बँक खात्यावर वर्ग होणार आहे. सांगली जिल्ह्याची एकूण 1 लाख 60 हजार 795 इतक्या खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे. त्यापैकी पहिल्या यादीमध्ये एकूण 62 हजार 642 इतक्या लाभार्थ्यांची नावे समाविष्ट आहेत. उर्वरीत पात्र लाभार्थ्यांच्या याद्या यापुढे शासनाकडून वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येणार आहेत. यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी योजना संपण्यापूर्वी विनाविलंब आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे. आधार प्रमाणीकरण न केल्यास प्रोत्साहनपर अनुदान लाभाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होणार नाही. यादीतील लाभार्थ्यांनी यादीमधील आपला विशिष्ठ क्रमांक, आधार कार्ड व बँकेचे पासबुक घेवून जवळच्या आपले सरकार केंद्र / सी.एस.सी.सेंटर किंवा बॅक शाखेत जावून आधार प्रमाणिकरण पुर्ण करावे. आधार प्रमाणिकरण बायोमेट्रीक पध्दतीने किंवा मोबाईल OTP द्वारे करता येईल. या दोन्ही पर्यायाने आधार प्रमाणिकरण न झाल्यास आधार प्रमाणिकरण शक्य नाही (Unable to E-KYC) हा पर्याय निवडून तक्रार करता येईल. या तक्रारींची निराकरण तालुका स्तरीय समिती व जिल्हा स्तरीय समितींमार्फत करण्यात येईल. आधार नंबर किंवा रक्कम चूकीची असल्यास अधार अमान्य किंवा रक्कम अमान्य हा पर्याय निवडून तक्रार जनरेट करावी व मिळणारी पावती स्वत:कडे ठेवावी. तसेच एकापेक्षा जास्त कर्ज खाती असल्यास सर्व खात्यांचे आधार प्रमाणिकरण केल्यानंतर रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. मयत लाभार्थ्यांच्या वारसांनी बँकेमध्ये जावून त्यांची वारसनोंद करून घ्यावयाची आहे. तसेच ज्यांनी आपले बँक खात्यास आधार क्रमांक लिंक केलेला नाही त्यांनी तात्काळ आपले आधार लिंक करून घेणे आवश्यक आहे. सर्व बँकांच्या शाखा, तालुक्यातील उप/ सहाय्यक निंबंधक, सहकारी संस्था, कार्यालय व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय येथे या योजनेसाठी मदत कक्ष उभारणी करण्यात आला आहे. तरी मुदतीच्या आत सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणिकरण पुर्ण करून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. 00000

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०२२

जागतिक दृष्टी दिनी नेत्र चिकित्सा अधिकाऱ्यांना नेत्ररोग आजारांची तपासणी करण्याचे आवाहन

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : जागतिक दृष्टी दिन सन 2000 पासून ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरूवारी साजरा करण्यात येतो. यावर्षी 23 व्या जागतिक दृष्टी दिनी दि. 13 ऑक्टोबर रोजी सांगली जिल्ह्यातील विविध उपजिल्हा रूग्णालये, ग्रामिण रूग्णालये, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथे विविध नेत्ररोग आजारांची तपासणी नेत्र चिकित्सा अधिकारी यांनी करावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील यांनी केले आहे. जागतिक दृष्टी दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा सामान्य जनतेमध्ये खासकरून वयस्क व्यक्ती व लहान मुले यांना विविध नेत्र आजार होऊ नये म्हणून घ्यावयाच्या काळजी व उपचार याबाबत जनजागृती करणे तसेच मोतिबिंदू, खुपऱ्या, डायबेटीक रेटीनोपॅथी, लहान मुलांमधील नेत्र विकार, नेत्र विकारांचा प्रतिबंध व व्यवस्थापन करणे हा आहे. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील नेत्र तपासणी झालेल्या रूग्णांना पुढील उपचारासाठी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे संदर्भित करावे. त्याचबरोबर नेत्र आजार असलेल्या जास्तीत जास्त लहान मुलांचा शोध घेवून संदर्भित सेवेसाठी समर्पित संस्थांमध्ये समन्वय निर्माण करून लहान मुलांचे नेत्रविकाराचे उपचार करावेत, अशा सूचना नेत्र चिकित्सा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथील नेत्र बाह्य विभागात तसेच राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अशसकीय स्वयंसेवी संस्था येथे मोफत मोतीबिंदू तपासणी, काचबिंदू, खुपऱ्या, डायबेटीक रेटीनोपॅथी, लहान मुलांमधील नेत्र विकार यांची तपासणी करण्यात येत आहे, याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. गायत्री खोत यांनी केले आहे. तसेच या कार्यक्रमास जास्तीत जास्त युवक युवतींनी नेत्रदानाचा संकल्प फॉर्म भरून हातभार लावावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. 00000

कृषि पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनामार्फत विविध कृषि पुरस्कार देण्यात येतात. शेतकऱ्यांनी कृषि पुरस्कारांसाठी प्रस्ताव तात्काळ तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी केले आहे. विविध कृषि पुरस्कारनिहाय निकष व कंसात पुरस्काराचे स्वरूप पुढीलप्रमाणे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार (राज्यस्तर-1) - कृषि क्षेत्रातील विस्तार, प्रक्रिया, निर्यात, उत्पादन पिक फेरबदल, आधुनिक तंत्रज्ञान वापर इत्यादी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस देण्यात येतो (पारितोषिक 75 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र (व्यक्तीचा सपत्नीक/पतीसह सत्कार)). वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार (आठ कृषि विभागातून प्रत्येकी 1 याप्रमाणे 8) - कृषि व कृषि संलग्न क्षेत्रामध्ये स्पृहणीय कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस देण्यात येतो (पारितोषिक 50 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र (व्यक्तीचा सपत्नीक/पतीसह सत्कार)). जिजामाता कृषिभूषण पुरस्कार (आठ कृषि विभागातून प्रत्येकी 1 याप्रमाणे 8) - कृषि क्षेत्रामध्ये महिलांचे उल्लेखनिय कार्य (पारितोषिक 50 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र (व्यक्तीचा पतीसह सत्कार)). वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार (आठ कृषि विभागातून प्रत्येकी 1 याप्रमाणे 8) - पत्रकारीतेव्दारे अथवा इतर अन्य मार्गाने कृषि विषयक ज्ञानाचा फायदा परीसरातील शेतकऱ्यांना करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस देण्यात येतो (पारितोषिक 30 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र (व्यक्तीचा सपत्नीक/पतीसह सत्कार)). वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गटासाठी प्रति जिल्हा एक याप्रमाणे 34 आणि आदिवासी गटासाठी प्रति विभाग एक याप्रमाणे सहा असे एकूण 40) - अधुनिक तंत्र सुधारीत बी-बीयाणे इत्यादींचा वापर करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना देण्यात येतो (पारितोषिक 11 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र (व्यक्तीचा सपत्नीक/पतीसह सत्कार)). कृषिभूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार (आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे आठ) - सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रीय निविष्ठा वापरण्यास प्रोत्साहन देणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येतो (पारितोषिक 50 हजार रूपये, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र (व्यक्तीचा सपत्नीक/पतीसह सत्कार). उद्यानपंडीत पुरस्कार (आठ कषि विभागातून प्रत्येक एक याप्रमाणे आठ) - फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येतो (पारितोषिक 25 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र (व्यक्तीचा सपत्नीक/पतीसह सत्कार). पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवा रत्न पुरस्कार (आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे आठ व आयुक्तालय / मंत्रालय स्तरावरून एक अधिकारी/कर्मचारी एक या प्रमाणे एकूण 9) - कृषि विभागामध्ये अतिउत्कृष्ठ कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येतो (पारितोषिक स्मृतीचिन्ह, सन्मपनपत्र (व्यक्तीचा सपत्नीक सत्कार). युवा शेतकरी पुरस्कार (आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक या प्रमाणे आठ) - कृषि क्षेत्रात उल्लेखनीय व नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना (वय 18 ते 40 वर्षे) देण्यात येतो (पारितोषिक 30 हजार रूपये, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र (व्यक्तीचा सपत्नीक /पतीसह सत्कार). 00000

मॅग्नेट प्रकल्पांतर्गत प्रस्ताव सादर करण्यास 14 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतमाल उत्पादक संस्था, प्रक्रियादार,‍ निर्यातदार, ॲग्रीगेटर व माविम अंतर्गत नोंदणीकृत संस्था यांच्याकडून मॅग्नेट प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दि. 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले होते. तथापि विहीत मुदतीत बऱ्याच संस्थांना प्रस्ताव सादर करता न आल्याने इच्छुक संस्थांसाठी दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजीचे सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी माहिती विभागीय प्रकल्प उपसंचालक डॉ. सुभाष घुले यांनी दिली. एशियन डेव्हलपमेंट बँक व महाराष्ट्र शासन सहकार व पणन विभागांतर्गत मागील वर्षीपासून मॅग्नेट प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आलेला आहे. मॅग्नेट प्रकल्पाचा मुख्य उद्देश पिकांचे काढणीत्तोर होणारे नुकसान कमी करणे, साठवणूक क्षमता वाढविणे, त्याचबरोबर पायाभूत सुविधा अंतर्गत मुल्य साखळी विकसीत करणे व मागणीनुसार शेतमालाचे मुल्यवर्धन करणे हा आहे. 00000

सोमवार, ३ ऑक्टोबर, २०२२

घोणस अळी ओळख व व्यवस्थापन

काही दिवसापासून विविध माध्यमामार्फत ऊसावर आढळून आलेल्या एका अळीमुळे जिची ओळख बोली भाषेमध्ये स्लग कैटरपिलर किंवा काटेरी अळी व ग्रामीण भाषेमध्ये घोणस अळी म्हणून आहे. जिच्या दंश झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. त्यामुळे या अळीबद्दल सर्वांच्या मनात एक प्रकारची भिती दिसून येते. तसेच त्याबद्दल बरेचसे गैरसमज निर्माण झाले आहेत. अळीची ओळख या अळीला स्लग कैटरपिलर किंवा काटेरी अळी किंवा डंक अळी असेही म्हणतात. ही एक पतंगवर्गिय कीड असून ती लीमाकोडिडे (स्लग कैटरपिलर पतंग) या कुटुंबातील आहे. या अळ्यांना त्यांच्या चिकटून राहण्याच्या स्वभावामुळे आणि संथ हालचाली व लक्षणामुळे स्लग अळी असे म्हणतात. या अळीचे पतंग त्यांच्या भषकांसाठी मऊ आणि पौष्टिक खाद्य असतात. पतंग फार वेगाने फिरत नाहीत आणि उडू शकता नाहीत, म्हणून ते पक्ष्यांचे आणि इतर भक्षकांचे सहज होणारे आणि मुख्य खाद्य आहेत. म्हणून या जातीच्या अळ्यांनी स्वत:चा भक्षकांपासून बचाव करण्यासाठी शरीरामध्ये भडक रंग आणि काटे विकसित केले आहेत. या त्यांच्या शरीराच्या गर्द आणि प्रखर तेजस्वी रंगाव्दारे आणि काटे किंवा केसांव्दारे त्यांच्या भक्षकांना डंख मारण्याची चेतावणी देतात. हे या अळ्यांना त्यांच्या भक्षकांपासून वाचवते. अशा काट्याच्या खाली विष ग्रंथी असतात. ही एक स्व:संरक्षणाची रणनीती आहे. या गटातील सर्व अळ्यांच्या शरीरावर काटे किंवा केस नसतात. या किडीला अकाली आपला स्पर्श झाल्यास काही प्रमाणात त्रासही होऊ शकतो परंतु या किडीचे पतंग अपायकारक नसतात. आढळ ही किड भारत, श्रीलंका, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया यासारख्या देशामध्ये आढळून येते. पिकांसाठी किती धोकादायक ही अळी पिकांचे फारसे नुकसान करत नाही, परंतु काही वेळा अळीचा प्रादुर्भाव पिकांच्या काही ठराविक भागापुरताच मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि प्रादुर्भाव झाल्यास अळ्या फक्त पानांच्या शिरा सोडून बाकी भाग अधाशीपणे खातात त्यामुळे झाडाला फक्त पानांच्या शिराच शिल्लक राहतात आणि मोठे नुकसान होते. अळीच्या काट्याचा दंश झाल्याय काय होऊ शकते या गटातील अळ्या त्यांच्या शरीरावर असलेल्या काट्यांमुळे आणि केसांमुळे सहज लक्षात येतात. त्याचा उद्देश त्यांच्या भक्षकांना परावृत्त करणे हा आहे. अळी लोकांच्या मागे जात नाहीत. परंतु तुम्ही त्यांना स्पर्श केल्यास किंवा चूकून संपर्कात येऊन शरीर घासले गेल्यास त्या ठिकाणी काट्यांचा दंश होऊन अपाय होऊ शकतो आणि लक्षणे उद्भवतात. अशा काट्यांमध्ये असलेले विष शरीरात प्रवेश करते. स्पर्श झालेल्या ठिकाणी अळीचे केस अथवा काटे शरीरात तसेच राहतात. दंश हा मधमाशीच्या डंखासारखा त्रासदायक असतो. विष हे सौम्य स्वरूपाचे असते परंतु वेदना होणे, पुरळ येणे, जळजळ होणे, खाज सुटणे, सूज येणे आणि फोड येणे या सारखी लक्षणे दिसू शकतात. सहसा लक्षणे ही तात्पुरत्या स्वरूपाची असतात आणि एका दिवसात निघून जातात किंवा कमी होतात. परंतु जर ती तीव्र स्वरूपाची किंवा जास्त वेळाकरिता कायम राहिली तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत. काही लोकांना अशा अळीच्या संपर्कात आल्यास त्यांना असलेल्या ॲलर्जीमुळे जास्त त्रास होऊ शकतो. ज्या लोकांना अस्थमा, ॲलर्जी या सारख्या समस्या असतील अशा लोकांनी सावधगिरी बाळगून अपाय होऊन जास्त त्रास झाल्यास लवकरात लवकर वैद्यकीय उपचार घ्यावेत. ताबडतोब करावयाचे उपाय अथवा उपचार काही तज्ज्ञ सूचित करतात की चिकट टेप प्रभावित भागात हलक्या हाताने लावून काढावा त्याने शरीरात गेलेले अळीचे केस किंवा काटे सहज निघण्यास मदत होईल. लक्षणे सौम्य असतील तर अपाय झालेल्या ठिकाणी बर्फ लावल्यास किंवा बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट लावल्यास त्रास कमी होतो. अळीचे नियंत्रण कोणतेही स्पर्शजन्य किटकनाशक फवारावे. यामध्ये क्विनॉलफॉस, क्लोरोपायरीफॉस, इमामेक्टिन बेंझोएट, फ्लूबेंडामाईड सारखे कीटकनाशक शिफारस नसले तरी चांगले नियंत्रण करतात. तसेच बरेच नैसर्गिक मित्र किटकांव्दारेही या किडीचे नियंत्रण नैसर्गिकरित्याच होते. तरी सर्वांना कोणत्याही केसाळ किंवा काटेरी अळ्यापासून स्वरक्षणाची सावधगिरी बाळगावी. अळीमुळे दंश झाल्यास घाबरून न जाता योग्य उपाय अथवा उपचार घ्यावेत. संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

रविवार, २ ऑक्टोबर, २०२२

शिक्षणक्षेत्र सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशिल - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 02, (जि. मा. का.) : देशाच्या व राज्याच्या प्रगतीत शिक्षण क्षेत्राचे योगदान महत्वपुर्ण आहे. हे क्षेत्र अधिकाधिक सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशिल असून महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सांगली येथील अधिवेशनाच्या निमित्ताने या क्षेत्रातील मांडण्यात आलेल्या विविध ठरावांच्याबाबतीत सकारात्मक मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशिल राहू, अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन सांगली येथे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांची यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी महामंडळाच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे होत्या, यावेळी खासदार फौजिया खान, माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंत पाटील, माजी मंत्री आमदार विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार जयंत असगावकर, आमदार सुमनताई पाटील, आमदार किरण सरनाईक, आमदार चिमणराव पाटील, सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी, माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, माजी आमदार प्रा. शरद पाटील, हुतात्मा समुहाचे वैभव नायकवडी, महामंडळाचे सहकार्यवाह माजी आमदार विजय गव्हाणे, सहसचिव राजेंद्र साळुंखे, माजी आमदार भैय्यासाहेब रघुवंशी, अमरसिंह देशमुख, वसंतदादा सहकारी साखर काराखान्याचे संचालक विशाल पाटील, स्वागताध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्यासह महामंडळाचे विविध पदाधिकारी, संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षणावर होणारा खर्च ही गुतंवणूक समजून जीडीपीच्या सहा टक्के खर्च शिक्षणावर करावा, नवीन शैक्षणिक धोरण ठरविताना किंवा योजनांबाबत निर्णय घेताना शिक्षण संस्था महामंडळाच्या प्रतिनिधींचा समावेश करावा, विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना संपुर्ण सेवा संरक्षण द्यावे, विनाअनुदानित शाळांचा शिक्षकेत्तर अकृतीबंध जाहीर करावा. या साराख्या अन्य मागण्या या व्यासपीठावरुन करण्यात आल्या. या मागण्याबाबत समन्वयाने व सकारात्मक पध्दतीने मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशिल राहू, अशी ग्वाही कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली. यावेळी त्यांनी जिल्ह्याबाहेरुन आलेल्या संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी महामंडळाचे पदाधिकारी या सर्वांचे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सांगली जिल्ह्यात स्वागत केले. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी राज्यस्तरीय अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, शिक्षक भरतीसाठीची पवित्र पोर्टल प्रणाली रद्द होणार नाही. पोर्टलमध्ये काही अडचणी असल्यास त्यामध्ये सुधारणा करु. विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांसोबतच आता वह्याही मोफत दिल्या जातील असे आश्वासनही दीपक केसरकर यांनी दिले. यावेळी बोलताना मंत्री केसरकर म्हणाले, विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून काम केले पाहिजे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे शिक्षण आणि शिक्षणाबाबत संवेदनशील आहेत. राज्यात शिक्षकांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना तो काळजीपूर्वक घ्यावा लागतो. राज्य सरकारचा प्रती विद्यार्थ्यावर 70 हजार रुपयांचा खर्च होतो. खासगी संस्थांचा तोच खर्च तुलनेने कमी आहे. ते म्हणाले, शिक्षणसंस्था आणि शिक्षकांचे प्रश्न कसे सोडवता येतील यावर सरकार आणि शिक्षणसंस्थांनी चर्चा केली पाहिजे. येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी शिक्षणसंस्थांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा करुन त्यावर काय मार्ग काढता येईल यावर विचारविनिमय करु. नवीन शिक्षण धोरणावर सरकारकडून चर्चा सुरु आहे. पवित्र पोर्टलबाबत बोलताना मंत्री केसरकर म्हणाले, पवित्र पोर्टलमुळे अनेक गुणवत्ताधारक शिक्षक मिळाले आहेत. पोर्टलबाबत जर काही त्रुटी असतील तर त्यामध्ये सुधारणा करण्याचा निश्चित प्रयत्न करु. मात्र, पवित्र पोर्टल बंद होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. तसेच आरटीई अंतर्गत प्रतिपूर्तीसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. डिसेंबरपर्यंत यामध्ये आणखी वाढ कशी करता येईल त्याचाही विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणसेवकांच्या पगारवाढीचा निर्णय घेण्यात आला असून शिक्षणसेवकांना 15 हजार रुपये पगाराची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली आहे. सरकारी शाळाही सुरु राहिल्या पाहिजेत अशी सरकारची अपेक्षा आहे, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी महामंडळाच्या अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मानवाच्या जीवनामध्ये बदल घडवून आणणाऱ्या घटकांपैकी एक घटक म्हणजे शिक्षण, शिक्षणाने उद्याचे सुजान, सर्जनशील, कर्तबगार व सुसंस्कृत नागरिक घडविणे खरे अपेक्षित आहे. शिक्षण ही न संपणारी प्रक्रिया आहे. मानावाच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवून आणणे हा त्याचा हेतू आहे. आधुनिक काळात जीवनामान समृध्द करण्यासाठी शिक्षण संस्था, शिक्षक व शिक्षणाची भूमिका महत्वाची आहे. म्हणून महामंडळाच्या माध्यमातून शिक्षण संस्थांचे प्रश्न आणि त्याचसोबत शिक्षक/शिक्षकेत्तर सेवकांचे प्रश्न सोडवण्यास प्रयत्नशिल राहीन. यावेळी आमदार जयंत पाटील, आमदार विश्विजीत कदम, विशाल पाटील, वैभव नायकवडी यांनी मनोगत व्यक्त केले. माजी आमदार विजय गव्हाणे यांनी प्रास्ताविक केले. अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी रावसाहेब पाटील होते. ०००००