बुधवार, २६ जुलै, २०२३

पी.एम. किसान योजनेच्या लाभ वितरणाच्या कार्यक्रम प्रसारणाचा लाभ घेण्याचे आवाहन

पी.एम. किसान योजनेच्या लाभ वितरणाच्या कार्यक्रम प्रसारणाचा लाभ घेण्याचे आवाहन सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 14 व्या हप्ता वितरणाचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या 27 जुलै 2023 रोजी होणार आहे. हा समारंभ राजस्थान मधील सिकर येथे सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण http://pmindiawebcast.nic.in व http://pmevents.ncog.gov.in या लिंक व्दारे होणार असून या कार्यक्रमाचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील लाभार्थी शेतकऱ्यांना 14 व्या हप्त्यातील एप्रिल 2023 ते जुलै 2023 देय लाभ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सीकर, राजस्थान येथून ऑनलाईन समारंभामध्ये वितरीत होणार आहे. कृषि विज्ञान केंद्र कसबे डिग्रज, कृषि विज्ञान केंद्र कांचनपूर, ग्रामपंचायत स्तरावरून तसेच तालुक्यातील गावोगावी कृषि विभागामार्फत मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक यांनी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाचे आयोजन केले असल्याचे श्री. कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

संभाव्य पूर, आपत्ती हाताळण्यास प्रशासन सज्ज नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : जिल्ह्यात पाऊस सुरू असून सद्यस्थितीत पूर व आपत्तीजनक, धोकादायक परिस्थिती नाही. संभाव्य आपत्ती परिस्थिती हाताळण्यासाठी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस, पाटबंधारे, सर्व प्रशासन व इतर सर्व विभाग सतर्क व सज्ज आहेत. यामुळे नागरिकांनी काळजी करू नये. कोणतीही अडचण आल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून मदत घ्यावी. कोणत्याही अनधिकृत माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. शासन व स्थानिक प्रशासनामार्फत दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. जिल्ह्यात येणाऱ्या काळात संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनामार्फत निश्चित केलेल्या तात्पुरत्या निवारा केंद्रात, किंवा सुरक्षित ठिकाणी नागरिकांनी स्थलांतरित व्हावे. ही निवारा केंद्र कोठे आहेत याची माहिती नागरिकांनी जाणून घ्यावी. त्याचबरोबर नियमितपणे प्रशासनाच्या संपर्कात रहावे. सांगली जिल्ह्यामध्ये चार गावातील दरड प्रवण भागाची जिल्हा प्रशासनामार्फत नुकतीच पाहणी करण्यात आली असून तेथे एनडीआरएफमार्फत गावकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या कोणताही धोका दिसत नसून जर स्थलांतराची गरज पडल्यास त्यांना प्रशासनामार्फत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले जाईल. सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी. पाणी उकळून प्यावे. जिल्ह्यामध्ये एनडीआरएफचे एक पथक पोहोचले असून त्यांनी पूरपरिस्थितीच्या ठिकाणांची पाहणी केली आहे. स्थानिक लोकांचेही सहकार्य असून आपदा मित्रांचेही प्रशिक्षण झाले आहे. सर्व नागरिकांनी सतर्क रहावे, सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. 00000

सोमवार, २४ जुलै, २०२३

वारणा धरणात 25.67 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 25.67 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 51.78 (105.25), धोम 7.50 (13.50), कन्हेर 4.58 (10.10), वारणा 25.67 (34.40), दूधगंगा 12.01 (25.40), राधानगरी 7.36 (8.36), तुळशी 1.59 (3.47), कासारी 2.21 (2.77), पाटगांव 2.43 (3.72), धोम बलकवडी 3.47 (4.08), उरमोडी 4.72 (9.97), तारळी 4.65 (5.85), अलमट्टी 62.53 (123). विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 17 (40) व अंकली पूल हरिपूर 21.10 (45.11). कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 905 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. 00000

शिराळा तालुक्यात 37.4 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.8 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 37.4 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 6.9 (124), जत 2.9 (89.8), खानापूर-विटा 3 (79.4), वाळवा-इस्लामपूर 16.3 (161), तासगाव 6.1 (138.1), शिराळा 37.4 (413.1), आटपाडी 1 (80.6), कवठेमहांकाळ 3.3 (100.8), पलूस 8.5 (126.1), कडेगाव 5.3 (101.1). 00000

विकास संस्थांच्या संगणकीकरणासाठी जिल्ह्यामधील 381 संस्थांची निवड - सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे

केंद्र शासनाच्या सर्व योजनांचा लाभ सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना द्या सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : विकास संस्थांच्या संगणकीकरणासाठी जिल्ह्यातील 381 संस्थांची निवड केली असून केंद्र शासनाच्या सर्व योजनांचा लाभ सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना द्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे यांनी केले. केंद्र शासनाच्या प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्थांच्या संगणकीकरण योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे यांनी नुकताच सांगली जिल्हा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांच्या समवेत पणन संचालक व अप्पर निबंधक शैलेश कोतमिरे, कोल्हापूर विभागाचे विभागीय सहनिबंधक (प्रशासन) अरूण काकडे, विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षक) श्री. छत्रीकर, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 संजय पाटील व संबंधित तालुक्याचे सहाय्यक निबंधक उपस्थित होते. सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे यांनी सांगली मधील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना भेटी दिल्या. ‍ यामध्ये वाळवा तालुक्यातील वसंतदादा वि.का.स. सोसा.लि. येडेनिपाणी, हनुमान विकासह. सोसा. लि. कोरेगाव, चंद्रप्रभनाथ दिगंबर विविध कार्यकारी सह संस्था मर्या. आष्टा, नांद्रे सर्व सेवा सह संस्था मर्या. नांद्रे, वसगडे विकास सोसा.लि वसगडे, अंकलखोप विविध कार्यकारी सह. सोसा.लि, अंकलखोप या संस्थांचा समावेश आहे. यावेळी त्यांनी विकास सोसायट्यांसाठी सी.एस.सी. सेंटर, जेनरीक मेडीकल, अग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर स्किम अंतर्गत पीक काढणीपश्चात करता येणारे उद्योग, पेट्रोल पंप, एलपीजी गॅस वितरण, पीएम कुसुम योजना इत्यादीचा आढावा घेतला. या योजने अंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 78 संस्थांनी सी.एस.सी. रजिस्ट्रेशन केले आहे. 22 संस्थांनी त्यांचे अॅक्टीवेशन करून काम सुरु केलेले आहे. या भेटी प्रसंगी सहकार आयुक्त श्री. कवडे यांच्या हस्ते वसंतदादा येडेनिपाणी येथील केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. केंद्र सरकारकडून प्राप्त सुचनेनुसार विकास संस्थांच्या उपविधीमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यास दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे 5 संस्थांनी जेनरीक मेडीकलसाठी रजिस्ट्रेशन केलेले असून अंकलखोप सोसायटीमार्फत सुरू असलेल्या मेडीकलला त्यांनी भेट दिली. केंद्र सरकारच्या अॅग्रीकल्चर इन्फास्ट्रक्चर फंड स्कीम (AIF) अंतर्गत सांगली जिल्ह्यातील 22 प्राथमिक कृषि सहकारी संस्थांनी पीक काढणी पश्चात उद्योग यामध्ये गोडाऊन, बनाना रायपेनिंग युनिट, सोलार पॉवर प्लाँट, शुगरकेन हार्वेस्टींग मशिन, अँग्रो स्टोअरेज सेंटर, औषध फवारणीसाठी ड्रोन इत्यादी उद्योग सुरू केले आहेत. या अंतर्गत 7 कोटी 47 लाख रूपये कर्ज वाटप संस्थाना करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. सहकार विभागातील अधिकारी तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी यांची सांगली अर्बन बँकेच्या सभागृहामध्ये आढावा सभा घेण्यात आली. त्यामध्ये विकास संस्थांच्या संगणकीकरणासाठी प्रशिक्षणही देण्यात आले. विकास संस्थांच्या संगणकीकरणासाठी राज्यातील 451 संस्था पायलेट प्रोजेक्टसाठी निवडण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 768 वि.का.स. संस्था असून यामधील 381 संस्थांची निवड केली असल्याचे, जिल्हा उपनिबधंधक मंगेश सुरवशे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. 00000

शनिवार, २२ जुलै, २०२३

बेडग गावातील स्वागत कमान घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व धर्मियांनी सामाजिक सलोखा राखावा राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांचे आवाहन

सांगली, दि. 22 (जि. मा. का.) :- बेडग गावातील स्वागत कमान घटनेच्या पार्श्वभूमीवर गाव, परिसर, जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व धर्मीय बांधवांनी सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी केले आहे. बेडग गावातील स्वागत कमान घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती घोडमिसे, महापालिका आयुक्त सुनील पवार, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, अतिरीक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील, मिरज उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अपर्णा मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर आदि उपस्थित होते. श्री. पारधी यांनी बेडग येथील स्वागत कमान घटनेच्या पार्श्वभूमीवर महसूल विभाग, जिल्हा परिषद, पोलीस विभागाकडून माहिती जाणून घेतली. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी प्रशासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या. तत्पूर्वी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी आज बेडग येथे भेट दिली. यावेळी त्यांनी स्वागत कमान जागेची पाहणी करून माहिती घेतली. तद्नंतर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांशी संवाद साधला व सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले. बेडग येथील भेटी प्रसंगी मिरज उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अपर्णा मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे, सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर, बेडगचे सरपंच उमेश पाटील आदि उपस्थित होते. ०००००

बेडग गावाने सामाजिक सलोख्याचा आदर्श निर्माण करावा समाज माध्यमांवर अफवा पसरवू नका जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे आवाहन

सांगली, दि. 22 (जि. मा. का.) :- बेडग गावातील स्वागत कमान संदर्भात समाज माध्यमांवर कोणत्याही अफवा पसरवू नका. बेडगच्या ग्रामस्थांनी गावात सामाजिक सलोख्याचा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, या घटनेमुळे गावात कोणताही भेदभाव होऊ नये याची दक्षता ग्रामस्थांनी घ्यावी. सर्वांनी गावाच्या विकासासाठी पुन्हा एकत्र येणे अपेक्षित असून त्यासाठी सर्वांनी आपापसात सुसंवाद ठेवून कृती करावी. प्रशासनामार्फत सर्वांना सहकार्य केले जाईल, असे ते म्हणाले. बेडग गावातील स्वागत कमान अनुषंगाने समाज माध्यमावर कोणताही चुकीचा संदेश जाऊ नये. दोन समाज बांधवांमध्ये तेढ निर्माण होऊ नये याची खबरदारी गावकऱ्यांनी घ्यावी. या संदर्भात समाज माध्यमातून चुकीचे संदेश देणाऱ्यांवर व अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. ०००००

शुक्रवार, २१ जुलै, २०२३

इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

उच्च शिक्षणासाठी राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरीता इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी / विद्यार्थिनींना बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रक्कमेवरील व्याजाचा परतावा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येते. इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी 10 लाख रूपये व पदरेशी अभ्यासक्रमासाठी 20 लाख रूपये इतके महत्तम कर्ज अदा करण्यात येते. राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रम - आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिकय व व्यवस्थापन अभ्यासक्रम, कृषी, अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान. राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता बँकेने उपलब्ध करून दिलेल्या कर्जामध्ये शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदी व अर्जदाराच्या राहण्याचा व भोजनाचा खर्च याचा समावेश राहील. परदेशी अभ्यासक्रम - आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन, विज्ञान व कला. परदेशी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता बँकेने उपलब्ध करून दिलेल्या कर्जामध्ये फक्त शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदीचा समावेश राहील. योजनेचे स्वरुप व सहभाग देशांतर्गत अभ्यासक्रमाकरीता 10 लाख रूपये तसेच परदेशी अभ्यासक्रमाकरीता 20 लाख रूपयेच्या मर्यादेत बँकेने मंजूर केलेल्या कर्जाचे विद्यार्थ्याने वेळेत हप्ते भरल्यास त्यामधील व्याजाची रक्कम 12 टक्केच्या मर्यादेत विद्यार्थ्यांच्या आधारलिंक खात्यात महामंडळामार्फत व्याज परतावा जमा करण्यात येते. विद्यार्थ्यांची पात्रता अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी व इतर मागास प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे. इयत्ता 12 वी 60 टक्के गुणांसह पास असलेले विद्यार्थी पात्र राहतील. अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण व शहरी भागाकरीता 8 लाख रूपये पर्यंत व शासनाच्या सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमिलेअरच्या मर्यादेत असावी. इतर अटी व शर्ती परदेशी अभ्यासक्रमांतर्गत शैक्षणिक कर्ज घेतलेल्या लाभार्थीनी व्याज परतावा मागणी करताना पुढील बाबी संबंधित आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहील. परदेशी अभ्यासक्रमासाठी QS (Quacquarelli Symonds) च्या रँकिंग / गुणवत्ता निकषांनुसार संस्थेचे स्थान 200 पेक्षा आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी. परदेशी अभ्यासक्रमाकरीता पात्रता परीक्षा Graduate Record Exam (GRE), Test of English as a Foreign Langauage (TOEFL) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. अर्ज करण्याची पद्धत अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने www.msobcfdc.org या संकेतस्थळ / वेबसाईटवर अर्ज सादर करावा. संपर्क जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, संभाजीनगर, सांगली. दूरध्वनी क्र. 0233-2321513. संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, सांगली 00000

बुधवार, १९ जुलै, २०२३

जिल्हा विकास आराखडा 28 जुलैपर्यंत तयार करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले निर्देश

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वसमावेशक जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील सामाजिक, आर्थिक परिस्थिती आणि नैसर्गिक संसाधनांमधील असमानता तसेच जलद शहरीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याची गरज या सर्व बाबी विचारात घेणे गरजेचे आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांकडून विविध क्षेत्रांतील बलस्थाने, उणिवा, उत्कर्षाच्या संधी तसेच संभाव्य अडचणींचा अभ्यास करून 28 जुलैपर्यंत जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. “विकसित भारत - भारत @2047 (India@२०४७)” साठी तयार करण्यात येत असलेल्या जिल्हा विकास आराखड्याबाबत घेण्यात आलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन 2047 पर्यंत “विकसित भारत -भारत @2047 (India@२०४७)” करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. यासाठी विकासाचे केंद्र म्हणून जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केल्याने आर्थिक विकासासाठी विचारपूर्वक आणि विशिष्ट दृष्टीकोन विकसित करणे शक्य होईल. या अनुषंगाने सर्व विभागांनी जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी सक्रिय योगदान द्यावे, तसेच हा आराखडा सर्वसमावेशक होण्यासाठी सामाजिक संस्थांसह विविध क्षेत्रातील लोकांनी https://forms.gle/x8sMvgSjAF4UWu1U9 या लिंकवर आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 00000

बीएलओमार्फत मतदार यादीतील नावाची पडताळणी 21 जुलै ते 21 ऑगस्ट दरम्यान जिल्हा प्रशासनाचा उपक्रम

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मतदार यादीच्या पुनरिक्षण पूर्व उपक्रमामधील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करण्याचा उपक्रम 21 जुलै ते 21 ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात येणार आहे. या कालावधीत संबंधित बीएलओ हे मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदार यादीतील मतदारांच्या तपशिलाची पडताळणी संबंधित कुटुंब प्रमुखांकडून गोळा करणार आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबवण्यात येत आहे. मतदार यादी अचूक व सुदृढ होण्यासाठी नागरिकांनी व राजकीय पक्षांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी बी. आर. माळी यांनी केले आहे. राज्यात स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनस्तरावर सज्जता ठेवण्यासाठी कार्यवाहीला प्रारंभ झाला आहे. भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024 या वर्षासाठी छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मतदार हा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. यामध्ये बीएलओ प्रामुख्याने मतदार यादीत नाव नसलेले पात्र नागरिक, संभाव्य मतदार 1 जानेवारी 2024 रोजीच्या अर्हता दिनांकावर वयाची 18 वर्ष पूर्ण करणारे तसेच 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑक्टोबर 2024 या अर्हता दिनांकावर वयाची 18 वर्ष पूर्ण करणारे व मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र मतदार, दुबार नोंदी, मृत मतदार, कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदार, मतदार यादीत दुरुस्ती अशा मुद्यांची घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. 22 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीत मतदार केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण व मतदार यादी / मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी 17 ऑक्टोबरला प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यावरील दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 असा आहे. अंतिम मतदार यादी 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. दावे व हरकती सादर करण्यासाठी नमुना अर्ज तहसिल कार्यालयात उपलब्ध आहेत. दावे व हरकतींबाबत मतदार नोंदणीचे ऑफलाईन अर्ज संबंधित तहसिल कार्यालयात (निवडणूक शाखा) अथवा बीएलओमार्फत सादर करण्यात यावेत किंवा ऑनलाईन अर्ज Voter Service Portal, Voter Portal या संकेतस्थळावर व Voter Helpline Mobile App वर देखील सादर करता येतील. या मोहिमेसंदर्भात नागरिकांना किंवा मतदारांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेशी संपर्क साधावा. बीएलओंची यादी प्रत्येक तहसील कार्यालयात उपलब्ध असल्याचे श्री. माळी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडील थेट कर्ज योजनेंतर्गत 25 जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करा

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाजातील 12 पोटजातीतील अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारूडी, मांग गारोडी, मादगी व मादिगा या जातीतील व्यक्तींची आर्थिक उन्नती होण्यासाठी थेटकर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यासाठी एकूण 50 लाभार्थीचे 50 लाख रूपयांचे उदिष्ट प्राप्त झाले असून दि. 25 जुलै 2023 पर्यंत लाभार्थीने प्रस्ताव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, संभाजीनगर, सांगली येथे दाखल करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. 00000

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी 31 जुलै पर्यंत सहभागी व्हावे

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांचे आवाहन सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्ह्यात भात (25), ख.ज्वारी (52), बाजरी (36), भुईमूग(63), सोयाबीन (55), मूग (39), उडीद (33), कापूस (3) या पिकांसाठी महसूल मंडळ, मंडळ गटस्तरावर तसेच मका (0) व तूर (0) या पिकांसाठी तालुका गटस्तरावर विमा क्षेत्र घटक धरुन भारतीय विमा कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी भाग घेण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याचे काम होत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे. या योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या आकस्मिक प्रतिकूल परिस्थितीमुळे अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे नुकसान झाल्यास योजनेतील अटी-शर्तीनुसार नुकसान भरपाई निश्चित करण्यात येते. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदाराव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेवू शकतात. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकाचे उंबरठा उत्पन्न हे मागील 7 वर्षापैकी सर्वाधिक उत्पादनाचे मागिल 5 वर्षाचे पिक कापणी प्रयोगाद्वारे आलेले सरासरी उत्पन्न गुणीले जोखिमस्तर विचारात घेवून निश्चित करण्यात येते. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याची व विमा हप्ता कर्ज रक्कमेतून वजावट करुन विमा कंपनीकडे वर्ग न करण्याची सूचना बँकेला देण्याची अंतिम मुदत, नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस आधी द्यावी. जे कर्जदार शेतकरी विहीत मुदतीत सहभागी होण्यासाठी बँकांना कळविणार नाहीत असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत, असे गृहीत धरुन, शेतकऱ्याचा विमा हप्ता विहीत पध्दतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल. या योजनेंतर्गत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कर्जदार शेतकरी जवळच्या प्राधिकृत बँका/बँक शाखा/प्राथमिक कृषि पत पुरवठा सहकारी संस्था (नोडल बँकमार्फत) व बिगर कर्जदार शेतकरी प्राधिकृत बँका, कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी), जवळच्या तसेच संबधित विमा कंपनीची कार्यालये, www.pmfby.gov.in या वेब पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज भरु शकतील. अर्जदाराने आपल्या सोबत आधार कार्ड /आधार नोंदणीची प्रत, 7/12 उतारा, भाडेपट्टा करार असेल तर करारनामा/ सहमती पत्र, पेरणी घोषणापत्र आणि बँक पासबुकची झेरॉक्स, मोबाईल क्रमांक इत्यादी अर्जास जोडणे / ऑनलाईन पध्दतीने जोडण्यासाठी आवश्यक आहे. प्रतिकुल हवामान घटकामुळे अपूरा पाऊस, किंवा हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित मुख्य पिकाची अधिसूचित विमा क्षेत्र घटकातील पेरणी क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर उगवण अथवा पेरणी, लावणी न झाल्यास सदरची तरतूद लागू आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादीमुळे अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात 25 टक्के मर्यादेपर्यत आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देय राहील. हंगामाच्या अखेरीस सरासरी उत्पन्नाच्या आधारे नुकसान भरपाई निश्चित करणे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पडलेल्या पावसामुळे विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्ख्लन, गारपीट, ढगफूटी अथवा वीज कोसळल्यामुळे नैर्सगिक आग यामुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे अधिसूचित पिकाचे नुकसान वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येते. काढणी पश्चात नुकसान भरपाई हे अधिसूचित क्षेत्रातील, पिक शेतात कापणी करुन सुकवणीसाठी पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकासाठीच, कापणी पासून जास्तीत जास्त 14 दिवसापर्यंत गारपिट, चक्रिवादळ व त्यामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई निश्चित करण्यात येते. स्थानिक नैर्सगिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्व्हे नंबर नुसार, बाधीत पिक व बाधीत क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत संबंधित विमा कंपनीस कळविणे आवश्यक आहे. सर्वप्रथम कृषि व शेतकरी कल्याण विभागामार्फत विकसित मोबाईल ॲपद्वारे स्थानिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे छायाचित्र त्यांच्या अक्षांश व रेखांश सहित घेवून माहिती देणे अपेक्षित आहे. केंद्रिय टोल फ्रि क्रमांक 1800 419 5004 चा वापर शेतकऱ्यांनी करावा. केंद्रिय टोल फ्री क्रमांक उपलब्ध न झाल्यास आपत्तीबाबतची माहिती, भरलेला पिक विमा हप्ता व त्याचा दिनांक, विमा संरक्षित रक्कम यासह माहिती संबधित बँक, कृषी व महसूल विभागांना तात्काळ द्यावी. पीक नुकसानीचा पुरावा म्हणून मोबाईल प्रणालीद्वारे घेतलेली छायाचित्रे द्यावीत. स्थानिक आपत्ती अथवा काढणी पश्चात पीक नुकसानीची तक्रार नोंदवल्याशिवाय शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाईचा लाभ मिळणार नाही. या योजनेंतर्गत भात, ख.ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, मूग, तूर, उडीद, मका, कापूस पिकांसाठी जोखिमस्तर 70 टक्के असून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता एक रूपया प्रति हेक्टर आहे. विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर भात पिकासाठी 50 हजार रूपये, ख.ज्वारी 30 हजार रूपये, बाजरी 25 हजार रूपये, भुईमूग 40 हजार रूपये, सोयाबीन 40 हजार रूपये, मूग 20 हजार रूपये, तूर 25 हजार रूपये, उडीद 22 हजार रूपये, मका 35 हजार 598 रूपये व कापूस पिकासाठी 35 हजार रूपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आहे. 00000

वारणा धरणात 17.11 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 17.11 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 31.10 (105.25), धोम 5.44 (13.50), कन्हेर 2.79 (10.10), वारणा 17.11 (34.40), दूधगंगा 6.56 (25.40), राधानगरी 4.87 (8.36), तुळशी 1.09 (3.47), कासारी 1.41 (2.77), पाटगांव 1.75 (3.72), धोम बलकवडी 2.46 (4.08), उरमोडी 3.91 (9.97), तारळी 3.59 (5.85), अलमट्टी 28.76 (123). विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 7.09 (40) व अंकली पूल हरिपूर 8.5 (45.11). 000000

शिराळा तालुक्यात 36.3 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 14.9 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 36.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 15.2 (84), जत 14.2 (70.6), खानापूर-विटा 10.4 (61.1), वाळवा-इस्लामपूर 11.6 (83.6), तासगाव 16 (99.7), शिराळा 36.3 (247.5), आटपाडी 10.2 (64.5), कवठेमहांकाळ 17 (71), पलूस 9.6 (68.7), कडेगाव 5.7 (68.5). 00000

क्रीडा स्पर्धा आयोजन बैठकीस क्रीडा शिक्षकांना उपस्थित रहाण्याचे आवाहन

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : जिल्हाय क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली व्दालरा प्रतिवर्षी विविध खेळांच्या् व विविध गटात, विविध पातळीवर स्प)र्धांचे आयोजन करण्यारत येते. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील स्पिर्धांचे आयोजन व नियोजन करण्या साठी सांगली जिल्याारीतील 10 तालुक्यां3तून व महानगरपालिका क्षेत्राच्याी शाळा, कनिष्ठि महाविद्यालय यांच्याि क्रीडा शिक्षकांची बैठक आयोजित करण्याात आली आहे. या बैठकीस शाळा, कनिष्ठन महाविद्यालयातील क्रीडा शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाक क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले आहे. शासनाने प्रत्येाक शाळेने किमान दोन सांघिक खेळात व एका वैयक्तिक खेळात सहभागी होणे सक्तीचे केले असल्यातने शाळा प्रमुखानी आपल्याव शाळेचे संघ स्पखर्धामध्ये सहभागी करण्याबाबत आपल्याल शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा शिक्षकांना सभेस उपस्थित राहण्याबाबतच्या सूचना द्याव्यात व शासकीय क्रीडा स्पपर्धा आयोजनास सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. बोरवडेकर यांनी केले आहे. क्रीडा शिक्षकांची बैठक कार्यक्रम निश्चित झाला असून क्रीडा स्पार्धा आयोजन व नियोजन सभेमध्येा क्रीडा स्प्र्धांची माहिती ऑनलाईन पोर्टल व्दारे देण्यात येणार आहे. तालुकास्तकर क्रीडा स्परर्धा आयोजनाबाबत व जिल्हा क्रीडा स्पर्धा आयोजन स्थ ळ निश्चितीबाबत चर्चा होणार आहे. या स्प र्धेसाठी कोणती संस्थाल विविध खेळाचे नियोजन करण्याडस इच्छू्क असल्याीस त्यााबाबतचे पत्र या सभेत स्विकारले जाईल. तालुकानिहाय क्रीडा शिक्षकांच्या सभेचा दिनांक व सभेचे ठिकाण पुढीलप्रमाणे. दिनांक 26 जुलै रोजी मिरज व तासगाव तालुक्यासाठी सकाळी 10 वाजता व महानगरपालिका क्षेत्रासाठी दुपारी 3 वाजता एस. एन. डी. टी. (चंपाबेन) महाविद्यालय, सांगली येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. दि. 27 जुलै रोजी खानापूर व आटपाडी तालुक्यासाठी सकाळी 10 वाजता बळवंत कॉलेज, विटा येथे तर जत व कवठेमहांकाळ तालुक्यासाठी दुपारी 3 वाजता जिल्हा परिषद शाळा नं.-1, कवठेमहांकाळ येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.‍ दि. 28 जुलै रोजी पलूस व कडेगाव तालुक्यासाठी सकाळी 10 वाजता लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदीर, पलूस येथे तर वाळवा व शिराळा तालुक्यासाठी दुपारी 3 वाजता विद्यामंदीर हायस्कूल, इस्लामपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. 000000

मंगळवार, १८ जुलै, २०२३

शिराळा तालुक्यात 16.3 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.3 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 16.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 2.6 (68.8), जत 1.6 (56.4), खानापूर-विटा 3 (50.7), वाळवा-इस्लामपूर 4.6 (72), तासगाव 5 (83.7), शिराळा 16.3 (211.2), आटपाडी 1.3 (54.3), कवठेमहांकाळ 2.1 (54), पलूस 3.1 (59.1), कडेगाव 3.4 (62.8). 00000

वारणा धरणात 15.95 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 15.95 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 27.28 (105.25), धोम 5.09 (13.50), कन्हेर 2.60 (10.10), वारणा 15.95 (34.40), दूधगंगा 5.82 (25.40), राधानगरी 4.55 (8.36), तुळशी 1.04 (3.47), कासारी 1.32 (2.77), पाटगांव 1.57 (3.72), धोम बलकवडी 2.13 (4.08), उरमोडी 3.75 (9.97), तारळी 3.40 (5.85), अलमट्टी 26.93 (123). विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 6.06 (40) व अंकली पूल हरिपूर 5.7 (45.11). 000000

मदत व बचाव कार्यासाठी एन.डी.आर.एफ.चे पथक दाखल

सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी व मदत कार्य राबविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एन.डी. आर.एफ) एक पथक सांगली जिल्ह्यात दाखल झाले आहे. अशी माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण दिपक शिंदे यांनी दिली. एन.डी. आर.एफ. च्या पथकामध्ये पथक प्रमुख राजेश येवले व मोहित शर्मा असे दोन अधिकारी व इतर 20 जवान आहेत. या पथकाकडे बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, रोप, इमारत कोसळल्यानंतर शोध व सुटका कामी आवश्यक साहित्य सामग्री उपलब्ध आहे. सन 2019 सन 2021 मधील जुलै महिन्याच्या शेवटी पडणारा पाऊस व हवामान खात्याकडील अंदाज पाहता त्यानुसार राज्य शासनाकडून एन.डी.आर.एफ. पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत सांगली जिल्ह्यात कार्यरत राहणार आहे. या पथकामार्फत जिल्ह्यामधील संभाव्य पूर प्रवण भागातील क्षेत्र, शहरी भागातील धोकादायक इमारती, दरडग्रस्त गावाची पाहणी, धोकादायक औद्योगिक क्षेत्र इत्यादी पाहणी करण्यात येणार आहे. तसेच आपत्तीच्या काळात काय करावे व काय करू नये या अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे एन.डी. आर. एक पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 00000

सोमवार, १७ जुलै, २०२३

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सांगली दि. 17 (जि.मा.का.) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना, बीज भांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना आणि कौशल्य विकास प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे. वैयक्तिक व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, आणि कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थीनी महामंडळाच्या www.msobcfdc.org या पोर्टलवर आवश्यक कागदपत्रासह अर्ज करणे आवश्यक आहे. पात्र व इच्छुक लाभार्थ्यांनी योजनेच्या लाभासाठी व अधिक माहितीसाठी इतर मागास प्रवर्गात मोडत असल्याचा मूळ जातीचा दाखला, आधारकार्ड यासह महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बुधगाव रोड, संभाजीनगर, सांगली (0233- 2321513) येथे संपर्क साधावा. ०००००

बेरोजगार व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी 26 जुलैला मार्गदर्शन वेबीनार

सांगली दि. 17 (जि.मा.का.) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत बेरोजगार व स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांसाठी बुधवार दि. 26 जुलै 2023 रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनार आयोजित करण्यात आला आहे. या वेबीनारमध्ये "व्यवसाय वृध्दीसाठी बॅंक, शासकीय कार्यालयाशी सुसंवाद" या विषयावर बॅंक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा कार्यालयाचे निवृत्त बॅंक अधिकारी लक्ष्मीकांत कट्टी हे मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुक युवक व युवतीनी https://meet.google.com/mnb-xdyn-yhy लिंकव्दारे वेबीनारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज.बा. करीम यांनी केले आहे. 00000

खाजगी बसेसच्या चालक व मालकांनी वाहतूकीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे - सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. व्ही. साळी

बसेस तांत्रिक दृष्ट्या सक्षम असल्याची खात्री करूनच प्रवासी वाहतूक करा सांगली दि. 17 (जि.मा.का.) : खाजगी बसेसच्या चालक व मालक यांनी वाहतूकीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व आपल्या बसेस तांत्रिक दृष्ट्या सक्षम असल्याची खात्री करूनच प्रवासी वाहतूक करावी, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. व्ही. साळी यांनी केले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी समृध्दी महामार्गावर झालेल्या बसच्या अपघातानंतर खबरदारी म्हणून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगलीच्या वायुवेग पथकांकडून खाजगी ट्रॅव्हल्स बसेसची कसून तपासणी केली जात असून चालक-मालक व प्रवाशी यांना मार्गदर्शन व प्रबोधन केले जात आहे. दोषी असणाऱ्या बसेसवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. प्रबोधन करत असताना वाहन चालकास लेन कटींग बदलचे नियम, प्रवासी वाहतूक दरम्यान कोणत्याही चुकीच्या ठिकाणी वाहन पार्किंग न करणे, प्रवासी वाहतूकीदरम्यान मद्यप्राशन न करणे, आग विझवणारी उपकरणे व प्रथम उपचार पेटी सुस्थितीत ठेवणे, घाट मार्गामध्ये वाहन चालवताना वाहन न्यूट्रल न करणे, लांब पल्लांच्या प्रवासामध्ये वाहन चालकाने दोन ते तीन तासानंतर पुरेशी विश्रांती घेणे, ठरलेल्या वेग मर्यादेपेक्षा वाहन अती वेगाने चालवू नये, वाहनांमध्ये असणारे आपत्कालीन दरवाजे सुस्थितीत ठेवणे, आपत्कालीन दरवाजे व आग विझवणारी यंत्रणा यांचे बसमध्ये असणारे प्रत्यक्ष स्थान व त्यांचा वापर करण्याची पध्दत प्रवाशांना समजावून सांगणे, तसेच वाहन चालकांनी नियमीत आपली आरोग्य व नेत्र तपासणी करून घेणे इत्यादी विषयी माहिती व मार्गदर्शन केले जात आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून 1 जुलै पासून 75 बसेसची तपासणी केली असून दोषी आढळलेल्या 35 बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही बसेसची तपासणी नियमीतपणे केली जाणार असल्याचे श्री. साळी यांनी कळविले आहे. 00000

शनिवार, १५ जुलै, २०२३

गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी बीट मार्शल वाहने व स्मार्ट बीट प्रणाली उपयुक्त ठरेल - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 15 जुलै (जि.मा.का.) : बीट मार्शल वाहने व स्मार्ट बीट प्रणालीमुळे पोलीस यंत्रणा अधिक गतिमान होईल. बीट मार्शल वाहने व स्मार्ट बीट ही यंत्रणा गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केला. पोलीस अधीक्षक कार्यालय येथे बीट मार्शल वाहने व स्मार्ट बीट प्रणालीचे लोर्कापण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, आमदार सुधीर गाडगीळ, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील, पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलीस अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, सांगली, मिरज सारख्या शहरात व उपनगरात काही अनुचित प्रकार घडल्यास या ठिकाणी बीट मार्शल दुचाकी वाहनांमुळे तात्काळ पोहचता येईल व तेथील परिस्थिती नियंत्रणात आणता येईल. या बरोबरच शाळा, कॉलेज, उद्याने यासारख्या ठिकाणीही गस्त घालण्यासाठी या वाहनांचा अधिक चांगला उपयोग होईल. पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाने अधिकच्या आधुनिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे. पोलीस यंत्रणेनेही जिल्ह्यातील अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यासाठी अधिक सक्षमपणे कारवाई करावी. महापौर दिग्वीजय सुर्यवंशी व आमदार सुधीर गाडगीळ यांनी मनोगत व्यक्त करताना या उपक्रमास शुभेच्छा दिल्या व या उपक्रमामुळे गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले. प्रास्ताविकात पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली म्हणाले, पोलीस महासंचालनालय कार्यालयाकडून 66 दुचाकी वाहने प्राप्त झाली आहेत. यापैकी 30 वाहनांना पी.ए. सिस्टीम, सायरन सिस्टीम, चारचाकी वाहनांप्रमाणे लाईट सिस्टीम बसवून बीट मार्शलसाठी 30 गाड्या तयार करण्यात आल्या आहेत. सांगली जिल्हा पोलीस दलामध्ये 40 बीट मार्शल कार्यान्वीत करण्याचा मानस आहे. या बीट मार्शलना प्रत्येकी एक मोबाईल फोन देण्यात येत असून एक ठराविक मोबाईल नंबरही देण्यात येणार आहे. सांगली व मिरज शहरात प्रत्येक बीटसाठी एरिया विभागून देण्यात आला आहे. संबधित क्षेत्रातील सर्व आस्थापना, महत्वाच्या ठिकाणांची यादी तयार करून बीट मार्शलकडे देण्यात येणार आहे. प्रत्येक बीटमध्ये दिवसा 12 तासासाठी 2 अंमलदार व रात्री 12 तासासाठी 2 अंमलदार याप्रमाणे 24 तास गस्त घालण्यात येणार आहे. बीट मार्शलकडील मोबाईल नंबर त्या त्या क्षेत्रातील आस्थापना व नागरिकांना देण्यात येणार आहेत. शहर विभागासाठी एकूण 35 बीट मार्शल व 4 ट्राफिक बीट मार्शल व एक महिला बीट मार्शल असे एकूण 40 बीट मार्शल असणार आहेत. सांगली, मिरज, जत, इस्लामपूर, तासगाव, विटा व आष्टा या शहरामध्ये बीट मार्शल सिस्टीम कार्यान्वीत करणार आहे असे त्यांनी सांगितले. बीट मार्शल सिस्टीम पुढील काळात प्रभावीपणे काम करून जनतेच्या प्रश्नांना योग्य वेळेत प्रतिसाद देवून त्यांचे प्रश्न सोडवतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते बीट मार्शल अंमलदार यांना मोबाईलचे वाटप करण्यात आले. तसेच बीट मार्शल अंमलदार यांना मोबाईल हॅण्डसेट व सिमकार्ड देणारे देणगीदार माधवराव महाबळ फाऊंडेशनचे समीर महाबळ व क्वालिटी पॉवर इलेक्ट्रीकल इक्वीपमेंट प्रा. लि. चे कार्यकारी संचालक विवेक मोरोने यांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री डॉ. खाडे यांनी बीट मार्शल वाहनांना हिरवा झेंडा दाखवून या वाहनांचे लोकार्पण केले. तद्नंतर या दुचाकी वाहनांची पोलीस अधीक्षक कार्यालय ते पुष्कराज चौक, राजवाडा चौक व परत पोलीस अधीक्षक कार्यालय अशी रॅली काढण्यात आली. पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी आभार मानले. ०००००

शुक्रवार, १४ जुलै, २०२३

जिल्ह्यात आय. टी. पार्क उभारण्याचा मानस, आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

जिल्ह्यात आय. टी. पार्क उभारणीबाबत आयोजित प्राथमिक बैठकीत प्रतिपादन सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : जिल्ह्यात आय. टी. पार्क उभारण्याचा मानस असून, त्यासाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन व प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिली. जिल्ह्यात आय. टी. पार्क उभारणीबाबत आयोजित प्राथमिक बैठकीत ते बोलत होते. राज्यात माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवांच्या सर्वंकष व्यापक विस्तारासाठी माहिती तंत्रज्ञान उद्याने, सॉफ्टवेअर उत्पादने, डेटा सेंटर तसेच नाविण्यपूर्ण तंत्रज्ञान त्याचप्रमाणे एकात्मिक माहिती तंत्रज्ञान शहरे विकसीत करण्यावर भर देण्यात येत आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे नवीन माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण 2023 लागू करण्यात आले आहे. या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महापालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह आय.टी. क्षेत्रातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे नवीन माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण 2023 अंतर्गत जागतिक स्तरावरील माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा उपक्रमांकरिता धोरणात्मक निर्णय, स्पर्धात्मक विकास व व्यवसायपूरक वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांकरिताही पूरक वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. या क्षेत्राच्या वाढीकरिता उच्च रोजगारक्षम, प्रतिभावान व गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ विकसीत करण्यात येणार आहे. तसेच या धोरणांतर्गत मुद्रांक शुल्क माफी, ऊर्जा सुसूत्रीकरणाचे लाभ, विद्युत शुल्क, प्रमाणपत्र सहाय्य, बाजार विकास सहाय्य, पेटंट संबंधित सहाय्य आदि क्षेत्र विशिष्ट प्रोत्साहने (इन्सेंटीव्ह) दिली जाणार आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी सांगली शहर व जिल्ह्यात आय. टी. क्षेत्रातील व्यवसायांचे स्वागत असल्याचे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, आगामी 10 वर्षानंतरची गरज ओळखून आय. टी. क्षेत्रातील व्यवसायांना आवश्यक पायाभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून दिल्या जातील. हिंजेवाडीच्या आय. टी. हब प्रमाणे सांगली शहरातही आय. टी. पार्क उभारण्यासाठी 10 एकर शासकीय किंवा खाजगी जागा उपलब्धीसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. नामांकित दर्जेदार आय. टी. हब प्रमाणे यामध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येतील. जागेप्रमाणेच अखंडित वीजपुरवठा आणि इंटरनेट सुविधा, पाणी, कुशल मनुष्यबळ, कर्मचारी वाहतूक सुविधा, उपहारगृह, सुरक्षा अशा आवश्यक सर्व बाबींचा विचार करून आराखडा तयार केला जाईल. त्यामुळे आय. टी. क्षेत्रातील कंपन्यांनी सांगली जिल्ह्यात आपला उद्योग सुरू करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, जिल्ह्यात उद्योग पूरक वातावरण तयार करण्यात येत असून, शासनाच्या उद्योग स्नेही धोरणामुळे तसेच, जिल्ह्यात नव्याने आय. टी. पार्क निर्माण करण्यात येत असल्याने या क्षेत्रातील कंपन्यांना संधी मिळण्याबरोबरच जिल्ह्यातील तरुणांनाही रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास डॉ. खाडे यांनी यावेळी व्यक्त केला. राज्य शासनाने नव्याने माहिती तंत्रज्ञान व सहाय्यभूत सेवा धोरण जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात आय. टी. पार्क साठी या क्षेत्रातील उद्योजकांच्या अपेक्षापूर्तीसाठी प्रशासन आवश्यक सर्व मदत व सहकार्य करेल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बैठकीत सांगितले. यावेळी सांगली व अन्य जिल्ह्यातील दहाहून अधिक उद्योजकांनी त्यांचे मत मांडत आय. टी. पार्कसाठी व उद्योग उभारणीसाठी शासन व प्रशासनाकडून असणाऱ्या अपेक्षा व्यक्त केल्या. तसेच, त्यांच्या अडचणी मांडल्या. 00000

हरिपूर येथे कायदेविषयक शिबीर संपन्न

सांगली दि. 14 (जि.मा.का.) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्यावतीने बेटी बचाव बेटी पढाओ व बालकांचे हक्क, अधिकार व लैंगिक अपराधापासून संरक्षण तसेच मुलांसाठी अनुकूल कायदेशीर सेवा आणि त्यांचे संरक्षण विषयी कायदेविषयक शिबीर श्रीमती कोंडाबाई साळुंखे हायस्कूल हरिपूर येथे नुकतेच संपन्न झाले. कायदेविषयक शिबीरामध्ये बालकांचे हक्क व अधिकार या विषयावर मार्गदर्शन करताना ॲड. अमोल डोंबे म्हणाले, शिक्षणातून आपली जडणघडण होताना कायद्याचे ज्ञान अत्यावश्यक आहे. आपले हक्क माहित असावेत तसेच आपणास आपल्या कर्तव्याचीही जाणीव असायला पाहिजे. यावेळी त्यांनी शिक्षण, आरोग्य, पोषण व संरक्षण या संदर्भातील कायद्याविषयी मार्गदर्शन केले. बालकांचे कायदेशीर सेवा आणि संरक्षण या विषयावर मार्गदर्शन करताना ॲड. एस. एस. पखाली म्हणाले, अनेकदा काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक बालकांच्या अज्ञानाचा फायदा घेतात. यापासून आपण सावध असणे आवश्यक आहे. कायद्याच्या शिक्षणामुळे स्वतःच्या कुटुंबाचे आणि समाजाचे हीत जोपासले जाते. कायद्याच पालन करणे राष्ट्रहीतच आहे. प्रास्ताविक विजय कोगनोळे यांनी केले. स्वागत व सूत्रसंचालन विठ्ठल मोहिते यांनी केले. सुनिल खोत यांनी आभार मानले. या प्रसंगी नितीन आंबेकर, सुरज कदम व शाळेतील शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या. 00000

मॅग्नेट प्रकल्पांतर्गत नवीन प्रस्ताव 10 ऑगस्टपर्यंत सादर करावेत - विभागीय प्रकल्प उपसंचालक डॉ. सुभाष घुले

सांगली दि. 14 (जि.मा.का.) : राज्यातील फळे, भाजीपाला व फुलांच्या उत्पादनावर प्रक्रियेसह विपणन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी राज्यात मॅग्नेट प्रकल्प कार्यान्वीत केलेला आहे. मॅग्नेट प्रकल्पांतर्गत नवीन प्रस्ताव 10 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन मॅग्नेट प्रकल्प, पि. आय. यु., कोल्हापूरचे विभागीय प्रकल्प उपसंचालक डॉ. सुभाष घुले यांनी केले आहे. मूल्य साखळी विकसीत करणे व त्यामध्ये खाजगी गुंतवणूकदार आकर्षित करणे, काढणी पश्चात नुकसान कमी करणे, साठवणूक क्षमता वाढविणे, मागणीनुसार शेतमालाचे मुल्यवर्धन करणे, अन्नाची वितरण व्यवस्था कार्यक्षम करणे व शेतकरी उत्पादक संस्थांचा मुल्यसाखळीमध्ये सहभाग वाढविणे या प्रमुख उद्देशाने मॅग्नेट प्रकल्प कार्यान्वीत केलेला आहे. तीसऱ्या टप्यामध्ये मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत केळी, पेरू, डाळिंब, चिक्कू, सिताफळ, स्ट्रॉबेरी, संत्री, मोसंबी, भेंडी, मिरची (हिरवी/लाल), व फुलपिके पूर्वीच्या 11 पिकांसह नवीन चार पिकांचा (आंबा, काजू, लिंबू आणि पडवळ) यांचा समावेश करण्यात आलेला आहे. पात्र लाभार्थ्यांमध्ये शेतकरी उत्पादक संस्था (कंपनी कायदा व सहकारी संस्था कायदा याअंतर्गत नोंदणी झालेल्या शेतकरी संस्था, आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत प्रोत्साहित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे प्रोत्साहित लोकसंचलित साधन केंद्र तसेच शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स/असोशिएसन्स) आणि मुल्यसाखळी गुंतवणुकदार (शेतकरी उत्पादक कंपनी नसलेल्या मात्र कोणत्याही फलोत्पादन पिकांच्या उत्पादकाबरोबर तसेच उत्पादकांच्या सहकारी संस्था बरोबर सक्रियपणे कामकाज करीत असलेल्या संस्था जसे अँग्रीगेटर/ प्रक्रियादार/निर्यातदार/ मध्यम व मोठ्या रिटेल विक्री संस्था/कृषि तंत्र वा आर्थिक तंत्र संस्था) यांचा समावेश आहे. मॅग्नेट प्रकल्पातील पहिल्या दोन टप्यातील शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था व लोकसंचलीत साधन केंद्र यांचा मोठ्या प्रमाणात प्रतीसाद मिळालेला होता. मॅग्नेट प्रकल्पाचा कालावधी 6 वर्षाचा असून, तीसऱ्या टप्यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तीसऱ्या टप्यात नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ www.msamb.com या संकेतस्थळावर लिंक देण्यात आलेली आहे. तसेच अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारे पात्रता निकष, विहीत नमुन्यातील अर्ज, मुल्यांकन निकष व कागदपत्राची चेकलिस्ट, संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अर्जदारांनी विहीत नमुन्यातील अर्ज भरून चेकलिस्टप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडून मॅग्नेट प्रकल्पाच्या प्रकल्प अंमलबजावणी कक्ष (पी.आय.यु), तथा महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, श्री. छत्रपती शाहू मार्केट यार्ड, विभागीय कार्यालय- कोल्हापूर येथे छापील प्रतीत सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2023 रोजीचे सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील, असे डॉ. घुले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

विद्यार्थ्यांनी जात पडताळणी वेळीच करून घ्यावी - गणेश सव्वाखंडे

सांगली दि. 14 (जि.मा.का.) : विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी जात पडताळणीचे महत्व लक्षात घेऊन वेळीच आपल्या जातीच्या दाखल्याची पडताळणी करून घ्यावी व त्याचा शैक्षणिक फायदा करून घ्यावा. यासाठी 11 वी आणि 12 वी मध्ये असताना जात पडताळणीचे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन बार्टीचे प्रकल्प अधिकारी गणेश सव्वाखंडे यांनी केले. राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व निमित्त सोनवडे येथील हुतात्मा नानकसिंग विद्यालयांमध्ये जिल्हा जाती प्रमाणपत्र समिती सांगली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जाती प्रमाणपत्र मार्गदर्शन शिबिरामध्ये ते बोलत होते. जिल्हा जाती प्रमाणपत्र समितीच्या अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी नलिनी आवडे तसेच जात पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश घुले, संशोधन अधिकारी संभाजी पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन शिबिरामध्ये श्री. सव्वाखंडे यांनी जात पडताळणी वैधता आणि अर्ज करण्याची प्रक्रिया या विषयावरती विविध उदाहरणासहित सखोल मार्गदर्शन केले. तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती व जात पडताळणीसाठी आवश्यक असणारे पुरावे यासंदर्भात विविध दाखले देऊन विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन केले. समतादूत शहाजी पाटील यांनी जात वैधता प्रमाणपत्राचे फायदे व शैक्षणिक आवश्यकता या विषयावरती मार्गदर्शन केले व बार्टीच्या विविध योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमास मुख्याध्यापक एस. ए. गायकवाड, एस जी साठे, बी ए तडाखे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सदा पाटील यांनी केले. 00000

जिल्हास्तरीय रोजगार मेळावा 20 जुलैला

सांगली दि. 14 (जि.मा.का.) : खाजगी क्षेत्रात, लहान, मध्यम व मोठ्या कारखान्यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी व बेरोजगारीची समस्या दूर करण्याच्या दृष्ट्रीकोनातून तिसऱ्या प्लेसमेंट ड्राईव्हचे व जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन गुरुवार, दि. 20 जुलै 2023 रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगली येथे आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्याचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहाय्यक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये विविध शैक्षणिक पात्रतेची एकूण 131 पदे भरण्यात येणार असून यामध्ये सांगली व पुणे जिल्ह्यातील रोटाडाईन टुल्स प्रा लि.मिरज, वेस्टर्न प्रेसिकॉस्ट प्रा.लि. कुपवाड, जस्ट डायल लि. पुणे, टालेनस्टु सर्व्हिस प्रा.लि, पुणे, व श्रीराम जनरल इन्शुरंन्स कंपनी लि.सांगली इ. विविध नामवंत कंपन्यानी सहभाग नोंदविलेला आहे. यामध्ये रोटाडाईन प्रिसीजन इंजिनिअरींग प्रा.लि यांच्याकडील एकूण 22 पदे, वेस्टर्न प्रेसिकॉस्ट प्रा.लि. यांच्याकडील 44 पदे, जस्ट डायल यांच्याकडील 25 पदे, टालेनसेतू सर्व्हिस प्रा. लि. यांच्याकडील 20 पदे व श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्याकडील 20 पदे भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी hpps://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अर्ज करुन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी 20 जुलै रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2 या वेळेमध्ये उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी 0233-2990383 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. 00000

गुरुवार, १३ जुलै, २०२३

आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदानासाठी लाभार्थ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन

सांगली दि. 13 (जि.मा.का.) : आंतरजातीय विवाहितांना प्रोत्साहनपर अनुदान योजना या योजनेकरीता शासनाकडून अनुदान प्राप्त झाले असून लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याची कार्यवाही सुरु आहे. ज्या लाभार्थ्यांनी आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदानासाठी सन २०१९-२० ते सन २०२१-२२ या कालावधीत अर्ज केले आहेत, त्या संबंधित लाभार्थ्यांना वारंवार दुरध्वनीद्वारे संपर्क करुनही लाभार्थ्याचा प्रतिसाद मिळत नसल्याने कागदपत्राअभावी अनुदान वर्ग करणे अडचणीचे होत आहे. तरी लाभार्थ्यांनी तात्काळ जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सांगली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांनी केले आहे. आंतरजातीय विवाहितांना प्रोत्साहनपर अनुदान योजना या योजनेंतर्गत आंतरजातीय विवाह करणारे सवर्ण व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच मागास प्रवर्गातील जोडप्यांना 50 हजार रूपये इतके अनुदान देण्यात येते. या योजनेचा लाभ हा केंद्र 50 टक्के व राज्य 50 टक्के असा समप्रमाणात देय आहे. ही रक्कम पतीपत्नीच्या संयुक्त खात्यामध्ये जमा केली जाते. 00000

उद्योजकतेच्या क्षेत्रामध्ये व्याख्याता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन व्याख्यान देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्याचे आवाहन

सांगली दि. 13 (जि.मा.का.) : सांगली येथे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) द्वारा जिल्हा उद्योग केंद्र उद्योग भवन विश्रामबाग सांगली या ठिकाणी उद्योजकतेच्या क्षेत्रामध्ये विविध विषयांनुसार मार्गदर्शन करण्यासाठी व्याख्याता विकास प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 17 ते 31 जुलै 2023 या कालावधीमध्ये अनुभवी तज्ज्ञ व्याख्यात्याकडून उद्योजकतेच्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने मार्गदर्शन करावे या अनुषंगाने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. व्याख्यान देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी एमसीईडी दत्तात्रय क्षीरसागर यांनी केले आहे. प्रशिक्षणामध्ये कॉलेज महाविद्यालयातील प्राध्यापक, टेक्निकल महाविद्यालय मधील प्राध्यापक, उद्योग क्षेत्रात काम करत असलेल्या तज्ज्ञ व्यक्ती, यशस्वी उद्योजक, विविध संस्था प्रतिनिधी अशा व्यक्तींना 12 दिवस एमसीईडी मार्फत शास्त्रयुक्त पद्धतीने प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर व्याख्यात्यांना एमसीईडी अंतर्गत होत असलेल्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या विषयावर जसे की उद्योग संधी, उद्योगाची निवड, उद्योगाचे व्यवस्थापन, विक्री कौशल्य, प्रकल्प अहवाल, उद्योगासाठी लागणारे परवाने, शासकीय विविध कर्ज व अनुदान विषयक योजनांची माहिती, उद्योगासाठी लागणारी जागा, सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, उद्योगासाठी लागणाऱ्या मशनरी, उद्योगासाठी लागणाऱ्या भांडवलाचे व्यवस्थापन इत्यादी विषय कशा पद्धतीने हाताळावे किंवा त्या विषयावर बोलताना कशा पद्धतीने व कोणकोणते कंटेंट्स त्या विषयांमध्ये समाविष्ट असावे इत्यादी मार्गदर्शन तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून देण्यात येणार आहे. एमसीईडी मध्ये पोर्टल इम्पानमेंट रजिस्ट्रेशन करून मार्गदर्शन करण्यासाठी मानधन तत्वावर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये व्याख्यान देण्याची संधी देण्यात येणार आहे. तसेच त्यांना त्यांच्या महाविद्यालयातील गरजू उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे सोपे जाणार आहे. प्रशिक्षणानंतर व्याख्यात्यांना एमसीईडी मार्फत व्याख्याता प्रशिक्षक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम सी ई डी) द्वारा जिल्हा उद्योग केंद्र उद्योग भवन विश्रामबाग सांगली या ठिकाणी संपर्क साधावा(फोन नंबर 0233-2671169 मोबाईल नंबर 9423871685/ 7057994308) किंवा सविस्तर माहितीसाठी www.mcd.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. क्षीरसागर यांनी केले आहे. 00000

एक रुपया टोकन रक्कम भरून पीक विमा काढून नैसर्गिक आपत्ती व जोखमीपासून पीक सुरक्षित करून घ्या

सांगली दि. 13 (जि.मा.का.) : सर्व समावेशक प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 मध्ये एक रुपया भरून पीक विमा काढून घ्यावा. जिल्ह्यात अधिसूचित मंडळ निहाय भात, ज्वारी, मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, मूग, तूर, उडीद व कापूस इत्यादी पिकांचा शेतकरी विमा उतरवू शकतात, सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप हंगामाकरीता जोखमीच्या बाबींचा समावेश करून राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी एक रुपया टोकन रक्कम भरून पीक विमा काढून घ्यावा व स्वतःचे पीक नैसर्गिक आपत्ती व जोखमीपासून सुरक्षित करून घ्यावे, असे आवाहन कृषी अधीक्षक विवेक कुंभार यांनी केले आहे. विमा हप्ता भरण्याची सोय आपले सरकार ग्राहक सेवा केंद्र (CSC), खाते कार्यरत असणारी बँक शाखा, प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्था, पिक विमा पोर्टल (www.pmfby.gov.in) येथे असून विमा हप्ता भरण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2023 आहे. सर्वसमावेशक पिक विमा योजना खरीप हंगामाकरीता जोखमीच्या बाबी पुढीलप्रमाणे. प्रतिकूल हवामान घटकामुळे पेरणी/लावणी/उगवण न होणे - हंगामातील अपुरा पाऊस व प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अनुसूचित मुख्य पिकाची अपेक्षित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी लावणी होऊ न शकलेल्या क्षेत्रासाठी पेरणी लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त असल्यास विमा संरक्षण देय राहील. हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत झालेली नुकसान - हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत सर्वसाधारण काढणीच्या पंधरा दिवस आधीपर्यंत पूर पावसातील खंड दुष्काळ इत्यादी बाबीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये मागील लगतच्या सात वर्षाच्या सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय राहील. पीक पेरणी पासून काढणे पर्यंतचा कालावधीत पिकाच्या उत्पादनात येणारी घट - दुष्काळ, पावसातील खंड, क्षेत्र जलमय होणे, कीड व रोगाचा व्यापक प्रादुर्भाव भुस्खलन, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपीट आणि चक्रीवादळ यासारख्या टाळताना येणाऱ्या जोखमी मुळे पिकाच्या उत्पादनात येणाऱ्या घटनेपासून व्यापक विमा संरक्षण दिले जाते. स्थानिक नैसर्गिक आपत्ती - गारपीट, भुस्खलन, विमा क्षेत्र जलमय झाल्यास,ढगफुटी अथवा विज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसूचित पिकाचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामा करून निश्चित करण्यात येईल यामध्ये शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत विमा कंपनीस कळवणे बंधनकारक आहे. काढणीपश्चात नुकसान भरपाई - ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंड्या बांधून काढणीनंतर सुखवण्यासाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे काढणीनंतर दोन आठवड्याचा आत (१४दिवस) गारपीट चक्रीवादळ,चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगर मोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामा करून निकषांचे अधीन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाईल, असे श्री. कुंभार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक : 86 गावांचे अंतिम आरक्षण

सांगली दि. 13 (जि.मा.का.) : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सांगली जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारूप, “नमूना ब” दिनांक २६ जून २०२३ रोजी सर्व ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, गट विकास अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय स्तरावर तसेच NIC Website वर तसेच स्थानिक दैनिक वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. दिनांक २७ जून २०२३ ते दि. ३ जुलै २०२३ या कालावधीमध्ये प्राप्त होणाऱ्या हरकती उपविभागीय स्तरावर अभिप्राय घेवून दिनांक १२ जुलै २०२३ रोजी अंतिम करून परिशिष्ट १६ मधील अधिसूचना, “नमुना-अ” दिनांक १४ जुलै २०२३ रोजी अंतिमरीत्या प्रसिद्ध करण्यात येत असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी दिली. कवठेमहांकाळ तालुक्यातील मौजे घोरपडी व खानापूर तालुक्यातील मौजे भेंडवडे येथील प्रत्येकी एक हरकत प्राप्त झाली होती. त्यापैकी मौजे घोरपडी येथील हरकत मान्य करण्यात आली असून, मौजे भेंडवडे येथील हरकत अमान्य करण्यात आली आहे. उर्वरित ८४ ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण संदर्भात कोणत्याही हरकती हरकत कालावधीमध्ये प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे आयोगाने निश्चित करून दिलेल्या कार्यक्रमानुसार दिनांक १२ जुलै २०२३ रोजी जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर मान्यता देवून, त्यानुसार तालुकानिहाय एकूण ८६ गावांचे अंतिम आरक्षण परिशिष्ट १६ “नमूना अ” दिनांक १४ जुलै २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे. अंतिम आरक्षण परिशिष्ट १६ “नमूना अ” प्रसिद्ध करण्यात येणारी तालुकानिहाय गावे पुढीलप्रमाणे. मिरज तालुका - का.खोतवाडी, निलजी बामणी, वाजेगाव. तासगाव तालुका - चिखलगोठण, बिरणवाडी. जत तालुका - गुलगुंजनाळ, को. बोबलाद, कोणबर्गी, बिळूर, खिलारवाडी. कवठेमहांकाळ तालुका - बसाप्पाचीवाडी, दुधेभावी, गर्जेवाडी, करलहट्टी, पिंपळवाडी, रामपूरवाडी, देशिंग, धुळगाव, घोरपडी, करोली टी, कोकळे, शिंदेवाडी (जी), ढोलेवाडी, ढालगाव, कदमवाडी, कुंडलापूर, मोरगाव, जाधववाडी, झुरेवाडी. खानापूर विटा तालुका - देवनगर, भेंडवडे, साळशिंगे. आटपाडी तालुका - नेलकरंजी, वाक्षेवाडी, काळेवाडी, मानेवाडी, मासाळवाडी, मिटकी, पिंपरी खुर्द, आंबेवाडी, बनपुरी, करगणी, मुढेवाडी, निंबवडे, पूजारवाडी आ, विभूतवाडी, औटेवाडी, कानकात्रेवाडी. पलूस तालुका - राडेवाडी, आमणापूर, विठ्ठलवाडी. वाळवा तालुका - तांबवे, शिरटे, साटपेवाडी, कारंदवाडी. कडेगाव तालुका - वाजेगाव, चिंचणी वांगी. शिराळा तालुका - बांबवडे, वाकुर्डे बु., भाटशिरगाव, धसवाडी, करुगली, खुजगांव, मादळगाव, रांजणवाडी, रिळे, शिरशी, आंबेवाडी, बेलेवाडी, फकीरवाडी, खराळे, कुसाईवाडी, सावंतवाडी, शिरसटवाडी, चिखलवाडी, अस्वलेवाडी, चिंचेवाडी, इंगरूळ, कुसळेवाडी, मराठेवाडी, मेणी, मोरेवाडी, पं.त. वारूण, पाचगणी, मानेवाडी, कदमवाडी. 00000

रस्ता सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे निर्देश

सांगली, दि. १३ जुलै (जि.मा.का.):- रस्ते सुरक्षेसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस व आरटीओ विभाग आणि महानगरपालिकेने समन्वयाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जिल्हास्तरीय रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत दिले. जिल्हास्तरीय रस्ते सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस महानगरपालिका उपायुक्त राहुल रोकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कांतिकुमार मिरजकर, पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एस. कुलकर्णी यांच्यासह पोलीस, आरटीओ विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, इतर जिल्हा मार्ग आणि महापालिका क्षेत्रातील रस्त्यावर ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणी आपत्कालीन उपाययोजना करण्यास संबधित यंत्रणेने प्राधान्य द्यावे. नजीकच्या काळात सण, उत्सव सुरू होत आहेत यासाठी रस्त्यावरील खड्डे भरून घ्यावेत. खड्डे भरताना आवश्यकती खबरदारी घेण्यात यावी. वाहतुकीस अडथळा करणारी अतिक्रमणे काढण्यासाठी पोलीस विभागाची मदत घेण्यात यावी अशा सूचना करून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, विना हेल्मेट वाहन चालवणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जादा मालवाहतूक, वाहन चालवताना सीटबेल्ट न वापरणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, ओव्हरस्पीड, विमा नसलेली वाहने चालवणे, काळी-पिवळी टॅक्सी, विना परवाना प्रवासी वाहतूक, ट्रिपल सीट व मॉडीफाय करून वाहने वापरणे याबाबत पोलीस व आरटीओ विभागाने कसून तपासणी करावी. या तपासणीत दोषी आढळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. ००००

जल जीवन मिशन मधील ३७ गावातील योजनांच्या कामांना मान्यता जलजीवन मिशनमधील कामे 15 डिसेंबरपूर्वी पूर्ण करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. १३ जुलै (जि.मा.का.): जल जीवन मिशन अंतर्गत सन २०२३-२०२४ आराखड्यामधील जिल्ह्यातील 37 गावांमधील योजनांच्या कामांना जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. जल जीवन मिशन योजनेतील कामे १५ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. जलजीवन मिशन अंतर्गत सन २०२३-२०२४ आराखड्यातील योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता संजय येवले आदि उपस्थित होते. जलजीवन मिशन अंतर्गत मान्यता देण्यात आलेल्या कामांमध्ये नळ पाणी पुरवठा योजनांच्या १७ आणि सौरऊर्जेवर आधारित लघु नळ योजनेच्या २० कामांचा समावेश आहे. तसेच भोसे येथील घरगुती नळ जोडणीच्या कामालाही बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, जलजीवन मिशन मधील कामे गतीने करण्याबरोबरच कामाची गुणवत्ता आणि दर्जा चांगला असावा. डिसेंबर 2023 अखेर सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. ०००००

आजी व माजी सैनिकांच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 13 जुलै (जि.मा.का.) : आजी व माजी सैनिकांच्या प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या. जिल्हा सैनिक मंडळाची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात काल झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल भिमसेन चवदार (निवृत्त), तहसिलदार अनंत गुरव यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, आजी व माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकास्तरावर महिन्यातून किमान दोन बैठका घ्याव्यात. जमीन मागणीबाबतचे अर्ज तातडीने निकाली काढावेत. सैनिकी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी खुली व्यायामशाळाबाबतचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 00000

तंबाखूमुक्त शाळेसाठी व्यापक जनजागृती करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. १३ जुलै (जि.मा.का.):- जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त व्हाव्यात यासाठी आरोग्य व शिक्षण विभागाने व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिल्या. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समिती समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस डॉ. मिलिंद पोरे, डॉ. विनायक पाटील, डॉ. वैभव पाटील आदि उपस्थित होते. डॉ. राजा दयानिधी म्हणाले, तंबाखूच्या दुष्परिणामबाबत शालेयस्तरावर व्यापक जनजागृती झाल्यास त्याचा तंबाखू मुक्तीसाठी मोठा लाभ होईल. शिक्षण विभागाने शालेय स्तरावर बैठका घ्याव्यात. शालेय परिसरात व सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. यासाठी आरोग्य विभाग व पोलीस विभागाने संयुक्तपणे मोहीम राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बैठकीत दिल्या. ०००००

महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने संदर्भात प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या सूचना

सांगली, दि. 13 जुलै (जि.मा.का.) : महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेतून उपचार घेतलेल्या ज्या रुग्णांनी हॉस्पिटलच्या देयकाबाबत व अन्य विषयाबाबत तक्रारी केल्या आहेत, अशा प्रलंबित तक्रारी प्राधान्याने निकाली काढाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या. महात्मा फुले जन आरोग्य योजने संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभीषण सारंगकर, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सुभाष नांगरे, डॉ. अभिराज माने व लक्ष्मण कुंडले यांच्यासह हॉस्पिटलचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, महात्मा फुले जन आरोग्य योजने संदर्भात ज्या तक्रारी प्राप्त होतात त्या निराकरण करण्यासाठी संबंधित यंत्रणेने या तक्रारींची प्रत्यक्ष चौकशी करून ही प्रकरणे निकाली काढावीत. याकामी आरोग्य मित्रांची मदत घ्यावी. तसेच आयुष्मान भारत ई-कार्ड योजनेचे 100 टक्के काम पूर्ण करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत दिल्या. ०००००

शुक्रवार, ७ जुलै, २०२३

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रत्येक विभागाने सजगतेने, सतर्कतेने काम करावे - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर

जिल्हास्तरीय आढावा बैठकीत सूचना सांगली, दि.७ (जि.मा.का.) :- महिलांवरील अत्याचार, बालविवाह, स्त्रीभृणहत्या रोखण्यासाठी प्रत्येक विभागाने सजगतेने व सतर्कतेने योगदान द्यावे, अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महापालिका आयुक्त सुनील पवार, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा पवार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. श्रीमती चाकणकर म्हणाल्या, स्त्री भृण हत्या रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी समितीची महत्त्वाची भूमिका आहे. या समितीने प्रभावीपणे काम करत जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटर्सची वेळोवेळी अचानक तपासणी करावी. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा. तसेच, गरोदर महिलांची नोंदणी ते प्रसुती याचा पाठपुरावा करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने सहकार्य करावे. आशा, अंगणवाडी सेविका-मदतनीस यांच्या मदतीने माहिती घ्यावी, जेणेकरून मधल्या टप्प्यात अवैध गर्भपात झाल्यास त्यावर कारवाई करता येईल. श्रीमती चाकणकर म्हणाल्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी कौशल्य विकास व महिला आर्थिक विकास महामंडळाने पुढाकार घेऊन या महिलांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण द्यावे. मनोधैर्य योजनेतील प्रलंबित प्रकरणे प्राधान्याने निकाली काढा. त्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. या प्रकरणातील अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविका-मदतनीस यांची मदत घ्यावी, असे त्या म्हणाल्या. श्रीमती चाकणकर म्हणाल्या, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण व्हावे यामधे भरोसा सेलची भूमिका महत्वाची आहे. समुदेशनासाठी वारंवार अनुपस्थित राहणाऱ्यांना पोलीस विभागाने नोटीस बजावावी. सहाय्यक कामगार आयुक्त यांनी जिल्ह्यातील अंतर्गत तक्रार निवारण समिती (ICC) बाबत तपासणी करावी. ज्या ठिकाणी अशी समिती गठीत केली नसेल त्यांच्यावर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करावी. बालविवाह ही सर्वात मोठी समस्या असल्याचे सांगून श्रीमती चाकणकर म्हणाल्या, बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. बालविवाह रोखण्यासाठी स्थानिक कर्मचाऱ्यास गावांचे पालकत्त्व द्यावे. त्यांनी बालविवाह होत असल्याची माहिती मिळताच, तो रोखण्यासाठी आवश्यक बाबी कराव्यात. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आगारांमध्ये महिलांसाठी स्वच्छ स्वच्छतागृहे असावीत. त्यातील दर आकारणी नियमाप्रमाणे होत असल्याची संबंधितांनी खातरजमा करावी. सर्व स्थानकांमध्ये महिलांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करावेत. जिल्ह्यातील शाळांच्या ठिकाणीही मुलींसाठी स्वतंत्र शौचालये व त्यामध्ये पुरेसे पाणी ठेवावे, अशा सूचना यावेळी श्रीमती चाकणकर यांनी दिल्या. यावेळी बेपत्ता महिलांच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी, असे त्यांनी सूचित केले. तसेच कामगार विभागाने दवाखाने, शाळा-महाविद्यालये, खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली असल्याबाबत प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा घ्यावा. महिलांसाठी शासकीय वसतिगृहे कार्यान्वित करण्यासाठी कार्यवाही करावी. पोलीस विभागाने बेपत्ता महिलांच्या केसेसमध्ये संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. महिलांवरील अत्याचारासंदर्भातील कायदेशीर कारवाई गतीने होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. यावेळी महिला व बालविकास, कामगार, पोलीस, आरोग्य, शिक्षण, परिवहन आदिंसह संबंधित विभागांच्या प्रमुखांनी माहिती सादर केली. 00000

पीक विमा योजनेत नोंदणीसाठी सामुहिक सेवा केंद्राने अतिरीक्त रक्कमेची मागणी केल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

सांगली दि. 7 (जि.मा.का) : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामाकरिता 3 वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारकाकडून केवळ एक रुपया भरुन पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करावी. पीक विमा योजनेचे अर्ज भरताना सामुहिक सेवा केंद्राने अतिरीक्त रक्कमेची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी संबंधित पीक विमा योजनेचे कार्यालय, तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. सन 2023-24 पासून “सर्वसमावेशक पीक विमा योजना” राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून PMFBY पोर्टल https://pmfby.gov.in वर स्वत: शेतकरी यांना तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सामुहिक सेवा केंद्र यांच्या मार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल. पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामुहिक सेवा केंद्र धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम 40 रूपये देण्यात येते. परंतु राज्यातील काही सामुहिक सेवा केंद्र धारकाकडून शेतकऱ्यांकडून अतिरीक्त पैसे घेण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्या अनुषंगाने सर्व शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत नोंदणीसाठी सामुहिक सेवा केंद्राने अतिरीक्त रक्कमेची मागणी केल्यास संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. 00000

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन्सच्या तपासणी प्रक्रियेसाठी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली दि. 7 (जि.मा.का) : आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने प्राप्त ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन्सची प्रथमस्तरीय तपासणी दिनांक 4 जुलै 2023 पासून ते दिनांक 10 ऑगस्ट पर्यंत सांगली जिल्हा ईव्हीएम-व्हीव्हीपॅट गोदाम, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, गोदाम क्र. 8 मालगाव, मिरज- पंढरपूर रोड या ठिकाणी सुरु झाली आहे. सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी सदर FLC च्या प्रक्रियेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. या कामकाजाकरीता BEL कंपनीच्या 8 अभियत्यांची टिम नियुक्ती केली आहे. या टीमला सहकार्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन्सची परिचालन प्रकीया व त्यांची जोडणी प्रक्रीया पाहण्यासाठी व सर्व शंकांचे निरसन होण्याकरीता जिल्हास्तरीय राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व राज्यस्तरीय राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना उपस्थित राहणेबाबत कळविणेत आले असल्याचे उप जिल्हा निवडणूक अधिकारी बी. आर. माळी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

1 जानेवारी 2024 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या नागरीकांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर सांगली दि. 7 (जि.मा.का.) : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या सर्व नागरीकांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे. पुनरिक्षण पूर्व उपक्रम - मतदार यादी संदर्भातील सर्व कायदे आणि मार्गदर्शक सुचना तसेच, नविनतम IT Application आणि प्रणालीबाबत मतदार नोंदणी अधिकारी / सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी / मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्रशिक्षण - दि. 20 जुलै 2023 पर्यंत. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी - 21 जुलै 2023 ते 21 ऑगस्ट 2023. मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण, मतदार यादी / मतदार ओळखपत्रातील त्रुटी दुर करणे इ.,आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, अस्पष्ट / अंधुक छायाचित्र बदलून त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे, विभाग / भाग यांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांचे पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे; आणि तुलनात्मक फरक शोधुन फरक दुर करण्यासाठी कालबध्द योजना आखणे, कंट्रोल टेबल अद्यावत करणे - दि. २२ ऑगस्ट २०२३ ते दि. २९ सप्टेंबर २०२३. नमुना १-८ तयार करणे, ०१ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत पुरवणी व एकत्रीत प्रारूप यादी तयार करणे - दि. ३० सप्टेंबर २०२३ ते दि. १६ ऑक्टोबर २०२३. पुनरिक्षण उपक्रम - एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करणे - दि. १७ ऑक्टोबर २०२३ (मंगळवार), दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी - दि. १७ ऑक्टोबर २०२३ (मंगळवार) ते दि. ३० नोव्हेंबर २०२३ (गुरुवार). विशेष मोहिमांचा कालावधी - दावे हरकती स्विकारण्याच्या व कालावधीत, मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार. दावे व हरकती निकालात काढणे - दि. २६ डिसेंबर २०२३ (मंगळवार) पर्यंत. अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई -दि. ०१ जानेवारी २०२४ (सोमवार) पर्यंत. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे -दि. ०५ जानेवारी २०२४ (शुक्रवार). या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे नमुना-6, नमुना-7, नमुना-8, व आधार जोडणीसाठी नमुना-6ब चे अर्ज उपलब्ध होतील. 1 जानेवारी 2024 रोजी वयाची 18 वर्ष पुर्ण होणारे सर्व नागरीक मतदार यादीत नवीन नाव नोंदणीसाठी नमुना 6 मध्ये अर्ज करु शकतील. मतदान ओळखपत्रास आधार जोडणी करण्यासाठी नमुना 6ब मध्ये अर्ज करून शकतील. दि. 17 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीमधील नावांबाबत आक्षेप नोंदविण्यास अथवा नाव कमी करण्यासाठी नमुना 7 मध्ये अर्ज करता येईल. मतदार यादीमधील मतदारांच्या तपशीलात दुरुस्ती करण्यासाठी, एकाच मतदारसंघात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झाल्यास, मतदान ओळखपत्र बदलून मिळण्यासाठी तसेच दिव्यांग व्यक्तींना चिन्हांकित करणे इत्यादी करीता नमुना ८ मध्ये अर्ज करता येईल. सांगली जिल्ह्यात सर्व तहसिल कार्यालये व 282-सांगली विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हा पुरवठा कार्यालय येथे अशी एकूण 11 मतदार मदत केंद्रे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मतदार मदत केंद्र स्थापन केले आहे. तसेच मतदार ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करु शकतात. प्रत्येक राजकीय पक्षांनी मतदान केंद्रनिहाय मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता (Booth Level Agent) यांची नियुक्ती करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. 00000

महिलांनो... अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरेतून बाहेर पडा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे आवाहन

'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमात 87 प्रकरणावर सुनावणी सांगली दि. 7 (जि. मा. का.) : बाल विवाह, हुंडाबळी, गर्भलिगनिदान चाचणी यासह समाजातील अनेक अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरेचा महिलांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. यासाठी महिलांनी अशा अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरेतून बाहेर पडले पाहिजे. याची सुरवात प्रत्येक महिलेने स्वतःपासून करावी, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज येथे केले. 'महिला आयोग आपल्या दारी' उपक्रमांच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या जनसुनावणीप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, महापालिका आयुक्त सुनील पवार, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार व विधी प्राधिकरणाचे अधिकारी आदि उपस्थित होते. श्रीमती चाकणकर म्हणाल्या, समाजात महिलांचे प्रश्न, समस्या अनेक आहेत. याची सोडवणूक करण्यासाठी शासन अनेक कायदे, नियम बनवते. या कायदे व नियमांची महिलांनी माहिती करून घ्यावी. नियम माहीत असल्यास त्रास देणाऱ्याला आपण जाब विचारू शकतो व आपले संरक्षण करू शकतो, असे त्यांनी सांगितले. श्रीमती चाकणकर म्हणाल्या, ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या तक्रारी राज्य महिला आयोगाच्या मुख्य कार्यालयात प्रत्यक्ष मांडता येत नाहीत, यासाठी राज्य महिला आयोगामार्फत महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जावून महिलांच्या तक्रारी, समस्यांचे निराकरण करून त्यांना न्याय मिळवून दिला जात आहे. जन सुनावणीमध्ये दाखल झालेल्या तक्रारींचे निराकरण करून त्या महिलांना न्याय देण्याची भूमिका आयोगाची आहे. जन सुनावणीतून महिलांचे प्रश्न, समस्या मार्गी लागतील, असा विश्वास श्रीमती चाकणकर यांनी यावेळी व्यक्त केला. महिलांचे प्रश्न सोडवण्यास प्रशासनाने नेहमीच प्राधान्य दिले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी सांगितले. कोरोना काळात एक पालक गमावलेल्या व दोन्ही पालक जिल्ह्यातील बालकांना मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनीही त्यांच्या काही तक्रारी असल्यास प्रशासनाकडे मांडाव्यात. आवश्यक त्या ठिकाणी अशा महिलांची नावे गोपनीय ठेऊन त्यांना न्याय मिळवून दिला जाईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी प्रास्ताविक करून महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने जनसुनावणी उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. जनसुनावणीत ८७ प्रकरणावर सुनावणी या जनसुनावणीत जिल्ह्यातील महिलांकडून प्राप्त झालेल्या 87 प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. या मध्ये वैवाहिक/कौटुंबिकची 45 प्रकरणे, सामाजिक 11 प्रकरणे, मालमत्ता संदर्भात 9 प्रकरणे, कामाच्या ठिकाणी छळ 3 आणि इतर 19 प्रकरणांचा समावेश आहे. या प्रकरणांची 3 पॅनलद्वारे सुनावणी घेण्यात आली. 00000

बुधवार, ५ जुलै, २०२३

पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

सांगली दि. 5 (जि.मा.का.) : धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी “पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना” सुरु करण्यात आली आहे. पालकाचे उत्पन्न 2 लाख 50 हजार रूपये पेक्षा कमी असणाऱ्या व योजनेच्या अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. राज्यातील सर्व महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय तसेच अनुदानित महाविद्यालयामध्ये केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्ववारे प्रवेश घेतलेल्या पंरतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी “पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना” सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना 43 हजार रूपये इतकी रक्कम लाभ म्हणून वितरीत केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण यांचे कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगाव रोड, सांगली दूरध्वनी क्रमांक 0233-2374739 येथे संपर्क साधावा. 00000

धनगर समाजातील महिलांकरिता मार्जिन मनी योजना

सांगली दि. 5 (जि.मा.का.) : केंद्र शासनाच्या स्टॅड अप इंडिया योजनेत धनगर समाजातील महिलांकरिता मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेकरिता इच्छुक धनगर समाजातील नवउद्योजक महिला लाभार्थ्यांनी शासन निर्णयातील सर्व अटी व शर्तीची पुर्तता करुन मार्जिन मनी योजनेचा लाभासाठी प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगाव रोड,सांगली, दूरध्वनी क्रमांक 0233-2374739 वर संपर्क साधावा. 00000

मंगळवार, ४ जुलै, २०२३

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

भूजल व्यवस्थापनात मैलाचा टप्पा अटल भूजल योजना

जिल्ह्यात एक रूपया विमा योजनेने वाचणार 10 कोटी

खरीप पिकासाठी लाभ मिळणार फक्त एक रुपयात पीकविमा कवच

सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयात पिकांचा विमा उतरविता येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सर्वसमावेशक पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी चालू वर्षीच्या खरीप हंगामापासून करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खरीप विमा उतरविण्यासाठी 31 जुलै 2023 पर्यंत अर्ज करावे लागणार आहेत. केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत यंदाचा खरीप हंगाम 2023 ते आणि आगामी रब्बी हंगाम 2025-26 या कालावधीतील खरीप व रबी हंगामातील पिकासाठी ही 'सर्वसमावेशक पीक विमा योजना (कप अँड कॅप मॉडेल ८०:११०) राबविण्यास मंजुरी दिली आहे. या विमा योजनेमुळे नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी विम्याचे संरक्षण मिळणार आहे. सध्या ही योजना केवळ अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकासाठी लागू करण्यात आली आहे. ती ऐच्छिक आहे. शेतकऱ्याव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत सर्व पिकासाठी ७० टक्के जोखिमस्तर निश्चित करण्यात आला आहे. योजनेचे उद्देश पिकांच्या नुकसानीच्या काळात शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे, उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा गतिमान विकास करणे, स्पर्धात्मकतेत वाढीचा हेतू साध्य होण्यास मदत होणार आहे. नुकसान भरपाई हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, हंगामात हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीतील नैसर्गिक आग, बीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पुरामुळे पीकक्षेत्र जलमय होणे (भात, ऊस व ताग पीक वगळून) भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबींमुळे उत्पन्नात होणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे काढणी पश्चात होणारे नुकसान. 'सर्वसमावेशक पीक विमा योजना' मध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळणार आहे. समाविष्ट पिकनिहाय तालुके भात (जि) - वाळवा, तासगाव, पलूस, कडेगाव, शिराळा. ख. ज्वारी - मिरज, खानापूर, वाळवा, तासगाव, पलूस, कडेगाव, शिराळा, आटपाडी, कवठेमहांकाळ. बाजरी - मिरज, जत, खानापूर, तासगाव, पलूस, कडेगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ. तुर - जत. मका - मिरज, वाळवा, जत, खानापूर, तासगाव, पलूस, कडेगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ. उडीद - मिरज, जत, खानापूर, तासगाव, कडेगाव, कवठेमहांकाळ. मुग - मिरज, जत, खानापूर, तासगाव, कडेगाव, कवठेमहांकाळ. भुईमुग - मिरज, जत, खानापूर, वाळवा, तासगाव, पलूस, कडेगाव, शिराळा, कवठेमहांकाळ. सोयाबीन - मिरज, खानापूर, वाळवा, तासगाव, पलूस, कडेगाव, शिराळा, कवठेमहांकाळ. कापुस - आटपाडी. पीकनिहाय तालुक्यातील अधिसूचित मंडळामध्ये पिकविमा लागू आहे. वातावरणात होत असलेला बदल व पावसाची अनिश्चितता यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील भात, खरीप ज्वारी, बाजरी, तूर, मका, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांसाठी जिल्ह्यात योजना लागू आहे. सर्व शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकाचा पीक विमा घ्यावा, योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज बँकेकडे व विमा कंपनीकडे उपलब्ध असून शेतकऱ्यांचे ज्या बँकेत खाते आहे तेथे अथवा विमा कंपनीच्या कार्यालयात सार्वजनिक सुविधा केंद्र, विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारे हप्ता भरावा. अधिक माहितीसाठी कृषी सहायक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. केवळ एक रुपया पीकविमा हप्ता भरून शेतकऱ्यांनी सर्वसमावेशक पीक विमा योजना मध्ये सहभागी व्हावे व पिकविमा कवच मिळवावे. सांगली जिल्ह्याकरिता भारतीय कृषी विमा कंपनीची नियुक्ती झालेली असून टोल फ्री क्र. 1800 4195004 असून e-mail: pikvima@aicofindia.com असा आहे. संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, सांगली

चित्ररथाव्दारे पीक विमा योजनेची प्रचार प्रसिद्धी प्रचार प्रसिद्धी रथाला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवला हिरवा झेंडा

सांगली दि. 4 (जि.मा.का.) : सांगली जिल्हा खरीप हंगाम २०२३ प्रधानमंत्री पीक विमा योजना ही भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. पीक विमा योजनेची प्रचार प्रसिध्दी चित्ररथाव्दारे करण्यात येत आहे. प्रचार प्रसिध्दी चित्ररथाला जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पीक विमा प्रचार प्रसिद्धी सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांना एक रुपयात विमा भरता येणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी केले. विमा भरण्यासाठी ३१ जुलै ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी संदीप पाटील व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 00000

शेतकऱ्यांनी तृणधान्य पिकांचे क्षेत्र वाढवावे - वरिष्ठ भूवैज्ञानिक जयंत मिसाळ

सांगली दि. 4 (जि.मा.का.) : आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, राजगिरा इत्यादी पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश केल्याने आपले आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. पौष्टिक तृणधान्य पिकांचे उत्पादन प्रामुख्याने कोरडवाहु भागात होते. कोरडवाहु भागातील शेतकऱ्यांची पौष्टिक तृणधान्याची पीक पध्दती टिकून रहावी, यासाठी अटल भूजल योजनेतून प्रचार प्रसिध्दी करण्यात येत असून शेतकऱ्यांनी तृणधान्य पिकांचे क्षेत्र वाढवावे, असे आवाहन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक जयंत मिसाळ यांनी केले. सन 2023 हे वर्ष पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. तृणधान्य पिकांचे क्षेत्र वाढावे व अटल भूजल योजनेतील गावांमध्ये शेतकऱ्यांनी कमी पाण्यावरील पिकांची लागवड करावी म्हणून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून अटल भूजल योजनेतील समाविष्ठ कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव, बनेवाडी, मोघमवाडी, थबडेवाडी तसेच जत तालुक्यातील बसर्गी, गुगवाड, वज्रवाड, जिरग्याळ या गावामध्ये मोफत बियाण्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक जयंत मिसाळ, कवठेमहांकाळचे तालुका कृषि अधिकारी एस.जी. तोडकर, कृषि तज्ज्ञ नागनाथ पाटील, बोरगावचे नामदेव पाटील, बोरगावचे ग्रामसेवक श्री. बनसोडे, वनराई संस्थेच्या समन्वयक अंजली वाघे, कृषि तज्ज्ञ व लाभार्थी उपस्थित होते. तृणधान्य पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढविणे, आहारामध्ये वापर वाढविणे, त्यासाठी प्रचार व प्रसार करणे हा मुख्य उद्देश आहे. केंद्र पुरस्कृत व जागतिक बँक अर्थसहाय्यित अटल भूजल योजना सांगली जिल्ह्यामधील ९५ गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या गावांमध्ये जलसुरक्षा आराखड्यामध्ये सूचविल्याप्रमाणे पुरवठा आधारित व मागणी आधारित कामे सुरु करण्यात आलेली आहेत. भूजलातील पाण्याची होत असलेली घसरण थांबविणे व कार्यक्षम पाण्याचा वापर करणे हा योजनेचा प्रमुख उद्देश आहे. याकरिता सूक्ष्म सिंचनाचा वापर करणे, कमी पाण्यावरील पिकांची लागवड करणे, प्लॉस्टिक मल्चिंगचा वापर करणे, मुरघास बाबींवर मार्गदर्शन करण्यात येत असून सूक्ष्म सिंचनासाठी वाढीव २५ ते ३० टक्के अनुदान योजनेमधून देण्यात येत आहे. 00000