सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

मिरज शासकीय कोविड रूग्णालयामध्ये अतिरिक्त 6 के एल क्षमतेचा ऑक्सिजन टँक - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

क्षमता वृध्दीचा रूग्णांना होणार लाभ सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : वाढत्या कोविड-19 रूग्णांच्या संख्येमुळे मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये जिल्हा प्रशासनाने व्हेंटिलेटर व विशेषतः एच. एफ. एन. ओ. या विशेष उपचार पद्धतीची सुविधा उपलब्ध करून दिली. मिरज येथील रुग्णालयामध्ये 54 व्हेंटीलेटर व 16 एच. एफ. एन. ओ. उपकरणे गंभीर व अतिगंभीर रुग्णांच्या उपचाराकरिता उपलब्ध आहेत. तथापि, या उपकरणांना लागत असणाऱ्या ऑक्सिजनचा वाढीव पुरवठा करण्याकरिता ऑक्सिजनचा अतिरिक्त क्षमतेचा टँक उपलब्ध करणे अत्यंत गरजेचे होते. आत्तापर्यंत 6 के एल या क्षमतेचा ऑक्सीजन टॅंक होता. वाढती रुग्ण संख्या पाहता ऑक्सिजनची गरज प्रचंड प्रमाणात वाढल्याने जिल्हा प्रशासनाने त्याची क्षमता दुप्पट म्हणजेच 12 के एल करण्याचा निर्णय तात्काळ घेतला व अंमलबजावणी सुद्धा केली. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सद्यस्थितीत मिरज येथील शासकीय कोविड रुग्णालयांमध्ये 315 ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. यामुळे गंभीर व अतिगंभीर रुग्णांची तात्काळ व अधिक चांगल्या पद्धतीने सुरक्षित उपचार होत आहेत. मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये गरीब तसेच गंभीर व अतिगंभीर रुग्णांचे उपचार अधिक प्रमाणात होत असल्याने शासनामार्फत आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा तात्काळ होणे अत्यंत गरजेचे होते. ऑक्सिजन टँकची क्षमता वाढविल्यामुळे सर्व रुग्णांना ही एक दिलासा मिळणारी बाब आहे. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी अधिक लक्ष घालून तत्पर कार्यवाही केल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. कोविड-19 ची वैश्विक साथ सुरू झाल्यानंतर मिरज कोविड रुग्णालयामध्ये आजतागायत 1796 रुग्णांना उपचार करण्यात आलेले आहेत. त्यामधील 1333 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. रुग्णांची बरे होण्याची टक्केवारी 73.55 आहे. सदर रुग्णालयातील रिकव्हरी रेट हा राष्ट्रीय निर्देशांकापेक्षा चांगला आहे. तसेच जिल्ह्याचा मृत्युदर 3.5 टक्के असून तो राष्ट्रीय निर्देशांकच्या बरोबर आहे. आजतागायत मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वायरल रीसर्च डिसीज लॅबोरेटरी ( VRDL )मध्ये 49066 इतक्या स्वॅबच्या तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. त्यातील 70.78 टक्के इतके रुग्णांना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले आहेत व पॉझिटिव्हिटी रिपोर्टची टक्केवारी 14.24 टक्के आहे. 000000 <

रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

गणशोत्सव व मोहरमचे कार्यक्रम कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव होणार नाही अशा पध्दतीने साजरे करण्यासाठी काटेकोर नियोजन - गृह (गामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : लोकांच्या सुरक्षिततेसाठी व गर्दी झाल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये ही भूमीका लक्षात घेऊन घरगुती व साध्या पध्दतीने उत्सव साजरे करत आहोत. याबाबत अधिक सतर्क रहाण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सर्व गणशोत्सव व मोहरमचे कार्यक्रम सुरळीतपणे, साध्या पध्दतीने व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून व कोणत्याही पध्दतीने कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फैलाव होण्यास वाव मिळेल अशा पध्दतीने होणार नाहीत, ते काळजीपूर्वक केले जातील, असे काटेकोर नियोजन केले आहे, असे प्रतिपादन गृह (गामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. गणेशोत्सव व मोहरमच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था याबाबत आढावा बैठक शासकीय विश्रामगृह तासगाव येथे झाली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार सुमनताई पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे यांच्यासह पोलीस विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. गृह (गामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, गतवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केलेल्या मंडळापैकी यावषीर् 60 ते 65 टक्के गणेशोत्सव मंडळळानी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी एक गाव एक गणपतीची संकल्पना सुध्दा राबविली आहे. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व सर्व पोलीस अधिकारी यांनी गणेशोत्सवाच्या अगोदरच लोकांच्यामध्ये जनजागृती केल्यामुळे तसेच नागरिकांनी छोट्या स्वरूपात व घरगुती गणेशोत्सव साजरा करावा ही भावना सामान्य माणसांपर्यंत पोहोचवल्यामुळे गणेश मंडळांचा, गणेश भक्तांचा, गावांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. काल गणेशोत्सव सुरू झाला पण कोठेही मोठ्या प्रमाणावर मिरवणुका झाल्या नाहीत. जी कार्यपध्दती गणेशोत्सवासाठी ठेवली आहे तीच कार्यपध्दती मोहरमसाठी सुध्दा ठेवली आहे. यासाठी मुस्मीम बांधवांचेही चांगले सहकार्य मिळाले असून त्यांनी सुध्दा गणेशोत्सवाप्रमाणे मोहरम सुध्दा घरगुतीच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मिरवणूका व उत्सवाचा फारसा ताण पोलीस दलावर येणार नाही. तरीसुध्दा पोलीस दल सतर्क आहे. सर्व अधिकाऱ्यांना सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. गणेशोत्सव घरगुती पध्दतीने व साध्या पध्दतीने साजरा व्हावा यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईतल्या मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची एक महिन्यापूर्वीच ऑनलाईन बैठक घेतली होती. यामध्ये गणेशोत्सव मंडळानी शासन जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असे सांगितले होते. त्याप्रमाणे पूर्ण राज्यात कोठेही मोठे उत्सव, मंडप, डेकोरेशन नसून घरगुती पध्दतीने गणेशोत्सव साजरा होत असल्याचे ते म्हणाले. तत्पूर्वी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी गणेशोत्सव व मोहरमच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहाण्याच्या अनुषंगाने केलेले नियोजन, बंदोबस्त, विसर्जन मिरवणूका याबाबत सविस्तर आढावा घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सविस्तर माहिती दिली. 00000

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

कोविड रूग्णांवर औषधोपचार करण्यास टाळाटाळ केल्याने 5 कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत एफआयआर दाखल

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : घाटगे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, पी. जी. इन्स्टीट्युट अँन्ड रिसर्च सेंटर, सांगली हे कोविड-19 रूग्णांवर उपचारासाठी महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आदेशित केल्यानुसार कार्यान्वित केले आहे. या हॉस्पीटलमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या 5 कर्मचाऱ्यांनी कोविड रूग्णांवरती औषधोपचार करण्यास टाळाटाळ केल्याने त्यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाणे येथे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल अंबोळे यांनी एफआयआर दाखल केली आहे. सद्या सुरू असलेल्या कोविड-19 या संसर्गजन्य विषाणूच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय साथ रोग अधिनियम 1987 नुसार आणि महाराष्ट्र इसेन्सियल सर्व्हिसेस मेन्टनंस ॲक्ट 2005 हा अधिनियम देशामध्ये लागू करण्यात आलेला आहे. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीमध्ये कोविड-19 हॉस्पीटल सुरू करण्यात आली आहेत तेथे रूग्णावर उपचार सुरू असून शासकीय रूग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त कोविड-19 रूग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. सांगली मिरज कुपवाड शहर महानरपालिकेचे आयुक्त यांच्याकडील आदेशानुसार घाटगे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, पी. जी. इन्स्टीट्युट अँन्ड रिसर्च सेंटर, सांगली हे अधिग्रहित करण्यात येवून त्यांना कोविड-19 च्या रूग्णांवर उपचार करण्याबाबत निर्देशित केले आहे. मनिषा आवळे, सुनिता माने (चेलेकर), कलावती बाबर, प्रज्ञा थोरवत, सोनाली करंडे यांच्याविरूध्द मेस्मा अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 00000

कोविड-19 उपचारासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या रूग्णालयांचे फायर व इलेक्ट्रीक ऑडीट होणार

सांगली, दि. 21 , (जि. मा. का.) : कोविड-19 च्या उपचारासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या रूग्णालयांचे फायर व इलेक्ट्रीक ऑडीट त्वरीत करून घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महनगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी राजेंद्र गाडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा कोषागार अधिकारी सुशिलकुमार केंबळे, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोविड-19 च्या उपचारासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या रूग्णालयांचे फायर व इलेक्ट्रीक ऑडीट करून घ्यावे. तपासणीअंती नोंदविण्यात आलेली निरीक्षणे व त्या अनुषंगाने आवश्यक दुरुस्त्या करावयाच्या असल्यास त्याबाबत लेखी संबंधित रुग्णालयांना कळविण्यात यावे व संबंधितांकडून त्याबाबतची पूर्तता करून घेण्यात यावी. कोविड रूग्णालयांच्या तपासणीसाठी नेमन्यात आलेल्या टीमने कमीत कमी प्रत्येक दिवशी एका रूग्णालयाची तपासणी करावी. भरारी पथकाच्या कारवाई अंतर्गत प्राप्त झालेल्या अहवालावर जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी व जिल्हा कोषागार अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करावी. रॅपिड ॲन्टीजन टेस्ट किटची मागणी करण्याबाबत यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देश दिले. तसेच कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी आणखी खाजगी हॉस्पीटल अधिग्रहित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 32.06 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 21 , (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 32.06 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 94.73 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 12.88 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 9.09 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 9.49 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी, तारळी धरणात 5.46 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 24.12 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.36 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 100.51 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे. सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग क्युसेक्स मध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 12059, धोम 199, कण्हेर 2714, वारणा 11978, दूधगंगा 1800, राधानगरी 4256, तुळशी 507, कासारी 250, पाटगाव 2818, धोम बलकवडी 1210, उरमोडी 1710, तारळी 1442, अलमट्टी 2 लाख 50 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 18.6 (45), आयर्विन पूल सांगली 24.8 (40) व अंकली पूल हरिपूर 32.6 (45.11). 00000

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०

जत तालुक्यात कोरोना बाधीत रूग्ण आढळून आलेल्या ठिकाणी कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात

सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : जत तालुक्यातील जत शहरातील खाटीक गल्ली, नाटेकर गल्ली, नीलसागर लॉज परीसर, रामराव नगर व दुधाळ वस्ती, डोर्ली (मातंग समाज वस्ती), बालगाव (उमराणी वस्ती) येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट झोनच्या परिघाबाहेरील काही परिसर बफर झोन केला आहे. अशी माहिती जत उपविभागीय दंडाधिकारी प्रशांंत आवटे यांनी दिली. सदर भागांमध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश जत उपविभागीय दंडाधिकारी प्रशांत आवटे यांनी दिले आहेत. 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 31.58 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 18 , (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 31.58 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 91.95 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 11.96 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 9.17 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 9.30 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी, तारळी धरणात 5.33 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 23.54 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.29 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 100.64 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे. सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे कोयना धरणातून 55486 क्युसेक्स, धोम 210, कण्हेर धरणातून 6956 क्युसेक्स, वारणा धरणातून 12042 क्युसेक्स, दूधगंगा धरणातून 7700 क्युसेक्स, राधानगरी धरणातून 4256 क्युसेक्स, तुळशी धरणातून 504 क्युसेक्स, कासारी धरणातून 1300 क्युसेक्स, पाटगाव 2393 क्युसेक्स, धोम बलकवडी धरणातून 1233 क्युसेक्स, उरमोडी धरणातून 1710 क्युसेक्स, तारळी धरणातून 2626 क्युसेक्स, अलमट्टी धरणातून 2 लाख 50 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 27.6 (45), आयर्विन पूल सांगली 39 (40) व अंकली पूल हरिपूर 42.6 (45.11). 00000

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी जिल्हा क्रीडा संकुल सांगलीच्या बाजूला कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी 400 खाटांचे हॉस्पीटल उभा करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाला देण्यात आला असून यावर लवकरच निर्णय होऊन त्याचे काम लवकरच सुरू होईल. कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे गरज नसताना घराच्या बाहेर पडू नये. कोरोनापासून दूर राहण्यासाठी अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली व राष्ट्रगीत झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली अशोक वीरकर यांनी संचलनाचे नेतृत्त्व केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, महापौर गीता सुतार, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, मिरज पोलीस उपविभागीय अधिकारी संदीपसिंह गिल, पद्मश्री विजयकुमार शहा यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, अन्य पदाधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना आजाराचा फैलाव वेगाने होत आहे. कोरोना नियंत्रणासाठी शासकीय यंत्रणा गेल्या काही महिन्यापासून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. काही विलंब व अडचणी समजून घेऊन त्यांना सर्वांनी साथ देणे गरजेचे आहे. हे संकट नेहमीचे व साधारण संकट नाही. या संकटाच्या काळात सर्वांनी समजून घेऊन प्रशासकीय काम करणाऱ्या कोरोना योध्यांना साथ देणे गरजेचे आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी यांनीही या संकटाच्या काळात अतिशय चांगले काम केले आहे. कोरोनाबाबत लोकांची जागृती व समजूत घालणे हाच उपाय आहे. आरोग्य विभागाने 50 वर्षावरील व कोमॉर्बिडिटी असलेल्या नागरिकांची तपासणी मोहीम हाती घेतली असून त्यांची वारंवार तपासणी व त्यांना काही अडचणी आहेत का हे पाहण्याचे काम आरोग्य यंत्रणा करीत आहे असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाच्या काळात कोमॉर्बिडिटी असणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या कोरोनापासून बचाव हाच सर्वोत्तम उपाय आहे. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्याने आत्तापर्यंत अनेक प्रकारच्या आपत्ती पाहिल्या आहेत. पूर, दुष्काळ, गतवर्षीचा भीषण महापूर, अवकाळी पाऊस आणि आता यावर्षी कोरोना. हे सारे आघात पेलताना जिल्हा प्रत्येकवेळी धैर्याने उभा राहिला. प्रत्येक संकटाने आपल्याला अधिक कणखर आणि संघर्षशील बनविले. कोरोनाशी लढताना कोणतीही सरावलेली युध्दसामग्री कुचकामी ठरते. अशा परिस्थितीतही जिल्हा खंबीरपणे कोरोना योध्यांच्या, प्रशासनाच्या बाजूने सहनशिलतेने उभा आहे. प्रशासनातील सर्व यंत्रणा झोकून देवून अहोरात्र राबत आहे. सर्व लोकप्रतिनिधीही एकदिलाने साथ देत आहेत. सांगली जिल्हावासियांनी तर संकटाच्या या काळात संयम बाळगून प्रशासनाला दिलेली साथ अतुलनीय आहे. यासाठी मी सर्वांचाच ऋणी आहे. जसजशी कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे तसतसे शासकीय रूग्णांलयाबरोबरच खाजगी रूग्णालयेही अधिग्रहित करण्यात येत आहेत. उपचारापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर कार्यान्वीत करण्यात आले आहेत. तसेच काही ग्रामीण रूग्णालयांमधून व उपजिल्हा रूग्णालयांमध्ये डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले आहेत, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा हे सर्व घटक कोणतीही तमा न बाळगता या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र झटत आहे. यांच्या जोडीला खाजगी रूग्णालयातील डॉक्टर्स व त्यांचे सर्व सहकारी यांनीही रूग्ण सेवेचे आपले आद्य कर्तव्य पार पाडण्यासाठी पुढाकार घेणे ही वेळेची गरज आहे. खाजगी क्षेत्रातील सर्व आरोग्य यंत्रणेतील घटक यासाठी संपूर्ण योगदान देतील. आणि मानव जातीच्या इतिहासात उदभवलेल्या या अभूतपूर्व महामारीच्या संकटात आपल्या संपूर्ण क्षमता वापरून योगदान देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्ह्यात आजमितीस 5 हजार 700 हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. जवळपास तीन हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधून गत आर्थिक वर्षात 7 कोटी 32 लाखाची तर यावर्षी 10 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच शासनाकडून 4 कोटी 65 लाखाचा निधीही आत्तापर्यंत उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोरोना आज प्रत्येकाच्या दारात आला आहे, मात्र त्याला उंबरठ्यावरुनच परत पाठवायचं असेल तर नागरिकांनी घरी राहूनच कोरोनाशी दोन हात केले पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात गेल्या वर्षी उदभवलेल्या महापूराच्या पार्श्वभूमीवर यंदा पूरप्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना नियोजनबध्दरितीने केल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, पडणारा पाऊस, धरणातील पाणीसाठा, धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन, नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा आणि पूरग्रस्तांसाठी बचाव व मदत कार्य याचे शास्त्रशुध्द नियोजन केले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय ठेऊन अलमट्टी धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग यावर अधिक लक्ष देण्यात येत आहे. जिल्ह्यात गतवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांसाठी एक हेक्टर पर्यंतच्या पीक कर्जास माफी जाहीर करण्यात आली होती. यासाठी सातत्याने पाठपुरावा करून 131 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून घेतला. जिल्ह्यातील 26 हजार 256 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 130 कोटी 91 लाख रक्कम वर्ग करून पुरबाधीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत 74 हजार 771 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 443 कोटी 68 लाख रक्कम वर्ग करण्यात आली. यावर्षी खरीपासाठी 1497 कोटी पीक कर्जाचे उद्दिष्ट आहे. 31 जुलै अखेर 1025 कोटी रूपयांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. उर्वरित उद्दिष्टही लवकरच साध्य होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 मार्च 2020 पासून शासनाने केवळ पाच रुपयात शिवभोजन थाळी योजना राबवून अडचणीत सापडलेल्या गरीब आणि गरजू जनतेला पोटभर जेवण उपलबध करुन दिले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 21 शिवभोजन केंद्रामार्फत ४ लाखाहून अधिक थाळ्याचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाबरोबरच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगानेही पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लॉकडाऊन अंमलबजावणी, कंटेनमेंट झोन व्यवस्थापन, दैनंदिन आवश्यक वस्तुंची घरपोच सेवा या सर्वांमध्ये उत्कृष्ट काम केले आहे. जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प टेंभू, ताकारी व म्हैसाळ या उपसा सिंचन येाजनांमुळे 9 तालुक्यातील सुमारे 1 लाख 80 हजार हेक्टराहून अधिक क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार असून सद्यस्थितीत या सर्व क्षेत्रास सिंचनाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या लाभ दिला जातो. या उपसा सिंचन योजनांमधून सद्यस्थितीत वार्षिक 30 ते 35 टीएमसी पाणी अनेक टप्प्यांव्दारे उचलून आवर्षण भागातील शेतीसाठी सिंचन सुविधा पुरविण्यात येते. तसेच प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील लहान मोठे तलाव भरून दिले जात आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना व पशुधनास टंचाई कालावधीत टंचाई निवारणार्थ फार मोठी मदत झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कृषि विभागाच्या आत्मा अंतर्गत नाविण्यपूर्ण योजनेतून 200 शेत तलावामध्ये मत्स्यपालनाचा उपक्रम राबविण्यात आला. शेततळी अस्तरीकरणासाठी सुमारे 2 हजार शेतकऱ्यांना 12 कोटी अनुदान दिले. त्यामुळे शेततळ्यामध्ये 12 लाख 58 हजार 350 घनमीटर पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊन त्याचा लाभ पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या क्षेत्रातील द्राक्ष पिकाला झाला असल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, 26 कोटी 25 लाख रूपये अनुदान वितरीत करून 13 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना 6784 हेक्टरवर ठिबक सिंचनाचा लाभ दिला. लॉकडाऊन काळात 3 हजार 906 क्विंटल बियाणे व 8 हजार 966 मेट्रिक टन रासायनिक खते 20 हजार 200 शेतकऱ्यांच्या बांधावर पुरवठा केली आहेत. प्रत्येक पातळीवर सर्वसामान्य माणसाचे जीवन सुरळीत चालावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगलीकरांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते कोरोना योध्दा पुरस्कार डॉ. प्रिया बिडवे, डॉ. अंजना पलकंडी, कक्षसेवक अनिल कांबळे, आशा वर्कर मनिषा कांबळे, साधना खाडे, अरूणा शिंदे, सहिदा जमादार व वर्षा ढोबळे, कोरोना विषयक विशेष कामगिरीबध्दल जमीर पाथरवट, अनिल मादरगे, कोरोना मुक्त झालेल्या हौसाबाई पाटील, ताराबाई खोत, बाबासाहेब खोत, प्रकाश पांढरे, कोरोना जनजागृतीसाठी पत्रकार दीपक चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2018-19 युवराज खटके, सुरेश चौधरी, सुरेश सावंत, प्रियंका कारंडे, गिरीष जकाते, विशाल पवार यांना देण्यात आला. सन 2016-17 चा जिल्हा युवा पुरस्कार प्रताप मेटकरी, योगीता मगदूम व एकलव्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सांगली यांना, 2017-18 चा जिल्हा युवा पुरस्कार चंद्रशेखर तांदळे, माया गडदे व इन्साफ नॅचरल सिक्युरिटी ऑफ ॲनिमल फाऊंडेशनचे अध्यक्ष मुस्ता मुजावर यांना व सन 2018-19 चा जिल्हा युवा पुरस्कार मयुर लोंढे, अनिता पाटील यांना पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते देण्यात आला. पूरस्कार वितरणानंतर पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्वातंत्र्य सैनिक, कोरोना योध्दे, नागरिक यांना भेटून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : शासकीय रूग्णालयांमध्ये कर्मचारी वर्ग अपूरा पडत आहे याचा सविस्तर आढावा घेऊन यावर मार्ग काढण्यासाठी कंत्राटी तत्वावर मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता यांनी तात्काळ प्रस्ताव तयार करावा व तो मंत्रालय स्तरावर सादर करावा. त्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल, असे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने पालकमंत्री जयंत पाटील यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यात सद्यस्थितीत 5 हजार 788 एकूण कोरोना बाधीत असून यातील 2 हजार 517 कोरोना बाधीत उपचाराखाली आहेत. तर 3 हजार 70 रूग्ण बरे झाले आहेत. महानगरपालिका क्षेत्रात तुलनेने प्रादुर्भाव जास्त आहे. या सर्व बाबींचा आढावा घेऊन सद्यस्थितीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी सविस्तर चर्चा केली. सांगलीत उभारण्यात येत असणारे ऑक्सीजन प्लँट व मिरज येथील ऑक्सीजन प्लँटची क्षमता वृध्दी याबाबतही चर्चा करून पालकमंत्री जयंत पाटील यांनी अधिग्रहित रूग्णालयांमधून रूग्णांकडून जादा दराने बिलांची आकारणी होऊ नये यासाठी प्रत्येक खाजगी रूग्णालयांवर शासकीय ऑडीटर नेमून खात्री करावी. रूग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा दर्जा चांगला असावा. रूग्ण मृत झाल्यास स्वॅबचा अहवाल येण्यामध्ये होत असलेला विलंब कमी करावा याबाबत निर्देशित केले. 00000

सांगलीत कोरोना रूग्णांवर उपचारासाठी 400 खाटांचे हॉस्पीटल लवकरच उभारणार - पालकमंत्री जयंत पाटील

भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी जिल्हा क्रीडा संकुल सांगलीच्या बाजूला कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी 400 खाटांचे हॉस्पीटल उभा करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाला देण्यात आला असून यावर लवकरच निर्णय होऊन त्याचे काम लवकरच सुरू होईल. कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यामुळे गरज नसताना घराच्या बाहेर पडू नये. कोरोनापासून दूर राहण्यासाठी अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली व राष्ट्रगीत झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली अशोक वीरकर यांनी संचलनाचे नेतृत्त्व केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, महापौर गीता सुतार, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे, मिरज पोलीस उपविभागीय अधिकारी संदीपसिंह गिल, पद्मश्री विजयकुमार शहा यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, अन्य पदाधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना आजाराचा फैलाव वेगाने होत आहे. कोरोना नियंत्रणासाठी शासकीय यंत्रणा गेल्या काही महिन्यापासून प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. काही विलंब व अडचणी समजून घेऊन त्यांना सर्वांनी साथ देणे गरजेचे आहे. हे संकट नेहमीचे व साधारण संकट नाही. या संकटाच्या काळात सर्वांनी समजून घेऊन प्रशासकीय काम करणाऱ्या कोरोना योध्यांना साथ देणे गरजेचे आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी यांनीही या संकटाच्या काळात अतिशय चांगले काम केले आहे. कोरोनाबाबत लोकांची जागृती व समजूत घालणे हाच उपाय आहे. आरोग्य विभागाने 50 वर्षावरील व कोमॉर्बिडिटी असलेल्या नागरिकांची तपासणी मोहीम हाती घेतली असून त्यांची वारंवार तपासणी व त्यांना काही अडचणी आहेत का हे पाहण्याचे काम आरोग्य यंत्रणा करीत आहे असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोनाच्या काळात कोमॉर्बिडिटी असणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या कोरोनापासून बचाव हाच सर्वोत्तम उपाय आहे. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्याने आत्तापर्यंत अनेक प्रकारच्या आपत्ती पाहिल्या आहेत. पूर, दुष्काळ, गतवर्षीचा भीषण महापूर, अवकाळी पाऊस आणि आता यावर्षी कोरोना. हे सारे आघात पेलताना जिल्हा प्रत्येकवेळी धैर्याने उभा राहिला. प्रत्येक संकटाने आपल्याला अधिक कणखर आणि संघर्षशील बनविले. कोरोनाशी लढताना कोणतीही सरावलेली युध्दसामग्री कुचकामी ठरते. अशा परिस्थितीतही जिल्हा खंबीरपणे कोरोना योध्यांच्या, प्रशासनाच्या बाजूने सहनशिलतेने उभा आहे. प्रशासनातील सर्व यंत्रणा झोकून देवून अहोरात्र राबत आहे. सर्व लोकप्रतिनिधीही एकदिलाने साथ देत आहेत. सांगली जिल्हावासियांनी तर संकटाच्या या काळात संयम बाळगून प्रशासनाला दिलेली साथ अतुलनीय आहे. यासाठी मी सर्वांचाच ऋणी आहे. जसजशी कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे तसतसे शासकीय रूग्णांलयाबरोबरच खाजगी रूग्णालयेही अधिग्रहित करण्यात येत आहेत. उपचारापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर कार्यान्वीत करण्यात आले आहेत. तसेच काही ग्रामीण रूग्णालयांमधून व उपजिल्हा रूग्णालयांमध्ये डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले आहेत, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा हे सर्व घटक कोणतीही तमा न बाळगता या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र झटत आहे. यांच्या जोडीला खाजगी रूग्णालयातील डॉक्टर्स व त्यांचे सर्व सहकारी यांनीही रूग्ण सेवेचे आपले आद्य कर्तव्य पार पाडण्यासाठी पुढाकार घेणे ही वेळेची गरज आहे. खाजगी क्षेत्रातील सर्व आरोग्य यंत्रणेतील घटक यासाठी संपूर्ण योगदान देतील. आणि मानव जातीच्या इतिहासात उदभवलेल्या या अभूतपूर्व महामारीच्या संकटात आपल्या संपूर्ण क्षमता वापरून योगदान देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्ह्यात आजमितीस 5 हजार 700 हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. जवळपास तीन हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधून गत आर्थिक वर्षात 7 कोटी 32 लाखाची तर यावर्षी 10 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच शासनाकडून 4 कोटी 65 लाखाचा निधीही आत्तापर्यंत उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोरोना आज प्रत्येकाच्या दारात आला आहे, मात्र त्याला उंबरठ्यावरुनच परत पाठवायचं असेल तर नागरिकांनी घरी राहूनच कोरोनाशी दोन हात केले पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात गेल्या वर्षी उदभवलेल्या महापूराच्या पार्श्वभूमीवर यंदा पूरप्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना नियोजनबध्दरितीने केल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, पडणारा पाऊस, धरणातील पाणीसाठा, धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन, नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा आणि पूरग्रस्तांसाठी बचाव व मदत कार्य याचे शास्त्रशुध्द नियोजन केले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय ठेऊन अलमट्टी धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग यावर अधिक लक्ष देण्यात येत आहे. जिल्ह्यात गतवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांसाठी एक हेक्टर पर्यंतच्या पीक कर्जास माफी जाहीर करण्यात आली होती. यासाठी सातत्याने पाठपुरावा करून 131 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून घेतला. जिल्ह्यातील 26 हजार 256 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 130 कोटी 91 लाख रक्कम वर्ग करून पुरबाधीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत 74 हजार 771 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर 443 कोटी 68 लाख रक्कम वर्ग करण्यात आली. यावर्षी खरीपासाठी 1497 कोटी पीक कर्जाचे उद्दिष्ट आहे. 31 जुलै अखेर 1025 कोटी रूपयांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. उर्वरित उद्दिष्टही लवकरच साध्य होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 30 मार्च 2020 पासून शासनाने केवळ पाच रुपयात शिवभोजन थाळी योजना राबवून अडचणीत सापडलेल्या गरीब आणि गरजू जनतेला पोटभर जेवण उपलबध करुन दिले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 21 शिवभोजन केंद्रामार्फत ४ लाखाहून अधिक थाळ्याचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाबरोबरच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगानेही पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लॉकडाऊन अंमलबजावणी, कंटेनमेंट झोन व्यवस्थापन, दैनंदिन आवश्यक वस्तुंची घरपोच सेवा या सर्वांमध्ये उत्कृष्ट काम केले आहे. जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प टेंभू, ताकारी व म्हैसाळ या उपसा सिंचन येाजनांमुळे 9 तालुक्यातील सुमारे 1 लाख 80 हजार हेक्टराहून अधिक क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार असून सद्यस्थितीत या सर्व क्षेत्रास सिंचनाचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या लाभ दिला जातो. या उपसा सिंचन योजनांमधून सद्यस्थितीत वार्षिक 30 ते 35 टीएमसी पाणी अनेक टप्प्यांव्दारे उचलून आवर्षण भागातील शेतीसाठी सिंचन सुविधा पुरविण्यात येते. तसेच प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील लहान मोठे तलाव भरून दिले जात आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना व पशुधनास टंचाई कालावधीत टंचाई निवारणार्थ फार मोठी मदत झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कृषि विभागाच्या आत्मा अंतर्गत नाविण्यपूर्ण योजनेतून 200 शेत तलावामध्ये मत्स्यपालनाचा उपक्रम राबविण्यात आला. शेततळी अस्तरीकरणासाठी सुमारे 2 हजार शेतकऱ्यांना 12 कोटी अनुदान दिले. त्यामुळे शेततळ्यामध्ये 12 लाख 58 हजार 350 घनमीटर पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊन त्याचा लाभ पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या क्षेत्रातील द्राक्ष पिकाला झाला असल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, 26 कोटी 25 लाख रूपये अनुदान वितरीत करून 13 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना 6784 हेक्टरवर ठिबक सिंचनाचा लाभ दिला. लॉकडाऊन काळात 3 हजार 906 क्विंटल बियाणे व 8 हजार 966 मेट्रिक टन रासायनिक खते 20 हजार 200 शेतकऱ्यांच्या बांधावर पुरवठा केली आहेत. प्रत्येक पातळीवर सर्वसामान्य माणसाचे जीवन सुरळीत चालावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगलीकरांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते कोरोना योध्दा पुरस्कार डॉ. प्रिया बिडवे, डॉ. अंजना पलकंडी, कक्षसेवक अनिल कांबळे, आशा वर्कर मनिषा कांबळे, साधना खाडे, अरूणा शिंदे, सहिदा जमादार व वर्षा ढोबळे, कोरोना विषयक विशेष कामगिरीबध्दल जमीर पाथरवट, अनिल मादरगे, कोरोना मुक्त झालेल्या हौसाबाई पाटील, ताराबाई खोत, बाबासाहेब खोत, प्रकाश पांढरे, कोरोना जनजागृतीसाठी पत्रकार दीपक चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2018-19 युवराज खटके, सुरेश चौधरी, सुरेश सावंत, प्रियंका कारंडे, गिरीष जकाते, विशाल पवार यांना देण्यात आला. सन 2016-17 चा जिल्हा युवा पुरस्कार प्रताप मेटकरी, योगीता मगदूम व एकलव्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सांगली यांना, 2017-18 चा जिल्हा युवा पुरस्कार चंद्रशेखर तांदळे, माया गडदे व इन्साफ नॅचरल सिक्युरिटी ऑफ ॲनिमल फाऊंडेशनचे अध्यक्ष मुस्ता मुजावर यांना व सन 2018-19 चा जिल्हा युवा पुरस्कार मयुर लोंढे, अनिता पाटील यांना पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते देण्यात आला. पूरस्कार वितरणानंतर पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्वातंत्र्य सैनिक, कोरोना योध्दे, नागरिक यांना भेटून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000

रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

आपत्ती काळासाठी पुढारीची महत्वाची मदत - पालकमंत्री जयंत पाटील

पुढारी रिलीफ फौंडेशनतर्फे महापालिकेस दोन यांत्रिक बोटी प्रदान सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : दैनिक पुढारी’ने पुढारी रिलीफ फौंडेशनच्यावतीने सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेला महापूर नियंत्रणासाठी देण्यात आलेल्या दोन यांत्रिक बोटी, लॉईफसेव्ह जॅकेटसह अत्यावश्यक साहत्य पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते महापौर गीता सुतार व आयुक्त नितीन कापडनीस यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, उपमहापौर आनंदा देवमने, दैनिक पुढारीचे आवृत्ती प्रमुख चिंतामणी सहस्त्रबुध्दे आदींसह पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. सामाजिक उत्तरदायित्व पार पाडण्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या पुढारी रिलीफ फौंडेशनने महापालिकेला दोन अत्याधुनिक यांत्रिक बोटी इंजिनसह, लॉफसेव्ह जॅकेट, बिओ रिंगसह दोर आदी सुमारे 10 लाखांचे साहित्य प्रदान करण्यात आले. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, नेहमीच विकासात्मक भूमिका घेणाऱ्या पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव व व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांनी ‘पुढारी रिलीफ फौंडेशनच्यावतीने अत्याधुनिक यांत्रिक बोटींसह बचावकार्यासाठी महापालिकेला दोन बोटींसह अत्याधुनिक साहित्य दिले आहे. आपत्ती काळात बचावासाठी बोटी व हे साहित्य महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ‘पुढारी’ने दिलेल्या यांत्रिक रबरी बोटी असून, त्याला असलेल्या मोटारीला 25 एचपी टू स्ट्रोक इंजिन आहे. यामुळे या बोटी अडचणीच्या व धोकादायक ठिकाणातही गतिमान पद्धतीने बचावासाठी फायदेशीर ठरणार आहेत. एका बोटीमध्ये दहाजणांची आसनक्षमता आहे. यासोबतच मोठ्यांसाठी लाईफसेफ्टी 20 जॅकेट, मुलांसाठी दहा लाईफसेफ्टी जॅकेट, 20 बीओ रिंग दोरसह आदी बचावात्मक साहित्याचा समावेश आहे. 00000

कोविड-19 महामारीला रोखण्यासाठी आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल - पालकमंत्री जयंत पाटील

मृत्यूदर कमी ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी 11 कोटी 30 लाख रूपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यापुढेही या महामारीला रोखण्यासाठी आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती सभागृहात सांगली जिल्ह्यातील कोविड प्रादुर्भावाचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात सद्यस्थितीत 2 हजार 374 कोरोना बाधित रूग्ण उपचाराखाली आहेत. यातील 985 रूग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचाराखाली आहेत. त्यामुळे कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता खाजगी रूग्णालये अधिग्रहित करणे क्रमप्राप्त आहे. यासाठी खाजगी रूग्णालयांनी आवश्यक ते सर्व सहकार्य द्यावे. सर्वांनी मिळून कोरोना बाधितांवर उपचार करूया व मृत्यूदर कमीत कमी रहावा यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी खाजगी रूग्णांलयांना केले. यावेळी त्यांनी अनेक रूग्ण घाबरलेल्या स्थितीत असतात त्यामुळे ज्येष्ठ वैद्यकीय व्यवसायिकांनी त्यांच्यावर उपचार केल्यास, त्यांना धीर दिल्यास रूग्णांचे मनोधैर्य वाढेल व रूग्ण लवकरात लवकर बरा होण्यास त्याची मदत होईल. त्यामुळे संकटाच्या या वेळेत सर्वांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासन आणि खाजगी रूग्णालये यांच्यात सहजता यावी व सुसुत्रता यावी यासाठी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी खाजगी रूग्णालयांच्या समस्या जाणून घेतल्या. अनेक रूग्ण बेड्स च्या शोधात फिरतात त्यामुळे उपचारासाठी उशीर होतो हे टाळून खाजगी रूग्णालयांच्या कार्यपध्दतीमध्ये सुसुत्रता यावी यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या बेड मॅनेजमेंट सिस्टीमला प्रतिसाद देवून सर्वांनी ती वेळेत अद्ययावत ठेवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कोरोना बाधितांवर उपचार करण्यात येत असलेला मनुष्यबळाचा तुटवड्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मेडिकल कॉलेजच्या इंटर्नशिप करत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सेवा उपलब्ध करून घ्याव्यात, असेही त्यांनी यावेळी सूचित केले. या बैठकीत राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी अनेकदा खाजगी रूग्णालये आपली जबाबदारी झटकून रूग्णांना मोठ्या हॉस्पीटलच्या दिशेने पाठवितात. या ठिकाणी बेड्स उपलब्ध नसल्यास अडचणीचा प्रश्न येतो. हे टाळण्यासाठी आपल्याकडे येणाऱ्या रूग्णाला स्थितीचे गांभीर्य ओळखून प्राधान्याने उपचार सुरू करा, अशा सूचना खाजगी रूग्णालयांना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यात 80 टक्के आरोग्य सुविधा खाजगी क्षेत्रात आहेत. रूग्णांची वाढती संख्या पहाता खाजगी रूग्णालयांनी रूग्णसेवा देण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. बेड्स उपलब्ध असतानाही रूग्णसेवा नाकारणे हे नैतिकता व कायदा या दोहोंना धरून नाही. गंभीर स्वरूपाच्या रूग्णांसाठी काही बेड्स राखीव ठेवावेत व रूग्णाला अन्यत्र न फिरवता तातडीने उपचार द्यावेत. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये सूचीबध्द होण्यासाठी खाजगी रूग्णालयांनी स्वत:हून क्षमतावृध्दी करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक असणारी मदत रूग्णालयांना प्रशासनामार्फत करण्यात येईल. याशिवाय अधिग्रहित खाजगी रूग्णालयांनी प्रशासनामार्फत वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे सांगितले. 00000

पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते पूरप्रवण गावांसाठी फायबर ग्लास यांत्रिक बोटींचे लोकार्पण

सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : गतवर्षी सांगली जिल्ह्याने भीषण महापुराचा सामना केला. त्यातुन जिल्ह्यात अद्ययावत अशा यांत्रिक बोटींची गरज अधोरेखित झाली. भविष्यात महापूराची स्थिती निर्माण झाल्यास जिल्ह्यात बोटींची सुसज्जता असावी यासाठी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नाविण्यपूर्ण योजनेतून फायबर ग्लास यांत्रिक बोटी खरेदी करण्यात आल्या. या बोटींचे लोकार्पण पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. यावेळी बोटींची पहाणी करताना अत्यंत सुंदर अशा बोटींची निर्मिती केल्याबद्दल त्यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार आणि पुरवठादार व्ही. डी. जामदार यांचे कौतुक केले. कृष्णा घाट सांगली येथे जिल्ह्यातील कृष्णा, वारणा नदी काठावरील पूर बाधित गावांना फायबर ग्लास यांत्रिक बोटींचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुड्डेवार, महानगरपालिकेचे पदाधिकारी आदि उपस्थित होते. जिल्हा परिषदेमार्फत पूर बाधित गावांना फायबर ग्लास यांत्रिक बोट पुरविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नाविण्यपूर्ण योजनेतून २ कोटी १० लाख रूपयांची तरतुद करून एकूण १५ बोटी खरेदी करण्यात आल्या. या फायबर ग्लास यांत्रिक बोटी शिराळा तालुक्यातील सागावं, कोकरूड व आरळा, वाळवा तालुक्यातील भरतवाडी, वाळवा, शिरगांव व गौंडवाडी, मिरज तालुक्यातील हरीपूर, अंकली, मौजे डिग्रज व माळवाडी तसेच पलूस तालुक्यातील भिलवडी, आमणापूर, ब्रम्हनाळ, घनगावं-तावदरवाड या प्रत्येक गावांना १ या प्रमाणे देण्यात येणार आहेत. या बोटीची प्रवासी क्षमता १६ प्रवासी अधिक २ चालक अशी १८ प्रवासी क्षमता असून आपत्ती अति तात्तडीच्यावेळी २० प्रवासी क्षमता आहे. बोटीची लांबी २४ फूट असून रूंदी ७ फुट, उंची २ फुट ६ इंच, फायबर जाडी तळाची ८ मि.मी., बाजूची जाडी 6 मि.मी., बोट शेप व्ही आकार असून फायबर मटेरियल रेनिज + फायबर मॅट (आयआरएस मान्यता प्राप्त) आहे. ३० एचपी इंजिन क्षमता असून २५ नग जीवन रक्षक कवच (लाईफ जॅकेट एमएमबी/आयआरएस मान्यता प्राप्त) प्रती बोट, ५ नग जीव रक्षक रिंग्ज, २५ किलो वजन नांगर, ४ नग ओर्स (वल्हे), १०० फुट लांबीचा २० मी.मी. जाडीचा नायनॉल दोर, बोटीच्या दोन्ही बाजूस रेलिंग, बोट वाहतुकीसाठी ट्रॉली अशी ॲसेसरी आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधून पूरबाधित गावांसाठी आणखी ७ फायबर ग्लास यांत्रिक बोटीसाठी ९८ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या बोटी दि. ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वितरणासाठी उपलब्ध होतील. या बोटी शिराळा तालुक्यातील मौजे चरण, वाळवा तालुक्यातील जुनेखेड, बिचुद व एैतवडे खुर्द, पलूस तालुक्यातील नागराळे व पुणदी (वा) तसेच मिरज तालुक्यतील पद्ममाळे या प्रत्येक गावासाठी एक या प्रमाणे देण्यात येणार आहेत. सदर बोटींची तपासणी मेरीटाईन बोर्डाकडून करून घेण्यात आली असून सुरक्षिततेबाबत कोणतीही त्रुटी नसल्याची खात्री करण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायतींना या बोटी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यांनी बोटींची देखभाल ठेवणे आवश्यक असल्याचेही पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. याशिवाय आवश्यकतेनुसार आणखी बोटी उपलब्ध करून घेण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी जिल्ह्याला आवश्यक असणाऱ्या बोटींची बांधणी जिल्ह्यातील सुपुत्र श्री. जामदार यांनी अत्यंत अद्ययावत पध्दतीने केल्याबद्दल त्यांचे कौतुक करून पालकमंत्री जयंत पाटील यांनी संभाव्य महापूराला सक्षमपणे तोंड देता यावे यासाठी या बोटी तयार करून घेण्याचे निर्देशित केले होते, असे सांगून बोटी चालविण्याबाबत संबंधित गावातील नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 00000

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 32.2 मि. मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.61 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 32.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 7.1 (314.7), तासगाव 4.3 (294.3), कवठेमहांकाळ 3.9 (361.9), वाळवा-इस्लामपूर 5.6 (345.9), शिराळा 32.2 (798.6), कडेगाव 3.4 (298.2), पलूस 2.8 (248.2), खानापूर-विटा 3.4 (402.8), आटपाडी 0.0 (253.0), जत 0.3 (207.5). 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 29.44 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 08 , (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 29.44 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 71.56 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 8.49 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 6.98 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 8.03 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी, तारळी धरणात 3.71 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 21.57 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.25 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 95.06 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे. सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 6500 क्युसेक्स, राधानगरी धरणातून 4256 क्युसेक्स, दुधगंगा धरणातून 4100 क्युसेक्स, कासारी धरणातून 1350 क्युसेक्स, कण्हेर धरणातून 24 क्युसेक्स व अलमट्टी धरणातून 1 लाख 80 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 10.4 (45), आयर्विन पूल सांगली 22.7 (40) व अंकली पूल हरिपूर 29.6 (45.11). 00000

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 45.5 मि. मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 8.91 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 45.5 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 6.5 (307.6), तासगाव 3.4 (290), कवठेमहांकाळ 2.3 (358), वाळवा-इस्लामपूर 9.5 (340.3), शिराळा 45.5 (766.4), कडेगाव 7.6 (294.8), पलूस 1.0 (245.4), खानापूर-विटा 4.0 (399.4), आटपाडी 0.0 (253.0), जत 2.4 (207.2). 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 29.05 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 07 , (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 29.05 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. आपल्या शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 69.12 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 8.28 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 6.63 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 7.73 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी, तारळी धरणात 3.53 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 21.05 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.36 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 97.28 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे. सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे वारणा धरणातून 4400 क्युसेक्स, राधानगरी धरणातून 7112 क्युसेक्स, दुधगंगा धरणातून 1000 क्युसेक्स, कासारी धरणातून 1350 क्युसेक्स व कण्हेर धरणातून 24 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 11.5 (45), आयर्विन पूल सांगली 23.9 (40) व अंकली पूल हरिपूर 29.6 (45.11). 00000

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

जिल्ह्यात 75 पूरप्रवण गावांना आपत्ती किटचे वाटप

सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात 104 पूरप्रवण गावे आहेत. या गावामध्ये आपत्कालीन साहित्य (आपत्ती किट) वाटप करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी घेतला होता. जिल्ह्यात मिरज तालुक्यात 20, पलूस 25, वाळवा 38 व शिराळा तालुक्यात 21 अशी एकूण 104 पूरप्रवण गावे आहेत. त्यानुसार प्राधान्याने एकूण 75 पूरप्रवण गावांना साहित्य खरेदी करण्यात आलेले असून त्याचे आज पूरप्रवण तालुक्यांना वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी दिली. प्रत्येक आपत्कालीन किटमध्ये मेगा फोन, रोप, बॅग, टॉर्च, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग असे साहित्य आहे. मिरज तालुका 17, वाळवा 31, पलूस 21 व शिराळा तालुक्यास 06 असे एकूण 75 आपत्कालीन साहित्याच्या किटचे आज वाटप करण्यात आले. यापूर्वी सर्व गावांचे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेले आहे. तसेच सांगली जिल्ह्यामध्ये एन.डी.आर.एफ. ची दोन पथके (50 जवान) 15 जुलै पासून दाखल झालेली असून आष्टा व सांगली येथे ठेवण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे नवीन चार बोटी खरेदी करण्यात आलेल्या असून पलूस तालुक्यास 2 व वाळवा तालुक्यास 2 असे वाटप करण्यात आलेले आहे. 000000

जिल्ह्यातील वारणा धरणात 28.11 टी.एम.सी. पाणीसाठा

गुरुवार, ३० जुलै, २०२०

कर्तव्यावर हजर न होणाऱ्या ८ जणांवर मेस्मा अंतर्गत कारवाई

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : सेवा सदन लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल हे कोविड-19 रूग्णांवर उपचारासाठी कार्यान्वित केले आहे. या ठिकाणी कर्तव्य बजावण्यासाठी महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आदेशित केले होते. यामध्ये ज्यांनी आदेशाचे पालन केले नाही अशा ८ जणांवर मिरज पोलीस ठाणे येथे महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल अंबोळे यांनी एफआयआर दाखल केली आहे.
सद्या सुरू असलेल्या कोविड-19 या संसर्गजन्य विषाणूच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय साथ रोग अधिनियम 1987 नुसार आणि महाराष्ट्र इसेन्सियल सर्व्हिसेस मेन्टनंस ॲक्ट 2005 हा अधिनियम देशामध्ये लागू करण्यात आलेला आहे. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीमध्ये कोविड-19 हॉस्पीटल सुरू करण्यात आली आहेत तेथे रूग्णावर उपचार सुरू असून शासकीय रूग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त कोविड-19 रूग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. सांगली मिरज कुपवाड शहर महानरपालिकेचे आयुक्त यांच्याकडील आदेशानुसार सेवा सदन लाईफलाईन सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल हे अधिग्रहित करण्यात येवून त्यांना कोविड-19 च्या रूग्णांवर उपचार करण्याबाबत निर्देशित केले आहे.
पुजा कलाब, योगेश सुहास आवळे, केतन सोन्याबापू कांबळे, केतन सुर्यवंशी, ज्योती आप्पासो कांबळे, श्वेता धोंडीराम भाट, ऋषीकेश पाटील, पुजा भोसले यांच्याविरूध्द मेस्मा अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
00000



शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी जिल्ह्यात होईल - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात नागरी भागात जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन शिथील करण्यात आला आहे. मात्र राज्य शासनाने 31 ऑगस्ट पर्यंत जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या अनुषंगाने जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जाहीर केलेले आहे. तसेच राज्य शासनाने दि. 31 ऑगस्ट 2020 पर्यंत जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सांगली डॉ. अभिजीत चौधरी यांनी शासन निर्देशानुसार दि. 01 ऑगस्ट 2020 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 31 ऑगस्ट 2020 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत खालील प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश पारित केले आहेत.
     सांगली जिल्ह्याच्या सीमा, बंदी आदेशाच्या कालावधीत बंद राहतील. या कालावधीत आंतरराज्य व आंतरजिल्हा माल वाहतूक, जीवनावश्यक सेवा / सुविधा व अत्यावश्यक सेवांसाठी होणारी वाहतूक व जिल्हा अंतर्गत सशर्त प्रवासी वाहतूक वगळून उर्वरित सर्व वाहतूक प्रतिबंधीत असेल. आंतरराज्य व आंतरजिल्हा व्यक्तीच्या प्रवासावर प्रतिबंध असेल व असा प्रवास मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियंत्रित केला जाईल. सदर कालावधीत 21.00 वाजलेपासून ते 05.00 वाजे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शाळा, कॉलेज, शैक्षणिक / प्रशिक्षण / शिकवणी देणाऱ्या संस्था इत्यादी प्रतिबंधित असतील.
     चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्कस (Entertainment), प्रेक्षागृहे, बार आणि सभागृहे, असेंब्ली हॉल यासारखे तत्सम सर्व ठिकाणे प्रतिबंधित असतील. सर्व सामाजिक / राजकीय / क्रीडा / करमणूक / शैक्षणिक / सांस्कृतिक / धार्मिक कार्यक्रम तसेच इतर मेळावे प्रतिबंधित असतील. धार्मिक स्थळे व सार्वजनिक ठिकाणाची उपासनास्थळे प्रतिबंधित असतील. तसेच खाजगी व सार्वजनिक धार्मिक स्थळांच्या ठिकाणी विधिवत पूजेसाठी असणाऱ्या धर्मगुरू अथवा पुजारी यांना वगळून इतर सर्व नागरिकांना धार्मिक स्थळांना भेटी देण्यास प्रतिबंध असेल. हॉटेल्स, रेस्टोरंट, आणि इतर आदरातिथ्य सेवा प्रतिबंधित असतील. हॉटेल्स, रेस्टोरंट व किचन येथून पार्सल देणे व घरपोच सेवा संचार बंदी कालावधी वगळता अनुज्ञेय असेल. तसेच निवासी व्यवस्था प्रदान करणारी हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाउस या आस्थापना जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दि.७ जुलै २०२० च्या आदेशानुसार सुरु राहतील.
     जिल्ह्यातील वय वर्षे 65 वरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, 10 वर्षाखालील बालके आजार असणाऱ्या व्यक्ती ( Persons with co-morbidities ) यांना अत्यावश्यक गरजा व वैद्यकीय सेवा वगळता घरातून बाहेर पडण्यास मनाई आहे.
     सदर कालावधीत अंत्यविधीकरिता 20 व लग्नसमारंभ करिता 50 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. शासन निर्देशाप्रमाणे सदर ठिकाणी Social Distancing पाळणे बंधनकारक राहणार आहे. तसेच लग्नसमारंभ विषयक बाबी लॉन / विना वातानुकुलीत - मंगल कार्यालय/ हॉल / सभागृह मध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दि. 23 जून 2020 च्या आदेशातील अटी व शर्तींचे अधीन राहून करण्यास परवानगी असेल. यामध्ये अत्यावश्यक सेवा व औषधी दुकाने (medical shops) वगळून सर्व मार्केट व दुकाने 09.00 वाजे पूर्वी व 19.00 वाजले नंतर चालू ठेवता येणार नाहीत. एखाद्या ठिकाणी गर्दी होवून सामाजिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ मार्केट व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात येतील.
     सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, सुपारी खाणे व थुंकणे प्रतिबंधित असेल. तसेच पानपट्टी मधून पान, तंबाखू, सुपारी व तत्सम पदार्थ फक्त पार्सल स्वरूपात देण्यात यावेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकलेस या  500 रूपये इतका दंड आकारण्यात येईल. सर्व नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वावरताना (उदा. रस्ते, वाहने, दवाखाने, कार्यालये, बाजार इ.) तीन पदरी मास्क किंवा साधा कापडी मास्क किंवा रुमाल किंवा कापडाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक असेल. तसेच सदर बाबीचे उल्लंघन केल्यास 500 रूपये इतका दंड आकारण्यात येईल. प्रतिबंधित क्षेत्र ( Containment Zone ) या क्षेत्रात फक्त अत्यावश्यक बाबींसंदर्भातील कार्याला परवानगी देण्यात येत आहे. वैद्यकीय कारण आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी या क्षेत्रात लोकांना बाहेर जाण्या-येण्यास पूर्णतः प्रतिबंध करण्यात येत आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शिकेतील सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.
     क्रीडा संकुले किंवा स्टेडीयमच्या आतील क्षेत्र (बंदिस्त) (indoor) याचा वापर प्रतिबंधित असेल. शासन आदेशानुसार वेळोवेळी शिथिलता देण्यात आलेल्या बाबी आणि ज्या प्रतिबंधित किंवा बंदी घातलेल्या नसतील त्या सर्व बाबी प्रतिबंधित नसलेल्या क्षेत्रामध्ये खालील अटीच्या आधारे सुरु असण्यास परवानगी असेल.
     परवानगी असलेल्या बाबीना कोणत्याही शासकीय परवानगीची आवश्यकता नाही. क्रीडा संकुले आणि मैदाने यांच्या बाह्य जागा आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागा या वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या राहतील. परंतु प्रेक्षक जमणेस व समूह सराव किंवा एकत्रित खेळ खेळण्यास प्रतिबंध करणेत येत आहे. सर्व शारीरिक व्यायाम आणि इतर व्यायाम प्रकार सामाजिक अंतराचे निकष पाळून करणेस हरकत नाही. खुल्या मैदानामध्ये गोल्फ कोर्सेस, जिमनॅस्टिक, टेनिस, खुल्या मैदानातील बॅडमिंटन आणि मल्लखांब यांना सामाजिक अंतराचे निकष पाळून दि. 05 ऑगस्ट 2020 रोजी पासून करणेस परवानगी असेल. केशकर्तनालये, स्पा, सलून्स, ब्युटी पार्लर्स यांना जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दि. ३० जून 2020 च्या आदेशानुसार परवानगी असेल. यापूर्वीच्या आदेशाने सुरु करणेत आलेले सर्व उद्योगधंदे व बांधकामे या पुढेही सुरु राहतील.
     जिल्हा अंतर्गत (Intra District) सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक यांना खालील प्रमाणे प्रवासी संख्येच्या हमीसह वाहतूक व्यवस्थापन करता येईल. परंतु प्रत्येक वापराचे वेळी असे वाहन निर्जंतुकीकरण करणे, प्रवासी व चालक / वाहक यांनी मास्क वापरणे बंधनकारक असेल. चालकाने त्यांचे वाहनात निर्जंतुकीकरण उपकरण ठेवणे बंधनकारक असेल. त्याच प्रमाणे मास्क न घातलेल्या प्रवाशांना वाहनात प्रवेश देता येणार नाही.  दुचाकी - 1 + 1 हेल्मेट व मास्क वापरणे बंधनकारक असेल, तीन चाकी - 1 + 2 व  चार चाकी - 1 + 3.
     जिल्हा अंतर्गत बस सेवा हि जास्तीत जास्त 50 टक्के प्रवासी क्षमतेसह त्याचबरोबर बसमध्ये शारीरिक अंतर आणि स्वच्छता विषयक उपाययोजनेसह सुरु करता येईल. प्रत्येक बस प्रत्येक वापरानंतर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करावी लागेल. त्याच प्रमाणे मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना वाहनात प्रवेश देता येणार नाही. वाहनात बसताना सॅनीटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल.
     मॉल्स दि. 05 ऑगस्ट 2020 पासून 09.00 वाजले पासून ते 19.00 वाजे पर्यंत सुरु राहतील. तथापि मॉल्स मधील सिनेमागृहे, खाद्यगृहे / रेस्टोरंट पूर्णपणे बंद राहतील. परंतु मॉल्स मधील अन्नगृहे / रेस्टोरंट ची स्वयंपाकगृहे सुरु ठेवून पार्सल सुविधा संचार बंदी कालावधी वगळता अनुज्ञेय असेल.
     वरील नमूद प्रतिबंधित बाबी वगळता उर्वरित सर्व बाबीना मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, मंत्रालय यांचेकडील निर्देशानुसार प्रतिबंध व सुट लागू असेल.  
या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, Incident Commander तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी. सदर आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार, गुन्हे दाखल करणेकामी सांगली जिल्ह्यातील सबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.
00000


कोविड-19 : लक्षणे व सक्रीय उपचाराची गरज असणाऱ्या रूग्णांनाच कोविड रूग्णालयांमध्ये दाखल करून उपचार करावेत - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : कोविड-19 रूग्णांलामध्ये लक्षणे असलेल्या व ज्यांना रूग्णालयीन उपचाराची गरज आहे, अशाच कोविड पॉझिटीव्ह रूग्णांना दाखल करून घेणे व त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुसार कोविड-19 उपचारासाठी राखीव ठेवलेल्या रूग्णालयातील बेड्स लक्षणे असलेल्या व ज्यांना सक्रीय उपचाराची गरज आहे अशाच कोविड पॉझिटीव्ह रूग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.
कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपिचंद कदम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, उपजिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख, मिरज उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, डॉ. निरगुंडे, डॉ. दिक्षीत, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी यासीन पटेल आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सौम्य लक्षणे असणाऱ्या किंवा लक्षणे नसलेल्या व ज्यांना सक्रिय वैद्यकिय उपचाराची गरज नाही अशा रूग्णांना कोणत्याही परिस्थितीत कोविड रूग्णालयात दाखल करून घेऊ नये. तर अशा रूग्णांना कोविड केअर सेंटर किंवा त्यांच्या पसंतीनुसार पात्र असल्यास होम आयसोलेशनमध्ये ठेवावे. यावेळी त्यांनी फॅसिलिटी ॲप व बेड मॉनिटरिंग सिस्टीम विहीत कालावधीत अद्ययावत करणे बंधनकारक असून महापालिका आयुक्त व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी संबंधित यंत्रणांना याबाबत निर्देशित करावे, असे सांगितले.
या बैठकीत कोविड-19 रूग्णांवर उपचार करण्यात येत असणारी शासकीय व अधिग्रहित करण्यात येणारी खाजगी रूग्णालये या ठिकाणचे रूग्ण तसेच कर्मचारी वृंद यांना मानसोपचार तज्ज्ञांमार्फत समुपदेशन करावे. तसेच अद्यापही कर्तव्यावर रूजू न झालेल्या खाजगी वैद्यकीय व्यवसायिक व कर्मचारी यांना मेस्मा कायद्यांतर्गत नोटीस बजावाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
00000


लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती दिनी त्यांच्या विचारांचे चिंतन घरीच राहून करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : जगात व देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून घराबाहेर पडू नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती जनतेने घरातच राहून त्यांच्या विचारांचे, कार्याचे, साहित्याचे चिंतन करून साजरी करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या दि. १ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या १०० व्या जयंती दिनानिमित्त्‍ जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या समग्र साहित्याचा माणूस हा केंद्रबिंदू आहे. माणसाचं माणूस असणारे मुल्य आणि त्याची मानवी प्रतिष्ठा यासाठी अण्णा भाऊ साठे यांनी आपली वाणी व लेखणी झिजवली. गावकुसाबाहेरचा, राबणारा, कष्ट करणारा, घाम गाळणारा माणूस आणि त्याची असणारी जीवनावरची निष्ठा यासाठी अण्णा भाऊ साठे लिहीत आणि गात राहिले. सर्वसामान्य माणसाला नायक आणि नायिका बनवणारे अण्णा भाऊ साठे हे मराठीतील महत्वाचे साहित्यिक आहेत. कृष्णा, कोयना, वारणा आणि पंचगंगा या नद्यांच्या खोऱ्यातील म्हणजेच सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरातील लोकपरंपरा, लोकरूढी, गावगाढा आणि स्वातंत्र्य चळवळ याबरोबरच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अणा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून सातासमुद्रापलिकडे पोहचवली. सर्व प्रकारच्या कर्मठ आणि कट्टरपणाला विरोध करून न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुभावाची रूजवणूक अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून केली. अशा या महान साहित्यिक, लोकशाहीराच्या 100 व्या जयंती दिनी  आपण सर्वांनीच त्यांच्या कार्याचे, त्यांच्या चरित्राचे, त्यांच्या विचारांचे या दिवशी स्मरण करून त्यांच्या प्रती आदर व्यक्त करावा. त्यांची जयंती  जनतेने घरातच थांबून साजरी करून त्यांना अभिवादन करावे. आणि कोरोनाविरूध्दच्या लढाईतील एकजूट दाखवावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील सर्व श्रेष्ठ मानवी मुल्यांचे चिंतन जन्मशताब्दी दिनी करून सर्व नागरिकांनी आपल्या घरी थांबूनच त्यांना अभिवादन करावे व त्यांच्या प्रति आदर व्यक्त करावा. तसेच प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे व कुटुंबिय तसेच साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी समितीचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
0000

ekhMR;mso-ascii-font-family:DVOT-SurekhMR; color:black'> 

शुक्रवार, २४ जुलै, २०२०

बार्टी समतांदूतांमार्फत 59 अनुसूचित जातीचे गावनिहाय सर्वेक्षण - जिल्हा प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे

सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, बार्टीच्या मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे व जिल्हा प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली 59 अनुसूचित जाती नामशेष होणाऱ्या जातींना इतर जातीच्या प्रवाहात येण्यासाठी सांगली जिल्ह्यात काम चालू आहे. सांगली जिल्ह्यातील 7 समतांदूतामार्फत गावनिहाय 59 अनुसूचित जातीचे सर्वेक्षण करण्यात येत असून आत्तापर्यंत सांगली जिल्ह्यातील 416 ग्रामपंचायतींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. अशी माहिती बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांनी दिली.
     सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्यावतीने सांगली जिल्ह्यातील तालुक्यात कार्यरत असलेल्या समतांदूतांच्याकडून तालुक्यातील गटविकास अधिकारी व गावातील ग्रामसेवकांच्या सहकार्याने 59 अनुसूचित जातीच्या विकासासाठी अधिक प्रभावी योजना व उपक्रम राबविण्यासाठी गावनिहाय 59 अनुसूचित जातीचा सर्वेक्षण करून शासनास अहवाल सादर करण्यात येणार आहे. बार्टी, पुणे या स्वायत्त संस्थेच्या वतीने अनुसूचित जातीच्या विकासासाठी व उत्थानासाठी कार्य केले जाते. त्यानुसार महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती मधील समाविष्ट 59 जातींपैकी महार, मांग, चांभार, मेहतर, वाल्मिकी, ढोर, अशा मोजक्याच जातीबाबत समाजात माहिती असते. परंतु या जाती व्यतिरिक्त 59 जातींतील काही जाती महाराष्ट्र राज्यातून नामशेष होताना दिसून येत आहे. म्हणून आशा जातीचा शोध घेऊन त्याची सध्यपरिस्थिती जाणून घेऊन संशोधन अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे. जेणेकरून या इतर जाती देखील विकासाच्या प्रवाहात येतील. या सर्वेक्षणासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,ग्रामविस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांचे सहकार्य लाभले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काही ठिकाणी अडचणी येत आहेत. परंतु आरोग्याची काळजी घेऊन व सुरक्षित अंतर ठेवून मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करून समतादूत अंकुश चव्हाण, सागर आढाव, आबासाहेब भोसले, विक्रांत शिंदे, सविता पाटील, लता सुरवसे, शहाजी पाटील विशेष परिश्रम घेत असल्याचे श्री. सवाखंडे यांनी सांगितले.
00000


वॉनलेस हॉस्पीटल मिरज, घाटगे मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल आणि विवेकानंद हॉस्पीटलमध्ये त्वरित कोविड उपचार सुविधा सुरू करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : वॉनलेस हॉस्पीटल मिरज, घाटगे मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल सांगली आणि विवेकानंद हॉस्पीटल बामणोली मध्ये त्वरित कोविड उपचार सुविधा सुरू करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
कोविड-19 उपचारासाठी वॉनलेस हॉस्पीटल येथील 100 बेड्स चा सेटअप महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत चालविले जातील. तसेच याच ठिकाणी आणखी 50 बेड्सचा सेटअप सशुल्क असेल. सदर हॉस्पीटलमध्ये रूग्णांना विना अडथळा सुविधा व उपचार मिळावेत यासाठी उपविभागीय अधिकारी मिरज, उपायुक्त महानगरपालिका, असिस्टंट चॅरिटी कमिशनर, मिरज सिव्हील हॉस्पीटलचे डॉ. निरगुंडे, डॉ. सोमनाथ, डॉ. दिक्षीत यांची प्रशासकीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत असलेले बेड्स व सशुल्क उपचारांसाठी राखीव असणारे बेड्स या दोन्हींचे नियंत्रण प्रशासकीय समिती मार्फत करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले.
तसेच घाटगे मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल, सांगली आणि विवेकानंद हॉस्पीटल बामणोली ही देखील कोविड-19 उपचारासाठी अधिगृहित करण्यात येत असून वरील तीनही हॉस्पीटल्समध्ये त्वरीत कोविड रूग्णांवर उपचार सुरू करावेत, असे निर्देशित करण्यात आले आहे.
कोविड उपचारासाठी अधिगृहित करण्यात येणारी हॉस्पीटल्स ही संबंधित हॉस्पीटलच्या व्यवस्थापनामार्फतच चालविण्यात येतील. आवश्यक तेथे प्रशासकीय यंत्रणा मदत पुरविण्याचा प्रयत्न करेल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी परखड शब्दात स्पष्ट केले. यावेळी त्यांनी मिरज मेडिकल कॉलेजने अधिगृहित करण्यात येणाऱ्या हॉस्पीटल्सना विस्तृत ट्रेनिंग पुरवावे, असेही त्यांनी यावेळी निर्देशित केले. तसेच संबंधित हॉस्पीटल्सनी त्यांच्याकडील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची त्वरीत यादी उपलब्ध करून द्यावी, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जी हॉस्पीटल सद्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये सूचिबध्द नाहीत, अशा हॉस्पीटल्समधील जेवढ्या संख्येचे बेड्स कोविड-19 च्या उपचारासाठी अधिगृहित करण्यात येत आहेत तेवढे बेड्‌स महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट करण्यात येतील, असे सांगितले.
सांगली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व वाढती रूग्ण संख्या पहाता खाजगी हॉस्पीटलमध्ये बेडस्‍ कोविड-19 विषाणू बाधित रूग्णांसाठी उपलब्ध करून घेणे व त्यावर देखरेख ठेवणे याकरिता समिती गठीत करण्यात आली असून सदर समिती विविध रूग्णांलयांना भेटी देवून तेथील उपलब्ध साधन सामग्री व सुविधा याबद्दल अहवाल सादर करते. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेण्यात येतो. आत्तापर्यंत जिल्ह्यातील सेवासदन हॉस्पिटल मिरज, मेहता हॉस्पिटल टिंबर एरिया, सांगली, श्वास हॉस्पिटल गारपीर रोड, सांगली, कुल्लोळी हॉस्पिटल विश्रामबाग, सांगली यांचे अधिग्रहण करण्यात आले असून या ठिकाणी डेडिकेटेड कोविड उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिगृहित करण्यात आलेल्या रूग्णांलयांमध्ये रूग्णांना आवश्यक सुविधा विना अडथळा मिळाव्या तसेच रूग्णालयातील प्रशासकीय नोंदी व लेखे तपासणी यासाठी प्रशासकीय समिती नियुक्त करण्यात येत आहे.
दरम्यान महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी डॉ. शरद घाटगे यांचे घाटगे मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल सांगली हे अधिगृहित केले असून या हॉस्पीटलमध्ये शनिवार दि. २५ जुलै पासून कोविड रूग्णांवर उपचार देण्याबाबत आदेश जारी केले आहेत.


000000

गुरुवार, २३ जुलै, २०२०


मास्क, रूमाल किंवा कापडाने नाक तोंड झाकून वावरणे बंधनकारक अन्यथा 500 रूपये दंड
                                  - जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग प्रादुर्भाव तात्काळ नियंत्रण करणे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता विविध प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरल्याने कोरोना विषाणू पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वावरताना (उदा. रस्ते, वाहने, दवाखाने, कार्यालये, बाजार इ.) तीन पदरी मास्क किंवा साधा कापडी मास्क किंवा रूमाल किंवा कापडाने नाक तोंड झाकून वावरणे बंधनकारक असलेबाबतच्या दि. 13 एप्रिल 2020 रोजी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास 500 रूपये इतका दंड आकारण्याचा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केला आहे.
हा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, कलम 34 मधील पोटकलम (m), महाराष्ट्र शासन क्र. करोना 2020.प्र.क्र.58/आरोग्य6 दि. 14 मार्च 2020 नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून जारी केला आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी पोलीस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था संबंधित विभाग प्रमुख यांनी करावी, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
00000