रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

आपत्ती काळासाठी पुढारीची महत्वाची मदत - पालकमंत्री जयंत पाटील

पुढारी रिलीफ फौंडेशनतर्फे महापालिकेस दोन यांत्रिक बोटी प्रदान सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : दैनिक पुढारी’ने पुढारी रिलीफ फौंडेशनच्यावतीने सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेला महापूर नियंत्रणासाठी देण्यात आलेल्या दोन यांत्रिक बोटी, लॉईफसेव्ह जॅकेटसह अत्यावश्यक साहत्य पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते महापौर गीता सुतार व आयुक्त नितीन कापडनीस यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, उपमहापौर आनंदा देवमने, दैनिक पुढारीचे आवृत्ती प्रमुख चिंतामणी सहस्त्रबुध्दे आदींसह पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. सामाजिक उत्तरदायित्व पार पाडण्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या पुढारी रिलीफ फौंडेशनने महापालिकेला दोन अत्याधुनिक यांत्रिक बोटी इंजिनसह, लॉफसेव्ह जॅकेट, बिओ रिंगसह दोर आदी सुमारे 10 लाखांचे साहित्य प्रदान करण्यात आले. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, नेहमीच विकासात्मक भूमिका घेणाऱ्या पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव व व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांनी ‘पुढारी रिलीफ फौंडेशनच्यावतीने अत्याधुनिक यांत्रिक बोटींसह बचावकार्यासाठी महापालिकेला दोन बोटींसह अत्याधुनिक साहित्य दिले आहे. आपत्ती काळात बचावासाठी बोटी व हे साहित्य महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ‘पुढारी’ने दिलेल्या यांत्रिक रबरी बोटी असून, त्याला असलेल्या मोटारीला 25 एचपी टू स्ट्रोक इंजिन आहे. यामुळे या बोटी अडचणीच्या व धोकादायक ठिकाणातही गतिमान पद्धतीने बचावासाठी फायदेशीर ठरणार आहेत. एका बोटीमध्ये दहाजणांची आसनक्षमता आहे. यासोबतच मोठ्यांसाठी लाईफसेफ्टी 20 जॅकेट, मुलांसाठी दहा लाईफसेफ्टी जॅकेट, 20 बीओ रिंग दोरसह आदी बचावात्मक साहित्याचा समावेश आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा