गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

जिल्ह्यात 75 पूरप्रवण गावांना आपत्ती किटचे वाटप

सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यात 104 पूरप्रवण गावे आहेत. या गावामध्ये आपत्कालीन साहित्य (आपत्ती किट) वाटप करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी घेतला होता. जिल्ह्यात मिरज तालुक्यात 20, पलूस 25, वाळवा 38 व शिराळा तालुक्यात 21 अशी एकूण 104 पूरप्रवण गावे आहेत. त्यानुसार प्राधान्याने एकूण 75 पूरप्रवण गावांना साहित्य खरेदी करण्यात आलेले असून त्याचे आज पूरप्रवण तालुक्यांना वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी दिली. प्रत्येक आपत्कालीन किटमध्ये मेगा फोन, रोप, बॅग, टॉर्च, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग असे साहित्य आहे. मिरज तालुका 17, वाळवा 31, पलूस 21 व शिराळा तालुक्यास 06 असे एकूण 75 आपत्कालीन साहित्याच्या किटचे आज वाटप करण्यात आले. यापूर्वी सर्व गावांचे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेले आहे. तसेच सांगली जिल्ह्यामध्ये एन.डी.आर.एफ. ची दोन पथके (50 जवान) 15 जुलै पासून दाखल झालेली असून आष्टा व सांगली येथे ठेवण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे नवीन चार बोटी खरेदी करण्यात आलेल्या असून पलूस तालुक्यास 2 व वाळवा तालुक्यास 2 असे वाटप करण्यात आलेले आहे. 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा