शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२०

कोविड-19 उपचारासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या रूग्णालयांचे फायर व इलेक्ट्रीक ऑडीट होणार

सांगली, दि. 21 , (जि. मा. का.) : कोविड-19 च्या उपचारासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या रूग्णालयांचे फायर व इलेक्ट्रीक ऑडीट त्वरीत करून घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महनगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी राजेंद्र गाडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा कोषागार अधिकारी सुशिलकुमार केंबळे, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोविड-19 च्या उपचारासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या रूग्णालयांचे फायर व इलेक्ट्रीक ऑडीट करून घ्यावे. तपासणीअंती नोंदविण्यात आलेली निरीक्षणे व त्या अनुषंगाने आवश्यक दुरुस्त्या करावयाच्या असल्यास त्याबाबत लेखी संबंधित रुग्णालयांना कळविण्यात यावे व संबंधितांकडून त्याबाबतची पूर्तता करून घेण्यात यावी. कोविड रूग्णालयांच्या तपासणीसाठी नेमन्यात आलेल्या टीमने कमीत कमी प्रत्येक दिवशी एका रूग्णालयाची तपासणी करावी. भरारी पथकाच्या कारवाई अंतर्गत प्राप्त झालेल्या अहवालावर जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी व जिल्हा कोषागार अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करावी. रॅपिड ॲन्टीजन टेस्ट किटची मागणी करण्याबाबत यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देश दिले. तसेच कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी आणखी खाजगी हॉस्पीटल अधिग्रहित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा