रविवार, ३१ जुलै, २०२२

शिराळा शहरातील सर्व प्रकारच्या किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या नागपंचमी सणादिवशी मद्य विक्रीसाठी पूर्ण दिवस बंद - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : शिराळा शहरात नागपंचमी सण दि. 2 ऑगस्ट 2022 रोजी साजरा होत आहे. हा सण शांततेत व सुरळीत पार पाडण्याकरीता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याकरीता मुंबई दारूबंदी कायदा 1949 मधील कलम 142 अन्वये दि. 2 ऑगस्ट 2022 रोजी एक दिवसाकरीता शिराळा शहरातील सर्व प्रकारच्या किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या (सीएल-3, एफएल-2, एफएल-3, एफएलबीआर-2, टीडी-1, फॉर्म-ई, फॉर्म-ई-2) मद्य विक्रीसाठी पूर्ण दिवस बंद राहतील. या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकाविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 26.92 टी.एम.सी. पाणीसाठा वारणा धरणातून 1817 क्युसेक्स विसर्ग सुरू

सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 26.92 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 64.99 (105.25), धोम 9.09 (13.50), कन्हेर 7.23 (10.10), वारणा 26.92 (34.40), दूधगंगा 17.26 (25.40), राधानगरी 6.12 (8.36), तुळशी 2.74 (3.47), कासारी 1.92 (2.77), पाटगांव 2.80 (3.72), धोम बलकवडी 3.39 (4.08), उरमोडी 7.15 (9.97), तारळी 4.92 (5.85), अलमट्टी 106.17 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना - निरंक, धोम - निरंक, कण्हेर - 24, वारणा 1807, दुधगंगा - निरंक, राधानगरी 1000, तुळशी - निरंक, कासारी - निरंक, पाटगांव -निरंक, धोम बलकवडी - 330, उरमोडी - निरंक, तारळी - 283 व अलमट्टी धरणातून 18 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 5.10 (45), आयर्विन पूल सांगली 7.6 (40) व अंकली पूल हरिपूर 10.1 (45.11). 00000

जिल्ह्यात वाळवा तालुक्यात 27.8 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.9 मि. मी. पावसाची नोंद झाली असून वाळवा तालुक्यात सर्वाधिक 27.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 4.7 (211.3), जत 2 (206.1), खानापूर-विटा 15.4 (248.9), वाळवा-इस्लामपूर 27.8 (302.9), तासगाव 3.5 (213.2), शिराळा 12.4 (641), आटपाडी 3.8 (164.4), कवठेमहांकाळ 1.7 (239.3), पलूस 7.3 (194.5), कडेगाव 7.7 (230.3). 00000

शनिवार, ३० जुलै, २०२२

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सांगलीच्या संकेत सरगर यांनी वेटलिफ्टींगमध्ये पुरूषांच्या ५५ किलो गटात रौप्य पदक पटकविले

सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : इंग्लंडच्या बर्मिंगहम मध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022 ) भारताला पहिले पदक सांगलीच्या संकेत महादेव सरगर यांनी वेटलिफ्टींगमध्ये पुरूषांच्या ५५ किलो गटात रौप्य पदक पटकवून मिळवून दिले. संकेत सरगर हा सांगली जिल्हा वेटलिफ्टींग संघटनेचा खेळाडू असून त्याने सन 2013-14 पासून गुरूवर्य कै. नाना सिंहासने यांच्या सांगलीतील दिग्वीजय वेटलिफ्टींग इन्स्टिट्युटमध्ये वयाच्या 13 व्या वर्षापासून वेटलिफ्टींगचे धडे घ्यावयास सुरूवात केली. नाना सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाचा पाया भक्कम झाल्यावर संकेतने सन 2017 पासून शिवछत्रपती पुरस्कार विजेते मयुर सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील धडे घेतले. त्यांनी संकेतच्या ट्रेनिंगची दिर्घकालीन योजना आखली. ट्रेनिंग, डायट, रेस्ट व इंज्युरी मॅनेंजमेंट याचा योग्य ताळमेळ घालत संकेतचा सराव सुरू होता. त्याने 2018 पासून राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेण्यास सुरूवात केली. ऑफ सिझनमध्ये दिवसातून तीन वेळाही त्याचे ट्रेनिंग असायचे. या मेहनतीमुळे 2019 ते 2020च्या दरम्यान त्याची कामगिरी उंचावली. संकेतने अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य मिळविले. जानेवारी 2020 ते मार्च 2020 दरम्यान सलग चार राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवत सुवर्णपदक मिळवून वरिष्ठ राष्ट्रीय उच्चांकही मिळविले. याची दखल घेत संकेतची भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ‘टॉप्स’ मध्ये निवड झाली. कोविड 19 मधील लॉकडाऊन काळात ट्रेनिंग मध्ये काहीसा व्यत्यय आला पण लॉकडाऊन उठल्यानंतर दिग्वीजय इन्स्टिट्युट पुन्हा सुरू झाले. साधारणपणे ऑगस्ट 2020 ला त्याच्या कमरेत जोरात इंज्युरी झाली. स्पाँडिलोलायसीसचे निदान झाले. महाराष्ट्राचे वेटलिफ्टींगचे क्रीडा मार्गदर्शक मधुरा टोळे यांनी मुंबईचे डॉ. किरण नारे स्पोर्टस फिजिओथेरेपिस्टना संपर्क करण्याचा सल्ला दिला. डॉ. किरण नारे यांचे उपचार आणि कोच मयुर सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली संकेतने दुखापतीवर मात करत जानेवारी 2021 ला संकेतचा फॉर्म परत आणला. इंडियन वेटलिफ्टींग फेडरेशनने फेब्रुवारीमध्ये त्याचे नॅशनल कॅम्प सिलेक्शनचे पत्र पाठविले. फेब्रुवारी 2022 ला सिंगापूर इंटरनॅशनलमध्ये त्याने नविन राष्ट्रकुलचे उच्चांक नोंदवत 2022 बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये आपले स्थान पक्के केले. संकेत हा हिंदकेसरी कै. मारूती माने यांच्यानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभाग घेणारा सांगलीतील दुसरा खेळाडू आहे. 1970 साली कै. मारूती माने यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. आज तब्बल 52 वर्षाने सांगलीच्या खेळाडूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपर्यंत रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. इंग्लंडच्या बर्मिंगहम या ठिकाणी चालू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये संकेत सरगर या खेळाडूने वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये सिल्वर मिडल मिळविल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली यांच्यामार्फत संकेत सरगर यांच्या आई-वडिलांचे व त्याचे कोच शिवछत्रपती पुरस्कारार्थी मयूर सिंहासने यांचा सत्कार करण्यात आला. 0000

गुरुवार, २८ जुलै, २०२२

जिल्ह्यात आटपाडी तालुक्यात 25.8 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 7.6 मि. मी. पावसाची नोंद झाली असून आटपाडी तालुक्यात सर्वाधिक 25.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 6.8 (194), जत 3.8 (184), खानापूर-विटा 12.9 (196.8), वाळवा-इस्लामपूर 2.3 (256.2), तासगाव 4.9 (170.9), शिराळा 18.2 (625.9), आटपाडी - 25.8 (146.9), कवठेमहांकाळ 8.3 (187.5), पलूस 7 (164.7), कडेगाव 3.6 (195.5). 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 26.92 टी.एम.सी. पाणीसाठा वारणा धरणातून 1885 क्युसेक्स विसर्ग सुरू

सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 26.92 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 64.77 (105.25), धोम 8.99 (13.50), कन्हेर 7.15 (10.10), वारणा 26.92 (34.40), दूधगंगा 17.14 (25.40), राधानगरी 6.16 (8.36), तुळशी 2.72 (3.47), कासारी 1.92 (2.77), पाटगांव 2.78 (3.72), धोम बलकवडी 3.42 (4.08), उरमोडी 7.06 (9.97), तारळी 4.93 (5.85), अलमट्टी 105.12 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना - निरंक, धोम - निरंक, कण्हेर - निरंक, वारणा 1885, दुधगंगा - निरंक, राधानगरी 1500, तुळशी - निरंक, कासारी 250, पाटगांव -निरंक, धोम बलकवडी - 330, उरमोडी - निरंक, तारळी - 435 व अलमट्टी धरणातून 18 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 5.11 (45), आयर्विन पूल सांगली 7 (40) व अंकली पूल हरिपूर 9.4 (45.11). 00000

जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी प्रवर्गनिहाय आरक्षण सोडत जाहीर

प्रवर्गनिहाय आरक्षण एकूण 68 सर्वसाधारण - 21 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग - 09 अनुसूचित जाती - 04 सर्वसाधारण महिला - 21 नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला - 09 अनुसूचित जाती महिला - 04 सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : जिल्हा परिषद निवडणूक विभागाचा प्रस्ताव तयार करण्याकरीता आणि आरक्षित निवडणूक विभाग निश्चितीकरीता आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत प्रक्रिया संपन्न झाली. उपजिल्हाधिकारी (महसूल) मोहिनी चव्हाण यांनी निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेलया सुचनांनुसार आरक्षण सोडतीची सविस्तर माहिती सादरीकरणाव्दारे उपस्थित विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना दिली. जिल्हा परिषदेचे एकूण 68 गट आहेत. या गटांसाठी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार चिठ्ठी पध्दतीने आरक्षण निश्चित करण्यात आले. यावेळी कुमार रितेश चित्रुट याच्याहस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यानुसार जिल्हा परिषद निवडणुक गट पुढीलप्रमाणे आरक्षित करण्यात आले. तालुकानिहाय आरक्षित निवडणूक विभागाचा क्रमांक, नाव व कंसात आरक्षणाचा प्रवर्ग पुढीलप्रमाणे. आटपाडी तालुका - (१) दिघंची (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), (२) आटपाडी (सर्वसाधारण महिला), (३) करगणी (सर्वसाधारण), (४) निंबवडे (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), (५) खरसुंडी (अनुसूचित जाती). जत तालुका - (६) जाडरबोबलाद (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), (७) उमदी (सर्वसाधारण महिला), (८) करजगी (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), (९) संख (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), (१०) माडग्याळ (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), (११) शेगाव (अनुसूचित जाती महिला), (१२) वाळेखिंडी (सर्वसाधारण), (१३) डफळापूर (सर्वसाधारण महिला), (१४) बिळूर (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), (१५) मुचंडी (सर्वसाधारण). खानापूर तालुका - (१६) नागेवाडी (सर्वसाधारण महिला), (१७) लेंगरे (सर्वसाधारण महिला), (१८) करंजे (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), (१९) भाळवणी (सर्वसाधारण महिला). कडेगाव तालुका - (२०) तडसर (सर्वसाधारण), (२१) कडेपूर (सर्वसाधारण महिला), (२२) वांगी (अनुसूचित जाती महिला), (२३) देवराष्ट्रे (सर्वसाधारण). तासगाव तालुका - (२४) मांजर्डे (सर्वसाधारण महिला), (२५) सावळज (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), (२६) चिंचणी (सर्वसाधारण), (२७) विसापूर (सर्वसाधारण महिला), (२८) येळावी (सर्वसाधारण), (२९) कवठेएकंद (सर्वसाधारण), (३०) मणेराजुरी (सर्वसाधारण). कवठेमहांकाळ तालुका - (३१) ढालगांव (सर्वसाधारण), (३२) कुची (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), (३३) देशिंग (अनुसूचित जाती महिला), (३४) रांजणी (अनुसूचित जाती). पलूस तालुका - (३५) कुंडल (सर्वसाधारण), (३६) सावंतपूर (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), (३७) दुधोंडी (सर्वसाधारण महिला), (३८) अंकलखोप (सर्वसाधारण), (३९) भिलवडी (सर्वसाधारण महिला). वाळवा तालुका - (४०) रेठरेहरणाक्ष ( सर्वसाधारण महिला), (४१) बोरगाव (अनुसूचित जाती महिला), (४२) नेर्ले (सर्वसाधारण महिला), (४३) कासेगाव (सर्वसाधारण), (४४) वाटेगाव (सर्वसाधारण), (४५) पेठ (सर्वसाधारण), (४६) वाळवा (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), (४७) बावची (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), (४८) कुरळप (सर्वसाधारण), (४९) चिकुर्डे (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), (५०) बहादूरवाडी (अनुसूचित जाती), (५१) बागणी (सर्वसाधारण). शिराळा तालुका - (५२) पणुंब्रे तर्फे वारूण (सर्वसाधारण), (५३) वाकुर्डे बु (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), (५४) कोकरूड (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), (५५) सागांव (सर्वसाधारण महिला), (५६) मांगले (सर्वसाधारण). मिरज तालुका - (५७) भोसे (सर्वसाधारण), (५८) एरंडोली (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), (५९) आरग (सर्वसाधारण), (६०) मालगांव (सर्वसाधारण महिला), (६१) कवलापूर (सर्वसाधारण महिला), (६२) बुधगांव (अनुसूचित जाती), (६३) नांद्रे (सर्वसाधारण महिला), (६४) कसबे डिग्रज (सर्वसाधारण महिला), (६५) कवठेपिरान (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), (६६) हरिपूर (सर्वसाधारण महिला), (६७) म्हैसाळ (एस) (सर्वसाधारण महिला), (६८) बेडग (सर्वसाधारण महिला). 00000

नागपंचमी सणाच्या अनुषंगाने सुरक्षेच्या दृष्टीने पेठनाका ते शिराळा पर्यंतच्या वाहतूक मार्गात बदल

सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : शिराळा येथील नागपंचमी यात्रा दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी साजरी होणार आहे. या दिवशी शिराळा येथे नागपंचमी यात्रा मोठ्या प्रमाणात भरविली जाते. नागपंचमी दिवशी शिराळा येथील वाहतूक सुरळीत रहावी तसेच गर्दीत वाहन घूसून नागरीकांच्या जीवीतास धोका पोहचू नये याकरीता सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम चे कलम 34 प्रमाणे प्रदान केलेल्या अधिकारान्वये पेठनाका ते शिराळा पर्यंतच्या वाहतूक मार्गात दि. 2 ऑगस्ट 2022 रोजीच्या 01.00 वाजल्यापासून ते 24.00 वाजेपर्यंत खालीलप्रमाणे बदल केला आहे. पेठनाका ते शिराळा पर्यंतच्या वाहतूक मार्गात केलेला बदल पुढीलप्रमाणे. राष्ट्रीय महामार्ग क्र.४ पेठनाका येथून सर्व वाहने एकेरी मार्गाने शिराळ्याकडे जातील. शिराळ्याकडून राष्ट्रीय महामार्ग ४ कडे जाणारी सर्व वाहने शिराळा बायपासमार्गे कापरी-कार्वे-ढगेवाडी फाटा-ऐतवडे बुद्रुक फाटा-लाडेगाव-वशी-येडेनिपाणी फाटा या मार्गाने महामार्ग क्र. ४ कडे जातील. शिराळा बायपास येथून पेठनाक्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यास महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 131 प्रमाणे शिक्षा किंवा दंड करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी स्पष्ट केले आहे. 00000

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ऑफलाईन पध्दतीने थेट कर्ज योजना, 20 टक्के बीज भांडवल योजना आणि ऑनलाईन पध्दतीने व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, महिला स्वयंसिध्दी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक हणमंत बिरादार यांनी केले आहे. या सर्व योजनांसाठी आर्थिक वर्ष 2022-23 साठी उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. ऑफलाईन योजनांचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला व आधार कार्ड सोबत घेवून संबंधितांनी महामंडळाचे जिल्हा कार्यालय महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, संभाजीनगर, सांगली येथे संपर्क साधावा. ऑनलाईन योजनांचा लाभ घेण्यासाठी www.msobcfdc.org या वेबसाईटवर संबंधित योजनांचा पर्याय निवडून अर्ज पोर्टलवर ऑनलाईन दाखल करावेत, असे आवाहन श्री. बिरादार यांनी केले आहे. 00000

मिरज सिव्हीलमध्ये घरापासून दोन वर्षे दूर असलेल्या अनोळखी रूग्णास निशुल्क उपचार देवून स्वगृही पाठविले

सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज रूग्णालयात दि. 16 मे 2022 रोजी मध्यरात्री 70 वर्षे वयाचा अनोळखी पुरूष (सदाशिव गरप्पा कांबळे) जखमी अवस्थेत कर्नाटक राज्यातील कागवाड येथून 108 या रूग्णवाहिकेमार्फत अस्थीव्यंगोपचार कक्षात उपचाराकरीता दाखल करण्यात आला होता. या रूग्णास रूग्णालयाच्या माध्यमातून निशुल्क सेवा देवून दोन महिन्याच्या उपचारानंतर दि. 9 जुलै 2022 रोजी स्वगृही पाठविण्यात आले व तब्बल दोन वर्षापासून ताटसातूट झालेल्या बहीण भावांना मिळविण्याचे काम रूग्णालयाने केले. याकामी अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशीर मिरगुंडे, उप वैद्यकीय अधिक्षक डॉ. रूपेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. रूग्णास उजव्या पायास क्रश इंज्युरी झालेली होती. संबंधित विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया केली. कक्षाच्या परिचालकांनी, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी रूग्णाची सुश्रुषा केली. दरम्यानच्या काळात समाजसेवा अधिक्षकांनी वेळोवेळी रूग्णाची भेट घेवून मानसीक आधार दिला व नातेवाईक शोधण्याचा प्रयत्न केला. समाजसेवा अधिक्षकांच्या भेटीतून रूग्ण हळू हळू मोकळेपणाने बोलू लागला. प्रारंभीक मिळालेल्या माहितीनुसार तो त्याच्या कुटूंबापासून मागील दोन वर्षापासून अलिप्त असल्याचे समजले. तसेच कागवाड परिसरातील मठात राहून भटकंती (भिक्षा) करून चरितार्थ भागवत होता. रूग्णाचे नातेवाईक (बहीण) म्हैशाळ येथे राहत असल्याचे समजले. तसेच रूग्ण दाखल असलेल्या शेजारील खाटावरील रूग्णांच्या नातेवाईकांच्या संपर्कातून सदरच्या अनोळखी रूग्णाच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचणे सोयीचे झाले. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज तर्फे देण्यात आली. 00000

बुधवार, २७ जुलै, २०२२

जिल्ह्यातील वारणा धरणात 26.89 टी.एम.सी. पाणीसाठा वारणा धरणातून 1888 क्युसेक्स विसर्ग सुरू

सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 26.89 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 64.47 (105.25), धोम 8.94 (13.50), कन्हेर 7 (10.10), वारणा 26.89 (34.40), दूधगंगा 17.06 (25.40), राधानगरी 6.23 (8.36), तुळशी 2.70 (3.47), कासारी 1.94 (2.77), पाटगांव 2.77 (3.72), धोम बलकवडी 3.42 (4.08), उरमोडी 6.19 (9.97), तारळी 4.93 (5.85), अलमट्टी 104.37 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना - निरंक, धोम - निरंक, कण्हेर - 24, वारणा 1888, दुधगंगा 700, राधानगरी 1500, तुळशी - निरंक, कासारी 400, पाटगांव -निरंक, धोम बलकवडी - 329, उरमोडी - निरंक, तारळी - 435 व अलमट्टी धरणातून 18 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 6.3 (45), आयर्विन पूल सांगली 7.9 (40) व अंकली पूल हरिपूर 10.4 (45.11). 00000

जिल्ह्यात आटपाडी तालुक्यात 12.4 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5.3 मि. मी. पावसाची नोंद झाली असून आटपाडी तालुक्यात सर्वाधिक 12.4 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 6.3 (187.2), जत 1.9 (180.2), खानापूर-विटा 6.4 (183.9), वाळवा-इस्लामपूर 11 (253.9), तासगाव 3.3 (166), शिराळा 1.1 (607.7), आटपाडी - 12.4 (121.1), कवठेमहांकाळ 2.7 (179.2), पलूस 2.1 (157.7), कडेगाव 2.9 (191.9). 00000

दंड सवलत अभय योजनेचा लाभ घ्या - मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव

शासकीय सुट्टीच्या दिवशी दि. ३० व ३१ जुलै रोजी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय सुरू राहणार सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : महाराष्ट्र शासनाने ज्या दस्तऐवजांवर मुद्रांक शुल्क वसुली प्रलंबित आहे, त्या प्रकरणांमध्ये मुद्रांक शुल्क रकमेवर देय असणाऱ्या दंडाबाबत "दंड सवलत अभय योजना सन 2022" जनहितार्थ जाहीर केलेली आहे. ही योजना दि. 01 एप्रिल 2022 ते 31 जुलै 2022 आणि दि. 01 ऑगस्ट 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 अशा एकूण दोन टप्प्यामध्ये लागू केलेली आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सह जिल्हा निबंधक वर्ग-1 व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 व मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव यांनी केले आहे. या अनुषंगाने 90 टक्के दंड सवलतीचा या योजनेचा पहिला टप्पा दि. 31 जुलै 2022 रोजी संपत आहे. तथापि शनिवार दि. 30 जुलै 2022 आणि रविवार दि. 31 जुलै 2022 रोजी शासकिय सुट्टी असल्याने तसेच रविवार दि. 31 जुलै 2022 रोजी बँका बंद असल्याने पक्षकारांना दंडाची रक्कम शासन जमा करण्याबाबत अडचणी येवू शकतात. यास्तव नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दि. 26 जुलै 2022 रोजीच्या पत्रान्वये आदेशित केल्याप्रमाणे दंड सवलत अभय योजना सन 2022 च्या 90 टक्के सवलतीचा पहिल्या टप्प्याचा लाभ जास्तीत जास्त जनतेला होण्यासाठी शनिवार दि. 30 जुलै 2022 आणि रविवार दि. 31 जुलै 2022 रोजी सह जिल्हा निबंधक वर्ग-1 व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय राजवाडा आवार सांगली हे कार्यालय नियमित वेळेत सुरू राहणार असून देय दंड रकमेची चलने ऑनलाईन पध्दतीने शासन जमा करण्याची सुविधा राजवाडा आवार सांगली येथे करण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सह जिल्हा निबंधक वर्ग-1 व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय राजवाडा कंपौंड सांगली, दुरध्वनी क्रमांक-0233-2376136, ई-मेल आय डी-jdrsangli01@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहनही मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव यांनी केले आहे. ०००००

मंगळवार, २६ जुलै, २०२२

जिल्ह्यातील वारणा धरणात 26.85 टी.एम.सी. पाणीसाठा

कोयना धरणातून 2100 तर वारणा धरणातून 1893 क्युसेक्स विसर्ग सुरू सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 26.85 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 64.25 (105.25), धोम 8.85 (13.50), कन्हेर 6.96 (10.10), वारणा 26.85 (34.40), दूधगंगा 17 (25.40), राधानगरी 6.27 (8.36), तुळशी 2.69 (3.47), कासारी 1.94 (2.77), पाटगांव 2.74 (3.72), धोम बलकवडी 3.43 (4.08), उरमोडी 6.93 (9.97), तारळी 5.58 (5.85), अलमट्टी 103.62 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना -2100, धोम - निरंक, कण्हेर - निरंक, वारणा 1893, दुधगंगा 700, राधानगरी 1500, तुळशी - निरंक, कासारी 400, पाटगांव -निरंक, धोम बलकवडी - निरंक, उरमोडी - निरंक, तारळी - 435 व अलमट्टी धरणातून 18 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 7.1 (45), आयर्विन पूल सांगली 8 (40) व अंकली पूल हरिपूर 10.10 (45.11). 00000

जिल्ह्यात जत तालुक्यात 23.8 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5.6 मि. मी. पावसाची नोंद झाली असून जत तालुक्यात सर्वाधिक 23.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 3.4 (180.8), जत 23.8 (178.3), खानापूर-विटा 3.1 (177.5), वाळवा-इस्लामपूर 1 (242.9), तासगाव 5 (162.7), शिराळा 0.7 (606.6), आटपाडी - 2.7 (108.7), कवठेमहांकाळ 7.4 (176.5), पलूस 3.6 (155.6), कडेगाव 0.5 (189). 00000

आपली वसुंधरा वाचविण्यासाठी प्रत्येकाने सहभाग घेवून प्रदुषण मुक्तीसाठी खारीचा वाटा उचलावा -प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अजेय राजंदेकर

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : प्रदुषणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास ही जगातील गंभीर समस्या आहे. जगामधील अनेक देश प्रदुषणामुळे ओसाड होत आहेत. त्यामुळे प्रदुषणावर नियंत्रण आणून येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना स्वच्छ पर्यावरण प्रदुषण मुक्त पर्यावरण उपलब्ध करुन देणे आता ही सर्वात मोठी काळाची गरज आहे. आपली वसुंधरा वाचविण्यासाठी प्रत्येकाने यामध्ये सहभाग घेवून प्रदुषण मुक्तीसाठीचा खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अजेय राजंदेकर यांनी केले. जिल्हा न्यायालय विजयनगर, सांगली येथील हॉलमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदुषण मंडळ व सांगली बार असोसिएशन सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणातील प्रदुषणाचा मानवी हक्कावर होणारा ऱ्हास रोखण्यासाठी व कमी करण्यासाठी कार्यशाळा, चर्चासत्र व प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अजेय राजंदेकर यांच्याहस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक दिक्षीत गेडाम, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख सांगली बार असोसिएशनचे प्रशांत जाधव, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी नवनाथ अवताडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव प्रविण नरडेले, न्यायाधीश, वकील, न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अजेय राजंदेकर पुढे म्हणाले, शासनाने प्रत्येक क्षेत्राच्या नियंत्रणासाठी विविध व्यवस्था निर्माण केल्या आहेत. त्या-त्या यंत्रणा त्यांची कामे करीत आहेत. त्यामध्ये प्रदुषण नियंत्रणासाठीही काम होत आहे. पण या यंत्रणाखेरीज समाजातील प्रत्येक नागरीकांचा आपले कर्त्यव्य समजून प्रदुषण कमी करण्यासाठी सहभाग आवश्यक आहे. पर्यावरणातील प्रत्येक गोष्टीचा अतिवापर हा सुध्दा प्रदुषणाचा भाग आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा बचत करण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे. प्रामुख्याने प्रत्येकाने पाणी, वीज, मानवी जिवनासाठी आवश्यक उपकरणे याचा वापर मर्यादीत ठेवून प्रदुषण कमी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यावेळी म्हणाले, पर्यावरणाचे होणारे प्रदुषण येणाऱ्या काळासाठी फार मोठी समस्या ठरत आहे. पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना शुध्द पर्यावरण देणे आपली जबाबदारी आहे. प्रगती करणे ही आवश्यक बाब असली तरी पर्यावरणाचा समतोल राखून ती प्रगती होणे आवश्यक आहे. प्रत्येक सुजान नागरिकांनी नियमांचे, कायद्याचे पालन करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. वातावरणीय बदल झपाट्याने होत आहेत. पर्यावरणाच्या होणाऱ्याक ऱ्हासामुळे आजच्या परिस्थितीत महापूर, चक्री वादळे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या टाळावयाच्या असतील तर प्रदुषण कमी करण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. महानगरपालिका आयुक्त नितीन कापडनिस यावेळी म्हणाले, जगातील सर्वात प्रदुषित शहर म्हणून दिल्लीचा समावेश आहे. ही बाब येणाऱ्या पिढ्यासाठी घातक असून वेळेतच सावधान होणे ही काळाची गरज आहे. प्रदुषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून अनेक नवनविन समस्या उद्भवत आहेत. प्रदुषणामध्ये प्रामुख्याने जल, वायू, ध्वनी, माती यांचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे. हे पर्यावरणासाठी बाधक आहे. यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने पर्यावरण रक्षणासाठी पुढे येणे तसेच प्रशासनाला सहकार्य करणे हे महत्वाचे आहे. शासनस्तरावर प्रदुषण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना राबविण्यात येत असून यामध्ये माझी वसुंधरा, स्वच्छ सर्वेक्षण अभियान याचा समावेश आहे. सांगली-मिरज,कुपवाड शहर महापालिकेच्यावतीनेही प्रदुषण रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून माझी वसुंधरा या अभियानात अतिउकृष्ठ काम करुन राज्यात दुसरा क्रमांक पटकविला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी व्दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. फारुख कोतवाल यांनी केले. आभार जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव प्रविण नरडेले यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभय मेहंदळे यांनी केले. यावेळी पर्यावरणासंबंधीचे कायदे या विषयावर ॲड. ओंकार वांगीकर, पर्यावरण संबंधीच्या कायद्याची व राष्ट्रीय हरीत लवाद यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यामध्ये प्रदूषण नियंत्रण बोर्डाची भूमिका या विषयावर ॲड. दत्तात्रय देवळे, प्रदुषण नियंत्रण बोर्डाची माहिती व त्यांची कार्यपध्दती या विषयावर नवनाथ अवताडे यांचे मार्गदर्शन माहितीचे चर्चासत्र आयोजीत करण्यात आले होते. 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 26.77 टी.एम.सी. पाणीसाठा

कोयना धरणातून 2100 तर वारणा धरणातून 1903 क्युसेक्स विसर्ग सुरू सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 26.77 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 63.96 (105.25), धोम 8.74 (13.50), कन्हेर 6.89 (10.10), वारणा 26.77 (34.40), दूधगंगा 16.90 (25.40), राधानगरी 6.27 (8.36), तुळशी 2.67 (3.47), कासारी 1.96 (2.77), पाटगांव 2.73 (3.72), धोम बलकवडी 3.46 (4.08), उरमोडी 6.92 (9.97), तारळी 4.94 (5.85), अलमट्टी 102.26 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना -2100, धोम - निरंक, कण्हेर - निरंक, वारणा 1903, दुधगंगा 700, राधानगरी 1500, तुळशी - निरंक, कासारी 500, पाटगांव -निरंक, धोम बलकवडी - 748, उरमोडी - 200, तारळी - 609 व अलमट्टी धरणातून 6 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 7.4 (45), आयर्विन पूल सांगली 8.8 (40) व अंकली पूल हरिपूर 11.4 (45.11). 00000

जिल्ह्यात जत तालुक्यात 3 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.3 मि. मी. पावसाची नोंद झाली असून जत तालुक्यात सर्वाधिक 3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 1.5 (177.5), जत 3 (154.5), खानापूर-विटा 0.3 (174.4), वाळवा-इस्लामपूर 0.9 (241.9), तासगाव 1.6 (157.7), शिराळा 1.0 (605.9), आटपाडी -निरंक (106), कवठेमहांकाळ 0.6 (169.1), पलूस 1.4 (152), कडेगाव 1.5 (188.5). 00000

शनिवार, १६ जुलै, २०२२

जिल्ह्यातील वारणा धरणात 23.77 टी.एम.सी. पाणीसाठा

कोयना धरणातून 2100 तर वारणा धरणातून 1761 क्युसेक्स विसर्ग सुरू सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 23.77 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 52.15 (105.25), धोम 7.28 (13.50), कन्हेर 5.15 (10.10), वारणा 23.77 (34.40), दूधगंगा 14.63 (25.40), राधानगरी 5.65 (8.36), तुळशी 2.28 (3.47), कासारी 1.97 (2.77), पाटगांव 2.38 (3.72), धोम बलकवडी 2.82 (4.08), उरमोडी 6.51 (9.97), तारळी 4.31 (5.85), अलमट्टी 87.99 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना -2100, धोम - निरंक, कण्हेर - निरंक, वारणा 1761, दुधगंगा 1100, राधानगरी 1400, तुळशी - निरंक, कासारी 800, पाटगांव -निरंक, धोम बलकवडी - निरंक, उरमोडी - 881, तारळी - निरंक व अलमट्टी धरणातून 1 लाख 25 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 12.1 (45), आयर्विन पूल सांगली 18.10 (40) व अंकली पूल हरिपूर 24.7 (45.11). 00000

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 22.4 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.7 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 22.4 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 5.7 (148.1), जत 0.7 (127.8), खानापूर-विटा 6.6 (146.6), वाळवा-इस्लामपूर 8.6 (198.2), तासगाव 5.0 (132.5), शिराळा 22.4 (494.2), आटपाडी 0.6 (92.6), कवठेमहांकाळ 3.9 (128.8), पलूस 3.0 (119.4), कडेगाव 8.9 (158). 00000

बुधवार, १३ जुलै, २०२२

कोविड-१९ आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्यसाठी विहीत मुदतीत अर्ज करणे आवश्यक - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : कोविड-१९ या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50 हजार रूपये इतके सानुग्रह सहाय्य देण्याची योजना दिनांक 1 डिसेंबर 2019 पासून ऑनलाईन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. शासनाच्या दि. 11 एप्रिल 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार कोविड-19 आजारामुळे दिनांक 20 मार्च 2022 पूर्वी मृत्यू झालेला असल्यास दिनांक 24 मार्च 2022 पासून 60 दिवसाच्या आत म्हणजेच दिनांक 24 मे 2022 पर्यंत व दि. 20 मार्च 2022 पासून पुढे मृत्यू झाल्यास मृत्यूच्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत सानुग्रह सहाय्य योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. मुदतीच्या नंतरचे अर्ज केवळ गाऱ्हणे निवारण समिती (GRC) मार्फत करता येतील. या योजनेकरीता ज्या अर्जदारांनी सानुग्रह सहाय्यसाठी चुकीचा दावा दाखल केलेला आहे त्यांच्याविरुध्द जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 52 प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. 00000

मंगळवार, १२ जुलै, २०२२

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 34.0 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.8 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 34.0 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 8.0 (129.2), जत 7.0 (117.8), खानापूर-विटा 4.7 (123.1), वाळवा-इस्लामपूर 18.3 (165.8), तासगाव 9.2 (113.3), शिराळा 34.0 (410.9), आटपाडी 2.0 (83.0), कवठेमहांकाळ 6.9 (113.5), पलूस 12.8 (100.7), कडेगाव 7.5 (124.6). 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 20.53 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 20.53 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 38.49 (105.25), धोम 5.98 (13.50), कन्हेर 3.71 (10.10), वारणा 20.53 (34.40), दूधगंगा 12.31 (25.40), राधानगरी 4.84 (8.36), तुळशी 1.98 (3.47), कासारी 1.88 (2.77), पाटगांव 2.12 (3.72), धोम बलकवडी 2.10 (4.08), उरमोडी 5.39 (9.97), तारळी 3.39 (5.85), अलमट्टी 88.50 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना -निरंक, धोम - निरंक, कण्हेर - निरंक, वारणा 829, दुधगंगा 700, राधानगरी 1350, तुळशी - निरंक, कासारी 250, पाटगांव -निरंक, धोम बलकवडी - निरंक, उरमोडी - निरंक, तारळी - निरंक व अलमट्टी धरणातून 100000 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 11.5 (45), आयर्विन पूल सांगली 18.0 (40) व अंकली पूल हरिपूर 23.3 (45.11). 00000

औद्योगिक वसाहतीमध्ये ग्रीन स्पेससाठी राखीव भूखंड वृक्षारोपणासाठी उपलब्ध करून द्या वापरात नसलेले मोकळे भूखंड ताब्यात घेवून मागणीनुसार उपलब्ध करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण कमी व्हावे यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करून औद्योगिक वसाहती हिरव्यागार करण्यासाठी उद्योग कार्यालयाने ग्रीन स्पेससाठी राखीव भूखंड तातडीने उपलब्ध करून द्यावेत. त्याचबरोबर वृक्षारोपण केलेल्या झाडांचे जतन करण्यासाठी पाण्याची उपलब्धतता करून द्यावी. या वृक्षारोपण मोहिमेत औद्योगिक संघटनांनी सहभाग घ्यावा. तसेच उद्योगासाठी देण्यात आलेले भूखंड जर वापरात नसतील किंवा त्याच्यावर कोणत्याही कारखान्याची उभारणी केली नसेल असे मोकळे भूखंड कोणते आहेत याचे सर्व्हेक्षण करून ते ताब्यात घ्यावेत व मागणीनुसार ते उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उद्योग मित्र सभा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, व्यवस्थापक एन. एम. खांडेकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाच उप प्रादेशिक अधिकारी एन. एस. अवताडे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सु. आ. गांधीले, विविध औद्योगिक संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी आदि उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये औद्योगिक क्षेत्राची वाढ होत असून औद्योगिक क्षेत्र वसविण्यासाठी उद्योजकांकडून जागेची मागणी होत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी उद्योग विभागाने जिल्ह्यामध्ये नविन औद्योगिक वसाहती उभारण्यासाठी जागेची पाहणी करावी व स्थळ निश्चिती करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करावा, असे आदेश देवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कुपवाड मिरज औद्योगिक वसाहतीत एमएसईबी चे सबस्टेशन उभारण्यासाठी जागेची उपलब्धता व्हावी यासाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर सीईटिपी प्लँट तात्काळ सुरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही व्हावी. औद्योगिक क्षेत्रांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी प्राधान्याने काम करावे. औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्ते, आवश्यक असणाऱ्या ठिकाणी स्पीड ब्रेकर तातडीने तयार करावेत. ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमणे वाढली आहेत अशा ठिकाणची टपऱ्या, खोकी काढावी. कामगारांसाठी ईएसआयसी रूग्णालयासाठी भूखंड देण्याबाबत शासनास प्रस्ताव तयार करावा. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रात पाण्याची पाईपलाईन, रस्त्यांचे पॅच वर्क तातडीने करण्यात यावेत. माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा. मिरज एमआयडीसी येथे ट्रक टर्मिनस सुरू करण्याबाबतही तपासणी करावी. त्याचप्रमाणे देशिंग औद्योगिक कार्यक्षेत्रात विद्युत पुरवठा नियमित करण्याबाबत एमएसईबी ने तातडीची बैठक आयोजित करून संबंधित उद्योग क्षेत्रातील उद्योजकांचे प्रश्न जाणून घ्यावेत व त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करावेत. 00000

सोमवार, ११ जुलै, २०२२

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 50.6 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 14.1 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 50.6 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 8.4 (121.2), जत 3.1 (110.8), खानापूर-विटा 8.6 (118.4), वाळवा-इस्लामपूर 22.6 (147.5), तासगाव 7.5 (104.1), शिराळा 50.6 (376.9), आटपाडी 2.5 (81.0), कवठेमहांकाळ 5.2 (106.6), पलूस 10.9 (87.9), कडेगाव 16.3 (117.1). 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 18.86 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 18.86 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 35.08 (105.25), धोम 5.63 (13.50), कन्हेर 3.41 (10.10), वारणा 18.86 (34.40), दूधगंगा 11.64 (25.40), राधानगरी 4.60 (8.36), तुळशी 1.87 (3.47), कासारी 1.84 (2.77), पाटगांव 2.04 (3.72), धोम बलकवडी 1.85 (4.08), उरमोडी 5.13 (9.97), तारळी 3.13 (5.85), अलमट्टी 87.99 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना -निरंक, धोम - निरंक, कण्हेर - निरंक, वारणा 807, दुधगंगा 700, राधानगरी 1350, तुळशी - निरंक, कासारी 250, पाटगांव -निरंक, धोम बलकवडी - निरंक, उरमोडी - निरंक, तारळी - निरंक व अलमट्टी धरणातून 56936 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 12.2 (45), आयर्विन पूल सांगली 17.6 (40) व अंकली पूल हरिपूर 21.9 (45.11). 00000

रविवार, १० जुलै, २०२२

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 38.9 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 8.8 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 38.9 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 3.0 (112.8), जत 1.3 (107.7), खानापूर-विटा 8.4 (109.8), वाळवा-इस्लामपूर 12.0 (124.9), तासगाव 4.8 (96.6), शिराळा 38.9 (326.3), आटपाडी 0.9 (78.5), कवठेमहांकाळ 2.8 (101.4), पलूस 5.5 (77.0), कडेगाव 12.3 (100.8). 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 17.60 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 17.60 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 31.32 (105.25), धोम 5.19 (13.50), कन्हेर 3.08 (10.10), वारणा 17.60 (34.40), दूधगंगा 11.01 (25.40), राधानगरी 4.40 (8.36), तुळशी 1.78 (3.47), कासारी 1.69 (2.77), पाटगांव 1.97 (3.72), धोम बलकवडी 1.66 (4.08), उरमोडी 4.83 (9.97), तारळी 2.84 (5.85), अलमट्टी 83.85 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना -निरंक, धोम - निरंक, कण्हेर - निरंक, वारणा 765, दुधगंगा 650, राधानगरी 1350, तुळशी - निरंक, कासारी 250, पाटगांव - 250, धोम बलकवडी - निरंक, उरमोडी - निरंक, तारळी - निरंक व अलमट्टी धरणातून 2976 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 16.7 (45), आयर्विन पूल सांगली 12 (40) व अंकली पूल हरिपूर 17.5 (45.11). 00000

शनिवार, ९ जुलै, २०२२

वारकऱ्यांच्या वाहनांना पथकरात सवलतीसाठी प्रवेशपत्र देण्याचे कामकाज सुरू

सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : आषाढी एकादशी 2022 च्या निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना पथकरात सवलत देण्याबाबतचे प्रवेशपत्र देण्याचे कामकाज उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली या कार्यालयात सुरू आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली कार्यालयातर्फे देण्यात आली. 00000

शुक्रवार, ८ जुलै, २०२२

मरनाथ येथे भाविक अडकले असल्यास नातेवाईकांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अ सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : काश्मीर मधील अमरनाथ येथे शुक्रवारी मोठी ढग फुटी झाली असून काही भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी काश्मीर येथे एन.डी.आर.एफ 01123438252/011-23438253, काश्मीर विभाग 0194-2496240 हे हेल्पलाईन स्थापन करण्यात आलेले आहेत. तसेच सांगली जिल्ह्यातील भाविक अमरनाथ येथील ढगफुटी दुर्घटनेत अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या 0233-2600500 व टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 00000

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 26.4 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.3 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 26.4 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 9.4 (109.8), जत 9.2 (106.4), खानापूर-विटा 8.5 (101.4), वाळवा-इस्लामपूर 11.9 (112.9), तासगाव 9.9 (91.8), शिराळा 26.4 (287.4), आटपाडी 7 (77.6), कवठेमहांकाळ 13 (98.6), पलूस 8.7 (71.5), कडेगाव 7.7 (88.5). 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 15.44 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 9, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 15.44 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 25.23 (105.25), धोम 4.55 (13.50), कन्हेर 2.69 (10.10), वारणा 15.44 (34.40), दूधगंगा 9.74 (25.40), राधानगरी 3.92 (8.36), तुळशी 1.64 (3.47), कासारी 1.54 (2.77), पाटगांव 1.79 (3.72), धोम बलकवडी 1.29 (4.08), उरमोडी 4.45 (9.97), तारळी 2.44 (5.85), अलमट्टी 70.58 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना -निरंक, धोम - निरंक, कण्हेर - निरंक, वारणा 714, दुधगंगा 700, राधानगरी 1300, तुळशी - निरंक, कासारी 250, पाटगांव - निरंक, धोम बलकवडी - निरंक, उरमोडी - निरंक, तारळी - निरंक व अलमट्टी धरणातून – निरंक, क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 15.10 (45), आयर्विन पूल सांगली 8 (40) व अंकली पूल हरिपूर 11.9 (45.11). 00000

जिल्ह्यातील इस्लामपूर, विटा, आष्टा, तासगाव व पलूस नगररिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम आज दि. 8 जुलै 2022 रोजी जाहीर केला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर व विटा या ब वर्ग नगरपरिषदा तसेच आष्टा, तासगाव व पलूस या क वर्ग नगरपरिषदांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी मतदान 18 ऑगस्ट 2022 रोजी तर मतमोजणी 19 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू झाली असूत ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. आचारसंहिता सार्वत्रिक निवडणुकांकरिता नगर परिषदा/नगर पंचायतींच्या संपूर्ण क्षेत्रात लागू राहील. सार्वत्रिक निवडणूक असलेल्या नगर परिषदा/नगर पंचायतींच्या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती / घोषणा मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा इतर पदाधिकाऱ्यांना इतरत्र सुध्दा करता येणार नाही. निवडणुकीसाठीच्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. राज्यातील पर्जन्यमान कमी असलेल्या 17 जिल्ह्यांमधील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक सदस्य पदांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम-2022 पुढीलप्रमाणे आहे. अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिध्द करण्यात आल्याचा दिनांक - 5 जुलै 2022 (मंगळवार). जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख - 20 जुलै 2022 (बुधवार). नामनिर्देशनपत्र राज्य निवणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरीता उपलब्ध असण्याचा कालावधी - 22 जुलै 2022 (शुक्रवार) सकाळी 11 वाजल्यापासून ते 28 जुलै 2022 (गुरूवार) दुपारी 2 वाजेपर्यंत. वरील नामनिर्देशनपत्रे स्विकारण्याचा कालावधी - 22 जुलै 2022 (शुक्रवार) ते 28 जुलै 2022 (गुरूवार) सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत. दि. 23 जुलै 2022 शनिवार, दि. 24 जुलै 2022 रविवार या सुट्टींच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक - 29 जुलै 2022 (शुक्रवार) सकाळी 11 वाजल्यापासून. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा दिनांक अपील नसेल तेथे - 4 ऑगस्ट 2022 (गुरूवार) दुपारी 3 वाजेपर्यंत. अपील असल्यास (i) वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत जिल्हा न्यायाधिशाकडे अपिल करता येईल. (ii) निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. - अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी. मात्र दिनांक 8 ऑगस्ट 2022 (सोमवार) पर्यंत. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक - उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक - 18 ऑगस्ट 2022 (गुरूवार) सकाळी 7.30 पासून ते सायंकाळी 5.30 पर्यंत. मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक - 19 ऑगस्ट 2022 (शुक्रवार) सकाळी 10 वाजल्यापासून. महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिध्द करणे - कलम 19 मधील तरतुदीनुसार. 00000

ईट राईट इंडीया अंतर्गत सांगली जिल्ह्यातील 27 हॉटेलना स्वच्छतेचे मानांकन प्राप्त

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : ईट राईट इंडीया अंतर्गत सांगली जिल्ह्यातील 27 हॉटेलना स्वच्छतेचे मानांकन प्राप्त झाले आहे. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांनी या 27 हॉटेल्सना "हायजिन रेटींग" चे प्रमाणपत्र जारी केले आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी दिली. हायजिन रेटींग प्रमाणपत्र देतेवेळी थर्ड पार्टी ऑडीट करून मानांकन दिले जाते. मानांकनामुळे हॉटेलचा दर्जा इतर हॉटेलपेक्षा उंचावला आहे. अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयाने ईट राईट इंडीया अंतर्गत 6 कैम्पसना FSSAI मानांकन मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केले होते. या सर्व कॅम्पसना ईट राईट इंडीया चे मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामध्ये तासगाव तालुक्यातील तुरची पोलिस ट्रेनिंग सेंटर, तुरची, पलूस तालुक्यातील फॉरेस्ट अॅकेडमी कुंडल व चितळे डेअरी, भिलवडी, भारती विद्यापीठ सांगली, जिल्हा परिषद कॅन्टीन सांगली, सिव्हील हॉस्पिटल सांगली यांचा समावेश आहे. भोग अंतर्गत जत तालुक्यातील गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवी देवस्थान, देवीस ईट राईट इंडीया चे मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच स्वच्छ व ताजे भाजीपाला मार्केट अंतर्गत मिरज व सांगली येथील महानगरपालिके अंतर्गत येणारे मिरज लक्ष्मी मार्केट भाजी मंडई व जुनी भाजी मंडई, पेठ भाग, सांगली यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. जुनी भाजी मंडई, पेठ भाग, सांगली व मिरज लक्ष्मी मार्केट भाजी मंडई यांना स्वच्छ व ताजे भाजीपाला मार्केट असे मानांकन मिळाले आहे. रस्त्यावर खाद्यपदार्थ विकी करणाऱ्या स्वच्छ खाऊ गल्ली अंतर्गत मिरज लक्ष्मी मार्केट व संभा भेळ कॉर्नर, सांगली यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यापैकी स्वच्छ रोडवर अन्न पदार्थ विक्री करण्याचे मानांकन मिरज लक्ष्मी मार्केटला प्राप्त झाले आहे. दुध व दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादन व प्रक्रिया करणाऱ्या डेअरीचे थर्ड पार्टी कडून ऑडीट करण्यात आले असुन मानांकनासाठी त्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामध्ये रामविश्वास डेअरी, सांगलीवाडी, थोटे डेअरी, आष्टा, पाटील डेअरी, भिलवडी, श्रीमंत बाबासाहेब देशमुख मिल्क प्रॉडक्ट, आटपाडी यांचा समावेश आहे. त्यामुळे या डेअरीचा दर्जा इतर डेअरीपेक्षा उंचावणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन सांगली कार्यालयातर्फे प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

जिल्हा न्यायालयात संभाव्य पूर आपत्ती ग्रस्तांकरीता मदत केंद्र कार्यान्वीत

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यामध्ये संभाव्य पूरग्रस्त लोकांना सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, विजयनगर, सांगली येथे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. गरजू लोकांनी मदत केंद्रात कार्यान्वीत करण्यात आलेल्या ०२३३-२६००९२८ या दूरध्वनी क्रमांकावर तसेच मोबाईल क्रं ८५९१९०३६१० वर संपर्क करुन मदत केंद्राव्दारे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली चे अध्यक्ष अजेय राजंदेकर तसेच सचिव प्रविण नरडेले यांनी केले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगलीमार्फत सुरू करण्यात आलेल्या या मदत केंद्रामध्ये कायदेविषयक माहिती व सल्ला दिला जाणार आहे. पुरामुळे होणारे नुकसान, मौल्यवान दस्तादेवज पुनःबांधणी, विम्यासंबंधीचे दावे, कायदेशीर हक्क, वैद्यकिय, आरोग्य विषयक मार्गदर्शन व नुकसान पोहोचलेल्या पिडीतांचे समुपदेशन महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन, इतर संबंधीत शासकीय कार्यालय तसेच भारतीय वैद्यकीय संघटना यांच्याशी समन्वय साधून मदत केली जाणार आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या योजनेनुसार, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आपत्ती पिडीतांसाठी सेवा देण्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती सांगली तसेच महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने पिडीतांची मदत करणे, आपत्ती कमी करणे व कार्यनिती स्विकारण्यासाठी मदत करण्याकरीता आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रशासनास व्यवस्थापन करण्यामध्ये मदत करण्यासाठी तसेच क्षमता वाढविण्यासाठी सांगली जिल्ह्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने मुख्य गटाची स्थापना करण्यात आलेली आहे. 00000

सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत 13 ऑगस्टला

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार शनिवार, दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली चे अध्यक्ष अजेय राजंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय सांगली व सांगली जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी, कौटुंबिक वादासंबंधीची, कामगार वादाची, भू- संपादनाची, मोटार अपघात नुकसान भरपाई, कौटुंबिक हिंसाचाराची, चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम १३८ खालील प्रकरणे, जिल्हा ग्राहक मंचासमोरील प्रलंबित प्रकरणे आणि वादपूर्व प्रकरणांत बॅंक, दूरसंचार, वीज बिल, घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची प्रकरणे ठेवता येणार आहेत. पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून प्रकरणे तडजोडीने मिटविण्याबाबत लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण कि. नरडेले यांनी केले आहे. 00000

कोविड-19 लसीचा दुसरा व प्रिकॉशन डोस तातडीने घ्या - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

- कोविड-19 लसीकरण मोहिमेत सांगली जिल्हा राज्यात 12 ते 14 वयोगटातील लसीकरणात दुसऱ्या तर 15 ते 18 वयोगटात तिसऱ्या क्रमांकावर सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी ज्या पात्र नागरिकांचा कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेणे अद्याप बाकी आहे, त्यांनी तो तात्काळ घ्यावा. तसेच ज्यांनी प्रिकॉशन डोस विहीत कालावधी पूर्ण होवूनही घेतलेला नाही त्यांनीही सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तो तात्काळ घ्यावा. यासाठी पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य विभागाने यंत्रणा अधिक गतीमान करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-19 लसीककरण मोहिम जिल्हा समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आरोग्य उपसंचालक डॉ. राम हंकारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील, महानगरपालिकेचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील, उपजिल्हा रूग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रूग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोविड-19 लसीकरण मोहिमेत 12 ते 14 वयोगटातील लसीकरणात 66.46 टक्के इतके लसीकरण करून सांगली जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 15 ते 18 वयोगटात 65.66 टक्के लसीकरण करून सांगली जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत पहिला डोस 23 लाख 33 हजार 241 जणांनी तर दुसरा डोस 21 लाख 15 हजार 290 जणांनी घेतला आहे. तसेच प्रिकॉशन डोस 87 हजार 721 जणांनी घेतला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्याला 43 लाख 05 हजार 660 डोसेस प्राप्त झाले असून आजअखेर 1 लाख 16 हजार 930 डोसेस शिल्लक आहेत. जिल्ह्यामध्ये दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण कमी असून ज्यांनी अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही त्यांनी दुसरा डोस घ्यावा. त्याचबरोबर हर घर दस्तक मोहिमेची गतीमानपणे अंमलबजावणी करून उर्वरीत लोकांना तातडीने डोस देण्यात द्यावेत. जिल्ह्यामध्ये कमी लसीकरण झालेल्या तालुका व गावे यामध्ये लसीकरणाची मोहिम गतीमान करावी. याबरोबरच जिल्ह्यामध्ये खाजगी नोंदणीकृत लसीकरण केंद्रावरही लसींची उपलब्धता करून देण्याबाबत कार्यवाही करावी. ज्या ज्या व्यक्तींचे लसीकरण झालेले आहे त्यांची माहिती ऑनलाईन तातडीने भरावी, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात सध्या पावसाळा सुरू झाला असून अतिसार वाढण्याचा धोका संभवतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहिम सुरू आहे. यामध्ये ओआरएस चे वाटप व घरगुती उपायांची माहिती प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात यावी. जिल्ह्यामधील पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाणी साठ्यांचे क्लोरिनेशन करण्यात यावे. त्याचबरोबर जनतेनेही पाणी उकळून प्यावे. हात स्वच्छ धुवावेत त्याचबरोबर वैयक्तिक व परिसराचीही स्वच्छता ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावेळी केले. 00000

गुरुवार, ७ जुलै, २०२२

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 10.4 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 2.2 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 10.4 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 2.1 (100.4), जत 0.3 (97.2), खानापूर-विटा 0.6 (92.9), वाळवा-इस्लामपूर 2.1 (101), तासगाव 1.4 (81.9), शिराळा 10.4 (261), आटपाडी 0.1 (70.6), कवठेमहांकाळ 2.1 (85.6), पलूस 2.1 (62.8), कडेगाव 0.5 (80.8). 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 14.63 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 14.63 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 23.04 (105.25), धोम 4.39 (13.50), कन्हेर 2.61 (10.10), वारणा 14.63 (34.40), दूधगंगा 9.01 (25.40), राधानगरी 3.53 (8.36), तुळशी 1.59 (3.47), कासारी 1.42 (2.77), पाटगांव 1.70 (3.72), धोम बलकवडी 1.18 (4.08), उरमोडी 4.34 (9.97), तारळी 2.30 (5.85), अलमट्टी 63.84 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना -निरंक, धोम - निरंक, कण्हेर - निरंक, वारणा 710, दुधगंगा 700, राधानगरी 1200, तुळशी - निरंक, कासारी 250, पाटगांव - निरंक, धोम बलकवडी - निरंक, उरमोडी - निरंक, तारळी - निरंक व अलमट्टी धरणातून - 451 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 12.7 (45), आयर्विन पूल सांगली 8.3 (40) व अंकली पूल हरिपूर 12.7 (45.11). 00000

ाळजी करू नका...लवकर बरे व्हा... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जखमी वारकऱ्यांना दिलासा

- दिंडीतील जखमी वारकऱ्यांशी साधला संवाद - जखमींना तातडीची 25 हजार रूपयांची मदत सांगली दि. 7 (जि.मा.का.) : कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी येथे मंगळवार, दिनांक 05 जुलै 2022 रोजी आषाढी वारीच्या दिंडीमध्ये टेम्पो शिरल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिवारे कापसी येथील 17 वारकरी जखमी झाले होते. या जखमी वारकऱ्यांशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हीडीओ कॉलव्दारे संवाद साधून काळजी करू नका...लवकर बरे व्हा... अशा शब्दात दिलासा दिला. तसेच अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर व अधीक्षक डॉ. रूपेश शिंदे यांना सर्व जखमी वारकऱ्यांची सर्वोतोपरी काळजी घेण्यात यावी. ‍मिरज सिव्हील येथील वैद्यकीय उपचारांव्यतिरीक्त अन्यत्र खाजगी ठिकाणी उपचारांची आवश्यकता असल्यास त्याचाही सर्व खर्च शासन करेल. जखमी वारकऱ्यांची मागणी असल्यास त्यांच्या सोयीच्या ठिकाणी हलविण्याबाबतही कार्यवाही करावी, असे निर्देशित केले. यावेळी आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने जखमी वारकऱ्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 25 हजार रूपये उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जखमी वारकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले, तुमची तब्बेत कशी आहे, तुमच्या डॉक्टरांशी माझे बोलणे झाले आहे. आवश्यक काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तुम्ही काही काळजी करू नका. सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. ‍ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरज सिव्हील येथील जखमी वारकऱ्यांशी व्हीडीओ कॉलव्दारे संवाद साधला. यावेळी आमदार अनिल बाबर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रूपेश शिंदे उपस्थित होते. आमदार अनिल बाबर म्हणाले, वारकऱ्यांच्या दिंडीत वाहन घुसल्याने 17 वारकरी जखमी झाले. जखमी आवस्थेत वारकऱ्यांना या ठिकाणी आणल्यानंतर वैद्यकीय यंत्रणेने अत्यंत चांगली काळजी घेत उपचार केले आहेत. तीन लोक गंभीर होते. आज सर्वांची प्रकृती चांगली आहे. डॉ. सुधीर नणंदकर, डॉ. रूपेश शिंदे यांनी वारकरी रूग्णांची विशेष काळजी घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. रूपेश शिंदे यांच्याशी संवाद साधून आवश्यक निर्देश दिले आहेत. मिरज सिव्हील येथील व्यवस्थेव्यतीरिक्त अन्य व्यवस्था करावी लागल्यास त्याचाही खर्च सरकार करेल. पण रूग्णांना काही होवू नये याची सर्वतोपरी दक्षता घ्या असे निर्देश देवून मुख्यमंत्र्यांनी स्वत: रूग्णांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. पांडुरंगाच्या आर्शीवादाने सर्व वारकरी रूग्ण लवकरात लवकर बरे होवून घरी जातील. शासकीय नियमाप्रमाणे मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू असून तोपर्यंत तातडीची मदत म्हणून मुख्यमंत्र्यांच्या वतीने प्रत्येक वारकरी रूग्णाला 25 हजार रूपये उपलब्ध करून देत असल्याचे ही आमदार अनिल बाबर यांनी यावेळी सांगितले. 00000

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सुशिक्षीत बेरोजगारांना 50 लाखापर्यंत कर्ज

सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सुशिक्षीत बेरोजगार युवकांना व्यवसायासाठी कर्ज दिले जाते. सुशिक्षीत बेरोजगारांना उद्योग सुरु करण्यासाठी 25 ते 50 लाखापर्यंत बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्याची सोय आहे. चालु वित्तीय वर्षामध्ये सांगली जिल्ह्याकरीता 870 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ठ शासना मार्फत देण्यात आलेले आहे. याशिवाय जिल्हा उद्योग केंद्रामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, सुधारीत बीज भांडवल योजना व जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 18 ते 45 वयोगटातील किमान सातवी पास इच्छुकांना 25 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध होते. त्याचप्रमाणे 18 ते 45 वयोगटातील किमान दहावी पास इच्छुकांना 50 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अपंग व माजी सैनिक या प्रवर्गातील व्यक्तींना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षे सवलत देण्यात आलेली आहे. या योजनेची दोन यंत्रणामार्फत अंमलबजावणी करण्यात येत आहे. शहरी भागासाठी जिल्हा उद्योग केंद्र व ग्रामीण भागांसाठ महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ या यंत्रणा कार्यरत आहेत. या योजना पुर्णपणे ऑनलाईन असून maha-cmegp.gov.in या पोर्टलवर अर्ज सादर करावयाचा आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण व शहरी घटकांना 15 टक्के ते 35 टक्यापर्यंत अनुदानाची सोय करण्यात आली असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी 15 जुलै पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन

सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत नांदेड जिल्ह्यातील शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर येथे अपंगांना व्यवसायिक प्रशिक्षण देण्यासाठी प्रवेश देवून त्यांचे पुनर्वसन करण्यात येते. या संस्थेत सन 2022-23 या वर्षात अपंग, मुकबधीर मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे. इच्छुकांनी प्रवेशासाठी दि. 15 जुलै 2022 पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्रातर्फे करण्यात आले आहे. अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर या संस्थेत महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परिक्षा मंडळ मुंबई मार्फत शासन मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी 15 ते 45 वयोगटातील अपंग व मुकबधीर मुला- मुलींना प्रवेश देण्यात येत आहे. या प्रशिक्षण केंद्रात संगणक प्रशिक्षण (सी.सी.ईन. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्यूटर टायपिंग), वेल्डर कम फॅब्रीकेटर, शिवन व कर्तन कला आणि इलेक्ट्रीशिएन अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येत आहे. संस्थेत अपंग आणि मुकबधीर प्रशिक्षणार्थ्याना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत पदवी शिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे. प्रवेशितांची निवासाची, वैद्यकिय औषधोपचाराची व प्रशिक्षण साहित्याची विनामुल्य सोय केली आहे. इच्छुक अपंग मुला-मुलींनी, पालकांनी दिनांक 15 जुलै 2022 पर्यंत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, शिवनेरी नगर, रामपूर रोड, देगलूर जि. नांदेड मोबाईल क्रमांक 9960900369,9175446411, 7378641136, 9503078767 येथे संपर्क साधावा अथवा प्रत्यक्ष भेटावे, असे तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 21.8 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 6.1 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 21.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 3.5 (98.3), जत 1.1 (96.9), खानापूर-विटा 3.6 (92.3), वाळवा-इस्लामपूर 8 (98.9), तासगाव 5.6 (80.5), शिराळा 21.8 (250.6), आटपाडी 2.1 (70.5), कवठेमहांकाळ 2.7 (83.5), पलूस 6.6 (60.7), कडेगाव 6.2 (80.3). 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 13.57 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 13.57 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 20.72 (105.25), धोम 4.26 (13.50), कन्हेर 2.51 (10.10), वारणा 13.57 (34.40), दूधगंगा 8.43 (25.40), राधानगरी 3.26 (8.36), तुळशी 1.54 (3.47), कासारी 1.31 (2.77), पाटगांव 1.59 (3.72), धोम बलकवडी 1.05 (4.08), उरमोडी 4.25 (9.97), तारळी 2.21 (5.85), अलमट्टी 57.39 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना -निरंक, धोम - निरंक, कण्हेर - 24, वारणा 703, दुधगंगा 700, राधानगरी 1200, तुळशी - निरंक, कासारी 250, पाटगांव - निरंक, धोम बलकवडी - निरंक, उरमोडी - निरंक, तारळी - निरंक व अलमट्टी धरणातून - 451 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 14 (45), आयर्विन पूल सांगली 7.6 (40) व अंकली पूल हरिपूर 11.6 (45.11). 00000

बुधवार, ६ जुलै, २०२२

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 33.3 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 7.2 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 33.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 6.4 (94.8), जत 0.6 (95.8), खानापूर-विटा 2.4 (88.7), वाळवा-इस्लामपूर 11.3 (90.9), तासगाव 3 (74.9), शिराळा 33.3 (228.8), आटपाडी 0.3 (68.4), कवठेमहांकाळ 1.5 (80.8), पलूस 3.1 (54.1), कडेगाव 3.9 (74.1). 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 12.47 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 12.47 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 17.83 (105.25), धोम 4.18 (13.50), कन्हेर 2.42 (10.10), वारणा 12.47 (34.40), दूधगंगा 7.76 (25.40), राधानगरी 2.98 (8.36), तुळशी 1.50 (3.47), कासारी 1.21 (2.77), पाटगांव 1.50 (3.72), धोम बलकवडी 0.92 (4.08), उरमोडी 4.14 (9.97), तारळी 2.11 (5.85), अलमट्टी 53.70 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना -निरंक, धोम - निरंक, कण्हेर - निरंक, वारणा 646, दुधगंगा 700, राधानगरी 1200, तुळशी 50, कासारी 250, पाटगांव - निरंक, धोम बलकवडी - निरंक, उरमोडी - निरंक, तारळी - निरंक व अलमट्टी धरणातून - निरंक क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 14.7 (45), आयर्विन पूल सांगली 5.9 (40) व अंकली पूल हरिपूर 9.11 (45.11). 00000

मंगळवार, ५ जुलै, २०२२

पीएम राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळावा सोमवारी

सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली येथे दि. 11 जुलै 2022 रोजी सकाळी 9 वाजता पीएम राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळावा होणार आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे अधिकारी या मेळाव्यास उपस्थित राहणार असून या विभागाच्या अधिनस्थ नोंदणीकृत आस्थापनेमध्येही रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. या मेळाव्यास उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह आयटीआय सांगली येथे दि. 11 जुलै रोजी सकाळी 9 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यतिन पारगांवकर व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे. या मेळाव्यास सांगली तसेच सांगली जिल्ह्यातील चिंतामणी मोटर्स, जगदीश आर्यन ॲण्ड स्टील, भिडे ॲण्ड सन्स, प्रसादिती मेडिकल, चौगुले इंडस्ट्रीज, इंजिनिअर टेक्नोलॉजी, जयसिंगपूर ग्रुप, युनिव्हर्सल पॉवर, क्वालीटी पॉवर इलेक्ट्रीकल इक्युपमेंट प्रा. लि. कुपवाड एमआयडीसी सांगली, सह्याद्री मोटर्स तसेच इतर मोठ्या शहरातील कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण किंवा आयटीआयच्या अंतिम वर्षात शिकणारे प्रशिक्षणार्थी या मेळाव्यास भाग घेऊ शकतात. आयटीआयचे उमेदवार परीक्षा पास होण्यापूर्वीच त्यांना शिकाऊ उमेदवारीच्या संधी प्राप्त होणार आहेत. पाचवी ते बारावी पास, आयटीआय उत्तीर्ण तसेच पदवी, पदविका धारक उमेदवारांनी स्वखर्चाने या मेळाव्यास उपस्थित रहावे. दि. 11 जुलै 2022 रोजी सकाळी 9 वाजता कंपनीचे अधिकारी त्यांच्या कंपनीची माहिती अटी, शर्ती, सुविधा बाबतची माहिती देवून उमेदवारांचया प्रत्यक्ष मुलाखती घेऊन प्रमाणपत्रे तपासून त्याच दिवशी भरती केली जाणार आहे. सोबतच ॲप्रेन्टीसशिप पोर्टल बाबतचे प्रशिक्षण व शंका निरसन बाबत मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केन्द्र सांगली व्दारे ही मार्गदर्शन केले जाणार आहे. आयटीआयच्या फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशीयन, कोपा, डिझेल मेकॅनिक, टर्नर, मशिनिष्ट, मशिनिष्ट ग्राइंडर, पेंटर, ड्राफ्टस्मॅन मेकॅनिक, शिटमेटल वर्कर, वायरमन, मेकॅनिक मशीन मशिनिष्ट टुल मेटेंनन्स, टुल आणि डायमेकर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एयरकंडिशनिंग, पेंटर जनरल अशा सर्व ट्रेडच्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मेळाव्यास उपस्थित रहावे. आयटीआय पास गुणपत्रक, आधार कार्ड व आयटीआय प्रमाणपत्र या कागदपत्रांच्या छायांकित प्रतिची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे श्री. पारगांवकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

जिल्ह्यातील वारणा धरणात 11.45 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 11.45 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 16 (105.25), धोम 4.14 (13.50), कन्हेर 2.37 (10.10), वारणा 11.45 (34.40), दूधगंगा 7.07 (25.40), राधानगरी 2.65 (8.36), तुळशी 1.44 (3.47), कासारी 1.06 (2.77), पाटगांव 1.39 (3.72), धोम बलकवडी 0.84 (4.08), उरमोडी 4.06 (9.97), तारळी 2.02 (5.85), अलमट्टी 50.04 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 1050, धोम - निरंक, कण्हेर - निरंक, वारणा 600, दुधगंगा 50, राधानगरी 1100, तुळशी 50, कासारी 250, पाटगांव - निरंक, धोम बलकवडी - निरंक, उरमोडी - निरंक, तारळी - निरंक व अलमट्टी धरणातून 451 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 16.9 (45), आयर्विन पूल सांगली 4.9 (40) व अंकली पूल हरिपूर 5.4 (45.11). 00000

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 51 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 11.3 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 51 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 8.6 (88.4), जत 0.1 (95.2), खानापूर-विटा 11.1 (86.3), वाळवा-इस्लामपूर 9.3 (79.6), तासगाव 2.9 (71.9), शिराळा 51 (195.5), आटपाडी 0.1 (68.1), कवठेमहांकाळ 20.6 (79.3), पलूस 5 (51), कडेगाव 9 (70.2). 00000

सोमवार, ४ जुलै, २०२२

शिष्यवृत्ती, फ्रीशिप, आरएसएमएस, निर्वाह भत्ता योजनेकरीता अर्ज करण्यासाठी 31 जुलै पर्यंत मुदतवाढ

सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील नवीन शैक्षणिक वर्ष 2021-22 साठी नवीन व नुतनीकरण अर्जदारांसाठी तसेच सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील प्रलंबित नुतनीकरण अर्जदारांसाठी शिष्यवृत्ती, फ्रीशिप, आरएसएमएस, निर्वाह भत्ता या योजनेकरीता अर्ज भरण्याकामी महाडिबीटी प्रणालीवर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून नवीन व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी अनुसचित जाती प्रवर्गाकरीता दि. 31 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील प्रलंबित नुतनीकरण अर्जदारांसाठी व सन 2021-22 मधील नवीन व नुतनीकरण अर्जदारांसाठी दि. 5 जुलै 2022 पर्यंत अंतीम मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेकरीता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी www.mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावरुन अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. सांगली जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित सर्व विद्यालय/ महाविद्यालयांनी विहीत मुदतीत विद्यार्थ्यांचे सर्व योजनांचे अर्ज भरुन घ्यावेत. भविष्यात अंतिम दिनांकानंतर मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहिल्याबाबत किंवा अशा प्रकारे कोणतीही तक्रार निर्माण झाल्यास विद्यालय/ महाविद्यालयास सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे. 00000

मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सुचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 9 डिसेंबर 2020 अन्वये निश्चित केल्या आहेत. हा शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या योजनेकरिता इच्छुक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली, जुना बुधगाव रोड सांगली यांच्याकडे सर्व अटी व शर्तीची पुर्तता करून प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. 00000

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या लाभासाठी 30 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2022-23 मध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी विहीत नमुन्यात प्रस्ताव दि. 30 ऑगस्ट 2022 अखेर सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे योजनेच्या अटी व शर्तीची पूर्तता करून सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणी करून तीन वर्षे झालेल्या आणि अल्पसंख्याक बहुल जिल्ह्यातील व तालुक्यातील मदरशांना डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतून जिल्ह्यातील मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारीक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दु या विषयांचे शिक्षण देणे, मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इयत्ता 9 वी, 10 वी व 12 वी तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देणे, परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होऊन त्यांची रोजगार क्षमता वाढून आर्थिक दर्जा सुधारण्यास मदत होईल या दृष्टिने मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान देणे व शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेच्या अटी व शर्ती तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली, दूरध्वनी क्रमांक 0233-2600525 येथे संपर्क साधावा. 00000

धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधांसाठी 30 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : जिल्हास्तरावर सन 2022-23 मध्ये धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, अपंग शाळा, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी अल्पसंख्यांक विकास विभागाकडील दि. ऑक्टोबर 2015 च्या शासन निर्णयातील निकषांची पुर्तता करून दि. 30 ऑगस्ट 2022 अखेर सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. या योजनेच्या अटी व शर्ती तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली, दूरध्वनी क्रमांक 0233-2600525 येथे संपर्क साधावा. 000000

शुक्रवार, १ जुलै, २०२२

जिल्ह्यातील वारणा धरणात 10.40 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 10.40 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 13.55 (105.25), धोम 4.12 (13.50), कन्हेर 2.33 (10.10), वारणा 10.40 (34.40), दूधगंगा 6.09 (25.40), राधानगरी 2.28 (8.36), तुळशी 1.36 (3.47), कासारी 0.93 (2.77), पाटगांव 1.22 (3.72), धोम बलकवडी 0.76 (4.08), उरमोडी 4.11 (9.97), तारळी 2.04 (5.85), अलमट्टी 48.21 (123). विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 1600, धोम 0.0, कण्हेर 24, वारणा 580, दुधगंगा 50, राधानगरी 1000, तुळशी 50, कासारी 250, पाटगांव 0.0, धोम बलकवडी 0.0, उरमोडी 550, तारळी 0.0 व अलमट्टी धरणातून 810 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 16.1 (45), आयर्विन पूल सांगली 4.6 (40) व अंकली पूल हरिपूर 3.10 (45.11). 00000

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 10.5 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 3.1 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 10.5 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 5.9 (71.9), जत 0.5 (94.4), खानापूर-विटा 0.3 (67.4), वाळवा-इस्लामपूर 2.6 (61.9), तासगाव 1.2 (61.6), शिराळा 10.5 (119.3), आटपाडी 3.7 (67.6), कवठेमहांकाळ 0.8 (56.7), पलूस 0.2 (43.8), कडेगाव 3.4 (54.6). 00000

कृषि दिन उत्साहात साजरा

कृषि संजीवनी सप्ताह मोहिमेचा समारोप सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती 1 जुलै 2022 जिल्ह्यामध्ये कृषि दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2022 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यामध्ये दि. 25 जुन ते 01 जुलै 2022 दरम्यान राबविण्यात आलेल्या कृषि संजीवनी सप्ताह मोहिमेचा समारोप करण्यात आला. सांगली येथे आत्मा कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कृषि दिन व कृषि संजीवनी सप्ताह मोहिमेच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ, कृषि उपसंचालक प्रियांका भोसले, तंत्र अधिकारी मयुरा काळे, कृषि पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांसह इतर शेतकरी, कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार वेताळ यांनी उपस्थितांना कृषि विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनां विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना कृषि विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या मोहिमांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व प्रचार प्रसिद्धीसाठी रिसोर्स शेतकरी म्हणून सहभाग घेण्याबाबत आवाहन केले. वाळवा तालुक्यातील आष्टा येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी संजीव गणपतराव माने यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आधुनिक पद्धतीने शेती करण्याबाबत मार्गदर्शन केले. पडवळवाडी येथील कृषिभुषण सेंद्रीय शेती पुरस्कार प्राप्त शेतकरी सचिन तानाजी येवले यांनी सेंद्रीय शेती पद्धती व विक्री व्यवस्थापन याबाबतउपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रारंभी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. कृषि दिनाचे औचित्य साधून उपस्थित अधिकारी व विविध कृषि पुरस्कार प्राप्त शेतकरी यांच्याहस्ते कृषि चिकित्सालय फळरोपवाटिका कुपवाड येथील कार्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. प्रास्ताविक तंत्र अधिकारी मयुरा काळे यांनी केले, आभार कृषि उपसंचालक प्रियांका भोसले यांनी मानले. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील कृषि पुरस्कार प्राप्त शेतकरी सुरेश ज्ञानदेव चव्हाण (वसंतराव नाईक कृषिभूषण), सुनिल आनंदराव माने (वसंतराव नाईक कृषिभूषण), प्रशांत श्रीधर लटपटे (वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार), काकासाहेब रावसाहेब सावंत (उद्यानपंडीत पुरस्कार) तसेच कृषि विभागातील अधिकारी कर्मचारी व मिरज तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. 000000