गुरुवार, ७ जुलै, २०२२

तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी 15 जुलै पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन

सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत नांदेड जिल्ह्यातील शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर येथे अपंगांना व्यवसायिक प्रशिक्षण देण्यासाठी प्रवेश देवून त्यांचे पुनर्वसन करण्यात येते. या संस्थेत सन 2022-23 या वर्षात अपंग, मुकबधीर मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे. इच्छुकांनी प्रवेशासाठी दि. 15 जुलै 2022 पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्रातर्फे करण्यात आले आहे. अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर या संस्थेत महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परिक्षा मंडळ मुंबई मार्फत शासन मान्यता प्राप्त अभ्यासक्रमासाठी 15 ते 45 वयोगटातील अपंग व मुकबधीर मुला- मुलींना प्रवेश देण्यात येत आहे. या प्रशिक्षण केंद्रात संगणक प्रशिक्षण (सी.सी.ईन. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्यूटर टायपिंग), वेल्डर कम फॅब्रीकेटर, शिवन व कर्तन कला आणि इलेक्ट्रीशिएन अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येत आहे. संस्थेत अपंग आणि मुकबधीर प्रशिक्षणार्थ्याना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत पदवी शिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे. प्रवेशितांची निवासाची, वैद्यकिय औषधोपचाराची व प्रशिक्षण साहित्याची विनामुल्य सोय केली आहे. इच्छुक अपंग मुला-मुलींनी, पालकांनी दिनांक 15 जुलै 2022 पर्यंत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, शिवनेरी नगर, रामपूर रोड, देगलूर जि. नांदेड मोबाईल क्रमांक 9960900369,9175446411, 7378641136, 9503078767 येथे संपर्क साधावा अथवा प्रत्यक्ष भेटावे, असे तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र देगलूर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा