शुक्रवार, ८ जुलै, २०२२

जिल्हा न्यायालयात संभाव्य पूर आपत्ती ग्रस्तांकरीता मदत केंद्र कार्यान्वीत

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यामध्ये संभाव्य पूरग्रस्त लोकांना सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, विजयनगर, सांगली येथे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. गरजू लोकांनी मदत केंद्रात कार्यान्वीत करण्यात आलेल्या ०२३३-२६००९२८ या दूरध्वनी क्रमांकावर तसेच मोबाईल क्रं ८५९१९०३६१० वर संपर्क करुन मदत केंद्राव्दारे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली चे अध्यक्ष अजेय राजंदेकर तसेच सचिव प्रविण नरडेले यांनी केले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगलीमार्फत सुरू करण्यात आलेल्या या मदत केंद्रामध्ये कायदेविषयक माहिती व सल्ला दिला जाणार आहे. पुरामुळे होणारे नुकसान, मौल्यवान दस्तादेवज पुनःबांधणी, विम्यासंबंधीचे दावे, कायदेशीर हक्क, वैद्यकिय, आरोग्य विषयक मार्गदर्शन व नुकसान पोहोचलेल्या पिडीतांचे समुपदेशन महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन, इतर संबंधीत शासकीय कार्यालय तसेच भारतीय वैद्यकीय संघटना यांच्याशी समन्वय साधून मदत केली जाणार आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या योजनेनुसार, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आपत्ती पिडीतांसाठी सेवा देण्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती सांगली तसेच महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने पिडीतांची मदत करणे, आपत्ती कमी करणे व कार्यनिती स्विकारण्यासाठी मदत करण्याकरीता आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रशासनास व्यवस्थापन करण्यामध्ये मदत करण्यासाठी तसेच क्षमता वाढविण्यासाठी सांगली जिल्ह्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने मुख्य गटाची स्थापना करण्यात आलेली आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा