गुरुवार, २८ जुलै, २०२२

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ऑफलाईन पध्दतीने थेट कर्ज योजना, 20 टक्के बीज भांडवल योजना आणि ऑनलाईन पध्दतीने व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, महिला स्वयंसिध्दी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक हणमंत बिरादार यांनी केले आहे. या सर्व योजनांसाठी आर्थिक वर्ष 2022-23 साठी उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. ऑफलाईन योजनांचा लाभ घेण्यासाठी जातीचा दाखला व आधार कार्ड सोबत घेवून संबंधितांनी महामंडळाचे जिल्हा कार्यालय महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, संभाजीनगर, सांगली येथे संपर्क साधावा. ऑनलाईन योजनांचा लाभ घेण्यासाठी www.msobcfdc.org या वेबसाईटवर संबंधित योजनांचा पर्याय निवडून अर्ज पोर्टलवर ऑनलाईन दाखल करावेत, असे आवाहन श्री. बिरादार यांनी केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा