मंगळवार, ५ जुलै, २०२२

पीएम राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळावा सोमवारी

सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली येथे दि. 11 जुलै 2022 रोजी सकाळी 9 वाजता पीएम राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळावा होणार आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे अधिकारी या मेळाव्यास उपस्थित राहणार असून या विभागाच्या अधिनस्थ नोंदणीकृत आस्थापनेमध्येही रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. या मेळाव्यास उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह आयटीआय सांगली येथे दि. 11 जुलै रोजी सकाळी 9 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यतिन पारगांवकर व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे. या मेळाव्यास सांगली तसेच सांगली जिल्ह्यातील चिंतामणी मोटर्स, जगदीश आर्यन ॲण्ड स्टील, भिडे ॲण्ड सन्स, प्रसादिती मेडिकल, चौगुले इंडस्ट्रीज, इंजिनिअर टेक्नोलॉजी, जयसिंगपूर ग्रुप, युनिव्हर्सल पॉवर, क्वालीटी पॉवर इलेक्ट्रीकल इक्युपमेंट प्रा. लि. कुपवाड एमआयडीसी सांगली, सह्याद्री मोटर्स तसेच इतर मोठ्या शहरातील कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आयटीआय उत्तीर्ण किंवा आयटीआयच्या अंतिम वर्षात शिकणारे प्रशिक्षणार्थी या मेळाव्यास भाग घेऊ शकतात. आयटीआयचे उमेदवार परीक्षा पास होण्यापूर्वीच त्यांना शिकाऊ उमेदवारीच्या संधी प्राप्त होणार आहेत. पाचवी ते बारावी पास, आयटीआय उत्तीर्ण तसेच पदवी, पदविका धारक उमेदवारांनी स्वखर्चाने या मेळाव्यास उपस्थित रहावे. दि. 11 जुलै 2022 रोजी सकाळी 9 वाजता कंपनीचे अधिकारी त्यांच्या कंपनीची माहिती अटी, शर्ती, सुविधा बाबतची माहिती देवून उमेदवारांचया प्रत्यक्ष मुलाखती घेऊन प्रमाणपत्रे तपासून त्याच दिवशी भरती केली जाणार आहे. सोबतच ॲप्रेन्टीसशिप पोर्टल बाबतचे प्रशिक्षण व शंका निरसन बाबत मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केन्द्र सांगली व्दारे ही मार्गदर्शन केले जाणार आहे. आयटीआयच्या फिटर, वेल्डर, इलेक्ट्रीशीयन, कोपा, डिझेल मेकॅनिक, टर्नर, मशिनिष्ट, मशिनिष्ट ग्राइंडर, पेंटर, ड्राफ्टस्मॅन मेकॅनिक, शिटमेटल वर्कर, वायरमन, मेकॅनिक मशीन मशिनिष्ट टुल मेटेंनन्स, टुल आणि डायमेकर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एयरकंडिशनिंग, पेंटर जनरल अशा सर्व ट्रेडच्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मेळाव्यास उपस्थित रहावे. आयटीआय पास गुणपत्रक, आधार कार्ड व आयटीआय प्रमाणपत्र या कागदपत्रांच्या छायांकित प्रतिची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे श्री. पारगांवकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा