शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

आयटीआय प्रशिक्षण कौशल्य विकासाची सुवर्णसंधी

सध्या भारत सरकारने कौशल्य विकासावर मोठ्या प्रमाणात भर दिला असून देश-विदेशात आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांंना रोजगार-स्वयंरोजगाराच्या अनेक नवनवीन संधी निर्माण होत आहेत. कौशल्य विकासातील एक भाग म्हणजे आयटीआय प्रशिक्षण आहे. यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू केलेल्या आहेतच, याशिवाय अनेक खाजगी आयटीआय देखील कार्यरत आहेत. सांगली येथे पद्मभूषण वसंतदादा औद्योगिक वसाहत, आरटीओ ऑफीस जवळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) कार्यरत असून येथे इलेक्ट्रिशन, फीटर, टर्नर, वेल्डर, मशिनिस्ट, ग्राईंडर, वायरमन, ड्राफ्टसमन मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल असे विविध 24 प्रकारचे अभ्यासक्रम असून कालावधी 1 वर्ष, 2 वर्ष इतका आहे. संस्थेचा 28 एकर इतका भव्य परिसर असून सर्व अभ्यासक्रमांना योग्य प्रमाणात नवनवीन अशी मशिनरी, टूल्स उपलब्ध आहेत. आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर शासकीय, खाजगी कंपनीमध्ये हजारो विद्यार्थ्यांना ऍ़प्रेंटीस मिळाली आहे. अनेकजन टाटा मोटर्स, थायसेन ग्रुप इंडस्ट्रीज, कमिन्स, बजाज ऑटो, थरमॅक्स अशा नामांकित कंपन्यांमध्ये कायम झाले आहेत. तर अनेकजनांनी स्वत:चा उद्योग उभा करून नावलौकीक मिळविला आहे.
सध्या राज्यातील आयटीआय प्रवेशासाठी ज्यांनी अर्ज केले आहेत, त्यांची प्रवेश फेरी प्रक्रिया चालू झाली असून अद्यापही ज्यांनी प्रवेशासाठी अर्ज भरलेला नाही त्यांच्यासाठी शासनाने 1 ते 13 ऑगस्ट दरम्यान प्रवेश अर्ज भरण्याची संधी दिलेली आहे. या काळातच उमेदवारांनी नवीन ऑनलाईन अर्ज करून आयटीआयमध्ये अर्ज निश्चिती करणे आवश्यक आहे. दिनांक 16 ऑगस्ट रोजी सर्व मूळ कागदपत्रासह उपस्थित राहून गुणवत्तेनुसार शिल्लक जागावर प्रवेश घेता येईल. संस्थेमध्ये मार्गदर्शन कक्षास भेट देऊन अधिक माहिती घेता येईल. समुपदेशन फेरी 16 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 8 वाजता सुरू होत असून इच्छुकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेवून आपले भविष्य घडवावे हीच सदिच्छा.

                  यतिन प्र. पारगांवकर
                                     प्राचार्य
                   शासकीय औद्योगिक प्रशिक्षण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा