शनिवार, ५ नोव्हेंबर, २०१६

आद्य नाटककार विष्णुदास भावे : 5 नोव्हेंबर रंगभूमी दिन

5 नोव्हेंबर 1843 रोजी विष्णुदासांनी "सीत स्वयंवर" या पहिल्या मराठी नाटकाचा प्रयोग सांगलीत केला. पण त्यापूर्वी ते कठपुतळ्यांचे खेळ करीत असत. त्यांनी बनविलेल्या खेळविलेल्या या कठपुतळ्या त्यांच्या निधनानंतर तशाच पेटाऱ्यात पडून होत्या. भावे यांच्या कठपुतळी खेळाच्या तीन चार संहिता उपलब्ध आहेत. द्रौपदी, स्वयंवर, ढोंगी महंताची नक्कल अशी त्यांची नावे आणि कठपुतळ्या या लाकडी असल्या तरी अतिशय हलक्या होत्या. शक्यतो उंबराच्या लाकडाचा कागदाचा लगदा यापासून बनविल्या जात. रेखीव आकार प्रमाण बध्दता असूनही त्या चाकावर बसविल्या होत्या. त्या लोखंडी काठीच्या आधाराने आणि दोरीच्या साह्याने अशा दोन्ही प्रकारे खेळविता येत असत.
   कर्नाटकातील भागवत मंडळी खेळ पाहून सांगलीचे संस्थानिक थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी आपल्या पदरी असणाऱ्या सुभेदार अमृतराव भावे यांच्या विष्णू या बुध्दिमान मुलाला भागवत मंडळीतील नाटकाप्रमाणे खेळ करण्याची आज्ञा केली. त्यांची आज्ञा प्रमाण मानून 1843 साली सांगलीच्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये मराठीतील पहिले नाटक "सीता स्वयंवर" नाटकाचा जन्म झाला.  त्यासाठी त्यांनी कानडी नाट्य परंपरेत आवश्यक तेथे बदल केले. भाव्यानी स्वत:च नवीन पदाची रचना केली. "सीता स्वयंवर" करण्याआधी अहिल्योध्दार आख्यान श्रीमंतांपुढे सादर केले. हेच मराठीतील पहिले नाटक मानण्यात येते. इथंच मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली. या सर्व आख्यान्यात खुद्द विष्णुदासांनी नाट्य कवितासंग्रह या नावाने 1885 मध्ये संग्रहित केले. "सीता स्वयंवर" मराठी रंगभूमीवर आले तो दिवस होता 5 नोव्हेंबर 1843. म्हणूनच हा दिवस नाट्यपंढरीत मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करतात.
   विष्णुदासांनी रामावतारी आख्यानेच सादर केली. हीच मराठी रंगभूमीची सुरूवात होती. 1843 ते 1851 या काळात विष्णुदासांना राजाश्रय लाभला. विष्णुदासांच्या कंपनीन मुंबईलाही नाटकाचे प्रयोग केले. तेथे प्रेक्षकांनी या नाटकांना रसिकतेने राजाश्रयानंतर लोकाश्रयाला "सांगलीकर नाटककार मंडळी" फिरतीवर निघाली. 1843 साली मुंबईच्या दौऱ्यापासून या सांगलीकर मंडळीनी तिकीटे लावून प्रयोग सादर केले. पैसे मोजून तिकिटे काढून नाटक पाहण्याची सवय लावली. राजाश्रयानंतर प्रशासकांनी विष्णु दासांच्या नाटकावर झालेल्या खर्चाची वसुली सुरू केली. त्याचा परिणाम विष्णुदासांनी सांगलीकर नाटक मंडळी स्थापन करून 1851 ते 1862 सालापर्यंत एकूण सात दौरे केले. 14 फेब्रुवारी 1853 साली प्रथमच वृतपत्रातून नाटकाची जाहिरात आली. मुंबईच्या ग्रँट रोड थिएटरमध्ये मराठी नाटकाचा प्रयोग झाला. प्रथमच "गोपीचंद" या हिंदी नाटकाचा प्रयोग 1954 मध्ये
झाला. त्यामुळे हिंदी रंगभूमीचे जहनक म्हणून विष्णुदासांचे नाव आखिल भारतात गाजले, म्हणूनच "सांगली ही नाट्यपंढरी " म्हणून ओळखली जाऊ लागली. या विष्णुदासांनी एकूण 52 नाटके लिहीली. त्यांची सर्व नाटके पौराणिक होती. नाटक मंडळीत पुढे 1862 सुमारास विष्णुदासांनी नाट्य संन्यास घेतला पण त्यापूर्वी दरबारचे कर्ज तसल मातीचा उलगडा करण्यास हा नाट्याचार्य विसरला नाही. सांगलीकर संगीत हिंदी नाटक मंडळी आणि नूतन सांगलीकर मंडळीनी विष्णुदास भावे यांच्या पध्दतीची नाटके 1910 पर्यंत चालू होती. 9 ऑगस्ट 1901 साली नाट्याचार्य विष्णुदास अमृत भावे यांचे निधन झाले. त्यांच्या नावाने भावे पुरस्कार 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिना दिवशी देण्यात येतो. त्यांच्या नावाने सांगलीतील विष्णुदासा भावे नाट्य मंदिराची उभारणी झाली आहे. नाटक कंपनीने नाटक बसविले की त्यांचा पहिला प्रयोग या नाट्य पंढरीच्या विष्णुदास भावे रंगमंचावर करायचा ही जणू प्रथाच पडली आहे. नाट्य पंढरीबध्दल सर्वच नाट्य रसिकांना मनोमन आदराचे स्थान आहे.

विजय बक्षी
                           विश्रामबाग, सांगली



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा