शनिवार, १ जुलै, २०१७

निसर्गसंपदेचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे - जिल्हाधिकारी वि. ना. काळम

सांंगली, दि. 1 (जि. मा. का.) : वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत सन 2017 च्या पावसाळ्यामध्ये संपूर्ण राज्यात चार कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत सांगली जिल्ह्यात वनविभागासह ग्रामपंचायत इतर यंत्रणांसाठी एकूण 8 लाख 84 हजार इतके वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शासनाच्या चार कोटी वृक्षलागवड मोहिमेत शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांबरोबरच, सामाजिक संस्था, विद्यार्थी, मान्यवर स्वयंस्फूर्तीने मोठ्या उत्साहाने सहभागी            झाले आहेत. या माध्यमातून निसर्गाच्या ऋणातून उतराई होण्याची संधी सर्वांना मिळाली आहे. मात्र, ही मोहीम सप्ताहापुरतीच मर्यादित ठेवता निसर्गसंपदेचे संरक्षण संवर्धन करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी आज येथे केलेे.
नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, विभागीय वन अधिकारी विश्वास जवळेकर यांच्यासह शासकीय कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी, महिला कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, या महत्त्वांकाक्षी मोहिमेत सांगली जिल्हा अग्रेसर राहण्यासाठी निसर्गसंपदेचे संवर्धन करण्याच्या दृष्टीकोनातून वृृक्षलागवड सप्ताहात लोकसहभाग महत्वाचा आहे. तरी जिल्ह्यातील पदाधिकारी, अधिकारी, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, सेवाभावी संस्था, हरित सेना, निसर्ग पर्यावरण प्रेमी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन वृक्ष लागवड सप्ताहात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी. शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी शासकीय कार्यालयांचा परिसर वृक्षाच्छादित करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी वड, आंबा, पिंपळ, जांभूळ आदि झाडे मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनी उत्साहाने वृक्षारोपण केले. यावेळी उपजिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी, अमृत नाटेकर, मीनाज मुल्ला, तहसीलदार विजया पाटील, डॉ. सोनिया घुगे, तेजस्विनी पाटील, श्रीमती कोळी यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

00000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा