रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

महात्मा गांधी जयंती निमित्त जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

सांगली, दि. 2, (जि. मा. का.) : महात्मा गांधी जयंती निमित्त आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
   यावेळी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अमृत नाटेकर, तहसिलदार टी. पी. दोरकर, नायब तहसिलदार श्री. बिराजदार, श्री. विभूते तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा