शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

मुख्यमंत्री महोदयांनी उरुण-इस्लामपूर येथे सरपंच, नागरिकांकडून स्विकारली निवेदने

सांगली, दि. 25, (जि.मा.का.) : उरुण-इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थां आणि संघटनांचे पदाधिकारी सदस्य आणि नागरिकांकडून विविध प्रश्न आणि समस्याबाबतची निवेदने स्वीकारली. या निवेदनांवर संबधित विभागाच्यावतीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुधिर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषेदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे प्रमुख निशिकांत भोसले-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे प्रमुख निशिकांत भोसले-पाटील यांनी मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत केले. तसेच प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
    जिल्ह्यातील विविध गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्था संघटना, नागरिकांनी आपल्या समस्यांची निवेदने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केली. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी वि. ना. काळम, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, सरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा