गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०१८

दख्खन जत्रेमध्ये 32 लाखांपेक्षा अधिक उलाढाल

सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : इस्लामपूर येथे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे आयोजित दख्खन यात्रेमध्ये  पाच दिवसांमध्ये 32 लाख रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाली. पाच दिवस चाललेल्या या दख्खन यात्रेचा  कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत समारोप झाला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अजयकुमार माने, वित्त लेखाधिकारी प्रिया देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते.
दख्खन जत्रेत महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू खाद्यपदार्थ यांचे प्रदर्शन विक्री करण्यासाठी 100 स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. त्यामध्ये 126 महिला बचतगटांनी सहभाग नोंदवला होता. सांगली जिल्ह्यातील बचतगटांबरोबरच सातारा, पुणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, सोलापूर अशा विविध जिल्ह्यातून जवळजवळ 31 बचतगटांनी यामध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये 67 बचतगट हे खाद्यपदार्थांचे 59 बचतगट विविध गृहपयोगी वस्तूंचे होते. दख्खन यात्रेमध्ये जवळपास 32 लाख रूपयांपेक्षा अधिक उलाढाल झाली. यामध्ये सर्वात जास्त विक्री करण्यात आलेल्या महिला बचतगटांना गौरवण्यात आले. कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते प्रथम क्रमांकास 5 हजार रूपये, व्दितीय 3 हजार रूपये तर तृतीय क्रमांकास 2 हजार रूपयांचा धनादेश प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
प्रथम क्रमांक मिरज तालुक्यातील टाकळी येथील मनस्वी महिला बचतगट स्वामी समर्थ महिला बचतगट सांगली यांना विभागून देण्यात आला. मनस्वी गटाने वेगवेगळ्या स्वादाच्या शेवया उन्हाळी पदार्थ यांची 96 हजार 700 रूपयांची तर स्वामी समर्थ महिला बचतगटाने हैद्राबादी दम बिर्याणीची 1 लाख 69 हजार रूपयांची विक्री केली. व्दितीय क्रमांक रत्नागिरी जिल्ह्यातील श्रेयस महिला बचतगट गुहागर यांना देण्यात आला. या गटाने विविध कोकणी पदार्थ, मच्छीफ्राय सोलकडी यांची विक्री केली. तृतीय क्रमांक मिरज तालुक्यातील मानिनी महिला बचतगट बिसूर कडेगाव तालुक्यातील श्री गणेश महिला बचतगट वडियेरायबाग यांना विभागून देण्यात आला. मानिनी महिला बचतगटाने बिनपाण्याची कांदा भजी श्री गणेश महिला बचतगटाने थालीपीठ आप्पे यांची विक्री केली.
काही बचतगटांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र प्रत्येकी 1 हजार रूपयांचा धनादेश देण्यात आला. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील प्रेरणा महिला बचतगट कळवण, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जय मल्हार बचतगट एकंबे वाळवा तालुक्यातील श्रीराम महिला बचतगट वाळवा यांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र प्रत्येकी 1 हजार रूपयांचा धनादेश देण्यात आला.
पाच दिवस चाललेली ही दख्खन जत्रा यशस्वी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अजयकुमार माने, वित्त लेखाधिकारी प्रिया देशमुख यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
दख्खन जत्रेमध्ये काही वैशिट्यपूर्ण बचतगटांनीही सहभाग घेतला होता. यामध्ये आदर्श महिला बचतगट करमाळा, ता. शिराळा यांचे घरगुती चप्पल, शिवसाई महिला बचतगट ऐतवडे बु. ता. वाळवा यांचे आर्युवेदिक औषधी उत्पादने, जयश्री महिला बचतगट गार्डी ता. खानापूर यांचे दगडी वस्तू, ओंकार महिला बचतगट ढालगाव ता. कवठेमहांकाळ यांचे लोकरीचे जेन घोंगडी असे अनेक गट सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या सर्व गटांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. कृषि महोत्सव दख्खन जत्रा यामुळे इस्लामपूर शहरवासियांना पारंपरिक वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ यांचा आस्वाद घेता आला.
00000






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा