गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०१८

जिल्हा कृषि महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवी ऊर्जा - कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत

 सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : सांगली जिल्हा कृषि महोत्सवामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नवी ऊर्जा मिळेल. हा महोत्सव राज्याला जिल्ह्याला दिशादर्शक ठरला आहे, असे प्रतिपादन कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
इस्लामपूर येथे आयोजित जिल्हा कृषि महोत्सव सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. यावेही इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशीकांत पाटील, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, आत्माचे प्रकल्प संचालक सुरेश मगदूम, उपविभागीय कृषि अधिकारी मनोज वेताळ आदि उपस्थित होते.
जिल्हा कृषि महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करून कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, या महोत्सवाच्या माध्यमातून शेतीविषयक अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना मिळण्यास मदत झाली. महोत्सवातील चचासत्रातून जगातील कृषि विषयक घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना झाली. महोत्सवाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि कृषि संलग्न विभाग, महसूल, पोलीस आणि सर्व संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन केले आणि अंमलबजावणीसाठी मेहनत घेतली. त्यामुळेच हा कृषि महोत्सव यशस्वीरित्या पार पडला. या महोत्सवास 3 लाखाहून अधिक शेतकरी नागरिकांनी भेट दिली. यासाठी सर्व संबंधित विभागांनी स्थापन केलेल्या समित्यांनी समन्वयाने काम केले. त्यामुळेच या महोत्सवाचे नेटके आणि शिस्तबध्द नियोजन होऊ शकले, असे ते म्हणाले.
कृषि महोत्सवाचे यजमानपद इस्लामपूरला दिल्याबद्दल ऋणनिर्देश व्यक्त करून नगराध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले, कृषि महोत्सवाचे यशस्वी आयोजन करून कृषि महोत्सवाचे यशस्वी आयोजन करून कृषि कृषि संलग्न तसेच अन्य शासकीय विभागांनी उत्कृष्ट टीम वर्कचे दर्शन घडवले आहे. हा महोत्सव शेतकऱ्यांना शिक्षित करणारा आणि त्याला व्यासपीठ देणारा ठरला, याबद्दल त्यांनी संबंधित सर्व विभागाचे अभिनंदन केले.
प्रास्ताविकात राजेंद्र साबळे म्हणाले, शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान देणारा, स्फूर्ती देणारा हा कृषि महोत्सव ठरला आहे. महोत्सवाच्या आयोजनात सहकार्य केलेल्या सर्व विभागांचे त्यांनी यावेळी आभार व्यक्त केले. आभार सुरेश मगदूम यांनी मानले.
यावेळी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते महोत्सवात सहभागी झालेल्या स्टॉलधारकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी कृषि उपसंचालक मकरंद कुलकर्णी, उपविभागीय कृषि अधिकरी जयवंत कवडे यांच्यासह कृषि अन्य विभागांचे अधिकारी, शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा