सोमवार, २९ एप्रिल, २०२४

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात आज मुलाखत

सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमातून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 जिल्हा प्रशासन सज्ज या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन तसेच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरुन सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित करण्यात येणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी फारुक बागवान यांनी ही मुलाखत घेतली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात निवडणुकीचे कामकाज पार पाडण्यासाठी सुरु असलेली कार्यवाही, मतदान केंद्रे व मतमोजणी केंद्रावर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती, कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन, मतदारांसाठी सोयीसुविधा आदींबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी माहिती दिली आहे. ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा