रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पदयात्रेच्या माध्यमातून दिला स्वच्छतेचा संदेश

सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : कृषि फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूर येथे महात्मा गांधी स्वच्छता संवाद सेवा पदयात्रा काढून स्वच्छतेचा संदेश जनतेला दिला. यावेळी नगरसेवक विक्रम पाटील, अशोक खोत, नंदु सुर्यवंशी यांच्यासह विविध पदाधिकारी नागरिकांनी पदयात्रेत सहभाग घेतला.
इस्लामपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा- शिवाजी पुतळा - यल्लमा चौक अशी पदयात्रा काढण्यात आली. यावेळी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हातात झाडू घेवून स्वछता केली. यावेळी मार्गदर्शन करताना कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, जगाची बदलाची सुरूवात स्वत:पासून करा असा संदेश महात्मा गांधी यांनी दिला. या संदेशातून प्रेरणा घेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा संदेश संपूर्ण देशाला दिला. 2 ऑक्टोबरपासून ते जानेवारी पर्यंत प्रत्येकाने आठवड्यातून किमान एक दिवस 10 किलोमीटर अशी एकूण 150 किलोमीटर पदयात्रा काढून स्वच्छतेचा संदेश गावोगावी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणताही कमीपणा बाळगता जर आपले गाव, शहर स्वच्छ केले तर संपूर्ण समाज निरोगी राहील. पदयात्रेच्या माध्यमातून चांगल्या आरोग्याचा स्वच्छतेचा संदेश संपूर्ण जनतेला आपण देत आहोत. संत गाडगेबाबा, महात्मा गांधी यांच्या विचारानुसार त्यांच्या पावलावर पाऊल  ठेवून पुढे जावयाचे आहे हा एक मोठा संदेश स्वच्छतेच्या माध्यमातून देत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
00000





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा