मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१८

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सांगली जिल्ह्यात स्वागत

सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी कवलापूर मैदान हेलिपॅडवर आगमन झाले. त्यांच्यासमवेत सहकार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी होते. हेलिपॅडवर कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि खासदार संजय पाटील, प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, महापौर संगीता खोत यांच्यासह जिल्हाधिकारी वि. ना. काळम, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिकेचे आयुक्त रविंद्र खेबुडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी  उपस्थित होते.


000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा