गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८

सांगली जिल्ह्यातील 4 उच्च शैक्षणिक संस्थांची उन्नत भारत अभियानासाठी निवड

सांगली जिल्ह्यातील 4 उच्च शैक्षणिक संस्थांची
उन्नत भारत अभियानासाठी निवड
महात्मा गांधी यांचे 150 वे जयंती वर्ष साजरे करण्यात सहभाग

सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या उन्नत भारत अभियानासाठी महाराष्ट्रातील एकूण 160 उच्च शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 4 उच्च शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात आली आहे.
आदर्श इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर, विटा, ता. खानापूर, राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव, ता. वाळवा, श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडी आणि संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटस्‌ची इंजिनिअरींग शाखा अशी या चार महाविद्यालयांची नावे आहेत. उन्नत भारत कार्यक्रमांतर्गत प्रत्येक महाविद्यालयाने त्यांच्या तालुक्यातील 5 गावे, खेड्यांमध्ये फील्ड व्हिजिट, घरोघरी जावून सर्वेक्षण, ग्रामीण जनतेच्या समस्या गरजांची माहिती घेणे आणि त्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी विविध तंत्र कार्यपद्धती विकसित करणे आदींचा समावेश आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने उन्नत भारत अभियानासाठी  देशभरातील 840 उच्च शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात आली असून, त्यात महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यातील 75 तांत्रिक 85 अतांत्रिक अशा एकूण 160 उच्च शैक्षणिक संस्थांचा यात समावेश आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा