शुक्रवार, २५ जानेवारी, २०१९

चरक आयुर्वेद वनस्पती उद्यानाचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले उद्घाटन

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका आणि आयुर्वेद पंचकर्म प्रॅक्टीशनर्स असोसिएशन यांच्यावतीने स्फुर्ती चौक, सांगली येथे नव्याने होत असलेल्या चरक आयुर्वेद वनस्पती उद्यानाचे उद्घाटन सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख मान्यवरांनी वृक्षारोपण केले. या प्रसंगी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील, महापौर संगीता खोत, आमदार सुधीर गाडगीळ, महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर आदि मान्यवर उपस्थित होते.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा