शुक्रवार, २५ जानेवारी, २०१९

उत्कष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते सत्कार

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण कार्यक्रमात पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सदर पोलीस अधिकारी पुढीलप्रमाणे.
नक्षलग्रस्त भागात सेवा बजावल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक भूपेंद्र देवरे, प्रशांत कंडारे, सचिन गढवे, संवेदनशिल गुन्हा उघडकीस आणल्याप्रकरणी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण, चलनाची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख अतुल निकम, सीसीटीएनएस प्रणालीचे 100 टक्के अंमलबजावणीसाठी पोलीस नाईक सुनंदा लोहार, शस्त्रसज्ज तीन आरोपींना पकडल्याबद्दल भालचंद्र चव्हाण, लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बिनतारी संदेश दळणवळणासाठी मोबाईल रिपीटर तयार केल्यासाठी पोलीस उपनिरीक्षक श्री. भालेराव, आंतरराज्यीय दरोडेखोरांची टोळी पकडल्याबाबत पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोलीस नाईक संदीप गुरव आणि राहुल जाधव, पोलीस शिपाई संदीप नलवडे, आठ गंभीर गुन्ह्यात फरारी असलेल्या गुंडाला पकडल्या प्रकरणी तसेच आंतरराज्यीय दोन गुन्हेगारांना अटक केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक  संतोष डोके, पोलीस हवालदार मेघराज रूपनर महेश आवळे, पोलीस नाईक सागर लवटे, पोलीस नाईक सागर लवटे, पोलीस शिपाई संतोष गळवे, आटपाडी पोलीस ठाण्यास दाखल असलेल्या संवेदनशील खुनाचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी, पोलीस उपनिरीक्षक  तुषार काळे, पोलीस शिपाई रवी गोसावी, एम पासपोर्ट प्रकल्प उत्कष्टरित्या राबविल्याबद्दल पोलीस निरीक्षक संजय गिड्डे, पोलीस नाईक करण परदेशी विनायक लोखंडे.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा