शुक्रवार, २५ जानेवारी, २०१९

जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) :  जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 
या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) किरण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) विजया यादव, जिल्हा नियोजन अधिकारी ज. द. मेहेत्रे  यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध विभागांचे अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.    
00000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा