शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०

सिंचन योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी गतीने काम करू - पालकमंत्री जयंत पाटील

सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : अनेक सिंचन योजनांची कामे गतीने सुरू आहेत. या सिंचन योजनांसाठी यावर्षीही निधी देणार आहोत. महाराष्ट्रातील सिंचन योजना  लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी गतीने काम करू, असे प्रतिपादन जलसंपदा लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यातील ताकारी, म्हैसाळ योजनेच्या कामाबाबत सांगली पाटबंधारे विभागाच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सुमनताई पाटील, सांगली पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता हणमंत गुणाले, अधिक्षक अभियंता बी. आर. पवार, कार्यकारी अभियंता सर्वश्री एस. एम. नलवडे, सचिन पवार, विजय पाटील, सुरेन हिरे, राजन रेड्डीयार, उपविभागीय अधिकारी पाटण श्रीरंग तांबे, जिल्हा परिषद सदस्य सर्वश्री अर्जुन पाटील, सागर पाटील, सतिश पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, जत या भागातील सिंचन योजनेच्या पाण्याबाबत अडीअडचणी जाणून घेऊन सिंचन योजनेच्या पाण्यापासून जो वंचित भाग आहे त्यांना न्याय कसा द्यायचा याबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी अधिक्षक अभियंता हणमंत गुणाले यांनी जिल्ह्यातील सिंचन योजनेच्या सुरू असलेल्या कामाबाबत तसेच वंचित गावांना सिंचन योजनेचे पाणी कशापध्दतीने देता येईल याबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी आमदार सुमनताई पाटील पदाधिकारी यांनी त्यांच्या भागातील समस्या मांडल्या सिंचन योजनेपासून वंचित असलेल्या गावांना पाणी लवकरात लवकर मिळावे, अशी मागणी केली.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा