बुधवार, ३१ जुलै, २०२४

. . .तिथे कर माझे जुळती !

सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : गेल्या चार-पाच दिवसापासून जिल्ह्यात काही तालुक्यातील नागरिकांना पुराच्या पाण्याचा सामना करावा लागतो. सुदैवाने सध्या सांगलीकरांची पूरस्थिती टळली असली तरीही भारतीय सेनादलाची तुकडी डोळ्यात तेल घालत कार्यरत आहे. ज्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने सुमारे 100 जणांची भारतीय सैन्य दलाची तुकडी बोलावली होती ती तुकडी आपल्या कर्तव्यापासून तसभूरही मागे हटले नाही अथवा त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली नाही. त्याचे झाले असे की , सांगलीतील मगरमच्छ कॉलनीतील रहिवाशांना पुराच्या पाण्यामुळे बाहेर जाता की आत येता येत नव्हते. अशा आव्हानात्मक स्थितीत सैन्यदलाच्या तुकडीतील काही सैनिकांनी त्यांना जेवणाचे तसेच जेवण तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या अन्नधान्याची पाकिटे वितरित केली तसेच सैन्यदलाच्या वैद्यकीय चमुने त्यांच्या आरोग्यविषयक स्थितीची काळजी घेत त्यांच्या आरोग्य विषयक बाबींची तपासणी केली. भारतीय सैन्यदलाच्या या निरपेक्ष कृतीने बाधित नागरिकांच्या चेहऱ्यावर मनस्वी आनंद पसरला. भारतीय सैनिक हे केवळ सीमेचेच रक्षण करतात असे नाही तर मानवीय भाव -भावनांच्या सीमेचेही रक्षण त्यांनी केले यात शंका नाही. म्हणूनच म्हणावेसे वाटते की , . . . तेथे कर माझे जुळती ! 00000

जिल्ह्यात मंगळवारी सरासरी 15.9 मि. मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : जिल्ह्यात मंगळवार, दि. 30 जुलै रोजी सरासरी 15.9 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 53.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात दिनांक 30 जुलै रोजी पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 8.6 (437.7), जत 1 (273.5), खानापूर-विटा 6.7 (354.2), वाळवा-इस्लामपूर 30.2 (705.9), तासगाव 8.4 (432), शिराळा 53.5 (1104.9), आटपाडी 1.5 (254.1), कवठेमहांकाळ 5.9 (384.2), पलूस 18.4 (489.6), कडेगाव 16.8 (476.3).

वारणा धरणात 29.25 टी.एम.सी. पाणीसाठा

कोयना धरणातून 42 हजार 100 तर वारणा धरणातून 8 हजार 92 क्युसेक्स विसर्ग सांगली, दि. 31, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 29.25 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी आहे. सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे कोयना धरणातून 42 हजार 100 क्युसेक्स, वारणा धरणातून 8 हजार 92 क्युसेक्स तर अलमट्टी धरणातून 3 लाख 50 हजार क्युसेक्स विसर्ग सुरू असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 85.59 (105.25), धोम 11.38 (13.50), कन्हेर 8.06 (10.10), वारणा 29.25 (34.40), दूधगंगा 21.95 (25.40), राधानगरी 8.36 (8.36), तुळशी 3.28 (3.47), कासारी 2.26 (2.77), पाटगांव 3.72 (3.72), धोम बलकवडी 3.43 (4.08), उरमोडी 7.71 (9.97), तारळी 5.04 (5.85), अलमट्टी 67.67 (123). विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी (आज सकाळी 8 वाजेपर्यंत) व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 37.7 (40) व अंकली पूल हरिपूर 43.9 (45.11). 00000

मंगळवार, ३० जुलै, २०२४

नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना सतर्क रहाण्याचे आवाहन

सांगली दि. 30 (जि.मा.का.) : सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी कमी होत असली तरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये व मुक्त पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्याने, पाण्याचा येवा वाढल्यामुळे कोयना व इतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळीमध्ये अंदाजे 1 त 2 फुट वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांनी सतर्क रहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. आज दिनांक 30 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळी 38फूट 6 इंच इतकी आहे. आज कोयना धरणामधून 42 हजार 100, धोम धरणातून 453, कन्हेर धरणातून 4 हजार 622, उरमोडी धरणातून 500, तारळी धरणातून 3 हजार 526 व वारणा धरणातून 8 हजार 92 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. वेळोवेळी अद्ययावत माहितीचे निवेदन देण्यात येईल. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील 0233-2301820, 2302925या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे. 00000

शुक्रवार, २६ जुलै, २०२४

पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मिरज, वाळवा, पलूस व शिराळा तालुक्याणतील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना आज सुट्टी

सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस सुरू असल्याने व जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाच्या ठिकाणची पाणी पातळी 38.07 फुट झाल्याने कृष्णा नदीचे पाणी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सांगली जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने जिल्हयात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कायलीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय वि‌द्यार्थ्यांवर होऊ नये या करिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजा दयानिधी यांनी त्यांना प्राप्ती अधिकारान्वरये सांगली जिल्ह्यातील मिरज (सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रासह), वाळवा, पलूस व शिराळा या तालुक्यासतील सर्व अंगणवाडी, पूर्व प्राथमिक शाळा तसेच प्राथमिक, माध्यमिक विद्यालये, आश्रमशाळा व महावि‌द्यालये (शासकीय, निमशासकीय, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित सर्व) तसेच आयुक्तर व्यरवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्यार आस्थापपनेवरील शैक्षणिक संस्थे,तील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक 27 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. तथापी या कालावधीत सर्व मुख्यााध्याैपक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत / विद्यालयात / महाविद्यालयात उपस्थित राहून स्थायनिक प्रशासनाच्याक आदेशानुसार आपत्तीक व्येवस्थालपनाचे कामकाज करण्याचे आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. 00000

गुरुवार, २५ जुलै, २०२४

पुराच्या पाण्यात पुलावरून उड्या मारणे, सेल्फी काढण्यास मनाई

सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : चांदोली व कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे व सध्या पडत असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नदी पात्रात वाढ झाल्याने पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरीक गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. आयर्विन पुलावरुन तसेच नदी काठावरील असणाऱ्या गावांमध्ये काही तरुण मुले व नागरीक पुराच्या पाण्यात पुलावरून उड्या मारणे, स्टंटबाजी करून सेल्फी घेत असल्याचे प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 27 ठिकाणी व त्यापासुन 100 मिटर परिसरात पूर परिस्थिती सामान्य होईपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी भारतीय नागरीक संरक्षण संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार दिनांक 26 जुलै 2024 ते 6 ऑगस्ट 2024 या कालावधीसाठी पुढीलप्रमाणे मनाई आदेश जारी केला आहे. संबंधित ठिकाणांच्या 100 मीटर परिसरात 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी विनाकारण जमण्यास फिरण्यास, वावरण्यास, उभा राहण्यास, पाणी पाहण्यासाठी जाण्यास तसेच फोटो सेशन करण्यास, व्हिडीओ ग्राफी करण्यास, रील्स बनविण्यासाठी जाण्यास मनाई केली आहे. मनाई करण्यात आलेली पोलीस ठाणे हद्दितील ठिकाणे पुढीलप्रमाणे - सांगली शहर - आयर्विन पूल, सरकारी घाट, स्वामी समर्थ घाट. सांगली ग्रामीण - हरिपूर – नदीघाट, कसबेडिग्रज – कृष्णा नदी पूल, कवठेपिरान – सातसय्यद दर्गा, माळवाडी – कुंभोज पूल, दुधगाव – खोची पूल. मिरज ग्रामीण - म्हैशाळ बंधारा. महात्मा गांधी चौक - कृष्णा घाट ते अर्जुनवाड पूल, कृष्णा घाट. मिरज शहर - म्हैशाळ रोड वांडरे कॉर्नर. आष्टा - शिरगाव बंधारा, शिगांव पूल, वाळवा (हाळभाग) ते कारंदवाडी रस्ता. इस्लामपूर - बहे पूल, ताकारी पूल. शिराळा - सागांव वारणा नदी पूल. कोकरूड - चरण पूल, आरळा पूल कोकरूड पूल. भिलवडी - भिलवडी पूल, औदुंबर मंदिर, आमणापूर पूल, नागठाणे बंधारा, सुखवाडी ते तुंग नवीन पूल. विटा - कमळापूर ते रामापूर जाणारा पूल. हा आदेश दि. 26 जुलै 2024 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 6 ऑगस्ट 2024 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तथा डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. 00000

पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मिरज, वाळवा, पलूस व शिराळा तालुक्‍यातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना आज सुट्टी

सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : सांगली जिल्हयात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सांगली जिल्हयात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्‍कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय वि‌द्यार्थ्यांवर होऊ नये या करिता जिल्हाधिकारी सांगली तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजा दयानिधी यांनी त्यांना प्राप्‍त अधिकारान्‍वये सांगली जिल्ह्यातील मिरज (सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रासह), वाळवा, पलूस व शिराळा या तालुक्‍यातील सर्व अंगणवाडी, पूर्व प्राथमिक शाळा तसेच प्राथमिक, माध्यमिक विद्यालये, आश्रमशाळा व महावि‌द्यालये (शासकीय, निमशासकीय, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित सर्व) तसेच आयुक्‍त व्‍यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्‍या आस्‍थापने वरील शैक्षणिक संस्‍थेतील सर्व विद्यार्थ्यांना दिनांक 26 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर केली आहे. तथापी या कालावधीत सर्व मुख्‍याध्‍यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत / विद्यालयात / महाविद्यालयात उपस्थित राहून स्‍थानिक प्रशासनाच्‍या आदेशानुसार आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाचे कामकाज करण्याचे आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. 00000

पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन दक्ष

नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन दक्ष आहे. सन 2019 व सन 2021 मधील पुराचा अनुभव पाहता, जीवीत व वित्त हानी टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. सर्वांनी सतर्क रहावे. संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करताना जनतेने घाबरु नये. प्रशासनाशी संपर्कात रहावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. पूर परिस्थिती उदभवल्यास आवश्यक त्या ठिकाणी नागरिकांचे व जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येईल त्याकामी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. नदीपात्रापासून १०० मीटर परिसरामध्ये नागरिकांनी जाऊ नये फोटो, सेल्फी काढू नये. नदीपात्रावरील पूलावरून पाणी वाहत असल्यास अशा पुलावरून वाहने नेवू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. सांगली जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामूळे व सध्या पडत असलेल्या पावसाच्या पाण्यामूळे नदीपात्रातील पाण्यात वाढ झाल्याने त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊ नये या दृष्टीने भारतीय नागरी संरक्षण संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे मनाई आदेश लागू केला आहे. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सूरू असल्याने जिल्ह्यातील मिरज (सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपलिका क्षेत्रासह), वाळवा, पलूस व शिराळा या तालुक्यातील सर्व अंगणवाडी, पूर्व प्राथमिक शाळा तसेच प्राथमिक, माध्यमिक वि‌द्यालये, आश्रमशाळा व महावि‌द्यालये (शासकिय, निमशासकीय, खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित सर्व) तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना दि. 26 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे आदेश जारी केले आहेत. 00000

पूर परिस्थितीच्या अनुषंगाने शासन, प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करा - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

पालकमंत्र्यांनी सांगली व मिरज येथे केली पूर परिस्थितीची पाहणी सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्यास कृष्णा नदीतील पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन दक्ष आहे. पूर परिस्थितीच्या अनुषंगाने शासन, प्रशासन ज्या सूचना देते त्याचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे. शासन, प्रशासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज आयर्विन पूल सांगली व कृष्णाघाट मिरज येथे पूर परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसुळ, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, मिरज तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, सांगली अपर तहसिलदार अश्विनी वरूटे आदी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, पूरबाधित नागरिकांच्यासाठी निवारा केंद्र, भोजन, आरोग्य सुविधा, जनावरांसाठी चारा, पाणी आदीची आवश्यकतेप्रमाणे सोय करण्यात येईल. नागरिकांनी काळजी करू नये, येणाऱ्या संकटाचा सर्वांनी मिळून मुकाबला करावा. अलमट्टी येथील पाणी विसर्ग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. नागरिकांनी पुराच्या पाण्यात जावू नये तसेच स्वत:सह कुटुंबियांची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मिरज येथील नागरिकांनी शेतात जाण्यासाठी रस्ते व अन्य समस्या पालकमंत्र्यांच्या समोर मांडल्या, यावर त्यांनी त्यांच्या या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. 000000

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : सध्या सांगली जिल्ह्यामध्ये संभाव्य पूर परिस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सर्व यंत्रणांनी आपापसामध्ये समन्वय ठेवून आपली जबाबदारी चोखरित्या पार पाडावी. या कामी हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिला. आपत्ती व्यवस्थापन विभागाची आज जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर आमदार सुधीर गाडगीळ, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मनपा अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफीक नदाफ आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, जिल्हा प्रशासनाने जनावरांसाठी चाऱ्यांची व्यवस्था करावी. निवारा केंद्रात स्थलांतरित लोकांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच त्या ठिकाणी आरोग्यविषयक सुविधा देण्यात याव्यात. त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी आपले फोन 24 तास सुरू ठेवावेत तसेच जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना आपत्तीच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घ्यावे. कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये तसेच आपत्ती कालावधीत रजा घेऊ नये. प्रत्येक अधिकारी फिल्डवर पाहिजे अशा सूचना करून जिल्ह्यातील ताकारी, टेंभू-म्हैसाळ या योजनेतून सांगली तसेच सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील तालुक्यांना पाणी सोडावे, असे निर्देश ही त्यांनी या बैठकीत दिले. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने महसूल, पोलीस, जिल्हा परिषद तसेच एसटी विभागाशी संपर्क साधून जिल्ह्यातील बंद रस्त्याबाबत माहिती घ्यावी. त्याचबरोबर बाधित नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रामध्ये मुख्याध्यापकांची सेवा घेण्यात यावी. आपत्कालीन परिस्थितीमध्ये विशेषत: गरोदर स्त्रियांची योग्य काळजी घ्यावी तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने, नागरिकांना स्वच्छ पाणी देण्याबाबत योग्य ते नियोजन करावे. आरोग्य विभागाने आपत्कालीन स्थितीत आरोग्य विषयक सर्व यंत्रणा अद्ययावत ठेवावी असे निर्देश दिले. तर पूर बाधीत ग्रामीण भागांमध्ये निवारा केंद्राची आवश्यकतेनुसार उभारणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी दिली. त्याचबरोबर सांगली मनपाकडून आपत्कालीन परिस्थितीच्या निवारणार्थ केलेल्या उपाययोजनांची माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी यावेळी दिली. प्रारंभी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफीक नदाफ यांनी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती प्रास्ताविकामध्ये दिली. या बैठकीसाठी संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांसह इतर अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. 00000

शुक्रवार, १९ जुलै, २०२४

अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांनी मिनी टॅक्टर पुरवठा योजनेंतर्गत 23 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करावेत - सहायक आयुक्त जयंत चाचरकर

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी टॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना सुरू असून या योजनेकरिता सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने वाटप करण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांनी योजनेच्या निकषानुसार व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव दि. 23 ऑगस्ट 2024 पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण सांगली कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. योजनेचे निकष - अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत. स्वयंसहायता बचत गटातील 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती घटकातील असावेत. स्वयंसहायता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत. बचत गट नोंदणीकृत असावा. प्रस्तावास आवश्यक कागदपत्रे - स्वयंसहायता बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र (तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी, पंचायत समिती इ.). स्वयंसहायता बचत गटाच्या नांवे असलेले राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स व या खातेशी अध्यक्ष व सचिव यांचे आधारलिंक असलेचा पुरावा. स्वयंसहायता बचत गटाचा ठराव व सभासद यादी. स्वयंसहायता बचत गटातील सर्व सदस्यांचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले जातीचे दाखले. स्वयंसहायता बचत गटातील सर्व सभासदांचे सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले रहिवाशी पुरावे. (डोमेसाईल). स्वयंसहायता बचत गटातील सर्व सभासदांचे आधारकार्ड झेरॉक्स. 100 रू स्टँम्पवर ट्रॅक्टर खरेदीबाबतचे हमीपत्र. सर्व कागदपत्रे ही साक्षांकीत केलेली असावीत. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहायता इच्छुक बचत गटांनी दि. 23 ऑगस्ट 2024 पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण सांगली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगाव रोड, सांगली येथे प्रस्ताव सादर करावेत. अधिक माहीतीसाठी समाज कल्याण सांगली कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे. 00000

सर्व धर्मियांमधील 60 वर्षावरील नागरिकांसाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना”

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील 14 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राबविण्यास मान्यता दिली आहे. देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांचीही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते. परंतु, गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे किंवा कोणी सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. ही बाब विचारात घेवून सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे ‍किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची / दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे. या योजनेतून प्रति व्यक्ती 30 हजार रुपये खर्चाची कमाल मर्यादा असून यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी बाबींचा समावेश असेल. भारतातील 73 व राज्यातील 66 निर्धारित स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता योजनेतून एकवेळ लाभ घेता येईल. या योजनेतून पात्र प्रवाशांची निवड ही पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे करण्यात येईल. योजनेतून निवड होण्यासाठी इच्छुक ज्येष्ठ नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. अर्ज करण्यासाठी नवीन वेबसाईट तयार करण्याचे काम शासनस्तरावर सुरू आहे. अर्ज करताना आधारकार्ड, रेशनकार्ड, अधिवासबाबत पुरावा, उत्पन्न दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल क्रमांक, योजनेच्या अटी पालन करणावावत हमीपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक राहतील. योजनेचे अर्ज स्विकारण्याकामी शासन स्तरावरून पोर्टल सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. तत्पूर्वी योजनेच्या अनुषंगाने इच्छुक ज्येष्ठ नागरिकांनी कागदपत्रांची पुर्तता आपल्या स्तरावर करावी व पोर्टल सुरू होताच अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. चाचरकर यांनी केले आहे. 00000

युवकांमध्ये एड्स जनजागृतीसाठी सांगलीत रेड रन मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून 12 ऑगस्ट हा दिवस साजरा केला जातो. या अनुषंगाने युवकांच्या मध्ये एच.आय.व्ही. - एड्स विषयी जनजागृती करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आज सांगली येथे रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभीषण सारंगकर, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरावडेकर व रोटरी क्लच अध्यक्ष मनिष मराठे यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथून सुरूवात होवून विश्रामबाग चौक- सांगली मार्केट यार्ड -पुष्कराज चौक - मार्गे सिव्हील हॉस्पीटल येथे सांगता झाली. या स्पर्धेकरीता जिल्ह्यातील कार्यरत 9 रेड रिबन क्लब कार्यान्वीत असणाऱ्या महाविद्यालयांना तसेच जिल्ह्यातील इतर महाविद्यालयांना निमंत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेचे नियोजन हे सांगली जिल्हा ॲम्युचुअर ॲथलेटिक असोसिएशन यांच्या सहकार्यालने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष सांगली कार्यालयाकडून करण्यात आले. रेड रन मॅरेथॉन स्पर्धेकरीता आदर्श कॉलेज विटा, आर. आर. पाटील कॉलेज सावळज, म्हैशाळ कॉलेज म्हैशाळ यांचे प्राध्यापक वर्ग तसेच गुलाबराव पाटील कॉलेज मिरज, यशवंतराव चव्हाण कॉलेज व कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज इस्लामपूर, डॉ. बापुजी साळुंखे कॉलेज मिरज, बळवंत कॉलेज विटा सहभागी झाले होते. तसेच ही स्पर्धा सुरळीत पार पाडण्याकरिता जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, आयसीटीसी, गुप्तरोग विभाग, एआरटी कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले. रेड रन मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक बाबासो अनिल कुडलापघोळ (डॉ. बापुजी साळुंखे कॉलेज मिरज), व्दितीय क्रमांक अनिकेत कुडलापघोळ (डॉ. बापुजी साळुंखे कॉलेज मिरज), तृतीय क्रमांक हर्षवर्धन कृष्णात पाटील (कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज इस्लामपूर) यांनी पटकावला. मुलींमध्ये प्रथम क्रमांक ऋतुजा भारत सोनवणे (बळवंत कॉलेज विटा), व्दितीय क्रमांक उषा तुकाराम चव्हाण (मा. आर.आर. पाटील कॉलेज सावळज), तृतीय क्रमाक प्रतिक्षा भारत सोनवणे (आदर्श कॉलेज विटा) यांनी पटकवला. या स्पर्धेचे बक्षिस वितरण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विभीषण सारंगकर, मनिष मराठे व पदाधिकारी यांच्या हस्ते सिव्हील हॉस्पीटल सांगली येथे करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा ॲम्युचुअर ॲथलेटिक असोसिएशनचे पदाधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विवेक सावंत, जिल्हा पर्यवेक्षक प्रमोद संकपाळ उपस्थित होते. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त मुले व मुली राज्यस्तरीय रेड रन मॅरेथॉन स्पर्धेसाठी पात्र झाली असून ही स्पर्धा ठाणे येथे होणार आहे. 00000

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्या - जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' महाराष्ट्र शासनाने 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्य विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त पात्र विद्यार्थी व आस्थापनांनी लाभा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी केले आहे. या योजनेच्या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय/निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. तसेच 12 वी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार, आयटीआय/पदविका प्रशिक्षणार्थींना 8 हजार आणि पदवीधर/पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना 10 हजार प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने दि. 9 जुलै 2024 रोजी प्रकाशित केला आहे. उमेदवाराची पात्रता • किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असावे. • किमान शैक्षणिक पात्रता 12 वी पास/आयटीआय/पदवीका/पदवी/पदव्युत्तर असावी. (मात्र, शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेस सहभागास पात्र असणार नाहीत.) • उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. • त्याचे आधार नोंदणी असावे. बँक खाते आधार संलग्न असावे. • कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in /#/register या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. आस्थापना/उद्योगासाठीची पात्रता • आस्थापना/उद्योग महाराष्ट्रात कार्यरत असावा. • आस्थापना/उद्योगाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar. mahaswayam.gov.in/#/employer_registration या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावा. • आस्थापना/उद्योगाची स्थापना किमान 3 वर्षापूर्वीची असावी. • आस्थापना/उद्योगानी ईपीएफ, ईएसआयसी, जीएसटी, सर्टीफिकेट ऑफ इन कॉर्पोरेशन, डीपीआयटी व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावा. कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल. या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. या योजनेंतर्गत किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्यप्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील. खासगी क्षेत्रातील आस्थापना/उद्योजकांकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10 टक्के व सेवा क्षेत्रासाठी 20 टक्के उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय/निमशासकीय आस्थापना/उद्योग/महामंडळ यामध्ये मंजूर पदांच्या 5 टक्के उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. जिल्हास्तरीय कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती या योजनेचा वेळोवेळी आढावा घेईल. योजनादूत शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिध्दी करणे व जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी योजनादूत नेमण्याची योजना सन 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतसाठी 1 व शहरी भागात 5 हजार लोकसंख्येसाठी 1 याप्रमाणे एकूण 50 हजार 'योजनादूत' नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. योजनादूतांचे विद्यावेतनही या योजनेमधून अदा करण्यात येईल. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर सांगली येथे संपर्क साधावा. 00000

मुख्यमंश्री वयोश्री योजना (ग्रामीणस्तर) अर्ज करण्यासाठी 7 ऑगस्ट अंतिम मुदत

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : 65 वर्षे वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपायोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीव्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यास दि. 7 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यास त्याच्या आधारसंलग्न खात्यावर 3 हजार रूपये एकदाच वर्ग करण्यात येणार आहेत. त्यास अनुसरून सांगली जिल्ह्याअंतर्गत ग्रामीण तसेच तालुका क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्जासोबत आधार कार्ड झेरॉक्स, उपकरण हवे असल्याबाबतचे वैद्यकिय प्रमाणपत्र, जन्म तारखेचा पुरावा, दोन फोटो, राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स,उत्पन्नाबाबत स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे. या योजनेसाठी दाखल करावयाचा अर्ज विनामुल्य आहे. हा अर्ज ग्रामीणस्तरावर ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक तसेच नजिकच्या अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, यांच्याकडे उपलब्ध असून नगरपालिका/नगरपंचायतस्तरावर मुख्याधिकारी तथा त्यांनी नेमून दिलेले नोडल अधिकारी यांच्याकडे अर्ज उपलब्ध आहेत. अर्जात नमुद केलेल्या आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन परिपूर्ण अर्ज त्यांचेकडेच जमा करावा, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे. 00000

माजी सैनिकांच्या पाल्यांकरीता शिष्यवृत्ती योजना

सांगली, दि. 19, (जि. मा. का.) : सन 2023-24 या शैक्षणीक वर्षात इयत्ता 10 वी, 12 वी, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये कमीत कमी 60 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण होवून पुढील वर्गात शिकत असलेल्या माजी सैनिक, दिवंगत माजी सैनिक पत्नीच्या / माजी सैनिकांच्या अनाथ पाल्यांना संपूर्ण / उर्वरित कालावधीकरीता शिष्यवृत्ती प्रदान करण्याकरीता संबंधितांनी दि. 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सांगली यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधितांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, सांगली येथे प्रत्यक्ष अथवा 0233-2990712 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. 00000

सोमवार, १५ जुलै, २०२४

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेपासून एकही पात्र महिला वंचित राहू नये - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्याचबरोबर त्यांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे तसेच त्यांच्या सशक्तीकरणास चालना मिळावी या उद्देशान महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण ही योजना कार्यान्वीत केली आहे. या योजनेपासून सांगली जिल्ह्यातील एकही पात्र महिला वंचित राहता कामा नये, असे निर्देश कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, महानगरपालिका उपायुक्त शिल्पा दरेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संदीप यादव उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे पुढे म्हणाले, या योजनेची अंमलबजावणी करत असताना कोणी पैशाची मागणी केल्यास त्याच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. विंशेषत: ग्रामीण भागात या योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी रिक्षाव्दारे प्रसिध्दी करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत या योजनेच्या परिपूर्ततेसाठी तसेच या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने सांगली जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर यावा यासाठी प्रशासनाने सर्वोतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रारंभी या योजनेसंदर्भात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संदीप यादव यांनी सादरीकरण केले. तर योजनेपासून कोणतीही पात्र महिला वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी दिली. या बैठकीसाठी तहसिलदार लिना खरात यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. 00000

वारणा धरणात 19.90 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 19.90 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 40.43 (105.25), धोम 4.91 (13.50), कन्हेर 3.85 (10.10), वारणा 19.90 (34.40), दूधगंगा 10.56 (25.40), राधानगरी 4.59 (8.36), तुळशी 1.92 (3.47), कासारी 1.65 (2.77), पाटगांव 2.65 (3.72), धोम बलकवडी 0.92 (4.08), उरमोडी 2.47 (9.97), तारळी 2.27 (5.85), अलमट्टी 91.66 (123). विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 18 (40) व अंकली पूल हरिपूर 18.11 (45.11). 000000

जिल्ह्यात काल सरासरी 39.5 मि. मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 39.5 मि. मी. पावसाची नोंद झाली असून वाळवा-इस्लामपूर तालुक्यात सर्वाधिक 71.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 40.7 (295.4), जत 4.5 (248.5), खानापूर-विटा 29.5 (254.4), वाळवा-इस्लामपूर 71.1 (391), तासगाव 34.5 (312), शिराळा 58.3 (495), आटपाडी 5.4 (222.1), कवठेमहांकाळ 28.9 (324.2), पलूस 52.7 (285.6), कडेगाव 38.3 (296.9). 00000

शनिवार, १३ जुलै, २०२४

वारणा धरणात 18.23 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 18.23 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 36.23 (105.25), धोम 4.84 (13.50), कन्हेर 3.67 (10.10), वारणा 18.23 (34.40), दूधगंगा 9.88 (25.40), राधानगरी 4.21 (8.36), तुळशी 1.89 (3.47), कासारी 1.50 (2.77), पाटगांव 2.55 (3.72), धोम बलकवडी 0.76 (4.08), उरमोडी 2.27 (9.97), तारळी 2.02 (5.85), अलमट्टी 90.33 (123). विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 7.9 (40) व अंकली पूल हरिपूर 8.5 (45.11). 000000

जिल्ह्यात काल सरासरी 8.6 मि. मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 14, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 8.6 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 37.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 5.9 (254.5), जत 0.1 (244), खानापूर-विटा 1.9 (224.9), वाळवा-इस्लामपूर 15.6 (319.9), तासगाव 3.3 (277.3), शिराळा 37.7 (436.7), आटपाडी 0.9 (216.7), कवठेमहांकाळ 1.7 (295.3), पलूस 5.5 (232.9), कडेगाव 6.2 (258.6). 00000

शुक्रवार, १२ जुलै, २०२४

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना लाभासाठी जिल्ह्यात आत्तापर्यंत 1 लाख 19 हजार 681 महिलांची नोंदणी - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

नारी शक्ती दूत ॲपवरून भरता येणार ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ चा अर्ज सांगली, दि. 12 (जि.मा.का.) : राज्य शासनामार्फत ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत 1 लाख 19 हजार 681 महिलांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या अर्जामध्ये 58 हजार 679 महिलांनी ऑनलाईन तर 67 हजार 2 महिलांनी ऑफलाईन नोंदणी केली आहे. या प्राप्त अर्जांची छाननी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज योजनेबाबत माहिती देताना पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, ‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिला वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन संवेदनशील आहे. या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यास 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया विनामुल्य आहे. पात्र महिलांनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. महिलांना या योजनेचा अर्ज ‘नारी शक्ती दूत’ या ॲपवरूनही भरता येणार आहेत. ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ या योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांनी गुगल प्ले स्टोअरवरून नारी शक्ती दूत ॲप डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती, आशा सेविका, लाभार्थी महिलांना हे ॲप डाऊनलोड करून घेता येईल. अर्जासमवेत भरावयाची माहिती कागदपत्रे अशी : आधार कार्डची प्रत (दोन्ही बाजूने), महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर त्याऐवजी त्या महिलेचे १५ वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, १५ वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व जन्मदाखला यापैकी कोणतेही एक ओळखपत्र/प्रमाणपत्र सादर करावे). परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक सादर करावे. नवविवाहीत महिलेच्या बाबतीत तीचे नाव रेशनकार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली असून या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा 1 हजार 500 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेच्या अनुषंगाने काही अडचणी आल्यास जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सांगली अथवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सांगली यांच्याशी सपंर्क साधावा. उत्पन्न प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखांपर्यंत असणे अनिवार्य आहे.) मात्र, पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट मिळणार आहे. त्यासाठी रेशनकार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानाची एका पानावर प्रत घेऊन ती अपलोड करावी. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाईल. यादी जाहीर केलेल्या दिनांकापासून पाच दिवसांपर्यंत तक्रार नोंदविता येईल. तक्रर अंगणवाडी सेविका / मुख्य सेविका / सेतु सुविधा केंद्रामार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे नोंदविता येईल. तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत असून तक्रार निवारणानंतर अंतिम यादी जाहीर केली जाईल. गावपातळीवर ग्रामसेवक, कृषि सहायक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका असणार आहेत. या समितीमार्फत गावपातळीवर शिबीर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने नोंदणी करावयाची आहे. महापालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली. 0000

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन 15 जुलैला

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : तालुका, जिल्हा, विभागीय व मंत्रालयीन स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन तर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. माहे जुलै महिन्याचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार, 15 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संदीप यादव यांनी दिली. समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. महिलांनी आपल्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक कराव्यात. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी, सामुहिक स्वरूपाचे तक्रार अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन श्री. यादव यांनी केले आहे. 00000

शालेय क्रीडा स्पर्धांच्या नियोजनासाठीच्या बैठकीसाठी शिक्षकांना उपस्थित रहाण्याचे आवाहन

सांगली, दि. 12, (जि. मा. का.) : सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये घेण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजन, नियोजनासाठी व ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले आहे. मिरज व तासगाव तालुक्यासाठी 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता तर सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रासाठी 16 जुलै रोजी दुपारी 3 वाजता नव कृष्णा व्हॅली इंग्लीश मेडियम स्कुल कुपवाड या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 18 जुलै रोजी जत व कवठेमहांकाळ तालुक्यासाठी सकाळी 11 वाजता पी.डि.व्ही.पी. कॉलेज कवठेमहांकाळ येथे तर खानापूर व आटपाडी तालुक्यासाठी दुपारी 3 वाजता कि.क. गुळवणी माध्यमिक विद्यालय कडेगाव येथे, दिनांक 19 जुलै रोजी कडेगाव व पलुस तालुक्यासाठी सकाळी 11 वाजता मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय कडेगाव येथे तर शिराळा व वाळवा तालुक्यासाठी दुपारी 3 वाजता श्रीमती कुसुमताई राजाराम बापू पाटील कन्या महाविद्यालय इस्लामपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरण-2012 अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्धांचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये आयोजित करावयाच्या भारतीय शालेय खेळ महासंघाव्दारे पुरस्कृत 93 खेळ प्रकारांचे आयोजन करण्यास शासनस्तरावर मान्यता प्रदान करण्यात आली आहे. 93 क्रीडा प्रकारापैकी 10 क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा तालुकास्तरावर व इतर क्रीडा प्रकारांच्या जिल्हास्तर पासून घेण्यात येणार आहेत. इयत्ता 6 वी ते इयत्ता 12 वी मध्ये शिकत असणारे विद्यार्थी या शालेय क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होवू शकतील, असे श्री. बोरवडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

गुरुवार, ११ जुलै, २०२४

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावर 52 कोटी 76 लाख व्याज परतावा - जिल्हा समन्वयक निशा पाटील

सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत सन 2018-19 ते 2023-24 या वर्षात 5 हजार 953 मंजूर प्रकरणात विविध बँकांमार्फत देण्यात आलेल्या 591 कोटी 76 लाख रूपये कर्जापोटी महामंडळाकडून आत्तापर्यंत 52 कोटी 76 लाख रूपये कर्जव्याज परतावा लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. एप्रिल 2023 पासून आत्तापर्यंत 208 कोटी 53 लाख रूपये बँकेतर्फे कर्ज वाटप करण्यात आले आहे. महामंडळाकडून यासाठी 82 लाख 75 हजार व्याज परतावा लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला आहे, अशी माहिती महामंडळाच्या जिल्हा समन्वयक निशा पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली. याबाबत अधिक माहिती देताना श्रीमती पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे, सन 2018-2019 या वर्षात 533 प्रकरणे, सन 2019-2020 मध्ये 717, सन 2020-2021 मध्ये 761, सन 2021-2022 मध्ये 843, सन 20222-2023 मध्ये 1 हजार 163 आणि सन 2023-2024 मध्ये 1 हजार 936 प्रकरणे विविध बँकामार्फत मंजूर करण्यात आली आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज फेब्रुवारी 2018 ते आतापर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे सुरु आहे. महामंडळाच्या कामकाजामध्ये अतिशय पारदर्शकता आहे. लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणांच्या प्रस्तावाबाबत महामंडळामार्फत नियमित पाठपुरावा केला जातो. तसेच रजिस्ट्रेशन केलेल्या प्रत्येक लाभार्थ्याशी संपर्क साधून त्यांच्या अडचणी समजून घेऊन योग्यती मदत केली जाते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी केली जात असून व्याज परतावा लाभार्थ्यांना वेळेवर मिळत आहे त्यामुळे बँकांचाही चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाकडील प्रतिनिधी बँकांना प्रत्यक्ष भेट देऊन आणि दर तीन महिन्याला प्रत्येक तालुक्यात पंचायत समिती येथे बी.एल.बी.सी. बैठकीमध्ये महामंडळाकडील योजनांच्या कर्ज प्रकरणाबाबत काही अडचणी असल्यास लाभार्थी आणि बँका यांचे प्रश्न सोडवत आहेत. जिल्हास्तरावरील डी.एल.सी.सी. बैठकीमध्ये यावरती चर्चा करण्यात येऊन लाभार्थींना मदत करण्याबाबत बँकेंच्या प्रतिनिधींना सूचना दिल्या जातात. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील योजनेमध्ये जिल्ह्यात बँकांनी आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल डी.एल.सी.सी. बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आणि जिल्हा उपनिबंधक यांचा सत्कार करण्यात आला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी काही अडचणी किंवा शंका असेल तर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत विजयनगर, सांगली येथील जिल्हा कौशल्य विभागाअंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाला भेट द्यावी, असे आवाहनही श्रीमती निशा पाटील यांनी केले आहे. 000000

वारणा धरणात 17.36 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 17.36 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 33.03 (105.25), धोम 4.65 (13.50), कन्हेर 3.46 (10.10), वारणा 17.36 (34.40), दूधगंगा 9.06 (25.40), राधानगरी 3.98 (8.36), तुळशी 1.79 (3.47), कासारी 1.31 (2.77), पाटगांव 2.40 (3.72), धोम बलकवडी 0.52 (4.08), उरमोडी 2.10 (9.97), तारळी 1.87 (5.85), अलमट्टी 84.59 (123). विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 8.6 (40) व अंकली पूल हरिपूर 9.3 (45.11). 000000

जिल्ह्यात काल सरासरी 1.8 मि. मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 3.9 (243.7), जत 0.3 (233.7), खानापूर-विटा 0.6 (221.1), वाळवा-इस्लामपूर 0.3 (299.1), तासगाव 3.4 (271.4), शिराळा 2.9 (379.8), आटपाडी 0.0 (215.4), कवठेमहांकाळ 2.7 (292.8), पलूस 0.3 (223.1), कडेगाव 2.2 (248.7). 00000

सोमवार, ८ जुलै, २०२४

पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : वंचित दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रगत आणि उत्पादनात तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पीक स्पर्धेमध्ये सहभागी होतील या दृष्टीकोनातून खरीप हंगाम 2023 पासून पीक स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येत आहे. कृषि विभागामार्फत खरीप हंगाम सन 2024-25 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ख. ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या 19 पिकासाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. पीक स्पर्धेतील पीके - खरीप पिके - भात, ख. ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल (एकूण 11 पीके). पात्रता निकष - स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर भात पिकाच्या बाबतीत किमान 20 आर (0.20 हे.) व इतर पिकांच्या बाबतीत किमान 40 (0.40 हे.) आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे - विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-31), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, 7/12, 8-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12 वरील पोषित केलेल्या चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख - खरीप हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख मुग व उडीद पीकासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2024, भात, खरिप ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल ३१ ऑगस्ट २०२४. अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात येईल. तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर व राज्य स्तरावरील पीक स्पर्धा निकाल प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क - पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रकम 300 रूपये राहील व आदिवासी गटासाठी रकम 150 रूपये राहील. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुका पातळीवर प्रथक क्रमांकास 5 हजार रूपये, व्दितीय क्रमांकास 3 हजार रूपये व तृतीय क्रमांकास 2 हजार रूपये बक्षीस आहे. जिल्हा पातळीवर प्रथक क्रमांकास 10 हजार रूपये, व्दितीय क्रमांकास 7 हजार रूपये व तृतीय क्रमांकास 5 हजार रूपये बक्षीस आहे. राज्य पातळीवर प्रथक क्रमांकास 50 हजार रूपये, व्दितीय क्रमांकास 40 हजार रूपये व तृतीय क्रमांकास 30 हजार रूपये बक्षीस आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. 00000

शिराळा तालुक्यात 16.1 मि.मी. पावसाची नोंद

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 4.6 मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक 16.1 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 4.5 (239.3), जत 1.3 (230.5), खानापूर-विटा 1.1 (219), वाळवा-इस्लामपूर 9.6 (298.9), तासगाव 1.4 (266.6), शिराळा 16.1 (374.1), आटपाडी 1.1 (210.2), कवठेमहांकाळ 0.5 (290), पलूस 3.1 (222.1), कडेगाव 1.2 (245.9). 00000

वारणा धरणात 16.66 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 16.66 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 30.84 (105.25), धोम 4.60 (13.50), कन्हेर 3.06 (10.10), वारणा 16.66 (34.40), दूधगंगा 8.33 (25.40), राधानगरी 3.87 (8.36), तुळशी 1.71 (3.47), कासारी 1.25 (2.77), पाटगांव 2.32 (3.72), धोम बलकवडी 0.45 (4.08), उरमोडी 1.90 (9.97), तारळी 1.67 (5.85), अलमट्टी 64.59 (123). विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. आयर्विन पूल सांगली 11.6 (40) व अंकली पूल हरिपूर 15.4 (45.11). 000000

रेल्वे पुलाच्या कामकाजास्तव वाहतूक मार्गात बदल

सांगली दि. 8 (जि.मा.का.) : सांगली ते नांद्रे स्थानकादरम्यान पंचशिलनगर (जुना बुधगाव रोड) येथील रेल्वे गेट LC 129 Km 269/1-2 वरील रेल्वे पुलाच्या कामकाजास्तव समाज कल्याण कार्यालय सांगली ते रेल्वे गेट पर्यंतचा मूळ रस्त्याला रेल्वे गेट पर्यंत समांतर रस्ता तयार करून सदर पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. मोटार वाहन कायदा 1988 कलम 115 व 116 अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी हे आदेश जारी केले असून वाहतूक सुरक्षा उपाययोजनेव्दारे वाहतूक नियंत्रित करण्याचे आदेशही निर्गमित केले आहेत. जनतेच्या व वाहन चालकाच्या माहितीसाठी योग्य ठिकाणी दिशाचिन्हे, माहिती लावणे संदर्भातील उपाययोजना अतिरिक्त महाव्यवस्थापक महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मुंबई, कार्यकारी अभियंता मध्य रेल्वे, मिरज, पोलीस अधीक्षक सांगली, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांनी एकत्रितपणे कराव्यात. अतिरिक्त महाव्यवस्थापक महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मुंबई व सहा. विभागीय अभियंता मध्य रेल्वे मिरज यांनी रेल्वे गेट LC 129 Km 269/1-2 वरून होणारी वाहतूक वळविण्यात आल्याबाबतची माहिती जनतेला होण्यासाठी ग्रामीण व शहरातील महत्वाच्या सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी याबाबतची अधिसूचना तसेच वाहतुकीसाठी उपलब्ध पर्यायी मार्गाच्या माहितीस पुरेशी प्रसिध्दी द्यावी. तसेच या निर्णयाची तात्काळ व संपूर्ण अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी. सदर ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने RPF / Railway Police कडील अंमलदार यांची नियुक्ती करण्यात यावी. ही अधिसूचना दि. 13 जुलै 2024 रोजीपासून अंमलात येईल, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत. 00000

सोमवार, १ जुलै, २०२४

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते रोपे विक्री कक्षाचे उद्घाटन

सांगली, दि. 1 (जि.मा.का.) : सामाजिक वनीकरण विभाग व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रोपे विक्री कक्ष सुरु करण्यात आला असून या कक्षाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते आज करण्यात आले. या कार्यक्रमास उप वनसंरक्षक निता कट्टे, सहायक उप वनसंरक्षक अजित साजने, सहाय्यक वनसंरक्षक रणजित गायकवाड, विभागीय वन अधिकारी प्रशांत वरुडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, वनक्षेत्रपाल विक्रम गुरव यांच्यासह वन व सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी-कर्मचारी, उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते महिलांना वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले. या कक्षामार्फत केंद्रशासनाद्वारे सुरु करण्यात आलेली योजना "एक पेड माँ के नाम" व राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली योजना "अमृत वृक्ष आपल्या दारी" या दोन योजना व सद्यस्थितीत सुरु असलेली वन महोत्सव कालावधीत वृक्ष लागवडीकरीता उपलब्ध रोपांची माहिती देऊन रोपे वाटप करण्यात येणार आहेत. रोप लागवड करण्याकरीता आवश्यक रोपे या कक्षावर व दोन्ही विभागातील रोपवाटीकेमध्ये उपलब्ध रोपे वन महोत्सव कालावधीत सवलतीच्या दरात मिळणार आहेत. रोपे विक्री कक्षामार्फत "अमृतवृक्ष" मोबाईल अॅप व वेब अॅप बाबतची माहिती देण्यात येणार असून जिल्ह्यात उपलब्ध रोपे, रोपवाटीकांचे स्थळ व रोपवाटीका समन्वयक आदींची माहिती एकाच ठिकाणी मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. "एक पेड माँ के नाम" व "अमृत वृक्ष आपल्या दारी या मोहिमेत सांगली जिल्ह्यातील नागरिक, निसर्गप्रेमींनी सहभागी होऊन जास्तीत जास्त वृक्षलागवड करावी व वृक्षांचे संगोपन करावे, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभाग व वन विभागामार्फत यावेळी करण्यात आले. 00000

कृषी दिनानिमित्त आयोजित प्रभात फेरीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

सांगली, दि. 1 (जि.मा.का.) :- माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात येते. या निमित्ताने कृषि विभाग व राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आज प्रभात फेरी काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते पालखीमध्ये गुलाबाचे रोपटे ठेवून प्रभात फेरीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, उप वनसंरक्षक निता कट्टे, सहायक उप वनसंरक्षक अजित साजने, विभागीय वन अधिकारी प्रशांत वरुडे यांच्यासह कृषी व वन विभागातील अधिकारी व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. 0000

भूकरमापक तथा लिपीक-टंकलेखक संवर्गाची सुधारित प्रतिक्षायादी प्रसिद्ध

सांगली, दि. 1 (जि.मा.का) : उपसंचालक भूमि अभिलेख पुणे प्रदेश पुणे यांच्या अधिनस्त विभागातील गट क पदसमूह 4 (भूकरमापक तथा लिपीक टंकलेखक) संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी दि 28 एप्रिल 2023 रोजी निवडसूची व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली होती. आता जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांच्याकडील दि. 26 एप्रिल 2024 व 19 जून 2024 रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या सुचनेनुसार ऑनलाईन परिक्षा निकालाच्या (सर्वसाधारण गुणवत्ता यादी) आधारे प्रादेशिक निवड समितीने दि. 17 ते 21 एप्रिल 2023 या कालावधीत कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र ठरविलेल्या उमेदवारांकडून विभागातील उपलब्ध सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेवून यापूर्वी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रतिक्षायादीतील नेमणूक दिलेले व निवड रद्द करण्याबाबत विनंती केलेले उमेदवार वगळून विभागातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने प्रादेशिक निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय सुधारित प्रतिक्षायादी प्रसिध्द केली आहे, असे पुणे प्रदेश पुणे चे उपसंचालक भूमि अभिलेख अनिल माने यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. 00000