शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१८

दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभिवादन

सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री आणि राजस्थानचे राज्यपाल वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वित्त आणि नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. यावेळी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, वसंतदादा पाटील यांच्या स्नुषा शैलजा पाटील आदि उपस्थित होते. यावेळी वसंतदादा पाटील यांचे विचार आजही महाराष्ट्राला मार्गदर्शक प्रेरणादायी आहेत. त्यांच्यामुळे सहकार क्षेत्राचा आणि परिणामी परिसराचा विकास झाला असल्याचे मत व्यक्त करून वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा