शुक्रवार, ९ जून, २०१७

महिला व बाल विकास विभागाच्या पुरस्कारासाठी 27 जूनपर्यंत प्रस्ताव सादर करावेत - बी. सी. पाटील

सांगली, दि. 9, (जि. मा. का.): केंद्र शासनाच्या महिला बाल विकास विभागामार्फत शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक कार्य किंवा खेळामध्ये दाखविलेल्या विशेष नैपुण्यासाठी "विशेष नैपुण्य पुरस्कार", मुलांसाठी विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती संस्थेस "राजीव गांधी मानवसेवा पुरस्कार" "राष्ट्रीय बाल कल्याण पुरस्कार" दरवर्षी प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारासाठी इच्छुक मुले, व्यक्ती संस्थांनी आपले प्रस्ताव 27 जून 2017 पर्यत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी बी. सी. पाटील यांनी केले आहे.
पुरस्काराची विस्तृत माहिती, अर्जाचा नमुना तसेच पुरस्कार पात्रतेच्या अटी शर्थी केंद्र शासनाची वेबसाईट http://www.wcd.nic.in वर उपलब्ध आहे. इच्छुकांनी त्यांचे पुरस्काराचे प्रस्ताव हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्येच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सांगली यांच्याकडे तीन प्रतीत पाठवावेत, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे.
या पुरस्कारासाठी अटी शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. राष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार सन 2016 (व्यक्ती) -  बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. वेतनावर कार्य करण्यावर व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. पुरस्कार स्वरुप व्यक्तीस 1 लाख रुपये रोख आणि प्रशस्तिपत्र असे आहे.
राष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार सन 2016 (संस्था)  - बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार दिला जातो तसेच संस्थेमार्फत बालकांचे पुनवर्सन होणे आवश्यक आहे. पुरस्कार स्वरुप संस्थेस 3 लाख रूपये रोख आणि प्रशस्तिपत्र असे आहे.
   राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार 2017 - मुलांच्या कल्याणासाठी विशेषत: शारीरिक मानसिक अपंगत्व असलेल्या मुलांच्या कल्याणासाठी कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन घेता उदात्त भावनेतून सलग 10 वर्षे वैशिष्टयपूर्ण अव्दितीय काम करणाऱ्या व्यक्तीस राजीव गांधी मानवसेवा पुरस्कार केंद्र शासनामार्फत दिला जातो. हा पुरस्कार बालकंाचा विकास, बालकांचे संरक्षण बालकांचे कल्याण या तीन क्षेत्रात विशेष सहभाग घेणाऱ्यास देण्यात येतो. पुरस्काराचे स्वरुप.एक लाख रूपये रोख, चांदीचा पदक प्रशस्तीपत्र असे आहे.
विशेष नैपुण्य पुरस्कार सन 2017 - शिक्षण/कला/सांस्कतिक कार्य किंवा खेळामध्ये दाखविलेल्या विशेष नैपुण्यासाठी 5 ते 18 वयोगटातील मुलांना केंद्र शासनामार्फत हा पुरस्कार दिला जातो. कोणताही  पंचायत/जिल्हा परिषद/म्युनिसिपल कॉपोरेशन/स्थानिक स्वराज्य संस्था/जिल्हाधिकारी/केंद्र शासनाचे कोणतेही विभाग/संसद सदस्य/त्या क्षेत्रातील तज्ज्ञ/विधानसभा/विधान परिषद सदस्य अणि नामवंत स्वयंसेवी संस्था यांचे प्रस्ताव जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सांगली  यांच्या मार्फत, राज्य शासनाच्या शिफारशीसह प्रस्ताव केंद्र शासनास पाठविले जातात. हा पुरस्कार दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी घोषित करुन दिल्ली येथे मा.मंत्री मानव संसाधन विकास मंत्रालय यांच्या मार्फत वितरीत करण्यात येतो.

00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा