शुक्रवार, ९ जून, २०१७

दक्षिण मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

सांंगली, दि. 9, (जि. मा. का.) : दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही भागात येत्या 24 तासात दिनांक 11 जून 2017 सकाळपासून 7 से.मी. ते 11 से.मी. पर्यंत पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याच्या कुलाबा, मुंबई येथील वेधशाळेने दिला आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्रात सातारा, सांगली, सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तरी या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा