गुरुवार, २१ जून, २०१८

सूर्यनमस्कार योगसाधनेने सांगली जिल्ह्यातील बालगावात केली 3 विश्वविक्रमी बुक्समध्ये नोंद

1 लाख 10 हजार योगप्रेमींनी घेतला सहभाग

        सांगली, दि. 21 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील बालगाव येथे जिल्हा प्रशासन गुरूदेवाश्रम बालगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित ऐतिहासिक योग शिबिरात सुमारे 1 लाख 10 हजार योगप्रेमींनी सहभाग घेऊन सूर्यनमस्कार योगसाधना केली. या ऐतिहासिक क्षणाची नोंद जागतिक मान्यताप्राप्त एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, मार्व्हलस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या तीन ठिकाणी झाली आहे. सर्वाधिक लोकांनी एकत्र येवून सूर्यनमस्कार योग साधना करण्याचा हा ऐतिहासिक क्षण असल्याच्या शब्दात वर्ल्ड बुक रेकॉर्डच्या प्रतिनिधींनी मोहोर उमटवली. यावेळी वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत प्रतिनिधींनी याबाबतचे प्रमाणपत्र सुवर्ण पदके सन्मानपूर्वक महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी अन्य उपस्थितांना समारंभाच्या शेवटी प्रदान केली.
        यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषद शिक्षण सभापती तमन्नगौडा रविपाटील, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशीकांत बोराटे, कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामी, गुरूदेवश्रमाचे स्वामी अमृतानंद, ज्ञानयोगाश्रम मठ विजापूरचे सिद्धेश्वर स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, जतचे उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे, तहसीलदार अभिजीत पाटील आदि उपस्थित होते.
        जगाला स्तिमित करणारा हा ऐतिहासिक क्षण असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर योग साधनेला मान्यता मिळवून दिल्याने आज जगभर मोठ्या उत्साहात योग दिन साजरा होत असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी वि. ना. काळम त्यांची टीम, बालगाव आश्रम यांचे इतक्या मोठ्या प्रमाणावर योग साधनेसाठी लोकांना एकत्र आणून सूर्यनमस्कार योग साधनेचा विश्वविक्रम केल्याबद्दल अभिनंदन कौतुक केले. जिल्हा प्रशासनाने एवढ्या मोठ्या जनसमुदायास एकत्र आणून सूर्यनमस्कार करण्यासाठी केलेली व्यवस्था नियोजन हे राज्य आणि देशापुढील एक आदर्श उदाहरण आहे, याबद्दल मी प्रामुख्याने जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांचे कौतुक करतो, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी बालगाव आश्रमाचे अमृतानंद स्वामी राबवत असलेल्या जलसंधारण, नाविन्यपूर्ण पीक पद्धती, योग अभ्यासाबद्दलची जनजागृती याबद्दल गौरवोद्गार काढून राजकारण बाजूला ठेवून अशा लोकोपयोगी कामांमध्ये सर्वांनी आश्रमाला मदत करावी, असे आवाहन केले.
        सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी प्राचीन काळापासून भारतामध्ये योगाभ्यास सुरू असून, निरोगी सुदृढ आरोग्यासाठी दररोज योगाभ्यास सुरू ठेवावा. प्रत्येक माणसाचे आरोग्य निरोगी राहिल्यास कुटुंब पर्यायाने देश सुदृढ होईल, असे सांगितले. तसेच या उपक्रमाबद्दल पालकमंत्री या नात्याने जिल्हा प्रशासन बालगाव आश्रम यांचे अभिनंदन केले.
        कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे, असे सांगून बालगाव येथे सूर्यनमस्कारासाठी विद्यार्थी, शेतकरी, ग्रामस्थ, आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी होऊन, ग्रामीण योग महोत्सव उत्साहात साजरा केल्याबद्दल कौतुक केले.
        खासदार संजय पाटील आणि आमदार विलासराव जगताप यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
        कणेरी (जि. कोल्हापूर) येथील काडसिद्धेश्वर स्वामी यांनी निरोगी  शरीरासाठी दीर्घायुष्यासाठी सेंद्रिय शेतीला पर्याय नसल्याचे सांगितले. रासायनिक खतांना फाटा देऊन जीवामृत, गांडूळ खत, सेंद्रिय खत यांचा वापर करावा, असे सांगून बालगाव येथे स्वामी अमृतानंद चालवत असलेली गोशाळा शेतकऱ्यांना करत असलेल्या मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केले. 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असून, या दिवसाप्रमाणेच सर्वांना दीर्घायुष्य लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त केली.
        प्रास्ताविकात जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी योगविद्या ही जीवन विद्या असून, उत्तम आरोग्यासाठी सर्वांनी तिचा अंगीकार करावा. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची जी परंपरा सुरू केली आहे, त्यास अनुसरून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनातून हा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने संयुक्त विद्यमाने आयोजित केल्याचे सांगितले. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी संबंधितांकडे विश्वविक्रम नोंदणीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येत आहे. त्यावर नियमानुसार कार्यवाही होवून तो विश्वविक्रम प्रस्थापित होईल,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.  या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सभापती तमन्नगौडा रवी पाटील हे जातीने अनेक दिवसांपासून परिश्रम घेत होते. त्यांनी एक हजार शिक्षक स्वयंसेवक विद्यार्थी यांना आवाहन करून या ठिकाणी येण्यासाठी प्रवृत्त केले, याचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. यावेळी त्यांनी शिक्षण, महसूल, पोलीस असे जिल्हा प्रशासनातील सुमारे साडेतीन हजार अधिकारी, कर्मचारी यांनी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. 50 एकर क्षेत्रावर हा उपक्रम घेण्यात येवून यासाठी गेले 3 दिवस नियंत्रण कक्ष 24 तास सुरू आहे. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, जत उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे, तहसीलदार अभिजीत पाटील अन्य अधिकारी, त्यांचे सहकारी, कर्मचारी, बालगाव आश्रमाचे स्वामी अमृतानंद आणि त्यांचे सहकारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच कर्नाटक राज्यातून आलेली जनता सांगली जिल्ह्यातील आलेले विद्यार्थी, शिक्षक, विविध खातेप्रमुख यांचेही या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल आभार व्यक्त केले.
        स्वामी अमृतानंद यांनी योगविद्येचे महत्व विषद करून महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील सर्व सहभाग घेणाऱ्यांचे, मान्यवरांचे स्वागत केले.
        यावेळी विविध पदाधिकारी, अधिकारी, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय वाहिन्यांचे प्रतिनिधी, मुद्रित इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी ही क्षणचित्रे संग्रहित करण्यासाठी उपस्थित होते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा