शुक्रवार, ८ जून, २०१८

‘“Ö»ÖÖ ¯ÖµÖÔ™ü­ÖÖ»ÖÖ’ प्रदर्शन वारसा, इतिहास, संस्कृती यांचे मिश्रण - जिल्हाधिकारी वि. ना. काळम

सांगलीकरांसाठी रविवारपर्यंत प्रदर्शन खुले राहणार

  सांगली, दि. 8, (जि. मा. का.) : “Ö»ÖÖ ¯ÖµÖÔ™ü­ÖÖ»ÖÖ या पर्यटनस्थळांच्या छायाचित्र प्रदर्शनातून आपला वारसा, इतिहास, संस्कृती यांचे एकत्रित मिश्रण मांडण्यात आले आहे. सांगलीकरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची सफर आवर्जून करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी आज येथे केले.
येथील कै. पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मारक समितीच्या प्रदर्शन दालनामध्ये आयोजित चला पर्यटनाला या छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पद्मश्री विजयकुमार शहा, कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक सतीश लळीत, डॉ. सई लळित, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, सांगली जिल्ह्यातील अनेक ऐतिहासिक वास्तुंचे सौंदर्य, त्यांचा इतिहास या छायाचित्रांमधून उलघडला गेला आहे. तसेच, कोल्हापूर जिल्ह्यातील सुद्धा ऐतिहासिक स्थळे, स्मारके, अप्रतिम दऱ्याखोरी, मंदिरे यातून इतिहासाचे स्मरण घडते. याबरोबरच देशातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गमधीलही अनेक पर्यटनस्थळे पाहणाऱ्याचे मन मोहून घेत आहेत.
'चला पर्यटनाला' हा माहिती विभागाचा स्तुत्य उपक्रम असल्याचे स्पष्ट करुन जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, या प्रदर्शनाच्या निर्मितीमध्ये अथक मेहनत आणि कष्ट घेतले असून जिल्ह्यातील महत्वाची पर्यटन स्थळांची देखणी, सुबक छायाचित्रे संक्षिप्त माहिती आणि आकर्षक टॅगलाईन देण्यात आली आहे. या प्रदर्शनामुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची ठिकाणे, माहिती लोकांना होईल आणि पर्यटनासाठी सहाय्यभूत ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रदर्शनाच्या देखण्या आयोजनाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. हे प्रदर्शन जिल्ह्याबरोबरच तालुकास्तरावरही आयोजित करण्याचे सूचित केले.
माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी या प्रदर्शनाविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, चला पर्यटनाला हे छायाचित्र प्रदर्शन 8 ते 10 जून 2018 या कालावधीत मोफत खुले ठेवण्यात आले आहे. या प्रदर्शनात कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी 50 पर्यटनस्थळांच्या अशा 150 छायाचित्रांची मांडणी केली आहे. या छायाचित्र प्रदर्शनामध्ये 'ऐतिहासिक कोल्हापूर', 'सांगली, बहु चांगली' तर 'रमणीय सिंधुदुर्ग' अशी  संकल्पना राबवून कोल्हापूर विभागातील 150 निवडक ऐतिहासिक, धार्मिक, निसर्ग पर्यटनस्थळांच्या छायाचित्रांची निवड करण्यात आली आहे. प्रदर्शनातील प्रत्येक छायाचित्राचे अनुरुप शब्दात वर्णन करण्यात आले आहे.
 जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी स्वागत केले. तर माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी आभार मानले.
पर्यटनस्थळांची सफर
हे प्रदर्शन दि. 8 ते 10 जून या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत मोफत खुले राहणार आहे. कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयातर्फे आयोजित या प्रदर्शनात कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येकी 50 पर्यटनस्थळांच्या अशा 150 छायाचित्रांचा समावेश आहे.
या प्रदर्शनामध्ये सांगली जिल्ह्यातील श्री गणेश मंदिर, बलवडी येथील क्रांतीवन, सागरेश्वर अभयारण्य आणि मंदिर, राजेवाडीचा ऐतिहासक तलाव,  तासगावचा रथोत्सव, कडेगावचा मोहरम, हरिपूर संगम, स्मारके, स्वतंत्रपूरचे खुले कारागृह शिराळ्याची नागपंचमी, यशवंतराव चव्हाण, ग. दि. माडगूळकर आणि अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक, रेवणसिद्ध मंदिर तर कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर, राजर्षि शाहू महाराज जन्मस्थळ, रंकाळा तलाव, तिलारी येथील स्वप्नवेल पॉइंट, सरसेनापती प्रतापराव गुर्जर स्मारक, खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर, नृसिंहवाडी, आजरा येथील रामतीर्थ आदि आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नयनरम्य सागरकिनारे, खाद्यसंस्कृती, मंदिरे आदिंची मांडणी छायाचित्रांमधून करण्यात आली आहे.
00000




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा