बुधवार, २ मे, २०१८

पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक : प्रसार माध्यमांनी प्राधिकारपत्रासाठी 5 मे पर्यंत छायाचित्रे सादर करावीत

सांगली, दि. 2, (जि. मा. का.) : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 26 एप्रिल 2018 च्या प्रसिध्दी पत्रकान्वये 285-पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. प्रसिध्दी माध्यमांच्या ज्या प्रतिनिधींना या पोटनिवडणुकीकरिता प्राधिकारपत्रे हवी असतील, अशा प्रतिनिधींनी आपली नावे, आपल्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राच्या 2 प्रतीसह (मतदान / मतमोजणी दोन्ही प्राधिकारपत्रे हवी असल्यास 3 प्रतींसह) जिल्हा माहिती कार्यालय, सांगली या कार्यालयाकडे दिनांक 5 मे 2018 अखेर सादर करावीत.
या पोटनिवडणुकीसाठी  दिनाक 28 मे 2018 रोजी मतदान होणार असून मतमोजणी दिनांक 31 मे 2018 रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमिवर मतदान, मतमोजणीचे वृत्तसंकलन, छायाचित्रण करण्याकरिता विविध प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींना भारत निवडणूक आयोगाची विहीत प्राधिकारपत्रे प्रथम प्राप्त करणे आवश्यक आहे. अशी प्राधिकारपत्रे प्राप्त होण्याकरिता भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या इच्छुक प्रतिनिधींच्या नावांच्या शिफारशी भारत निवडणूक आयोगाकडे पोहोचण्याचा अंतिम दिनांक 11 मे 2018 असून या शिफारसी महासंचालक, माहिती जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई यांनी दिनांक 10 मे 2018 पर्यंत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, मुंबई यांच्याकडे सादर करावयाच्या आहेत. तरी इच्छुक प्रसिध्दीमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आपली छायाचित्रे संपादकांचे नियुक्ती पत्र किंवा अधिस्वीकृतीपत्रिकेच्या छायांकित प्रतीसह जिल्हा माहिती कार्यालय, तळमजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, सांगली या कार्यालयास दिनांक 5 मे 2018 पर्यंत सादर करावीत.
छायाचित्राशिवाय तसेच विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेली मागणी स्वीकारण्यात येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा