गुरुवार, १७ मे, २०१८

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जत तालुक्यात आवंढी येथे उत्स्फूर्त स्वागत

   सांगली, दि. 18, (जि.मा.का.) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जत तालुक्यातील आवंढी येथे हेलिपॅडवर मान्यवरांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, प्रभारी जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा आदि मान्यवर उपस्थित होते.
   यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन 
स्वागत केले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, जतचे उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले, तहसिलदार अभिजीत पाटील आदि उपस्थित होते.
00000










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा