सोमवार, २८ मे, २०१८

जिल्ह्यात गुरूवारपासून तंबाखू विरोधी सप्ताह

सांगली, दि. 28 (जि. मा. का.) : जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून 31 मे हा दिवस पाळला जातो. त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दिनांक 31 मे ते 6 जून 2018 या कालावधीत तंबाखू विरोधी सप्ताह राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ए. व्ही. सोनटक्के यांनी दिली.
या सप्ताहअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 31 मे 2018 रोजी तंबाखू विरोधी सप्ताहाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. जिल्हा रूग्णालय उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालयामध्ये दिनांक 31 मे 2018 रोजी सकाळी 11 वाजता तंबाखू विरोधी शपथ घेण्यात येणार आहे. तसेच हृदयरोग मौखिक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. दिनांक 5 जून 2018 रोजी दंतशल्य चिकित्सक, सलाम मुंबई, कॅन्सर वॉरियर इतर स्थानिक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, हृदयरोग तज्ज्ञ, नाक-कान-घसा तज्ज्ञ इत्यादींच्या मदतीने हृदयरोग मौखिक कर्करोगासंबंधी तपासणी केली जाणार आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा