बुधवार, १६ ऑगस्ट, २०१७

पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते ‘विकासाची वाटचाल’ घडीपत्रिकेचे प्रकाशन जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या विकासाची ¾ÖÖ™ü“ÖÖ»Ö या घडीपत्रिकेत सांगली जिल्ह्यात झालेल्या विविध विकासकामांची माहिती देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना शासकीय उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही घडीपत्रिका उपयोगी ठरणार आहे, असे प्रतिपादन सहकार, पणन वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालय, सांगलीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विकासाची ¾ÖÖ™ü“ÖÖ»Ö या घडीपत्रिकेच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. भारतीय स्वातंत्र्याच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी वि. ना. काळम, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, अप्पर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर अन्य मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विकासाची ¾ÖÖ™ü“ÖÖ»Ö या घडीपत्रिकेत राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या सांगली जिल्ह्यात झालेल्या अंमलबजावणीचा सचित्र संक्षिप्त आढावा घेण्यात आला आहे. यामध्ये  कर्जमाफी, सातबारा संगणकीकरण, महाराजस्व अभियान, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, बालकांच्या मोफत गंभीर हृदय शस्त्रक्रिया, नाम योजना, जलयुक्त शिवार अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, शासकीय इमारती, वृक्षलागवड, पोलीस दलाचा विधायक उपक्रम, हागणदारीमुक्त सांगली जिल्हा आर्थिक समावेशन या योजनांचा समावेश आहे.
माहिती महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या संकल्पनेतून सर्व जिल्ह्यात अशा घडीपत्रिका तयार करून स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर त्यांचे प्रकाशन करण्यात आले आहे. संचालक अजय अंबेकर आणि शिवाजी मानकर, कोल्हापूर विभागाचे उपसंचालक सतीश लळित यांचे यासाठी मार्गदर्शन लाभले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा