रविवार, ६ ऑगस्ट, २०१७

केमिस्ट असोसिएशनचे प्रश्न मार्गी लावण्यास कटिबध्द - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : राज्यातील असोसिएशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
सांगली जिल्ह्यातील विटा येथे केमिस्ट असोसिएशनच्या राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार जगन्नाथ शिंदे, आमदार अनिल बाबर, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, उपविभागीय अधिकारी अश्विनी जिरंगे, वैभव पाटील, केमिस्ट असोसिएशनचे राज्य अध्यक्ष विजय पाटील,  माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, गोपीचंद पडळकर आदि मान्यवर उपस्थित होते.
अँटीबायोटीक रेझिस्टन्स या थीम वरील या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन झाल्याचे जाहिर करून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, औषध विक्रीचा व्यवसाय करताना नफ्याबरोबरच ग्राहकांच्या समाधानाचा विचार होणे आवश्यक आहे. व्यावसायिक नफ्याबरोबर व्यवसायाचा दर्जा वृध्दिंगत होण्याच्या दृष्टीने राबवण्यात आलेले पेशंट कौंसिलिंग सेंटर, ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर यासारखे उपक्रम स्तुत्य आहेत. औषधावरील कर परिषदेचे अन्य प्रश्न मार्गी लावण्यास कटिबध्द असल्याचे सांगून त्यांनी यावेळी या परिषदेश शुभेच्छा दिल्या.
आमदार जगन्नाथ शिंदे म्हणाले, ऑल इंडिया ऑर्गेनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट ही देशातील मोठी संघटना आहे. या संघटनेचे राज्यभरात 72 हजार सभासद आहेत. मात्र या क्षेत्रात सध्या इंटरनेट फार्मसी या प्रणालीचे युवा पिढीला धोके आहेत. त्यामुळे या प्रणालीबाबत योग्य तो विचार व्हावा.
प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केले. सांगली जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष विनायक शेटे यांनी स्वागत केले. या कार्यक्रमास केमिस्ट असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000














कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा